सर्जेकोट किल्ला , सर्जेकोट बंदर , शिंपला बेट

व्लॉगर पाटील's picture
व्लॉगर पाटील in भटकंती
18 Jan 2021 - 9:59 am

सर्जेकोट किल्ला , सर्जेकोट बंदर , शिंपला बेट

तीन दिवसाच्या स्वर्गीय कोकणच्या रोडट्रीप मध्ये आज जातोय तिसऱ्या दिवसाच्या प्रवासावर, आज आम्ही जातोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण जवळ असलेल्या सर्जेकोट या गावात. मालवण पासून ९ किलोमीटर असलेलं हे गाव. तळाशील नदी आणि अरबी समुद्राच्यावर संगमावर असलेलं हे गाव . इथे १६६८ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सर्जेकोट किल्ला आहे तसेच सर्जेकोट बंदर , शिंपला बेट , कवडा बेट अशी ठिकाणे पाहायला मिळतात.

सर्जेकोट किल्ला - छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६८ च्या दरम्यान सिंधुदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी ३ किल्ले बांधले, राजकोट , पद्मदुर्ग आणि हा सर्जेकोट. मुख्यतः पावसाळयाच्या दिवसात किंवा जर वादळे आली तर जहाजांना मुक्कामासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात होता. किल्याला मुख्य प्रवेश द्वार, चारही बाजूने तटबंदी , बुरुज आहेत. आत राजवाड्याचे अवशेष आणि त्याच्या तटबंदीवर पण बुरुज पाहायला मिळतात. वाड्यात एक जुने तुळशी वृंदावन, एक छोटी विहीर आणि तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्यापण आहेत. सागरी किनारपट्टी असल्यामुळे इथे नारळाची बाग आहे आणि सोबतच भरपूर झाडे पण आहेत.

सर्जेकोट बंदर - इथेच एक छोटंसं बंदर पण आहे. स्थानिक लोक याचा मच्छीमारी साठी उपयोग करतात. तसेच वॉटर स्पोर्ट साठी इथे एक क्लब आहे. ते लोक कवडा बेटा जवळ स्कुबा डायविंग साठी घेऊन जातात.

शिंपला बेट - किनारपट्टीच्या जवळ च असलेलं शिंपला बेट. या बेटावर भरपूर प्रमाणात शिंपले आहेत त्यामुळेच या खडकाळ बेटाला शिंपला बेट म्हणतात. तसेच हि एक इथली विशेष जागा आहे कारण इथूनच आपणाला सर्जेकोट किल्ला, सर्जेकोट बंदर , तळाशील आणि समुद्राचा संगम , तळाशील बीच , तोंडिवली बीच , कवडा बेट , सुवर्ण कडा असा एक विहंगम दृश्य दिसते.

या सगळ्या सोबतच इथल्या स्थानिक मच्छिमारासोबत गप्पा मारल्या , त्यांच्या मासेमारी आणि माशांची माहिती जाणून घेतली. अधिक माहिती साठी संपूर्ण विडिओ नक्की पहा.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

18 Jan 2021 - 11:33 am | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

व्लॉगर पाटील's picture

18 Jan 2021 - 5:18 pm | व्लॉगर पाटील

धन्यवाद !!!

गोरगावलेकर's picture

18 Jan 2021 - 2:13 pm | गोरगावलेकर

तिसऱ्या दिवसाचीही भटकंती आवडली.
व्हिडिओही छान .

व्लॉगर पाटील's picture

18 Jan 2021 - 5:18 pm | व्लॉगर पाटील

धन्यवाद !!!

चौथा कोनाडा's picture

18 Jan 2021 - 8:49 pm | चौथा कोनाडा

व्वा, एकदम भारी !
+१

व्लॉगर पाटील's picture

18 Jan 2021 - 9:39 pm | व्लॉगर पाटील

धन्यवाद !!!

कपिलमुनी's picture

19 Jan 2021 - 12:52 am | कपिलमुनी

या सीरीज मधील भटकंतीच्या लिंक्स एकत्र द्यायला हव्या होत्या