मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फोटोयुक्त लेखनाची नवी रेसिपी

टर्मीनेटर · · तंत्रजगत
नमस्कार मिपाकरांनो, मिपावर लेखनात फोटो समाविष्ट कसा करावा? हा प्रश्न वारंवार विचारला जातो. वास्तविक ह्या विषयावर खाली दिलेले दोन उपयुक्त धागे मिपावर उपलब्ध आहेत. मिपावर चित्रे टाकण्याची कृती - डॉ. सुहास म्हात्रे गूगल ड्राइव'वरचे फोटो, ओडिओ, विडिओ वेबसाईटवर देणे - कंजूस परंतु तरीही काही कारणांमुळे जसे की गुगल नियमितपणे आपली वेब आणि मोबाईल apps अपडेट करत असल्याने लेखनात फोटो समाविष्ट करण्यात अनेक मिपाकरांना अडचण येते. ती अडचण दूर करण्यासाठी स्क्रीनशॉट्स सहित, शक्य तेवढ्या सोप्या भाषेत एक ट्युटोरीयलवजा लेख लिहिण्याचा प्रयत्न करतोय. ह्या लेखात आपण गुगल फोटोज आणि फेसबुक वरून फोटो समाविष्ट कसा करावा ह्याची माहिती घेऊ. अर्थात विशिष्ठ विषयावरील लेखात द्यायचे फोटो, स्क्रीनशॉट्स, आकृत्या इत्यादी कोणी फेसबुकवर पोस्ट करत नसल्याने त्यासाठी शक्यतो गुगल फोटोजचा पर्याय वापरावा आणि प्रवास (पर्यटनस्थळे), उत्सव, समारंभ, स्वनिर्मित कलाकृतींचे फोटो जे सहसा फेसबुकवर पोस्ट केले जातात ते तेथून समाविष्ट करणे उत्तम. गुगल फोटोज वरून फोटो समाविष्ट कसा करावा: १) सर्वप्रथम आपल्या डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅब्लेट किंवा मोबाईलच्या ब्राउझर मधे https://photos.google.com ही साईट उघडून तिथे लॉगीन करावे. ह्या लिंक वर क्लिक केले तरी चालेल ती नवीन टॅब मधे उघडेल. [ टॅब्लेट किंवा मोबाईल मधील आणि आपल्या डेस्कटॉप, लॅपटॉप वरील (install केलेले असल्यास ) गुगलचे Photos हे App उघडू नका, त्यात फोटोची डायरेक्ट लिंक मिळवण्याची सुविधा आता उपलब्ध नाही. ] २) आता टॉप बार वरील उजवीकडे दिसणाऱ्या upload button वर क्लिक करून जे फोटो लेखात द्यायचे असतील ते अपलोड करा. (ते आधीच अपलोड केलेले असतील तर पुन्हा करायची आवश्यकता नाही.) ३) डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅब्लेटच्या डाव्या बाजूला असलेल्या साईड बार मधून आणि फोन वापरत असाल तर टॉप बार वरील ह्या मेनू च्या चिन्हावर क्लिक करून यादीतील Albums हा पर्याय निवडा. menu ४) डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅब्लेटच्या स्क्रीन वर दिसणाऱ्या Create album वर क्लिक करा. create album आणि मोबाईल वर albums च्या शेजारच्या छोट्या चौकटीतील + चिन्हावर क्लिक करा. upload button2 ५) आता Add a title येथे नवीन अल्बम साठी हवे ते नाव लिहा. (इथे मी उदाहरणासाठी Tutorial असे नाव दिले आहे.) title त्यानंतर उजवीकडील वरच्या कोपऱ्यातील वर क्लिक केल्यावर Options सिलेक्ट करून Link sharing समोरील स्लायडर उजवीकडे सरकवून लिंक शेअरिंग ऑन करा, नंतर मध्ये दुसरी पॉपअप विंडो उघडेल ती बंद करा. slider असे केल्यावर खालीलप्रमाणे अल्बमच्या नावाखाली Shared असे लिहिलेले दिसेल, ते दिसणे अत्यंत महत्वाचे आहे अन्यथा लेखात फोटो दिसणार नाहीत. shared आता त्याच पानावर खाली दिसणाऱ्या + Select photos ह्या बटणावर क्लिक केल्यावर जे पान उघडेल त्यावरील सुरुवातीला आपण अपलोड केलेले फोटो किंवा आधीपासून तेथे असलेले फोटोज सिलेक्ट करा. select photos (फोटो सिलेक्ट करण्यासाठी थंबनेलच्या डाव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला अस्पष्ट वर्तुळ दिसेल त्यावर क्लिक करा. थंबनेलचा आकार फोटोच्या आकारानुसार वेगवेगळा असू शकेल.) selected हवे असलेले फोटोज सिलेक्ट करून झाल्यावर वरती उजव्या कोपऱ्यातील Done ह्या बटणावर क्लिक करा. ६) तुमचा शेअर्ड अल्बम आता तयार झाला आहे, त्यातला लेखात समावेश करायचा असलेला फोटो त्याच्या थंबनेल वर क्लिक करून उघडा, आणि त्या पूर्ण पणे उघडलेल्या फोटोवर वर राईट क्लिक केल्यावर जे पर्याय दिसतील त्यातून Copy Image Location अथवा Copy image address हा पर्याय निवडला कि त्या फोटोचे Image URL क्लिपबोर्ड मधे कॉपी होईल. (वरील क्रिया करताना Copy Image हा पर्याय निवडू नये!) ७) आता हे कॉपी केलेले Image URL मिपावर लेखन करत असलेल्या टेक्स्ट एडिटरच्या वरच्या टूलबारच्या डाव्या कोपऱ्यातील Insert/edit image ह्या बटणावर क्लिक करून त्यातल्या Image URL समोर पेस्ट करा. Width x Height येथे फोटोची लांबी आणि उंची नमूद करा. उदा. landscape फोटो साठी 600 X 450 आणि portrait साठी 450 X 600. Alternative text येथे समजा काही तांत्रिक कारणाने फोटो लोड नाही होऊ शकला तर त्या ऐवजी दिसेल असा शब्द लिहा. उदा. झाडाचा फोटो असेल तर त्याठिकाणी झाड किंवा Tree असे लिहावे. insert or edit image एका पेक्षा जास्ती फोटो असतील तर हीच कृती परत परत करावी. फेसबुक वरील फोटो समाविष्ट कसा करावा मोबाईल,टॅब्लेट,डेस्कटॉप, लॅपटॉप साठीच्या Updated App मधे डायरेक्ट लिंक मिळवण्याची सुविधा नसल्याने, डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅब्लेट किंवा मोबाईलच्या ब्राउझर वर https://www.facebook.com ही साईट उघडून तिथे लॉगीन करावे. (टॅब्लेट किंवा मोबाईलच्या ब्राउझर settings मधून Desktop site हा पर्याय निवडावा अन्यथा डायरेक्ट लिंक मिळू शकत नाही. ) फेसबुक वरील फोटो लेखात देताना आपल्या टाईमलाईन वरील किंवा albums मधील हव्या असलेल्या फोटोवर क्लिक करून तो उघडा, आणि त्या पूर्ण पणे उघडलेल्या फोटोवर वर राईट क्लिक केल्यावर जे पर्याय दिसतील त्यातून Copy Image Location अथवा Copy image address हा पर्याय निवडला कि त्या फोटोचे Image URL क्लिपबोर्ड मधे कॉपी होईल. (फेसबुक वरचे आपले फोटो समाविष्ट करताना त्यांना Public access दिलाय कि नाही त्याची खात्री करा, नसेल दिला तर सर्वप्रथम तो द्या अन्यथा फोटो लेखात दिसणार नाहीत.) त्यानंतर मिपावर तो लेखात देण्याची कृती वरील क्रमांक ७ प्रमाणेच आहे. टीप: गुगल फोटोज वरून फोटो समाविष्ट करणे जास्ती फायदेशीर आहे कारण जवळपास सर्वच Intarnet Service Providers कडे ग्लोबल + गुगलची स्वतःची bandwidth असल्याने जास्त साईझचे फोटो असले तरी ते लवकर लोड होतात.

वाचन 49059 प्रतिक्रिया 0