शिव सेने चे बिहार मध्ये काय होणार ?

हस्तर's picture
हस्तर in काथ्याकूट
9 Oct 2020 - 9:29 pm
गाभा: 

शिव सेने चे बिहार मध्ये काय होणार ?

बिहार मधल्या निवडणूक साठी शिव सेने चे सर्व स्टार प्रचारक जाणार आहेत
एक जरी सीट जिंकले तर हवा खूप होईल
आधीच गुप्तेश्वर पांडे ह्यांना तिकीट मिळाले नाही कारण , शिवसेना अशी हवा केलेली आहे
पण...
समजा एक पण सीट मिळते नाही तर ?
३ वर्ष आधी असे झाले होते कि जिथे राहुल गांधी प्रचाराला जाणार तिथे काँग्रेस चा धुवा उडालेला आणि जिथे पाऊल पण टाकले नाही तिथे काँग्रेस जिंती
जर शिव सेने ला जमले नाही तर पत घसरेल
आधीच आज mpsc चा निर्णय खूप उशिरा घेऊन नाचक्की केली आहे

२०१५ मध्ये ४० जागा लढवल्या होत्या पण दुसऱ्या नंबर वर पण कोणी आले नव्हते ह्या वेळी ५० जागा ते पण भाजप आणि भाजप आयटी सेल विरोधात असताना

शेवटी नाचककी महाराष्ट्राची होईल ती पण बिहार मध्ये ,आणि आत्ताच्या काळात जास्त होईल ,एक तरी उमेदवार जिंकायला पाहिजे

प्रतिक्रिया

Rajesh188's picture

9 Oct 2020 - 9:40 pm | Rajesh188

बिहार मध्ये सेनेला 1 पण जागा मिळणार नाही हे जगजाहीर आहे.
निवडणूक फक्त जिंकण्यासाठी लढवली जात नाही त्या मागे बाकी अनेक कारणे असतात.

हस्तर's picture

9 Oct 2020 - 9:42 pm | हस्तर

मान्य

पण नाचक्की?

कानडाऊ योगेशु's picture

9 Oct 2020 - 10:04 pm | कानडाऊ योगेशु

हा शिवसेनेचा राष्ट्रीय राजकारणात चंचुप्रवेश करण्याचा प्रयत्न असावा. राज ठाकरेंची जी पध्दत होती कि कुणाला जिंकवण्यापेक्षा पाडण्यासाठी निवडणुक लढवायची व सभा घ्यायच्या तीच पध्दत शिवसेना वापरते आहे असे वाटते. ह्यात नाचक्की होणार नाही. झाला तर बीजेपीचा तोटाच होईल.

यावेळेस भाजपाचा तोटा होईल का याबाबत साशंक आहे.. कारण शिवसेना आपला *हिंदुत्ववादी पक्ष* हा युएसपी गमावून बसलेय.

त्यामुळे मते फुटली तर विरोधकांची फुटतील..
बाके म्हणजे महाराष्ट्रात युती तुटली हे बरेच झाले म्हणायचे.
आता बिहार आणि गुजरात मध्ये सेना अपशकुन करू शकणार नाही.

370 झाले
मंदिर आले
3 तलाक झाले
राफेल आले

आता लोक शाळा, हॉस्पिटल , रस्ते , व्यवसाय , जीडीपी विचारतील , ते नै जमणार भाजपाला

Gk's picture

10 Oct 2020 - 9:26 am | Gk

शिवसेना म्हणूनच शहाणी झाली आणि हिंदुत्व सोडून भारतीयत्व घेऊन बसली

हिंदुत्व म्हणजे मरायला सेना आणि चरायला भाजप असे झाले होते,
म्हणून ते हिंदुत्वाचे यायातीचे मढे सेनेने टाकून दिले

सॅगी's picture

10 Oct 2020 - 9:59 am | सॅगी

आणि तीन लोचट पक्षांच्या सरकारचे मढे महाराष्ट्राच्या डोक्यावर बसवले.

Gk's picture

10 Oct 2020 - 2:10 pm | Gk

ऑपरेशन लोचट करून करून करणारा दमला आणि नेहरूंच्या एम्स मध्ये आडवा झाला

महासंग्राम's picture

10 Oct 2020 - 2:16 pm | महासंग्राम

List of AIIMS in India

  1. AIIMS Delhi, Est 1956 -
  2. AIIMS Bhopal, Est 2012
  3. AIIMS Bhubaneshwar, Est 2012 -
  4. AIIMS Jodhpur, Est 2012 -
  5. AIIMS Patna, Est 2012 -
  6. AIIMS Raipur, Est 2012 -
  7. AIIMS Rishikesh, Est 2012 -
  8. AIIMS Rae Bareli, Est 2013
  1. AIIMS Mangalagiri, Est 2018
  2. AIIMS Nagpur, Est 2018
  3. AIIMS Bhatinda, Est 2019
  4. AIIMS Deogarh, Est 2019
  5. AIIMS Gorakhpur, Est 2019
  6. AIIMS Kalyani, Est 2019
  7. AIIMS Telangana, Est 2019
  8. AIIMS Madurai, Tamil Nadu
  9. AIIMS Rajkot, Gujarat
  10. AIIMS Vijay Pur, J&K (Jammu Region)
  11. AIIMS Awantipora, J&K (Kashmir Region)
  12. AIIMS Bilaspur, Himachal Pradesh
  13. AIIMS Chandsari, Assam
  14. AIIMS Rewari, Haryana
  15. AIIMS Darbhanga, Bihar
सॅगी's picture

10 Oct 2020 - 2:16 pm | सॅगी

आडवा होउन उभा पण झाला...आहात कुठे...

सॅगी's picture

10 Oct 2020 - 2:20 pm | सॅगी

बाकी तुमच्या खांग्रेसमाता नेहरूंच्या एम्स मध्ये उपचार का घेत नाहीत म्हणे?

Gk's picture

10 Oct 2020 - 2:41 pm | Gk

ते गोरगरिबांना एम्स बेड उपलब्ध ठेवतात व म्हणून स्वतः परदेशात जातात

सॅगी's picture

10 Oct 2020 - 3:30 pm | सॅगी

इतकी वर्षे राज्य करुन गरिबी हटलीच नाही म्हणजे...

Gk's picture

10 Oct 2020 - 4:10 pm | Gk

मग मोदींनी 10 चे 20 एम्स केले ते कुणासाठी ?

आणि बाष्प वापरून पाणी करणार आहेत मोदीजी तर मग प्रत्येक संडासवर ते लावले असते तर 80 % संडास पाण्या अभावी बंद आहेत , ते बंद नसते पडले

नमो नमो

सॅगी's picture

10 Oct 2020 - 4:15 pm | सॅगी

कोणामुळे करावे लागले?

गरिबी हटाव चा चुनावी जुमला देऊन तुम्ही एवढी वर्षे सत्ता उपभोगली, गरिबी काही हटलीच नाही ना??

Gk's picture

10 Oct 2020 - 5:24 pm | Gk

आणि मग मोदींजींचे 5 ट्रीलीयन 2014 पासून उपजले की काय ?

सॅगी's picture

10 Oct 2020 - 6:00 pm | सॅगी

१० चे २० एम्स केले तेव्हापासून...

रमेश आठवले's picture

12 Oct 2020 - 2:58 am | रमेश आठवले

ही ८०% टक्केवारी कुठून उपलब्ध झाली ? संदर्भ द्या..

महासंग्राम's picture

10 Oct 2020 - 2:21 pm | महासंग्राम

नेहरू गांधी (ओरिजिनल वाले ) सोडून सध्याचे गांधी (डुप्लिकेट वाले ) यांनी काय केलं ते पण सांगा

वर्तमानातल्या नेत्यांवर टिका करतांना वर्तमानातल्या नेत्यांबद्दलच बोला कि जरा ?

Gk's picture

11 Oct 2020 - 9:54 am | Gk

सध्याचे गांधी केवळ एक खासदार आहेत , तसे भाजपाचे 330 आहेत , मनेका , वरुण आहेत तसे, त्यांचे कर्तृत्व त्यांच्या मतदार संघापुरते ,

आणि निवडणूक काय , तशी मोदीजी शहाजी महाराष्ट्रातही हरलेत

गांधी सध्या गृहमंत्री अर्थमंत्री पंत प्रधान वगैरे नाहीत , प्रश्न सत्ताधार्याना विचारायचे असतात

महासंग्राम's picture

12 Oct 2020 - 10:06 am | महासंग्राम

प्रश्न सत्ताधार्याना विचारायचे असतात

हो ना मग नेहरूंचा उल्लेख तो कशासाठी ?

नेहरू आता हयात आहे का ?

Gk's picture

12 Oct 2020 - 1:03 pm | Gk

तुमचे कोण इतिहासातील असतील तर तुम्हीही उल्लेख करा

महासंग्राम's picture

12 Oct 2020 - 2:55 pm | महासंग्राम

आम्ही वर्तमानावर विश्वास ठेवणारे भूतकाळात रमणारे नाहीत

कानडाऊ योगेशु's picture

10 Oct 2020 - 11:26 am | कानडाऊ योगेशु

आणि हिंदुत्व सोडून भारतीयत्व घेऊन बसली

दै.सामनाची टॅगलाईन जोपर्यंत "ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेक दैनिक" जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तरी तुम्ही म्हणता ते मानणे मूर्खपणाचे ठरेल.

महासंग्राम's picture

10 Oct 2020 - 2:11 pm | महासंग्राम

स्वातंतत्र्यानंतर एकूण किती एम्स आणि IIT /IIM बनवले गेले/?

कानडाऊ योगेशु's picture

9 Oct 2020 - 10:05 pm | कानडाऊ योगेशु

हा शिवसेनेचा राष्ट्रीय राजकारणात चंचुप्रवेश करण्याचा प्रयत्न असावा. राज ठाकरेंची जी पध्दत होती कि कुणाला जिंकवण्यापेक्षा पाडण्यासाठी निवडणुक लढवायची व सभा घ्यायच्या तीच पध्दत शिवसेना वापरते आहे असे वाटते. ह्यात नाचक्की होणार नाही. झाला तर बीजेपीचा तोटाच होईल.

रमेश आठवले's picture

11 Oct 2020 - 8:44 am | रमेश आठवले

स्वतःचे नाक कापुन घेऊन भाजपाला अपशकुन करण्याची धडपड दिसते,

Gk's picture

11 Oct 2020 - 9:48 am | Gk

ते राम मंदिर भाजपाला पावले नाही , त्याचा निकाल आला आणि दुसऱ्या दिवशी सेना भाजप फुटले , आधी वाटले होते फक्त महाराष्ट्रात असेल , आता सगळीकडेच फुटत चाललेत

सामान्यनागरिक's picture

14 Oct 2020 - 11:05 am | सामान्यनागरिक

ही बातमी वाचल्यावर थोडेसे हसून सोडून द्यावी

तुमच्या आमच्या सारख्या लोकांनी दखल घेऊन त्यावर चर्चा करण्यात वेळ घालवावा अशी बातमी नव्हे.

शाम भागवत's picture

10 Oct 2020 - 9:22 am | शाम भागवत

धृविकरण योग्य दिशेने चाललंय.
पूर्वीसुध्दा असंच होत आलंय.

यामधे भाजप किंवा शिवसेना यापैकी एक पक्ष मोठा होणार व दुसरा गलीतगात्र. तर काँग्रेस व राष्ट्रवादी यांना तगून राहायला बळ मिळणार.

मुंबई मनपाच्या निवडणुकांत चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत शांतपण् पाहत राहऩार.
😀

शिवसेनेने ज्वलंत हिंदुत्व, जे राष्ट्रवादी मुस्लीम व राष्ट्रवादी इसायांच्या विरोधी नसेल ते चालू ठेवावे आणि दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादाचा व देश प्रेमाचा ढोल बडवावा. कॉंग्रेस चा मुळ गाभा देशभक्ती होता, सेक्युलॅरिझम म्हणजे हिंदू विरोध या नादात कॉंग्रेस ते हरवत चालली आहे. भाजपाच्या 'भाजप म्हणजेच हिंदूत्व, भाजप म्हणजेच देश, भाजप म्हणजेच राष्ट्रभक्ती' या प्रचाराला कॉंग्रेस जोवर कॉंग्रेस ठोस उत्तर देत नाही तोवर अवघड आहे. शिवसेनेनं बिहार निवडणुकीत नुसता सुशांत सिंह राजपूत न वापरता बिहार चा विकास रखडला आहे ते ठळक करावं.

Gk's picture

10 Oct 2020 - 6:31 pm | Gk

भारतात केवळ हिंदूंनाच राहण्याचा अधिकार आहे किंवा इथे फक्त हिंदूचंच म्हणणे ऐकून घेतले जाईल असं आपल्या राज्यघटनेत म्हटलेलं नाही. कारण आपली संस्कृती आहे आणि ती संस्कृती म्हणजे हिंदू आहे असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. ‘विवेक’ साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीवेळी ते बोलले आहेत. जगात भारतीय मुस्लीम सर्वाधिक समाधानी आहेत असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/rss-mohan-bhagwat-on-hindu-mus...

नीलस्वप्निल's picture

10 Oct 2020 - 2:30 pm | नीलस्वप्निल

बिहार निवड्णूकीमधे लो.ज.पा. बहुमताने जिन्केल....

रमेश आठवले's picture

11 Oct 2020 - 7:11 am | रमेश आठवले

ठाकरे कुटुंब हे मुळात बिहारी आहेत. ते स्थलांतर करून मराठी प्रदेशात स्थाईक झाले, असे खुद्द प्रबोधकार ठाकरे यांनी लिहून ठेवले आहे. याचा फायदा शिवसेनेला नक्की होईल. निकालांनंतर लालू पक्षाशी युती करुन आदित्यला बिहारचा मुख्य मंत्री करता येईल.

Gk's picture

11 Oct 2020 - 8:19 am | Gk

आधीच एका पक्षाचे चिन्ह बाण आहे , म्हणून सेनेला बिस्कीट हे चिन्ह मिळाले

रमेश आठवले's picture

11 Oct 2020 - 8:41 am | रमेश आठवले

निवडणुकीचा येणारा निकाल लक्षात घेता भोपळा हे चिन्ह सयुक्तिक ठरले असते.

इरसाल's picture

14 Oct 2020 - 1:40 pm | इरसाल

ते नाही का रडक्या पिर्पिर करणार्‍या पोराला गप करण्यासाठी "बिस्कीट" देतात. तसच दिलेलं दिसतय.

शिवसेनेचे बिहार मध्ये काय होईल माहित नाही, अपेक्षा पण का करावी? आणि त्या बाबत चर्चा करून पुन्हा भाजप कशी भारी किंवा शिवसेनेने हिदुत्व सोडले वगैरे चर्चा करण्यात काय पॉईंट?
कोणता पक्ष बिहार मधील प्रगतीचे मुद्दे.. शिक्षण आणि उद्योगधंदे आणि त्या अनुशंघाने नविन विचार घेऊन लढतोय हे महत्वाचे...
महाराष्ट्र 2019 निवडणूक जशी आधीच्या सत्ताधारी पक्षाने 370, काश्मीर आणि लोकल मुद्दे न मांडता प्रगती चे मुद्दे न मांडता लढवली तसे कुठेच होऊ नये अशे वाटते..

मी बिहार निवडणुकीमध्ये
पुष्पम प्रिया चौधरी यांच्या किती सीट येतायेत ते पाहीन..

शिवसेनेचे 0 आले तरी काही फरक पडणार नाही तेथे..
परंतु प्लुरल्स चा राजकीय उद्य बिहार सारख्या राज्यात होतोय का?
तेथील जनतेला काय वाटते या बाबतचे तेथील मत आणि इतर हे नक्की ऐकायला आवडेल..

"समर शेष है। बिहार है तो सम्भव है और बिहारी हैं तो क्या सम्भव नहीं है! #ChooseProgress #बिहार_का_खोंयछा"
- पुष्पम प्रिया चौधरी.

वे बिहार से राजनीति करते हैं और हम बिहार से प्यार क्योंकि प्यार करने के लिए हौसला चाहिए और वो तो सिर्फ़ हममें है प्यार करने का, लड़ने का, जीतने का और बिहार बदलने का! #LoveBiharHatePolitics #PositivePoliticsBihar2020
- - पुष्पम प्रिया चौधरी.

ना उम्र की सीमा हो न जन्म का हो बंधन! स्टेरीओटाइप को तोड़िए, आप किसी भी जाति-धर्म के हों, पुरुष-स्त्री-ट्रांसजेंडर हों, विवाहित-अविवाहित हों, मुझे खोंयछा दें, बिहार को बिहार के भविष्य के लिए - ताकि फिर कोई बिहार को पिछड़ा न कहे, ताकि फिर बिहार को बीमारु कहने की किसी की हिम्मत न हो, ताकि फिर बाहर बिहार का स्वाभिमान गर्व से दमकता रहे! #LetsOpenBihar #30YearsLockdown #ChooseProgress
- - पुष्पम प्रिया चौधरी.

Gk's picture

11 Oct 2020 - 10:03 am | Gk

तिच्या पार्टीचे 60 पैकी 28 अर्ज अवैध ठरले.

पहिल्याच बॉलमध्ये आउट

गणेशा's picture

11 Oct 2020 - 10:33 am | गणेशा

ओह..
जास्त follow केले नाही मी अजुन..

पण उम्मेदवारांची list आणि त्याचे शिक्षण बघितले तर सर्व educated लोक आहेत उभे राहिलेले.. डॉक्टर, प्रिन्सिपल असे..
हा बिहार मधील बदल चांगला वाटत आहे..

बाकी जास्त माहिती नाहीये.. बातम्या पाहत नसल्याने जास्त माहिती नाहीच..

उदा. म्हणुन माझ्याकडील list चे एक पान देतो..
Education matters,

1