अमरनाथ-वैष्णोदेवी-अमृतसर - 2012 - भाग 3

नयना माबदी's picture
नयना माबदी in भटकंती
7 Oct 2020 - 4:23 pm

अमरनाथ-वैष्णोदेवी-अमृतसर - 2012 - भाग 3

24 जुन 2012

चहा -नाश्ता करुन आम्ही आंघोळीला गेलो. त्या लोकांनी आम्हाला गरम पाणी दिले होते पण थंडी इतकी जास्त होती कि पाणी लगेच गार होत होते.
आम्ही आंघोळीला गेलो त्याच वेळेला जोरदार पाउस सुरु झाला. अगोदरंच थंडी त्यात पाउस. आम्हाला नीट आंघोळ करताच आली नाही. कसेतरी दोन तांबे अंगावर घेतले आणि आलो बाहेर.

आंघोळ उरकुन जेउन आम्ही बालताल फ़िरण्यासाठी बाहेर पडलो. बालताल हे अमरनाथ यात्रेसाठी मुख्य तळ आहे. सोनमर्गजवळ सिंध नदीच्या काठी सुंदर बालताल खोरे वसलेले आहे.त्याची समुद्र्सपाटी पासुन उंची 2743 मीटर आहे.सिंधच्या पाण्यामुळे, विखुरलेल्या हिरवाईने आणि बर्फाच्छ्दित पर्वतंरागांमुळे , ही दरी निसर्गप्रेमींसाठी नंदनवन मानली जाते.बालतालच्या अस्थिर प्रदेश आणि निर्जन जागेमुळे त्याला वारंवार ट्रेकिंग आणि कॅम्पिंग साइट बनविण्यात हातभार लागला आहे.
बालताल व्हॅलीचा नयनरम्य परिसर फोटोग्राफरमध्येही लोकप्रिय आहे वर्षंभर इथे वातावरण सुखद असते.

(बालताल छावणी येथील काही दृष्य)

बालतालमध्ये ठिकठिकाणी भंडारे लागले होते. आपण कोणत्याही भंडारामध्ये जाउन जेवु शकतो.

(आम्ही थांबलेलो तो भंडारा)

आम्ही आधी बुट घेउन आलो जे आम्हाला फक्त 150 रुपयात मिळाले. जागोजागी सैनिकांचा पहारा होता. आपले सैनिक तिथे डोळ्यात तेल घालुन आपली यात्रा सुरक्षित व्हावी म्हणुन पहारा देत होते हे पाहुन मन भरुन आले. आम्ही तेथील एका सैनिकासोबत फोटो काढण्याची इच्छा प्रकट केली, ते आधी नाही म्हणु लागले. मग तो फोटो सोशल मिडीयावर कुठेही टाकणार नाही अस आम्ही त्यांना सांगितल्यावर ते तयार झाले.

थोड इकडेतिकडे फिरुन आम्ही आमच्या रुमवर आलो. निघायची सर्व तयारी करुन आम्ही 9 वाजताच जेवुन झोपुन गेलो.

(भंडा-यामधे जेवताना)

25 जुन 2012

रात्री 2 वाजता आम्ही उठलो. सकाळी 7-8 वाजता निघण्यापेक्षा आम्ही रात्री 3 वाजता निघणार होतो. त्यामुळे गर्दीही कमी मिळाली असती व आम्ही लवकर दर्शन घेउन आलो असतो. उठुन प्रात:विधी आटपुन आम्ही तयारीला लागलो. हाडे गोठवणारी थंडी होती त्यामुळे आम्ही आधी आपली अंर्तवस्त्रे मग त्यावर थर्मल , टी-शर्ट, स्वेटर , जाकीट व त्यावर रेनकोट, हातात हातमोजे, कानात कापुस , मग कानटोपी , जाड मोजे आणि बुट अशी जय्यत तयारी करुन बाहेर पडलो. चहा नाश्ता करुन आम्ही निघालो. आमच्या भंडाराच्या बाहेरच घोडेवाले,पालखीवाले , सामान नेण्यासाठी पिठ्ठु जमले होते, ज्यांना घोडे किंवा पालखीने जायचे असल्यास इथुनच ठरवुन जावे लागते. आम्ही पायी जाणार होतो, म्हणुन पुढे निघालो.

जिथपर्यंत भंडारे होते तिथपर्यंत दिव्यांचा उजेड सोबत होता, मग अंधार सुरु झाला. विजेरीच्या उजेडावर बम बम भोले करत आम्ही निघालो.
बालताल मार्ग खालील प्रमाणे

बालताल - दोमेल - (2 किमी)

दोमेल ते बराडी - ( 5 किमी)

बराडी ते संगम - (4 किमी)

संगम ते पवित्र गुफा - (3 किमी)

(यात्रेचा मार्ग)

पाऊस पडत असल्यामुळे रस्त्यावर संपूर्ण चिखल झाला होता. आम्ही हळुहळु चालत होतो. दोमेल पार झाल्यानंतर उजडायला सुरुवात झाली. निसर्गाने त्याच रुपड दाखवायला सुरुवात केली. सगळीकडे धुके पसरले होते. सतत पाऊस सुरु होता त्यामुळे थंडीही वाढली होती, रस्ता निसरडा झाला होता. हा रस्ता खुप लहान आहे. एका बाजुला डोंगर आणि एका बाजुला दरी. जेमतेम 4 माणस एकत्र चालु शकतील एवढाच रस्ता आहे आणि यातुनच घोडेवाले हि ये-जा करतात. जरा दुर्लंक्ष केल तर आपण खाली दरीत पडु शकतो.

(पावसाने चिखलमय झालेला रस्ता)

(यात्रेचा मार्ग)

दोमेलपासुन पुढे कठीण चढाई सुरु होते. दोमेलपासुन बराडीपर्यंत यात्रेकरुंसाठी कोठेही थांबण्यासाठी जागा नाही. हि चढाई करता करता आम्ही दमलो. मुखाने बम बम भोले करत आम्ही चाललो होतो. जे लोक दर्शन करुन येत होते ते आम्हाला बस अजुन थोडच दुर आहे म्हणुन दिलासा देत होते. बराडीपर्यंत पोहचेस्तोवर आमची हालत खराब झाली होती. आम्ही हातात लोकरीचे मोजे घातले होते आणी ते पावसांमध्ये पूर्ण भिजले. थंडी इतकी होती कि आमचे हात सुन्न झाले होते. बराडी पोहचल्यावर एका लहानश्या टपरीवर चहा घेतला, थोड बर वाटल. पुन्हा चालायला सुरुवात केली.

(चहा घेण्यासाठी थांबलेलो आम्ही, सर्वात शेवटी मी)

(बराडी ते संगम मार्गावरील एक ठिकाण)

(यात्रेत दिसलेले मनमोहक शिखर)

अजुन संगम यायच बाकी होत. हळुहळु पाय उचलत चालत होतो. एकदाचे संगम आले.

(संगम - उजवीकड्चा रस्ता पहलगाव वरुन येणारा व डावीकडचा बालतालहुन)

पहलगाम आणी बालताल इथुन येणा-या दोन्ही रस्त्यांचा संगम इथे होतो.

इथे पोहोचल्यावर आपल्याला पवित्र गुफा दिसु लागते.

(पवित्र गुफेकडे जाणारा मार्ग)

(संगमहुन गुफेकडे जाणारा मार्ग)

पण अजुनही बाबा बर्फानी आणी आपल्यात 3 कि.मी चे अंतर आहे. संगमवरुन पुढे चालायला लागल्यावर डावीकडे कातळामधे कालीमाता आपल्याला दिसते.

आता पुढील मार्ग हा पूर्ण ग्लेशियर वरुन जायचा होता. त्या ग्लेशियरच्या आधी एक भंडारा होता तेथे आम्ही जेवणासाठी थांबलो. पराठा भाजी खायला होत. पण जसे आम्ही जेवणासाठी हातमोजे काढले तेव्हा समजल हाताची बोटे पूर्ण सुन्न झाली होती. मी आणी बहीणीने अक्षरक्ष: तिथे रडायला सुरुवात केली. रात्री 2 पासुन आम्ही चालत होतो, निट खाणेही झाले नव्ह्ते. आता खायला होते तर आम्हाला तो पराठा बोटाने तोडता हि येत नव्ह्ता. शेवटी आमच्या आईने आम्हाला भरवल. कसतरी थोड खाउन व चहा घेउन आम्ही निघालो.ग्लेशियर वरुन जाताना सारखे पाय घसरत होते.

(ग्लेशियरवरुन जाताना आम्ही व समोर पवित्र अमरनाथ गुफा)

(ग्लेशियरवर तात्पुरती निवासासाठी बांधलेले तंबु)

माझ्यामधे काहीच शक्ती उरली नव्हती. उंचावर विरळ हवेचा त्रास जाणवु लागला होता. मग मी गुफेपर्यंत जाण्यासाठी डोली केली. डोली म्हणजे एका खुर्चीला 2 बांबु आडवे लावलेले असतात. आपण त्या खुर्चीत बसायच मग 4 माणसे ती खुर्ची बांबुंच्या साहाय्याने उचलुन घेतात.

(डोली - चित्र जालावरुन साभार)

त्यांनी मला गुफेजवळ आणुन सोडल. मी इतर लोक येण्याची वाट पहात तिथेच बसले. थोड्या वेळाने सर्वजण आले. मग आम्ही तिथेच असलेल्या एका दुकानात आमचे सर्व सामान , बुट,कॅमेरा काढुन ठेवले. गुफेमधे हे सर्व नाही नेउ शकत. आम्ही बुट काढुन मोज्यांवर प्लास्टिकची पिशवी लावली. गुफेच्या आत सर्वत्र थंड पाणी असते म्हणुन ही काळजी घ्यायची. आम्ही शेवटचा टप्पा चढायला सुरुवात केली. गुफेबाहेर रांग होती . ओळीने एकेकाला आत सोडत होते. आमचा नंबर आला आणी समोर दिसले बाबा बर्फानी. तो क्षण आता मी इथे सांगु ही शकत नाही काय वाटले त्या वेळेला (तुझे रूप पाहता देवा,झाले सुख झाले माझ्या जीवा) सोमवार , 25 जुन 2012 दु. 2.30 मि. ला आमचे दर्शन झाले. यात्रा सुरु केल्यानंतर 12 तासांनी. बाबा बर्फानींचे दर्शन होताच सर्व थकवा निघुन गेला. डोळ्यातुन अश्रू वाहु लागले आणी मुखातुन बम बम भोले गाऊ लागलो.

(पवित्र अमरनाथ गुफा)

(गुफेतील बाबा बर्फानी - चित्र जालावरुन साभार)

जवळच दोन बर्फाचे आकार आहेत ते पार्वती माता व श्रीगणेश आहेत अशी मान्यता आहे. त्यांचेही दर्शन केले. आम्हाला प्रसादामधे चांदीचे बेलपत्र मिळाले. बाहेर आल्यावर हे शिवलिंग वितळुन जे पाणी तयार होत ते नळाच्या साहाय्याने बाहेर आणलेल आहे. आम्ही तिथुन ते पवित्र जल एका बाटलीमधे भरुन घेतल.
पुन्हा एकदा गुफेकडुन पाहुन हात जोड्ले. भोले बाबांकडे प्रार्थना केली की आम्हाला पुन्हा तुझ्या दर्शनाला बोलव व आमचा या पुढील प्रवास सुखकर होवो.

आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. गुफेच्या आसपास वातावरण खुप थंड झाल होत. पुन्हा बालतालपर्यंत चालत जाण्याची आमच्यात शक्ती नव्ह्ती मग आम्ही घोडे केले खाली जाण्यासाठी. दु. 3.30 ला आम्ही निघालो ते रात्री 9 वाजता आम्ही 5 तासाने आमच्या भंडाराजवळ आलो.
(परतीच्या मार्गावर असताना)

या 5 तासात आम्ही एकदाही घोड्यावरुन खाली उतरलो नाही आणी जेव्हा उतरलो तेव्हा आम्ही एकही पाऊल पुढे टाकु शकत नव्हतो. कंबरेखालील पुर्ण शरीर बधीर झाले होते. अक्षरक्ष: आम्ही स्वत:ला घसपटत आमच्या खोलीपर्यंत घेऊन गेलो. जाताच कसेतरी बुट काढुन आम्ही सरळ बिछान्यावर पडलो. 2-3 तासाने आमचे बाकीचे सहकारी आले तेव्हा त्यांनी उठवल्यावर आम्ही जेवायला गेलो. जेऊन येऊन पुन्हा झोपलो.
पाय खुपच दुखत होते. मी जिथे झोपले होते तिथे माझ्या बाजुला एक दुस-या गटातील काकी होत्या, ते लोक उद्या दर्शनासाठी जाणार होते. त्यांनी माझी अवस्था पाहीली व स्वत:कडे असलेल्या तेलाने माझ्या हातापायांची मालिश करुन दिली. मी त्यांना ओळखत ही नव्ह्ते तरी त्यांनी माझ्यासाठी एवढ केल जणु भोले बाबांनीच तिला माझ्यासाठी पाठवल होत. अमरनाथ यात्रेला येणा-या प्रत्येकाला इथे भोले म्हणुन संबोधल जात. आम्ही सर्वच भोले होतो, इतर कोणत्याही ओळखीची तिथे आवश्यकता नव्हती. कधी निद्रेच्या अधीन झाले समजल हि नाही. उद्या आम्ही बालताल वरुन निघणार होतो जम्मुला जाण्यासाठी. माझ्या माताराणीचे दर्शन करण्यासाठी.

कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्।
सदा बसन्तं हृदयारबिन्दे भबं भवानीसहितं नमामि।।

क्रमशः

प्रतिक्रिया

कंजूस's picture

7 Oct 2020 - 7:01 pm | कंजूस

रात्री २ ते परत रात्री ९ पर्यंत म्हणजे कठीणच। आणि थंडीही.

नयना माबदी's picture

8 Oct 2020 - 10:22 am | नयना माबदी

हो. कठीण यात्रा.

नयना माबदी's picture

10 Oct 2020 - 3:53 pm | नयना माबदी

धन्यवाद सर. आपण दिलेल्या माहितीप्रमाणे फोटोज जोडले. आता सर्व दिसत आहेत.

अर्धवटराव's picture

8 Oct 2020 - 8:56 am | अर्धवटराव

:(

नयना माबदी's picture

8 Oct 2020 - 10:21 am | नयना माबदी

फोटो दिसत नाहियेत का? मी गुगल फोटोज मधुन टर्मीनेटर यांनी सांगितल्या प्रमाणे जोडले आहेत.

संजय क्षीरसागर's picture

8 Oct 2020 - 10:40 am | संजय क्षीरसागर

तुमच्या शेअर्ड अल्बमची लिंक साहित्य संपादकांना पाठवून ते अपलोड करायची विनंती करा.

नयना माबदी's picture

8 Oct 2020 - 5:02 pm | नयना माबदी

कसे पाठवू?

नयना माबदी's picture

10 Oct 2020 - 3:55 pm | नयना माबदी

आता सर्व दिसत आहेत.

नयना माबदी's picture

10 Oct 2020 - 3:53 pm | नयना माबदी

आता सर्व दिसत आहेत.

काल मी लिंक्स पाहिल्या पण फोटो येत नाहीत कारण ते शेअर झालेले नाहीत.
*********************
फोटो शेअरिंग पद्धतीच्या स्टेप्स अगदी क्रमाने वापरा.
फोटो >> share या ठिकाणी पर्याय दिसेल
- with people
इथे पुन्हा change वापरा
- मग anyone with the link can view हा पर्याय करा.
-मग शेअरिंग लिंक जेनरेट करा. ती साधारण

https://photos.app.goo.gl/.......
अशी दिसेल.

ही लिंक
https://app.bytenbit.com/

या साइटच्या बॉक्समध्ये टाकून नविन-लिंक काढा , वापरा.
जर ती येत नसेल तर शेअरिंग चुकलेलं आहे, फोटो येणार नाही. ही टेस्ट आहे.

आणखी खात्रीचा उपाय म्हणजे वरील संस्कार प्रत्येक फोटोला केले ते सर्वप्रथम त्या शेअरड फोल्डरलाच केल्यास त्यातल्या कोणत्याच फोटोला प्रॉब्लेम येत नाही.

नयना माबदी's picture

8 Oct 2020 - 5:01 pm | नयना माबदी

आता पुन्हा कसे अ‍ॅड करू?

नयना माबदी's picture

10 Oct 2020 - 3:55 pm | नयना माबदी

धन्यवाद

कंजूस's picture

8 Oct 2020 - 7:13 pm | कंजूस

लेख भटकंती सदरात आहे त्यामुळे स्वत:ला संपादन करता येते.
--------------------------
फोटो क्रमांक <br />
मथळा <br />
<img src="लिंक" width="80%"/><br />

----------

यामध्ये लिंक टाकून कॉपी करून लेखात जो फोटो आलेला नाही तिथे पेस्ट करून प्रकाशित करा.

AKSHAY NAIK's picture

9 Oct 2020 - 12:01 pm | AKSHAY NAIK

पु.भा.प्र.

नयना माबदी's picture

10 Oct 2020 - 3:55 pm | नयना माबदी

धन्यवाद

मला तीन फोटो दिसत आहेत बाकीचे नाही. लिहिताय छान वाचायला आवडतंय 👍

नयना माबदी's picture

10 Oct 2020 - 3:54 pm | नयना माबदी

आता सर्व दिसत आहेत

नयना माबदी's picture

10 Oct 2020 - 3:54 pm | नयना माबदी

आता सर्व दिसत आहेत

नयना माबदी's picture

10 Oct 2020 - 3:54 pm | नयना माबदी

धन्यवाद

फोटो मोजकेच आणि वर्णनाबरोबर उपयुक्त आहेत. एकूण यात्रेची कल्पना आली.

ग्लेशिअरवरच तंबू बांधण्याचं कारण काय असेल?

नयना माबदी's picture

12 Oct 2020 - 3:31 pm | नयना माबदी

धन्यवाद. तिथे तिच जागा आहे. कारण बाकी पूर्ण वर्षभर तिथे बर्फच असतो.

नयना माबदी's picture

12 Oct 2020 - 3:53 pm | नयना माबदी

धन्यवाद. तिथे तिच जागा आहे. कारण बाकी पूर्ण वर्षभर तिथे बर्फच असतो.

प्रविन ९'s picture

12 Oct 2020 - 2:32 pm | प्रविन ९

मी जुलै 2012 मध्ये अमरनाथ ला गेलो होतो. आम्ही पहलगाम वरून चढाई केली आणि बालताल मध्ये उतरलो होतो.

नयना माबदी's picture

12 Oct 2020 - 3:27 pm | नयना माबदी

ओह छान.

चौथा कोनाडा's picture

12 Oct 2020 - 4:11 pm | चौथा कोनाडा

थरारक यात्रा वृतांत ! कठीण आणि जिकिरीचा प्रवास, मस्त लिहिलंय. फोटो ही सुरेख ! मजा आली वाचताना !
(फोटो जोडता आल्याबद्दल विशेष अभिनंदन !)

नयना माबदी's picture

13 Oct 2020 - 2:06 pm | नयना माबदी

हो. धन्यवाद