संवाद

aanandinee's picture
aanandinee in जनातलं, मनातलं
7 Aug 2020 - 4:37 am

संवाद म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दोन जणांचं एकमेकांशी चालणारं संभाषण येतं. पण खरं तर आपला सर्वाधिक संवाद हा आपल्या स्वतःशीच सुरू असतो. आपल्या मनात येणारे विचार हाही या संवादाचाच एक भाग झाला. कधी हा संवाद विचारांच्या रूपात असतो, कधी भावनेच्या, पण तो बहुतेक सारा वेळ सुरूच असतो खरा!

काळे ढग आणि बरसणारा पाऊस पाहून कोणाला त्या पावसात चिंब भिजण्याची इच्छा होते, कोणी छत्री शोधू लागतो, कोणी भज्यांची फर्माईश करतो आणि कोणाला कालिदासाचा मेघदूत आठवतो. तोच पाऊस ह्या वेगवेगळ्या गोष्टी कसा साधतो? कारण त्याने वेगवेगळ्या मनांची वेगवेगळी तार छेडलेली असते. मनाच्या तारा जेव्हा सुरांत झंकारल्या जातात तेव्हा सुरेख सुरावट उमटते. पण जेव्हा वरचेवर त्यांचे सूर बिनसतात तेव्हा? आपले विचार आपल्यालाच नकोसे वाटतात तेव्हा? त्यांचा त्रास कधी आपल्याला स्वतःला, कधी इतरांना होतो तेव्हा? "तुला नाही जमणार, तोंडघशी पडशील गेल्या वेळसारखं" असं म्हणून कधी आपलंच मन आपल्याला संधी नाकारतं, तर कधी रागावर ताबा ठेवायचं शेकडो वेळा ठरवूनही आपल्याला कळायच्या आत जळजळीत काटेरी शब्द आपल्या तोंडून निघतात. नाती तोडण्याची आपली इच्छा नसते खरं तर, पण नात्यांमधले पूल अश्या शब्दांनी पार कोलमडतात. कधी निराशेचा काळा अंधार इतका घेरतो की प्रयत्नाचं पाऊल पुढे टाकायला समोर उजेडच दिसत नाही. कधी नोकरी, कधी लग्न, कधी तब्बेत, कधी पूर्ण आयुष्यावर निराशेचे हे काळे ढग येतात. "हे असंच राहणार, काहीच, कधीच नाही बदलणार" असं सतत आत ऐकू येत राहतं. "मला काही झालं तर? माझ्या मुलांचं कसं होईल…." "छे छे असं काही नाही होणार!" "पण झालं तर! माझ्या मित्राच्या भावाचं नाही का अगदी अचानक असं झालं!" असे उलटसुलट विचार जाता जात नाहीत. आणि अजून जवळही न आलेल्या संकटाच्या भीतीने, दुःखाने आधीच हातपाय गळतात. आपल्या अंतर्मनात होणाऱ्या या संवादाचा त्रास तर आपल्याला होत असतो. पण या विसंवादाचा सुसंवाद कसा करायचा?

आपल्याला सार्यांना ही उपजत बुद्धी असते. पण कधी सवयीने, कधी चुकीच्या उदाहरणांमुळे, कधी आयुष्यातील तणावांमुळे त्यावर पुटं चढतात. हे सदर ही पुटं हटवून ह्या आपल्या विसंवादाचा सुसंवाद करण्यासाठी आहे. सध्याच्या काळात कोणाच्या मनात व्हायरसची भीती आहे, कोणाला नोकरी धंद्याची काळजी आहे, काही नाती विस्कटली आहेत आणि कधी सगळं ठीकठाक असूनही आत काहीतरी खुपतंय. माझ्या मानसोपचाराच्या अनुभवांतून आणि अभ्यासातून मी काही साचे (ज्याला आम्ही ट्रीटमेंट प्रोटोकॉल म्हणतो) तयार केले आहेत. मनातील गुंता स्वतःचा स्वतः सोडवायला हे साचे आपल्याला उपयोगी पडतील अशी आशा आहे.

मनाच्या विसंवादामध्ये एक मोठा भाग असतो भीतीचा. असं झालं तर? तसं होईल का? अश्या प्रकारचे विचार मनाला घेरतातं आणि भीतीचा अंमल वाढत जातो. भीती, भय याला आपण सहसा नकारात्मक दृष्टीने पाहतो पण खरं तर काही प्रमाणात भीती ही आवश्यकच आहे. वानराचा नर होण्याच्या उत्क्रांतीमध्ये मानव तग धरू शकला कारण वेगवेगळे आणि मोठे अधिक बलवान प्राणी, नैसर्गिक संकटं यांपासून असलेला धोका मानवाने ओळखला. त्या धोक्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने निरनिराळ्या शकला लढवल्या, योजना आखल्या आणि त्या अंमलात आणल्या. योग्य प्रमाणात असलेल्या भीतीमुळे माणूस सुरक्षिततेसाठी प्रयत्न करतो, पण भीती जर प्रमाणाबाहेर वाढली तर त्याचे दुष्परिणाम जाणवू लागतात. भीतीने ग्रस्त लोकांमध्ये छातीत धडधडणं, घसा कोरडा पडणं, पोटात मळमळणं, उलट्या, जुलाब होणं, वारंवार टॉयलेटला जायची गरज आहे असं वाटणं, डोकं दुखणं, झोप उडणं, सतत अस्वस्थ वाटत राहणं यापैकी एक किंवा अधिक लक्षणं दिसून येतात. यावर उपाय कसा करायचा हे आपल्याला पाहायचं आहे.

वैद्यकीय शिक्षणाचं पहिलं दीड वर्ष, आठवड्यातले बहुतेक दिवस आम्ही शवविच्छेदन करून शरीर आत कसं असतं, शरीराचे सारे व्यापार कसे चालतात ही शिकत असू. कारण उपचार करण्या आधी गोष्टी सामान्यतः कश्या चालतात हे समजून घेणं फार आवश्यक आहे. अगदी हेच मनोविकारांनाही लागू आहे. म्हणूनच या सदरांमध्ये आपण भय, नैराश्य, तणाव इत्यादी विकारांकडे पाहताना आधी ते समजून घेऊन मग उपचार कसा करायचा हे पाहणार आहोत. समस्येला आधी नीट समजून घेणं, त्याविषयीची माहिती मिळवणं ही उपचाराची पहिली पायरीच म्हणता येईल.

अनेक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या भीतीने ग्रासलेल्या असतात. भीतीचे मुख्य प्रकार समजून घेऊया.
• फोबिया (विशिष्ट गोष्टीची किंवा परिस्थितीची भीती)
• Generalised Anxiety Disorder (जी ए डी किंवा प्रत्येक गोष्टीची धास्ती)
• हेल्थ anxiety (आरोग्याबद्दलची, आजारांची भीती)
• सोशल anxiety (समूहामध्ये वावरण्याची भीती)
• पॅनिक डिसऑर्डर (भीतीचा तीव्र झटका)

सर्वपरिचित असणारा भीतीचा प्रकार म्हणजे फोबिया – एखाद्या विशिष्ट वस्तू/ प्राणी किंवा परिस्थितीशी निगडीत असलेलं भय. उदाहरणार्थ पाण्याची, उंचीची, कीटकांची, सापांची, बंदिस्त जागांची वाटणारी तीव्र भीती. सापांचा फोबिया असणारी व्यक्ती माळरानात, गवतात तर चालायला जात नाहीच, पण प्राणी संग्रहालयातील बंदिस्त पेट्यांमधील साप पाहणंही अश्या व्यक्तीला अशक्य असतं.

भीतीचा दुसरा प्रकार म्हणजे जीएडी (GAD) किंवा प्रत्येक गोष्टीची – प्रत्येक गोष्ट विपरीत झाली तर अशी सतत वाटणारी धास्ती. या प्रकारात मोडणाऱ्या बहुतेक व्यक्ती या सदैव काहीना काही कारणाने चिंताग्रस्त असतात. आणि अशी काळजी करणं आवश्यकच आहे असं यातल्या बहुतेकांचं मत असतं. हा मनोविकारांचा एक प्रकार आहे यांची कल्पनाच नसल्यामुळे त्यावर उपाय योजना करणं लांबच राहतं.

सध्याच्या व्हायरस मुळे पुढच्या काही वर्षांत ज्या एका प्रकारच्या भीतीचं प्रमाण वाढणार आहे तो प्रकार म्हणजे हेल्थ anxiety. या रोगाला पूर्वी हायपोकोंड्रिया म्हटलं जात असे. हेल्थ anxiety च्या व्यक्तींना स्वतःच्या आरोग्याविषयी खूपच चिंता वाटत असते. आपल्याला हा रोग तर नाही ना तो रोग तर नाही ना अश्या अवाजवी काळजीने त्यांचं मन सतत ग्रासलेलं असतं.

सर्वत्र भरपूर दिसून येणारा आणि तरीही कमी परिचित असणारा भीतीचा प्रकार आहे सोशल anxiety किंवा समूहामध्ये वावरण्याची भीती. अनोळखी लोकांशी बोलणं अश्या व्यक्तीना नकोसं वाटतं, बरेचदा या व्यक्तीना ओळखीच्या अनेक लोकांशी एकत्र भेटण्याची, बोलण्याची, उठण्या-बसण्याची वेळ आली (उदाहरणार्थ पार्टी / मीटिंग / पिकनिक) की त्यांना त्याचं अतिशय दडपण येतं. मग ते सहसा असे कार्यक्रम टाळतात किंवा कोणाचीतरी सोबत घट्ट पकडून ठेवतात. लाजरा स्वभाव या लेबलखाली दडून गेल्यामुळे कित्येक व्यक्तींच्या या रोगाचं निदानच होत नाही.

भीतीचा थोडा कमी परिचित असणारा प्रकार म्हणजे पॅनिक डिसऑर्डर. या व्यक्तींना भीतीचा तीव्र झटका हा अचानक कधीही येऊ शकतो. या झटक्यांच्या वेळी त्यांना वाटणारी भीती, जसं “मी आत्ताच्या आत्ता मरेन/ माझ्या शरीराचे तुकडे होतील / मला फिट येईल" इतरांना तर्कहीन, बिनबुडाची वाटते पण त्या व्यक्तींसाठी मात्र ती अतिशय तीव्र असते.

भीती किंवा चिंता (Anxiety) या मनोविकाराचे हे काही प्रमुख प्रकार आहेत. एकाच व्यक्तीला एकाहून अधिक प्रकारची भीती असणं किंवा भीती आणि नैराश्य असणं हेसुद्धा बरेचदा दिसून येतं. पुढच्या भागांमध्ये पाहूया की या भीतीशी टप्प्याटप्प्याने मुकाबला कसा करायचा ...

डॉ. माधुरी ठाकूर
https://drmadhurithakur.blogspot.com/2020/08/1.html?m=1

समाजजीवनमानलेख

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Aug 2020 - 8:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टर, लेखन माहितीपूर्ण आहे, मन:पूर्वक आभार. पुढील भागांंच्या प्रतीक्षेत.

-दिलीप बिरुटे

प्राची अश्विनी's picture

10 Aug 2020 - 8:53 am | प्राची अश्विनी

+1 हेच म्हणायचंय.

खुप अभ्यासपूर्ण लेखन.अभिनंदन.खुपच छान वाटलं वाचताना.

रातराणी's picture

7 Aug 2020 - 10:16 am | रातराणी

रोचक. पुभाप्र.

सुबोध खरे's picture

7 Aug 2020 - 10:35 am | सुबोध खरे

या अतिशय महत्त्वाच्या पण दुर्लक्षित विषयाबद्दल आपण लिहिता आहात हि अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.

मनोविकाराबद्दल एकंदर गैरसमजच जास्त आहेत.

ज्यात हे कधीच बरे होणार नाहीत पासून मनोविकार तज्ज्ञ नुसत्या झोपेच्या गोळ्या देतात पासून अशा औषधांचे साईड इफेक्टसच जास्त आहेत आणि त्यांचा काहीही फायदा होत नाही पर्यंत.

हि स्थिती सुशिक्षित माणसांची आहे यात अनेकदा डॉक्टर सुद्धा गैरसमजांचे बळी पडलेले दिसतात.

मग अशिक्षित माणसात तर हे "बाहेरचं" आहे. करणी केली आहे भूतबाधा आहे पासून मनोविकार तज्ज्ञांकडे गेले तर ते शॉकच देतात पर्यंत.

याशिवाय अंधश्रद्धा आणि गैरसमजुती तर बक्कळ आहेतच.

आपण जितक्या विस्ताराने लिहाल तितके गैरसमज दूर होण्यास मदत होईल.

आपल्या लेखनाची आतुरतेने वाट पाहत आहे.

सुबोध, आपण म्हणता ते अगदी खरं आहे. मनोविकारांबद्दल माहितीपेक्षा गैरसमजच अधिक आहेत. मी जे शिकले आहे, पाहिलं आहे ते या लेखमालेत सोप्या शब्दांत मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. Self help प्रकारचं लिखाण करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे त्यामुळे बदल किंवा काही सल्ला असल्यास जरूर सुचवा

पुढील भागाची वाट बघतोय.
हि लेखमाला इतरांनाही फॉर्वर्ड करणार.

आपल्या प्रतिक्रियेकरिता धन्यवाद! पुढला भाग पुढच्या आठवड्यात पोस्ट करण्याचा विचार आहे. लेखमाला अवश्य share करा. वर लिहिल्याप्रमाणे Self help प्रकारचं लिखाण करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे त्यामुळे बदल किंवा काही सल्ला असल्यास जरूर सुचवा

aanandinee's picture

7 Aug 2020 - 11:46 pm | aanandinee
aanandinee's picture

7 Aug 2020 - 11:47 pm | aanandinee

डॉ. बिरुटे, भक्ती, रातराणी आपल्या प्रतिक्रियांकरिता खरंच आभारी आहे. मी या वेळी प्रतिक्रियांची विशेष वाट पाहत होते कारण फार वैद्यकीय शब्दांचा मारा होत नाहीये ना, साधारण प्रतिसाद कसा आहे याची मला खूप उत्सुकता होती. आपल्या प्रतिक्रियांनी हुरूप आला आहे

मुळात भय हे एकच आहे > आपण नष्ट होऊ !
याची दोन उपांग आहेत > एक, शरीर नष्ट होईल आणि दोन, प्रतिमा भंग होईल.
तुम्ही दिलेले साहीप्रकार या मुळ भीतीत येतात.
भयावर टप्याटप्यानं मात करता येत नाही.

आपण शरीर नसून, आपल्याला शरीराची जाणीव आहे या उलगड्यानं पहिली भीती जाते, आणि
आपण व्यक्ती नसून एक कायम स्थिती आहोत या उलगड्यानं दुसरी भीती जाते.

सोत्रि's picture

3 Sep 2020 - 9:59 am | सोत्रि

आपण शरीर नसून, आपल्याला शरीराची जाणीव आहे या उलगड्यानं पहिली भीती जाते, आणि
आपण व्यक्ती नसून एक कायम स्थिती आहोत या उलगड्यानं दुसरी भीती जाते.

भिती घालविण्याचा ह्या पेक्षा दुसरा चपखल मार्ग नाही.

ते थांबवण्याच्या दोन हमखास लागू पडणाऱ्या पद्धती म्हणजे ‘मन प्रयत्नपूर्वक दुसऱ्या विचाराकडे वळवणं’ (distraction technique), आणि साक्षी भाव (mindfulness)

आनंदीनी यांनी दुसर्‍या भागात साक्षी भाव (mindfulness) हा मार्ग सांगितला आहे, त्यानेच संक्षी म्हणता आहेत तो उलगडा होऊ शकतो.

- (मनस्वी) सोकाजी

सुबोध खरे's picture

8 Aug 2020 - 11:53 am | सुबोध खरे

है शाबास

तज्ज्ञ-- पुढच्या भागांमध्ये पाहूया की या भीतीशी टप्प्याटप्प्याने मुकाबला कसा करायचा ...

सर्वज्ञ -- भयावर टप्याटप्यानं मात करता येत नाही.

मन अशी काहीही चीज या दुनियेत नाही.
विचारांच्या सर्वनामाला मन असं संबोधण्याची पूर्वापार चूक झाली आहे.
ज्याप्रमाणे चित्रपट हा अनेक स्थिर चित्रं गतीमानतेनं डोळ्यासमोरुन नेल्यावर हालचालीचा भास होतो;
तसा अनेक विचारांच्या गतीमान प्रवाहामुळे मनाचा भास होतो.
हे कळल्यावर तुमची निम्मी भीती संपेल, कारण मन अशी काही अज्ञात शक्ती नाही.
एकेक विचार वेगवेगळा आहे.
भीती हा मनाच्या दहशतीचा प्रकार नाही, तो विचाराला दिलेला व्यक्तिगत रिस्पाँन्स आहे.
हा झाला पार्ट वन.
_______________________________________
विचार ही वस्तुस्थिती नाही, तो विभ्रम आहे.
विचार वास्तविक वाटण्याचं कारण म्हणजे व्यक्तीनं तो खरा समजणं आहे.
हे देखिल पिक्चरप्रमाणेच आहे.
जेवढा तो व्यक्तीला खरा वाटतो तितका तो सखोल परिणाम करतो.
विचार हा भ्रम आहे म्हटल्यावर त्यामुळे भीती निर्माण होणं अशक्य आहे.
अर्थात, यासाठी तुमच्याकडे कमालीचा अवेअरनेस (सजगता) हवा.
अवेअरनेस म्हणजे नक्की काय हे अप्रिय आठवणींपासून सुटका प्रकरणात तुम्हाला सांगितलं आहेच.
कारण तिथेही नेमका हाच प्रश्न होता;
लेखकाला विचार ही वस्तुस्थिती वाटल्यानं दहशत निर्माण झाली होती.
ते वाचा म्हणजे तुम्हाला आणखी लाईट पडेल.

आणि हे देखिल कळेल की नॉलेज इज इंटीग्रेटेड इंटेलीजन्स,
मग मला प्रतिसाद देतांना ते भान कायम राहील.
अर्थात, तुम्हाला लाईट पडून मुद्दा कळला असेल तर !
तस्मात, आता मुद्दा भरकटवणे आणि व्यक्तिगत प्रतिसाद देणे टाळाल तर पुन्हा उघडे पडणार नाही.

सुबोध खरे's picture

10 Aug 2020 - 10:11 am | सुबोध खरे

आम्ही कशाला मुद्दा भरकटवू.

आम्हाला एवढाच कळतं कि कोणी एखाद्या विषयात ( येथे मनोविकाराशास्त्रात) पदव्युत्तर तीन वर्षे घासली आहेत. आणि त्यानंतर अनेक वर्षे व्यासंग केला आहे. त्यांना थोडं तरी कळत असेल कि नाही?

मन अशी काहीही चीज या दुनियेत नाही.

विचार ही वस्तुस्थिती नाही, तो विभ्रम आहे.

लेखकाला विचार ही वस्तुस्थिती वाटल्यानं दहशत निर्माण झाली होती.

नॉलेज इज इंटीग्रेटेड इंटेलीजन्स,

काय विचार मौक्तिके आहेत

( हायला पण विचार ही वस्तुस्थिती नाही, तो विभ्रम आहे --इति सर्वज्ञ)

म्हणजे हि पण विभ्रम मौक्तिके आहेत तर.

तुम्हाला आणखी लाईट पडेल.तुम्हाला लाईट पडून मुद्दा कळला असेल तर !

आम्ही काय सर्वज्ञ आहोत का लाईट पडायला?

आणि

पडला तर उचलून घेऊ

हा का ना का

असं दिसतंय.

तुम्हाला शब्दच्छलाशिवाय काहीही जमत नाही.

आता सांगा :

१. कुठे असतं हे मन ?
२. ज्या विचाराची चर्चा चालू आहे तो वस्तुस्थिती विभ्रमित करण्यापलिकडे काय करतो ?
३. लेखकाचा अप्रिय आठवणींमुळे झालेला छळ म्हणजे ती व्यक्ती समोर नसतांना असल्याचा विभ्रम होता.
इतकी उघड गोष्ट तुम्हाला अजूनही लक्षात येत नाही का ?

४. इतकी वर्ष मेडिसिनमधे (घासून का काय ते) तुम्हाला मुद्दा कसा लक्षात येत नाही ?
का न वाचता आणि विचार करता प्रतिसाद ठोकता ?

आता लेखिकेचं मत जाणून घ्या म्हणजे जास्त शोभा होणार नाही.

सुबोध खरे's picture

10 Aug 2020 - 12:56 pm | सुबोध खरे

जे लिहिलंय ते तुमच्या अंडरस्टँडींग पलिकडे आहे

अर्थातच

म्हणून तर लेखिकेला पुढचे भाग सविस्तर लिहायला सांगितले आहेत.

आपण तर कोण कुठले-- गोंदवलेकर महाराज, अक्कलकोटचे स्वामी झालंच तर श्री ज्ञानेश्वर माउली, संत तुकाराम अशा संतांना सुद्धा न समजलेले अध्यात्म कोळून प्यायला आहात.

आम्ही साधे चार बुकं वाचलेले मुमुक्षु भिक्षुक आहोत, आपल्यासारखे शत ग्रन्थ पचवून उच्चपदाला पोचलेले व्युत्पन्न अन सर्वज्ञ थोडीच आहोत?

मुमुक्षु भिक्षुक झाली म्हणजे बरीच प्रगती आहे !

आता मुद्दा पकडायला शिका > जाणीव वर्टीकल व्हायला ते फार उपयोगी आहे.

भय काय आहे आणि मन अशी काही चीज आहे का ? यावर चर्चा चालू आहे.

संतांना उगीच मधे आणू नका ते तुम्हाला वाचवायला इथे येणार नाहीत.

सुबोध खरे's picture

11 Aug 2020 - 1:58 pm | सुबोध खरे

जाणीव वर्टीकल व्हायला

हायला

जाणीव हॉंरीझॉन्टल असते का?

संतांना उगीच मधे आणू नका ते तुम्हाला वाचवायला इथे येणार नाहीत.

इथे आम्ही कुठे मरायला लागलोय कि संतांकडे वाचवण्यासाठी साकडं घालून बसलोय ?

बाकी तुमच्या सारख्या माणसाशी वाद घालायला लै मज्जा यायलीये बघा.

तर मुद्दा कसा पकडायचा? हा मुद्दा आहे सध्या.

ते मन आणि भय राहू दे बाजूला

जाणीव हॉंरीझॉन्टल असते का?

अस्ताव्यस्त आणि अनियंत्रित विचार म्हणजे जाणीवेचा रोख त्या विचारांप्रमाणेच हॉरिझाँटल असतो.

त्याचा परिणाम म्हणजे मुद्दा कळत नाही. काल काय प्रतिसाद दिला ते आज लक्षात रहात नाही. एकदा दुसर्‍याची लायकी, मग प्रतिसादाची लायकी आणि शेवटी स्वतःची लायकी काढतो !

जाणिव वर्टीकल होणं म्हणजे संपूर्णपणे वर्तमानात असणं.

करा ट्राय म्हणजे मुद्दा समजेल आणि त्याला मुद्दा पकडता येणं म्हणतात हे पण कळेल.

सुबोध खरे's picture

11 Aug 2020 - 6:46 pm | सुबोध खरे

मग आडवं पडलं कि जाणीव व्हर्टिकल होईल कि.

(म्हणजे झोपेपूर्वी चिंतन केलं कि !)

ते आइन्स्टाइन सापेक्षता वादाचा सिद्धांत म्हणून "काही तरी" सांगून गेलाय

एवढं सोपं असून तुम्हाला समजलं नाही? सर्वज्ञ असूनही? आश्चर्य आहे !

बघा मुद्दा सापडला का? किंवा पकडता आला का?

शाम भागवत's picture

10 Aug 2020 - 4:59 pm | शाम भागवत

३. लेखकाचा अप्रिय आठवणींमुळे झालेला छळ म्हणजे ती व्यक्ती समोर नसतांना असल्याचा विभ्रम होता.
इतकी उघड गोष्ट तुम्हाला अजूनही लक्षात येत नाही का ?

हाहाहा!!!

ॐ शांती ॐ

संजय क्षीरसागर's picture

10 Aug 2020 - 5:32 pm | संजय क्षीरसागर

> ३. लेखकाचा अप्रिय आठवणींमुळे झालेला छळ म्हणजे ती व्यक्ती समोर नसतांना असल्याचा विभ्रम होता.

यापेक्षा काही वेगळा प्रकार होता का ?

तुम्ही कल्पनेतलं पिस्तुल काढून समोर नसलेल्या व्यक्तीचा गेम करायचा प्रयत्न करत होता ! आणि तो ही भिजलेल्या बनीयनवर.

शाम भागवत's picture

10 Aug 2020 - 8:28 pm | शाम भागवत

ॐ शांती ॐ

सुबोध खरे's picture

11 Aug 2020 - 2:07 pm | सुबोध खरे

तुमचं अगदीच कल्पना दारिद्र्य आहे पहा.

कल्पनेतच गेम करायचा तर फडतूस पिस्तूल कशाला काढायचं. त्यातून नेम चुकला तर मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा खटला उभा राहील ना( कल्पनेतका होईना)

चांगला रणगाडा क्षेपणास्त्र नाही तर गेला बाजार बॉम्ब तरी हवा होता.

कल्पनेतच गेम वाजवायचा म्हणजे जोरदार का नको?

शाम भागवत's picture

11 Aug 2020 - 2:19 pm | शाम भागवत

राफेल?
;)

चौकस२१२'s picture

11 Aug 2020 - 5:02 am | चौकस२१२

संक्षी
आपला पहिला प्रतिसाद चांगले होता, त्यातील
"भयावर टप्याटप्यानं मात करता येत नाही" हे फारसे पटेल नाही ( एक सर्वसामान्य माणूस म्हणून ) पण यात तज्ज्ञ सांगू शकतील जास्त
पण आपल्याला एक विचारू का.. का हो तुम्ही सांगल्यांशी भांडता... आता तुम्ही म्हणाल.. येथे डॉ खरे यांनी तुमचं वॉर टिप्पणी केली म्हणून
अशी टिपण्णी येते याला काय कारण असू शकेल हे कधी आपल्या मनाला विचारलाय का ?
याचं कारण हे असू शकत का ... प्रत्त्येक विषयात आपल्याला सर्वकाही कळते असे प्रतिसाद द्यायचे ,, आणि क्लिष्ट कार्याचे...हि आपली सवय

आपण हुशार तर आहातच ( हि चेश्टा नव्हे आपल्या लेखांतून दिसते म्हणून म्हंटले ) पण असा भांडकुदळ पणा करण्यात वेळ का घालवता?
आपली अकौंटिंग नयनातील काहीतरी सांगत जा हो .. सगळ्यांना फायदा होईल
असो डॉ माधुरी यांच्या कडून त्यातील अजून कळेल तर बरे
आणि अजून एक, सर्वांनाच उद्देशून, खास करून वैद्यकीय बाबींबद्दल कोणी लिहीत असले तर त्यांनी आपण कसले डॉक्टर आहोत किंवा त्या विषयातील आपण कोण आहोत हे नक्की लिहावे , सही च्या खाली .. कारण वैद्यकीय विचार, माहिती आणि सल्ला ह्या फार मह्त्वाचया गोष्टी आहेत

त्यांना सल्ला देण्याचं धाडस करा.

मला सर्व कळतं की नाही हे नंतर बघू, तुमच्याकडे काही समज असेल तर माझ्या प्रतिसादांचा प्रतिवाद लिहायला जमतंय का ते पाहा. ते मुद्दा धरुन होईल.

"भयावर टप्याटप्यानं मात करता येत नाही" हे फारसे पटेल नाही

भय हा मूळ प्रश्न आहे, कशाचं भय हे दुय्यम आहे. कारण आपण संपू ही एकमेव भीती सर्व कारणांमागे दडलेली आहे. जर आपल्याला काहीही संपवू शकत नाही हा उलगडा झाला तर कोणत्याही कारणानं भय निर्माण होणार नाही.

चौकस२१२'s picture

11 Aug 2020 - 1:04 pm | चौकस२१२

"....तुमच्याकडे काही समज असेल तर .."
संजय क्षीरसागर
हे राम... खरंच तुमच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही... सतत दुसऱ्याला अक्कल शिकवत राहा...
तुमच्या क्लायंट बरोबर पण असेच वाद घालता काहो ?
https://www.youtube.com/watch?v=DCXDyIsPEN8&list=RDWFdNRFAqvDA&index=१२
१:१० विक्रम गोखले टू नाना

संजय क्षीरसागर's picture

11 Aug 2020 - 1:17 pm | संजय क्षीरसागर

अक्कल तुम्ही मला शिकवतायं !

बघा :

प्रत्त्येक विषयात आपल्याला सर्वकाही कळते असे प्रतिसाद द्यायचे

आणि मी तुम्हाला म्हटलं

मला सर्व कळतं की नाही हे नंतर बघू, तुमच्याकडे काही समज असेल तर माझ्या प्रतिसादांचा प्रतिवाद लिहायला जमतंय का ते पाहा. ते मुद्दा धरुन होईल >तर इतक्या मिर्च्या झोंबल्या ? कमाले !

- 'प्रत्त्येक विषयात आपल्याला सर्वकाही कळते असे प्रतिसाद द्यायचे'
मि? कधि तसा आव आणलाय .. २-३ विषयात थोडा अनुभव आहे तिथेच लिहितो, नाट्य, स्थलांतर , ट्रेडिंग ( फिनंसिअल) इत्यादी आणि १-२ आवडी, फिरणे खाणे पिणे एवढेच ,( राजकारण यावर तर सगळेच बोलतात आणि भांडतात )
" त्यांना ( डॉ खरे )सल्ला द्या " म्हणता तुम्ही..... अहो कशाला... बहुतेक मंडळींना त्यांचे लिखाण आवडते ( मतभेद असले तरी) नाही वाटत मला कि ते अनाठावी सर्वन्यानी असे वागतात म्हणून, मग कशाला त्यांना सल्ला देऊ?
-'तर इतक्या मिर्च्या झोंबल्या ?' मला? कशाला? उलट मी तुम्हाल दाखवून देतोय कि तुम्ही किती भांडताय ते .. बरं तुमचं विषयी काही चांगले बोलावे / चांगला प्रतिसाद तरी तरी तुम्ही गुरकावणार
असो तुमचा शब्द शेवटचा आणि खरा... बसा उगाळत

सोत्रि's picture

3 Sep 2020 - 10:21 am | सोत्रि

"भयावर टप्याटप्यानं मात करता येत नाही" हे फारसे पटेल नाही

हे का पटलं नाही हे तुम्ही सांगितलं नाही. ते सांगितलं तर काही चर्चा होइल. (संक्षींनी का करत येत नाही हे स्पष्ट केलं आहे.)

ता.क.: व्यक्तिगत शेर्‍यांकडे दूर्लक्ष केलं तर साधक बाधक चर्चा (ह्या धाग्याच्या विषयाशी सुसंगत) करता येइल.

- (चर्चोत्सुक) सोकाजी

सोत्रि's picture

3 Sep 2020 - 10:08 am | सोत्रि

भीती हा मनाच्या दहशतीचा प्रकार नाही, तो विचाराला दिलेला व्यक्तिगत रिस्पाँन्स आहे.

कोणतीही भावना हा विचाराला दिलेला व्यक्तिगत रिस्पॉन्सच असतो.

विचार वास्तविक वाटण्याचं कारण म्हणजे व्यक्तीनं तो खरा समजणं आहे.

विचाराला दिलेला व्यक्तिगत रिस्पॉन्सच अतिशय प्रचंड वेगाने होतो आणि तसं होणं हे 'ऑटो पायलट' मोडमधे आपसूकच होते. त्यामुळे विचार खरा वाटू लागतो. जाणीवेत राहून विचारांकडे तटस्थ बघण्याची (mindfulness) साधना करत राहिलं की विचांराना व्यक्तिगत रिस्पॉन्स देणंं हळूहळू कमी होत जातं.

- (Mindful होण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी

शा वि कु's picture

3 Sep 2020 - 11:13 am | शा वि कु

जरी एकवेळ मानलं, की आपण केवळ शरीर नाही, पण आपण शरीर आजिबात नाही हे पटत नाही. संक्षींना आपली शरीर सोडून काही ओळख असते असे वाटते हे वाचून फार आश्चर्य वाटले. (मी तर शरिरापलिकडे काही अस्तित्व असते असे मानतच नाही.)
माझे शरीर ही माझी ओळख आहेच. म्हणून तर माझे हात पाय कापले जाऊ नयेत अशी माझी अगदी मनापासून आणि तीव्र इच्छा आहे. याबाबत मी जरासाही उदासीन नाही. उदा – मी व्हॉट्स अॅप स्टेटस बाबतीत उदासीन असतो कारण ती माझी ओळख नाही हे मला पुरेपूर पटत. शरीराची जीवापाड काळजी घेऊन शरीर नष्ट होणे ह्यात काही भिण्यासारखे नाही असे म्हणणे – पटण्यासारखे नाही वाटत.

त्यामुळे आनंदिनी यांनी उल्लेखलेले भीतीचे विविध प्रकार हे केवळ अध्यात्मिक गैरसमजातून आले आहेत असे नाही वाटत. तसे मानणे या गोष्टींना फार अंडर एस्टिमेट करणे होईल.
डिप्रेस्ड व्यक्तीला "डिप्रेस्ड राहू नकोस ना मग." असा सल्ला दिल्यासारखा.
अध्यात्माची चर्चा फार स्थूल (broad,in general) असते. ही अगदी सूक्ष्म, पिनपॉइंट समस्यांवर आहे. त्यामुळे हे अवांतर होते आहे.

सोत्रि's picture

3 Sep 2020 - 12:33 pm | सोत्रि

अध्यात्माची चर्चा फार स्थूल (broad,in general) असते. ही अगदी सूक्ष्म

नेमकं उलटं होतय.

शारिरीक पातळीवरची जाणिव ही स्थूल (Gross Reality), त्याच्यापलीकडची जाणिव ही सूक्ष्म (subtle reality).

मी तर शरिरापलिकडे काही अस्तित्व असते असे मानतच नाही

ही मानण्याची गोष्ट नसून अनुभूतीची अवस्था आहे.

- (शरीर आणि मन ह्यांच्या पलीकडचा) सोकाजी

शा वि कु's picture

3 Sep 2020 - 2:18 pm | शा वि कु

हे असं होतं
"जीवन समरसून जगा, जीवनात चढ उतार येतात" हे जेनरिक वाक्य ओके आहे. एक जीवन जगण्याचा मंत्र म्हणूनसुद्धा चांगले आहे.
पण हे वाक्य क्रॉनिक डिप्रेशन सारखा रोगावर इलाज आहे काय ?
किंवा
" डेबिट व्हॉट कमस इन, क्रेडिट व्हॉट गोज आऊट" हे रियल अकाउंट्स चे मुख्य सूत्र आहे, जे बारावीत शिकवले जाते.

हे चुकीचे आजिबात नाही, आणि खरतर यातच सर्वकाही समावल आहे. पण सीए फायनल ला येणारे प्रश्न केवळ या ढोबळ सूत्राने सोडवता येत नाहीत.

अश्या प्रकारे मला "शरीराच्या जाण्याची भीती अनाठायी वाटते" हे वाक्य ढोबळ वाटते. तुम्हाला सूक्ष्म वाटत असेल तर ओके.

संजय क्षीरसागर's picture

3 Sep 2020 - 2:41 pm | संजय क्षीरसागर

आता जिथे बसला आहात तिथे, खुर्चीला पाठ टेकवून शांतपणे डोळे मिटा.

तुम्हाला लक्षात येईल की शरीर बसलं आहे आणि आपल्याला कळतंय. आपणच शरीर असतो तर असं कळणं शक्य नाही.

या नंतर धारणा निस्सरण आणि मी डिवेलप केलेली एक ध्यानपद्धती यामुळे आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत हा अनुभव सघन होत जातो.
यथावकाश निद्रेत ही अनुभुती आली की शरीर झोपलं आहे आणि आपल्याला कळतंय ही स्थिती येते. आपण मृत्यूला पार करतो.

या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी । यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥६९॥

या श्लोकाचा नेमका अर्थ तो आहे.

संकेतस्थळावरच्या लोकांना अध्यात्मात शून्य रस आहे (इथे बहुतेक देवभोळे आहेत) त्यामुळे इथे त्याविषयीचं लेखन मी बंद केलं आहे.

शा वि कु's picture

3 Sep 2020 - 2:55 pm | शा वि कु

मान्य आहे, अशी अनुभूती येते. पण याचा शरीर सोडून स्वची जाणिव असू शकते असा अर्थ नाही वाटत.
उदाहरणार्थ , मेंदुशिवाय/हृद्य थांबल्यावर/चेतातंतूच्या जाळ्याशिवाय ही जाणीव असेल का ? शंका वाटते.

फक्त व्यक्त जाणण्यासाठी आहे. स्वतःला जाणण्यासाठी न्यूरो सिस्टमचा काहीएक उपयोग नाही कारण आपण अंतीम आहोत.

स्व स्वतःला जाणू शकत नाही कारण जाणण्यासाठी आपण स्वतःला स्वत:पासून वेगळं करु शकत नाही.

आपण शरीर नाहि.. कारण शरीर अ‍ॅज सच काहि नाहि. अवयवांच्या असेम्ब्लीला शरीर म्हणतात. अवयव देखील अस्तीत्वात नाहि. एक प्रचंड पेशी समुह म्हणजे अवयव. पेशी देखील अस्तीत्वात नाहि. काहि रसायनांची असेम्ब्ली म्हणजे पेशी... असं कितीही सुक्ष्मात जाता येते.

शरीर म्हणा किंवा पर्वत, सूर्य म्हणा किंवा अमीबा... तत्वतः हे असं काहिच अस्तीत्वात नसतं.. आपल्याला कुठलिही गोष्ट तिच्या स्वरुपानुसार कळत नसुन कार्यावरुन कळते. तुम्ही कार्याचे कॉण्टेक्स्ट बाद करत चला.. मग प्रत्येक गोष्ट एका युनिफॉर्म ऑब्जेक्टमधे परावर्तीत व्ह्यायला लागते. या प्रकारे विश्वाची युनिफॉर्मीटी लक्षात आलि कि सारं सुख-दु:ख त्यात विरघळुन जाईल. डिप्रेशन वगैरे तर नावाला देखील राहाणार नाहि.

अर्धवटराव's picture

4 Sep 2020 - 8:51 am | अर्धवटराव

यात अध्यात्म वगैरे काहि नाहि.. साधा कॉमनसेन्स आहे.. विज्ञानाची सिद्धता आहे.

शा वि कु's picture

4 Sep 2020 - 9:21 am | शा वि कु

तुमचं म्हणणं अर्थातच बरोबर आहे. पण मायक्रो असण्याने मॅक्रो का रद्द करावा ?
आणि अणू/ पेशी/केमिकल्स/अवयव/शरीर हे माझ्या "मी" असण्यासाठी मस्ट आहेत. इतकेच.

अजीबात रद्द करु नये. इन फॅक्ट या सर्व आपला "मी' च्याच अवस्था आहेत. त्यातल्या किती जाणवतात, किती नाहि हे व्यक्तीपरत्वे/परिस्थीतीनुसार ठरतं.. पण त्यामुळे त्यांच्या व्हॅलिडीटीला बाधा येत नाहि.

भीतीच्या ह्या सर्व प्रकारातील एका प्रकारची भीती जास्तीजास्त लोकांना असते.
सर्वांना कशाची तरी भीती वाटतं असते.
मी दुचाकी वर माग बसलो की गाडी चालवणं रा काळजी पूर्वक गाडी चालवत नाही कधी ही accident करू शकतो अशी भीती वाटते.
पण स्वतः चालवत असताना ती भीती वाटतं नाही.

Dr. मैडम आपन खुप छान संमजावत आहात पुढचे भाग येऊ दया आम्ही वाट पाहतोय, आणी हो एक महत्वाचे इथे स्वयंघोषित महावतार पन आहेत ज्याना सगळ सगळ कळत ते भोचकेगिरी करायला आले तरी दुर्लक्ष करा ही नम्र विनंती :)

कानडाऊ योगेशु's picture

8 Aug 2020 - 12:41 pm | कानडाऊ योगेशु

लेख वाचुन असे वाटले कि लेखात उल्लेखिलेल्या सगळ्या भीती मला कमी अधिक प्रमाणात वाटतात. : )

सापांचा फोबिया असणारी व्यक्ती माळरानात, गवतात तर चालायला जात नाहीच, पण प्राणी संग्रहालयातील बंदिस्त पेट्यांमधील साप पाहणंही अश्या व्यक्तीला अशक्य असतं.

माझ्या एका मित्राची आई टी.वी वर देखील साप पाहु शकत नसायची. त्यावेळी छायागीत चित्रहार मध्ये नगीना नागीन वा तत्सम नागधारी चित्रपटातील गाणी सर्रास लागायची तेव्हा त्या, त्या गाण्यापुरते मान वळवुन घेत असत.

शुभावि's picture

8 Aug 2020 - 10:26 pm | शुभावि
शुभावि's picture

8 Aug 2020 - 10:27 pm | शुभावि
शुभावि's picture

8 Aug 2020 - 10:27 pm | शुभावि
अभिजीत अवलिया's picture

9 Aug 2020 - 11:31 am | अभिजीत अवलिया

छान सुरवात. पु.भा.प्र.

आनन्दा's picture

10 Aug 2020 - 8:22 am | आनन्दा

आपण हे लक्ष्यात ठेवूया की शेवटी विचार म्हणजे केमिकल लोच्या असतो.
त्यामुळे एकदा केमिकल लोच्या झाला तर तो केवळ दुसऱ्या केमिकलनेच बारा होऊ शकतो!!

डॅनी ओशन's picture

10 Aug 2020 - 12:00 pm | डॅनी ओशन

पुभाप्र

वीणा३'s picture

11 Aug 2020 - 1:24 am | वीणा३

माहितीपुर्ण लेख!!!
पुढे नक्की लिहा. कधी कधी उलट सुलट प्रतिसाद वाचून पुढचा लेख लिहायची इच्छा जाते काही लेखकांची. दुर्लक्ष करा हि विनंती आहे. आणि मानसशास्त्रांच्या अभ्यासक असाल तर तुमच्या कडे आलेल्या / माहित असलेल्या केसेस बद्दल पण लिहा नक्की. कधी कधी आपल्याच आसपास हे त्रास/लक्षणं असणारं कोणी आहे हे जाणवून आपसूक मदत केली जाते, किमान सहानभूती तरी दाखवली जाते.

ताई तुम्ही यांचे मिपावरतीच आलेले समुपदेशनाचे अनुभव वाचले आहेत का?

आणि मानसशास्त्रांच्या अभ्यासक असाल तर तुमच्या कडे आलेल्या / माहित असलेल्या केसेस बद्दल पण लिहा नक्की.

या अगोदरची ही सत्यघटनेवर आधारित कथा<\a> मुद्दामहून वरती आणलीय.

त्यामुळे
१. ही वाचाल तर मग त्यांच्या अगोदरच्या कथाही वाचतच राहाल.
२. बुध्दीमान असाल तर तुमच्या बुध्दीला त्या कथा खाद्य पुरवतील.
३. चर्चा वाढवत नेण्यासाठी यात अध्यात्म घुसडण्याची कोणालाही जरूरी वाटणार नाही.
४. लेखिका मानसशास्त्रातीलच तज्ञ असल्याने व बराच काळ मिपावर असल्याने, सक्रीय सभासदांच्या इथल्या वावरावरून त्यांनी त्या सभासदांना नक्कीच जोखले असणार. त्यामुळे त्यांच्याशी कसं वागायला पाहिजे हे त्यांना नक्कीच माहिती असणार. नव्हे, तीच तर त्यांची विशेषिता आहे. त्यामुळे कोणितरी त्यांना त्रास देईल, त्या त्रास करून घेतील, त्यामुळे त्या त्यांचे लेखन कार्य थांबवतील अशी शक्यता नाही.
५. आत्तापर्यंतच्या होत्या त्या कथा होत्या. बरोबरीच्या नात्याने चर्चा करणे व आपले मत मांडणे बरोबर होते. पण आता मात्र त्या त्यामागचे शास्त्र सांगताहेत. त्यामुळे ते समजावून घेणे, आणखी नीट समजण्यासाठी शंका विचारणे हे योग्य होईल.
६. तसेच आपले मत मांडता येईल. तो हक्क सर्वांचाच आहे. पण यावेळेस त्याबरोबर त्याची कारणमिमांसाही माडली तर ती अभ्यासाच्या दृष्टिने उत्तम होईल..

वीणाताई,
हे फक्त तुम्हाला उद्देशून लिहिल्यासारखे वाटले तरी, ते सगळ्यांसाठीच लिहिले आहे. कृपया वैयक्तिक घेऊ नये.

संजय क्षीरसागर's picture

11 Aug 2020 - 10:25 am | संजय क्षीरसागर

यात अध्यात्म घुसडण्याची कोणालाही जरूरी वाटणार नाही ?

भय हाच तर स्व उलगडण्यातला महत्त्वाचा अडथळा आहे आणि विचारांची प्रक्रिया कळली की तो दूर होतो. याला सांख्ययोग म्हणतात.

तुमचं पिस्तुल घेऊन काल्पनिक व्यक्तीला ठार करणं हा भयाचाच प्रकार आहे.

याचा साधा अर्थ तुम्हाला अध्यात्माची शून्य जाण आहे.

आता ते ॐ शांती शांती सोडा आणि माझे प्रतिसाद नीट वाचा, तुमची भीती जाईल.

शाम भागवत's picture

11 Aug 2020 - 10:43 am | शाम भागवत

ॐ शांती ॐ

सुबोध खरे's picture

11 Aug 2020 - 2:11 pm | सुबोध खरे

याचा साधा अर्थ तुम्हाला अध्यात्माची शून्य जाण आहे.

पहा शामराव

आम्ही म्हटलं नव्हतं का?

येथे कुणालाही काहीही येत नाही आणि सर्वच बाबींची सर्वांची जाण शून्य आहे.

तुम्हाला "ओम शांती शांती" चा तरी अर्थ कळलाय का?

शाम भागवत's picture

11 Aug 2020 - 2:22 pm | शाम भागवत

मी तर बाॅ एकदाच “शांती“ म्हणतो.
ते दोनदा का म्हणतात काही कळत नाही.

कदाचित त्यांना डबल शांतीची जरूरी असावी.
:)

संजय क्षीरसागर's picture

11 Aug 2020 - 2:50 pm | संजय क्षीरसागर

ते ॐ शांती शांती शांती: असं तीनदा आहे !

पण तुम्हाला एक तरी चान्स हवा म्हणून दोनदा लिहिलं.

शाम भागवत's picture

11 Aug 2020 - 3:36 pm | शाम भागवत

:)
ॐ शांती ॐ

वाचतोय. तुमचे मागील लेखही आवडले होते. पुभाप्र.

अवांतर :

संजय क्षीरसागर,

१.
या धाग्यात वर तुम्ही म्हणता की :

मन अशी काहीही चीज या दुनियेत नाही.

पण इथे तर तुम्ही संदीपचा मनाचा अभ्यास अफाट आहे असं म्हणता :

संदीपचा मनाचा अभ्यास अफाट आहे. तो मनाच्या अंतरंगात फार खोलवर उतरला आहे. मनाच्या महालाचे सर्व कानेकोपरे त्याच्या परीचयाचे आहेत. मनाच्या विमनस्कतेचं वर्णन तो अनेक अंगानी आणि कलात्मकतेनं करु शकतो.

तर मग तुम्हांस मन म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे?

२.
एके ठिकाणी तुम्ही मनाची व्याख्या केलीयेत :

मन म्हणजे मेंदूत अविरत चाललेला दृक-श्राव्य चलतपट.

आणि आता म्हणता की मन अशी काहीही चीज या दुनियेत नाही ....?

३.
इथे म्हणता की :

जोपर्यंत मनाचा उपयोग कंप्युटरसारखा करुन, निर्णय घेण्यापूर्वी तो कंप्लीटली शटडाऊन केल्याशिवाय (वैचारिक प्रक्रिया पूर्णपणे थांबल्याशिवाय), योग्य निर्णय होऊ शकत नाही.

आणि वर म्हणता की :

विचारांच्या सर्वनामाला मन असं संबोधण्याची पूर्वापार चूक झाली आहे.

म्हणजे विचार अस्तित्वात असतात तर. हे विचार मनाच्या नसतील तर नेमक्या कशाच्या आधारे अस्तित्वात असतात?

कुतूहल म्हणून विचारतो आहे. माझा मनाचा अभ्यास नाही.

आ.न.,
-गा.पै.

तुमचा मनाचा अभ्यास नसला तरी माझ्या सर्व लेखनाचा जबरदस्त अभ्यास आहे ! तुम्ही तो अत्यंत मनःपूर्वक केलायं आणि तुमच्या विचारांची दिशाही एकदम पर्फेक्ट आहे. त्यामुळे तुमचा प्रश्ण आवांतर नाही, अत्यंत समर्पक आहे.

१. गर्दी अशी चीज अस्तित्वात नाही, व्यक्ती समूहाचं ते सर्वनाम आहे. एकेक व्यक्ती वेगळी झाली तर गर्दी शून्य होईल. एक्झॅक्टीली तसंच मनाचं आहे, एकेक विचार सुटासुटा झाला तर मन अशी काही चीज अस्तित्वात नाही. ज्याप्रमाणे गर्दी या सर्वनामाचा आपण उपयोग करतो त्याप्रमाणे मन या निदर्शकाचा उपयोग आहे.

पण त्यामुळे एक सर्वात मोठा झोल झाला आहे; मन अशी काही तरी अज्ञात शक्ती शरीरात आहे आणि ती सर्व व्यक्तीगत जीवनावर सत्ता गाजवते असा समज दृढ झाला आहे. आणि सगळे संत-महंत, सगळी सायकीअ‍ॅट्री, कवि-लेखक हे मन नांवाचं प्रकरण आहे अशी ठाम धारणा पूर्वापार धरुन आहेत.

थोडक्यात, 'मन आहे' अशी चुकीची समजूत एकदा दृढ झाली की सगळी उपाय योजना, सगळा अप्रोच हुकतो.

२. मनाची नेमकी व्याख्या ही आहे : मन म्हणजे मेंदूत अविरत चाललेला दृक-श्राव्य चलतपट. तो मेंदूच्या आधारे चालतो आणि आपण त्याचे एकमेव प्रेक्षक आणि श्रोते असतो.

जर तुम्हाला एकेक विचार वेगळा दिसायला लागला तर तुम्ही त्या अविरत प्रवाहातून मुक्त होण्याची शक्यता आहे > त्या प्रक्रियेला ध्यान म्हणतात.

सुबोध खरे's picture

12 Aug 2020 - 6:23 pm | सुबोध खरे

सगळे संत-महंत, सगळी सायकीअ‍ॅट्री, कवि-लेखक हे मन नांवाचं प्रकरण आहे अशी ठाम धारणा पूर्वापार धरुन आहेत.

सगळेच्या सगळे कसे काय बेअक्कल निपजले आहेत बुवा?

त्यात तुम्हाला अर्धवट उप-प्रतिसाद देण्याची घाई !

एकदम अक्कल, लायकी अशा गोष्टींवर कशाला घसरता ?

तुम्ही स्वतः शरीरशास्त्राचा अभ्यास केला आहे. संपूर्ण देहाचं डिसेक्शन अभ्यासक्रमात असेल, हजारो पेशंटस तपासले असतील. मानसशास्त्र हा तुमचा विषय नसला तरी एक गोष्ट सांगा :

कुठे असतं हे मन ?

अर्थात, तुमच्याकडे याचं उत्तर नाही !

मग आता निरर्थक प्रतिसाद न देता, किमान सभ्यतेनं लेखिकेचं म्हणणं ऐकाल का ?

सुबोध खरे's picture

13 Aug 2020 - 9:31 am | सुबोध खरे

श्री सर्वज्ञ संक्षी

कुठे असतं हे मन ? ते मला माहिती आहे. परंतु आपल्या सारख्या विद्वान माणसाला समजावून देण्यात मला वेळ घालवायचा नाही.

एखादी गोष्ट आपल्याला दिसत नसली म्हणजे ती अस्तित्वात नाहीच असा जावई शोध लावून तुम्ही स्वतःचीच टिमकी वाजवता आहात.

ऑक्सिजनचा शोध लागण्यापूर्वी तो अस्तित्वात नव्हताच का?

किंवा

ऑक्सिजन आपल्याला दिसत नाही म्हणून तो नसतोच असे म्हणत आहात.

आपल्यालाच सर्व काही कळतं हा दंभ झाला असल्यामुळे असा होतंय.

फंक्शनल एम आर आय नावाची काही गोष्ट असते ज्याने आपल्या मेंदूचा आणि मनाचा व्यापार कसा चालतो याचे गूढ आता उलगडायला लागले आहे.

>फंक्शनल एम आर आय हा मी ज्या शास्त्राचा ( क्ष किरण शास्त्र) अभ्यास आणि व्यवसाय करतो आहे त्याचाच एक भाग आहे. यामुळे याबद्दल मला थोडी फार माहिती आहे.

काही वर्षात मन म्हणजे काय? याचे स्पष्ट उत्तर मिळेलच. तोवर तुम्ही आपला पूर्व ग्रह कुरवाळत रहा.

जाता जाता -- फंक्शनल एम आर आय आणि मन आणि मेंदू याबद्दल एक शोधनिबंध पाठवत आहे.

Studying mind and brain with fMRI

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2555441/

पहा आपल्याला झेपतोय का?

सुबोध खरे's picture

13 Aug 2020 - 9:39 am | सुबोध खरे

Can fMRI Read your Mind ?

https://www.imagilys.com/fmri-mind-reading/

A selective review of dharana and dhyana /fmri

https://www.sciencedirect.com/science/article/pii/S0975947616302406

जिज्ञासूंनी f mri गुगलून पाहावे.

बाकी हा धाग्याचा विषय नव्हे म्हणून मी यावर अधिक टिप्पणी करत नाही.

किमान मुद्दा धरुन आहे; चला एवढी तरी प्रगती झाली !

१.

कुठे असतं हे मन ? ते मला माहिती आहे . परंतु आपल्या सारख्या विद्वान माणसाला समजावून देण्यात मला वेळ घालवायचा नाही.

तुम्हाला ते माहिती नाही ! मला समजावून सांगण्याचा प्रश्ण कुठे येतो ? तुम्ही नक्की जागा सांगा विषय संपला. पण जी गोष्ट अस्तित्वातच नाही तिचा पत्ता तुम्ही काय सांगणार ?

२.

एखादी गोष्ट आपल्याला दिसत नसली म्हणजे ती अस्तित्वात नाहीच असा जावई शोध लावून तुम्ही स्वतःचीच टिमकी वाजवता आहात.

तुम्ही विज्ञान शिकला आहात, एखादी गोष्ट सिद्धच होत नसेल तरीही ती आहे असं मानता का ?

प्रथम रोगनिदान आणि नंतर उपचार अशी पद्धत आहे. तुम्ही रोग गृहित धरुन उपचार करता का ?

शिवाय तुमचा हा युक्तीवाद तुमच्याच पहिल्या दाव्याला (ते मला माहिती आहे) धोबीपछाड मारतो. इतकी साधी गोष्ट लक्षात आली नाही का ?

३.

काही वर्षात मन म्हणजे काय? याचे स्पष्ट उत्तर मिळेलच

बघा सगळं ओमफस्स करुन ठेवलंत !

थोडक्यात, तुमच्याकडे उत्तर नाही.

४.

फंक्शनल एम आर आय आणि मन आणि मेंदू याबद्दल एक शोधनिबंध पाठवत आहे. पहा आपल्याला झेपतोय का?

इतके अंतर्बाह्य पोकळ प्रतिसाद असल्यावर तुमच्या विधानांचा काय पाड लागणार ? तस्मात, झेपण्याच्या गोष्टी सोडा.
तुमच्या लिंक्स बोगस असतात त्या वाचायला मला वेळ नाही. त्यापेक्षा त्या निबंधाचं तुमचं आकलन लिहा. (अर्थात, ते सुद्धा लिहायची गरज नाही कारण तुमचा प्रतिसादच पुरेसा बोलका आहे)

सुबोध खरे's picture

14 Aug 2020 - 6:20 pm | सुबोध खरे

हा हा हा

किती भंपक प्रतिसाद.

काही ही झालं तरी मी च हुशार

चालू द्या

सुबोध खरे's picture

14 Aug 2020 - 6:22 pm | सुबोध खरे

तुमच्या लिंक्स बोगस असतात त्या वाचायला मला वेळ नाही.

झेपत नाही असे सरळ प्रामाणिकपणे म्हणा कि

कशाला मला सगळंच समजतं म्हणून आव आणत आहात

संजय क्षीरसागर,

प्रश्नाच्या प्रशंसेबद्दल आभार. अभ्यासाबद्दल म्हणाल तर ते माझं नसून गुग्गुळाचार्यांचं कर्तृत्व आहे. असो.

एकेक विचार सुटासुटा झाला तर मन अशी काही चीज अस्तित्वात नाही, असं तुमचं मत आहे. पण हा एकेक विचार सुट्टा करायचा तो कशाच्या पार्श्वभूमीवर? त्याचप्रमाणे तो सुट्टा न बघता सलग बघायचा झाला तरी पार्श्वभूमी हवीच ना? मग तिलाच मन का म्हणू नये?

तुम्ही म्हणता तो दृक-श्राव्य चलतपट मेंदूच्या आधारे चालतो. तो दाखवणारा आणि पाहणारा एकंच आहे. तो म्हणजे जाणीवस्वरूपी आत्मा. पण तो चलतपट कशावर व्यक्त होतो? त्यासाठी मनाचा आधार लागणारच ना?

चित्रपटाचं उदाहरण द्यायचं झालं तर प्रक्षेपकाच्या भिंगामागे चित्रफीत फिरंत असते, तिच्यावर चित्रपट चित्रमुद्रित असतो. पण प्रक्षेपकाच्या भिंगाला डोळा लावून चित्रपट दिसंत नसतो. त्यासाठी पांढरा पडदा लागतो. हा पांढरा पडदा म्हणजे मन.

आ.न.,
-गा.पै.

संकेतस्थळाचा दर्जा उंचावयचं मनावरच घेतलंय !

१. प्रथम तुमच्या आकलनातली एक चूक दुरुस्त करतो :

तो दाखवणारा आणि पाहणारा एकच आहे

असं नाही >माझा प्रतिसाद बघा : आपण त्याचे एकमेव प्रेक्षक आणि श्रोते असतो.

२. हा चित्रपट कशावर चालतो हा तुमचा प्रष्ण नंतर घेऊ.

प्रथम हे बघू की हा दृक-श्राव्य चलतपट प्रक्षेपित कोण करतं ? कारण असा प्रक्षेपण करणारा जो कुणी आहे त्यालाच तर मन समजलं गेलंय ! आणि माझं म्हणणंय की असा प्रक्षेपण करणारा कुणीही नाही. काय सोडवणूक आहे याची ? कारण प्रक्षेपक मूळ आहे, प्रक्षेपण दुय्यम आहे. प्रक्षेपक सोडवला की प्रक्षेपण सुटलं !

मौज अशी की लेखिका `टप्याटप्यानं प्रष्ण सोडवू' म्हणते ! ते अशक्य आहे. कारण भय मूळ आहे, एक कारण सोडवलं तर भय दुसरं कारण शोधेल.

हा प्रष्ण सायकिअ‍ॅट्री बापाजन्मात सोडवू शकणार नाही कारण तो हा सगळा पोस्ट अ‍ॅनॅलिसिस आहे. प्रोजेक्शन झाल्यावर (म्हणजे चित्रपट चालू झाल्यावर) त्याला दिलेल्या रिस्पाँन्सचा तो अभ्यास आहे. त्यामुळे लेखिका सोयिस्करपणे चर्चेतून अंग काढून घेऊन नव्या पोस्ट टाकतेयं. आणि हा प्रक्षेपकच सगळ्या संत-महंतांनी, मानसशास्त्रज्ञांनी, कवि-लेखकांनी, तुम्ही-आम्ही (ज्याम) गृहित धरला आहे

या अनुषंगानं आता एकदम अपूर्व उलगडा करतो !

प्रक्षेपण किंवा मेंदूत अविरत चाललेला हा दृक-श्राव्य चलतपट म्हणजे आपलंच रुपांतरण आहे आणि त्याचं एकमेव कारण आहे बेसावधपणा ! सकाळच्या बेसावधपणाला तंद्रा म्हणतात आणि रात्रीच्या बेसावधपणाला निद्रा. रात्री हा चलतपट स्पष्ट दिसतो त्याला आपण स्वप्न म्हणतो; दिवसा उजेडामुळे तो अस्प्ष्ट दिसतो; त्याला आपण विचार म्हणतो; इतकाच काय तो फरक !

त्यामुळे प्रक्षेपण बंद करण्याचा एकमेव उपाय सजगता आहे (अवेअरनेस) . म्हणून सिद्धाला जागृत पुरुष म्हटलंय. ही जागृतीची प्रोसेस म्हणजे ध्यान !

३. आता तुमचा प्रश्ण : तो चलतपट कशावर व्यक्त होतो? त्यासाठी मनाचा आधार लागणारच ना?

तो चलतपट मेंदूत प्रक्षेपित होतो. मेंदूपलिकडे विचाराचं सामर्थ्य शून्य आहे. जसा वेदनेचा दायरा शरीर आहे तशी मनाची* अ‍ॅक्टीविटी फक्त मेंदूत आहे.

__________________________________

* प्रतिसाद देतांना जरी मन हा शब्द वापरत असलो तरी त्याचा अर्थ विचारांचा प्रवाह किंवा एकूण मानसिक अ‍ॅक्टीविटी असाच आहे. मन अशी काही चीज या दुनियेत नाही. तरी सदस्यांनी (काहीही न जमल्यानं) उगीच शब्दच्छल करण्याचा प्रयत्न करु नये.

सुबोध खरे's picture

13 Aug 2020 - 12:06 pm | सुबोध खरे

मौज अशी की लेखिका `टप्याटप्यानं प्रष्ण सोडवू' म्हणते ! ते अशक्य आहे. कारण भय मूळ आहे, एक कारण सोडवलं तर भय दुसरं कारण शोधेल.

हा प्रष्ण सायकिअ‍ॅट्री बापाजन्मात सोडवू शकणार नाही कारण तो हा सगळा पोस्ट अ‍ॅनॅलिसिस आहे.

है शाबास

एकदा वाचून कळालेलं दिसत नाही.
प्रतिसादाची घाई करु नका.
पुन्हा दोनदा वाचा नक्की कळेल.
उघड गोष्टी आहेत.
एकदा कळलं की स्वतःलाच शाबासकी घ्याल !

सुबोध खरे's picture

13 Aug 2020 - 12:20 pm | सुबोध खरे

एकदा कळलं की स्वतःलाच शाबासकी घ्याल !

काय सांगताय?

सुबोध खरे's picture

12 Aug 2020 - 10:22 am | सुबोध खरे

गा पै साहेब

काही लोकांचं लेखन हे नेपाळी भाषेतील वृत्तपत्र वाचल्यासारखं असतं.

वाचता तर सगळं येतं पण समजत मात्र काहीही नाही.

))=((

संजय क्षीरसागर's picture

12 Aug 2020 - 12:41 pm | संजय क्षीरसागर

तुम्हाला नेपाळी वाचता येतं ही नवी माहिती कळली !
फावल्या वेळात गुरख्याबरोबर ड्युटी केली का
क्लास लावला होता ?
पण वाचता येतं आणि समजत नसेल तर तिथेही घोळ झालेला दिसतोयं

त्यामुळे तो अभ्यास घरच्या घरी सुद्धा केला असेल पण अर्थ समजत नसेल तर वाचायचं कशाला ?

महासंग्राम's picture

13 Aug 2020 - 9:46 am | महासंग्राम

हे मन पण नेपाळी आहे :)

आपला के पी ओली

सुबोध खरे's picture

12 Aug 2020 - 6:21 pm | सुबोध खरे

पण वाचता येतं आणि समजत नसेल तर तिथेही घोळ झालेला दिसतोयं १२.४१

नेपाळी देवनागरी स्क्रीप्टमधे लिहितात१.०९

हि पश्चात बुद्धी कशी काय आली.?

जाता जाता -- लष्करात असताना गुरखा सैनिकांबरोबर बराच वेळ घालवला आहे. आणि त्या शूर पण भोळ्या आणि सरळ मनाच्या माणसांबद्दल अत्यंत आदर आहे.

स्वतःच्या अस्तित्वाची भीती हे सर्व. भीती चे मूळ आहे हे संजय क्षीरसागर ह्यांचे मत योग्य च आहे.
पण भीती चे खूप. वेगवेगळे प्रकार आहेत त्या वर चर्चा करून त्याचा अभ्यास करून त्या वर उपाय शोधणे गरजेचे पण आहे.
अस्तित्वात नसलेल्या संकटाची भीती वाटणे हा मानसिक रोग आहे त्या भीती शी अस्तित्वाची भीती शी काही संबंध नाही

अर्धवटराव's picture

12 Aug 2020 - 11:56 pm | अर्धवटराव

बर्‍याचदा काहितरी गमावण्याची भिती हि अस्तित्व संपण्याच्या भितीपेक्षा वरचढ ठरते. जीवंत असल्याचं समाधान आणि आनंदप्रापती/दु:खमुक्ती करता आवषयक वाटणार्‍या (आवश्यक असायलाच हवे असे नाहि..) रिसोर्सेसची हमी असल्याचं समाधान, यात अनेक जण रिसोर्सेसला प्राधान्य देतील. कोणि कितीही म्हटलं कि तुमचं अस्तित्व कुठल्याही बाह्य बाबींपासुन अबाधीत आहे, तरी ते दु:खमुक्त आणि/किंवा सुखासीन असण्याला जास्त महत्व दिलं जाणं, हे देखील भितेचं एक कारण आहे.
हि लेखमाला बहुतेक या बाबींना स्पर्ष करेलच.

संजय क्षीरसागर,

तुमचा इथला संदेश वाचला. माझी मतं मांडेन म्हणतो.

१.

आपण त्याचे एकमेव प्रेक्षक आणि श्रोते असतो.

काही हरकत नाही. तसंही पाहता माझ्याकडून तो मूळ मुद्दा नव्हता.

२.

प्रक्षेपक सोडवला की प्रक्षेपण सुटलं !

पण ग्राहक अस्तित्वात आहे. तो कशाच्या आधारे विचार ग्रहण करतोय हा प्रश्न उरतोच.

३.

मौज अशी की लेखिका `टप्याटप्यानं प्रष्ण सोडवू' म्हणते ! ते अशक्य आहे. कारण भय मूळ आहे, एक कारण सोडवलं तर भय दुसरं कारण शोधेल.

मी लेखिकेच्या या विधानाबद्दल काहीच भाष्य करू इच्छित नाही. सध्या तरी मी 'मन अस्तित्वात आहे' या युक्तिवादावर लक्ष केंद्रित करीत आहे.

४.

सकाळच्या बेसावधपणाला तंद्रा म्हणतात आणि रात्रीच्या बेसावधपणाला निद्रा.

मान्य. मात्र यातनं एक प्रश्न उद्भवतो. जागृतावस्थेतून निद्रावस्थेत ढकलणारी कोणती तरी एजन्सी अस्तित्वात असली पाहिजे. त्याचप्रमाणे निद्रावस्थेतून जागृतावस्थेत आणणारी एखादी एजन्सी अस्तित्वात असली पाहिजे. या दोन एजन्सी कदाचित एकंच असू शकतात. त्यांना मन म्हणायला काय हरकत आहे? निद्रा व तंद्रा ज्याच्या आधारे व्यक्त होतात, ते मन.

५.

त्यामुळे प्रक्षेपण बंद करण्याचा एकमेव उपाय सजगता आहे (अवेअरनेस) . म्हणून सिद्धाला जागृत पुरुष म्हटलंय. ही जागृतीची प्रोसेस म्हणजे ध्यान !

सिद्धावस्थेत मन शांत होऊन नाहीसं होतं, हे मान्य. माऊलींनी असंच काहीसं कुठेतरी म्हटलंय.

६.

तो चलतपट मेंदूत प्रक्षेपित होतो. मेंदूपलिकडे विचाराचं सामर्थ्य शून्य आहे. जसा वेदनेचा दायरा शरीर आहे तशी मनाची* अ‍ॅक्टीविटी फक्त मेंदूत आहे.

तसं पाहायला गेलं तर मेंदू एक चरबीचा लिबलिबीत गोळा आहे. विशिष्ट स्थिती प्राप्त झाल्याशिवाय तो विचार ग्रहण करू शकंत नाही. उदा. : मृत मेंदूत विचार उमटंत नसतात. ती जिवंत स्थिती म्हणजे मन.

आ.न.,
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

14 Aug 2020 - 11:52 am | संजय क्षीरसागर

१.

सध्या तरी मी 'मन अस्तित्वात आहे' या युक्तिवादावर लक्ष केंद्रित करीत आहे.

शाब्बास ! तोच एकमेव मुद्दा आहे.

२.

पण ग्राहक अस्तित्वात आहे. तो कशाच्या आधारे विचार ग्रहण करतोय हा प्रश्न उरतोच.

जाणिवेच्या आधारे वैचारिक आकलन होतं.

३.

निद्रा व तंद्रा ज्याच्या आधारे व्यक्त होतात, ते मन.

आपल्या बेसावधपणाला आपण मन म्हणू शकत नाही कारण आपण सावध झालो की विचार उमटू शकत नाहीत.

४.

सिद्धावस्थेत मन शांत होऊन नाहीसं होतं, हे मान्य

मन नाहीचे. अविरत चाललेला विचार प्रवाह शून्य होतो. शांतता प्रस्थापित होते. आपण आपल्यात स्थित होतो.

५.

मृत मेंदूत विचार उमटंत नसतात. ती जिवंत स्थिती म्हणजे मन.

मृत मेंदू म्हणजे मनाचं नाहिसं होणं नाही. मेंदू फुल्ली फंक्शनल असतांना (आणि आपण जीवंत असतांना) विचार प्रवाह थांबणं ही जागृत अवस्था आहे. त्याचा मनाशी काहीएक संबंध नाही.

जागृतावस्थेतून निद्रावस्थेत ढकलणारी कोणती तरी एजन्सी अस्तित्वात असली पाहिजे.

त्याला ARAS (ascending reticular activating system) म्हणतात.

https://en.wikipedia.org/wiki/Reticular_formation#:~:text=The%20ascendin...(ARAS)%2C%20also%20known%20as,wakefulness%20and%20sleep%2Dwake%20transitions.