अंधेरी, सेनस्केस आणि ट्रेन

लेखनवाला's picture
लेखनवाला in जनातलं, मनातलं
24 Aug 2020 - 9:40 am

****************

सकाळचा तो लोकल ट्रेनच्या आतला भाग. नाकीनऊ करत का होईना ट्रेनच्या आतल्या गर्दीत एकदाचे दोन्ही पाय डब्यात टेकवायला जागा झाली खरी, आणि थोडं थोडं पुढे आतमध्ये शिरत, आता एका कोप-यात टेकून उभं राहता आलं शेवटी त्याला, माणसां मागून माणसं आत रेटत होती, मघास पासून आत खिश्यात असलेला मोबाईल एकदाचा हातात आला, आजूबाजूला एकदा त्यानें सभोवार नजर मारली, खूपजण त्यांच्यासारखेच मोबाईलमध्ये गुंतले होते, तितक्यात अचानक एकजण उठल्यामुळे बसण्याजोगी ‘चौथ्या’ सीटची जागा झाली आणि तो बसला. त्याच डब्यात थोडं पुढच्या बाजूलाच असलेल्या लोकांपैकी काहीचं टाळ, ढोलकी, नाल बडवणं चालू होतं, त्याला असं ट्रेनमध्ये भजन म्हणा-याचीं प्रचंड चीड यायची, आपली नोकरी करत वर्षानुवर्ष रोज असं ‘राबणं’ ही लोक कशी काय इन्जॉय करु शकतात, त्यांचा स्वतःचा जीव नोकरीत रमत नव्हता, अन त्याचमुळे त्याला आपल्या एकूणच समाजातल्या अश्या टाईपच्या लोकांबदल प्रचंड राग होता, अशी भजन करुन प्रपंच, अध्यात्म्याच्या गोष्टी उगाळत बसल्यामुळे इथं या आताच्या पिढयांना अश्या दुस-याच्या हाताखाली नोक-या करायला लागतायत, तो मनातल्या मनात घुसमटत राहायचा, तो आता बावीस-तेवीस वयाचा होता, ‘हे जग बदलून टाकीन’ असाच त्यांचा काहीसा अविर्भाव असायचा. तो इथं अंधेरीला आला होता इथल्या एका संघटनेसोबत पूर्वी काम करायचा म्हणून, आता सक्रिय नव्हता पण रविवारी, सुटटीच्या दिवशी वैगेरे आयोजित केलेल्या कार्यक्रमांना निश्चित जात होता, महापुरुषांच्या विचांरानी प्रेरित झालेल्या एका बिगर राजकीय पण काही विशिष्ट राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय डावपेचापायी पांठिबा देऊन पोशिंदा केलेली ही संघटना. आता मात्र या ‘संघटने’ने एकूण आपली कक्षा वाढवण्यासाठी निवडणूक लढवायचं ठरवलं, अगदी त्या पांठिबा देणा-या राजकीय पक्षाच्या विरोधातसुदधा…. खूप सारी आतल्याआत चालणारी राजकारण्यांची तजवीज असते पण ते काही त्यांच्यापर्यंत येणारं नव्हतं, ते सगळं वरच्या लेव्हलवर होतं, पूर्वी पार तिकडे मराठवाडयात जोमाने चालत असलेली ही संघटना आता इथं मुंबईपासून निवडणुका लढवण्यासाठी तयारी करीत होती, त्यासाठीच लोक जमा होण्याच्या हेतूनं आणि लोकांत संघटनेची चर्चा व्हावी यासाठी रविवारी रात्री आयोजित कार्यक्रम होता. मात्र हा कार्यक्रम वेळेपेक्षा जास्त लांबला, मग काय रात्रभर मुक्काम तिथंच होता, या संघटनेशी तो पहिल्यापासून जोडलेला, सगळेच ओळखीचे त्यामुळे येणं-जाणं होतचं पण आज जास्तच वाजले. इथल्या जागेशी त्यांची नाळ जुळलेली होती, इथले मित्र होते, शाळा होती, आयुष्याचा खूप सारा काळ यांच भागात गेलेला त्यामुळे इथें आला की मग त्याला रमायला व्हायचं, संघटनेच्या मंडळाची स्वतःची रुम असल्यामुळे झोपायची सोय होती, जसा दिवस उजाडला तसा तो तडक निघाला.

****************

सकाळचे साडेआठ वाजले, सोमवार सुरु झाला, त्यांने अंधेरी स्टेशन गाठलं, आता तो इथं राहत नाही, मागच्या पाच वर्षांपूर्वी आई-वडील-भाऊ-बहिण यांच्यासोबत ठाण्याला स्थलांतरित झाला होता, मेट्रोने तो अगदी सुखासुखी व्हाया घाटकोपर ठाण्याला जाऊ शकला असता पण त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते खिश्यात. आणि असते तरी त्यांने तसं केलं नसतं, जे अंतर तीस रुपयात होणार होतं ते त्यांला डबल पैसे देऊन करायला त्यांच मन धजवलं नसतं, त्यांचा स्वभाव तसाच होता, काटकसरीपणा अंगाअगात भिनलेला. ठाणे रेल्वेस्टेशनपासून खूपच आतमध्ये एके ठिकाणी बिल्डींगमध्ये रुम होता आणि तो ही भाडयानें, कोणत्या कारण्यानीं इथं ठाण्याला स्थायिक झालां ठाऊक नाही, ठाण्यालाच घरापासून जवळच नोकरीला होता.

वाढत्या वयासोबत पाहिल्या जाणा-या स्वप्नामध्ये स्वतःच्या म्हणून ज्या ज्या काही गोष्टी हव्या अश्या वाटत होत्या त्याची एक यादी होती. त्यात घर सगळ्यात वरती होतं, हे सगळं हव असेल तर पैसा हवा, त्यासाठी मग चागलं काम हवं किवां मग बिझनेस हवा. त्याची रिस्क घेण्याची क्षमता लिमिटेड होती, सध्या तो फक्त नोकरीवर फोकस करत होता त्याशिवाय आणखी कुठून पैसे मिळवता येतील यांचाही तो शोध करत होता. स्वतः नाईलाजास्तव नोकरी करत असल्यामुळेच त्याला दुस-याच्यां नोकरी करण्याचा प्रंचड राग येई. तो या परिस्थितीला काय नाव देता येईल यांचा विचार करायचा. हतबलता. त्याला यांतून बाहेर पडायचं होतं. हल्लीच त्यांला एक नवीन पैसे कमवण्याचा रस्ता कळाला होता, कुठेही जायची गरज नाही, कुठेही ऊन्हातान्हात फिरायची गरज नाही, आपले आपले पैसे टाकून सुरु करायचा, तो म्हणजे शेअर बाजार. त्याला स्वतःच घर घ्यायचं होतं, पण त्याला कर्ज काढून घर नव्हतं घ्यायचं आणि कर्ज देणारं तरी कोण होतं? तारण तरी काय होतं? ते आता इथं ठाण्यातही शक्य वाटत नव्हतं आणि त्याला आता तिथं ठाण्यापलीकडे बदलापूर, अंबरनाथ गाठायचं नव्हतं, त्याला इथं मुंबईतून ठाण्याला आल्यामुळेच कसंतरी होतं होतं, त्यामुळे आता किमान ठाणंतरी सोडायचं नव्हतं, मेहनत करायची तयारी होती पण मेहनत कश्यात करायची तीच माहित नव्हती.

आणि मेहनत म्हणजे ‘घाम गाळणे’ नव्हे हे त्याला ही ठाऊक होतं, आता त्याला हल्लीच शेअर बाजाराबदल कळालं होतं, तो कॉमर्स शिकून सुदधा या सगळ्यापांसून अनभिज्ञ होता, त्याला आता हळूहळू थोडया थोडया गोष्टी कळत होत्या, जसे की एखादा शेअर विकत घेतला की तो लगेच त्यांच दिवशी विकून टाकता येतो, त्यासाठी त्या शेअर एवढया किमंतीची रक्कम असणं गरजेचं नाहीय म्हणजे एक शेअर शंभर रुपये असेल आणि तुम्ही शंभर शेअरचा व्हवहार एकाच दिवसात आटपणार असाल तर त्यासाठी दहा हजार रुपये असणं गरजेचं नाहीय जास्तीच जास्त दोन ते तीन हजार असले तरी बसं झालं यालाच ‘इन्टराडे ट्रेडींग’ म्हणतात, शेअर पहिला विकून नतर खरेदी करता येतो. हे सगळं समाजावून सांगण्या-याने त्याला खूप मोठी स्वप्न दाखवली होती, रोजच्या रोज प्रॉफिट कमवून तोच पैसा दुस-या दिवशी नवीन शेअर खरेदी-विक्रीसाठी कसा वापरायचा, ‘पुन्हा नफा पुन्हा व्हवहार’ असं चक्र चालू करायचं, खूप सारे पैसे कमवायचे. साधा सरळ हिशोब होता साधी सरळ स्वप्न होती. त्यासाठीचा अभ्यास काय तर एखादया कंपनीचा शेअर का कोसळतो किंवा का वाढतो यांची माहिती घ्यायची, काही वेबसाईट चाळायच्या, काही अपलिकेशन मोबाईलमध्ये डाऊनलोड करायची, शेअर बाजारातली अनुभवी माणसं आणि त्याचं बरोबर ‘बाजार’ वाचणारी, सांगणारी आजूबाजूची लोक काय बोलतात ते ऐकायचं, टीव्हीवर शेअर मार्केटला वाहायलेली चॅनेल तासनतास बघत बसायची, हल्ली शेअरची आर्डर देण्यासाठी ब्रोकरच्या ऑफिसात फोन करण्याची गरज नव्हती, सगळं काही मोबाईलवर हाताच्या बोटानी एकदम सोप झालं होतं. जितकं जाणून घेता येईल तितकं तो माहित करुन घेत होता, त्यानें पुस्तक वाचून माहित केलं की असं इन्ट्राडे करुन कोणीही खूप वेळपर्यंत श्रीमंत राहू शकत नाही.

शेअर मार्केट दोन गोष्टीवर चालतं ‘भीती’ आणि ‘मोह’. तुमचा मोह ‘तुम्हाला अजून नफा होईल’ किंवा ‘आता लगेच थोडया वेळात, झालेलं नुकसान भरुन निघेल…. होईल लगेच नफा’ यासाठी आणि भीती ‘झाला तितका नफा ठीक आहे’ किंवा ‘यापेक्षा जास्त नुकसान नको’ यासाठी काम करायला भाग पाडतो. मानवी मन त्यांच्या अथांग अश्या ‘असंख्य शक्यता-अशक्यतांनी’ काम करत असतं, या मनासोबतच हदय आणि मेंदू दोन्ही ही या शेअर बाजारतल्या घडामोडीनां प्रतिक्रिया देऊ लागतात. तो आता दररोज सराव करु लागला होता, सुरवातीला तो हे सगळं काही कागदावर आकडेमोड करुन बघायचा, याशिवाय त्यांचं वाचन चालू होतं, आता त्याला अजून काही गोष्टी कळाल्या होत्या, एखादया शेअरचं विश्लेषण करायचे दोन भाग, एक तांत्रिक विश्लेषण जिथं त्याचा वरती खालती होणा-या किमंतीचा ग्राफ तयार करत खूप सा-या गणिती प्रकिया मांडत अंदाज मांडण आणि दुसरं विश्लेषण फंडामेंटल, जिथं त्या कंपनीची बॅलन्सशीट चाळून काढत त्या क्षेत्रातल्या इतर कंपन्याशी तुलना करत अंकाऊटिग रेशो काढणं. हयासाठी डोकं लावावं लागत, मेहनत लागते, निवांतपणा लागतो, तो त्यांच्याकडे नव्हता. पुन्हा काही पुस्तक वाचली आणि त्यांने आपला आपला निष्कर्ष काढला “आणि असं विश्लेषण करुन आलेला अंदाज प्रत्येक वेळी खरा ठरेल यांची शाश्वती नव्हती”, आणखी एक गोष्ट होती टिप्स देणारे कॉल आणि मॅसेज, यांचा काही नेम नसतो ते स्वतःच बंडलबाज असतात यांचा त्याला अंदाज होता आणि ‘हे बंडलबाज आहेत’ असा विश्वास देणा-या आसपासच्या काही शेअर ट्रेंडिग करण्याच्या अनुभवकथनामुळे ही तयार झाला होता, त्यामुळे जे काही तो शेअर ट्रेडिंग करणार होता ते स्वतः विश्लेषण केलेल्या शेअर पैकीच असणार होतं. या व्यक्तिरिक्त म्युचल फंड नावाचा दरमहिना रक्कम गुंतवून करुन गप्प बसण्याचा प्रकार होता पण त्याला इथं रोज होणा-या शेअरच्या चढ-उतारांमधून नफा कमवायचा होता, तरी त्याला काही प्रश्न पडतं, हे पटापट शेअरस मध्ये पैशे कमवणं शक्य आहे का? मग सगळ्याचं लोकांनी केलं असतं, लोक सकाळी उठून कामाला का गेले असते, पण अजून एक डोकं सांगत होतं, जर जगात सगळं शक्य आहे तर मग दररोज नफा पण शक्य आहे? होईल का? तो अजूनही कागदावरच ट्रेंड करत होता म्हणजे कागदावरच नफा आणि कागदावरच तोटा. आता त्यानं काही दिग्गज मंडळीविषयी वाचलं, ब्रेजमिन फ्रकलिन, वॉरेन बफेटसारखी, पीटर लिएच वैगेरेसारखी. त्याचं म्हणणं होतं की नुसतं ट्रेडिगं करुन कोण अब्जाधीश होतं नाही, संयम बाळगावा लागतो, शेअर मध्ये इन्वस्टेर या नात्यानें पैसे गुंतवा. इथं त्याला पटकन मोठं व्हायचं होतं कारण जे अगोदरपासून निसटून गेलंय ते त्याला अधिकच गमवायचं नव्हतं आणि इतका उशीर करुन हे सगळं साध्य होणार नव्हतं, ते हवं असेल तर जितक्या लवकर होईल तितक्या लवकर त्याला खूप सारे पैसे कमवायचे होते पण यासाठी पुस्तक वाचत अभ्यास करणं, ती तशी डोकं चालवणारी मेहनत करायची नव्हती. त्याला असं कागदावर ट्रेंड करुन अजूनही अंदाज येत नव्हता. दररोज कामावर जाताना त्याला त्या मोठमोठाल्या बिल्डिंगस दिसायच्या, त्या पॉश गाडया दिसायच्या, यात त्याला कुठेचं प्रामाणिकपणा, सोचटी दिसायची नाही, दिसायचा भष्ट्राचार, पिळवणूक, आर्थिक असमतोलपणा, लबाडी. हे असं असुरी वागूनच सगळं कमी वयात मिळणार असेल तर का करु नये पण त्यासाठीचा जो बेदारकरपणा लागतो तो त्यांच्यात येणं मुश्कील आहे. आता त्याला ही त्या बिल्डींगमध्ये स्वतःचा फलॅट हवा होता, तो ही पार म्हातारवयात नाही, आताच हवा होता तरुण वयात, शिवाय मेहनत म्हणून स्वतला असं झिजवायला तो तयार नव्हता, तो असं पार मैदानात उतरुन लढायला घाबरायचा. त्याला वाटायचं कुठल्या तरी एका बाजूने शेअर झुकणार आहे आपण नुसतं नशीबावर स्वार होतं ट्रेडिंग करायचं, शेअर बाजार जुगार आहे असं मानूनच ट्रेंड करायचा. आणि हल्ली तो तसचं तो करत होता……

आता देखील ट्रेनमध्ये जागा भेटल्यावर यांच दुनियेत शिरला, शेअर बाजाराच्या. सोमवारचा दिवस होता, मोबाईलवर झळकणा-या काही नेहमीसारख्या बातम्या होत्या, ट्रेन वेळेवर नव्हतीच नेहमीसारखीच, दादर गाठायला नऊ दहा होतील, अजून नऊच वाजले होते, आता त्यांने मोबाईलमध्ये आपलं ट्रेडिगं अंकाऊटच अपलिकेशन ओपन केलं, सेनेस्क्स नेहमीसारखाचं….. जास्त काही वरती खाली नव्हता, त्याने आपल्या ट्रेडिग अंकाऊटमध्ये किती पैसे आहेत यांची खात्री केली, तीन हजार रुपये, हे पैसे त्यांने कमावले होते की बाकी शिल्लक राहले होते ते तोच जाणो, पण आता त्यांने खरी ट्रेंडिग करायला सुरुवात करुन दोन-तीन महिने लोटले होते, त्यांची त्यांची काही मांडणी तयार होत चालली होती, एकदा का एका शेअरमध्ये खरेदी किंवा विक्री केली की आपला नफा होणा-या बाजूने व्हवहार झाला की बसं बाकी त्यांची कारण काही असो त्या ‘लाख करोड’ रुपयाच्यां महासागरात आपले हजार दोन हजार रुपये हे निव्वळ थेंब होते. पण जर का त्यातं नुकसान झालं तर मात्र त्याचं अस्तित्वच राहणार नाही आणि तो शेअर बाजारमधून बाहेर पडेल. त्या थेंबाची कधी वाफ झालीय कळणार ही नाही…..

तो इथं थेंबाथेंबापासून समुद्र बनवायची स्वप्न बघतोय, हल्ली एका शेअरची तो नेहमी ट्रेडिंग करत होता, शेअर सहाशे रुपये किमंत झालेला. त्यांची नजर होती…. नऊ पंधराला शेअर बाजार सुरु होतो…. तो मोबाईल एपलिकेशनवर बाकी शेअरस पण बघत होता… इकडे त्यांची ट्रेनच्या थांबण्याबरोबर प्रत्येक नव्या फलाटावर नजर होती….नऊ पंधरा झाले….शेअर बाजार सुरु… ट्रेन दादर स्टेशनला आता पोचणार…. ज्यांना उतारायचं ते सगळे दरवाजापांशी येऊन उभे राहायले….. नेहमीप्रमाणे गाडी थांबायच्या अगोदरच उतरणारी मंडळी एकामागोमाग गाडीतून उतरत होती…. गाडी जशी थांबली…. तशी माणसं नुसती चढतच होती…. त्या दरवाजावर माणसचं माणसं अजूनही दरवाजावर तातकळत होती….तो मात्र त्यातून केव्हाच निसटतं इकडे मध्यरेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर आला….ठाण्याला जाण्या-या ट्रेनची वाट बघत उभा होता…पुन्हा मघाशी खिश्यात असलेला मोबाईल बाहेर काढला. ते शेअर ट्रेडिंगचं अपलिकेशन सुरु केलं… सेनेस्कस ठीक होतं… स्क्रीनवर खाली खाली स्क्रोल स्क्रोल करत असताना एके ठिकाणी थांबला.. हा शेअर अचानक का कोसळतोय….सहाशे रुपये होता मार्केट सुरु होण्याच्या अगोदर… आणि आता नऊ पंचवीस झालेत…. शेअरची प्राईज…पाचशे पंचवीस….तो विचार करत होता…करु का ट्रेंडिग….अजून पडेल का? तीन हजार रुपयांमध्ये इंट्राडेसाठी कमीतकमी पन्नास शेअरचा व्हवहार करण्याइतकी मार्जिन भेटेल…. इथून जर विकत घेतला आणि वरती पन्नास रुपये गेला तर….पन्नास गुणिले पन्नास….पंचवीशे रुपये… पण जर हा अजून खाली कोसळला तर…साठ रुपयांनी पडला तर… त्यांचे ते तीन हजार रुपयें गेले… चडडीचूप… अश्यावेळी निर्णय घेणं कठीणं होतं…फार कमी वेळ भेटतो आपण ठराविक मतावरं पोचायला… विश्लेषण वैगेरे करायला जास्त वेळ मिळत नाही… फक्त विकणारे आणि खरेदी करणारे यांच्या संख्येवरुन अंदाज बांधता येतो… समोर ट्रेन आली…. बसायचं नाही असं ठरलं त्यांचं… पहिला आधी यांचा काय तो निपटारा लावावा असं त्यानं ठरवलं….सिंपल सिपलं… हदय अश्यावेळी जोरदार ठोके दयायला सुरुवात करतं….हया अश्या शेअरमध्ये ट्रेडिंग करणं म्हणजे थोडक्यात एका मोठया वा-याच्या झोक्यासारखं …फक्त तुम्ही त्या झोक्याच्या दिशेने असला की तुम्ही मालामाल…. नऊ पस्तीस…त्यांचं ठरत नव्हतं… काय करावं… खरेदी करावं की विकावं…. काय तरी एक करावं लागणारचं होतं…. त्याला ठाण्यातल्या मोठमोठाली इमारती, पॉश गाडया नजरेसमोर तरळत होत्या….तीन हजार गेले तर… महिनाचा पगार यांच्या सहा पट… एवढं तर रिस्क घ्यावीचं लागेल…म्हणजे काहीतरी व्हवहार होणार होता…खरेदी की विक्री… नऊ चाळीस…झाले.. शेअर अजून खाली कोसळला… चारशे ऐंशी… त्यांने घेतला डिसीजन… त्यांने पन्नास शेअर विकायचे ठरवले……ऑर्डर टाकली…म्हणजे जर अजून खाली गेला तर..प्राफीट… कसा…जे विकलयं ते नंतर कमी भावाला खरेदी करा…व्हवहार संपला… आणि जर वरती गेला तर वरच्या भावाने खरेदी करावा लागेल…हा असाच जो प्लस मांईनस करुन उरेल तो प्राफीट किवां लॉस…पावणेदहा वाजले…शेअर पडत होता….दहा वाजले…यांने ट्रेन पकडलीय…घाटकोपर पार झालयं…शेअरस तीनशे ऐंशी….शंभर पांईटची मुव्हेंमेट…पन्नास गुणिले शंभर…पाच हजार प्राफीट…प्राफीट बुक करु का…की अजून थांबू…मोह आणि भीती दोन्ही ही भावना वेगात एकाच वेळी मनात घुसमळत होत्या.. त्याला मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारा प्राफीट कितीतरी दिवसानंतरचा होता…तो खुश होता…निम्मी गाडी रिकामी होती…काय करावं काय करावं..विचार करणंच त्याला जमत नव्हतं…इतक्यात काय व्हावं…शेअरची किमंत झाली तीनशे रुपये…आता नफा दिसत होता…पन्नास शेअरस गुणिले एकशे ऐंशी म्हणजे नऊ हजार रुपये…अजून खाली कोसळला…दोनशे नव्वद…दोनशे ऐंशी…दहा हजार रुपये नफा…त्यांच्या मनातील भीतीने त्यांच्या मोहावर मात केली…त्यांने नफा बुक केला…दहा हजार रुपये…मात केलेला मोह दुस-या क्षणाला उफाळून बाहेर आला, हेच आता एकूण जमा असलेले दहा हजार अधिक तीन…तेरा हजार गुंतवलेले तर इन्ट्राडे मध्ये तर….काय व्हायचं ते होऊ दे…त्यांच मन बदलत चाललं होतं…कसलचं नियत्रंण नव्हतं….नाहीतरी आता तीन हजार नुकसान झालं असतं तर चाललं असतं.. काय होतयं…. गेले तर गेले तीन हजार… सॉरी तेरा हजार… आता शेअरची किंमत दोनशे सत्तर होती…ट्रेननें मुंलूड क्रॉस केलं होतं….दोनशे सत्तरवरचं प्राईज टिकून होती… काय करावं… करावी का ट्रेडिंग… त्याला वाटतं होतं की अजून हा नाही खाली जाणार.. त्या शेअर बाजारातल्या बातम्या देणा-या चॅनेलवर एवढया जोरदार कोसळण्या-या शेअरची बातमी होतीच… जवळ जवळ पन्नास टक्क्यानें शेअर कोसळला होता.. तो ही विनाकारण.. अफवेमुळे… मग काय त्यांने निश्चय केला… शेअर खरेदी करण्याचा…आता किती क्वानटीटी…म्हणजे शेअरसी संख्या… सातशे शेअरस… दोनशे चौ-याहत्तर रुपयालां खरेदी केले.. पुन्हा हदयाची कंपन वाढू लागली…गाडीने आता ठाण्याच्या हददीत प्रवेश केला होता… तिथं ट्रेनला लाल सिग्नल लागला होता…ट्रेन थांबली होती… मोबाईल वरचं नेटवर्क काम करत नव्हतं…का बरं… सर्कल इश्यू असणारं.. आर्डर तर पास झालीय..काय होईल..फक्त दहा पांईटने जरी अजून शेअर खाली पडला तरी सात हजार नुकसान…काय होईल…”च्या आईची गांड या मोबाईल कंपनीच्या” त्यांच्या तोंडातून शिव्या येत होत्या…तो तोंडातल्या तोंडात पुटपुटत होता… मन आतल्या आत काहिली करत होतं…काय होईल काय होईल…जरी आता शेअर वरती गेला तीनशे… साडे तीनशे गेला…. आणि आपण प्राफिट बुक नाही करु शकलो तर… ”या नेटवर्कच्या आईचा भोसडा…” तो आतल्या आत मनातल्या मनात पिळवटून निघत होता…… त्यांने मघाशी दादरपासून तुंबूवून ठेवलेली लघवी आता त्याला अधिकच त्रास देत होती… तो कधी एकदा ठाणे स्टेशन गाठतो यांचीच वाट बघत होता… तो पुन्हा पुन्हा नेटवर्क चाचपडत होता.. नाही भेटत होती रेंज..तितक्यात गाडीसाठीचा सिग्नल बदला…गाडी निघाली…शेवटचा स्टॉप ठाणे होता… गाडी प्लॅटफॉर्म क्रंमाक एक वर येण्यासाठी सज्ज होती… पार दहा तीस झाले…हळूहळू नेटवर्क येतं होतं… तो नुकसान किती होईल यांच्याच विचार करत होता… तेरा हजार भागिले सातशे…किती ते ही नीट करता येतं नव्हते…मोबाईल मधला कॅलसी काढला…उत्तर होतं…साधारण अठरा पांईट खाली गेलं की खेळ खलास…दोनशे चौ-याहत्तर मांईनस अठरा…दोनशे छपन्न…नाही व्हायला पाहिजे एवढा खाली…ट्रेन फलाटाला लागत होती… आता संपूर्ण नेटवर्क दिसत होतं… पण मोबाईल खिश्यात ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता… हीच गाडी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणार असल्यामुळे सुरवातीला जशी गाडी आली रे आली की लोक आत चढतात… आतमधल्या लोकांना उतरु देत नाही… फुल धक्काबुक्की होते… अश्यावेळी आपण मागे उभं राहायचं.. त्यांने मोबाईल खिश्यात टाकला.. त्याला जोराची लघवीला झाली होती.. त्याचवेळी डोक्यात हे नफया तोटयाचं गणित चालतं होतं… नेटवर्क खूणावंत होतं… दोन-तीन मॅसेज आल्याचा आवाज आला…पुन्हा तशीच मघाशी दादर स्टेशनसारखी तुफान लोकं… गाडी संपूर्ण फलाटावर येण्याअगोदर खूप सारी लोकं आतमध्ये घुसत होती.. वखवखल्यासारखी सीट शोधत होती.. एकदाचं ते सगळं थांबलं….तो ट्रेनमधून बाहेर आला… एक हात पॅन्टच्या चेनवर होता… तो आता मुतारी शोधू लागला…. भेटली… खिश्यातला सुटा रुपया ठेवला… आणि पॅन्टची चेन काढली… चळाचळा पाणी…. रिलॅक्स वाटतं होत आणि पुढच्या क्षणात लगेच धडकी भरली…काय झालं असेल…तेरा हजार गेले का? तेव्हाच स्वतःला रोखायला पाहिजे होतं…. त्यानें पॅन्टीतून त्या तश्याच अवस्थेतच मोबाईल बाहेर काढला… मोबाईल हॅन्ग झाला होता… च्यायला पैसे वाया गेले तर… किमान मोबाईल तर घेता आला असता नवा… कॅमेरा ओपन झाला इथं याने लघवीसाठी म्हणून एका हाताने पॅन्टची चेन काढलेली आणि दुस-या हातात मोबाईल फोनचा कॅमेरा ऑन झालेला… काय करावं काहीचं कळतं नव्हतं… कसाबसा तो कॅमेरा बंद केला… ते शेअर मार्केटचं अँप्लिकेशन चालू केलं…. डायरेक्ट जिथं प्राफिट लॉस कळतं तिथं किल्क केलं… त्याचा चेहरा बघण्यासारखा होता… शेअर चारशे पार होता…प्राफिट …दोनशे चौऱ्याहत्तर खरेदी ते चालू स्थितीत चारशे…. एकशे सव्वीस पांईट गुणिले सातशे शेअरस….अठयाऐंशी हजार…

आज जर मी सगळं घरदार लावलं असतं तर… करोडपती झालो असतो… पण आज कुणीतरी रस्त्यावर देखील आला असेल…. आता त्यांच्या मनात मोहाचा मोठा असूर इरेला पेटलेला होता तो काय सांगत होता “हे सगळे अठठयाऐंशी हजार प्लस तेरा हजार….म्हणजे जवळ जवळ एक लाख रुपये….. वापस इन्ट्रराडे कर…..” त्यांच हदयाचे ठोके काही थांबत नव्हते….पण यावेळी मघाशी लघवी करत असताना आलेले सगळे पैसे गेल्याचं फिलिंग अजूनही कुठेतरी मनात घर करुन होतं.. त्या मोहाच्या असुराला मारायचा एकच उपाय… काय? …. त्यांने ते अपलिकेशन डिलिट मारलं… किमान आजचा दिवस तरी त्याला त्या एक लाख रुपयाचा आनंद घ्यायचा होता… दिवस कुठे सुरु झाला होता आणि कुठे संपत आला होता… नंतर त्यांने दिवसभर ट्रेंडिग केली नाही… तो शेअर…. त्यानंतर दरररोज तो बघत होता… त्यानंतर प्रत्येक दिवशी तो शेअर कोसळत होता…. पुढचा एक महिना तो फक्त बघत होता कोणतचं शेअर ट्रेडिगं करत नव्हता….. तो शेअर आता पार पन्नास रुपयावंर आला… कितीतरी जणानां या शेअरने मालामाल केले आणि कितीतरी जणानां रस्त्यावर आणलं….तो आता एक लाख रुपये घेवून वाटत बघत होता….कश्याची…. अश्याच एका दिवसात पन्नास टक्क्याने खाली पडण्या-या शेअरची….त्यांच्या संयमाला दाद दयायला हवी….. इतके पैसे आल्यानंतर ही तो कुठेही इक्साईट झाला नाही… ही भीती होता की मोह… मोह त्याला रोखत होता की भीती… हे सगळं त्यालाचं ठाऊक…त्याला हे पैसे गमवायचे नव्हते…..

****************

“मी एक इनवेस्टर आहे ट्रेंडर नाही, मी लॉग टर्म व्हयू घेवून चालणारा माणूस आहे….येत्या काळात तुम्हाला वीस टक्के सीएजीआरच्या हिशोबाने रिटर्न भेटत असेल तरी पुष्कळ झाले, वीस कसा तर…. बँकेचा एफडी इंनटरेस्ट साधारण सात टक्के आणि महागाईचा दर अजून सात टक्के आणि बाकी राहिला तो या कंपन्याचा ग्रोथ रेट…. आय अम पॉझिटव्ह अबाऊट मार्केट…. सव्वाशे करोड लोकांचा देश जिथं प्रत्येक जण आपली आपली स्वप्न पूर्ण करायच्या मागे लागलेला असल्यामुळे कॅझम्पशनला म्हणजे उत्पादनाला मग ते गुड्स असो वा सर्विस चालूच राहिलं… महिना पाच हजाराचा एसआयपी करा… आरामात येत्या काही वर्षात करोडपती व्हाल…चला येतो..आपलं तेवढं टॅक्सच बघा…” एक करोडाच्या कमाईवर तीस लाख सरकारला जाताना त्यांच्या मनाला अंनत यातना व्हायच्या…सगळे फंडे वापरुन…काही वाचवले जायचे….एका मोठया खाजगी बॅकेत मोठया हुदयावर असलेल्या माणसाचं त्यांच्या टॅक्स कंन्सलटन्टबरोबरचं बोलणं….

****************

हे बोलणं नकळत त्यांच्या कानावर आलं…. तो अंधेरीला जाण्याअगोदर…..त्यांच्याजवळ आता तीन हजार रुपयेचं उरले होतें….ट्रेडींग अंकाऊटला सुरवातीला… वीस हजार रुपये होते…. त्यांला मन शांत करणार काहीतरी हवं होतं….तो तुकारामाचे अंभग काढून वाचत होता….त्यातंसुदधा शिव्या होत्या त्यांने यांची अपेक्षाच केली नव्हती…

****************

त्या रात्री त्यांने संघटनेतल्या ऐका माणसाचं उत्स्फूर्त भाषणं ऐकलं….तसाचं झोपला त्या संघटनेच्या खोलीत….सकाळी उठला… ते रात्रीचं भाषण अजून तसचं आठवतं होता…. ट्रेडिंग न करण्याचं मनाला बजावलं पण जसा एक शेअर पन्नास टक्काने पडल्याचं दिसलं…. आणि त्याने ट्रेडिंग केलीच शेवटी….

****************

समाप्त

****************
-लेखनवाला
( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online, must be shared in totality . )

मांडणीसमाजजीवनमानविचारलेख

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

24 Aug 2020 - 10:37 am | पाषाणभेद

शेअर च्या गोष्टीला शेअर करू का?….अन शेअर केली तर माझा शेअर किती अन तुमचा शेअर किती?….असं शेअर शेअर खेळलं तर किती ठिकाणी हे शेअर शेअर होईल?….शेअर करू का नको?….नकोच करायला….उगाचच काही कॉपीराईटचा लोचा झाला तर….नको अडकायला….अन अडकलो तर बाहेर पडायचे कसे….करतोच शेअर….एका शेअरने काय होणार?….अनेकदा शेअरचा लेख शेअर केला पाहीजे….अन अनेकांनीही!….

स्क्रीप्ट कोणती होती हो या शेअरची? अन पन्नास टक्क्यांनी तुटणारा अन शंभर पॉईंटने खालीवर होतांना सर्कीट लागले नव्हते काय?

गोष्ट छान आहे. त्याची तगमग रंगवलेली आहे. असेच होते थोड्याफार फरकाने.

पण प्रॉफीट दिसत असला तरी शेवटी एकूण बेरीज ही तोट्याचीच होत असते.

गॅरी ट्रुमन's picture

26 Aug 2020 - 11:39 am | गॅरी ट्रुमन

स्क्रीप्ट कोणती होती हो या शेअरची? अन पन्नास टक्क्यांनी तुटणारा अन शंभर पॉईंटने खालीवर होतांना सर्कीट लागले नव्हते काय?

फ्युचर्स आणि ऑप्शन्समधील शेअर्सना अपर/लोअर सर्किट नसते. सप्टेंबर २०१८ मध्ये दिवाण हाऊसिंग फायनान्स एका दिवसात ४५% ने आपटला होता. मार्च २०२० मध्ये येस बँक पण असाच जोरदार आपटला होता.

पण प्रॉफीट दिसत असला तरी शेवटी एकूण बेरीज ही तोट्याचीच होत असते.

शेअरमार्केटमध्ये अयशस्वी होणार्‍यांचे प्रमाण बरेच जास्त असते हे नक्कीच पण १००% लोकांना तोटा होतो असे अजिबात नाही.

इथल्याच काही लोकांच्या प्रतापामुळे हल्ली मिपावर फार क्वचित येतो- अगदी वर्षातून एखाद्या वेळेला. पण ही चर्चा माझ्या आवडीच्या विषयावर असल्याने या चर्चेपुरता येणार आहे.

लेखनवाला's picture

24 Aug 2020 - 10:52 am | लेखनवाला

पी सी ज्वेलर्स (pc jeweller)............ थोडं वास्तव.............. थोडं कल्पना

चौकस२१२'s picture

24 Aug 2020 - 2:36 pm | चौकस२१२

शेअर पहिला विकून नतर खरेदी करता येतो
भारतीय बाजारात अश्या शॉर्ट सेलिंग ला परवानगी आहे का?
ती तशी नसते म्हणून शेर वर बेतलेले "सिंगल शेअर फुचर्स" जास्त प्रसिद्ध आहेत हे ऐकले आहे ( फ़ुटूर्स मार्केट मध्ये लॉन्ग किंवा शॉर्ट करणे सोप्पे असते आणि परवानगी हि असते )
नक्की काय परिस्थिती आहे ?
असे तर नाही ना कि
जरी सेबी अश्या शॉर्ट सेलिंग ला परवानगी देत नसले तरी ब्रोकर आपली स्वतःच्या जोखमी वर फक्त दे ट्रेडिंग सत्ताही परवानगी देतो शॉर्ट सेलिंग ला?

आनन्दा's picture

24 Aug 2020 - 10:06 pm | आनन्दा

शॉर्ट selling चालते भारतात पण.

चौकस२१२'s picture

25 Aug 2020 - 4:19 am | चौकस२१२

बरं पण कसे? जरा सविस्तारत सांगाल का
अधिकृत रित्या कि अनधिकृत रित्या , ब्रोकर चाय स्वतःच्या जोखमीवर ( तुमचयकडून अनामत रक्कम घेऊन) आणि ते सुधाच फक्त डे ट्रेडिंग साठी ? कारण डिलिव्हरी बेसिस वॉर तर कसे शक्य आहे ?
का तुम्ही म्हणताय ते मी वरील म्हणल्याप्रमाणे सिंगल शेर फुचर वापरून?
उदाहरण देतो
अमेरिकेत शेर चे शॉर्र्टिंग करायला ( इंट्राडे आणि लांब पल्य्याचे सुद्धा ) अधिकृत परवानगी आहे , त्यामुळे कदाचित तिथे शेर वॉर बेतलेली फुचर्स फारशी वापरली जात नाहीत ( इंडेक्स फुचर्स, कमोडिटी फुचर्स आणि करन्सी फुचर्स प्रसिद्ध आहेत )
या उलट भारतात शॉर्ट सेलिंग ( शेर चे) अधिकृत रित्या परवानगी नसल्याने त्यावरील फुचर्स प्रसिद्ध जास्त आहेत असं दिसते
धड कोणी माहिती देत नाही

गॅरी ट्रुमन's picture

26 Aug 2020 - 12:03 pm | गॅरी ट्रुमन

"सिंगल शेअर फुचर्स"

ही काय भानगड आहे? लॉट साईझ १ असलेले फ्युचर्स? निदान भारतात तरी हा प्रकार नसतो.

बाकी फ्युचर्सपेक्षा ऑप्शन्समध्येच ट्रेड करावे हे वैयक्तिक मत. आपला व्ह्यू थोडा तरी चुकला तर फ्युचर्समध्ये लगेच लॉस सुरू होतो पण ऑप्शनमध्ये शॉर्ट पोझिशन असेल आणि बर्‍यापैकी लांबचे ऑप्शन ठोकले असतील तर तेवढी ब्रिथिंग स्पेस मिळते. तसेच शॉर्ट/लाँग पोझिशनमध्ये लॉस झाला तरी शेअरची मूव्ह आपल्या व्ह्यूविरूध्द झाली तरी डेल्टामुळे सगळा लॉस होत नाही तर डेल्टा गुणिले १०० % इतकाच लॉस होतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे योग्य माहिती आणि त्यातले बारकावे माहित नसतील तर फ्युचर्स आणि ऑप्शनच्या भानगडीत न पडलेले बरे. डेरिव्हेटिव्हमध्ये अंधाधुंद ट्रेडिंग केल्यास अशा ट्रेडरला लिटरली रस्त्यावर आणायची ताकद या इन्स्ट्रुमेन्टमध्ये असते.

चौकस२१२'s picture

26 Aug 2020 - 3:01 pm | चौकस२१२

"सिंगल शेअर फुचर्स"
नावात सिंगल असाल तरी याचा लॉट साईझ १ शेअर नसतो साधारण १०० शेअर्स असतो आणि याला सिंगल स्टॉक फुचुर्स हे नाव ठेवले ते केवळ इंडेक्स फुचर्स पासून वेगळे दिसावेत म्हणून ( माझा अंदाज)
https://docs.onechicago.com/display/PD/No+Dividend+Risk+Security+Futures या वर हे आहेत
परंतु ते एवढे प्रसिद्ध नाही झालेले दिसत,

लेखनवाला's picture

25 Aug 2020 - 3:03 pm | लेखनवाला

फक्त डे ट्रेडिंग साठी शॉर्ट selling चालते

चौकस२१२'s picture

25 Aug 2020 - 4:10 pm | चौकस२१२

- अधिकृत रित्या सेबी ची परवानगी आहे का? कि ब्रोकर स्वतःचं जीववर तुम्हाला करू देतो?
- किती मार्जिन लागते? समजा १० लाखाचे शॉर्ट सेल्लिंग असेल तर आपले मार्जिन किती असावे लागते ब्रोकर पाशी ? उलट्यापद्धतीने मोजायचे तर लिव्हरेज किती मिळते?
- दुपारी किती वाजत चाय आधी सर्व शॉर्ट बंद कराव्या लागतात ?
- वरील मुद्दे लक्षात घेता मग यापेक्षा फ्चुर्स शॉर्ट केलेली बरी नाही का? त्यात धोका तेवढाच असतो शिवाय फुचर्स शॉर्ट अनेक दिवस उघडे ठेवता येते !
( कोणी माहितगार ब्रोकर असेल त्याला मार्जिन , एनआरआय ना काय परवानगी आहे वैगरे नीट माहिती असलेला असल्यास मला जरूर व्यनि पाठवावा )

सगळं ब्रोकरच्या जिवावर चालते.

मार्जिन मनीवर पाचपट शेअर विकत घेता येतात. तेही बोकरच्या जिवावर.
ब्रोकरने पैसे किंवा शेअर कोणाला उधार द्यायचे हा ब्रोकरचा वैयक्तिक प्रश्न असतो. त्याला सेबी हरकत घेत नाही. शेअर वापरायला देण्याचा व्यवहार अधिकृत रित्या करता येतो.
मात्र बाजाराची सेटलमेंट पूर्ण करायची जबाबदारी ब्रोकरची असते. ती त्याने निभावली म्हणजे झाले.

शाम भागवत's picture

25 Aug 2020 - 4:36 pm | शाम भागवत

मार्जीनवरचे व्यवहार २:४५ पर्यंत पूर्ण करावे लागतात. अन्यथा ते त्यावेळच्या बाजारभावानुसार स्वेकर ऑफ होतात. तसेच त्या अगोदर हे व्यवहार प्रत्यक्ष डिलिव्हरी मधे बदलता येतात. अर्थात त्यासाठी आपल्या डिमॅट खात्यात शेअर व बँकेत पैसे असावे लागतात.

गॅरी ट्रुमन's picture

26 Aug 2020 - 12:25 pm | गॅरी ट्रुमन

मार्जीनवरचे व्यवहार २:४५ पर्यंत पूर्ण करावे लागतात.

ते ब्रोकरवर अवलंबून असते. ३ ते ३.२० दरम्यान स्केअर ऑफ करणारे ब्रोकर्स पण बघितले आहेत.

शाम भागवत's picture

25 Aug 2020 - 4:38 pm | शाम भागवत

प्रत्येक शेअर प्रमाणे जोखीम वेगवेगळी असू शकते व त्यामुळे जोखीमेनुसार मार्जिन बदलू शकते.

शाम भागवत's picture

25 Aug 2020 - 4:39 pm | शाम भागवत

मी मला असलेली माहिती दिली आहे. मी तज्ञ नाही.

लेखनवाला's picture

25 Aug 2020 - 8:00 pm | लेखनवाला
गॅरी ट्रुमन's picture

26 Aug 2020 - 12:32 pm | गॅरी ट्रुमन

जूनपासून सेबीने कव्हर्ड ऑप्शन स्ट्रॅटेजीसाठी मार्जिन खूप कमी केले आहे. त्याचा व्यवस्थित वापर केला आणि फार हाव धरायला गेले नाही तर आठवड्याला सव्वा ते दीड टक्कापर्यंत रिटर्न काढता येऊ शकतात. यातील अधोरेखित भाग सगळ्यात महत्वाचा. फार हाव धरायला गेले आणि एखादा ट्रेड उलटला तर तो दहा ट्रेडमध्ये झालेला प्रॉफिट खाऊ शकतो.

चौकस२१२'s picture

26 Aug 2020 - 2:43 pm | चौकस२१२

कव्हर्ड ऑप्शन स्ट्रॅटेजी
एक प्रसिद्ध म्हण आहे ती म्हणजे
ऑप्शन विकणारा ( कवर्ड असेल तरी ) दर महिन्याला एखाद्या राजासारखी मेजवानी करेल पण जेव्हा त्याला जुलाब होतील तेव्हा ते एखाद्य सम्राटा सारखे असतील !

गॅरी ट्रुमन's picture

26 Aug 2020 - 4:54 pm | गॅरी ट्रुमन

ऑप्शन विकणारा ( कवर्ड असेल तरी ) दर महिन्याला एखाद्या राजासारखी मेजवानी करेल पण जेव्हा त्याला जुलाब होतील तेव्हा ते एखाद्य सम्राटा सारखे असतील !

अशा म्हणी भरपूर आहेत आणि बर्‍याचदा ऑप्शन हा प्रकार नक्की कसा काम करतो याची पुरेशी माहित नसल्याने आलेल्या आहेत. ऑप्शनच्या शॉर्ट पोझिशनमध्ये चुकीचा ट्रेड केला तर जुलाबच काय अतिसार सुध्दा होईल इतका डेंजरस प्रकार आहे तो. आणि त्याची पुरेशी माहिती करून न घेता असाच ट्रेड घेतला तर त्यात मार खाणारच. ऑप्शन म्हणजे इलेक्ट्रीसिटीसारखे आहेत. योग्य वापर केल्यास त्याचा उपयोग भरपूर पण चुकीचा वापर केल्यास जोरदार शॉक लागणे ठरलेले.

बाकी वॉरन बफेने डेरिव्हेटिव्हला 'वेपन ऑफ वेल्थ डिस्ट्रक्शन' असे म्हटले आहे ही खरी गोष्ट आहे. पण त्यांनी नक्की कोणत्या संदर्भात असे म्हटले आहे याची कल्पना नाही. कारण स्वतः वॉरन बफेने डेरिव्हेटिव्हमध्ये ट्रेडिंग केले आहे. बहुदा पुरेशी माहिती न घेता अंधाधुंदपणे ऑप्शनमध्ये ट्रेड करणार्‍यांना उद्देशून हे विधान असावे असे वाटते.

- लेखनवाला , धन्यवाद, आपण दिलेला झिरोधा चे वेबपेज फुचुर्स आणि ऑपशन्स साठी आहे , परंतु प्रत्यक्ष शेअर शॉर्ट करण्यासाठी ( शाम म्हणतात त्याप्रमाणे ब्रोकर च्या अखत्यारीत ) इंट्राडे काय मार्जिन लागते ते कसे कळते?
- शामजी धन्यवाद.. म्हणजे सगळा मामला ब्रोकर च्या अंतर्गत धोरणावर अवलंबून असं दिसतंय! अधिकृत रित्या प्रत्यक्ष शेअर शॉर्ट करत येतो का आणि ते सुद्धा एका दिवसापेक्षा जास्त हे अजून कोडंच आहे . नसावं करता येत बहुतेक
दुसरे असे कि माझा मार्जिन चा जो प्रश्न होता तो % या दृष्टीने होता शेअर ची किंमत किती का असेना आणि जरी त्याच्या रोजच्या वोलॅटिलिटी ( चढ उताराचा दर) ती % वारी कमी जास्त होत असेल पण साधारण किती % असते ते शोधतोय .
मला इतर देशातील अश्या आर्थिक उलाढाली बद्दल बऱ्यापकी माहिती आहे पण भारतातील असे प्रोडक्त्त कसे काम करतात हे काही धड नीट आणि स्पष्ट समजत नाही
उदाहरणार्थ, जगात साधारण जे शेअर वर बेतलेले ऑप्शन असतात ते जर "एक्सरसाईस " केले तर त्याचे प्रत्यक्ष शेअर मध्ये रूपांतर करता येते आणि या मूलभूत पद्धती मुले अनेक इतर गोष्टीत करता येतात आणि त्यात मार्जिन चा फायदा असतो ( शेअर मालकी + त्यावरील ऑप्शन विकणे = कवर्ड कॉल विकणे )
परंतु भारतात शेअर वरील ऑप्शन हे कॅश सेटल असतात त्यामुळे वरील कवर्ड कॉल विकणे हे केले तरी त्यात क्रॉस मार्जिन फायदा होत नाही
असो

गॅरी ट्रुमन's picture

26 Aug 2020 - 11:45 am | गॅरी ट्रुमन

भारतात शेअर वरील ऑप्शन हे कॅश सेटल असतात

नाही हल्ली बर्‍याचशा शेअरवरील ऑप्शन फिजिकल सेटलमेंटमध्ये आणले आहेत. त्यामुळे बहुसंख्य ब्रोकर्स एक्सपायरीच्या आदल्या दिवशी इन द मनी ऑप्शन पोझिशन बंद करतात. मला वाटते २०२० च्या शेवटपर्यंत सगळ्याच शेअरच्या ऑप्शनमध्ये फिजिकल सेटलमेंट आणण्यात येणार आहे. मी स्वतः शेअरवरील ऑप्शन ट्रेड करत नाही. त्यापेक्षा मला निफ्टी जास्त आवडतो. बँकनिफ्टी पण चांगला आहे पण बँकनिफ्टीच्या कँडलला लांब शेंड्या असतात म्हणून बँकनिफ्टीची तशी भितीच वाटते. निफ्टी-बँकनिफ्टीमध्ये फिजिकल सेटलमेंटचा प्रश्नच नाही.

चौकस२१२'s picture

26 Aug 2020 - 4:18 am | चौकस२१२

लेखनवाला ...क्षमा मी झेरोदह चे वेबपेज नीट बघितले नाही... त्यात शेअर संबंधी पण माहिती आहे

गॅरी ट्रुमन's picture

26 Aug 2020 - 12:20 pm | गॅरी ट्रुमन

लेख आवडला. एकेकाळी मी पण इन्ट्राडे करायचो. पण त्यासाठी ५ किंवा १५ मिनिटांची टाईमफ्रेम वापरावी लागते आणि त्या टाईमफ्रेमवर नॉईज खूप असतो. अनेकदा आपला स्टॉप लॉस खायलाच शेअरची मूव्ह होते आणि मग शेअर आपल्या दिशेने जातो. तसेच सगळे निर्णय खूप पटापट घ्यावे लागतात. ऑफिसमध्ये सतत चार्टकडे लक्ष कसे ठेवणार? आणि समोर चार्ट नसेल तर नक्की काय चालू आहे याची धाकधूक सतत मनात त्यामुळे ऑफिसमधील कामात पण लक्ष लागायचे नाही. त्यामुळे इन्ट्राडे हा माझ्या चहाचा कप नाही हे समजले. ट्रेडिंगमध्ये आपल्याला नक्की काय सूट होते ते बघून ते इन्स्ट्रुमेन्ट आणि तो सेट-अप ट्रेड करावा. दुसरा कोणीतरी काहीतरी करायला जात आहे म्हणून लगेच त्या गोष्टीमागे धावू नये. आपल्याला काय सूट होते हे सगळ्यात महत्वाचे. त्यात आता निफ्टी ऑप्शन सेलिंगवर स्थिरावलो आहे. मार्च-एप्रिलमध्ये मार्केट प्रचंड व्ह्लोआटाईल होते तेव्हा ट्रेड करायचे धाडस झाले नाही पण त्यानंतर नियमित प्रॉफिट होत आहे ते महत्वाचे :) मला टाईम व्हॅल्यु खायला आवडते.

या सगळ्यात व्यवस्थित माहिती मिळविणे महत्वाचे असते. मी अवधूत साठे ट्रेडिंग अ‍ॅकॅडेमीचा जिओ क्लास केला त्यानंतर माहिती बरीच वाढली. परिपूर्ण नक्कीच म्हणता येणार नाही- तशी परिपूर्ण माहिती कोणत्याच ट्रेडरकडे नसते. पण पूर्वीपेक्षा बरीच जास्त भर माहितीत पडली आहे हे नक्की. आता तर वाटते की पूर्वीचे ट्रेडिंग म्हणजे काही माहित नसताना हवेत केलेला गोळीबार होता. आता तसे नाही.

शाम भागवत's picture

26 Aug 2020 - 2:20 pm | शाम भागवत

यावर एक लेखच येऊ द्या की मग.
अगोदरच व नंतरच ट्रेडिंग.
सगळ्यांनाच बरच काही शिकायला मिळेल.

गॅरी ट्रुमन's picture

26 Aug 2020 - 5:11 pm | गॅरी ट्रुमन

यावर एक लेखच येऊ द्या की मग.

आता मिपावर लेख वगैरे लिहिण्याच्या बराच पलीकडे गेलो आहे. आणि मी कितीही लिहिले तरी त्याला मर्यादा असतील. त्यापेक्षा मी ज्यांच्याकडे शिकलो त्या अवधूत साठेंच्या https://www.youtube.com/channel/UCaiV1-PUXDu2Nmx8iOZkofQ या युट्यूब चॅनेलवर ते उद्या म्हणजे गुरूवारी २७ ऑगस्टला एक्सपायरीच्या दिवशी संध्याकाळी साडेपाचला लाईव्ह येतील तेच बघा असे सुचवतो. यापूर्वी केलेली १२ लाईव्ह सेशन्स त्याच चॅनेलवर आहेत. ते पण उपयोगी आहेत का बघा ही विनंती. *

आणखी माहिती हवी असेल मिपाकरांपैकी कोणीही माझ्या ईमेलवर gkhare2@gmail.com संपर्क करा ही विनंती. व्य.नि नको. ही चर्चा थंडावल्यानंतर मिपावर कधी येईन ते माहित नाही.

*: यातून एका अर्थी अवधूत साठेंच्या ट्रेडिंग अ‍ॅकॅडेमीची जाहिरात होत असेलही. पण त्याबद्दल मला काहीही मिळणार नाही हे स्पष्ट केलेले बरे. एकूणच ते मला खूप जेन्युईन वाटले आणि त्यांच्या क्लासचा मला खूप फायदा झाला आहे. मी अगदी हाच रिव्ह्यू मागच्या वर्षी त्यांच्या फेसबुक आणि गुगल मॅप्सवर लिहिला आहे. तोच फायदा मिपाकरांना होत असेल तर चांगलेच वाटेल.

शाम भागवत's picture

26 Aug 2020 - 6:06 pm | शाम भागवत

धन्यवाद.
_/\_

चौकस२१२'s picture

26 Aug 2020 - 2:35 pm | चौकस२१२

त्यात आता निफ्टी ऑप्शन सेलिंगवर स्थिरावलो आहे
- आपण फक्त कॉल किंवा पुट सेल करता ( नेकेड ) कि ऑप्शन + ऑप्शन असा स्प्रेड विकता? ( यात आपल्याला माहिती असेल कि जास्तीत जास्त नफा किंवा तोटा हा आधीच माहिती असतो याउलट नेकेड ऑप्शन विकता तेव्हा फायदा आणि तोटा किती होईल हे सांगता येत नाही)

- निफ्टी वरील ऑप्शन हे निफ्टी इंडेक्स च्या स्पॉट किमती वर असतात कि निफ्टी च्या फुचर वर बेतलेले असतात ? हे विचारायचा कारण असं कि जर हे ऑप्शन निफ्टी फुचर वर असतील तर "कवर्ड कॉल करता येते ,नेकेड करण्यापेक्षा ) "बेतलेले" म्हणजे ऑप्शन चे अंडरलायिंग काय असते?

मला माहिती असलेले अमेरिकेतील उद्धरण देतो त्या अनुषंगाने भारतात कसे ते सांगाल का
इंडेक्स = एस अँड पी ५०० ( वरचे ५०० शेअर ) = हि निफ्टी प्रमाणे फक्त एक आकडा आहे
इंडेक्स = एसपी बिग कॉन्ट्रॅक्ट = SP , FUTURE PRICE गुणिले $२५०
इंडेक्स फघूर्स = ई मिनी ES = $५० गुणिले फुचर ची किंमत
इंडेक्स फघूर्स = ई माइक्रो MES = $५ गुणिले फुचर ची किंमत
मोठे ऑप्शन = SP INDEX वर बेतलेलं कॅश सेट्ललेड $२५० गुणिले
मिनी ऑप्शन = ES वर बेतलेलं सेटल होतात ES मध्ये
माइक्रो ऑप्शन = MES वर बेतलेलं सेटल होतात ई MES मध्ये

गॅरी ट्रुमन's picture

26 Aug 2020 - 5:22 pm | गॅरी ट्रुमन

- आपण फक्त कॉल किंवा पुट सेल करता ( नेकेड ) कि ऑप्शन + ऑप्शन असा स्प्रेड विकता?

नाही एकदा नेकेड ऑप्शन सेल करून हात पोळले होते तेव्हापासून नेकेड ऑप्शन सेल करायची हिंमत होत नाही. हात पोळले होते तेव्हाही माझा व्ह्यू चुकीचा नव्हता आणि एक्सपायरीच्या दिवशी मी कॉल विकला होता तिथपर्यंत किंमत गेली नव्हती पण मधे मूव्ह आली त्यामुळे पोझिशन लॉसमध्ये दिसायला लागली. त्यामुळे शेक-आऊट व्हायला झाले आणि लॉस बुक करून बाहेर पडलो.

मी ऑप्शनचा क्रेडिट स्प्रेड करतो. म्हणजे ११३०० चा पुट विकला असेल तर त्याखालचा ११२०० चा पुट विकत घेतो. मुळात व्ह्यू असा की गुरूवारपर्यंत ११३०० पर्यंत किंमत पडणार नाही. तरीही खालचा पुट विकत घ्यायचा प्रोटेक्शन म्हणून आणि मार्जिन कमी करायला.

निफ्टी वरील ऑप्शन हे निफ्टी इंडेक्स च्या स्पॉट किमती वर असतात कि निफ्टी च्या फुचर वर बेतलेले असतात ?

अंडरलाईंग निफ्टी इंडेक्सच असतो. कव्हर्ड कॉल करायचा असेल तर निफ्टी फ्युचर्समध्ये लाँग पोझिशन बरोबर करताच येते. स्पॉट आणि फ्युचर्सच्या किंमतीत थोडा फरक असतोच पण इन जनरल निफ्टी इंडेक्स एकने वाढला/कमी झाला तर फ्युचर्सपण जवळपास एकनेच वाढतो/कमी होतो.

चौकस२१२'s picture

27 Aug 2020 - 4:48 am | चौकस२१२

' कव्हर्ड कॉल करायचा असेल तर निफ्टी फ्युचर्समध्ये लाँग पोझिशन बरोबर करताच येते'

हे जरी खरे असले तरी निफ्टी ऑपशन्स जर निफ्टी इंडेक्स ( आकडा) यावर बेतलेले असतील तर मग हे कॉल विकणे " कवर्ड" कसे समजले जाते? एक्सचेंज किंवा ब्रोकर क्रॉस मार्जिन करतो का? तसे नसेल करत तर दोन्ही साठी तुम्हाला वेगवेगळे मार्जिन दयावे लागेल ?

गॅरी ट्रुमन's picture

27 Aug 2020 - 8:27 am | गॅरी ट्रुमन

हे जरी खरे असले तरी निफ्टी ऑपशन्स जर निफ्टी इंडेक्स ( आकडा) यावर बेतलेले असतील तर मग हे कॉल विकणे " कवर्ड" कसे समजले जाते?

निफ्टी वर गेला तर निफ्टी फ्युचर्स पण वर जाणार आणि कॉलची किंमत पण वर जाणार. त्यामुळे कॉलमध्ये शॉर्ट पोझिशन असेल तर कॉलवर तोटा होईल पण निफ्टी फ्युचर्स वर गेल्याने त्या पोझिशनवर फायदा होईल. त्यामुळे असे कॉल विकणे हे कव्हर्ड असते.

एक्सचेंज किंवा ब्रोकर क्रॉस मार्जिन करतो का? तसे नसेल करत तर दोन्ही साठी तुम्हाला वेगवेगळे मार्जिन दयावे लागेल ?

हो. मार्जिनमध्ये फायदा मिळतो. दोन्हीकडे मार्जिन द्यावे लागत नाही. https://zerodha.com/margin-calculator/SPAN/ वर झिरोधा मार्जिन कॅल्क्युलेटर बघता येईल. त्यावरून कळेल की निफ्टीचे सप्टेंबर फ्युचर्स लाँग करायला आज १,४८,२०१ मार्जिन आहे तर ११५०० चा कॉल शॉर्ट करायला १,४२,४१६ इतके मार्जिन आहे. पण दोन्ही पोझिशन एकत्र केल्या तर १,६५,५२६ इतके मार्जिन आहे म्हणजे सव्वा लाख रूपये मार्जिन वाचते.

चौकस२१२'s picture

27 Aug 2020 - 9:31 am | चौकस२१२

निफ्टी वर गेला तर निफ्टी फ्युचर्स पण वर जाणार
हो ते तर साहजिक aahe , पण मुळात इंडेक्स ऑप्शन डिलिव्हरी वाले करून त्याचे मूळ जर इंडेक्स फुचुर ठेवले तर हा प्रश्न उदभवला नसता ( जसे एस अँड पी ५०० वरील ऑप्शन हे डिलिव्हरी वाले आहेत आणि त्याचाही मूळ हे एस अँड पी ५०० फुचर आहेत . इंडेक्स एकदा नव्हे ( जरी एस अँड पी ५०० फुचर हे मुळात एस अँड पी ५०० इंडेक्स वर बेतलेले असले तरी ) उगाचच नवीन माणसाचा गोंधळ वाढतो !
बर हे क्रॉस मार्जिन ब्रोकर मर्जी वर अवलंबून असते कि मुळात एक्स्चेंज ने सोय केली आहे ?
अजून एक प्रश्न होता इंडेक्स मध्ये लॉट साईझ हि काय भानगड ?
जर निफ्टी ११,५०० ला असेल तर त्याची दर्शनी किंमत ( फुल कॉन्ट्रॅक्ट किंमत ) कशी काढायची? ११,५०० गुणिले ७५रू ?
१ निफ्टी फुचार म्हणजे एकूण किती रुपयांचा वयहार ?
१ पॉईंट मध्ये किती टिक असतात?
- जसे १ इ मिनी एस अँड पी फुचर म्हणजे ३००० ( सध्याची फुचर ची किंमत धरा ) गुणिले $५० प्रति पॉईंट = $१५०,०००
आणि १ पॉईंट मध्ये ४ टिक असतात ($१२.५०प्रति टिक गुणिले ४ = $५०)
३०००-३००१ आणि याचं मध्ये ३०००/ ३०००.२५/ ३०००.५०/ ३०००.७५ / 3001अशी मोजणी
क्षमा करा मी खूप प्रश्न विचारले.. कारण जेव्हा जेव्हा मी भारतात ब्रोकर ला प्रश्न विचारले तेव्हा तेव्हा एक तर ते घाईत असतात किंवा काहीतरी तिसरेच सांगतात किंवा पहिला प्रश्न विचारत तुम्हला अकॉउंट उघडायचे आहे? अरे बाबा मी आधी प्रॉडक्ट कन्स्ट्रेट समजून घेईन मग बघीन उघडायचे कि नाही ते

गॅरी ट्रुमन's picture

27 Aug 2020 - 10:31 am | गॅरी ट्रुमन

उगाचच नवीन माणसाचा गोंधळ वाढतो !

मी अमेरिकन मार्केटमध्ये कधी ट्रेड केलेच नाही त्यामुळे माझा गोंधळ होत नाही :) भारतातल्या मार्केटमध्येच इतकी अमर्याद संधी आहे की बाहेर कुठे ट्रेड करायची गरजच पडू नये. काही ब्रोकर्स भारतात बसून अमेरिकन मार्केटमध्ये ट्रेड करायची संधी देतात पण फक्त इक्विटीमध्ये ट्रेड करता येत डेरिव्हेटिव्हमध्ये नाही. आणि एका मर्यादेपेक्षा जास्त ट्रेडिंग झाले तर आर.बी.आय फोरेक्स डिपार्टमेंटकडून चौकशीचे झेंगट मागे लागते असे एकांकडून ऐकले आहे. खखोदेजा.

भारतात पहिल्यापासून असेच आहे. गेल्या तीनचार वर्षांपासून निफ्टी आणि बँकनिफ्टीची विकली ऑप्शन एक्सपायरी (दर गुरूवारी) असते पण फ्युचर्स मात्र मंथली एक्सपायरी (दर महिन्याच्या शेवटच्या गुरूवारी) असतात. निदान निफ्टी आणि बँकनिफ्टी ऑप्शनसाठी फ्युचर्स हा अंडरलाईंग ठेवला तर चार गुरूवारच्या ऑप्शनसाठी एकच अंडरलाईंग असेल. अर्थात तसे करण्यात अडचण काही नसावी पण तसे केले जात नाही हे पण तितकेच खरे.

अजून एक प्रश्न होता इंडेक्स मध्ये लॉट साईझ हि काय भानगड ?

जो फ्युचर्सचा लॉट साईझ तोच ऑप्शनचाही. निफ्टीसाठी तो ७५ आणि बँकनिफ्टीसाठी २५ आहे. म्हणजे निफ्टीच्या लाँग फ्युचर्स पोझिशनवर निफ्टी एकने वर गेला तर ७५ रूपये नफा होतो. तर रिलायन्सवर तो ५०० (खरं तर ५०५) आहे. म्हणजे रिलायन्स एक रूपयाने वर गेला तर फ्युचर्सच्या लाँग पोझिशनवर ५०५ रूपये नफा होतो आणि एक रूपयाने खाली गेला तर ५०५ रूपये तोटा होतो.

१ निफ्टी फुचार म्हणजे एकूण किती रुपयांचा वयहार ?

सध्या निफ्टी ११६०० च्या आसपास आहे. एक फ्युचर्सचा लॉट म्हणजे ७५ रूपये याचा अर्थ एक लॉट ११६०० गुणिले ७५ बरोबर ८ लाख ७० हजार इतका व्यवहार. फ्युचर्स हे लिव्हरेज्ड प्रॉडक्ट असल्याने सगळे ८ लाख ७० हजार एवढे मार्जिन ठेवावे लागत नाही तर त्याच्या १७-१८% म्हणजे जवळपास दीड लाख इतके मार्जिन ठेवावे लागते. मार्केटवाल्यांच्या भाषेत दीड लाख भरून ८ लाख ७० हजाराचा माल उचलता येतो :)

१ पॉईंट मध्ये किती टिक असतात?

भारतात टिक साईझ ५ पैसे इतका असतो.