संगणकासाठी SSD वापरावी की HDD?

इरसाल कार्टं's picture
इरसाल कार्टं in तंत्रजगत
30 Jul 2020 - 3:34 pm

(SSD vs HDD) तुमच्या कम्प्युटरचा वेग खूप कमी झालाय का? तुमच्या कम्प्युटरची रॅम आणि प्रोफेसर दोन्ही आधुनिक असूनही ही समस्या येते आणि तुम्ही सर्व काही करून पाहिले तरीही तुमचा कम्प्युटर चालू व्हायला वेळ घेतोय. किंवा कुठलेही मोठे सॉफ्टवेअर किंवा मोठी फाईल ओपन करताना वेळ घेतो. असे असल्यास त्याला कारण तुमच्या कम्प्युटरचा प्रोसेसर किंवा रॅम नसून तुमचे स्टोरेज डिवाइस असू शकते. आता तुम्ही म्हणाल की कम्प्युटरच्या स्पीडचा आणि स्टोरेज याचा काय संबंध येतो? पण खरं पाहायला गेलं तर आपल्या कम्प्युटरचे स्टोरेज कुठल्या प्रकारचे आहे यावरही आपल्या कम्प्युटरचा वेग अवलंबून असतो. चला तर आज आपण पाहूया स्टोरेजमध्ये नक्की काय बदल केल्याने तुमच्या कम्प्युटरचा वेग वाढू शकतो.

https://stepupmarathi.com/ssd-vs-hdd-comparison-in-marathi/

(SSD vs HDD)अलीकडच्या काळात वापरल्या जाणाऱ्या दोन प्रकारच्या स्टोरेजची माहिती आपण घेऊया.
आपण आतापर्यंत शक्यतो हार्डडिस्क ड्राइव्ह याप्रकारचा स्टोरेज वापरत आलोय. यामध्ये CD किंवा DVD प्रमाणे धातूचा चकत्यांवर आपला डेटा साठवला जातो. पण यामध्ये समस्या ही हार्डडिस्कवर हा डेटा सेव्ह होत असताना जास्त वेळ घेतो. त्यामुळे आपला कम्प्युटर मंद गतीने चालतो.

जो नियम डेटा साठवण्यासाठी करण्यासाठी तोच नियम डेटा वाचण्यासाठीसुद्धा लागू होतो. म्हणजे आपली हार्डडिस्क जेवढ्या वेगाने राईट करेल किंवा जेवढ्या वेगाने तो रीड करेल तेवढ्या वेगाने आपला कम्प्युटर चालेल. कारण आपले कुठलेही सॉफ्टवेअर किंवा ऑपरेटिंग सिस्टम हे त्या त्याच्या हजारो फाईल्स वर काम करत असते आणि आपल्याला मॉनिटरवर तो डेटा दाखवत असते. अशावेळी जेव्हा कम्प्युटरला हार्ड डिस्ककडून डेटा वेगाने मिळतो तेव्हा आपला कम्प्युटर जास्त वेगाने चालतो. पण हाडडिस्कच्या कमी वेगामुळे यामुळे हा डेटा रॅम आणि प्रोसेसरला लवकर मिळत नाही. त्यामुळे तो आपल्याला सादर व्हायला वेळ लागतो आणि आपण म्हणतो की आपला कम्प्युटर कमी वेगाने चालतोय.

एस.एस.डी. काम कशी करते?
अलीकडच्या काळात एस.एस.डी. हे हार्डडिस्क पेक्षा नवीन असलेला स्टोरेज चा प्रकार आहे. एस.एस.डी.चे पूर्ण नाव सॉलिड स्टेट ड्राईव्ह आहे. याचा अर्थ असा होतो की आपल्या एस.एस.डी. मध्ये कुठल्याही प्रकारची डिस्क नसते ह्यात डेटा फ्लॅश मेमरी प्रमाणे आय.सी.(IC) किंवा इंटिग्रेटेड सर्किट(Intigrated Circuits) मध्ये स्टोअर केला जातो. परिणाम स्वरूप हा डेटा रीड आणि राईट करण्यासाठी हार्डडिस्क पेक्षा कमी वेळ लागतो. याचा फायदा असा होतो की आपल्या ऑपरेटिंग सिस्टममला डेटा सादरीकरणासाठी किंवा त्यावर प्रक्रिया करण्यासाठी लवकर उपलब्ध होतो आणि आपल्या कम्प्युटरचा वेग वाढतो.

एस.एस.डी. वापरल्याने सगळ्यात मोठा फरक हा पडतो की आपला कम्प्युटर चालू होण्यासाठीचा(Booting Speed) वेग खूप वाढतो त्याचप्रमाणे जर आपण मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ एडिटिंग किंवा फोटो एडिटिंग साठी लागणारे सॉफ्टवेअर वापरत असाल असे की अडॉबी फोटोशॉप, अडॉबी प्रीमियर प्रो, अडॉबी आफ्टर इफेक्टस तर ह्या सॉफ्टवेअरला चालू होण्यासाठी लागणारा वेळ तसेच ऑपरेट करताना येणाऱ्या अडचणी खूप कमी होतात. या याप्रकारची सॉफ्टवेअर एस.एस.डी.वर असल्यास ती हार्डडिस्कच्या तुलनेने खूप वेगाने चालतात.

एस.एस.डी. किती क्षमतेची घ्यावी?
खरंतर किमती पाहता एखाद्या हार्ड डिस्कच्या क्षमतेची एस.एस.डी. वापरणे हे खूप महाग असू शकते. यावर पर्याय म्हणून आपण फक्त ऑपरेटिंग सिस्टम आणि आपली सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी एस.एस.डी. वापरुन आपल्या फाइल्स स्टोअर करण्यासाठी हार्ड डिस्क चा पर्याय वापरू शकता. जर आपण फोटोशॉप किंवा प्रीमियर प्रो सारखी किंवा इतर व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर वापरणार असाल तर किमान 256 जीबी क्षमतेची एसडी वापरणे सोयीस्कर ठरेल. जेणेकरून आपली ऑपरेटिंग सिस्टम आणि सॉफ्टवेअर सह त्या सॉफ्टवेअरद्वारे वापरल्या जाणाऱ्या लागणाऱ्या स्क्रॅच डिस्क सुद्धा एस.एस.डी. च्या पार्टिशन मध्ये ठेवता येतील. आपल्याला लागणाऱ्या फोटो आणि व्हिडीओ फाईल्स आपण स्वतंत्र हार्डडिस्क मध्ये साठवून ठेवू शकतो. असे केल्याने आपला स्टोरेज साठी लागणारा खर्च कमी येईल त्याचबरोबर आपल्याला हवा तसा वेगही मिळेल.

आता आपण हार्ड डिस्क आणि एस.एस.डी. यांच्यातील काही फरक पाहूया.
१)हार्ड डिस्क ड्राइव्ह पेक्षा एस.एस.डी.चा वेग जास्त असतो.

२)हार्ड पेक्षा एस.एस.डी. आकाराने तसेच वजनानेही कमी असते.

३)हार्ड डिस्क स्टोरेज क्षमतेच्या मानाने एस.एस.डी पेक्षा महाग मिळते.

४. एस.एस.डी.फाईल ट्रान्स्फर किंवा रीड राईट वेग २०० ते ३६०० mb प्रति सेकंद असू शकतो याउलट हार्डडिस्क तुम्हाला जास्तीत जास्त ४८० mb प्रति सेकंद इतका वेग देऊ शकते. (दोन्हींचे वेग तुमच्या रॅम आणि प्रोसेसरच्या वेगानुसार कमी जास्त असू शकतात).

५. एस.एस.डी. वापरात असल्यास तुम्हाला हार्ड डिस्क पेक्षा खूप कमी वेळा डिस्क डिफ्रॅगमेंटेशन करण्याची गरज भासते.

६. हार्डडिस्कवर चुंबकीय क्षेत्राचा परिणाम होऊ शकतो याउलट एस.एस.डी.वर याचा प्रभाव पडत नाही.

प्रतिक्रिया

शाम भागवत's picture

4 Nov 2020 - 7:13 pm | शाम भागवत

BIOS पण 111 दाखवतंय. अँमेझॉनला वस्तू बदलून देण्यासाठी परत करतोय. लेबल १टीबीच, पावती १टीबीची. आत १११जीबी.
तक्रार करावी का? असं वाटतंय.

गामा पैलवान's picture

4 Nov 2020 - 7:39 pm | गामा पैलवान

शाम भागवत,

तक्रार कराच! बहुतेक चुकीचा माल पाठवलेला दिसतोय.

आ.न.,
-गा.पै.

माझ्यामते रिकव्हरी पार्टीशन जीबीस् मध्ये तयार झाले असावे. पीसी आयकॉला राईट क्लिक करुन मॅनेज मध्ये जा, तिथं डिस्क मॅनेजमेन्ट मध्ये पार्टीशन्स दिसतील. त्यात रिकव्हरी पार्टीशनची साईझ बघा, ते पार्टीशन श्रिंक करुन साईझ वाढवता येईल.

शाम भागवत's picture

5 Nov 2020 - 11:16 am | शाम भागवत

फोटो टाकतोय. म्हणजे सगळ्य़ांनाच कल्पना येईल. तसेच माझे काही चुकत असेल तर तेही कळेल.

शाम भागवत's picture

6 Nov 2020 - 7:53 am | शाम भागवत

माझ्यामते पार्टीशन श्रिंक करुन साईझ वाढवता येईल.

शेवटी असंच थोडसं झालं.

प्रथम मी ऑटोमॅटिक क्लोन हा पर्याय निवडला होता. पण १००% अगदी तस्साच क्लोन काही त्याला तयार करता आला नाही. मग मॅन्युअल पर्याय निवडला. त्यानंतर थोड्यावेळाने आणखी तीन पर्याय आले. त्यातला दुसरा प्रपोरशनेट निवडला. (खरेतर तोच आपोआप निवडला जाऊन त्याचीच शिफारीस केली गेली होती. त्यामुळे मला फक्त ओके म्हणायचे होते.) या पर्यायात चक्क लिहिले होते की पार्टिशन आपोआप कमी जास्त अ‍ॅडजस्ट केले जाते.
यावेळेस क्लोनिंग जमले.

प्रचेतस's picture

18 Aug 2020 - 7:58 pm | प्रचेतस

NVME SSD असेल तर त्याला PCI स्लॉट लागतो, लेटेस्ट मदरबोर्डस वर शक्यतो असतात तरी तपासून घेणे अगत्याचे.
SATA SSD असेल तर डेस्कटॉप मदरबोर्डला तरी एडिशनल पॉवर स्लॉट असतातच, तुम्हाला फक्त जास्तीची पॉवर केबल घ्यावी लागेल.

शाम भागवत's picture

30 Oct 2020 - 6:25 pm | शाम भागवत

साटा घेतोय.
NVME SSD वगैरेतले काही कळत नाही. त्यामुळे त्यापासून लांब राहिलोय. 😀

शाम भागवत's picture

18 Aug 2020 - 8:28 pm | शाम भागवत

धन्यवाद.
_/\_

चौकटराजा's picture

19 Aug 2020 - 3:27 pm | चौकटराजा

मस्त चर्चा चालली आहे ! अलिकडे काही वाचनात आले की आता " हडड " चा जमाना सम्पणार व ससड स्वस्त होत जातील. इतर काही पर्याय डेटा जपून ठवण्यासाठी आहेत का व त्यात कोणते फायदे तोटे आहेत यावर हे मण्डळीनी प्रकाश टाकावा ! जाता जाता -१९८७ मधे मी ज्या मिनि मेन्फ्रेम सन्गणकावर काम करीत होतो त्याचा १६ एम बी डिस्क ची किंमत होती तब्बल ३६००० रूपये . विश्वास नाही बसत ना ? नका ठेवू !

प्रचेतस's picture

19 Aug 2020 - 4:31 pm | प्रचेतस

सीडी रॉम caddy घेऊन लॅपटॉपचा सीडी ड्राईव्ह अगदी सहजतेने sata ssd मध्ये बदलू शकता.

शाम भागवत's picture

19 Aug 2020 - 4:36 pm | शाम भागवत

हे भारी आहे.

श्रीगणेशा's picture

12 Sep 2020 - 8:52 pm | श्रीगणेशा

भविष्यात संपूर्ण जगातील सर्व डिजिटल माहिती काही लिटर DNA वापरून साठवून ठेवता येईल, आणि तेही हजारो वर्षांसाठी :-)

https://www.scientificamerican.com/article/tech-turns-to-biology-as-data....

मराठी_माणूस's picture

3 Nov 2020 - 10:48 am | मराठी_माणूस

मोबाईल आणि लॅपटॉप च्या मधील एक उपकरण म्हणजे टॅब . हा खरेच उपयोगी असतो का ? WFH च्या काळात कशा प्रकारे वापर होउ शकतो.
घ्यायचा झाल्यास, काय कॉनफिग असयाला हवे ?

तुषार काळभोर's picture

3 Nov 2020 - 1:58 pm | तुषार काळभोर

मोबाईलचा स्क्रीन साईज ३-४ इन्च असताना ८ इंचाचा टॅब (स्क्रीन दुप्पट मोठा) वाचन, ब्राउजिंग, व्हिडिओ पाहणे यासाठी चांगला होता. पण आता मोबाईल ६.५" असतात, त्यामुळे टॅब घेण्याचे काही विशेष कारण राहिले नाही. आणि 'टॅब' ला मोबाईल अन संगणकाच्या मधील वस्तू म्हणणे फार धाडसाचे होईल. टॅबचा केवळ स्क्रीन साईज जास्त असतो, तोही २५%. १०" टॅब घेतला तर ठीक आहे. पण विंडोज कॉम्प्युटर वर करता येणारी कामे आणि ८-१० इंचाच्या अ‍ॅण्ड्रॉईड टॅब वर होणारी कामे, यात तुलना करता येणार नाही.
'कामे' सोडून, मनोरंजनासाठी टॅब मस्त आहे.

मराठी_माणूस's picture

3 Nov 2020 - 3:14 pm | मराठी_माणूस

धन्यवाद

शाम भागवत's picture

5 Nov 2020 - 11:30 am | शाम भागवत

प्रथम मी सीडी रॉम केबल वापरून सडड जोडली. फाईल एक्सप्लोरर मधे काही दाखवत नव्हता म्हणून मग डिस्क मॅनेजमेंट मधे गेलो. डिस्क चढवली. फॉर्मेट करू का विचारल्यावर, कर म्हणालो. आता सडड दिसायला लागली पण १११ जीबी दाखवत होता. मग रिस्टार्ट करून बायोसला गेलो. तिथेही १११ जीबी दाखवत होता. या सगळ्या कालच्या गोष्टी झाल्या.

आज
आता फोटोसाठी युएसबी २ केबल वापरून सडड जोडली आहे. डिस्क मॅनेजमेंट चा फोटो टाकला आहे. डिस्क१ पहा.
डिस्क मॅनेजमेंट

शाम भागवत's picture

5 Nov 2020 - 11:34 am | शाम भागवत

आता सडड चा फोटो टाकतोय.
सडड

शाम भागवत's picture

5 Nov 2020 - 11:38 am | शाम भागवत

दोन्ही फोटो टर्मिनेटर साहेबांच्या गुगल फोटोज रेसिपीजच्या आधारे.

त्यांना कृतज्ञतापूर्वक
🙏

तुषार काळभोर's picture

5 Nov 2020 - 12:24 pm | तुषार काळभोर

१२० जीबी = १२०,०००,०००,००० बाईट्स
= (१२०,०००,०००,०००/१०२४) केबी = (१२०,०००,०००,०००/१०२४)/१०२४ एम्बी = ((१२०,०००,०००,०००/१०२४)/१०२४ )/१०२४ जीबी - १११.७५ जीबी
म्हणजे हे १००० जीबी चं स्टिकर चुकीचं / फसवणुकीचं आहे.

शाम भागवत's picture

5 Nov 2020 - 12:57 pm | शाम भागवत

हो ना.
त्यासाठी जेवण झाल्यावर लॅपटॅापला ससड जोडणार आहे. म्हणजे वरचे दोन्ही फोटो एकाच फ्रेममधे येतील. मग हे फोटोसकट ॲमेझॅानला पाठवता येतंय का ते बघणार आहे.

तुषार काळभोर's picture

5 Nov 2020 - 1:21 pm | तुषार काळभोर

नुसतं एवढंच टाका की मी 1 टीबी खरेदी केली, प्रोडक्ट वर 1 टीबी आहे.
पण प्रत्यक्षात ती 120 जिबी आहे.

शाम भागवत's picture

5 Nov 2020 - 1:52 pm | शाम भागवत

रिप्लेसमेंटच्या वेळेला मी अगदी तसेच लिहिले आहे.
(होते एखादे वेळेस चूक असे मानून) 😀
पण उद्या परत तोच प्रकार झाला तर काहीतरी आपल्याकडे असावे यासाठी सगळं करतोय.

शाम भागवत's picture

5 Nov 2020 - 11:52 am | शाम भागवत

अ‍ॅमेझॉन उद्या रिप्लेसमेंट पाठवतीय, असा त्यांचा ईमेल रिप्ल्याय आलाय. तोपर्यंत माझं काही चुकलं असेल तर कळवा.

गामा पैलवान's picture

5 Nov 2020 - 3:12 pm | गामा पैलवान

शाम भागवत,

हा एक कक्ष-व्यवस्थापक प्रक्रम ( = पार्टिशन म्यानेजर प्रोग्राम ) आहे : http://download3.easeus.com/free/epm.exe

हा फुकट मिळतो. तो इन्स्टॉल करा व चालवून पहा परत १११ जीबी दिसते का ते. काम झाल्यावर प्रक्रम आवडला तर तसाच ठेवा नायतर अन-इन्स्टॉल करता येईल. क्वचित प्रसंगी विंडोजची स्वत:ची कक्ष-व्यवस्थापन प्रणाली गंडलेली असू शकते.

आ.न.,
-गा.पै.

शाम भागवत's picture

5 Nov 2020 - 4:10 pm | शाम भागवत

मी प्रयत्न करायला लागलो तर क्विकहीलने ही वॉर्निंग दिली. मग क्विकहील डिसेबल करून उद्योग करायचं जिवावर आलं.

quick heal

गामा पैलवान's picture

5 Nov 2020 - 7:24 pm | गामा पैलवान

शाम भागवत,

क्विक हील अडून राहिलाय तर प्रयत्न सोडून द्या. ईझ-अस मुळे फार काही प्रकाश पडणार नाहीये.

आ.न.,
-गा.पै.

शाम भागवत's picture

5 Nov 2020 - 10:40 pm | शाम भागवत

नवीन सडड आली
new ssd
क्लोन करून बसवली सुध्दा.
मस्त चाललाय संगणक

गामा पैलवान's picture

5 Nov 2020 - 11:24 pm | गामा पैलवान

शाम भागवत,

अभिनंदन. एकदा का ठोसदशासाधन बसवलं की तुम्ही चुंबकचकतीकडे परत जाणार नाही! :-)

आ.न.,
-गा.पै.

शाम भागवत's picture

8 Nov 2020 - 2:08 pm | शाम भागवत

खरंय.
बूट टाईम २१५ सेंकदांवरून ३५ सेकंदावर आलाय आणि संपूर्ण बंद व्हायला ८५ सेकंद घ्यायचा. (स्क्रीन बंद झाल्यावरसुध्दा हार्डडिस्कचा दिवा २५ सेकंद चालू असायचा!) ती वेळ १५ सेकंदावर आलीय.

आम्ही एक शाळा चालवतो. त्या शाळेसाठी एमएस अ‍ॅक्सेसमधे हिशोबाचे सॉफ्टवेअर करून द्यायचा विचार होता. पण माझा संगणक इतका स्लो झाला होता की, सुरवातच होत नव्हती. मराठीमधे सगळे फॉर्म व बटणे असणार होती. युनिकोडमुळे तर आणखी सगळं त्रासदायक झालं होतं.
आता प्रोजेक्ट सुरू करतोय. अ‍ॅक्सेस सुरू व्हायला आता १०-१२ सेकंद पुरतात. ही आमची शाळा म्हणजे आमच्या कुटुंबाची चॅरीटी आहे. फक्त खर्च करायचा, कष्ट करायचे व त्यातून आनंद मिळवायचा. (प्रोग्रॅम पूर्ण झाल्यावर शाळेला एक नवीन संगणकच घ्यायचा आहे.)

हा विषय ऐरणीवर आणून आमच्या शाळेचा मोठा प्रश्न सुटायला मदत झाली. त्यासाठी इरसाल कार्टं यांना
🙏

असो.

आगाऊ म्हादया......'s picture

16 Apr 2021 - 11:12 am | आगाऊ म्हादया......

हे महत्त्वाचं आहे, थँक्स. मी नुकतीच ssd, caddy प्रकरण केलंय