कोविड-१९ - सेरॉलॉजीकल सर्वेक्षणांच्या नजरेतून

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
26 Jul 2020 - 6:24 pm
गाभा: 

लेख चालू करतानाच निष्कर्ष घाई आवर्जून टाळण्याचे आग्रहाचे आवाहन करतो.

वीषाणू संसर्गाशी माणसाची अंगभूत नैसर्गीक प्रतिकारशक्ती मुकाबला करण्याचा प्रयत्न करते. केवळ बाह्यतः धडधाकट दिसण्यावर वीषाणू विरोधी प्रतिकारशक्ती अवलंबून असेलच असे नाही हे चिमुटभर मीठासोबत जाणून घेऊन अतीआत्मविश्वास टाळले पाहीजे. अंगभूत नैसर्गीक प्रतिकारशक्ती प्रत्येकवेळी पुरेशी पडतेच असे नाही म्हणून आणि वैद्यकीय निरीक्षण आणि उपचारांची गरज भासते. वीषाणू संसर्गाला बळी पडणारे दुर्दैवी जीव सोडलेतर बरेचश्या लोकांच्या शरीरातील अंगभूत अँटीबॉडीज (प्रतिपिंडे) एखाद्या विशीष्ट वीषाणू संसर्गाशी यशस्वी मुकाबला करून विशीष्ट वीषाणूंशी लढाईचा अनुभव पदरी पाडून घेतात हा अनुभव व्यक्ती आणि वीषाणू परत्वे कमी अधिक काळ ते काही वेळा कायमस्वरुपी काळ टिकणारा असू शकतो. लोकसंख्येच्या अधिकतम लोकांमध्ये प्रतिपिंडे अनुभवसंपन्न झाली असतील तर वीषाणू प्रसाराचा वेग काहीसा मंदावतो, हे जरी खरे असले तरी एक तर संसर्गाचा धोका पूर्ण टळलेला नसतो तसेच प्रत्येक व्यक्तीची वीषाणू संसर्गाला तोंड देण्याची प्रत्येकवेळीची क्षमता वेगळी असते त्यामुळे जाणीवपूर्वक आजार-सक्षम वीषाणू संसर्ग घडवण्याचा प्रयत्नच नव्हे विचार सुद्धा नैतीक दृष्ट्या योग्य ठरत नाही.

पण एखाद्या वीषाणूची साथ पसरल्यानंतर ती किती टक्के जनतेत पसरली आणि किती टक्के जनतेत वीषाणूंशी मुकाबला केलेली प्रतिपिंडे आढळून आली हे जाणून घेणे ढोबळ आडाखे बांधण्यास सरकारी यंत्रणांना ऊपयूक्त ठरू शकते. या साठी केलेल्या सर्वेक्षणांना सेरॉलॉजीकल सर्वे असे म्हणतात. भारतात अलिकडे दिल्ली आणि अहमदाबाद इथे अशी कोविड-१९ संबंधातील सेरो-सर्वेक्षणांची वृत्ते आहेत, मुंबईत एक फेज झाली असून दुसर्‍या फेजनंतरच आकडेवारीची माहिती उपलब्ध केली जाईल असा अंदाजा आहे.

अर्थात या सर्वेक्षणांच्या मर्यादाही या क्षेत्रातील तज्ञांनी अधोरेखित केलेल्या आहेत. या सर्वेक्षणात अनुभव प्राप्त प्रतिपिंड आढळले म्हणजे त्यांचे प्रमाण संबंधीत व्यक्तिस पुन्हा संसर्ग न होण्यासाठी पुरेसे आहे का आणि पुरेसा काळ टिकणारे आहे का याचा बोध होत नाही, तसेच वीषाणूंचे म्युटेशन्स सुद्धा होतात एका म्युटेशन सोबत मिळालेला अनुभव दुसर्‍या म्युटेशनशी मुकाबला करण्यास उपयूक्त ठरेलच असे सांगता येत नाही. त्या मुळे सेरो-सर्वे वरून कोविड-१९ वीषाणू संसर्ग पुन्हा होणारच नाही अथवा साथ वापस येणारच अशी निष्कर्ष घाई करण्याचा सल्ला या क्षेत्रातील तज्ञ देताना दिसतात.

लेखन चालू

* उत्तर दायकत्वास नकार लागू (मी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ नाही, महत्वाचे आरोग्य विषयक सल्ल्यासाठी आधुनिक वैज्ञानिक मापदंडाचा सुतर्कपूण वैद्यकीय सल्ला श्रेयस्कर असतो )

* अनुषंगिका व्यतरीक्त विषयांतर, व्यक्तिगत टिका, शुद्ध लेखन चर्चा, टाळण्यासाठी आभार.
* लोकांना आरोग्य विषयक जोखीम घेण्यास सांगणारे सल्ले, किमान शारीक अंतर, नाकतोंड-मास्क व निर्जंतुकीकरणाचे महत्व कमी लेखणारे सल्ले न देण्यासाठी अनेक आभार.

प्रतिक्रिया

माहितगार's picture

26 Jul 2020 - 6:36 pm | माहितगार

ऊपरोक्त लेखातील शेवटते वाक्य

* त्या मुळे सेरो-सर्वे वरून कोविड-१९ वीषाणू संसर्ग पुन्हा होणारच नाही अथवा साथ वापस येणारच अशी निष्कर्ष घाई करण्याचा सल्ला या क्षेत्रातील तज्ञ देताना दिसतात.

असे बदलून मिळावे हि नम्र विनंती

शकु गोवेकर's picture

28 Jul 2020 - 3:28 am | शकु गोवेकर

क्रमांक एक - श्री राम बांधल्याने कॉरोन जाईल का हो - इति
क्रमांक दोन - हनुमान चाळीस वाचा म्हणजे नक्कीच जाईल कि हो - इति

असंख्य धोके आजारी पडण्याचे पदोपदी आहेत.
Covid19 हाच एकमेव धोका आहे हाच विचार पटत नाही.
प्रतिकार शक्ती कोणाची किती सक्षम आहे हे जसे समजत नाही तसे शरीरातील कोणते अवयव किती सक्षम आहेत हे सुद्धा समजत nahi.
आपण भ्रमात असतो की मी तंदुरस्त आहे पण तो भास असतो.
तीच बाब covid 19 विषयी आहे मला बाधा होवू नये अशी सर्वांचीच इच्छा असते आणि इच्छे मुळेच जे सल्ले दिले जातात ते पाळले जातात..
पण ते सल्ले योग्यच आहेत आणि मी ते तंतोतंत पाळतो आहे हे कोण ठरवणार.
सल्ले
1) मास्क
कोणता मास्क चांगला,कोणता मास्क खराब
हेच अजुन ठरले नाही.
मास्क अती सूक्ष्म आकाराचे व्हायरस मास्क रोखू शकतात की नाही.
स्पष्ट ठाम,एकमताने कोणी सांगू शकत का?
2) हात धुणे
ह्या सल्ल्या वर सर्व ज्ञानी लोकांचे एकमत आहे.
3) व्हायरस हवेतून पसरतो का आणि किती अंतरापर्यंत.
ज्ञानी लोकात एकमत नाही परस्पर विरोधी मत आहेत
फक्त हे तीनच सल्ले विचारात घेवू .

माहितगार's picture

26 Jul 2020 - 7:30 pm | माहितगार

लोकांना आरोग्य विषयक जोखीम घेण्यास सांगणारे सल्ले, किमान शारीक अंतर, नाकतोंड-मास्क व निर्जंतुकीकरणाचे महत्व कमी लेखणारे सल्ले न देण्यासाठी अनेक आभार.

माहितगार's picture

26 Jul 2020 - 8:05 pm | माहितगार

लोकांना आरोग्य विषयक जोखीम घेण्यास सांगणारे सल्ले, किमान शारीरीक अंतर, नाकतोंड-मास्क व निर्जंतुकीकरणाचे महत्व कमी लेखणारे सल्ले न देण्यासाठी अनेक आभार.

तुर्रमखान's picture

14 Aug 2020 - 6:29 pm | तुर्रमखान

मास्क बाबतीत सहमत.
आधी न९५ वगैरे विकायका काढले. नंतर साधे आले. आता तर गल्लोगल्ली आणि फेसबुकवर घरगुती कंफी कॉटन मास्क म्हणून कुणीही मास्क विकतं.

माहितगार's picture

26 Jul 2020 - 7:26 pm | माहितगार

सेरॉलॉजीकल सर्वेक्षण हे लोकसंख्येतील थोड्याशाच लोकांचे रँडम (अविशीष्ट) सर्वेक्षण असते. त्यामुळे लोकसंख्येतील संसर्ग ग्रस्त तसेच संसर्ग होऊन गेलेल्यांच्या प्रत्यक्ष आकडेवारीशी सेरो-सर्वे आकडेवारी जुळण्याची हमी देणे शक्य नसते, केवळ संसर्ग होऊन गेलेल्यांच्या टक्केवारीचा केवळ ढोबळ अंदाजा मात्र सेरॉलॉजीकल सर्वेक्षणावरून येऊ शकतो. त्यातही कोणत्या क्षेत्रात आणि किती घनतेच्या क्षेत्रात सर्वेक्षण केले एकाच कुटूंब परिक्षेत्र आणि कम्युनिटीत कमी अधिक सर्वेक्षण झाले का इत्यादीवरही या सर्वेक्षणांच्या मर्यादा असतात.

दिल्लीतील सेरोसर्वेक्षणानुसार दिल्लीत सर्वेक्षण केलेल्यांपैकी आदमासे २३% लोकात प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) दिसून आल्या. तर अहमदाबादेतील सर्वेक्षणाचा आकडा 17.61 टक्के आढळला. असे वृत्त्तांतांवरून दिसते त्याबद्दल काही दखल घेण्या योग्य माहिती आणि विश्लेषण लेखही दिसतात. प्रत्यक्ष आकडेवारी सर्वेक्षणापेक्षा वेगळी असते हे ओघाने येतेच. याचा एक महत्वाचा निष्कर्ष अजूनही ८० टक्क्यापेक्षा अधिक लोकांना जोखीम असू शकते असा होतो.

उदाहरणार्थ पुण्याचा झालेल्या टेस्टचा सध्याचा पॉझिटीव्हीटी रेशो ८ टक्क्यांच्या आसपास दिसतो, अहमदाबाद आणि दिल्लीचे सेरोसर्वे प्रमाण बघता ज्या लोकांच्या टेस्ट झाल्याच नाहीत पण होऊन गेलेल्यांचे प्रमाण सहजपणे दुप्पट असू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे आकडेवारी
समजा १५ % गृहीत धरली आणि संसर्ग लागण दुपटीचा दर साधारणतः १५-२० दिवसांचा असण्याची शक्यता आकडेवारी लक्षात घेतली तर १५ % असल्यास ३० % आणि पुढे ६० %
२५% असल्यास ५०% आणि पुढे काही अडथळ्यांनी थांबले तरी ७५ % लोकसंख्या येत्या दोन महिन्यात कोविडच्या विळख्यात येण्याची जोखीम / साशंकता मला व्यक्तिशः जाणवते. याच कारणाने आता तरी भानावर या अशा स्वरुपाचे माध्यमांचे आवाहन आणि किमान शारीक अंतर, नाकतोंड-मास्क व निर्जंतुकीकरणाचे महत्व येत्या दोन-एक महिन्यांसाठी नितांत महत्वाचे असू शकते असे वाटते. या लेखनाचा उद्देश्य केवळ येते दिड-दोन महिने अधिक काळजी घेण्याच्या दृष्टीने आहे,
.
हर्ड इम्युनिटी इतक्यात येण्याची शक्यता तज्ञांनी फेटाळली असल्याने तुर्तास तसे निष्कर्ष काढून निर्धास्त होण्याचा प्रयत्न तुर्तास योग्य नसावा
.
.
.
संदर्भ:
* Only 17.61 per cent has antibodies: Ahmedabad civic body sero survey
* Explained Ideas: Why the results of the sero-prevalence survey in Delhi offer hope
* Serological surveys are being conducted to test for coronavirus antibodies. How useful are they?
* BMC Announces Completion Of First-Phase Of Serosurvey Among 10,000 Residents
* Explained: Are we approaching the stage of herd immunity?
.
.
.
*धागा लेखात नोंदवल्या उत्तरदायीकत्वास नकार लागू हे वे सा न ल.

शकु गोवेकर's picture

28 Jul 2020 - 4:13 am | शकु गोवेकर

क्रमांक एक - श्री राम मन्दिर बांधल्याने कोरोना जाईल का - इति **
क्रमांक दोन - हनुमान चाळीस वाचा म्हणजे कोरोना नक्कीच जाईल कि - इति **
हम वोईच बोलेन्गे **

माहितगार's picture

28 Jul 2020 - 9:25 am | माहितगार

COVID-19: Pune positivity rate high at 23-25 pc, says OSD

संदर्भ

मानवी शरीराची रोगप्रतिकार यंत्रणा ही खूप जटिल आहे.
डॉक्टर नी ह्या वर detail भाष्य करावे.
प्रतिपिंडे फक्त रोगप्रतिकार करतात असे नाही.
थोडक्यात मानवी शरीराची प्रतिकार शक्ती चे दीन प्रकार आहेत.
विशिष्ट प्रतिकार शक्ती आणि अविशिष्ट प्रतिकार शक.
विशिष्ट प्रतिकार शक्ती ही जन्मजात असते .
पेशी वरती बाह्य घटकांनी हल्ला चढवला ,पेशी मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला की विशिष्ट प्रतिकार शक्ती लगेच कार्यान्वित होते आणि प्रतिकार करण्याचे प्रयत्न करते पण तिला जिवाणू ,विषाणू मधला फरक समजत नाही.
पण अविषिष्ट प्रतिकार शक्ती उशिरा कार्यान्वित होते आणि बाह्य आक्रमकान पूर्ण ओळखून नंतर पूर्ण तयारी करून विषाणू ,जिवाणू वर हल्ला चढवतात.
त्यांना पेशी मध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध केला जातो.
T cell,helper T cells,B cells hya vishanu chi ओळख पटवतात.
Memory T cell. त्या विषाणू ल लक्षात ठेवतात.
तर किलर T cells saral vishanu,किंवा जिवाणू चा खात्मा करतात.
सध्या खोकला,थंडी ताप ह्यांनी सुध्दा प्रतिकार शक्ती प्रशिक्षित होते
आणि भारतात अनेक आजार होवून जात असल्यामुळे भारतीय लोकांची प्रतिकार शक्ती प्रशिक्षित आहे.
मी काही ह्या विषयातील जाणकार नाही.
माझ्या वरील पोस्ट मध्ये चुका असू शकतात किंवा पूर्ण पोस्ट चुकीची असू शकते.
डॉक्टर किंवा त्या विषयात अभ्यास असणाऱ्या व्यक्ती नी मत मांडावे.

माहितगार's picture

29 Jul 2020 - 1:24 pm | माहितगार

मुंबईच्या सेरो सर्वेचे रिझल्ट आलेले दिसतात. दिल्ली आणि अहमदाबादच्या मानाने मुंबईचा सँपल साईज फक्त 6,936 लोकांचा म्हणजे फारच लहान सँपल साईज आहे. सोसायटीवाल्यानी सँपल्स देण्यात असहकार्य केल्याने मध्यमवर्गीय सँपल फारच लहान म्हणजे दोन अडीच हजारच्या आसपास असावा उर्वरीत सँपलसाईज स्लम एरीयाचा आहे. सोसायटी वाल्या सँपलसाईजमध्ये केवळ १६ टक्केच कोविड अँटीबॉडी पॉझीटीव्ह आढळले असे रिपोर्ट म्हणतो.

(सोसायटीत्ल्यांची आकडेवारी अंशतः कमी असेल हे समजण्यासारखे मुंबईत जिथे मध्यमवर्गीय सुद्धा लोकल ट्रेन आणि सामाजिक व्यवहार गर्दीच्या जागांवर बर्‍यापैकी अवलंबून होते आणि आहेत त्या नुसार सँपलसाईज गंडल्याने आणि असहकार्या मुळे आकडेवारी स्लम्सच्या मानाने अंशतः कमी आली असावी. हे माझे मत)

मुंबईच्या स्लम एरीयात अँटीबॉडी पॉझीटीव्हीटी ५७ टक्के -सोसायटी रेसिडंट्सच्या मानाने साडेतीनपटीने अधिक- आली असे रिपोर्ट म्हणतो. (सँपलसाईज लहान असल्याने हा ही दर अंशतः कमी तर असणार नाही अशी शंका वाटते.

स्त्रीयांमध्ये अंशतः अँटीबॉडी पॉझीटीव्हीटी आढळली असे रिपोर्ट म्हणतो पण स्त्रीयांचा सँपलसाईजपण अंशतः अधिक आहे हे ही लक्षात घ्यावे लागते. )

स्लम एरियाच्या वीषाणू एक्सपोजरच्या मानाने मृत्यूदर कमी असण्याचे कारण स्लममध्ये तरुणांची संख्या अधिक असल्याने शक्य असल्याचे म्हटले आहे ( भारतातील पन्नासीनंतरचा रेग्युलर सर्वसाधारण मृत्यूदर अधिक असेल तर तेवढे पन्नासी नंतरचे लोकच नसतील तर त्या मानाने कोविडसाथकालीन मृत्यूदर कमी दिसू शकतो हे माझे मत)

माटूंगा धारावीच्या बाजूला असल्याने कदाचित तिथे अँटीबॉडी पॉझीटीव्हीटी अधिक म्हणजे 57.8 आढळली, असे रिपोर्ट म्हणतो.

(स्लम एरियात परराज्य आणि पर जिल्ह्यात गेलेली मंडळी परततील तेव्हा उर्वरीत ४०% स्लम लोकसंख्येची जोखीम आणखी वाढू शकते. सोसायटी मध्यमवर्गीयातील ८० टक्क्यांना आणखी काही काळ जोखीम आहेच आणि येते दिड - दोन महिने अधिक काळजी घेण्याची गरज आहे.)

संदर्भ: इंडीयन एक्सप्रेस वृत्त, टाईम्स ऑफ ईंडिया वृत्त

रात्रीचे चांदणे's picture

29 Jul 2020 - 2:09 pm | रात्रीचे चांदणे

मुंबईच्या स्लम एरीयात अँटीबॉडी पॉझीटीव्हीटी ५७ टक्के -......
याचा अर्थ असा आहे का की स्लम एरियात 57 टक्के लोकांना covid 19 होऊन बरा झाला आहे.

माहितगार's picture

29 Jul 2020 - 4:28 pm | माहितगार

होय एका अर्थाने तसेच फक्त त्यातील अनेकांना वीषाणूबाधेची लक्षणे, त्यांनी मनावर घेतली नसतील, अत्यंत सौम्य असतील किंवा दिसली नसतील आणि त्यांच्या शरीरांनी यशस्वी झूंज दिली. साधारणतः असे किती टक्के लोक एकुण लोकसंख्येत आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न सामाजिक आरोग्य या शीर्षका खाली होत असतो.

40 टक्के लोक झोपडपट्टी मध्ये राहतात .
मुंबई ची lokssnkhyav1 करोड नक्कीच आहे चाळीस लाख लोकांचे ह्यांनी sample घेवून टेस्ट केली आहे का.
तर बिलकुल नाही.
त्यांच्या दाव्या वर विश्वास ठेवणे ही सर्वात मोठी अंध श्रद्धा आहे

माहितगार's picture

29 Jul 2020 - 4:29 pm | माहितगार

तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे ?

उत्तरेच्या बेशिस्त राज्यात covid 19 चे प्रचंड रुग्ण असणार.
नेहमी प्रमाणे फसवणूक करून त्यांनी आकडा दाबून ठेवला आहे
2022 पर्यंत महाराष्ट्र सरकार नी बिलकुल बाहेरच्या राज्यातील लोकांना प्रवेश देवू नये.
उत्तरेच्या राज्यातील बेकार लोकांना इथे प्रवेश मिळवा म्हणून असे खोटे सर्वे जाहीर केले जात आहेत.
हे सत्य मानून त्यांना प्रवेश दिला तर पूर्ण देशातील संसर्ग बाधित लोकांवर उपचार महाराष्ट्र ला करावे लागतील.

Gk's picture

29 Jul 2020 - 4:28 pm | Gk

करोना परदेशातील उचच शिक्षीतानी भारतात आणला

गोर गरीब नाईलाज म्हणून बाहेर जात होते , तेच आज इंटिबॉडी मुले सुरक्षित आहेत

70 % समाज सुरक्षित झाला तर बंगलेवाले आपोआपच सुरक्षित होतील

( आर्मीत गुजराती लोक कमी असले तरी गुजरात बाकी राज्या इतकाच सुरक्षित आहे , तसे )

माहितगार's picture

29 Jul 2020 - 4:31 pm | माहितगार

( आर्मीत गुजराती लोक कमी असले तरी गुजरात बाकी राज्या इतकाच सुरक्षित आहे , तसे )

:)

माहितगार's picture

29 Jul 2020 - 4:38 pm | माहितगार

.....उत्तरेच्या राज्यातील बेकार लोकांना इथे प्रवेश मिळवा म्हणून असे खोटे सर्वे जाहीर केले जात आहेत.....

संशोधक संशोधक असतात राजकारणाचे अथवा आपल्या पुर्वग्रहांचे बटीक नव्हे, त्यांना हकनाक हलक्यात घेणेही योग्य नाही. सँपल साईज लहान आहे तर लहान आहे आपणही चिमुटभ मीठा सोबत घ्यायचा.

मराठी लोक शीस्तीत वागत आहेत असे आपल्या कडेही चित्र नाही. प्रवास करून उत्तरे आजार घेऊन जाऊन परत फिरवून आणणे योग्य नाही हे ही खरे आहे. पण आपण म्हणता तसे वर्ष अखेरी पर्यंत प्रवासांवर नियंत्रण आणणे जरूरी होते ते दुर्दैवाने आपल्या देशास जमले नाही.

Gk's picture

29 Jul 2020 - 6:46 pm | Gk

करोनाबाधा दोन वेळा होऊ शकते का, या प्रश्नाचे उत्तर शास्त्रज्ञ खात्रीपूर्वक देऊ शकत नसले तरी अशी शक्यता जवळपास नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. अमेरिकेतील काही विद्यापीठात याबाबत संशोधन झाले आहे. एकदा करोनाची बाधा झाल्यावर त्या संसर्गासाठी काही प्रमाणात प्रतिकारशक्ती निर्माण होत असली, तरी ती किती काळ टिकेल, याबाबत साशंकता आहे. करोनामुक्त झालेले रुग्ण काही आठवड्यांनंतर पुन्हा पॉझिटिव्ह आल्याच्या काही घटना नोंदवण्यात आल्या आहेत. पूर्वीच्या संसर्गाचे काही अवशेष या चाचण्यामध्ये आढळत असतील. त्यामुळेच त्यांची चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे समोर येत असावी. त्याशिवाय अनेकदा करोनाची बाधा झाली असल्याचे सांगणारी चाचणी चुकीचे असल्याचे आढळले आहे. या अशा प्रकरणांमध्येही चाचणी चुकीच्या प्रकारे आढळत असेल असे म्हटले जाते.

https://maharashtratimes.com/international/international-news/can-you-ge...

हर्ड इम्युनिटी हे आजारापासून मिळणारे अप्रत्यक्ष संरक्षण आहे. हर्ड इम्युनिटी लोकसंख्येला आजारापासून वाचवते पण लस तयार होईल तेव्हाच हर्ड इम्युनिटी तयार होईल किंवा नागरिकांना करोनाची लागण होऊन ते त्यातून बरे झाले, तर हर्ड इम्युनिटी तयार होते. भारतासाठी हर्ड इम्युनिटी पर्याय असू शकत नाही. लस दिल्यानंतरच हर्ड इम्युनिटी तयार होऊ शकते” असे आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/covid-19-herd-immunity-not-an-...

मै व्यापारी हूं
यथा राजा तथा वैद्यराजा

गामा पैलवान's picture

31 Jul 2020 - 1:20 am | गामा पैलवान

Gk,

ऑस्ट्रेलियामधल्या आदिवासींच्या अंगात नैसर्गिकरीत्या पोलियोची प्रतिकारशक्ती अस्तित्वात होती. पोलियोचं परिचयकाठीण्य नैसर्गिक रीत्या विकसित झालं होतं. त्यासाठी लस हवीच असं काही नाही. त्या आदिवासींना पोलियो माहीतही नव्हता. गोरे लोक तिथे आल्यावर पोलियोच्या साथी सुरू झाल्या.

आ.न.,
-गा.पै.

Gk's picture

31 Jul 2020 - 7:15 am | Gk

नैसर्गिक शक्ती होती , मग गोरे लोक गेल्यावर साथी कशा आल्या ?

याचा अर्थ , तिथे तो रोजच नसल्याने पूर्वी त्यांच्यात प्रतिकार शक्ती निर्माण झाली नव्हती,

शिवाय ते आदिवासी असल्याने इतरांशी जनसंपर्क 0 होता, इतर जग असे आयसोलेटेड राहू शकत नाही

गामा पैलवान's picture

31 Jul 2020 - 6:25 pm | गामा पैलवान

Gk,

पोलियो फैलावायची कारणं काहीही असतील, उदा. : आहारातला बदल वगैरे. पण गोरे लोकं यायच्या अगोदर तिथे पोलियो नव्हता हे सत्य आहेच.

आ.न.,
-गा.पै.

Gk's picture

31 Jul 2020 - 6:49 pm | Gk

मग ?

गामा पैलवान's picture

31 Jul 2020 - 10:51 pm | गामा पैलवान

परिचयकाठीण्य येण्यासाठी लस हवीच असं नाही. बस इतकंच.
-गा.पै.

Gk's picture

1 Aug 2020 - 7:19 am | Gk

लस हवीच असे नाही.

पण तरीही काही विशिष्ट कंडिशन असेल तर लोक लस प्रेफर करतात

1. रोगाने गंभीर रूप घेतल्यास जास्त कॉम्प्लिकेशन वा मृत्यू होतो
2. रोगास महागडे उपचार लागतात
3. रोगाचे निदान होण्यास खर्च लागतो
4. बरा व्हायला वेळ लागतो

आणि जर लस अगदी स्वस्तात असेल तर लोक लस घेतात

कोविडची लस निघालीच तर लोक प्रेफर करतील
तोवर डार्विनराव आहेतच , सरवायव्हल ऑफ द फिटेस्ट

परिचयकाठीण्य येण्यासाठी लस हवीच असं नाही. बस इतकंच. -गा.पै.

गा.पै.जी, फक्त पैंलवानाला भेटला आणि काटकुळ्याचा पैलवान झाला, असं किती जणांच्या बाबतीत झालय आज पर्यंत? तालमीत पैलवानाशी झुंज होऊन काहीच काटकुळे मजबूत होतील, पण पैलवानाच्या हल्ल्याशी मुकाबला करु न शकलेल्या असंख्य काटकुळ्यांचे काय ?

एखादा माणूस बाहेरून पैलवान असला आणि दिसला तरी आतली वीषाणूंना तोंड देणारी अप्रशिक्षीत नैसर्गिक प्रतिकारशक्ती काही वेळा काटकुळी असू शकते, प्रत्येकाच्या शरीरातील प्रतिकारशक्ती प्रत्येकवेळी वीषाणू पैलवानाशी मुकाबला करु शकेलच असे नाही. आपण म्हणता तसे बर्‍याच जणांची प्रतिकारशक्ती नवनव्या वीषाणू पैलवानांशी झूंज देउन परिचय काठीण्य मिळवते देखिल. पण ज्यांची अप्रशिक्षीत नैसर्गिक प्रतिकारशक्ती काटकुळी असते / होते ते नवनव्या वीषाणूंनी बेजार होऊन असंख्य धारातीर्थी पडतात त्यांचे काय? बरं बर्‍याच वीषाणूंचे असे नाही ना की लुटूपुटूच्या खेळात लोळवून दाखवले आणि गेले निघुन पैलवान वीषाणू, परिचय न झेपू शकलेल्यांच्या जीवाला मोठी हानी पोहोचवू शकतात.

लसी शिवाय वीषाणू परिचय म्हणजे सराव न करता काटकुळ्याने पैलवानाशी झुंजीला उतरणे होय. पूर्व सराव नसेल आणि हल्ला झालाच तर काटकुळी प्रतिकारशक्ती सुद्धा आपापल्यापरीने छोट्या झुंजी देतातच पण जिथे जीवाला जोखीम असते तिथे पूर्व सुयोग्य लसयुक्त सरावानिशी तोंड देण्यात अधिक शहाणपण नाही का?

गामा पैलवान's picture

1 Aug 2020 - 1:10 pm | गामा पैलवान

माहितगार,

लशींचा इतिहास फारसा उत्साहवर्धक नाही. शरीराची प्रतिकारयंत्रणा अत्यंत गुंतागुंतीची असते. तिच्यात सरावासाठी टोचलेले विषाणूही गंभीर आजार निर्माण करू शकतात. याविषयी ठाम माहिती नाही. शिवाय अशा सरावाच्या विषाणूंमुळे मूळ प्रतिकारशक्तीत गोंधळ उत्पन्न झाल्याची उदाहरणंही आहेत. Original Antigen Sin असं म्हणतात त्याला.

लस हा उपचार कधीच नसतो. ती फारतर पूरक असू शकते.

आ.न.,
-गा.पै.

Rajesh188's picture

31 Jul 2020 - 12:01 am | Rajesh188

जगातील एका पण देशात,एका पण राज्यात,एका पण जिल्ह्यात तयार झाली नाही.
अमेरिका 50 लाख च्या वर गेली किती तरी लोक मेली तिथे तयार झाली नाही.
जगात एका पण ठिकाणी सामूहिक प्रतिकार शक्ती निर्माण झाली ह्याचे उदाहरण नाही तर अंध श्रद्धा का पसरवत आहात.
नियंत्रित संख्येत व्हायरस शरीरात सोडून लोकांना बाधित करण्याचा एक पण प्रयोग झाला नाही मग कशाला लोकांची दिशाभूल करत आहात.
जे नियम पाळत आहे,अंतर राखत आहेत.
हात धूत आहेत त्या लोकांमध्ये गोंधळ का निर्माण केला जात आहे

Gk's picture

31 Jul 2020 - 7:16 am | Gk

जे नियम पाळत आहेत त्यांनी नियम पाळावेत , सर्वांनी पाळावेत

हर्ड इम्युईनीती आली , आता गावभर फिरा, असे कुणी म्हटले आहे का ?

मराठी_माणूस's picture

1 Aug 2020 - 11:55 am | मराठी_माणूस

राजीव बजाज किमान सेफ डिस्टन्सींगच्या बाजूने बोलत आहेत ते बरे आहे. कारण लस न घेतल्यास खरी भीस्त शारिरीक अंतर राखण्यावरच असेल.

मी या विषयातला जाणकार नाही, अधिक भाष्य डॉक्टर मंडळींनी करावे.

शारीरीक अंतर, मास्क, निर्जंतुकीकरण इत्यादी गोष्टींचे जे काटेकोरपालन करणे ज्यांना शक्य आहे आणि करतात सुद्धा त्यांना लस जरा उशीराने घेतली तर जमणारे असू शकते. लसींमुळे तयार झालेली प्रतिकारशक्ती कितीकाळ टिकेल हा प्रश्न थोडा फार शिल्लक राहू शकतो. पण लसींचे कोणतेही मोठे दुष्परीणाम नाहीत यासाठी किमान प्रमाणात तपासणी झाल्यावरच लस बाजारात येईल. आणि कोणत्याही जिवंत वीषाणूशी प्रत्यक्ष सामना करण्यापेक्षा लसी मधल्या मेलेल्या वीषाणूंशी किंवा जिवन नसलेल्या वीषाणू प्रारुप लसींबा स्विकारण्यात अधिक शहाणपणा असावा. लस इतर काही जणांना काही झाले नाही याची शाश्वती करून घेऊन घेण्यास हरकत नाही. लसींच्या नावाने त्यापेक्षा अधिक भिती निर्माण करणे सयुक्तीक नव्हे नुकसान कारक असू शकते. बजाज सारख्या कर्मचार्‍यांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तीने बोलताना विषय किमान आधी नीट समजून घेऊन बोलणे गरजेचे असावे नाही तर त्यांचा डोनाल्ड ट्रम्प होतो.

अयोध्येमध्ये आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते भव्य राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ११.३० च्या सुमारास अयोध्येतील साकेत कॉलेजच्या हेलिपॅडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर उतरेल, त्यावेळी त्यांच्याभोवती विशेष सुरक्षाकडे असणार आहे. या सुरक्षा कड्यामध्ये करोनामुक्त झालेले स्थानिक पोलीस असतील, असे राज्याच्या पोलीस उपमहानिरीक्षकांनी मंगळवारी सांगितले.

भूमिपूजन सोहळयाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी तीन तास अयोध्येमध्ये असतील. *मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या या पोलिसांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. या पोलिसांमुळे करोनाचा फैलाव होणार नाही, असा प्रशासनाला विश्वास आहे. पुढचे काही महिने करोनाच्या धोक्यापासून पंतप्रधान मोदींचा बचाव करणे आवश्यक आहे.*

https://www.loksatta.com/desh-videsh-news/at-bhumi-pujan-150-cops-recove...

सेरोसर्वेच्या बाबतीत अतीअल्प सँपल साईजमुळे पुणेकरांना दुधाची तहान ताकावरच भागवावी लागणार अशी चिन्हे आहेत. एनी वे पुण्यातील एका प्रायव्हेट लॅबच्या सेरो सर्वेचा रिपोर्ट ४००० च्या सँपलसाईज मध्ये १७ टक्के च्या आसपास लोकांना अँटी बॉडीज विकसित झाल्याचे सुचवताना दिसतोय. दिल्ली अहमदाबाद सेरोसर्वे सँपल साईज मोठा होता आणि तो ट्रेंड गृहीत धरला तर आकडेवारी २० ते २५ टक्केच्या घरात निघावयास हवी.

लोक पावसामुळे घरात बसले आणि दुपटीचा साथीचा दुपटीच्या दिवसांचा दर कमी झाला असे म्हटले तरी निष्काळजीपणाने तेवढी जागा भरून काढली असणार, या महिना अखेरीस अधिक अंदाजा येईल असे वाटते.

पुणे महापालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, इंडियन इन्स्टिटय़ूट फॉर सायन्स, एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च (आयसर) आणि ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्सेस अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी इन्स्टिटय़ूट यांच्या पुढाकारातून पुण्यातील करोनाने अधिक प्रभावित पण सध्या सक्रीय केंटॅनमेम्ट नसलेल्या ५ प्रभाग क्षेत्रातील सेरो सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. सँपल साईझ लहान म्हणजे १६६४ लोकांचा आहे पण सँपलसाईज निवडताना विवीध घटक निवडण्यात पद्धतशीरपणा वाटतो (दर पाचव्या वसाहतीतील पाचवे घर असा काही प्रकार, प्रतिघर एक प्रथमदर्शनी लक्षण विरहीत वयस्क). प्रत्येक प्रभागातून २५ कुटूंबांचे १२ गट निवडले असावेत (सुमारे ३०० व्यक्ती प्रत्येक प्रभागातून?) असे दिसते, बंगले, वाडे, चाळ, झोपडी असे सर्व प्रकार समाविष्ट होतील असे पाहीले गेले. सोबतच वय, महिला पुरुष, घर/झोपडीचे स्केअरफूट क्षेत्रफळ, टॉयलेट सुविधा सामुहिक की एकत्र याचीपण नोंद घेतली गेली.

आपण ज्या गटात टक्केवारी कमी आढळली त्या बाजूने सुरवात करू ६६ पेक्षा अधिक वयाच्या केवळ ३९.८ टक्केच व्यक्तित करोना प्रतिपिंडांचे प्रमाण आढळले. हे एका दृष्टीने ६० टक्के ज्येष्ठ नागरीकांपर्यंत साथ न पोहोचणे सुखद आश्चर्य वाटणारे पण उर्वरीत ६० टक्के वृद्धांना अजूनही संसर्ग धोका असू शकतो आणि काळजी घेणे चालू ठेवणे गरजेचे आहे हे ह्यावरून कळते. हि आकडेवारी कमी वयोगटातील ५२ टक्के लोकांना लागण आहे पण ६६ वयापेक्षा अधिक मध्ये कमी आहे ह्याची इतर दोन कारणे असू शकतात ज्यांना लागण झाली त्यातले वरेच वाचले नाही दुसरे ६६ वयोगटापेक्षा अधिकचे ज्येष्ठ नागरीक कमी आयुष्यमानामुळे गरीब वस्त्यातून कमी असतात आणि त्यामुळे आर्थिक सुस्थितीतील म्हणजे अधिक क्स्।एत्रफळाच्या घरातील वृद्ध सँपल साईज अधिक आहे किंवा नाही या बाबत सर्वेक्षणात भाष्य नाही कदाचित त्यांच्या हे मुद्दे लक्षातही आले नसतील का ?

एरिया वाईज कसबा-सोमवार पेठ ३६.१ % ; रास्ता - रविवार ४५.७ % ; नवीपेठ-पर्वती आणि येरवडा सुमारे ५६.६% ; लोहीयानगर -कासेवाडी ६५.४ टक्के असा फरक असण्याचे गमक अहवालात स्पष्ट केलेले दिसत नाही. लोकसंख्या घनतेचा संबंध किंवा अजून काही यावर इतर मिपा जाणकारांनी प्रकाश टाकावा.

ज्यांची घरे ५०० स्क्वेअर फुटांपेक्षा अधिक आहेत त्यांच्यात ३४.६ टक्के इतके कमी तर ३०० ते ५०० स्क्वेअर फूट ४८.५% आणि ३०० स्क्वेअरफूट पेक्षा कमी ५८.६ ते ५९.६ टक्के

केवळ घराचा साईज मोठासाईज अधिक सुरक्षीत कमी साईज कमी सुरक्षीत हा परिणाम लोक्संख्येच्या घनतेस अनुलक्षून समजता येईल पण अपार्टमेंट मध्ये रहाणारे ३३.२% बंगल्यात रहाणारे ४३.९ % हा असा फरक का पडला असेल ? (सोबतच मी आधीच्या प्रतिसादातून वर नोंदवलेला खासगी सर्वेक्षण ४००० सँपलसाईज आणि खर्च पहाता सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय असेल त्यात प्रमाण केवळ १६ % नोंदवले आहे म्हणजे एकतर इतर कमी प्रभावित क्षेत्रात साथ पोहोचणे अद्याप बाकी आहे असा अर्थ निघतो ?

बाकी वाडे आणि चाळी ५६ % आणि झोपडपट्टी ६२ % हे वाडे चाळी आणि झोपडपट्टी येथील आकडेवारी अपेक्षेनुसार म्हणता येईल.

केवळ घराचा साईज मोठासाईज अधिक सुरक्षीत कमी साईज कमी सुरक्षीत हा परिणाम लोक्संख्येच्या घनतेस अनुलक्षून आहे हे लक्षात येतेच पण स्व्तंत्र शौचालय असलेल्यात लागण ४५ % तर सामुदायीक टॉयलेट ६२ % . गरीब वस्त्यातून टॉयलेट्सची संख्या अधिक असण्याची गरज अधोरेखित होते . अजून एक मुद्दा असा की सार्वजनिक शौचालय हा घटक असेल तिथे १०० टक्के लोक सामुदायिक टॉयलेट वापरत असणार तर ३८ टक्केही लागण होण्यापासून सुरक्षित आहेत. सामुदायिक टॉयलेट वापरून बाधीत होणार्‍या ६२ % वि. बाधीत न होणारे ३८ % यात काही वेगळा बिहेवीअरल पॅटर्न असेल का ? कारण सामुदायिक टॉयलेट आणि लोक्संख्या घनता या घटकात तर फरक नाही मग मुख्यत्वे बिहेवीअरचा फरक ऊरत असेल की टॉयलेट्सच्या आर्किटेक्चरल संरचनांचा प्रश्न असेल ?

बाकी निरीक्षणात स्त्री पुरुष असा फारसा फरक नाही, ६६ पेक्षा कमी वयोगटात ५२%च्या आसपास प्रमाण आढळले (आणि सर्वसाधारण टक्केवारी ५२ %च्या घरात आहे म्हणजे ६६ पेक्षा अधिक वयोगटाचा सँपलसाईज फार लहान होता असा तर्क करता येतोय ना ? ते अगदी तसेच आहे ३१-५० वयोगट ६८० व्यक्ती ५१- ते ६५ वयोगट ४१८ व्यक्ती, १८ते ३० वयोगट ३९५ व्यक्ती तर ६६ पेक्षा अधिक वयोगट १७१ व्यक्ती - भारतातील मृत्यूदर विकसित देशातील मृत्यूदरापेक्षा कमी येण्याचे मुख्य गमक बहुधा यातच आहे आमच्याकडे सर्वसाधारण आयुर्मर्यादाच कमी आहे किंवा कसे)

सर्वे अहवालातील CAVEATS Our tests estimate the presence of IgG antibodies against SARS-CoV-2 in the population and suggest past infection. Thepresence of these antibodies does not necessarily indicate that the individual is resistant to subsequent infection. Neither is the high seroprevalence necessarily an indicator of population-level immune protection

या सर्वेक्षणातून प्रतिपिंडांचे प्रमाण आणि सक्षमता समजत नसल्याने ज्यांच्यात प्रतिपिंडे आढळली त्यांना पुन्हा करोना होणारच नाही याची तुर्तास शाश्वती देता येत नाही आणि जिथे प्रमाण अधिक आहे तेथे हर्ड इम्युनिटी प्राप्त झाली असेही तुर्तास म्हणता येत नाही .

संदर्भ मुख्य अहवाल दुवा पिडीएफ iiserpune.ac.in संस्थळ

दैनिक सकाळ दुवा

दैनिक लोक्सत्ता दुवा

अनुषंगिक धागा मृत्यूंचा आकडा वाढला, आता 'राजि'नामे द्या दुवा

थोडक्यात मतितार्थ : प्रमाण १६ % असो ५० % असो वा ६०% असो दुपटीचा कालावधी १५ ते ३० दिवस धरला तर येता दिड महिना अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. सामाजिक पथ्ये तीच अधिकतम सुरक्षीत अंतर, मास्क आणि हात आणि सर्व स्पर्षीय पृष्ठभागांचे निर्जंतुकीकरण

उत्तरदायित्वास नकार लागू

तज्ञांची एक झी २४ तास मुलाखत

माहितगार's picture

4 Sep 2020 - 3:31 pm | माहितगार

ह्या द विकच्या वृत्तार इंदुर, चेन्नई आणि पंजाबातील सेरोसर्वेची माहिती आहे.

.....Maharashtra has reported a 16 per cent coronavirus positivity rate among healthcare workers, including doctors, nurses, staffers and hospital cleaners, which is the second-highest in the country after Telangana (18 per cent)...........

....In Maharashtra, till August 29, a total of 4,274 doctors with the IMA were infected and 408 had died. The death rate among medical practitioners is higher at 9.5 per cent than the normal population....

Bhushan said people need to follow “Covid-19 appropriate behaviour”. “Till a vaccine is launched, social distancing is the only social vaccine we have,”

संदर्भ इंडीयन एक्सप्रेस वृत्त

ICMRचा पहिला राष्ट्रीय सेरोसर्वे ११ मे ते ४ जून कालावधीत केला गेला आणि त्याचे निष्कर्श तब्बल तीन महिने सात दिवसांनी दिले जात आहेत, असा विलंब काही भूषणावह बाब नाही. या सेरोसर्वेत टेस्टींगच्या सुविधा नसलेले जिल्हे आणि ग्रामिण भाग यांचा सुद्धा समावेश होता. लॉकडाऊन निटसा उठलेला नसताना सुद्धा ०.७३ टक्के पॉझीटीव्हीटी रेशो होता. (कम्युनिटी ट्रान्समिशन नाही हे हा रिपोर्ट जवळ असूनही स्विकारले जात नव्हते अजूनही अधिकृतरित्या स्विकारलेले नाही.) न्युज -१८ ने दिलेल्या वृत्ता नुसार एका अधिकृत (टेस्टेड) पॉझीटीव्हला ८० ते १०३ अनटेस्टेड पॉझीटीव्हची शक्यता दिसते. म्हणजे ६४ लाख लोकांना मे अखेरीपर्यंत अनटेस्टेड पॉझीटीव्हीटी येऊन गेली असल्याची शक्यता दिसते. आता मागच्या आठवड्यातील राष्ट्रीय टेस्टेड पॉझीटीव्हीटी चाळीस लाखाच्या आसपास होती. अधिकृत (टेस्टेड) पॉझीटीव्हला ८० ते १०३ अनटेस्टेड पॉझीटीव्हची शक्यता गुणाकार काय असेल या बद्दल न बोललेले बरे. आली साथ गेली साथ आले जीव गेले जीव संदर्भ

या आधी आलेल्या महानगरीय सेरोसर्वे वरून २०-२५ % महानगरीय पॉझीटीव्हीटीची शक्यता दिसत होती. एका टेस्टेड पॉझीटीव्हला १०० अनटेस्टेड पॉझीटीव्ह हे प्रमाण लावले तरी सर्वसाधारणपणे आकडे मेळ खाण्याची शक्यता दिसते.

लॉकडाऊन बर्‍यापैकी उठला तरी पावसाचा जोर चालू राहण्याने लोक बाहेर कमी पडण्याचा अप्रत्यक्ष फायदा होता आता पाऊस सरत आला आहे, बाजारहाटात लोक सुरक्षीत अंतर आणि मास्कचे पथ्य नीट पाळत नव्हते, राखी गौरी गणपती ला एकत्र कुटूंबांनी पथ्य बाजूला ठेवले आता पुणे शहर पॉझीटीव्हीटीत आघाडीवर असतानाही सिटीबस सेवा चालू होऊन त्यातही मास्क आणि सुरक्षित अंतर पथ्य पाळले जात नाहीए. रोज १लाख लोक बससेवा वापरतात म्हणजे आठवड्याभरात पुणेशहरची पॉझीटीव्हची संख्या भराभर वाढू शकते. पुण्यातील खासगी रुग्णालये ओसंडून वहात आहेत पण पेशंटना सेवेसाठी डॉक्टर आणि आरोग्य सेवकांचा तुटवडा भासत असल्याची वृत्ते आहेत. अ‍ॅम्ब्युलन्स मिळत नसल्याची शिवाय मृतांच्या दहनाचा क्रमांक येण्यास वेळ लागण्याची वृत्तेही येऊन गेल्याचे दिसते.

परवा विधानसभेतील देवेंद्र फडणविसांचे भाषण ऐकले आरोग्यसेवांमधील त्रुटींवरून सरकारवर जोरदार टिका केली पण जनता नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे या बेजबाबदारपणे वागत असेल तर कोणते मोदी आणि कोणते ठाकरेही आणि कोणत्याही व्यवस्था पुरे पडत नाहीत. आपल्या आप्तस्वकीयांवर संकट कोसळते तेव्हा जरासे रडून घ्यायचे व्यवस्थेवर खापर फोडायचे आणि नंतर येरे माझ्या मागल्यासाठी बिनबोभाट पुढे धावत सुटायचे.

https://indianexpress.com/article/cities/pune/amid-healthcare-staff-shor...

माहितगार's picture

12 Sep 2020 - 12:59 pm | माहितगार

“Containment can be comforting; the virus has not noticed it at all. And the only impact of the lockdown has been on the people, not on the pandemic.”

बरोबर आहे का हे स्टेटमेंट ?

Epidemiologist Dr Jayaprakash Muliyil, : “...We are experiencing a true epidemic in urban areas and a silent one in rural areas...."

पहिल्या राष्ट्रीय सेरो सर्वेचा निष्कर्ष मे महिन्यात केवळ १ टक्का पेशंट डिटेक्ट होत होते आणि शासनाच्या प्रयत्नांचा लाभ १ टक्का पॉझीतीवना होत होता म्हणजे ९९ टक्के डिटेक्ट होत नव्हते त्यांना लाभही पोहोचत नव्हता आणि नकळत साथीचा प्रसारही वाढवत होते.

Dr Jayaprakash Muliyil, यांच्या अंदाजा नुसार हर्ड इम्युनिटी ५०% च्या जराशी वर कुठेतरी येण्याची शक्यता असावी (हा अंदाज आहे काही एरीयात ६०%च्या वर पॉझीटीव्ह आढळले म्हणजे उर्वरीतांमध्ये प्रसार होतोय तर मग ५०% च्या जवळपास हर्ड इम्युनिटीचा निष्कर्ष कोणत्या बळावर काढण्याचा प्रयत्न केला ? बेसिकली स्वतंत्र शौचालय आणि लोकसंख्या घनता -लोक्संख्या घनतेचा अंदाजा परिसरातील घरांच्या आकारावरून येतो याचा साथ पसरण्याच्या वेगाशी संबंध असावा. )

संदर्भ
https://timesofindia.indiatimes.com/india/top-doctors-call-for-fresh-ser...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Sep 2020 - 4:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

औरंगाबाद शहरात १० ते १६ ऑगष्ट दरम्यान करण्यात आला. शहरातील जवळ जवळ सर्व ११५ वॉर्डमधे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. सर्वेक्षणासाठी लोकसंखेच्या प्रमाणात नमुने घेण्यात आले होते या सर्वेक्षणात १० ते १७ वयोगटातील मुलांचाही समावेश करण्यात आला होता. औरंगाबाद शहरात केवळ ११. ८१ टक्केच लोकांमधे करोनाविरोधी अँटिबॉडीज आढळून आल्या होत्या. झोपडपट्टी लोकसंखेच्या परिसरात हेच प्रमाण १४.५६ टक्के, सिल्लेखाना-नुतन कॉलनी परिसर (मुस्लीम लोकसंख्या अधिक- ही माझी माहिती भर)६३.३ टक्के, तर सर्वात कमी निझामगंज संजयनगर परिसरात ३९. ४ टक्के अँटीबॉडिज आढळल्या. जय विश्वभारती, कॉलनी, विश्वासनगर, जवाहर कॉलनी, शास्त्री नगर, संत ज्ञानेश्वर नगर, जटवाडा परिसरात शुन्य टक्के अँटीबॉडीज आढळल्या.

(विदा संदर्भ- औरंगाबाद जिल्हाधिकारी यांच्या संकेतस्थळावरुन साभार)

''सर्वेक्षण संपूर्ण शहराचे प्रतिनिधित्व करणारे असल्यामुळे कोवीड रोगाचे सामाजिक संक्रमण होत आहे त्यामुळे सार्वजनिक आरोग्य उपाय म्हणून लॉकडाऊनसारख्या उपायांचा फारसा उपयोग होणार नाही, मात्र मास्कर वापरणे, वारंवार साबण-पाण्याने हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे, या उपायांची कडक अंमलबजावणी आवश्यक आहे, काही ठिकाणी काही लोकांमधे कोवीडविरोधी प्रतिद्रव्ये आढळून आली तरी शहरवासियांनी गाफील राहून चालणार नाही'' - सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी औरंगाबाद.

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

11 Sep 2020 - 5:44 pm | माहितगार

बिरुटे सर औरंगाबादच्या सेरोसर्वे माहितीबाबत अनेक आभार. आपण उपलब्ध केलेल्या दुव्यात सँपल साईजची माहिती दिसत नाही पण बहुधा पुरेसा पद्धतशीरपणा असावा असे दिसते. पुण्याच्या सेरोसर्वेत घरांच्या स्क्वेअरफुटची माहिती होती तसेच झोपडपट्टीतील सार्वजनिक शौचालय वापरणार्‍यांचे प्रमाण वेगळे मोजले गेले आणि सार्वजनिक शौचालय वापरकरणार्‍यात होकारात्मक प्रमाण अधिक आढळले होते.

औरंगाबादेत झोपडपट्टी प्रभागात सेरोसर्वे होकारात्मकतेचे प्रमाण बरेच कमी राहीले असेल तर एक शक्यता झोपडपट्ट्यांमध्ये स्वतंत्र्य शौचालयांचे प्रमाण बरे राहिले असण्याची शक्यता असू शकते. शिवाय मी औरंगाबाद बाबत मागे वाचलेल्या वृत्तावरून औरंगाबाद जिल्हाधिकार्‍यांनी सुपरस्प्रेडर म्हणजे दुकानदार वगैरेंच्या चाचण्यांवर अधिक भर दिला आणि ज्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह होते त्यांनाच दुकाने चालू करू देण्याची परवानगी दिली असे वाचनात आले होते अर्थात हे बातमीत किती होते आणि प्रत्यक्षात किती हे आपल्यासारखे स्थानिक रहिवासी सांगू शकतील पण हे खरे असेल आणि त्याचा फायदा साथ प्रसारावर कंट्रोल येऊन झाला असेल तर तो औरंगाबाद प्रशासनाचा कौतुकास्पद निर्णय म्हणवता येईल.

पुणे औरंगाबाद आणि मुंबई अशी तुलना केली तर अजून एक विचार आला तो म्हणजे पुण्यातील नागरीकांकडे व्यक्तिगत वाहनसुविधा सर्वाधिक आहे. मुंबईत लोकल नसेल तर व्यक्तिगत वाहन व्यवस्था खुपच कमी आहे. तसेच औरंगाबादमध्येही एका परिसरातून दुसर्‍या लांबच्या परिसरात जाण्याचे सार्वजनिक रिक्षा पर्याय पुरेसे आकर्षक नसल्याने त्याचाही औरंगाबादकरांना जरासा फायदा झाला का माहीत नाही. खरे म्हणजे अंतर्गत प्रवासाच्या प्रमाणाची तुलना एका पाकीस्तानी विश्लेषणात आली आहे ती ही की भारतीयांपेक्षा पाकीस्तानींचे देशांतर्गत प्रवासाचे प्रमाण खूप कमी असल्याने त्यांचे प्रमाण भारतापेक्षा कमी असावे अशी एक शक्यता वर्तवली गेली आहे.

*

औरंगाबाद शहरात केवळ ११. ८१ टक्केच लोकांमधे करोनाविरोधी अँटिबॉडीज आढळून आल्या होत्या,

शहरातील काही परिसर सेरोसर्वेत शुन्यटक्के आल्याने शहराची टक्केवारी कमी दिसते. पण पाच प्रभागात प्रमाण ३९ टक्क्यांपेक्षा अधिक दिसते ती बरीच आहे. आपण सिल्लेखाना-नुतन कॉलनी परिसराचा ६३.३% उल्लेख केला -पुण्यातही भवानीपेठेत मुस्लिमपरिसरातून प्रमाण अधिक राहीले असावे- सिल्लेखाना-नुतन कॉलनी परिसरात स्वतंत्र शौचालयांचे कमी प्रमाण/ घरांचे लहान आकारमान (लोक्संख्या घनता) / प्रार्थनास्थळांचा सार्वत्रिक वापरचालू ठेवला / किंवा बाजारहाट करताना किमान अंतर आणि मास्कची दक्षता घेतली नाही या पैकी एक कारण राहीले असू शकावे कोणते अ‍ॅप्लिकेबल ते स्थानिकांनाच सांगता येईल.

म्हाडा कॉलनीतील घरांचे आकारमान सर्वसाधारण लहान असते लोक्संख्या घनता अधिक असते.

एनिवे काही प्रभागांचा अपवाद सोडता औरंगाबादकरांचे पॉझीटीव्हीटी रेशो कमी ठेवता आल्या बद्दल अभिनंदन करावयास हवे, अर्थात असेच सातत्य एखादी लस उपलब्ध होईपर्यंत अजून वर्षभर औरंगाबादकरांनी दाखवले तर त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल,

माहितगार's picture

11 Sep 2020 - 5:47 pm | माहितगार

पुणेरी व बेंगलोरी मध्यमवर्गीयात परदेशातून येणार्‍या पाहुण्यांचे प्रमाण खूपमोठे आहे तोही पुणे आणि इतर शहरामध्ये फरक असावा