आहारशास्त्रातील काही प्रश्न

Prajakta२१'s picture
Prajakta२१ in काथ्याकूट
16 May 2020 - 9:35 pm
गाभा: 

आहारशास्त्रातील काही प्रश्न
मागेही intermittant फास्टिंग च्या धाग्यावर विचारले होते पण उत्तर न मिळाल्याने नवीन धागा
काही प्रश्न मांडतीये कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे हि विनंती
तसेच बाकीच्यांनी हि काही प्रश्न असल्यास मांडावे धन्यवाद
१. सध्या कोलेस्टेरॉल ओमेगा ३ फॅटी ऍसिडस् ह्याबद्दल फार सगळीकडे चर्चा चालू असते ह्या तेलात जास्त ह्या तेलात कमी वगैरे
तुपाची फोडणी वापरल्याने जास्त फायदा होऊ शकतो का ?
कारण बरयाचदा आपण पदार्थांवर तूप वाढून घेतो त्याने तेल तूप हे दुप्पट पोटात जाते असे वाटते तर तुपाच्या फोडणीत पदार्थ केले तर तेल वापरायचे टाळून
तुपाचा आरोग्याला जास्त फायदा होईल का ?(साजूक किंवा गाईचे. म्हशीचे तूप अपेक्षित नाहीये तसेच विकत मिळणारे तूप किती शुद्ध असते कोण जाणे)
(ज्याला परवडेल त्याने)
२. दलिया हे धान्य गव्हांपासूनच बनलेले असते तर मुगाच्या डाळीची खिचडी करताना डाळ तांदुळाची पचायला हलकी का दलिया मुगाची हलकी होईल?
नेटवर बऱ्याच ठिकाणी दलिया तांदुळाला substitute वापरा असे सल्ले दिले आहेत पण माझ्या पूर्वीच्या जिम च्या मॅडमचे म्हणणे होते कि दलिया पौष्टिक असतो त्यामुळे वजन वाढायचे chances. तर दलिया वापरावा कि साधा तांदूळ ?(सध्या तांदळाच्या भाताने/खिचडीने जी पोट भरल्याची फीलिंग येते ती दलियाने येत नाही).
आधुनिक मताने भाताने वजन वाढते तर आयुर्वेदाप्रमाणे तांदूळ पचायला हलका आहे तर ह्यातले काय ग्राह्य मानावे ?
३. तांदूळ/साबुदाणा इ. भाजून घेतले तर त्यातल्या calories कमी होतील का?
४. विरुद्ध पदार्थ दही-गूळ,दही-फळे खाऊ नयेत असे आयुर्वेदाचे मत आहे पण आपण फ्रुट सलाड आणि शेव पुरी दही पुरी आवडीने खातो त्यात हे विरुद्ध पदार्थ एकत्र केलेले असतात (spdp त दही आणि चिंचेचे पाणी-त्यात गूळ असतो) असे अनेक विरुद्ध पदार्थ एकत्र केलेले आढळतील तर त्यात इतर घटकांमुळे (मीठ, चाट मसाला ,शेव ,साखर ) त्याची हानीकारकता कमी होते का?
५. आंबवलेले पदार्थ प्रोटीन च्या दृष्टीने चांगले (आणि बौद्धिक कामात पण -परीक्षेच्या काळात आम्हाला आमच्या शास्त्राच्या शिक्षिका fermented फूड खा असे सांगायच्या अनेकवेळा ) असे आधुनिक आहारशास्त्र सांगते पण आयुर्वेदात आंबवलेल्या पदार्थांना विरोध आढळून येतो असे का ?
उदा. इडली,दही
६. हळदी चे दूध बनवताना अनेक ठिकाणी ते चहासारखे बनवायला सांगतात (दूध गरम करायला ठेवलेले असतानांच त्यात हळद घालून थोडे उकळवायचे)आपल्या पारंपरिक पद्धतीप्रमाणे आपण ते कपात/ग्लासात हळद घालून घेतो
ह्यातले जास्त effective कुठले?

आभार आणि धन्यवाद

प्रतिक्रिया

शरीरातले पोटाचे अवयव तोंडातून चमचमीत म्हणून ढकलेल्या अन्नपदार्थांकडे फक्त अन्न म्हणून पाहात असते. म्हणजे त्यात हवे असलेले पोषणमूल्य आता किती गरजेचे आहे ते.
यापलिकडे आम्हाला आवडते आणि परवडते म्हणून खातो त्यास काही अर्थ नाही ते नंतर लक्षात येते.
पंधरा रु किलोचा तांदूळ आणि अडिचशे रु किलोच्या तांदूळात पोषणमुल्य तेवढेच असते. पण हातसडीचा आणि कोंडा न काढलेल्या तांदुळात जीवनसत्त्वे अधिक असतात. पण आता तो मिळत नाही. मैद्याचेही तेच.
कित्येक बाळांच्या नशीबाय लहानपणी भरपूर सकस अन्न खाण्याचे नशीबात असते. मोठेपणी तीच मुले अन्नाचा चौकसपणा करताना दिसतात.शरीराची वाढ होण्याच्या वयात (१८)चांगले अन्न पोटात गेल्याने नंतर माफक अन्नाची गरज असते.

कुमार१'s picture

17 May 2020 - 9:50 am | कुमार१

तेल व तुपामध्ये जी fatty acids (FA) असतात ती ३ प्रकारची असतात:

१. SFA = सफा
२. MUFA = मुफा
३. PUFA = पुफा

पोषणासाठी सुयोग्य गरज म्हणजे, वरील तिन्ही घटक आहारात १:१:१ अशा समप्रमाणात असावेत.

तुपात ‘सफा’
चे प्रमाण बरेच जास्त असते याउलट तेलात मुफा व पुफाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे तेल व तूप हे दोन्ही आहारात असावेत. त्याचा समतोल असा साधता येईल :

१. ज्या जेवणात तेलाच्या फोडणीचा पदार्थ असेल, तेव्हा पानात वरून तूप घ्यायचे नाही.
२. जेव्हा तेलयुक्त पदार्थ खाण्यात नसेल, त्यावेळी चमचाभर तूप खायचे.

मी असेच करतो.

चौकटराजा's picture

17 May 2020 - 10:24 am | चौकटराजा

सोयाबीन ,सन्फ्लावर, राईस ब्रान ,वनस्पती तूप व साजुक तूप या पाचाचा मेळ घालून आहार.

मी जाणकार नाही मात्र स्वानुभवातून काही प्रश्नांची उत्तरे देऊ इच्छितो. ही सगळ्यांना तशीच्या तशी लागू होतील असे नाही. कोणताही पदार्थ खाल्यामुळे आपल्या शरीरावर काय परीणाम होतो ह्याचे ज्याने त्याने निरीक्षण करावे. सध्या करोनामुळे सगळेजण घरात बसले आहेत. खरे तर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने विविध प्रयोग करायला आपल्याला धकाधकीच्या जीवनात वेळ मिळत नाही. निसर्गाने आपल्याला तो वेळ दिला होता मात्र बहुसंख्य जनतेने तो टाईमपास करुन फुकट घालवला. असो ! '

सगळ्यात पहिले आपली दिनचर्येत बदल करणे आवश्यक आहे. खरे तर आपला दिवस रात्रीपासून सुरु होतो. आपण रात्री उशीरात उशीरा १०.३० पर्यंत झोपायला जाणे आवश्यक आहे. मात्र बरेचशी जनता रात्री १२-१ पर्यंत जागून काहीना काही मनोरंजन करण्यात गुंतलेली असते हे सर्वथा चूक आहे. हे माझ्या घरात देखील चालू आहे. मी घरातल्यांना एक सूचना केली आहे. ती म्हणजे तुम्हाला जर मनोरंजनासाठी दिवस पुरत नसेल तर आज रात्री १०.३० ला झोपा. हवे तर तुम्हाला दुसर्‍या दिवशी सकाळी ५ वाजता उठवतो. तुम्ही सगळे काम आवरुन लवकर मनोरंजन करायला बसा.

माझ्या स्वत:च्या बाबतीत मला तेलापेक्षा तुपाचा जास्त फायदा झालेला आढळला आहे. बरेच लोक जाहीरातीला भूलून महागडी तेले खरेदी करतात. मात्र त्यात फारसा अर्थ नाही. ९० रुपयावाले सुर्यफुलाचे तेल आणि १५० रुपयावाले तेल यात गुणात्मक फरक आढळत नाही. चपातीमधून बरेचसे तेल आपल्या शरीरात जात असते. काही डाळी / भाज्यांना तुपाची फोडणी देऊन त्यांचा आहारात समावेश करुन बघा. सुर्यफूल, शेंगदाणा तेल, राईस ब्रान अशी वेगवेगळी तेल वापरुन पहा. मात्र ती एकत्र करुन वापरु नका. समजा तुम्हाला एक लीटर तेलाची पिशवी आठ दिवस जाते तर एकदा सुर्यफूल, एकदा राईस ब्रान असे वापरत चला.

दलिया / मुगाच्या डाळीची खिचडी

आपल्या रोजच्या आहारात गहू मोठ्या प्रमाणात शरीरात जात असतात मात्र आपण घरात जी नेहमीची डाळ बनवतो त्यात पाणी जास्त असते त्यामुळे अधून मधून मुगाच्या डाळीची खिचडी जास्त चांगली आहे. ही खिचडी बनविताना डाळिचे प्रमाण जास्त आणि भाताचे प्रमाण कमी असावे.

तांदूळ

तांदूळाने वजन वाढते की नाही ह्याचा अनुभव नाही मात्र रक्तशर्करा नक्कीच वाढते. भात बनविण्याची योग्य पद्धत म्हणजे तो कुकर मधे न शिजविता जुन्या पद्धतीप्रमाणे आचेवर शिजवावा. थोडा शिजल्यावर त्यातील पाणी काढून टाकावे. या पद्धतीने बनविलेला भात आरोग्यास चांगला आहे. रक्तशर्करा जास्त प्रमाणात वाढत नाही. वर कंजूस साहेबांनी तांदूळाबाबत केलेले विधान अगदी सत्य आहे. त्यामुळे महागडा तांदूळ म्हणजे भारी असे अजिबात समजू नये. उलट मी आहाराचे प्रयोग करायला लागल्यापासून जितका स्वस्तातला तांदूळ (अगदी रेशनवाला) पण खायला शिकलो आहे. प्रयोगाचा एक भाग म्हणून तांबडा तांदूळ वगैरे पण खाऊन पाहिला मात्र जे प्रयोगशाळेत सिद्ध होते ते आपल्या शरीरात सिद्ध होतेच असे नाही. त्यामुळे तांदूळ कोणताही खा मात्र तो कुकर मधे बनविलेला नसावा हे जास्त बरोबर आहे.

३. तांदूळ/साबुदाणा इ. भाजून घेतले तर त्यातल्या calories कमी होतील का?

अनुभव नाही.

आंबवलेले पदार्थ

कोणताही पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ला तर आरोग्यास वाईटच. आंबविलेले पदार्थ त्याला अपवाद नाहीत. मात्र आठवड्यातून एकदा आंबविलेले पदार्थ खाणे योग्य आहे. मात्र त्याच्या रतीब लाऊ नका.

फ्रुट सलाड आणि शेव पुरी

शेवपुरीत किती आरोग्यदायी पदार्थ असतात त्याचा स्वत:च ताळेबंद मांडून तुम्ही या प्रश्नाचे उत्तर मिळवू शकता. बाहेरचे खाणे आरोग्यदायी असेलच असे नाही. फळे आणि भाज्या त्या त्या मोसमात मिळणार्‍या खाव्यात. एकापेक्षा जास्त प्रकारची फळे एकत्र करुन खाऊ नये. प्रत्येक फळाचे वेगवेगळे गुणधर्म असतात. ते एकत्र करुन खाल्यामुळे सगळ्यांचा फायदा मिळत नाही. मात्र सगळ्यांचे तोटे जरुर मिळतात.

हळदी चे दूध

दूध गरम करुन मग त्यात नंतर हळद घालून पिणे जास्त संयुक्तिक आहे.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दिवसभर चरणे सोडा. तुम्हाला जे काही खायचे ते दिवसातून २-३ वेळा (त्यापेक्षा जास्त वेळा नाही) खाल्ले तर त्याचे जास्त फायदे होतात. दर २-२ तासांनी काही ना काही खाणे म्हणजे अनारोग्याला निमंत्रण देणे आहे.
अधूनमधून उपवास करणे चांगलेच मात्र त्यापेक्षा जमत असेल तर साखर आणि साखरेचे पदार्थ सोडा / कमीत कमी खा.
तुमच्या आयुष्यातील आरोग्यविषयक चिंता कमीतकमी ५०% तरी आपोआपच संपून जातील. साखर प्राणापेक्षा प्रिय असेल तर बाकी काहीही केले तरी घुम फिर के तिथेच याल.

धन्यवाद !

माहितगार's picture

17 May 2020 - 1:41 pm | माहितगार

प्र. १ कुमार यांचे मत ते जाणकार असल्याने अवश्यंभावी सयुक्तीक .

प्र. २ ज्यांच्या आहारात गहु आहेत त्यांनी तांदळाची खिचडी बदल म्हणून स्विकारावी हा पॉईंट बरोबर वाटतो.

प्र. ३ भाजण्याच्या प्रक्रीयेत पाण्याचे प्रमाणे तात्पुरते कमी होईल , फारतर अधिक किंवा कमी शिजणे असे काही होईल पण कॅलरीज मध्ये फरक पडण्याचे कारण वाटत नाही. अर्थात अन्न विषयक प्रयोगशाळेतील तज्ञांची मते काही वेगळी असल्यास कल्पना नाही पण तज्ञांची मते उपलब्ध नसताना कॅलरीज तेवढ्याच राहतील असे समजून चालणे कॅलरी विषयक निर्णय घेताना अधिक सयुक्तीक असेल असे माझे व्यक्तीगत मत.

प्र. ६ हलक्या गरम दुधात (९५ डिग्री पर्यंत गरम केलेल्या दुधात) उकळात ठेवलेल्या दुधापेक्षा ब१२ जिवनसत्व अधिक टिकून असेल.

अर्थात हळद अधिक काळ उकळत ठेवल्यास रासायनिक प्रक्रीयांचे नेमके स्वरुप काय असेल आणि वैज्ञानिक पद्धतीने जसे अ‍ॅलोपॅथीत औषधांचा अभ्यास जसा तावून सुलाखून होतो तसा दुर्दैवाने ट्रॅडीशनल पॅथीत होत नाही ही अल्टरनेटीव्ह मेडीसिन मधली उणीव भरुन काढली जाण्यास फार मोठा वाव असावा.

अर्थात हळदीचे स्रोत आणि स्थिती जिवाणू वीषाणूंबाबत खात्रीची नसेल तर जरासे उकळून घेणे अधिक सुरक्षीत असावे असा कयास ( चुभूदेघे)

प्र. ४ प्र. ५ एखाद्या खूप अनुभवी पण भोंगळ व्यक्तीची कल्पना करा मग आयुर्वेदाची कल्पना करा. आयुर्वेदाकडे अनुभव असला तरी आयुर्वेद स्वतच्या अनुभवांचा पुरेशा वैज्ञानिक अभ्यासूपद्धतीने शास्त्रीयपद्धतीने निरीक्षणे करण्यात अ‍ॅलोपॅथी आणि एकुणच आधुनिक विज्ञानाच्या हकनाक मागे पडते. हकनाक यासाठी की आमचा असा विश्वास आहे या दुराग्रहावरील आणि पुस्तक आणि पोपटपंची पुजेवरील भर.

आंबवण्याच्या प्रक्रीयांच्या परिणामी अ‍ॅसिडीक प्रमाणाचा आधुनिक आहारशास्त्राच्या अनुषंगाने विचार करण्यास आणि व्यक्तीपरत्वे नियोजन करण्यास हरकत नसावी पण केवळ आंबवण्याच्या काही प्रक्रीयात बॅक्टेरीया असतात म्हणून आंबलेले पदार्थ नाकारणे सयुक्तीक नसावे. जर इडली दोसादी पदार्थ भरपूर सांबार सोबत खाल्ले तर त्यात प्रोटीन्सचा अंश अधिक जातो आणि आंबवलेला पदार्थ-अंश कमीच असेल .

आयुर्वेदीय थंड गरम आणि तथाकथीत विरोधी पदार्थ हा तद्दन आधारहीन भोंगळपणा वाटतो. आयुर्वेदाने अ‍ॅलर्जी हा प्रकाराचे प्रभाव कधी नीटसे विचारात घेतले असतील या बाबत साशंकता वाटते. बरेचसे आयुर्वेदीय आणि भारतीय आहार विषयक टाबू मूलतः कुणालातरी अ‍ॅलर्जी झाली किंवा व्यक्तीगत आवडी निवडीला व्यक्तीगत वाटू नये म्हणून खोटे नाटे कारण जोडायचे आणि एकाने घातलेली भिती दुसर्‍याने पुढे न्यायची त्याची कधी तरी आयुर्वेदाने दखल घेऊन त्याचीच री ओढत रहायचे. आयुर्वेदाच्या अनुभवाबद्दल आदर ठेऊन प्रामाणिक प्रयत्नांबद्दलची साशंकता कमी होत नाही. नाही तर आता पर्यंत आयुर्वेद नाही आमच्या १०० समजुतींपैकी अमुक अमुक ४ समजूती चुकीच्या होत्या त्या आम्ही सुधारल्या म्हणून पुढे आले असते. तसे होत असल्यास किमान एक सर्वसामान्य नागरीक म्हणून माझ्या पर्यंत आलेले नाही.

आयुर्वेदाचार्यांनी नकार घंटा वाजवलेली बरीच थंड-गरम पित्त-कफ कारक तथाकथीत विरोधी बरेच पदार्थ मी बिन दिक्कत खात आलो आहे. माझ्यापुढे वैज्ञानिक प्रयोगाधारीत अभ्यास आल्यास मी ते स्विकारेन अन्यथा नाही. (मी आयुर्वेद आणि घरगुती औषधींना पुर्ण त्याज्य मानतो असे नाही. मला ज्या औषधींचा लाभ झाला आहे त्या वापरत असतो अर्थात इतर पथ्यपाण्यासाठी अ‍ॅलोपॅथीला त्याच्या प्रयोगशीलतेतील अधिक प्रामाणिकपणामुळे अधिक प्रमाण मानतो असो.

(चुभूदेघे. मी विषय जाणकार नाही उत्तरदायीत्वास नकार लागू)

धर्मराजमुटके's picture

17 May 2020 - 2:28 pm | धर्मराजमुटके

आयुर्वेदाने अ‍ॅलर्जी हा प्रकाराचे प्रभाव कधी नीटसे विचारात घेतले असतील या बाबत साशंकता वाटते.

ह्या विधानाशी असहमत आहे. माझ्या मुलाच्या आजारात मी अनेक अ‍ॅलोपॅथीक डॉक्टरांचे उपचार घेतले मात्र त्याने फरक पडला नाही. मात्र एका आयुर्वेदीक डॉक्टरांनी त्याच्या अ‍ॅलर्जीचे नेमके निदान केले व त्याप्रमाणे आहार सुचविला. यामुळे आज त्याला होणारा त्रास कित्येकपटीने आवाक्यात आला आहे.

माहितगार's picture

17 May 2020 - 3:29 pm | माहितगार

साबजी, मॉडर्न मेडिसीन (डॉ. कुमारांनी सुचवलेला शब्द, ह्या शब्दाचा इतर पॅथी मिसयूज करणार नाहीत याची अजून शाश्वती वाटत नाही.)

तर साबजी, मॉडर्न मेडिसीन टेस्ट लॅबकडे ब्लड सँपल घेऊन नेमक्या अ‍ॅलर्जी कन्फर्म करु शकते. अँटी अ‍ॅलर्जी मेडीकेशन पुरवते -जे सुस्पष्ट शास्त्रीय प्रायोगिक चाचण्यातून बाहेर पडते आणि साईड इफेक्ट असतील तर सांगण्याची प्रामाणिकता दाखवते.

जुन्या काळात एखाद्या व्यक्तीला डायबेटीस आहे तर कळण्याचा मार्ग नव्हता. त्याने अंब्याचा रस आणि अती गोड खाऊन आजारी पडला पण ते वैद्याला कळलेच नाही तर तो त्या दिवशी खाल्लेली कार्ल्याची भाजी बाधली असा चुकीचा निष्कर्ष बांधू शकत होता (कारली गृहीत उदाहरण म्हणून). साखर अंब्याचा रस असो अथवा मध वा कारली प्रत्येक पदार्थ हजार लोकांना देऊन पाहीला आणि हजार लोकांना दिला नाही आणि मग त्यांच्या नोंदी घेतल्या या शास्त्रीय पद्धतीचा अभाव होता आहे. मध चांगला म्हणजे चांगला त्याला ब्लडशुगर लेव्हल काय पण असली तरी चांगलाच हा आंधळा व्यवहार झाला. आणि असे बरेच आयुर्वेदातील असे बरेच व्यवहार अद्यापी आंधळे आणि अथवा भोंगळ आहेत.

विरोधी पदार्थ काय असते? मी सर्व तथाकथीत विरोधी पदार्थांची मिश्रणे खातो आणि ठणठणीत असतो. आहारा मध्ये असंख्य प्रक्रीया आणि मिश्रणे होत असतात, त्यांचा आधूनिक रसायनशास्त्र आणि आहारशास्त्रीय कितपत अभ्यास आयुर्वेदाने पार पाडला आहे आपल्या पुर्वीच्या गृहीतकातल्या किती उणीवा आता पर्यंत मोकळेपणाने स्विकारल्या आहेत? दोन चार न झेपलेल्यांचा अनुभव घेऊन अथवा चुकीचा निष्कर्ष जोडून त्याला प्रमाणभूत मानून मार्गदर्शन ही काही आदर्श व्य्वस्था नव्हे किंवा कसे .

तर साबजी, मॉडर्न मेडिसीन टेस्ट लॅबकडे ब्लड सँपल घेऊन नेमक्या अ‍ॅलर्जी कन्फर्म करु शकते. अँटी अ‍ॅलर्जी मेडीकेशन पुरवते -जे सुस्पष्ट शास्त्रीय प्रायोगिक चाचण्यातून बाहेर पडते आणि साईड इफेक्ट असतील तर सांगण्याची प्रामाणिकता दाखवते.

मला वाटते हे अ‍ॅलोपॅथी च्या डॉक्टरांनी सुचवायला हवे होते. मी गेलेल्या सगळ्याच्या सगळ्या डॉक्टरांनी केवळ तात्पुरता दिलासा मिळेल अशीच औषधे दिली. मात्र मुळापर्यंत जाण्याची कोणतीही तसदी घेतली नाही किंवा काय खाऊ नये हे देखील सुचविले नाही. मी हा निर्णय आंतरजालावर सल्ला / माहिती घेऊन करावा असे माझ्या मनात आले नाही. दर पंधरा दिवसांनी डॉ़क्टरांची फी आणि दर आठवड्याला वेगवेगळी औषधे घेऊन मुलगा कंटाळला होता. त्यामुळेच मी आयुर्वेदाचा मार्ग धरला. मी ज्या आयुर्वेदीक डॉक्टरांचा सल्ला घेतला त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगीतले की आयुर्वेदातली सुचविलेली औषधे ही तुमची व्याधी बळावू नयेत म्हणून आहेत. मात्र तुम्हाला मुळातून बरे व्हायचे असेल तर तुम्ही तुमचा आहार विहार नीट ठेवलाच पाहिजे. हे तत्त्व मला मनापासून पटले आणि ते जास्तीत जास्त आचरणात आणण्याचा माझा प्रयत्न असतो.

अर्थात आयुर्वेद ग्रेट आणि अ‍ॅलोपॅथी वाईट असा माझा दृष्टीकोन नाही.

कुमार१'s picture

17 May 2020 - 2:43 pm | कुमार१

या धाग्याच्या निमित्ताने सर्वांना एक विनंती, की 'allopathy' हा कालबाह्य आणि अशास्त्रीय शब्द न वापरता त्याला 'आधुनिक वैद्यक '(Modern Medicine) च म्हणावे .

संजय क्षीरसागर's picture

17 May 2020 - 2:48 pm | संजय क्षीरसागर

१. भूक लागल्याशिवाय काहीही खाऊ नका

२. भूक लागली का हे घडयाळाकडे पाहून ठरवू नका. खरी भूक तुम्हाला जेवणाशिवाय काहीही सुचू देणार नाही.

३. दिवसात एकदाच जेवायची गरज आहे.

४. सकाळी भूक लागली तर आवडेल तो ब्रेकफस्ट करा.

५. अन्नपदार्थांचं विश्लेषण > कॅलरीज, प्रोटीन्स, कोलॅस्टरॉल .... आणि कायकाय, अजिबात करु नका. माणूस सोडता कोणताही सजीव ते करत नाही.

कायम चवीनं आणि स्वादानं खा, त्यामुळे तृप्ती येईल आणि ते शरीराला श्रेयस होईल.

६. गेल्या कित्येक वर्षांचा हा अनुभव आहे.

७. उत्साह हा फिटनेसचा खरा क्रायटेरिया आहे आणि वय न जाणवणं हे शरीरस्वास्थाचं लक्षण आहे.

आयर्नमॅन's picture

20 May 2020 - 3:09 pm | आयर्नमॅन

उत्साह हा फिटनेसचा खरा क्रायटेरिया आहे आणि वय न जाणवणं हे शरीरस्वास्थाचं लक्षण आहे.

या उत्साहाचे करायचे काय ? मला उत्साहच नियंत्रण जमत नाही मग मी काय करावे ?

मी स्वतः फक्त एकवेळ आहार घेणे सुरू केले व मला अत्यंत फायदा झाला आता संध्याकाळी भूकच लागत नाही खाल्ले तर शरीराची सहजता कमी होते की काय असा अनुभव येतो पण तो मूळ प्रश्न नाही उत्साह टिकवून करायचे काय ?

संजय क्षीरसागर's picture

20 May 2020 - 8:11 pm | संजय क्षीरसागर

उत्साह हा सृजनाचा मूळ स्रोत आहे. त्यामुळे सतत काही तरी नवं शिकण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याच्या चांगल्या वाटलेल्या गोष्टींना मनःपूर्वक दाद द्या, हाच वृक्षासारखं बहरत जाण्याचा मार्ग आहे. इंटेलीजन्स आणि अॅस्थेटिक्स हे दोन जीवनाचे महत्तम पैलू आहेत.

स्वतःच्या कामात माहिरीयत हासिल करा, मग इतर गोष्टींसाठी फुर्सत उरते. आपल्या कामावर आपलं निःसिम प्रेम हवं. दिवसेंदिवस आपलं काम जास्त कौशल्यपूर्ण, सोपं आणि कमालीचं इफेक्टीव होत गेलं पाहिजे. उदा. सध्या मी बँकांचं रिमोट अॅक्सेस ऑडिट करतोयं. हजारो कोटींच्या व्यावहारातून नेमके व्यावहार निवडून, त्यांची छाननी करुन, ब्रांचच्या बॅलन्सशीट आणि पी अँड एलची वैधता ठरवायची. एकदम जबरदस्त काम आहे आणि कमालीची मजा येतेयं.

आणि वरचं सगळं चालू असतांना इथे एकसोएक आणि हटके विचार मांडायचे आणि पराकोटीच्या विरोधासमोर आपली चमक बर्करार ठेवायची. अर्थात, हे काल तुम्हाला करोनाचे साइड इफेक्टसवर लक्षात आलंच असेल !

आयर्नमॅन's picture

20 May 2020 - 8:25 pm | आयर्नमॅन

उत्साह हा सृजनाचा मूळ स्रोत आहे. त्यामुळे सतत काही तरी नवं शिकण्याचा प्रयत्न करा.

इतकं नवनविन करून झालंय किती आता all knowledge is related या तथ्यावर पोचलो आहे त्यामुळे learning curve उरला आहे का असा भ्रम तयार होतो

दुसऱ्याच्या चांगल्या वाटलेल्या गोष्टींना मनःपूर्वक दाद द्या, हाच वृक्षासारखं बहरत जाण्याचा मार्ग आहे.

मला एकतर्फीपणा पटत नाही मी सम्यकता जोपासना करतो वस्तुतः एखादी गोष्ट चांगली असेल तर मनमोकळी तारीफही करतो व पटली नसेल तर यथेच्छ शिव्या ही घालतो , पण लोकांना फक्त शिव्याच पोचतात की काय असा doubt येतो हो चांगलं बोलेल्याची हमखास माती केली जाते की काय कळत नाही

उदा. सध्या मी बँकांचं रिमोट अॅक्सेस ऑडिट करतोयं. हजारो कोटींच्या व्यावहारातून नेमके व्यावहार निवडून, त्यांची छाननी करुन, ब्रांचच्या बॅलन्सशीट आणि पी अँड एलची वैधता ठरवायची. एकदम जबरदस्त काम आहे आणि कमालीची मजा येतेयं.

तुम्ही हे करत असाल तर सध्या मी तुमच्या सारख्याना बेरोजगार बनवायचे काम करत आहे म्हटलं तर अतिशयोक्ती नाही एका मोठ्या JSON वर प्रोसेस करून लाखो रुपयांचे नियोजन कसे करायचे व कस्टरमर प्रोफाइल बघून त्याला रिलेटेड स्कीम सजेस्ट करायच्या असेच काहीसे कामाचे स्वरूप असलेला AI नुकताच तयार केला आणी ते काम करताना बघून मस्तही वाटत आहे तरी हा उत्साह काय माझा कमी होत नाही शेवटी वाढत जाऊन तो अति बनतो हो :(

आणि वरचं सगळं चालू असतांना इथे एकसोएक आणि हटके विचार मांडायचे आणि पराकोटीच्या विरोधासमोर आपली चमक बर्करार ठेवायची. अर्थात, हे काल तुम्हाला करोनाचे साइड इफेक्टसवर लक्षात आलंच असेल !

मीही काहीसे असेच करतो हो पण तुम्हाला हे मी सांगूनही लक्षात येईल का याची खात्री नाही...

उत्साह मावळतच नाही

संजय क्षीरसागर's picture

21 May 2020 - 12:26 am | संजय क्षीरसागर

याची चिंता कशापायी ? उत्साह तर कायम राहणारच. तो वापरायचा कसा हा प्रश्न आहे.

>इतकं नवनविन करून झालंय किती आता all knowledge is related या तथ्यावर पोचलो आहे त्यामुळे learning curve उरला आहे का असा भ्रम तयार होतो

अर्थात, ऑल नॉलेज इज इंटरलिटेड पण तो अस्तित्वाच्या स्ट्रक्चरींगचा गाभा आहे. तुम्ही संगीतचा अभ्यास करतांना अ‍ॅस्थेटिक्स येणारच. स्पोर्टस अ‍ॅक्टीविटीशी योगासनं, अलर्टनेस, प्राणायाम संगतीत आहेतच. त्यामुळे शिकण्याची उमेद वाढायला हवी. लर्नींग कर्व उतरणं असंभव आहे.

> मला एकतर्फीपणा पटत नाही मी सम्यकता जोपासना करतो वस्तुतः एखादी गोष्ट चांगली असेल तर मनमोकळी तारीफही करतो व पटली नसेल तर यथेच्छ शिव्या ही घालतो , पण लोकांना फक्त शिव्याच पोचतात की काय असा doubt येतो हो चांगलं बोलेल्याची हमखास माती केली जाते की काय कळत नाही

चांगल्या गोष्टींना दाद दिली तर ती दुसर्‍यापर्यंत पोहोचायलाच हवी कारण जाणीव एकसंध आहे. शिव्या घालण्यातून मात्र बखेडाच उद्भवतो, ते टाळायला हवं.

> तुम्ही हे करत असाल तर सध्या मी तुमच्या सारख्याना बेरोजगार बनवायचे काम करत आहे म्हटलं तर अतिशयोक्ती नाही.

मी सीए आहे आणि आम्हाला बेरोजगार करायला जगातली पैसा ही संकल्पना संपुष्टात यायला हवी. त्यामुळे तुम्ही तुमचा प्रोजेक्ट आनंदानं करत रहा.

> मीही काहीसे असेच करतो हो पण तुम्हाला हे मी सांगूनही लक्षात येईल का याची खात्री नाही.

तुमचं लेखन तुम्ही नक्की काय करता याची साक्ष असतं, तस्मात तुमच्या स्वतंत्र लेखनावरुन त्याची खात्री पटेलच > सुरु करा.

> उत्साह मावळतच नाही

जीवनातला सर्वोच्च आणि कमालीच्या हुशार व्यक्तीचा अल्टिमेट पर्याय अध्यात्म आहे. एकदा त्यात प्रवेश केला की प्रत्येक उत्साहाचं उधाण स्वरुपाचं नवं दालन उघडतं > इच्छा असेल तर ओशोंच्या " बुक ऑफ सिक्रेटस " या महान ग्रंथापासून सुरुवात करा.

आयर्नमॅन's picture

21 May 2020 - 10:49 am | आयर्नमॅन

अर्थात, ऑल नॉलेज इज इंटरलिटेड पण तो अस्तित्वाच्या स्ट्रक्चरींगचा गाभा आहे. तुम्ही संगीतचा अभ्यास करतांना अ‍ॅस्थेटिक्स येणारच. स्पोर्टस अ‍ॅक्टीविटीशी योगासनं, अलर्टनेस, प्राणायाम संगतीत आहेतच. त्यामुळे शिकण्याची उमेद वाढायला हवी. लर्नींग कर्व उतरणं असंभव आहे.

कमी उत्साही लोकांना आपण म्हणता ते 200% लागू पडते माझा उत्साह जास्त आहे

चांगल्या गोष्टींना दाद दिली तर ती दुसर्‍यापर्यंत पोहोचायलाच हवी कारण जाणीव एकसंध आहे. शिव्या घालण्यातून मात्र बखेडाच उद्भवतो, ते टाळायला हवं.

शिव्या घालण्यातून न्हवे तर मिळालेल्या शिव्या स्वीकारायच्या कशा याचे अज्ञान असल्याने बखेडे तयार होतात, शिव्या काय मनातल्या मनातही दिल्या जातीलच व पण अशावेळी अंतर्विरोध तयार होईल व जग ही बाब अत्यन्त उथळ बनेल

मी सीए आहे आणि आम्हाला बेरोजगार करायला जगातली पैसा ही संकल्पना संपुष्टात यायला हवी. त्यामुळे तुम्ही तुमचा प्रोजेक्ट आनंदानं करत रहा.

तुम्ही MA जरी असला तरी पैसा ही संकल्पना बदलत आहेच व तंत्रज्ञानही कमालीचे सुधारत आहे त्यामुळे CA ऑडिट AI सारखी निर्जीव गोष्ट लीलया करू शकते हे आज ना उद्या जगाला स्वीकारावे लागेलच. राहिला प्रश्न तुम्हाला हेच समजावण्याचा तर एक काम करा तुम्ही जे काही काम करत होता असे वर चर्चेत लिहले आहे ते एका सेपरेट धाग्यावर विस्तृतपणे लिहा तिथेच मी तेच काम करणारा AI जो मी उत्साहाच्या भरात स्वतः तयार करेन तो ही प्रदर्शित करेन... म्हणजे आपणास नक्की समजेल की मानवी बुद्धी कितीतरी फडतूस बाबी इंटेलिजन्स म्हणून पकडून असते ते पण खरा इंटेलिजन्स ज्याला म्हणावे त्याची चुणूकही बहुतांश लोक अनुभवत नाहीत

तुमचं लेखन तुम्ही नक्की काय करता याची साक्ष असतं, तस्मात तुमच्या स्वतंत्र लेखनावरुन त्याची खात्री पटेलच > सुरु करा.

चूक तुमचे लेखन तुमचे कल्पनाविश्व काय आहे याची चुणूक असते तुम्ही काय आहात ते तुम्ही इतरांच्या लेखनाला मताला सामोरे कसे जाता यावर ठरते

संजय क्षीरसागर's picture

21 May 2020 - 8:26 pm | संजय क्षीरसागर

> कमी उत्साही लोकांना आपण म्हणता ते 200% लागू पडते माझा उत्साह जास्त आहे

उत्साहामुळे तुमच्या जीवनात नक्की काय प्रश्न येतायंत ?

> शिव्या घालण्यातून न्हवे तर मिळालेल्या शिव्या स्वीकारायच्या कशा याचे अज्ञान असल्याने बखेडे तयार होतात.

> समाजात रहायचं असेल तर शिव्या न देता बोलण्याची सवय ही सभ्यता आहे.

> CA ऑडिट AI सारखी निर्जीव गोष्ट लीलया करू शकते हे आज ना उद्या जगाला स्वीकारावे लागेलच

तुमच्या प्रणालीला सीएची परिक्षा उत्तीर्ण व्हायला लागेल > करा प्रयत्न

> चूक तुमचे लेखन तुमचे कल्पनाविश्व काय आहे याची चुणूक असते तुम्ही काय आहात ते तुम्ही इतरांच्या लेखनाला मताला सामोरे कसे जाता यावर ठरते

तुमच्या इथल्या प्रोफाईलवरुन त्याची झलक मिळते.

इतरांच्या विरोधी मतांविरुद्ध तुम्ही किती सभ्यतेनं प्रतिवाद करता यावरुन व्यक्तिमत्त्वाची घडण कळते आणि तुमच्या लेखनावरुन तुमच्या व्यासंगाची झलक मिळते. अर्थात, व्यक्ती तद्दन असेल आणि लेखनातून सुद्धा केवळ कल्पनेच्या भरार्‍याच मारत असेल तर विमान कोसळायला फारसा अवधी लागत नाही.

इतरांच्या विरोधी मतांविरुद्ध तुम्ही किती सभ्यतेनं प्रतिवाद करता यावरुन व्यक्तिमत्त्वाची घडण कळते आणि तुमच्या लेखनावरुन तुमच्या व्यासंगाची झलक मिळते.

तुमच्या लिखाणावरून तुमच्या व्यक्तिमत्व बाबत टीचकिभरही माहीती कळत नाही हे दुर्दैव. आणी फुका खुमारी, कैफ आशा हिंदी व उर्दू व इतर अनेक भाषेतील उधार शब्द वापरणे याला कोणी व्यासंग म्हणनार नाही.

तुमच्या प्रणालीला सीएची परिक्षा उत्तीर्ण व्हायला लागेल > करा प्रयत्न

हेच हेच ते शेपूट वळवणे... परीक्षा सोडा तुम्ही काय करत होता ते स्पष्ट करा माझी प्रणाली ते काम करेल हे आव्हान स्वीकारता का ते बोला ? परीक्षा एक कायदेशीर बाब आहे ती औपचारिकता केंव्हाही पूर्ण करू कौशल्य विकसित आहे हे सिद्ध केले तर आहे तयारी ?

> समाजात रहायचं असेल तर शिव्या न देता बोलण्याची सवय ही सभ्यता आहे.

समाजात रहायचे असेल तर शिव्या खायची वेळ येऊ न देणे अशी वर्तणूक असणे जास्त म्हत्वाचे आहे अन्यथा शिव्या तर खाव्या लागणारच

उत्साहामुळे तुमच्या जीवनात नक्की काय प्रश्न येतायंत ?

रामाची सीता कोण हे सांगू म्हणता ? ठीक आहे माझे लिखाण परत वाचा तरीही शंका उरली तर निर्सनाला मी आहेच काळजी नको

संजय क्षीरसागर's picture

21 May 2020 - 9:10 pm | संजय क्षीरसागर

> तुमच्या लिखाणावरून तुमच्या व्यक्तिमत्व बाबत टीचकिभरही माहीती कळत नाही

हा तुमचा दृष्टीकोन आहे पण तुमच्या प्रोफाईलवरुन ती मिळते.

> परीक्षा सोडा तुम्ही काय करत होता ते स्पष्ट करा माझी प्रणाली ते काम करेल

प्रणाली विकसित करणार्‍याला ज्या क्षेत्रात ती प्रणाली काम करणार त्याचं ज्ञान असणं ही सुरुवात आहे. ऑडीट ही फार पुढची गोष्ट आहे. तुम्ही बँकिंगमधे काय प्रणाली विकसित केल्यात ते सांगा त्यावरुन तुम्हाला बँकिंग व्यावहाराची कितपत कल्पना आहे ते समजेल.

> समाजात रहायचे असेल तर शिव्या खायची वेळ येऊ न देणे अशी वर्तणूक असणे जास्त म्हत्वाचे

ते उघड आहे पण तुम्ही शिव्या घालता ती सभ्यता नाही.

> माझे लिखाण परत वाचा तरीही शंका उरली तर निर्सनाला मी आहेच काळजी नको

प्रश्न तुम्हाला आहे, मला नाही.

विचारला तुम्ही ना ? मग प्रश्न मला कसा ?

संजय क्षीरसागर's picture

21 May 2020 - 9:28 pm | संजय क्षीरसागर

> या उत्साहाचे करायचे काय ? मला उत्साहच नियंत्रण जमत नाही मग मी काय करावे ?

आयर्नमॅन's picture

21 May 2020 - 9:38 pm | आयर्नमॅन

उत्साहामुळे तुमच्या जीवनात नक्की काय प्रश्न येतायंत ?

हा प्रश्न तुम्ही विचारला आहे...

संजय क्षीरसागर's picture

21 May 2020 - 9:45 pm | संजय क्षीरसागर

> या उत्साहाचे करायचे काय ? मला उत्साहच नियंत्रण जमत नाही मग मी काय करावे ?

प्रतिप्रश्न आहे.

सुरुवात तुमच्या त्याच प्रश्नानं झाली आहे.

इतर निर्माण झालेले प्रश्न निरर्थक ठरत नाहीत...

तुमचा प्रश्न निरर्थक असूच शकत नाही

संजय क्षीरसागर's picture

21 May 2020 - 10:13 pm | संजय क्षीरसागर

हे असंभव आहे.

आयर्नमॅन's picture

21 May 2020 - 10:15 pm | आयर्नमॅन

पण याचा अर्थ तुम्हाला प्रश्न पडत नाहीत असे नाही फक्त तुमची लज्जा तुमच्या आड येते

संजय क्षीरसागर's picture

21 May 2020 - 10:35 pm | संजय क्षीरसागर

अर्थात एखादा नवा छंद किंवा नवे कौशल्य प्राप्त करतांना मला अजिबात संकोच वाटत नाही.

आयर्नमॅन's picture

21 May 2020 - 10:41 pm | आयर्नमॅन

तुम्हाला प्रश्नच पडत नाहीत की प्रश्नच समजत नाहित ?

संजय क्षीरसागर's picture

21 May 2020 - 10:52 pm | संजय क्षीरसागर

निष्प्रश्न याचा अर्थ ज्याला आपल्या स्वरुपाचा उलगडा झाला आहे.

प्रश्नकर्त्याच्या प्रश्न समजला नाही तर त्याला पुन्हा विचारता येतं.

पण आपण प्रश्न विचारतोयं हे न समजणं गोंधळाचं लक्षण आहे.

आयर्नमॅन's picture

21 May 2020 - 9:24 pm | आयर्नमॅन

ते उघड आहे पण तुम्ही शिव्या घालता ती सभ्यता नाही.

कारण बघून मी शिव्या घालतो विनाकारण नाही हे मी आधीच स्पष्ट केले आहे आणी

समाजात रहायचे असेल तर शिव्या खायची वेळ येऊ न देणे अशी वर्तणूक असणे जास्त म्हत्वाचे

ते उघड आहे

असे तुम्ही म्हणता म्हणजे तुम्ही माझ्या शिव्या द्यायच्या विरोधात आहात की बाजूने हे तुम्हाला समजत नाही असे का मानू नये ?

संजय क्षीरसागर's picture

21 May 2020 - 9:31 pm | संजय क्षीरसागर

हे माझं मत आहे.

http://misalpav.com/comment/1067085#comment-1067085

याचे उत्तर तुम्ही द्याल का ?

संजय क्षीरसागर's picture

21 May 2020 - 9:51 pm | संजय क्षीरसागर

Frick >A word commonly used by to express displeasure.

आयर्नमॅन's picture

21 May 2020 - 9:54 pm | आयर्नमॅन

इतकाही तुमचा व्यासंग नाही ?

संजय क्षीरसागर's picture

21 May 2020 - 10:08 pm | संजय क्षीरसागर

हे कुठून काढलं ?

संजय क्षीरसागर's picture

21 May 2020 - 9:54 pm | संजय क्षीरसागर

> पटली नसेल तर यथेच्छ शिव्या ही घालतो , पण लोकांना फक्त शिव्याच पोचतात की काय असा doubt येतो हो चांगलं बोलेल्याची हमखास माती केली जाते की काय कळत नाही

मी त्यावर माझं मत सांगितलंय.

आयर्नमॅन's picture

21 May 2020 - 10:00 pm | आयर्नमॅन

आणी तुम्ही स्वतः कथेचे नाव F U दिले आहे व F U म्हणजे काय याचे स्पष्टीकरणही तुम्ही चुकीचे दिलेले आहे

तरिही तुमची दांभिकता सुस्पष्ट होण्यास ही लिंक पुरेशी आहे

http://onlineslangdictionary.com/meaning-definition-of/fu

संजय क्षीरसागर's picture

21 May 2020 - 10:11 pm | संजय क्षीरसागर

Frick >A word commonly used by to express displeasure.

तुम्ही तुमचा अर्थ काढतायं

Fu गुगल करा म्हणजे तो का वापरतात ते स्पष्ट होईल आणी इतकेही तुम्हाला अजून माहीत न्हवते तर व्यसंगातील व ही तुमच्या ओळखीचा नाही असे खेदाने कबूल करावे लागेल

संजय क्षीरसागर's picture

21 May 2020 - 10:22 pm | संजय क्षीरसागर

fever of unknown origin

मी माझा अर्थ सांगितला आहे. तुम्ही दुसरा अर्थ घेतायं हा तुमचा प्रश्न आहे.

आम्हाला चमकोगीरीची तूर्त गरज नाही थांबतो तुम्ही चालू रहा

चमकोगिरी सदस्याच्या प्रोफाईलवरुन कळते.

आयर्नमॅन's picture

21 May 2020 - 10:59 pm | आयर्नमॅन
संजय क्षीरसागर's picture

22 May 2020 - 8:42 am | संजय क्षीरसागर

त्याची अंमलबजावणी करायला या संकेतस्थळाचं मालक व्हायला लागेल.

चौकटराजा's picture

24 May 2020 - 8:50 am | चौकटराजा

उत्साह हा सृजनाचा मूळ स्रोत आहे. त्यामुळे सतत काही तरी नवं शिकण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याच्या चांगल्या वाटलेल्या गोष्टींना मनःपूर्वक दाद द्या, हाच वृक्षासारखं बहरत जाण्याचा मार्ग आहे. इंटेलीजन्स आणि अॅस्थेटिक्स हे दोन जीवनाचे महत्तम पैलू आहेत

आता मिपावर प्रथम पुरूषी एकवचनी असं काही ( मी बोटीवर होतो तेंव्हा...... वारा वहात होता या स्टाईल ) लिहिलेले लोकाना भावत नाही असा अनुभव आहे .असे असतानाही आत्मस्तुतीचा दोष पत्करून मी असे म्हणेन की मी हे प्रत्यक्शात आणले आहे. माझे मते आपल्या इथे ते चित्रगुप्त ,डॉ म्हात्रे व कन्जुष काका यानीही प्रत्यक्शात उतरवले आहे !!!

संजय क्षीरसागर's picture

24 May 2020 - 11:29 am | संजय क्षीरसागर

> लिहिलेले लोकाना भावत नाही

बरोबरे !

कदाचित सतत काही तरी नवं शिकण्याचा सायास करण्यापेक्षा, सांगणार्‍यावर हल्ला चढवणं हे नाविन्यपूर्ण काम वाटत असावं

> मी बोटीवर होतो तेंव्हा...... वारा वहात होता

हे कर्तव्यपरायणता आणि राष्ट्रभक्ती यांच्या ओघात आल्यामुळे भरपूर वारा वाहू शकतो.

> आत्मस्तुतीचा दोष पत्करून मी असे म्हणेन की मी हे प्रत्यक्शात आणले आहे

अभिनंदन !

दुसर्‍यांना उपयोगी होणारं ठामपणे लिहायला प्रथम पुरूषी एकवचनीच लिहावं लागणार कारण तो व्यक्तिगत अनुभव असतो. निव्वळ माहितीपर लेखनात ते खुबीनं टाळता येतं.

धर्मराजमुटके's picture

17 May 2020 - 4:07 pm | धर्मराजमुटके

आयुर्वेदाचार्यांनी नकार घंटा वाजवलेली बरीच थंड-गरम पित्त-कफ कारक तथाकथीत विरोधी बरेच पदार्थ मी बिनदिक्कत खात आलो आहे.

यावरुन असे दिसते की आपण तरुण किंवा मध्यमवयीन आहात. मात्र असे असेल तर 'आताच जितं मया ! म्हणण्याची गरज नाही. शरीर आणि वेळ कोणाचाही मुलाहिजा बाळगत नाही. आयुष्यभर केलेल्या जेवणाची फळे उतारवयात जरुर मिळतात. तेव्हा थोडे वाट पाहून हे विधान करणे संयुक्तीक ठरेल. मात्र आपण उतार वयात असूनही बिन दिक्कत काहीही खात असाल तर आपले मी अभिनंदन करतो.

आंबट चिंच's picture

20 May 2020 - 4:03 pm | आंबट चिंच

जावु दे मुटके साहेब आयर्नमॅन म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारु आहेत. पण ते खुप उत्साहात आहेत कारण फक्त २० तासात बर्याच ठिकाणी पिंका टाकुन झाल्यात.

आयर्नमॅन's picture

20 May 2020 - 4:28 pm | आयर्नमॅन

आयर्नमॅन म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारु आहेत

I take that as compliment.
पण जर मी खरच जुना आहे असे वाटत असेल तर जुने ते सोने म्हणायला हरकत नसावी.

धन्यवाद आंबट चिंच साहेब. बाकी मीसुद्धा आंबट शौकीन असल्याने आपले चाहतेच समजा मला

रमेश आठवले's picture

17 May 2020 - 9:05 pm | रमेश आठवले

गरोदर स्त्रीला एखादा पदार्थ खाण्याची खुप इच्छा झाली, तर त्या स्त्रीला किंवा वाढणाऱ्या गर्भाला, त्या पदार्थातील पोषक घटकाची किंवा खनिज द्रव्याची गरज असणार , अशी मान्यता आहे.

संजय क्षीरसागर's picture

17 May 2020 - 9:42 pm | संजय क्षीरसागर

असेच भूकेचे डोहाळे लागले की नक्की काय खावं ते कळतं आणि मग भोजनाचा मोहोत्सव होतो !

Prajakta२१'s picture

17 May 2020 - 11:15 pm | Prajakta२१

चांगली चर्चा सुरु आहे सर्वांच्या मार्गदर्शनबद्दल खूप आभार
सध्या lockdown मुळे सारखे सगळीकडे रेसिपिंचे उदंड उत्साहात प्रयोग चालू आहेत त्यामुळे जास्त भूक लागल्यासारखे होते

@कुमार १ सर -मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद तुपाचा /फॅटी पदार्थांचा (बदाम इ. )जास्त वापर मेंदूसाठी /बौद्धिक कामासाठी उपयुक्त ठरतो असे ऋजुता दिवाकरांच्या पुस्तकात वाचल्याचे आठवते त्यांनी मारवाडी लोकांच्या आहाराचे उदाहरण दिले होते त्यांच्याकडे सर्व स्वैपाक शक्यतो तुपाच्याच फोडणीत होतो आणि त्यांचे व्यापारकौशल्य आणि बुद्धिमत्ता (genes मधील असे काहीसे वाचल्याचे आठवते )पण नंतरच्या पिढ्यात आहार तोच राहिला पण बैठी आरामदायी जीवनशैलीने लठ्ठपणा आणि इतर अनेक व्याधी लागल्याचे त्यांचे म्हणणे होते
@धर्मराजमुटके सर - सूचनांबद्दल धन्यवाद सध्या लवकर झोपणे जमत नाही घरी असल्यामुळे तरी लवकर झोपण्याचे प्रयत्न चालू आहेत
@माहितगार सर-चांगले विश्लेषण धन्यवाद
@संजय क्षीरसागर सर-सगळ्या सूचनांशी सहमत धन्यवाद
@चौकट राजा सर- पाचांचा मेळ -आमच्याकडे आलटून पालटून वापरतो आम्ही तेले
तसेच जेव्हा चविष्ट पदार्थ बनवायचा असतो तेव्हा calories/आहारशास्त्राला फाट्यावर मारून सढळहस्ते तेल,तूप,मसाले आणि साखरेचा वापर होतो आणि जेव्हा डाएट करायचे असते तेव्हा चवीला मुरड घालून जेवावे लागते दोन्हींचा सुवर्णमध्य साधता आला तर .....

अजून कोणाला काही प्रश्न असतील तरी ते मांडावेत
प्रश्नांच्या आणि प्रतिसादांच्या प्रतीक्षेत

चर्चा पाहुन हल्लीच पाहिलेला व्हिडियो देउन ठेवतो.

हे अमलात आणण्याचा मी प्रयत्न करतोय.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Samjho Na Kuch To Samjho Na...

अन्न प्या आणि पाणी खा

https://www.misalpav.com/node/43881

आनन्दा's picture

22 May 2020 - 1:27 pm | आनन्दा

मी आता 82 किलो.. 18 महिने, 12 किलो..
स्लो बट स्टेडी and durable!!

मीअपर्णा's picture

20 May 2020 - 2:01 am | मीअपर्णा

हा आहे की आपल्या शरीराला चालणारं जेवण इतर लोकांनाही तेच आउटपूट देईल असं नाही. मला जेव्हा गर्भारपणातला डायबिटीस झाला होता तेव्हा आहारतज्ञानी सांगितलेला आहार आणि तो एकंदरित अनुभव वाचुन पहा.

http://majhiyamana.blogspot.com/2011/11/blog-post_29.html
वरच्या लिंक वर आहे. त्यात मध्ये कुठेतरी थोडा भाग फक्त त्यावेळचा आहारतज्ञाने सांगितलेला आहार केल्यामुळे माझं वजन खरं तर कमी झालं होतं. तेव्हा ते योग्य नव्हतं पण आता गरज पडली तर मी तो आहार करून पाहाते. नशीब मी कुठेतरी लिहून ठेवलं त्यामुळे मलाच फायदा होतो.

तुम्ही एखाद्या आहारतज्ञाशी केव्हातरी बोललात का? तुम्हाला नाउमेद नाही करत पण आहार हा सापेक्ष असतो. माझ्या नवर्याने आंबे खाणं आणि मी खाऊ शकणं यात फरक आहे आणि तो का आहे ते मला माहित आहे. सो कधीतरी तुमच्या भल्यासाठी वरील प्रश्नांची उत्तर आहारतज्ञाकडेही शोधा. मी आधीचा धागा पाहिला नाही पण वेट लॉससाठी असेल असं वाटतं.

मी मागचे वर्षभर माझ्या लेव्हलला जमेल त्या पद्धतीचं आय एफ, मार्गदर्शकाच्या नजरेखाली योग आणि रेसिटंट ट्रेनिंग आणि आता थोडं फार वेटवॉचर्स वापरुन एक माझ्यासाठीची आहारशैलीवर काम करतेय. इट्स स अ प्रोसेस आणि मी ते डॉक्युमेंट केलं नाही. कधीतरी करायला हवं म्हणजे पुन्हा विसरले तर स्वतःला तरी त्याचा फायदा होईल. तुम्हाला शुभेछा. :)

Prajakta२१'s picture

20 May 2020 - 9:51 pm | Prajakta२१

आहारतज्ञाशी नाही पण पूर्वी जिमला जायचे तिथे डाएट डायरी होती रोजचे खाल्लेले त्यात ल्हियाचे दुसऱ्या दिवशी वजन चेक व्हायचे
वाढले /कमी झाले कि काय खाल्ले किंवा काय खाल्ले नाही (एखादे जेवण स्किप केले का )त्याची उलटतपासणी तेव्हा त्या मॅडमने थोडेसे डाएट गायडन्स केले होते तेव्हा त्या पण हेच सांगायच्या कि व्यायाम आणि आहार व्यक्तिसापेक्ष असतो तसेच जेवणाच्या वेळा पाळण्यावर त्यांचा भर होता त्याला पण खूप दिवस झाले
ब्लॉगवरील लेख अतिशय छान मार्गदर्शन करतो उसळीबद्दल नव्यानेच कळाले आमच्या इथे शाकाहारी मंडळींना उसळ,डाळी हाच प्रोटीनचा सोर्स म्हणून उसळ खूप जास्त आवडीने खाल्ली जाते (मी पण आहे त्यात )आता जरा कंट्रोल येईल धन्यवाद.
आपल्या ब्लॉग वरचे एकला चालो रे हे आवडले पु ले शु
मार्गदर्शनाबद्दल खूप धन्यवाद

मीअपर्णा's picture

21 May 2020 - 11:34 pm | मीअपर्णा

एकंदरित ब्लॉग वाचला आणि आपल्याला फायदा होईल याचा आनंद आहे.

>>आपल्या ब्लॉग वरचे एकला चालो रे हे आवडले पु ले शु
आणखी आभार. खरं जितकं दहा-बारा वर्षांपुर्वी लिखाण एकंदरितच इतर ब्लॉगर्सही करत ते आता तितकं जमत नाही. पण आता वाटतं जे पूर्वी व्यक्त करू शकलो ते झालं हे बरं झालं. :)

Rajesh188's picture

20 May 2020 - 10:44 pm | Rajesh188

Healthy vajan ase kahi अस्तित्वात नाही प्रतेक वेळेस वजन आणि हेल्थ ह्याचा संबंध जोडू नका...
अमुक तमुक माज वजन आहे म्हणजे माज आरोग्य चांगलं आहे,निरोगी आहे असे काही नाही.
व्यायाम,करा,योग्य आहार घ्या पण त्याचा संबंध वजनशी जोडू नका .

Ideal body weight Edit
Ideal body weight (IBW) was initially introduced by Devine in 1974 to allow estimation of drug clearances in obese patients;[7] researchers have since shown that the metabolism of certain drugs relates more to IBW than total body weight.[8] The term was based on the use of insurance data that demonstrated the relative mortality for males and females according to different height-weight combinations.

The most common estimation of IBW is by the Devine formula; other models exist and have been noted to give similar results.[8] Other methods used in estimating the ideal body weight are body mass index and the Hamwi method. The IBW is not the perfect fat measurement as it does not show the fat or muscle percentage in one's body. For example, athletes' results show that they are overweight when they are actually very fit and healthy. Machines like the dual-energy X-ray absorptiometry (DXA) can accurately measure the percentage and weight of fat, muscle, and bone in a body.

@राजेश १८८ धन्यवाद

चिवडा,भेळ फरसाण ह्याबद्दल
घरी केलेले आणि दाणे ,खोबरे असे घटक न घालता कमी तेलातले चिवडे पचायला हलके होतात का ?
नुसते पातळ पोहे पचायला हलके असतात
आमच्या कडे पातळ पोहे ,चुरमुरे ह्यांचा चिवडा करतो (फक्त तेल आणि मसाला घालून ) पचायला हलका होण्यासाठी
तसेच चुरमुरे पचायला हलके असतात पण त्यांनी पोट फुगते असे पण ऐकून आहे