करोना विषाणू COVID-19 भारतातील अपयश साखळी आणि फैलाव

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
9 May 2020 - 5:37 pm
गाभा: 

भारतीय मध्यमवर्ग कोविडसाथीला झोपडपट्टीपर्यंत मर्यादीत होणारा अथवा पुण्या मुंबईचा आजार या गैरसमजात अडकून स्वतःचे आणि देशाचे नुकसान तर करुन घेणार नाही ना? आजच्या तीन वृत्तांचा परामर्ष धारावी, पुणे आणि Covid-19 super spreaders

परदेशात अडकलेल्या भारतीय प्रवाशांना भारतात वापस आणण्याची शेखी मिरवण्यापेक्षा तिकडेच आर्थिक आणि वैद्यकीय मदत पाठवली असती तर आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा लगेच स्थगित केली असती तर अधिक चांगले झाले नसते का? विमान तळावरून केवळ टेम्परेचर नाही पाहून प्रवाशांना घरी जाऊ दिले गेले म्हणजे जसे की टेंपरेचर नसलेले प्रवाश्यांच्या नकळत त्यांच्या कडून वीषाणू प्रसार होणारच नाही! ( या सर्वावर कडी म्हणजे जागतिक आरोग्य संघटना जिच्या सल्ल्यांवर जग अवलंबून होते तीच सल्ले देताना बेसिक तार्कीक उणीवात अडकलेली होती, कसे ?)

शिकलेला आंतरराष्ट्रीय मजूर प्रवासी काय अन न शिकलेला मजूर प्रवासी काय वीषाणूंसाठी प्रसार योग्य सारखीच साधने होती आहेत रहातील, एकदा ठेच खाऊन शहाणा होईल तो भारतीय नव्हे एवढी मोठी आर्थीक व्यवस्था डावावर लावून प्रवाशांच्या दबावापुढे जगातली सगळी सरकारे नतमस्तक होतात तशी भारतातली सरकारे नतमस्तक झाली - होताहेत, मनुष्यस्वभावाच्या दोषांना सरकारांनाच फक्त जबाबदार धरता येते असे नाही. भारतीय सामाजिक बेशीस्तीने लॉकडाऊनच्या उद्दीष्टांचा बर्‍यापैकी पराभव केला आहे . सरकार माध्यमे आणि समाज अजून स्विकारत नसली तरी आज ना उद्या न स्विकारुन जातील कुठे ?

धारावी, पुणे आणि Covid-19 super spreaders

हि मी आज वाचलेली तीन वेगवेगळी वृत्ते. परदेशातून येणार्‍या प्रवाशांनी क्वारंटाईनची पालने केली नाहीत तबलिगींना लपवणेही महागात पडले हे ह्या वृत्तातून पुन्हा अधोरेखीत होते. मध्यमवर्गाकडे सेवा पुरवणार्‍या कामगार वर्गाकडून आजार लोकंख्या घनता अधिक असलेल्या भागात पसरला - झोपडपट्टीतील कामगारांशी रोज दररोजचा संवाद असूनही किमान नागरी सुविधांच्या बाबतीत सर्व झोपडपट्ट्या अधिकृत न समजणे याने साथ पसरण्यात मदत झाल्याचे दिसून येते आणि भारतांतर्गत रेशनकार्ड कुठेही सहज न वापरता येणे यामुळे मजुर/कामगार वर्गास मिळणार्‍या मदतीवर मर्यादा येऊन हा कामगार वर्ग प्रवास करुन आजार भारतभर पसरवत आहे.

हा प्रसार ग्रामिण भागात होऊन शेती माल भाज्या दुध जिवनावश्य्क वस्तु पुरवठादारांसोबत मध्यवर्गीयांपर्यंत लौकरच वापस पोहोचू लागेल. काही मध्य्म वर्गीय आपल्याला आता पर्यंत कोरोना होऊन गेला असेल आणि पुन्हा होणार नाही या भ्रमात असतील तर या कोरोनाचीही अनेक म्युटेशन अस्तीत्वात येत आहेत एखाद्या म्युटेशनला शरीर सरावले असेल तरी दुसर्‍या म्युटेशना फिरुन हमला होणारच नाही याची शाश्वती काय ?

आता इतर दुकाने आणि सेवाही पुन्हा नाईलाने सुरु होतील आणि या सेवादारांसोबत वीषाणू संक्रमणाची पुढची पुर्नावृत्ती दूर नसावी.

आम्हाला सेवा पुरवणार्‍या व्यक्ती रोज शेकड्यांनी लोकांना भेटतात आणि वीषाणूंची देवाण घेवाण करतात त्यांना एन ९५ मास्कचा आग्रह आम्ही अजून का धरलेले नाहीत ? भाजी निवडण्यापुर्वी आम्ही हात सॅनिटाईज करत आहोत का ? भाज्या निवडण्याच्या प्लास्टीक बास्केट वेगवेगळ्या हातातून देवाण घेवाण करतात त्या अधिकवेळा साबणाच्यापाण्याने धूऊन निर्जंतूंक करण्याचा आग्रह आम्ही धरतो आहोत का ? कॅशचा वापर न करण्यात किती यश येते आहे येत नसेल तर त्या संबंधातील बारीक सारीक अडचणी कोण दूर करणार ?

आमच्यातले आणि आपल्या आजूबाजूचे कितीजण अजून तीन बोटे दुसरीकडे दाखवत आहेत आणि स्वतः ५ फुटांचे अंतर राखणे, मास्क वापरणे, प्रत्येक गोष्ट साबणाच्या गरमपाण्याने धुणे याकडे गंभीर दुर्लक्ष करत आहेत? आणि दुर्लक्ष करणार्‍यांकडे दुर्लक्ष करत आहेत ?

* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे , शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आणि विषयास धरुन चर्चा सहभागासाठी अनेक आभार

प्रतिक्रिया

हे नक्की खरे आहे का की मास्क आपले रक्षण करतो?
हे नक्की खरे आहे का आता पर्यंत बाधित झालेले हात धुवत नव्हते,मास्क वापरात नव्हते,santizer वापरात नव्हते?
हे नक्की खरे आहे प्रतेक बाधित व्यकी हा corona badhit व्यक्तीच्या संपर्कात आल्या मुळे बाधित झाला आहे?
हे सर्व नक्की खरे आहे का

माहितगार's picture

9 May 2020 - 9:28 pm | माहितगार

"...हे नक्की खरे आहे प्रतेक बाधित व्यकी हा corona badhit व्यक्तीच्या संपर्कात आल्या मुळे बाधित झाला आहे?..."

आपला भारतीय तत्वज्ञानातल्या मिथ्यावादावर विश्वास असून कोरोना फैलाव केवळ भास आहेत असा भास होत नाहीए ना ? कि आजार वीषाणूंपेक्षा वेगळ्या काही जादूने पसरतो आहे असे वाटते ? पृत्वी गोल असल्याचे आणि विज्ञान नाकारणारी मंडळी अजूनही भूतलावर नक्कीच आहेत नाही असे नाही. आपल्या नजरेतून सुटले असल्यास वीषाणू म्हणजे काय आणि त्यांच्या प्रसार पद्धतीची किमान स्वरुपाची माहिती मिपावरील जाणकार मंडळींनी दिली आहेच.

संपर्क एकतर प्रत्यक्ष असेल किंवा अप्रत्यक्ष म्हणजे बाधीत व्यक्तीने बाधीत केलेल्या वातावरण अथवा वस्तुशी संपर्क झाला की वीषाणू संसर्गाला पुरे. जिथे लोक्संख्या घनता (गर्दी) अधिक तेथे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क अधिक कसा होणे सहाजिक नाही का ? मी तर वर पुणे आणि धारावी बद्दलचे संदर्भदुवे ही दिलेले आहेत. कॉमन टॉयलेट ही यांची एक प्रमुख समस्या आहे. घरात नेटाने बसलेल्या व्यक्तीलाही नैसर्गिक विधीला स्वच्छता गृहाचा आधार घ्यावाच लागतो (माझे व्यक्तिगत मत म्हणाल तर कॉमन बाथरुम या समस्येस अधिक कारणीभूत होऊ शकतात, कारण स्नान करताना गरम पाण्याने श्वसन संस्थेतील म्युकस मोकळा होतो आणि सर्वसाधारणपणे साबणाने धुतला जावयास हवा पण क्रमातील बारकावे पाळले गेले नाही तर व्यक्ती नंतर शिंकतील आणि आपल्याकडे टॉवेलसारख्या गोष्टी शेअर होणे ते धुतलेले न धुतलेले कपडे एकाच दोरीवर येणे असे असंख्य प्रकार संभाव्य आहेत. अगदी भारतीय घर झाडण्याची प्रथा सर्वसाधारणपणे (नाकाला कोणताही मास्क न लावता) वाकुन झाडण्याची आहे आणि अगदी वाकुन झाडतानाही पॅथोजेन श्वसनसंस्थेत जाणार नाही यावर काही अभ्यास आहेत का हे हे मिपावरील तज्ञांनी सांगावे पण मला अशीही एक शक्यता असू शकते असे वाटते.

हे नक्की खरे आहे का की मास्क आपले रक्षण करतो?
हे नक्की खरे आहे का आता पर्यंत बाधित झालेले हात धुवत नव्हते,मास्क वापरात नव्हते,santizer वापरात नव्हते?

तुमचा शारिरीक अंतर आणि मास्कचे प्रकार या बद्दल काही गोंधळ होतो आहे का ? असाच इतरांचाही होत असणार पण जरासा कॉमनसेन्स आणि लॉजीक वापरले की हा गोंधळ खरे तर टळावयास हवा ते होताना दिसत नाही.

एकत्तर असंख्य लोकांना आपल्याला अजून कोणतेही लक्षण दिसत नाही म्हणजे आपली इम्युनिटी उत्तम आहे याचा फाजील अहंकार दिसतो आहे . इम्युनिटी स्टॅटीक नव्हे डायनॅमिक असावी , वीषाणूच्या एका म्युटेशनला शरीराने यशस्वी तोंड दिले म्हणजे दुसर्‍याही म्युटेशनला तोंड देईलच शक्यता वाढली तरी गॅरंटी देणे शक्य नसावे.

आणि समजा तुम्हाला लक्षणे दिसली नाहीतरी वीषाणूंचे तुम्ही तुमच्याही नकळत गुप्त वाहक (जिवंत जैविक अस्त्र) असू शकता.

तुम्हाला स्वतःला संसर्ग होऊ नये म्हणून पॉपीप्रॉपीलीन मटेरीअल ने बनलेला मास्क हवा की केवळ जो वीषाणूंचा आकाराचे पॅथोजेन गाळू शकतो. साधा मास्क लावणे तुम्हाला स्वतःला संसर्ग न होण्याची गॅरंटी देत नाही ! जिंकलात ? थांबा जरासे, साधा मास्क लावल्याने तुमचे शिंकणे आणि बोलताना उडणारे तुषार लांबवर जाणार नाहीत म्हणजे सर्वांनीच मास्क वापरला तर हवेत उडणार्‍या तुषारांचे प्रमाण निश्चित्पणे कमी असेल. शारिरीक अंतर जेवढे अधिक तेवढे वातावरणातील वीषाणूंचे प्रमाण कमी आणि शारिरीक अंतर जेवढे कमी तेवढी वातावरणातील वीषाणू संख्या वाढण्याची आणि शवसनात येण्याची शक्यता अधिक, म्हणजेच अधिकतम शारीरीक अंतर न राखलेल्या आणि मास्क न वापरलेल्या वातावरणापेक्षा सर्वांनी अधिकतम शारिरीक अंतर राखलेले आणि मास्क वापरलेले वातावरण तुलनेने अधिक वीषाणू सुरक्षीत असेल. पण ज्या व्यक्तींना जसे की सर्वीस काऊंटर वरील व्यक्ती दुकानदार विवीध सेवा देणारे यांना जवळून भेटणार्‍या अनेक व्यक्तींशी संपर्क येतो तेवढी साधा मास्क वापरुनही संसर्ग शक्यता वाढते कारण साधा मास्क हा फुलप्रूफ नाहीच त्यामुळे ज्यांना दिवसाभरात अनेक व्यक्तींशी जवळून संपर्क येणार आहे त्यांनी एन ९५ मास्क वापरणे उत्तम आणि व्यावसायिकांना ते परवडूही शकते. समजा असंख्य लोकांच्या संपर्कात येणार्‍या १०० पैकी २० लोकांनी जरी एन ९५ मास्क वापरले तर संसर्गाची शक्यताही १/५ ने घटेल. जास्त वापरली तर जास्त घटेल.. लॉकडाऊनने आख्खी इकॉनॉमीआणि अर्थार्जन थांबवण्याच्या मानाने अधिक शारीरीक अंतर आणि मास्क वापरणे, आणि शरीर, हात , वातावरण आणि प्रत्येकवस्तु निर्जंतूक ठेवण्याचा अधिकतम प्रयत्न ही खुप छोटी तडजोड आहे पण समाज तेवढेही करत नसेल एकमेका सहाय्य करु एवजी एकमेका वीषाणू देऊ वागत असेल असा समाज नतद्रष्ट आणि डार्वीनच्या भाषेत नॉट स्मार्ट इनफ फॉर सर्वायवल म्हणावे लागेल.

सुबोध खरे's picture

9 May 2020 - 7:26 pm | सुबोध खरे

RETROSPECTVELY EVERYONE IS WISE.

ऋतुराज चित्रे's picture

9 May 2020 - 7:43 pm | ऋतुराज चित्रे

कोरोनातून बरे होऊन घरी गेलेले धारावीतील ५ जणांचा मृत्यू झाला.

सचिन's picture

9 May 2020 - 8:30 pm | सचिन

करोनाच्या बाबतीतल्या सर्व गोष्टींचा सीरियसनेस ध्यानात घेतल्यानंतरही एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे प्रचंड प्रमाणातला फिअर सायकॉसिस. सर्वच्या सर्व चॅनेल्स आणि अनेक राजकीय हेतूने प्रेरित मते लोकांमधे एक प्रकारचा भयगंड पसरवीत आहेत. लॉकडाऊन मुळे कोरोना नष्ट होणार नसून फक्त लांबणार आहे, आणि आपल्याला कोरोनसह जगावे लागणार आहे, हे जनमत तयारच होऊ शकलेले नाही. सकारात्मकता आणण्यासाठी काहीही विशेष झालेले नाही. कामे सुरू करावीच लागतील, आणि सोशल डिस्टन्सिंग आणि त्या अनुषंगाने आवश्यक असलेला आपल्या अनेक सवयींतील बदल ही आपली सामाजिक जबाबदारीच नव्हे तर राष्ट्रीय कर्तव्य देखील आहे, याचे भान प्रत्येकाला बाळगावे लागेल. पोलिस आणि आरोग्यसंस्था आपल्याला कुठपर्यंत पुरतील यालाही काही लिमिट आहेच. ते त्या अदृश्य शत्रूशी प्राणपणाने लढत आहेतच ..ते ओपनिंग बॅट्समन उत्तम भागीदारी रचत आहेत... आपली बॅटिंग येईल तेव्हा आपणही भक्कम धावसंख्या रचली पाहिजे. आपण पॅड बांधून (की मास्क बांधून) तयार असायलाच हवे.

माहितगार's picture

9 May 2020 - 9:52 pm | माहितगार

सोशल डिस्टन्सिंग आणि त्या अनुषंगाने आवश्यक असलेला आपल्या अनेक सवयींतील बदल ही आपली सामाजिक जबाबदारीच नव्हे तर राष्ट्रीय कर्तव्य देखील आहे,

माझे मतः
अगदी, अधिकतम शारीरीक अंतर + मास्कचा अधिकतम वापर (चार पेक्षा अधिक किंवा आजारी व्यक्तीच्या संपर्कात येत असाल तर साधा का होईना मास्क वापराच , दहा पेक्षा अधिक व्यक्तींच्या संपर्कात येत असाल आणि खिशाला परवडले तर एन ९५ पॉलीप्रॉपीलीन मास्क वापराच) + हात, कपडे, ज्या ज्या गोष्टीला हात लागतो लागू शकतो किंवा सार्वजनिक धूळ जाऊ शकते अशा सर्वांचे उष्ण पाणी आणि साबणाने निर्जंतुकीकरण + एका वेळी चार पेक्षा अधिक व्यक्ती असतील अशी ठिकाणे शक्यतोवर टाळणे आणि त्या चार लोकांनीही एकमेकांपासून चार हात लांब रहाणे + घरात पुरेशी जागा असल्यास एका खोलीत दोन किंवा तीन पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्याचे प्रमाण कमी करणे किंवा घरातल्या घरातही शक्य तेवढे अधिक अंतर ठेवणे - अगदी दहा बाय दहाच्या खोलीत चार लोक चार कोपर्‍यात ठरवून बसल्यास किमान अंतर पाळणे शक्य असावे. जिथे १० बाय १० च्या खोलीत चार पेक्षा अधिक लोक आहेत त्यांनी एकत्रित रहाण्याच्या वेळेतला अर्धावेळ तरी मास्कचे पालन घरातही करावयास हवे.

लॉकडाऊन मुळे कोरोना नष्ट होणार नसून फक्त लांबणार आहे,

उपरोक्त अटींचे पालन जेवढे केले तेवढे लॉकडाऊनचे यश बरे होऊन वीषाणू १९ अधिक काळ दूर राहील आणि औषधी उपाय योजना उपलब्ध होई पर्यंत श्वास घेण्यास अवधी मिळेल.

टर्मीनेटर's picture

13 May 2020 - 11:02 pm | टर्मीनेटर

१००% बरोबर.
मूळ धाग्यात म्हंटलेले

भारतांतर्गत रेशनकार्ड कुठेही सहज न वापरता येणे यामुळे मजुर/कामगार वर्गास मिळणार्‍या मदतीवर मर्यादा येऊन हा कामगार वर्ग प्रवास करुन आजार भारतभर पसरवत आहे.

हे काही समजले नाही.

चीन मधल्या एका बाधित व्यक्ती कडून साखळी द्वारे हा विषाणु जगभर पसरला.
तो पण तीन महिन्यात ह्याचे आश्चर्य वाटत आहे.
म्हणून पहिल्या प्रतिसाद मध्ये प्रश्न विचारले होते.
माहिती गार ह्यांनी सविस्तर उत्तर दिलेच आहे.
सुरवातीला बाधित लोकांची संख्या खूपच कमी होती आणि त्यांना बाकी समाजापासून वेगळे सुद्धा केले होते.

तरी विषाणू पसरतो म्हणजे साखळी ची अजुन एक कडी असावी जी उजेडात नाही .
असे मला सुचवायचे होते.
विज्ञान वर माझा विश्वास आहे वेगळा अर्थ काढू नये.

तरी विषाणू पसरतो म्हणजे साखळी ची अजुन एक कडी असावी जी उजेडात नाही .
असे मला सुचवायचे होते.

जागतिक व्यापार कमी असलेल्या आणि आंतरराष्ट्रीय प्रवास कमी असलेल्या एखाद्या समुहात हा वीषाणू दबून आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकांच्या लक्षात न येता अस्तीत्वात असण्याची कमी असली तरी शक्यता राहतेच. किंवा चीनच्या विशीष्ट डॉक्टरच्याही तो उशीरा लक्षात आलेला असू शकतो. जर चीनी डॉक्टरला शंका वाटली नसती तर न्युमोनीआचा एखादा प्रकार म्हणून मृत्यू नोंदवले जात राहीले असते आणि चिनी डॉक्टरा लक्षात येण्याच्या आधीही अनेक रुग्णांचा प्रवास झालेला नसेलच असे नाही म्हणजे प्रसार आधीपासूनच चालू झाला पण जेनेटीक संशोधन आणि वाढीव टेस्टींग नंतर वेगाने रडारवर आला असे असू शकते.

बाकी साधी सर्दीची साथ पसरु शकते तेवढ्या सहजतेने हा वीषाणू पसरु शकतो, सर्दी विकारांकडे सर्वसाधारणपणे कमी धोकादायक समजून दुर्लक्ष केले जात होतेच . आजार जाहीर झाल्या नंतर पण त्यात बहुतेक देशांनी मी लेखात म्हटल्या प्रमाणे अंगात ताप असलेले सोडून इतर सर्वांना जाऊ दिले. भारतातील लोकल मधील आणि इतर अनेक ठिकाणची गर्दी, ते मुंबईची लोकल ते युरोमेरीकेतील २० २५ मजल्या पेक्षा अधिक उंच इमारतींच्या लिफ्ट्सचा विचार करा. मग धार्मीक कार्यक्रम ते लग्न आणि पार्ट्या ते युरोमेरीकन आणि आफ्रीकन संस्कृतीतील शुक्रवार संध्याकाळ/रात्रीच्या पार्ट्या आल्या. प्रसार दोन महिने आधीच झालेला असेल तरी आजार बळावण्यास पुरेसे असावे.

बाकी चीन ने मुद्दाम घडवल्याची शक्यता मला फारशी वाटत नाही.

Prajakta२१'s picture

9 May 2020 - 11:11 pm | Prajakta२१

@सचिन -अनेक राजकीय हेतूने प्रेरित मते लोकांमधे एक प्रकारचा भयगंड पसरवीत आहेत. लॉकडाऊन मुळे कोरोना नष्ट होणार नसून फक्त लांबणार आहे, आणि आपल्याला कोरोनसह जगावे लागणार आहे, हे जनमत तयारच होऊ शकलेले नाही. >>>>>>>>>>>>>>>>ह्याच्याशी सहमत

बऱयाच जणांशी फोनवर बोलताना कधी संपणार सगळे आणि परत नॉर्मल होणार हाच प्रश्न आहे

परत नॉर्मल म्हणजे आधी वागत होतो तसेच वागण्यातले बदल ह्याबद्दल कोणी चकार शब्द काढत नाही

lockdown मुळे किती नियंत्रण आले असे बरेच जण म्हणत आहेत पण आरोग्यव्यवस्था पुरेशी नसल्यामुळे लोकडाऊन ची वेळ आली ह्याबद्दल कोणी बोलत नाही तो वेगळा विषय आहे

मास्क रोजच्या जगण्याचा भाग बनवावा लागेल आणि श्वसन उत्सर्जन करताना (शिंकणे,खोकणे )रुमाल किंवा अन्य आवरण वापरावे लागेल ह्याची कुठेच जाणीव नाहीये

आत्ता घरात बसून असलेल्यांपैकी तरी किती जण शिंकताना खोकताना सावधानी बाळगत असतील हा प्रश्नच आहे (आम्ही तर घरात बसलोय ना हि मानसिकता )

परत जे हे पा ळत असतील त्यांना न पाळणार्यांमुळे होणारा मानसिक त्रास आणि ते पाळत नाहीत तर आम्ही तरी का पाळू अशा वृत्तीला जन्म देणे हे पण घातकच (हि वृत्ती तयार होऊ न देण्याची मोठी जबाबदारी सगळ्यांवर आहे )

अजून-काही ठिकाणी भयगंड एवढा वाढलाय कि शेवटी भयगंड बेफिकिरीत परिवर्तित होण्याची पण भीती वाटते एका लिमिट नंतर जाऊ दे ना जे व्हायचे ते होईल असा विचार मूळ धरू लागतो

@माहितगार जी - आपल्या सूचनांशी सहमत पण अंमलबाजवणी होत नाहीये चांगल्या चर्चेबद्दल धन्यवाद

@राजेश १८८- हाच प्रश्न पडला आहे रोज एवढे वाढणारे आकडे आणि जिथे काही तशी शक्यता नाही तिथे हि रोग पोचलेला पाहून आपल्या सिस्टिम मध्ये ऑलरेडी काहीतरी असावे आणि परदेशातील व्यक्ती/किंवा बाधितांच्या संपर्कात आल्यामुळे ते उफाळून वर आले असावे असे वाटते

अवांतर-कालच सरकारने आयुर्वेदाला औषोधोपचार /संशोधन करण्यास परवानगी नाकारली अशी बातमी वाचली (लोकसत्ता पण आत्ता लिंक सापडत नाहीये )

टर्मीनेटर's picture

13 May 2020 - 11:24 pm | टर्मीनेटर

काही प्रमाणात सहमत पण

lockdown मुळे किती नियंत्रण आले असे बरेच जण म्हणत आहेत पण आरोग्यव्यवस्था पुरेशी नसल्यामुळे लोकडाऊन ची वेळ आली ह्याबद्दल कोणी बोलत नाही तो वेगळा विषय आहे

हीच सत्य परिस्थितीती आहे. आरोग्य सुविधांच्या बाबतीत तसं बघितलं तर खूप मागासलेला आहे आपला देश! पण केवळ लॉक डाउन मुळे त्या आपुऱ्या व्यवस्थेत देखील प्रगत/ विकसीत देशांनाही मागे टकुम खंबीरपणे उभा आहे आपला देश! रोग प्रसाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पण पुढे उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्याचे बळ ह्या आपुऱ्य अवस्थेत संबंधित कर्मचाऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना देण्याचे काम चोख बजावले आहे ह्या लॉकडाउनने!

पाहिले विषाणू बाधा होवू नये म्हणून काळजी घेणे.
त्या मध्ये,
मास्क , santizer,अंतर राखणे,भाज्या फळं हे santize करणे
हे सर्व करावे लागेल.
त्याच बरोबर विषाणू ची बाधा झाल्यावर तो कमीत कमी शरीराचे नुकसान करेल ह्या साठी प्रयत्न करणे त्यामध्ये
नियमित व्यायाम,प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार ( इथे आयुर्वेदाचे ज्ञान वापरवेच लागेल.).
हे दोन प्रकार आले.
आणि तिसऱ्या टप्प्यात विषाणू बाधा झाल्यावर उपचार .
हॉस्पिटल वर जास्त बोजा येवू नये म्हणून ज्यांना काहीच त्रास नाही आणि मोठ घर आहे त्यांना घरीच उपचार देणे.
रोज व्हिडिओ कॉल द्वारे उपचार,आणि रोग्याची माहिती घेवून औषध सुचवणे.
जे जास्त serious aahet त्यांनाच हॉस्पिटल मध्ये भरती करून घेणे..
सरकारी vilagikaran मध्ये संशयित लोक असतात आणि सुविधा कमी असते .
त्यामुळे इथे बाधा होण्याची शक्यता वाढते त्याच बरोबर corona बद्द्ल भीती पण निर्माण होते.
शक्य आहे तिथे घरीच vilagikaran करणे योग्य.
त्या मुळे भीती कमी होईल आणि विषाणू विरूद्ध लढण्याची मानसिक तयारी पण होईल.

Prajakta२१'s picture

10 May 2020 - 11:05 pm | Prajakta२१

प्रतिबंधित क्षेत्रात १७ तारखेपर्यंत सर्व दुकानं बंद राहणार – महापालिका आयुक्त

पुणे शहरातील ६९ प्रतिबंधित क्षेत्रामध्ये आज मध्यरात्रीपासून ते १७ मेपर्यंत पूर्णपणे सर्व प्रकारची दुकानं बंद राहणार आहेत. त्या क्षेत्रात केवळ दवाखाने सुरु राहणार असून भाजीपाला, दूध हे पोलीस आणि महापालिका प्रशासन गरजेनुसार स्वतः पुरवठा करणार आहेत, असे आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढला आहे.

चौकटराजा's picture

11 May 2020 - 8:18 pm | चौकटराजा

चाचणीचे प्रकार किती ? करोना पॉझिटिव्ह म्हणजे नकी काय ? जसे ज्याची जेवणानंतरची साखर १४० चे वरदोन तसानी तीन अलग अलग वेळा असत तो मधुमेही तसे " करोना पॉझिटिव्ह" म्हणजे नक्की काय ?

चौकटराजा's picture

11 May 2020 - 8:45 pm | चौकटराजा

१. घशातील वा नाकातील द्रव घेतला जातो.
२.पी सी आर -पोलिमरेज चेन रिऍक्शन तंत्राने विशिष्ट व्हायरसचा आर एन ए ( रायबोज न्यूक्लिक ऍसिड ) हे जेनेटिक मटेरियल असेल तर टेस्ट पॉसिटीव्ह येते. यासाठी लक्षण दिसायलाच पाहिजे असे काही नाही !
३. लक्षणे असूनही टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते. कारण यात दिसणारी लक्षणे इतर आजारातही दिसतात.
४.टेस्ट साठीअपुरा म्युकस घेतला तर चुकीने टेस्ट निगेटीव्ह येऊन शकते.
५. विषाणूंच्या प्रवेशानंतर लगेच टेस्ट झाली असेल तर अपुऱ्या विषाणू मुळे रिपोर्ट निगेटीव्ह येऊ शकतो.
६- सर्वात महत्वाचे ---- विषाणू जीवाणू यान्च्याशी साम्प्रत चा वा सम्पलेला लढा याविशयी माहिती इम्युनोग्लोबिन्स ( एकूण ५ प्रकारचे अ‍ॅन्टी बॉडी ) याचे रक्तातील तसेच लिम्फ द्रवातील अस्तित्व टेस्ट करून विजय झाला आहे वा लढाई चालू आहे याचा मागोवा घेता येतो. सध्या जगात कोरोना विषाणू च्या बाबतीत अशी टेस्ट उपलब्ध नाही. सबब एखादा लढून औषध न घेता बरा झाला आहे हे खात्रीने सांगण्याचा मर्ग उपलब्ध नाही.

Prajakta२१'s picture

13 May 2020 - 10:22 pm | Prajakta२१

लोकसंख्या कमी असल्यामुळे बाऊ न करता स्वयंशिस्तीचे पालन करत लोक नॉर्मल जगत आहेत'
ह्या लिंकमध्ये बेल्जियम मधील एका मराठी गृहिणीने तिचा अनुभव मांडला आहे
https://www.esakal.com/pailateer/corona-virus-lock-down-india-and-belgiu...

वरील लेखात ट्रीटमेंट न घेता हि बरे झाल्याचा उल्लेख आहे अर्थात ते बेल्जियम मध्ये

https://www.esakal.com/pailateer/story-priyanka-jadha-giram-corona-switz...
ह्या अजून एका लिंकमध्ये स्वित्झर्लंड मधील अनुभव लिहिला आहे