मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माणसं अशी का वागतात?

चतुरंग · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
नात्यात असली एकमेकाच्या, तरी गोत्यात आणतात मला नेहेमी प्रश्न पडतो, माणसं अशी का वागतात? लहानगे भांडतात, क्षणात विसरुन एक होतात मोठेपणीच हेवेदावे, मनात धरुन का ठेवतात? वयानं मोठी होताना, विचारानं लहानंच राहतात सुशिक्षित होताना, सुसंस्कृत व्हायचं का विसरतात? परक्यांना जवळ करतात, कारण मोठी ठरतात कळत नसणार का त्यांना, आपल्यांत खोटी ठरतात? मानभावी वागत जातात, संभावित जगत जातात, त्याचा अर्थ असा नव्हता, असं कसं म्हणत राहतात? वर्षामागे वर्षे जातात, प्रेमाचे बंध विरुन जातात मनामधे मरत मरत अशी कशी झुरुन जातात? कुणाची गरज नाही, तेच मग ठरवून ठेवतात इकडे तिकडे चौकशी कशी बरं करत रहातात? दारातही मरणाच्या सल मनात धरुन ठेवतात धावा करायच्या वेळी, दावा कसा उभा करतात? मरणातूनही शिकत नाहीत, मग कधी शिकतात? मला नेहेमी प्रश्न पडतो, माणसं अशी का वागतात? चतुरंग

वाचन 8920 प्रतिक्रिया 0