महाराष्ट्र लॉकडाऊन : नियम, माहिती, मनुष्य स्वभाव आणि गमतीजमती,

धडपड्या's picture
धडपड्या in काथ्याकूट
26 Mar 2020 - 1:23 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी...
गेले 5 वर्षे इथला सदस्य आहे, पण ऍक्टिव्ह लिखाण कधी केले नाही...

पण आता सध्या आजूबाजूला चाललेल्या घडामोडी पाहून, आणि आमचा त्यात सहभाग पाहून, हा धागा काढावा, अशी सूचना आली...

गेल्या महिन्यात भारतात कोरोना चा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर जगभरात या विषाणूने जे थैमान घातले, ते पाहता शासन आणि प्रशासनाने वेगवेगळे निर्णय घेत, अखेर देश लॉकडाऊन करण्यापर्यंत परिस्थिती आली आहे...

या काळात मला पोलीस प्रशासनासोबत काही काळ काम करायची संधी मिळाली आहे...
त्या निमित्ताने अनेक तर्हेच्या लोकांशी संबंध येतो आहे...
मनुष्यस्वभाव आणि विचित्रपणा या कडे जरा तिरक्या नजरेने पाहायचा हा प्रयत्न...

पण या सोबतच या धाग्याच्या निमित्ताने आणखी एक गोष्ट करूयात...
बऱ्याच लोकांना नवे नवे नियम, बंदी याबाबतीत वेगवेगळ्या समाज माध्यमांतून निरोप येत असतात...
त्याची शहानिशा प्रत्येकाला करणे जमेलच, असे नसते...
त्या शंका, अडचणी इथे मांडा...
त्यांचे यथाशक्ती निरसन करण्याचा प्रयत्न करेन...

उदघाटन म्हणून कालचा एक किस्सा टाकतो...

सकाळी लवकर फुलबाजारासाठी गर्दी झालेली...
सामान्य लोकांनी लोकल लोकांकडून घेणं जास्त प्रीफर केलेलं, पण बंगले वगैरे सजवायची हौस असलेल्या लोकांची गर्दी होती...

फुलवाल्यांना एकमेकांपासून किमान 15 फूट अंतर सोडून बसवलेलं.. त्यामुळे त्यांच्या नेहमीच्या पार्किंगच्या जागांवरून भांडणे चालू झाली...

सगळ्या गाडी मालकांना हाकलून लावलं.. बाजारापासून लांब 4-5 किमी लांब गाड्या लावून चालत यायला लावलं... जेणेकरून कंटाळा करून परत येणे टळतील... पण नाही...
त्यातपण नेहमीची हॉटेलं चालू आहेत का, हे पाहत येणारे महाभाग होते...

फुलबाजारात लोकांना रांगा करायला लावल्या, तर आधी माल पाहू, आणि मगच खरेदी करू म्हणणारे सुद्धा सापडले... त्यांना समजावलं, भाऊ मिळतेय ते घे, आणि घरी पळ...
यावर ग्राहकाचे हक्क वगैरे भाषण झोडायला लागले...

त्यांना कलम 144 आणि 3 महिन्याची कैद यावर प्रवचन द्यावं लागलं...

जर सुशिक्षीत लोकांकडूनच असे वर्तन होणार असेल, तर सामान्य लोकांनी काय करायला हवे?

प्रतिक्रिया

palambar's picture

26 Mar 2020 - 2:40 pm | palambar

हे मी पण observe केले, ज्यांच्या कडे भरपूर आहे व घरात माणसेही कमी आहेत तेच लोक
सगळीकडे गर्दी करून सामान घेत आहेत.
सगळ्यांचे फ्रिज गच्च भरलेले असतात. तरी साठा
करण्याची वृृृृृत्ती असते. काही जणी दुकानदाराला वेळ नाही तरी साॅस या कंपनीचा नको त्याच कंपनीचा हवा म्हणून वाद घालतात. लोकांना कशाचेच गांभीर्य नाही.

चैन आणि जीवनावश्यक यातला फरक अजूनही लोक लक्षत घेत नाही आहेत...

जर सुशिक्षीत लोकांकडूनच असे वर्तन होणार असेल, तर....... बँकिंग सारख्या सेवा क्षेत्रात तीन दशकांहून अधिक काळ काम केल्याने या प्रकारचे वर्तन सुशीक्षितांकडूनच होते याचा अनुभव आहे. अशिक्षित वा अल्पशिक्षीत लोक साधारणपणे सांगितलेले ऐकतात. महापालिकेच्या उद्यानात फिरायला, चालायला येणारे लोक सर्वसाधारणपणे सुशिक्षित असतात. चालतांना थुंकणे(तेही बऱ्याचदा घशातून विचित्र, किळसवाणे आवाज काढत), फुलझाडांची फुले कळ्या ओरबाडणे हे सर्व ही तथाकथीत सुशिक्षित माणसे नित्यनेमाने करत असतात.
चांगला धागा आहे, आणखी अनुभव, किस्से येऊ द्या.....

धडपड्या's picture

26 Mar 2020 - 4:01 pm | धडपड्या

अगदी खरं आहे काका...
काल सकाळी बाजारात सुशिक्षितांचा मुजोरपणा पहिला...

आणि दुपारी एका भाजीविक्रेत्या माउलीने स्वतःच्या हाताने बनवलेल्या पुरणपोळ्या ड्युटीवरच्या पोलिसांना खाऊ घालतानाही पाहिलं...

धडपड्या's picture

26 Mar 2020 - 3:56 pm | धडपड्या

सकाळी एक कॉल आला...
एक स्त्री एका पोलिसाला चावली म्हणून...

धावतपळत जागेवर पोहोचलो...
फारसं सिरीयस वगैरे नव्हतं...
कारण विचारलं काकूंना...
काल सणसुद असून सुद्धा काहीच गोडधोड करायला मिळालं नव्हतं.. त्यामुळे घरचे वैतागले होते...

शेवटी घरच्यांचे चेहरे पाहून या काकू घरातून बाहेर पडल्या.. एरियातल्या प्रसिद्ध हलवायाच्या दुकानातून त्यांना कुठल्याही परिस्थितीत चक्का किंवा श्रीखंड मिळवायचं होतं...

पण पोलिसांनी त्यांना अडवल्याने वैतागून पोलिसाच्या हाताला चावल्या...!!

चौकस२१२'s picture

26 Mar 2020 - 5:04 pm | चौकस२१२

काही विचित्र निर्णय ...
सध्या जगभरच्या मुख्यमंत्री/ पंतप्रधान यांना कंबर कसून काम करावे लागते आहे... त्यात कधी काही विचित्र निर्णय घेतले जातात ... सध्या येथील चर्चेत असलेले निर्णय
पंतप्रधान नॅशनल कॅबिनेट ( म्हणजे संकटकालीन मंत्रालय कि ज्यात विरोधी पण आहेत ) रोज भेटतात आणि रात्री पंतप्रधान देशाला संबोधतात ..
सर्वांनी १.५ मीटर चे अंतर एकमेकांच्यात ठेवावे हा तर नियम केला आहे
- सर्व केशकर्तनालयावर ३० मिनिटे प्रत्येकी जास्तीत जास्त असा निर्बंध घातल्या ची घोषणा केली ... मग त्या "इंडस्ट्री " ने आक्षेप घेतल्यावर निर्णय फिरवला
( पण वरील १.५ मीटर चा नियम केस कापताना कसा काय पाळणार बुवा? झाड कापण्याची लांब दांड्याची कात्री वापरायची कि काय! )
- मयताला जास्तीत जास्त १० jane आणि लग्नाला जास्तीत जास्त ५ जाणे जमू शकता

तेजस आठवले's picture

26 Mar 2020 - 5:09 pm | तेजस आठवले

केस घरीच कापा. ट्रीमर असल्यास केस कापायलाही वापरता येतो. :)

चौकटराजा's picture

26 Mar 2020 - 5:44 pm | चौकटराजा

केस कापणे अत्यावश्यक नाही . सध्या करोना च्या काळात कपाल भाती , अनुलोम विलोम करा माझे केस बघा काही फरक पडत नाही .
आपला ... बाबा रामदेव

धडपड्या's picture

26 Mar 2020 - 6:22 pm | धडपड्या

सरकारची प्रायोरीटी तुम्हाला जगवणे ही आहे...
त्या अनुषंगाने घेतलेले निर्णय आहेत हे..

अर्थात तुम्हाला तुमचा न्हावी भरवशाचा वाटत असेल, तर तुम्ही त्याला घरी सुद्धा बोलवू शकता केस कापून घ्यायला...

धडपड्या's picture

26 Mar 2020 - 6:26 pm | धडपड्या

दोन दिवसातल्या भटकंतीचा अनुभव फारच विचित्र वाटला...
सगळ्यात महत्वाचे म्हणजे योग्य वेळी टॉयलेट सापडणे, आणि भुकेच्या वेळी काही खायला मिळणे...

फार विचित्र अवस्था होते..
आपल्याला ज्यांना ज्यांना शक्य असेल, त्यांनी त्यांच्या जवळ बंदोबस्तासाठी उभे असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना किमान पाणी आणि एखादा बिस्कीट पुडा द्यावा...
आणि जमत असेल तर नैसर्गिक विधीसाठी सोय उपलब्ध करून द्यावी....

धडपड्या's picture

26 Mar 2020 - 7:13 pm | धडपड्या

65-70 चे आजोबा ईव्हीनिंग वॉक ला बाहेर निघालेत...
पोलिसांनी पकडलं...

चार दिवस झाले घरात बसून आहे... अजून थोडा बसलो, तर बोच्याला फोड येतील म्हणत आहेत...

त्यांना साहेबानी सांगितलं, बोच्याला फोड आले, तरी किमान जिवंत रहाल... करोनाची लागण झाली, तर आणखी 4 लोकांना घेऊन मराल...

आजोबा म्हणताहेत, मी नियमित कपालभारती, प्राणायाम, जमेल तशी योगासने करतो... मला काही होणार नाही...

उगा काहितरीच's picture

26 Mar 2020 - 7:37 pm | उगा काहितरीच

सरकारने बिग बास्केट , ग्रोसर्स सारख्या सेवादात्यांना सेवा देण्याची परवानगी द्यायला पाहिजे. त्यांनी त्यांच्या डिलीव्हरी करणाऱ्या लोकांना व्यवस्थित मास्क, गॉगल,सॕनिटायजेशन ची सुविधा द्यायला हवी. असं केल्यामुळे लोकं अत्यावश्यक सेवांच्या दुकानात गर्दी करणार नाहीत. कोरोनाचा धोका कमी होईल. लोकांना बाहेर निघायची काही गरजच उरणार नाही. (औषधे , डॉक्टर वगैरे गोष्टी वगळता)

चौकटराजा's picture

26 Mar 2020 - 7:54 pm | चौकटराजा

बिग बास्केट सकट अनेकाशी बोलणी चालू आहेत. सुरक्षित अशी प्रणाली निर्माण करून घरपोच किराणा ,भाजी दूध मिलेल. सोशल सिस्टंसिग चा प्रोब्लेम तालूका लेव्हल पर्यंतच येईल /

Nitin Palkar's picture

26 Mar 2020 - 8:06 pm | Nitin Palkar

पूर्णपणे सहमत.

Nitin Palkar's picture

26 Mar 2020 - 8:06 pm | Nitin Palkar

पूर्णपणे सहमत.

धडपड्या's picture

26 Mar 2020 - 8:07 pm | धडपड्या

या संदर्भात डी मार्ट आणि बिग बझार वाल्याने आज घोषणा केली आहे... जर 25000 रुपयांपेक्षा अधिक मागणी तुमच्या सोसायटी मधून झाली, तर ते समान सोसायटीत आणून देतील...
पण यात नफेखोरीचा भागच जास्त आहे...

बिग बास्केट वगैरे लोकांना मनुष्यबळ अधिक लागतं डिलिव्हरी साठी... त्यावर तोडगा काढणे चालू आहे..

NiluMP's picture

26 Mar 2020 - 10:09 pm | NiluMP

+१००

सौन्दर्य's picture

26 Mar 2020 - 10:48 pm | सौन्दर्य

आमच्या येथे (ह्युस्टन, टेक्सस स्टेट) सर्वात आधी टॉइलेट पेपर्सचे दुर्भीक्ष्य जाणवायला लागले. स्थानिक लोकं त्यासाठी फारच आकांडतांडव करताना दिसले. पाण्याने देखील 'ते' काम होऊ शकते हे जणू ह्यांच्या गावीच नाही. तोच प्रकार सॅनिटायझरचा, साबणाने २० सेकंद हात धुतले तरी चालू शकण्यासारखे असताना सॅनिटायझर संपूर्ण अमेरिकेत भरपूर डिमांड आणि शॉर्टसप्लायमध्ये आहे. केमिस्ट शॉप्समध्ये थर्मामीटर्स देखील मिळत नाहीत.

गरजेपेक्षा अधिक साठा करण्याच्या वृत्तीमुळे (ह्याला कोणीही अपवाद नाही) दूध, ब्रेड, अंडी, बॉटलवॉटर, ह्या गोष्टी प्रत्येकी एक ह्याच प्रमाणात विकल्या जातात.

पण ह्या सर्व संकटात एक अतिशय चांगली गोष्ट दिसते ती म्हणजे कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंचे भाव जराही वाढलेले नाहीत.

सुमेरिअन's picture

27 Mar 2020 - 1:43 am | सुमेरिअन

गोऱ्या लोकांनी किमती नाही वाढवल्या, पण इंडियन स्टोअर्स वाल्यांनी भाव वाढवलेत ना.. कणकेच्या वगैरे किमती वाढल्या आहेत..
बाकी ते टॉयलेट पेपर्सच गणित मला पण नाही कळलं.. :D

चौकस२१२'s picture

27 Mar 2020 - 4:20 am | चौकस२१२

"पाण्याने देखील 'ते' काम होऊ शकते हे जणू ह्यांच्या गावीच नाही."
हो अगदी बरोबर.. "वाहत्या पाण्याने धुणे" या मागील शास्त्र "घाण शरीरापासून ढकलून देणे " हा आहे हे कसे काय पटत नाही कोण जाणे
अजून एका विचित्र सवय पाश्चिमात्य संस्कृतीत ती म्हणजे
भांडी/ थाळ्या धुताना एका बेसिन मध्ये साबणाचे गरम पाणी आणि दुसऱ्या बेसिन मध्ये नुसते गरम पाणी आणि भांडी एकदा ह्याच्यात आणि मग त्याच्यात बुचकळायची.. आणि मग एक तर वाळवायची किंवा फडक्याने पुसायची...
यात २ ऱ्या भांड्यापासून दोन्ही बेसिन मधील पाणी खराब होते आणि साबणाचा अंश त्या भांड्यवनवर राहतो...
वाहते पाणी वापरेल तर हे होत नाही.. हे समजत नाही समाजाला
मागे एकदा शहरातील गॅस पुरवठा १५ दिवस बंद होता ( त्या शहरात बहुतेक गॅस हा नळाद्वारे पुरवला जातो , बाटली द्वारे नाही आणि गॅस नुस्ताचह सैपाकाला नाही तर , घरात गरम पाणी सर्व नळांना २४/७ असण्यासाठी अशी रचना त्यामुळे जीवन त्यावर अवलंबून )
शॉवर ला गरम पाणी नाही मग इलेकट्रीक केटल द्वारे पाणी गरम करायचे ... आणि बहुतेकांकडे "बादली" नसल्यमुळे बाथ टब मध्ये ते टाकायचे इथपर्यंत ठीक...पण मग हार्डवेवर किंवा कॅम्पिंग च्या दुकानातून पंप आणि लटकावण्याचे शॉवर आणून असा शॉवर उभा करायचा ...
मी म्हणले अरे एवढा द्राविडी प्राणायाम करण्यापेक्षा बदली आणि एक वाडगा घ्या आणि आशियाई लोक ( भारतीय , जपानी ) जसे खाली बसून अंघोळ करतात तशी करांना !
आणि हे सुद्धा इंजिनीरिंग डिपार्टमेंट मध्ये ...!

रम्या's picture

1 Apr 2020 - 10:32 am | रम्या

(खुप वर्षानी लिहितोय.)
हे सगळं सोडा.... मी आमच्या सोसायटीतील एका आदरणीय ज्येष्ट आजोबांना तोंडावरचा मास्क बाजूला करून उघड्यावर शिंकाताना पाहिले आहे... आता बोला.
मास्क बाजुला करून थुंकणारे तर अमाप आहेत. या सगळ्यात वयस्कर आघाडीवर असल्याचं सहज दिसते.
एवढ्या मोठ्य प्रमाणात प्रमाणात प्रबोधन, नियम करूनही लोकांना कळत नसेल तर त्यांना मुर्ख का म्हणू नये?