अच्छे दिन

Nitin Palkar's picture
Nitin Palkar in काथ्याकूट
23 Jan 2020 - 10:04 pm
गाभा: 

जेनेरीक औषधे हा थोडासा दुर्लक्षित विषय. माझ्या बघण्यातील अनेक डॉक्टर्स त्या विषयी काहीसे आकसानेच बोलताना ऐकलंय. आमच्या फॅमिली डॉक्टरांचं वक्तव्य, 'परदेशी औषध कंपन्यांचे योग्यता चाचणी निकष किती काटेकोर असतात, या देशी कंपन्यांचा काय भरवसा?' मी त्यांना विचारलं, जर पंत प्रधान स्वतः 'प्रधान मंत्री जन औषधी योजना' या नावाने ही योजना राबवत असतील तरीही त्यांचे निकष भोंगळ असू शकतील का'?'
आमच्या घराजवळ अलीकडेच दोन जेनेरीक औषधांची दुकाने सुरु झालीयत. त्या पैकी एक भारतीय प्रऔद्योगिकी संस्थेच्या (IIT Bombay) सहकार्याने. नित्योपयोगतील काही औषधे काल तिथून खरेदी केली. सवयीप्रमाणे कॅश मेमो घेतला. ₹५६८/- छापील किमतीची औषधे १०५/- रुपयांना मिळाली.
पेट्रोलच्या किमती दररोज वाढतायत, सर्वच माध्यमातून त्यावर चर्चा होतायत. पण आपली देशाच्या एकूण पेट्रोल वापरापैकी जवळ जवळ नव्वद टक्के पेट्रोल आपण आयात करतो, त्यामुळे पेट्रोलच्या दरांवर आंतर राष्ट्रीय प्रभाव असतो हे कोणीही लक्षात घेत नाही.
प्रचंड नफेखोरी करणाऱ्या मुजोर परदेशी कंपन्यांना चाप लावून नागरिकांना परवडणाऱ्या भावात औषधे उपलब्ध करून देणे हे 'अच्छे दिन'च्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे असं मला वाटतं.

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

24 Jan 2020 - 7:46 am | कुमार१

सहमत .

मुक्त विहारि's picture

24 Jan 2020 - 10:25 am | मुक्त विहारि

सहमत आहे

शा वि कु's picture

24 Jan 2020 - 11:22 am | शा वि कु

अगदी सहमत

mayu4u's picture

24 Jan 2020 - 12:44 pm | mayu4u

निर्मात्यांवर गुणवत्ता टिकवण्या साठी निर्बंध हवेत. बाकी बहुतेक औषध कंपन्या प्रचंड नफेखोरी करतात हे उघड गुपित आहेच. "रोश विरुद्ध अ‍ॅडम्स" हे पुस्तक आणि त्यावर मिपा वरची लेखमाला वाचल्यावर एका भयाण वास्तवाची जाणीव झाली.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

24 Jan 2020 - 2:41 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

मोदी सरकारचा स्तुत्य उपक्रम.

माझ्या बघण्यातील अनेक डॉक्टर्स त्या विषयी काहीसे आकसानेच बोलताना ऐकलंय

कारण बहुतांशी डॉक्टराना औषधी कंपन्यांकडुन 'कट' मिळतो.

टर्मीनेटर's picture

24 Jan 2020 - 5:58 pm | टर्मीनेटर

सहमत आहे.

Nitin Palkar's picture

24 Jan 2020 - 8:10 pm | Nitin Palkar

सर्व प्रतिसाद दात्यांना धन्यवाद
_/\_

ट्रम्प's picture

24 Jan 2020 - 11:17 pm | ट्रम्प

उत्कृष्ट विषय !!
मी सुद्धा जेनरिक औषधेच खरेदी करत असतो, इतक्या दिवस महागडी औषधे खरेदी करून खिसा खाली करणारे भाजप विरोधक या अत्यंत चांगल्या उपक्रमा बड्डल कौतुक मात्र करणार नाहीत ,
या धाग्यावर इकडे फिरकणार नाहीत .

Nitin Palkar's picture

25 Jan 2020 - 10:48 am | Nitin Palkar

धन्यवाद ट्रम्प,
निवडक जाणकारांचा प्रतिसादही उत्साहवर्धक असतो.
_/\_

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

26 Jan 2020 - 12:33 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

जपानी औषधी कंपनीचे गुजरातध्येच पायघड्या घालून स्वागत होतेय ,त्याला भा ज पा विरोधक तरी काय करणार रे ट्रम्पा?
https://www.deshgujarat.com/2020/01/23/japanese-ambassador-to-india-inau...

समीर वैद्य's picture

27 Jan 2020 - 1:37 am | समीर वैद्य

कंपनी भारतात उत्पादन करणार असल्यास निर्यात पण करता येते.... जेणे करून आपल्या देशाला परकीय चलन मिळवता येईल.
रोजगार निर्मिती होईल ती वेगळीच......

सत्य असतो. पण ते पुर्ण सत्य मात्र नसते. फार थोडे म्हणजे साधारण दोन टक्के वैद्यकिय व्यवसाईक प्रामाणीक माहिती देतात. जसे दुधामधे पाणी घालुन विकणारे गवळी असतात तसेच औषधाच्या कंपनी मधे पण चालते. त्यामुळे जेनेरिक औषधे खरेदी करतांना Knoll. Helios. Cipla. Abbott. Wallace. Micro. German remedies. Glenmark. Intas. Alkem अशा औषधी कंपन्यांचीच शक्यतो खरेदी करावीत.

मराठी कथालेखक's picture

25 Jan 2020 - 6:02 pm | मराठी कथालेखक

या जनरिक औषधांची MRP आणि विक्री किंमत यात इतकी जास्त तफावत का असते ? जर ही औषधे स्वस्त आहे तर MRP च का कमी ठेवली जात नाही. काहीच्या काही MRP ठेवून मग विक्रेत्यांनी सूट द्यावी असा काहीसा जो प्रकार आहे तो मला तरी फारसा पटत नाही. कारण मग नेमकी किती सूट द्यावी (किंवा द्यावी अथवा नाही) हे सगळंच विक्रेत्याच्या मर्जीवर अवलंबून राहतं आणि ग्राहकाला फायदा मिळेल किंवा नाही हे अनिश्चित होतं.

Nitin Palkar's picture

25 Jan 2020 - 7:35 pm | Nitin Palkar

धन्यवाद जा लो
_/\_

Nitin Palkar's picture

25 Jan 2020 - 7:39 pm | Nitin Palkar

धन्यवाद मराठी कथालेखक,
चांगला मुद्दा. हा प्रश्न मलाही पडला होता. पण आळसापोटी अधिक खोलात शिरलो नाही. अधिक माहिती काढण्याचा प्रयत्न करेन.
प्रतिसादाबद्दल आभार.
_/\_

औषधे हि एक कमोडिटी आहे. वैद्यकिय व्यवसाय हा एक धंदा आहे. इतर व्यवसायात असते तशीच ह्या मधे स्पर्धा आहे. त्यामुळेृृ विक्री साठी तीन पध्दती वापरल्या जातात.
१. demand pull. ह्यामधे जाहिरातीद्वारे थेट ऊपभोक्त्याला म्हणजेच गिर्‍हाइकाला वस्तु/औषध विकले जाते. ह्यात नफ्याचे प्रमाण दहा टक्क्याच्यावर दुकानदाराला नसते. ऊदाः झंडु बाम, डाबर शिलाजीत, क्रोसीन, अॅनासीन, व्हिक्स 500 वगैरे.

२. demand push ह्यामधे दुकानदाराच्या नफ्याचे प्रमाण पंचवीस टक्क्याच्या पुढे वाढवुन त्याला कंपनिची औषधे काऊंटर विकण्यास ऊद्युक्त केले जाते. ऊदाः अडुळसा, शतावरी कल्प, सितोपलादी चुर्ण, खोकल्याची औषधे,, सर्दीची औषधे.

३. डाॅ. लाच/कमिशन/कन्सलटेशन फी/ विवीध अॅक्टिव्हिटी,आमिषे,प्रलोभन देवुन प्रिसक्रिपशन लिहीण्यास भाग पाडणे. ऊदाः विवीध अॅंन्टिबायोटिक्स, रक्तदाब, मधुमेहाची, दम्याची,औषधे ह्यात येतात त्याला तोंड देण्यासाठी जेनेरिक म्हणवली जाणारी ब्रॅन्डेड औषधे भारतीय बाजारात आलीत, वास्तविक भारतीय कायद्यामधे जेनेरिक औषधांची व्याख्या केलेली नाही आहे, त्यामुळे त्यांना ब्रॅंन्डेड जेनेरिक अशी धेडगुजरी संज्ञा आहे.

कंजूस's picture

25 Jan 2020 - 7:43 pm | कंजूस

यावर लेख येऊन गेलेत.

माझ्या मते डॉक्टरांना काही सांगू नये. /आदेश देऊ नये.
A)
A1) आपण रोग सांगितला,
A2) त्यांनी तपासणीतून निदान केले आणि औषधे दिली.
A3) ती केमिस्टकडून घ्यावीत.
विषय संपला.
B)हे पटलं नाही तर -
B1) डॉक्टर बदला
B2) उपचार पद्धती बदला.

C) डॉक्टरने दिलेल्या औषधांचा गुण येतोय पण दीर्घकाळ घेण्यासाठी परवडत नसेल तर
C1) दिलेल्या औषधांपैकी जी महाग आहेत त्याचे पर्यायी जिनेरिक काय आहे ते केमिस्टला विचारून विकत घ्यावे. पण याचे बिल केमिस्ट देणार नाही. फक्त प्रिस्क्रिप्शनचेच औषध दिल्यास बिल मिळते.
C2) समजा वरचा C1 उपाय लागू पडला तर अधूनमधून जिनेरिक ड्रग आणू खर्च कमी ठेवता येईल.

थोडक्यात आपल्या हातात काय आहे ते करावे. शेवटी उपाय होणे महत्त्वाचे आहे .

Nitin Palkar's picture

27 Jan 2020 - 8:21 pm | Nitin Palkar

कंजूस
अतिशय मुद्देसूद प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुम्ही उपस्थित केलेल्या C) मुद्द्याबद्दल :
‘पण दीर्घकाळ घेण्यासाठी परवडत नसेल तर’ हा मुद्दा धाग्यासंदर्भात अप्रस्तुत वाटतो...
बहुतेक डॉक्टर्स त्यांना मिळणाऱ्या कट/कमिशन साठी परदेशी कंपन्यांची / महागडी औषधे लिहून देतात, विकत घ्यावयास लावतात.
तेच प्रिस्क्रिप्शन जेनेरिक औषधांच्या दुकानात दाखवल्यास त्याच (ब्रान्डेड) औषधातील साहित्य (ingrediants) असलेले भारतीय कंपनीचे औषध मिळू शकते. जे ब्रान्डेड औषधाच्य तुलनेत खूपच स्वस्त असते. त्याचे बिल केमिस्ट देतोच.
C2) बाबत - अधूनमधून जिनेरिक ड्रग आणू खर्च कमी करणे या पेक्षा योग्य आणि स्वस्त औषधांचा पर्याय उपलब्ध असताना डॉक्टर्स स्वतःच्या फायद्यासाठी जेनेरिक औषधांविरुद्ध मत व्यक्त करतात, रुग्णांच्या मनात संभ्रम उत्पन्न करतात. हे अयोग्य आहे असे सांगणे आहे.

चौकस२१२'s picture

31 Jan 2020 - 12:58 pm | चौकस२१२

जेनेरिक औषधे म्हणजे नक्की कोणती याचा जर पूर्णतः आधी स्पष्ट झालं तर हि चर्चा गोंधळ ना होता पूर्ण होईल
एक क्षण "भारतीय आणि अभारतीय मोठ्य्या उद्योजगांनी" बनवलेली हा मुद्दा बाजूल ठेवूया
कारण असे कि भारताबाहेर हि "जेनेरिक औषधे" हा प्रकार आहे आणो तिथे हि दोन्ही मध्ये किमतीत तफावत असते ...मग तिथे हा प्रश्न पडतो का? ग्राहकाला ?
तर अनुभवावरून असे म्हणेन कि याचे उत्तर "काहींना पडतो काहींना नाही" ( इतर बाकी देशातील अनुभव असलेली मंडळी यात त्यांचा अनुभव सांगू शकतील)

प्रथम हे कि ब्रँडेड असो कि जेनेरिक एखाद्या देशात दोन्ही औषदच्या उत्पादन पद्धती वर सारखेच निर्बंध असतात ( असले पाहिजेत ) त्यामुळे तसं पाहिलं तर दोन्हीत गुणधर्मात काही फरक नसावा ..
ब्रँडेड औषधे म्हणजे ज्या उद्योगाने खूप खर्च करून सर्वात प्रथम एखाद्या औषधाचाच शोध लावला व २० वर्षे टिकणारे पेटंट घेतली ती व ते पेटंट संपल्यावर कोण्ही इतर उत्पादक तेच औषध उत्पादित जरूर शकतात आणि या इतर उद्योगावर अर्थातच सुरवातीचं शोध करण्याच्या खर्च नसल्याने साहजिकच ते स्वस्त असू शकते
आता याचा परिणाम त्या औषधाचं उंवाटत्तेवर हतो कि नाही हे मात्र एखादा तान्या सांगू शकेल
अर्थात कोणत्याही एकसारख्या उत्पादनात जसे किमती वर त्या त्या उद्योहगच्या मूळ खर्चाचा (ओव्हरहेड ) परिणाम होतो तसेच आहे आणि ग्राहक म्हणून आपण जसे काही ब्रँड ची उत्पादने डोळे शकुन घेतो तसे या बाबतीत हि होऊ शकते
एक वेळ आपण कपडे किंवा इतर वस्तू घेताना ब्रँडेड कशाला वैगरे विचार करू शकतो पण अर्थात हे सर्व औषध या सारखया जीवन मरणाशी निगडित असलेल्या गोष्टीबद्द्दल असल्यामुळे हा प्रश्न गंभीर होतो

चौकस२१२'s picture

31 Jan 2020 - 1:03 pm | चौकस२१२

अजून एक गोष्ट .. त्या त्या देशातील नियम आणि आर्थिक गरज या प्रमाणे "डॉक्टर नेहमीच स्वार्था साठी महागडी औषधे लिहून देतो" हे सर्व जगभर लागू होईलच असे समजू नये
काही देशात डॉक्टर ने " असे केले तर त्याचा परवाना जाऊ शकतो" एवढे कडक नियम असतात आणि काही देशात नसतात !
थोडक्यात काय कि माणूस जर खाऊन पिऊन सुखी असले तर असले मार्ग त्याला पत्करावे लागत नाहीत ...