कूर्ग डायरीज १

अभिरुप's picture
अभिरुप in भटकंती
6 Jan 2020 - 7:13 pm

कूर्ग डायरीज

बरेच दिवस माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या मनात होते कि कुठे तरी बाहेर फिरायला जावे पण ठिकाण नक्की होत नव्हते. तसा माझा प्रवासाचा अनुभव मर्यादितच आहे. माझा बहुतेक प्रवास हा माझ्या गावाच्या आजूबाजूलाच जास्त झाला आहे म्हणजे सातारा , पुणे ,सोलापूर आणि कोल्हापूर व कोकण इतकाच. मुळात मला स्वतःला फिरायला खूप आवडते. कॉलेजला असताना पिकनिक आणि ट्रेकिंगमुळे काही पर्यटनस्थळे फिरण्याचा योग्य आला होता , अर्थात तो अनुभव सुद्धा भन्नाटच होता. परंतु गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर कुटुंबासमवेत प्रवास हा मर्यादित स्वरूपाचाच राहिला. त्यामुळे हि सहल प्लॅन करणे थोडे कठीणच वाटत होते. हो ना करता डिसेंबर २०१९ मध्ये काहीही करून जायचेच असे ठरले... नव्हे नव्हे बायकोने ठरवायलाच लावले आणि शोध सुरु झाला भारतातील उत्कृष्ट पर्यटनस्थळांचा.

आंतरजालावर खूप शोधाशोध केल्यानंतर काही स्थळे शॉर्टलिस्ट केली,उदा. कुलू मनाली, केरळ, कूर्ग, आणि राजस्थान. शेवटी कूर्ग ला जाण्याचे आम्ही सर्वांनी नक्की केले आणि विमानाची तिकिटे आणि हॉटेल्स बघायला सुरुवात केली. खूप माथेफोडी करून मदिक्केरी या कूर्ग मधील जागेत वसलेल्या प्रशांती रिसॉर्टला राहण्याचे ठरवले आणि बुकिंग सुध्दा करून टाकले. दि. २७ डिसेम्बर ते ३१ डिसेम्बर ची तारीख नक्की करून विमानाची तिकिटे आरक्षित केली. प्रशांती रिसॉर्टच्या हरीश जी यांनी फिरण्यासाठी गाडीही अरेंज करून दिली. हे सर्व सोपस्कार किमान सहली आधी १ महिना १० दिवस केले आणि मग फक्त इंतेजार ..... मुंबई ते कूर्ग प्रवासाचा.

प्रतिक्रिया

मकरंद घोडके's picture

9 Jan 2020 - 12:45 pm | मकरंद घोडके

मी ही जावे म्हणतोय कूर्ग ला

अभिरुप's picture

13 Jan 2020 - 2:13 pm | अभिरुप

खुपच छान आहे कूर्ग. किमान ७ दिवस राहिलात तरच कूर्ग छानपैकी पाहता येइल.