एपिक चॅनेल वरील एक उल्लेखनीय मालिका

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
10 Jan 2020 - 8:38 pm

एपिक चॅनेल वरील एक उल्लेखनीय मालिका
कलियुग - एक आरंभ
दिनांक १८ नोव्हेंबर पासून एपिक या चॅनेल वर रात्री ८.३०वाजता "कलयुग - एक आरंभ " या नावाची अतिशय उत्तम मालिका सुरु झाली आहे. मालिका ऍनिमेशन प्रकारात मोडत असली तरी लहानांसोबत मोठ्यांनीही आवर्जून बघावी अशी हि मालिका आहे. उलट मोठ्यांना त्यातले संदर्भ पटकन कळतील. आम्ही देखील जरा उशिराच हि मालिका बघायला सुरवात केली. पण आता मात्र सर्वाना हि मालिका बघण्याची विनंती करतो. महाभारतावर आधारित अशी हि मालिका आपल्याला अनेक विचार करायला भाग पाडते.

साधारणपाने माझ्या आठवणीत तिसरी किंवा चौथीला इतिहास नामक गोष्टीच पुस्तक आम्हाला होत. त्यात कृष्णाच्या जन्मापासून गोष्टी सुरु होऊन जयद्रथ वधापर्यंत गोष्टी होत्या. त्या शेवटच्या धड्यातील " अर्जुना, हा सुर्य आणि हा जयद्रथ " हे एक वाक्य अगदी मला कायम आठवत. कदाचित महाभारत सिरीयल जास्तच मनापासून बघितल्यामुळे असेल पण सगळ्या गोष्टी पटल्या होत्या. कृष्ण अर्थातच ग्रेट वाटला होता.यथावकाश मोठे होत गेल्यावर इतर अनेक कादंबऱ्या वाचनातआल्या. महाभारतातील गोष्टी आणखी आणखी आवडत गेल्या. एक एक गोष्ट मनात घर करून बसली. महाभारत म्हणजे १०० कौरव आणि ५ पांडव यांचं युद्ध ज्यात पांडव जिंकले आणि कौरव हरले, हे आता माझा ८ वर्षाचा मुलगादेखील सांगू शकतो. पण त्यात कितीतरी गोष्टी, रहस्य दडलेली आहेत जी आपल्याला माहित नसतात. "मृत्युन्जय" आणि "राधेय " या दोन्ही माझ्या अतिशय आवडत्या कादंबऱ्या आहेत. मूळ महाभारत मी वाचलेलं नाही. पण या संदर्भात इतरही अनेक कादंबऱ्या जशा कि युगंधर,धनंजय आणि इतर वाचल्या आहेत. आणि मला अजूनही आवडतात अशी सगळी पुस्तके. कादंबरीतल्या गोष्टी ह्या खऱ्या नसतात हे माहित असून देखील त्यात खूप छान तर्हेने गुंतायला होत. आणि म्हणून मनाची पकड घेणाऱ्या या कादंबऱ्या मला खूप आवडतात. पण तरीही मृत्युन्जय आणि राधेय या सगळ्यात वरचढ ठरल्या. खलनायक भासणारा कर्ण नुसता साईड हिरो नसून मेन हिरो वाटायला लागला. अनेकदा वाचताना वाटे, दुर्योधनाचा काय चुकलं ? काही ठिकाणी अहंकाराने मत्त होऊन त्याच्या हातून चुका झाल्याचं. त्या अजिबात क्षम्य नाहीत. पण म्हणून पांडव पूर्णपणे निर्दोष नाही होत. केवळ कायम कौरवांना व्हिलन करून काय मिळालं ? पांडव कायम गुणी आणि कौरव कायम दुष्टअसाच का मनावर बिंबवलं गेलं ? कौरवांची बाजू कधी कोणी मांडलीच नाही . चुकीची सही पण त्यांच्या बाजूने कोणी बोललाच नाही.

या मालिकेत मात्र कौरवांची चांगली बाजू मांडली आहे. प्रत्येक वेळी कृष्णाला पुढे करून काही ना काही वेगळ्या मार्गाने पांडव हे युद्ध जिंकले. जो कि पु लं च्या भाषेत 'रडीचा डाव' होता. कर्ण सर्वोत्तम असून त्याला कायम पांडवांपासून दूर ठेवणे, ऐन युद्धाच्या वेळेस त्याच नातं सांगून पांडवांना त्याच्यापासून सुरक्षित करून घेणे, त्याची कवच कुंडल काढून घेणे, गुरु द्रोणाचार्यांना अश्वत्थामा मेला असे सांगून फसवणे, शिखंडीला पुढे करून भीष्मांचा वध करणे आणि असे अनेक प्रकार पांडवांनी केले. या मालीकेत असे अनेक प्रश्न विचारले जातात आणि शक्य तिथे उत्तरेही दिली जातात.

आता २ दिवसापूर्वीचा एपिसोड छान होता. युद्धाचा निकाल लावण्यासाठी कौरवांकडून दुर्योधनाला बोलावलं जातं. आणि कोणत्याही एका पांडवांशी युद्ध करण्यास सांगितलं जात. दुर्योधन भीमाची निवड करतो कारण दुर्योधन स्वतः गदायुद्धात पारंगत असतो. त्यामुळे तो युद्ध नियमानुसार बरोबरीच्या भीमाची निवड करतो. गदायुद्ध चालू असताना निर्णय घेण्यासाठी मात्र दुर्योधन बलरामाला येण्याची विनंति करतो कारण कृष्ण नेहमीच पांडवांची बाजू घेत असतो, तर बलराम हा भीम आणि दुर्योधन दोघांचाही गुरु असल्याने निःपक्षपणे निर्णय देईल याची दुर्योधनाला खात्री असते. नियम तोडून भीम दुर्योधनाच्या कमरेखाली मांडीवर प्रहार करतो. आणि बलराम चिडतो. दुर्योधन नियमाप्रमाणे युद्ध करत असताना भीम मात्र नियम मोडतो आणि बलराम दुर्योधनाला विजयी घोषित करत. पण नेहमीप्रमाणे कृष्ण पांडवांची बाजू घ्यायला लागतो. कौरवांनी कसा अन्याय केला याची उदाहरणं देताना कायम अभिमन्यूच्या मृत्यू आणि द्रौपदी वस्त्रहरण हेच पुढे करतो. बलराम मात्र हे ऐकून घेत नाही. चक्रव्यूह भेदण्यासाठी १८ वर्षाच्या अभिमन्यूला पांडव पाठवतात . तिथे त्याचा मृत्यू झाला यास कौरव कसे जबाबदार?असे बलराम विचारतो. तसंच मुळात द्रौपदीला पणाला लावणारा धर्म चुकीचा नाही मात्र दुर्योधन चुकीचा हे कसं असही बलराम विचारतो. प्रत्येक वेळी हे दोन मुद्दे पुढे करून कौरवांनी कसा अन्याय केला हेच दाखवलं जातं. पण मुळात पांडव देखील नियमाने काहीच करत नसतात. हे आपल्याला कुठेतरी पटत. अन्याय हा कायम पांडवांवर नाही तर कौरवांवर पण झालेला असतो.

मालिकेचे ऍनिमेशन खूप छान तर्हेने केले आहे. कुठेही भडकपणा न करता मोजकेच रंग वापरून सुंदर आकृत्या उभ्या केल्या आहेत. एकीकडे मागून निवेदक आपल्याला गोष्ट सांगत असतो. युद्धाने सुरवात करून त्यात अनेक कथा गुंफल्या आहेत. मध्येच युद्ध मध्येच त्याला अनुसरून पाठची एखादी कथा अशी रचना आहे. निवेदक शैलेंद्र पांड्ये आहे. संथ तरीही स्पष्ट आणि पटणारं असं निवेदन कथेनुसार चालू राहात. सुरवातीला जाहिरात करतानाच ट्रेलर मध्ये म्हटलं आहे, कि इतिहास नेहमी विजयी पक्षाच्या बाजूने लिहिला जातो. हि गोष्ट फक्त धर्म अधर्म यांची आहे कि हा एक दृष्टिकोन आहे ? नक्की पांडव बरोबर होते कि त्यांच्या सुद्धा हातून चुका झाल्या ?पण सर्व कौरव मारले गेल्याने उरलेले पांडव सांगतील तीच खरी कथा मानावी लागली असं तर नाही ना ?असे काहीसे प्रश्न मालिका आपल्याला विचारते आणि अंतर्मुख करते.

आताच्या सासूसुनेच्या फालतू मालिकांच्यामध्ये हि मालिका खूपच उठून दिसते आणि संम्पूर्ण कुटुंबासह बघण्यासाठी नक्कीच चांगली मालिका आहे. आम्ही हि मालिका आवर्जून बघतो. तुम्ही देखील या मालिकेचा एखादा तरी भाग बघाच आणि मग पुढे बघायची कि नाही ठरवा .

मुक्तकशिफारस

प्रतिक्रिया

थोडक्यात काय तर फुरोगामी इकडे पण घुसले आहेत तर!!

गोंधळी's picture

10 Jan 2020 - 9:35 pm | गोंधळी

या आधी धर्मक्षेत्र ही मालिका बघितली आहे. महाभारतातील प्रत्येकाला चित्रगुप्त सभेत (कोर्टरुम ड्रामा टाईप) बोलाउन त्याच्यावर आरोप ठेवत व यावर ते पात्र त्याची बाजु मांडत.

अनन्त अवधुत's picture

11 Jan 2020 - 12:28 am | अनन्त अवधुत

धर्मक्षेत्र ही मालिका खुप चांगली आहे. चुकवु नये अशी. मृत्युनंतर कौरव, पांडव, आणि इतर प्रमुख पात्र (द्रोणाचार्य, कर्ण, कृष्ण, ईत्यादी) चित्रगुप्ताच्या सभेत आहेत. चित्रगुप्त एकेकाला बोलावुन त्यावर आरोप लावतो आणि ते पात्र त्याला उत्तर देतात अशी संकल्पना आहे.

धर्मक्षेत्र सीरियल सुरेख संकल्पना होती. त्यातील महाभारतातील पात्रे तू असे का वागला(ली)स? असे विचारून आपापसातील वैचारिक मतभेद सादर करताना हो माझी चूक झाली. असे म्हणताना दिसतात. श्री कृष्णाला कधी कधी मधे पडून त्यांनी ते वागणे कसे बरोबर किंवा चूक होत असे म्हटले आहे. त्या मालिके पुरता विचार करता श्री कृष्ण हा दैवी पुरुष आहे असे मानले गेले आहे.

महाभारतात काय घडलं ते कथानक आहे. कोण कधी बरोबर वगैरे समर्थन देत लिहिलेले नसणार. नंतरच्या काळात कुणाकुणाचे देवत्वकरण करत महाभारत सादर करण्याची प्रथा पडून गेली. लेखकांची चूक/दोष आहे.

लहान मुलांना ऐकलेलं खरं वाटत जातं.

नंतरच्या काळात कुणाकुणाचे देवत्वकरण करत महाभारत सादर करण्याची प्रथा पडून गेली.

अतितीव्र सहमत.
बाय द वे.

श्रीकृष्णाचा उल्लेख, महाभारताच्या आधी कधी आढळतो का ?

नाही आढळत. महाभारतात कृष्णाचा पहिला उल्लेख हा द्रौपदी स्वयंवराच्या वेळी येतो. कृष्णचरित्रासाठी हरिवंश किंवा खिलपर्व लिहिले गेले आहे जे आज महाभारताचाच भाग समजले जाते अर्थातच ते नंतर लिहिले गेले आहे.

गणेशा's picture

11 Jan 2020 - 12:39 pm | गणेशा

Apic चॅनेल मी आवडीने पाहतो,
एकांत, कहानी कही सुनी आणि राजा रसोई आणि.. ह्या मालिका माझ्या आवडीच्या मालिका आहेत..

तुम्ही जे बोलता आहात ते चित्र काढून महाभारत सांगत असतात ते आहे का? ते चांगले आहे पण तेच तेच ते रिपीट करतात कायम असा अनुभव आहे.
वेगळे म्हणत असाल तर पाहतो नक्की..

धर्मराजमुटके's picture

14 Jan 2020 - 8:46 pm | धर्मराजमुटके

जुनी रामायण / जुने महाभारत मालिका कोणाकोणाला आठवते ? युट्युब वर फेरफटका मारता मारता ही मुलाखत बघीतली. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.