BS3 ते टेस्ला

लॉरी टांगटूंगकर's picture
लॉरी टांगटूंगकर in तंत्रजगत
14 Apr 2017 - 7:00 pm

आजचे प्रेरणास्थानः हा धागा. चर्चा बी एस थ्री मधून सुरु होत ईलेट्रीक गाड्यांवर गेलेली आणि त्यावरून प्रदूषणावर घसरलेली. त्या संदर्भाने अजून काही.
l1
हा फोटो गेल्या वर्षीच्या ब्लूमबर्ग बिझनेस मधला आहे. फोटो मधील व्यक्ती लक्षात आल्या असतीलच, नसल्यास ते दोघं म्हणजे बफेट आणि इलॉन मस्क आहेत. लेखाचं नाव होतं "हू ओन्स द सन", सूर्यावर मालकी कोणाची? आजच्या लेखाचा विषय बफेट किंवा इलॉन मस्क नाहीये. दोघांच्याही कंपन्या सोलार एनर्जीवर काम करत आहेत आणि एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभ्या आहेत. त्यांच्यातील स्पर्धा हा एक वेगळा विषय म्हणून आत्ता बाजूला सोडू. पण एकंदर या पाठीमागील दिसणारे विदाबिंदू आणि त्यांचे भविष्यकालात दिसू शकणारे परिणाम याच्याकडे बघण्याचा हा प्रयत्न आहे. पाठीमागील विदाबिंदू आणि निरिक्षणे यांच्यावर आक्षेप असण्याचे कारण नसावे. भविष्यकाळाबद्दल आपण वेगवेगळी मते- मतांतरे ठेऊ शकतो आणी एकमेकांची मते मान्य नसली तरी हरकत नाही. मी इथे बंदूक चालवतांना टोनी सेबा या हार्वर्ड प्रोफेसरच्या खांद्यावर ठेउन चालवणार आहे.

विषयाला हात घालण्याआधी भूतकाळातील काही ढोबळ पॅटर्नकडे नजर टाकू..
आपण आज गाणी कशी ऐकतो?
गाना.कॉम, यु ट्युब किंवा फारच आवडलं तर मोबाईलची इंटरनल मेमरी.

पंचवीस-तीस वर्षापुर्वी आलेल्या ७८ आरपीएम च्या रेकॉर्ड्स, नंतर कॅसेट्स , सीडी आणि आता थेट ऑनलाईन स्ट्रीमिंग असा हा प्रवास आहे. प्रत्येक बदला बरोबर गुणवत्ता सुधारली आहे, किंमत कमी झालेली आहे. आणि वापर अर्थातच वाढला आहे.
l2
उजवीकडच्या फोटो मधे दिसणारी प्रत्येक गोष्ट आज खिशात आहे. पाठीमागे वळून बघतांना हे सर्व स्पष्ट आणि उघड वाटतं आहे ना?
कदाचित हे तितकसं उघड नसावं. किमान इतिहास तसं दाखवत नाही.कोणत्याही प्रकारचे बदल "तज्ञ" आणि इन्डस्ट्री इन्सायडर्सनी सहज स्वीकारले नाहीयेत.
उदाहरणा दाखल बघा.
l3
आता जिथून सुरुवात झालेली तो मुख्य विषय गाड्या आणि एनर्जी.

टेस्लाच्या ईलेक्ट्रीक गाड्या तुफान लोकप्रिय आहेत. ईलेक्ट्रीक कार ही कल्पना म्हणून नवी अजिबात नाहीये. पण टेस्लासाठी काही गोष्टींनी फार भरभक्कम पाया तयार केला आहे. आणि त्यांनी खेळाचे नियमच ब‌द‌ल‌ले आहेत.
या गाड्यांना टेस्ला अमर्याद किलोमीटर्स ची वॉरंटी देत आहे. याचं कारण कारमध्ये असलेले कमीत कमी भाग. टेस्ला मॉडेल एस मध्ये फक्त १८ हलणारे भाग आहेत. तुलनेसाठी म्हणून बघितलं तर सामान्य गाडी मध्ये ही संख्या दोन हजाराच्यावर असते.
l4
गाडीची ताकद आणि परफॉर्मन्स. फेरारी वगैरे सुपरकार्सच्या वर जाणारे स्पेक्स टेस्ला कडे आहेत. उदा. या टेस्लाच्या टॉर्क कर्व्ह ची स्टॅबिलिटी निव्वळ पप्पी घेण्यासारखी आहे.
l5
इथे पण निर्विवाद विजेतेपद.
वायरलेस चार्जिंग- दुकानात खरेदी चालू आहे आणि गाडी स्वतःच चार्ज होते आहे. पंप वगैरेवर जाण्याचीच गरज नाही. एक चार्ज ; सलग तीनशे वीस किमी. पुणे-मुंबई-पुणे न थांबता न चार्ज करता शक्य आहे.
गाडीत पेट्रोल जळणार नाही तर वीज प्रकल्पावर कोळसा जाळला जाईल. प्रदूषणाची पातळी तिथेच, असं वाटतं आहे काय? इथे मुख्य खेळ बदलतो आहे.
गेल्यावर्षी सोलर एनर्जी संदर्भाने काही अशक्य वाटणारे आकडे दिसण्यास सुरुवात झालेली. २,८५ ते ३ रुपये या युनिट या दराने वीज निर्मिती शक्य झालेली आहे. (घरगुती वापरासाठीचे दर साडे सात- आठ रेंज मध्ये आहेत). गुगल स्वत:ची वीज स्वत: बनवते आहे. इंफोसिस मोठ्या प्रमाणात वीज स्वत: बनवते आहे. या दादा कंपन्या म्हणून सोडल्या तर दुबई आणि ओमान सारखे देश सोलार एनर्जी कडे वळलेले आहे. तेल उपशाला वापरली जाणारी वीज सोलार एनर्जी मधून आलेली आहे.
वीजेची ग्राहकाला द्यावी लागणारे किम्मत निर्मितीमुल्याच्या जवळ असण्याचे कारण म्हणजे गळती नाही. सोलर सेल्स मधून वीज निर्मीतीची किंम्मत कमी आहे आणि अजून कमी होते आहे. स्टोरेजच्या बाबत लिथिअम आयॉन बॅटरीची किंम्मत उतरत चालली आहे आणि गुणवत्ता वाढत आहे. (*टेकीज नी तळटीपा पहाव्यात.) या दोन्हीचा परिणाम म्हणजे वीज अत्यंत स्वस्तात बनवता येते आहे आणि साठवता सुद्धा येते आहे. काही देशांत रुफ टॉप ची किंम्मत ही वीज वाहतुकीच्या खर्चापेक्षा कमी झालेली आहे. जर बाकी कंपन्यांनी पारंपारिक पद्धतीने हा खेळ खेळला तर पैसा गमावण्याची स्पर्धा लागेल.
असाच एक खेळ पारंपारिक पद्धतीने कोडॅकने खेळला होता. स्कोरकार्ड आपल्या समोर आहेत..
l6
आता हे सगळं आम्रिकेत ठीके, पर कॅपिटा करकचून प्रदूषण करा; दाबून पैशे खिशात ठेवा आणि जगाला ग्रीन पीस छाप धडे द्या. आपल्याला इमर्जिंग इकनॉमीज मध्ये राहून हे कसं जमणार? आपण आत्ता कुठे आहोत?
आपल्या देशातील सोलार कपॅसिटी ३०-४०% रेट ने वाढत आहे (तळटीप पहाणे). टोनी सेबाच्या म्हणण्यानुसार २०३० मध्ये संपूर्ण जग सोलार पावरवाले होईल. भारतीय सरकारच्या अंदाजानुसार आपण किमान ४०% वर असू.
परत पहील्या चित्राकडे जाऊ. बफेट विरुद्ध ईलॉन मस्क. बफेटबुवांची सतरा बिलियन्सची गुंतवणूक रिन्युएबल एनर्जी मध्ये आहे. त्याच्या कंपन्या सरासरी वीज किंमतीच्या अर्ध्या किंमतीत वीज बनवून विकता आहेत आणि प्रॉफिटेबल आहेत. ईलॉन मस्क प्रॉफिट्स दाखवत नाहीये. पण सोलार सिटी ही त्याची ग्रुप कंपनी सोलार रुफ टॉप्स बनवते. घरावर येणार्‍या प्रकाशापासून थेट वीज निर्मीती. दोघंही वेगवेगळ्या गाड्यांमध्ये आहेत पण ही रेस एकाच रस्त्यावर आहे.

आणि मॉडेल एस घेतांना अप्रत्यक्ष प्रदूषण केले जाईल असं वाटतं असेल तर तसं तितकं वाटून घ्यायची गरज नाही. :)

तळटीपा.
लिथिअम आयॉन बॅटरीची किंम्मत ( 16% दरवर्षी घट )आणि गुणवत्ता वाढ (सध्या ५% दरवर्षी; याहून जास्त अपेक्षा आहेत.). दुसर्‍या चित्रात सोलार सेल्स उतरणार्‍या किंमती.
l7
सोलार पीव्ही कपॅसिटी जागतिक :
l8
Ref- Tony seba , clean disruption
l9
Solar installations in India.
l10

ref-live mint official

टोनी सेबा सोडल्यास वर्तमानपत्रे, ब्लूमबर्ग वगैरे मधून संदर्भ घेतले आहेत. उत्साही लोक्स हवं असल्यास या पुस्तकाकडे नजर टाकू शकतात.

प्रतिक्रिया

फावल्या वेळात टेस्लाचा बाप तयार करून पुन्हा दिमाखात परतला असता, हकनाक गेला बिचारा.

ब्लु प्रिण्ट्स ओपन सोर्स करुन स्वतःलाच आव्हान निर्माण करण्याची वृत्ती असलेला इलॉन सफरचंदाला मुठीत आवळण्याच्या वृत्तीच्या स्टीव्ह पेक्षा कधिही सरस आहे... (असं मला वाटतं)

जॉनविक्क's picture

10 Dec 2019 - 7:41 pm | जॉनविक्क

प्रत्यक्ष प्रॉडक्ट्स वापरले आणी मग मत बदलले गुणवत्ता व सुटसुटीतपणा म्हणजे सफरचंद.

जसे आजही नोकियाच्या N71 मॉडेल च्या 5MP ने घेतलेले फोटो मिड रेंज अँड्रॉईड फोनच्या 12Mp च्या तुलनेत उजवे व सरस असतात, तसेच आजही iPhone पेक्षा डबल config असलेल्या हाय एंड फोनचे फोटो iPhone पुढे रद्दी वाटतात भलेही ऑन पेपर सर्व काही आधुनिक व जास्त ताक्तीचे दिसो.

गुणवत्तेत जॉब्स पेक्षा सरस कोणीच नाही, हे माझे मत. पण अर्थात आता तो नाही त्यामुळे सर्वच चर्चा जर तरच्या होतील त्यामुळे हो आपल्या मताचा मला आदर आहे असे नमूद करतो.

मोबाइलच्या जगात अ‍ॅपलने शब्दशः क्रांती आणली हे खरं आहे. पण मला सॅमसंगचे हाय-एण्ड फोन्स काहि उणे वाटत नाहि आयफोन पेक्षा. सतत क्वालकॉमला चिकटुन बसलेले सफरचंद आणि पार इंटेल, टी.आय. सोबत फ्लॅग्शीप मॉडेल काढणारे अ‍ॅण्ड्रॉइड यापैकी मला अ‍ॅण्ड्रॉइडची इनोव्हेशन सरस वाटते. गुणवतेचं म्हणाल तर मस्क इज मस्त :ड

आपल्याही मताचा आदर आहेच. किंबहुना अशाच चर्चेने चार बर्‍या गोष्टी आमच्या कानावर पडतात. हॅप्पी २०२०.