शह काटशह

खिलजि's picture
खिलजि in काथ्याकूट
25 Nov 2019 - 11:52 am
गाभा: 

सध्याचे जे राजकारण / खुर्चीखेच चालू आहे ते पाहता , मी स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणवून घ्यायची लाज वाटू लागली आहे .. निषेध व्यक्त करण्यापलीकडे माझ्या हातात काहीच नाही आहे ..

१) कितीही झालं तरी महारष्ट्रातील सत्ता , पवार या नवभावतीच फिरते , हे पुन्हा सिद्ध झालंय . मग ते श्री अजित पवार असो किंवा श्री शरद पवार ..

२) उद्धव ठाकरेंनी , बाकी असेल तर ठाकरी बाणा दाखवून , शिवसेना हि सत्तेसाठी कधीच नव्हती , ती मुळात जन्माला आली होती ती सामान्य माणसाच्या हक्काच्या लढाईसाठी . हे दाखवून द्यावं .. तरच त्यांची उरलेली सुरलेली ( जर काही बाकी असेल तर आणि तरच ..) लाज राहू शकते .. खुर्ची नाही मिळाली तरी हरकत नाही , पण मुंबईकरांच्या लढ्यासाठी , शिवसेना मुंबईत असणे , गरजेचे आहे .. विरोधात राहूनही , चांगले काम करू शकतो . त्यासाठी सत्ताच कशाला हवी ? पण हे अजून तरी त्यांना जमले नाही आहे , आणि पुढे जमेल याची शक्यताही वाटत नाही आहे ..

३) आमदार राखण्यात काय हशील आहे ? ज्याला जायचे आहे तो जाईल आणि राहायचे आहे तो राहील .. उगाच कोंबडीवानी सर्व पिल्लं पंखाखाली हैत कि नाही याची काळजी घेणं , हा ठाकरी बाणा नव्हे .. अहो जागवा त्या आठवणी गतकाळातल्या .. त्यातून शिकण्यासारखं बरंच आहे ...

४) श्री शरद पवारांच्या ताब्यात एव्हढी सारी आमदार मंडळी असणे , हे कधीही धोकादायक असू शकते .. त्या माणसाला ब्रम्हदेवही ओळखू शकणार नाही तर तुमची आमची काय भिशाद.. सर्वात चाणाक्ष नेता / लोकनेता सध्याच्या घडीला महाराष्ट्रात शरद पवारच आहेत ..

तेव्हा जरा सांभाळून पावले टाका .. नाहीतर पुढे तेलही गेले तूपही गेले , हाती आले धुपाटणे .. अशी अवस्था होऊ शकते .. हे झाले माझे मत , जे मी पाहिल्यान्दाच या धुळवडीच्या भाग घेऊन चर्चा करत आहे , पण तुमची मतेही वेगळी असू शकतात . ती इथे मांडली तर उत्तम .. पण एक मात्र नक्की , पुढील मतदानात आवर्जून भाग घेणार आणि नकाराधिकार वापरणार .. हे लेकाचे समजतात काय आपल्याला ..

प्रतिक्रिया

सगळा बाजार मांडलाय या राजकारण्यांनी गेले महिनाभर. मलाही वाटते की पुन्हा निवडणूका लादल्या तर जनतेने "नोटा " वापरावा. बसू द्या ह्यांना बोंबलत घरी. जमेल तेव्ह्ढा राष्ट्रपती राजवटीचा अनुभव घेऊ.

ट्रम्प's picture

26 Nov 2019 - 6:47 am | ट्रम्प

माझ्या वयोवृद्ध आई वडिलांनीं टी व्ही वरील बातम्या पाहुन ! ( कॉंग्रेस चोर , ते 15 लाख , राजघराणशाही ) गेल्या पाच सहा वर्षातील निवडणुका मध्ये कमळा वर शिक्का मारला .
त्यांना मला सांगावे लागले नाही की भाजपलाच मतदान करा .
आता शपथविधिचा गोंधळ पाहुन, उद्विग्न होवून या पुढे मतदान करणार नाही , असा त्यांनी पण केला आहे . म्हणजे भाजप ची हक्काची दोन मते गेली .
कमी अधिक प्रमाणात सगळी कडे अशीच परिस्थिति होण्याची शक्यता वाटते , मतदान करने हे पवित्रकाम न राहता मुर्खपणा चे लक्षण वाटायला लागले आहे .

आयुष्यभर शेतीत काबाडकष्ट केले असल्यामुळे
त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत जिव्हाळा होता ( मेट्रो , बुलेट ट्रेन बाबत नाही ) आणि नेमके त्याच विषयावर कुठलाही पक्ष गंभीर दिसत नाही .
त्यामुळे जर पुन्हा निवडणूक लादली गेली तर मतदान खुप कमी होणार आणि भाजप ला फटका बसणार .

जालिम लोशन's picture

25 Nov 2019 - 2:37 pm | जालिम लोशन

नोटा.

जॉनविक्क's picture

25 Nov 2019 - 2:47 pm | जॉनविक्क

उद्धव ठाकरेंनी , बाकी असेल तर ठाकरी बाणा दाखवून , शिवसेना हि सत्तेसाठी कधीच नव्हती , ती मुळात जन्माला आली होती ती सामान्य माणसाच्या हक्काच्या लढाईसाठी . हे दाखवून द्यावं ..

त्यांनी कधीच सेना संघटना म्हणून चालवली नाही पक्ष म्हणूनच हाताळली त्यामुळे... असो.

जनतेने रस्त्यावर उतरून राष्ट्रपती राजवटच असावी यासाठी आंदोलन करूनच भावना व्यक्त होउ शकतात. यानिमित्ताने भाजपाने प्रथमच जनादेश उघड उघड दुर्लक्षित करत सत्तेचा माज काय असतो हे दाखवून दिले बाकीचे जसे आहेत तसेच वागत आहेत.

चौकस२१२'s picture

28 Nov 2019 - 12:00 pm | चौकस२१२

भाजपाने प्रथमच जनादेश उघड उघड दुर्लक्षित...
कोणता जनादेश होता जरा नक्की सांगाल?
कोड्यात कशाला बोलताय ?

जॉनविक्क's picture

28 Nov 2019 - 1:07 pm | जॉनविक्क

कोणता जनादेश होता जरा नक्की सांगाल?

विरोधी पैलवानच नाही हा गोड गैरसमज प्रथम सोडून द्या, व स्वबळावर एकहाती सत्ता पुन्हा हाती देण्याइतकी चांगली कामगिरी आपली नाही अथवा देवेंद्रजी मोदींच्या इतके धडाडीचेही नाहीत अथवा त्यांच्या कामगिरीचा दीर्घकाळ मनात रहावा असा वैयक्तिक ठसाही उमटला नाही, तेंव्हा जुळवून घ्यायला शिका अन्यथा...

राजकारण yaa विषयावर आता बरेच बोलणे झाले .
जास्त सरळ ..परखड ..पुर्ण विश्लेषण हवे होते आता असे वाटले .

वेळ मिळाल्यावर परवा लिहितो ...तूर्तास पास

जॉनविक्क's picture

25 Nov 2019 - 4:10 pm | जॉनविक्क

वाट पाहत आहे

नक्कीच , उद्या etl मधून मशीन लर्निग ला जाण्यासाठी interview आहे , त्यामुळे बिझी आहे , project मिळाला तरी busy असेन , पण येईल संडे ला .. 30 km लांब जावे लागेल

जॉनविक्क's picture

26 Nov 2019 - 2:56 am | जॉनविक्क

मशीन लर्निंग रेकमेंडेशन इंजिन अल्गोरिदमधे काही मदत हवी असेल तर जरूर कळवावे

गणेशा's picture

26 Nov 2019 - 10:52 pm | गणेशा

सेपरेट मेसेज करतो

खिलजि's picture

25 Nov 2019 - 4:56 pm | खिलजि

@ बबन तांबे , जालीम लोशन

मीपण वैतागलोय आणि नोटा वापराने बघू काय फरक पडतोय का .. पण वापरणार एवढं नक्की ..

@ जॉन विकक

मित्रा शिवसेनेबद्दल आदर आहेच रे .. त्याला कारण उद्धध्व नाही तर त्यातीळ कार्यकतें आहेत . साल काही बोला .. बाळासाहेबांमुळे सर्व एक झाले .. अजूनही आमच्या इथे धडाडीचे कार्यकतें आहेत म्हणून तर ती टिकून आहे .. पण या उध्द्वल कोण सांगणार .. तो आपला कॉर्पोरेट राजकारण खेळात बसलाय .. अरे लोकशाहीची खरी ताकद लोकांमध्येच असते .. आता निवडणुका लागू देत ,, लोक बघ कशी दात तोंडात घालतील ते .. बाकी भागवत साहेबांचे विश्लेषण फार आवडले ..हे वे न सा

हस्तर's picture

25 Nov 2019 - 6:44 pm | हस्तर

https://youtu.be/CLUzgIURz24 गेम मस्त विदेओ

खिलजि's picture

26 Nov 2019 - 1:03 pm | खिलजि

१११

हा तमाशा आता लवकर संपवा अशी माझी पण इच्छा आहेच पण "सुसंकृत" महाराष्ट्रात ह्या पेक्षा भयंकर गोष्टी घडलेल्या आहेत , सध्याच्या अंगावर येतात आणि सतत आपण चिखलातूनच चालतोय असं वाटण्यामागे फक्त आणि फक्त मीडिया आहे ,भर पडलीये सोशल मीडिया ची

महाराष्ट्रात आत्ता राजकारण सोडून काहीच घडत नाहीये असाच भास निर्माण केला जातोय - आणि त्याला कारण पण आपणच सरळ सरळ गणित असतं TRP चं -

आणि बाकी सवाल राहिला पवारांचा , अमेझॉन च्या जंगलात एखादं पान गळालं तर त्याचा संबंध सुद्धा पवारांशी लावणारी जमात पैदा झालेली आहे.

तळटीप : नोटा म्हणजे "सगळे घरी" असा नसून अति भयानक आहे , नोटा चं गणित समजून घ्या

श्रिपाद पणशिकर's picture

26 Nov 2019 - 9:14 am | श्रिपाद पणशिकर

महाराष्ट्र छोडो मध्यप्रदेश संभालो ;)

ईधर दांव दिखाना कुछ और है और लगाना कुछ और :)

ग्वालियर च्या महाराजांनि आपल्या व्टिटर प्रोफाईल वर असलेली अफाट अशी माहिती काढुन फक्त "Public servant, cricket enthusiast" ठेवल्या मुळे बहुदा मल्लिकार्जुन खर्गे ह्यांना आपला खर्जातला आवाज आता
भोपाळ येथे खर्चण्याचि वेळ आलेली आहे. राजस्थान बद्दल हि बरेच गुर्हाळ सोशलमीडिया वर चालले असुन अजुन तरी ते फक्त हिअर & से ह्या तत्वात आहे.

आमच्या कॉलेज मध्ये एक मित्र सिगरेट चि जादु दाखवायचा सिगरेट ला हात हि न लावता त्याला रोल करायचा... बघणार्याचे सगळे लक्ष सिगरेट वर केंद्रीत करावयाचे मग हळूच कोणाचे लक्ष नाही हे पाहुन तो सिगरेट वर हलकी फुंकर मारायचा ;)

Let them see what you want them to see ;)

हम तुम्हारे अंदर ईतने छेद कर देंगे के समझ मे नहिं आयेगा ;)

ऐन्जाय माडि ;)

श्रिपाद पणशिकर's picture

26 Nov 2019 - 9:19 am | श्रिपाद पणशिकर

भय का माहौल है :- राजा रब्बिश कुमार

खिलजि's picture

26 Nov 2019 - 2:54 pm | खिलजि

आताची ताजा खबर .. उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचा राजीनामा आणि बहुधा देवेंद्र पण देणार हैत ..

जॉनविक्क's picture

26 Nov 2019 - 3:34 pm | जॉनविक्क

परंतु राजकारण असल्याने केविलवाणी अगतिकता असेच म्हणता येईल, पण तो धोकाही मी पत्करणार नाही व असे म्हणेन हे सर्व काकांनी आधीच ठरवले होते हो ;) लय डेंजर खेळया करतो, कधी काय करेल याचा नेम नाही.

कोर्टाने जनमताची व लोकशाहीची लाज राखली याबद्दल न्यायव्यवस्थेचे मनःपूर्वक अभिनंदन. अन्यथा...

दुधाच्या गाडीबरोबर शपथ घेणारे दुधनवीसही धारातीर्थी पडलेले हैत .. मानलं ,, भाय ,, पॉवर गेम ऑन...

उत्कृष्ट राजकीय तारतम्याचे प्रदर्शन साहेबांनी केले, साहेबांचे बरेच गुण उद्धव ठाकरे हळू हळू दाखवत आहेत, एक संघटना म्हणून सेनेची अस्तित्व दाखवायची क्षमताच वाचाळविरतेवर असल्याने उद्धव ठाकरे त्याला धक्का न पोचवता सुसूत्रपणे मर्यादित शक्यतेमधे चालू परिस्थितीचा अभ्यास करून उत्कृष्ट चाल निवडतात आणी ही बाब सेनेतील इतरांच्या गोंधळातून नेहमी झाकले जाते.

भाजपाने आतापर्यंत त्याच चुका केल्या ज्या काँग्रेसने मोदींना सत्तेपासून दूर ठेवायला केल्या सोप्या शब्दात त्याला जनमताकडे दुर्लक्ष करून थयथयाट , आतातायीपणा आणी सत्तेचा गैरवापर करायची प्रवृत्ती म्हणतात :) सर्वात जास्त जागा मिळणाऱ्या पक्षाची ही केविलवाणी अवस्था सेनेने केली आणी साहेबांनी त्यांचे राजकीय तारतम्य वापरून आतापर्यंत उत्कृष्ट चाली केल्या आहेत हे मान्यच करावे लागते.

आता लवकरच काकाभक्त ही सर्व साहेबांची भाजविरोधातील ध्रुवीकरण मजबूत करायची खेळी होती जेणेकरून आघाडीत कुरबुरी वाढल्या तर त्याची परिणीती कशात होऊ शकते याची झलक पहायला मिळाली जो सेना, काँग्रेसला समजून घ्यायला दिलेला अप्रत्यक्ष इशारा आहे की who is the boss ;)

mrcoolguynice's picture

26 Nov 2019 - 4:52 pm | mrcoolguynice

मी परत येणार.
मी परत आलो.
मी लगेच चाललो.
गलगले निघाले.........

फडणवीस गटाच्या कडून राबवण्यात येणाऱ्या प्रॉपगंडा मोहिमेला काऊंटर म्हणून , राबवण्यात आलेली "आम्ही १६२" मोहीम , आज सरकारने विश्वास दर्शक ठराव १६९ मतांनी जिंकला तेव्हा , भक्तांच्या लक्षात आली असेल.

चौकस२१२'s picture

26 Nov 2019 - 7:02 pm | चौकस२१२

काकांना खेळी करावीच लागली नाही पुतण्याने ताट वाढून पुढे केले ...आणि त्याआधी दुसऱ्या ताटात जाऊन त्यांचं ताटात घाण करून आला

शाम भागवत's picture

26 Nov 2019 - 9:21 pm | शाम भागवत

जबरदस्त ध्रुविकरण झालय.
महाराष्ट्रात आता भाजप व भाजप विरोधी असे दोनच पक्ष शिल्लक राहिले आहेत.

मुक्त विहारि's picture

27 Nov 2019 - 1:14 pm | मुक्त विहारि

+1

कुजबुज यंत्रणा व गुज्जू चाणक्यांची, लेंडी पातळ झाली, जेंव्हा सुप्रीम कोर्टाने आदेश दिला ... गुप्त मतदान नाही, रेकॉर्डिंग व लाईव्ह टेलेकस्ट...
तेंव्हाच यांचं पितळ उघड पडलं. घाबरले, सपशेल माघार घेतली.

तसं पाहिलं तर, तसा डाव मस्त टाकला होता बिजेपीने...
बिजेपीच्या राजकीय चतुर्या ला मानलं पाहिजे...
मजा आली गेल्या ४-५ दिवसात डाव प्रतिडाव पाहून...
मला तर गेम ऑफ थ्रोन पाहताना जस वाटायचं न, तसच काहीसं वाटलं.

जॉनविक्क's picture

27 Nov 2019 - 11:38 am | जॉनविक्क

मला तर गेम ऑफ थ्रोन पाहताना जस वाटायचं न, तसच काहीसं वाटलं.

अगदी, गॉट च्या प्रत्येक सिजनाचा फिनाले असाच असायचा :D

mrcoolguynice's picture

27 Nov 2019 - 2:07 pm | mrcoolguynice

मला पुन्हा यायचंयरे,
दरवाजा उघडाच ठेवा.
(बिल्डिंग उतरून खाली आल्यावर लक्षात आलं, की लॅच ची चावी घरातच विसरली, तेव्हा घरच्यांना सांगितलं)

सिजन 2 चे पोटेंशिअल असलेले कथाबीज.

गेल्या आठ महिन्यात भूतकाळातील चुका कश्या विसरायला लावायच्या आणि स्वतःच्या पदरात पुण्य पडून घ्यायचे , यालाही कसब लागते .. काकाश्रीनी पूर्णपणे बाजी मारलीय यात संशय नाही .. मुळात त्यांनी दादांच्या फायली बंद करून घेऊन , राष्ट्रवादीला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे .. यापुढे भ्रष्टाचार होईल कि नाही ते काळच ठरवेल ,, पण पूर्वाश्रमीची कामे झाकोळून लगेच त्यावर सोन्याचा मुलामा चढवणे तेही फक्त मुलामाचं नव्हे तर उत्कृष्ट अलंकार हे एखादा कसलेला सोनारच करू शकतो .. ते काकांनी केलेले आहे ..

मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री मा जयंत पाटील दोघेही माझ्याच शाळेत शिकलेले हैत .. बालमोहन विद्यामंदिर , शिवाजी पार्क , दादर मुंबई ..
अजूनही पुढे काय वाढून ठेवलेले आहे ते कुणालाच माहित नाही .. कारण
१) श्री अजितदादा पवार यांची राष्ट्रवादीत वापसी त्यामूळे पुढे हि युती कशी जाईल ते कुणालाच माहित नाही ..
२) श्री उद्धव यांचे प्रत्येक मुलाखतीत खास आवर्जून सांगणे ,, ३० वर्षाच्या दोस्ताने दगा दिला पण ज्यांच्याशी ३० वर्षे सामना केला त्यांनी विश्वास ठेवला ...
३) विरोधी पक्ष म्हणून समोर केवळ भाजप आहे .. त्यामूळे सरकारला कसे कोंडीत पकडायचे आणि चिमटायचे याची पूर्ण तयारी अनुभव माजी मुख्यमंत्र्यांनी केलेली असणार आहे , जे आता विरोधी पक्ष नेते म्हणून निभावणार आहेत ..
४) श्री.उद्धव ठाकरे , हे अजून फारसे मीडियाला सामोरे गेलेले नाही आहेत .. आता या नवीन पदभाराबद्दल ते काय करतात आणि कसे निभावतात , हा मोठा उत्सुकतेचा विषय ठरेल ..
५) शिवसेनेसोबत सत्ताग्रहण आणि त्यासोबत गयारामांना एक खाखणीत इशारा आणि गोटात असलेल्यांच्या पोटात भीतीचा गोळा ( चुकीला माफी नाही ) .. कि आली रे आली , आता माझी बारी आली ...

जॉनविक्क's picture

27 Nov 2019 - 6:04 pm | जॉनविक्क

मला पहिल्यांदाच असे खिचडीसरकार फार व्यवस्थित कामगिरी बजावेल अशी अपेक्षा आहे कारण

1) भाजपद्वेष
2) स्वबळावर सरकार टिकवायची कुवत नसणे
3) जनता भावनेतून मतदान करत नाही तर result देणाऱ्याला डोक्यावर बसवते अथवा उतरवते हा मिळालेला धडा
4) उठा व काकांचे प्रत्यक्ष नियंत्रण व जबाबदारीची टोपी
5) भाजपाची संख्याबळ सॉलिड असल्याने विरोधकाची धारदार भूमिका

उपेक्षित's picture

27 Nov 2019 - 7:07 pm | उपेक्षित

जल्ला मेला ऐन दिवाळीत झालेल्या accident मुळे इकडे जास्त फिरकलो नाही पण लय मजा आली डाव-प्रतिडाव पाहून,
नेहमीच गुळमुळीत राजकारणापेक्षा कधी कधी असे व्हावे असे मनापासून वाटते कारण त्यातून समजते कोण काय आहे म्हणून.

फडणवीस सरकार पडल्यानंतर गुगलवर ‘बरनॉल’ची मागणी वाढली

लोकसत्ता ऑनलाइन | November 27, 2019 03:53 pm

सध्या हा मेसेज खुप व्हायरल होत आहे , त्यात कितपत तथ्य आहे कोणास ठावुक ? दोन दिवसाचा मुख्यमंत्री असे महत्वाचे निर्णय घेवू शकतो का ? असेल तर टग्या ला ते माहित असणारच . मग भाजप ला सपोर्ट करण्याचे नाटक होते की क़ाय काही कळेनासे झाले आहे

Friends , Maharashtra was not a miscalculation or mistake as we think. It was a planned and calculated decision. Why ? Read this.

There are huge funds in Maharashtra government accounts, deposited as part of funds for Bullet train. Centre, Maharashtra and Gujarat control these funds. Sonia wanted to divert these funds for Farmer loan waiver though Japan wouldn't have agreed. But Japan cannot stop Maharashtra CM if he wants to go ahead. That would abort the Bullet train project. It will help Congress to siphon off funds in the name of waivers.

Fadnavis was care taker CM till 22 and he could not have transferred the money to central funds. So he struck a deal with Ajit Pawar (Shah Modi gameplan) and produced letters of support of 159 MLAs through party chiefs. That's why the emergency swearing in. He has transferred almost all the money to central funds, making it impossible for new government to touch the funds.

He will resign now but they have prevented the Congress from poaching into Bullet train project. Sonia's insistence in her CMP was Farmer's loan waivers (the easiest way to scam, like they did in Karnataka and MP) and stop Modi's dream project of Bullet train.

So it was for a cause. Ajit Pawar didn't know all this and thought he can become Deputy CM. In the 3 days, Fadnavis has finished the designated job. Now the Triplets can screw themselves.

दोन दिवसाचा मुख्यमंत्री असे निर्णय घेउ शकत असावा.. कारण शेतकरी पॅकेज पण गिले के त्यानी त्याच वेळेस.
कालजीवाहूला मर्यादा आहेत, पण आमदारांच्या सह्या आणणार्‍याला हे बंधन नसावे.
परंतु इत्के दिवस ते पैसे ठेवले कशाला हा प्रश्न आहेच. कदाचित आपण परत येणारच हा आत्मविशाव्स कारणीभूत असावा.

सेपरेट लिहायला घेतले आहे आता.

पण वरील प्रतिसादा साठी एकच म्हणेन..

बीजेपी, चुकली तरी ते कधी आपली चुक मान्य करणार नाही, आणि दुसर्‍याला कसलेच क्रेडीट देणार ही नाही.
असल्या वृत्ती मुळेच ते आज सत्तेत नाहीत

आनन्दा's picture

28 Nov 2019 - 7:09 am | आनन्दा

केवळ बीजेपीच नव्हे, तर राजकारणात कोणीच 'मी चुकलो' असे मान्य करत नाही. तसे केले तर समर्थकांचा विश्वास उडत असेल म्हणून असेल कदाचित..
आज अजित पवार परत आले म्हणून ती साहेबांची खेळी, धोरणीपणा म्हणून खपवलं जातय. हेच जर परत अले नसते तर मग साहेबांनी कसा आपला गट पुरवून शिवसेनेचा गेम केला म्हणून खपलं असतं. ते नेमकं काय करतात हे फक्त त्यांना आणि त्यांनाच माहीत नसतं.

अवांतर,
१ .आंतरराष्ट्रीय राजकारणात, जिथे याहीपेक्षा अनेक मुरब्बी प्लेयर्स २४ तास काम करत असतात, तिथे हल्लीच्या काळात दादागिरी करणारे इतका कच्चा डाव टाकतील हे मनाला पटत नाही. कारण हा डाव अगदीच कच्चा होता. शरद पवारांचा आतून पाठिंबपाठिंबातर एक्टे अजित पवार काहीही करू शकत नाहीत असे स्पष्ट आहे. मी हे त्या दिवशीच एका राष्ट्रवादीच्या माणसाला बोललो होतो. आणि त्याने मला स्पष्ट सांगितले की शरद पवारांचा पाठींबा नाहीये. वेट अँड वॉच.
२. राजीनामा दिल्याच्या पत्रकारपरिष्देत फडणवीस अगदी आनंदात होते, म्हणजे भासवात तरी होते, किंवा खरेच होते. जे करायचे होते ते साध्य झाल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर होता. मला ते खटकलं होतं.. की आपला डाव फसला असताना देखील माणुस इतका आनंदी कसा राहू शकतो?
३. खरे तर अजित पवारांनी विश्वासघात केलाय, मग पत्रकारपरिषदेत त्यांनी पवारांवर घसरायला हवे होते, पण ते घसरले शिवसेनेवर.

या सार्‍यामुळे काहीतरी वेगळेवे शिजत असल्याचा वास येतोय. शिवसेनेला जे साध्य करायचे आहे ते साध्य झाले की शिवसेनेच्या राजीनामा देणार याबद्दल माझ्या मनात शंका नाही. शिवसेनेला लाँग टर्ममध्ये हे सरकार ५ वर्षे चालवणे परवडणार नाही.. त्या परिस्थितीत पुन्हा मध्यावधी होतात, की भाजप - राष्ट्रवादी एकत्र येतात की अजून काही याचा अंदाज बांधणे कठीण आहे.

यातून मला असे वाटतेय की कोंग्रेसला बाटलीत उतरवण्यासाठी पवारांनी केलेला हा स्टंट होता, त्यात भाजपाने त्यांना साथ दिली. लोक सहा माहिन्यात सगळ विसरतात. आठवलं तरी आजचा राज सहा महिन्यांनी राहत नाही. पण विश्वासघात केला असेल तर त्याला क्षमा करत नाहीत. हा सगळा खेळ भावनांचा असतो.

अवांतर - शिवसेनेसाठी हे येणारे वर्ष अस्तित्वाच्या लढाईचं ठरणार आहे. किंबहुना त्यांचं अस्तित्व पणाला लगलं म्हणूनच दुसर्‍याच्या मतपेढीवर डल्ला मारायला हा मुख्यमण्त्रीपद वगैरे गोंधळ आहे. शिवसेना मनापासून हिंदुत्ववादी पूर्वीही नव्हती, आत्ताही नसावी. नाहीतर राज-ठाकरे नवीन पक्ष काढल्यावर प्रथम हिंदुत्ववादी आणि नंतर निधर्मी वगैरे कोलांट्याउड्या मारत बसला नसता. हे सगळे आपली मतपेढी शोधत आहेत. बाळासाहेबांच्या करिश्म्यावर मते मिळायची आत बंद होतायत. उद्धवसाहेबांचा वैयक्तिक करिश्मा काहीही नाही. त्यामुळे शिवसेना जगायची असेल तर सध्या पैसे वाटणे आवश्यक आहे. जे सरकारमध्ये गेलं तरच साध्य होते. भविष्यात शिवसेनेने जर हिंदुत्व सोडले तरी मला आश्चर्य वाटणार नाही. कारण तो त्यांचा श्वास नाही. ती केवळ मतांसाठी केलेली तडजोड आहे.

असो, खूपच बोललो. सध्याचे राजकारण हे चिखलफेक करण्याचे नसून अभ्यासायचे आहे.

श्रिपाद पणशिकर's picture

28 Nov 2019 - 9:27 am | श्रिपाद पणशिकर

BMC Watson BMC ;)

पहिला आणि मोठा वार तिथेच होईल.

आनन्दा's picture

28 Nov 2019 - 9:47 am | आनन्दा

पहिला वार BMC मध्ये होइल.. पण तोपर्यन्त शिवसेना आघाडी मोडून पुन्हा सहानुभूतीचे राजकारण सुरू झाले असेल त्यांचे.
भाऊ जनता विसरभोळी आहे हो. सहा महिन्यात सगळे विसरतात.
राज ठाकरेला बरोबर घेतले आणि त्याने आत्ताच जर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन शिवसेनेची हिंदुत्ववादी मतपेढी पळवली तर काहीतरी साध्य आहे. १९९० नंतर आलेली बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट मानणारी एक पिढी आहे, जी राज ठाकरेमध्ये आपला मसीहा शोधू शकते.
भाजपा चे आणि पर्यायाने संघाचे हिंदुत्व मवाळ आहे. शिवसेनेचे जहाल होते. आणि शिवसेनेमध्ये ग्रासरूटवर काम करणारे बरेच कार्यकर्ते जहाल हिंदुत्ववादी आहेत. त्यांना या आघाडीमुळे नक्कीच धक्का बसला असणार, त्यामुळे ते सावरायच्या आत त्यांना कार्यक्रम देणे आवश्यक आहे.

दुसरे -
सहा महिन्यांनी उद्धवने आघाडी मोडली, आणि हिंदुत्ववादी भूमिका सोडल्याबद्दल जाहीर माफी मागितली तर हे लोक त्याला माफ करायला पण तयार होतील. त्यामुळे शिवसेनेची व्होटबँक तशी स्थिर दिसते. एकंदरीत राऊत वगैरेंचा आणि शिवसेनेचा स्वभाव बघता त्यांना कोंग्रेसवरती लाथा झाडल्याशिवाय जगणे अशक्य आहे.. आणि एकदा विश्वासदर्शक ठराव झाला, की राऊत दाखवायचे दात पुन्हा बाहेर काढेल. कारण आपली मतपेढी जाऊ देणे त्याना परवडणार नाही.

या सगळ्या भानगडीत काँग्रेसचे नाक कापले जात आहे.
राश्ट्रवादीचा मतदाराला तसेही धर्म वगैरे गोष्टींशी मतलब नसते. साहेब, त्यांची चिल्लेपिल्ली आणि स्थानिक सुभेदार हा त्याचा पाया आहे.
स्वातंत्र्यानंतर आणि पुर्वी २० वर्षे जन्मलेला हिंदू मतदार हे कोंग्रेसचे बलस्थान आहे. अधिक मुस्लिम. शिवसेना + भाजपा + राश्ट्रवादी मिळून नवमतदारासाठी भांडत आहेत. कारण त्या मतदाराने बर्‍यापैकी आर्थिक स्थैर्य पाहिले आहे. आणि राष्ट्रवाद ही त्यांची प्रायोरिटी आहे.

सध्या कोण कोणाच्या मतदारामध्ये शिरकाव करत आहे हेच समजेनासे झाले आहे. पण मला वाटत आहे की या आघाडीमुळे शिवसेनेपेक्षा अधिक धोका काँग्रेसला आहे. आणि त्यामुळेच काँग्रेस सरकारमध्ये यायला उत्सुक नव्हती. म्हणूनच पवारांनी भाजपच्या सहाय्याने हा पुढच्या निवडनूकीत वंचितची मते वाढू शकतात.

पुढचे ६ महिने नुस्ता धुमाकूळ असणार आहे.

चिगो's picture

28 Nov 2019 - 1:23 pm | चिगो

असं म्हणता? बरं बरं..

सध्या असाही एक मेसेज व्हायरल होतोय की
म्हणे, सिंचन घोटाळा प्रकरणी चौकशीचे , अनेक ट्रक भरून कागद पत्रे, (८० तासांच्या सरकारने एक्सेक्युटिव्ह ऑर्डर काढून, सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट दिल्याने )
ही रद्दीत विकून, त्यातुन येणाऱ्या रकमेची मदत, एका मध्यमवयीन हौशी (किंवा हाऊसी) उभारत्या गायिकेचा (आपण त्यांना वहिनी म्हणूया हवतर) अल्बम लॉन्च करण्या करता वापरला...

श्रिपाद पणशिकर's picture

28 Nov 2019 - 9:24 am | श्रिपाद पणशिकर

खुप पैसे आले असल्यास थोडे शश्वुर गृहाकडच्यांचा मार खाल्यामुळे ऐन तारुण्यात सटकलेल्यां कडे वळवावा अशी विनंती मि अखिल जागो मोहन प्यारे संस्थे कडुन मायबाप सरकार चरणी करतो.

आनन्दा's picture

28 Nov 2019 - 9:31 am | आनन्दा

:ड

जॉनविक्क's picture

27 Nov 2019 - 11:04 pm | जॉनविक्क

आता सारव व थिअरीज वाचून मनोरंजन होणार, पॉपकॉर्न घेऊन बसिल्या आहे

श्री देवेंद्र फडणवीस यानी फक्त अमित शहा /मोदी यांना खूष ठेवून( काश्मिरात महाराष्ट्र सरकार गुंतवणूक करण्याची घोषणा वै सारख्या अनेक गोष्टी करून) प्रकाशझोतात राहण्याची कला चांगली साधली होती.
. अन्यथा त्यांच्या इतका overrated (अवाजवी महत्त्व दिला गेलेला) राजकारणी राज्यात दुसरा नसेल.

फडणवीस काहीही करू शकतात इतके भंपक वाक्य दुसरे नसेल.

फक्त एका वेळेस मुख्यमंत्री झाले ते पण स्वतःच्या जीवावर नाही तर मोदी मुखवट्या आड,

एकंदर कारकीर्द पाच वर्षेच होती (व आताची छटाकभर ८० तासांची). स्वकर्तुत्वाने कारकिर्दीत
कधीही मुख्यमंत्री काही त्यांना होता आलेल नाही.

एवढेच नव्हे तर आयुष्यात एकदाही त्यांना स्वबळावर बहुमत मिळेल एवढे आमदार काही निवडून आणता आलेले नाही. त्यांची ५ वर्ष्याची कारकिर्द ही "शिक्षकांनी वर्गात नेमलेला मॉनिटर", अश्या छापची होती. बसवलेला मुख्यमंत्री होते.

इतक्या वेळेस त्यांनी दिल्लीत वाऱ्या केल्या आणि मोदी शहा यांच्या भेटी घेतल्या पण शहांनी काही त्यांना जाहीर भुमिका घेतली नाही. त्यामुळे पडद्यामागूनच ते नाथीतून तीर मारण्याचा प्रकार करत राहिले, सुप्रीमकोर्टाने त्यांना भीक घातली नाही.

त्यामुळे "सदुसष्ठ पूर्ण दोन दशांश कोटींचा सिंचन घोटाळा" अशी वाक्ये बोलून मोडिया तर्फे आपला उदो उदो त्यांनी चालवला होता. त्यांच्याकडून याबाबत काहीही ठोस होणार नाही हे पाहून त्यांना मतदान देणाऱ्यांना तोंडघशी पडल्याची भावना आलेली आहे आणि त्यांचे कोर मतदार अस्वस्थ झालेले होते.

कोअर मतदार राष्ट्रवादी आणि कॉम्ग्रेसमधून होणार्‍या इनकमींगमुळे अस्वस्थ होते.
इन्फ्राच्या मंदावलेल्या वेगामुळे देखील अस्वस्थ होते.. उदा सातारा हायवे, अजुन काम पुर्ण झालेले नाही. अर्थात लोकांना हे कळत नाही, की हे काम पूर्वीच्या सरकारच्या काळात दिलेले होते, आणि काही आर्थिक कारणे, जसे की जमीन अधिग्रहण वगैरे गोष्टी काम थांबवतात.

गडकरीनी स्वतः जी कामे सुरू केली ती सगळी प्रचंड वेगाने पुरी होत आहेत. पण जिथे कायदेशीर अडचणी असतात तोथे त्यांना पण मर्यादा आहेत.

असो, अजित पवारासोबत युती केल्यामुळे अजुन पण भाजपाचा मतदार अस्वस्थच आहे. त्यांना स्थिर व्हायला काही काळ लागेल. हळूहळू भाजपाचा आयटी सेल सक्रिय होईल, आणि जमेची बाजू अशी आहे की सध्या ते विरोधात आहेत, त्यामुळे गमावण्याची शक्यता काहीच नाही.

खरी मजा अजून सुरू व्हायची आहे. देखते रहो.

पुढची निवडणूक सगळ्या पक्षांसाठी अस्तित्वाचा प्रश्न असणार आहे.

हळूहळू भाजपाचा आयटी सेल सक्रिय होईल,

काय म्हणतोस भावा ?
भाजपाचा आयटी सेल कधी सक्रिय नव्हता/ नसतो ?

नाही.. सध्या भाजपाचा आयटी सेल स्वतःच शिव्या घालण्यात मग्न आहे. त्यांना काय झालं आहे ते पचलच नाहीये.
भाजप नेतृत्वाला धडा मिळायलाच हवा होता असे मानणारे देखील बरेच आहेत. साधारण १०% मतदार या निवडणूकीत भाजपाला सोडोन गेले होते, त्यात बरेच कोअर मतदार पण होते.
परंतु जे झाले ते बघून हे लोक परत येण्याची शक्यता वाढत आहे. फक्त आपण अजित पवारांना सोबत घेऊन सरकार का स्थापन केले ते या लोकांना पटेल अश्या भाषेत सांगणे आवश्यक आहे.

सध्या सगळे विश्वासमत पारित होण्याची वाट पाहत आहेत. एकदा विश्वासमत पारित झाले की सगळ्यांचे खायचे दात बाहेर येतील. प्रत्येकाची गणिते आहेत डाव-प्रतिडाव आहेत, सगळे आहे. विश्वासमत झाले की सहा महिने सरकार स्थिर होते. त्यामुळ सहा महिने हे गदारोळ घालायला मोकळे होतील.

एकदा खायचे दात बहेर आले की कोणाला नेमके काय साध्य करायचे आहे हे पण कळेल. पण त्यासाठी अजुन आठवडाभर थांबावे लागेल.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला पाडण्याचा एखादा प्रयत्न होऊ देखील शकतो. पण नक्की सांगता येत नाही.

सध्या सगळे विश्वासमत पारित होण्याची वाट पाहत आहेत. एकदा विश्वासमत पारित झाले की सगळ्यांचे खायचे दात बाहेर येतील. प्रत्येकाची गणिते आहेत डाव-प्रतिडाव आहेत, सगळे आहे.

जर का भुजबळांना गृहमंत्रीपद मिळालं, तर ...
बऱ्याच जणांचे दात बाहेर येतील.. असं वाटतंय.

mrcoolguynice's picture

29 Nov 2019 - 12:17 pm | mrcoolguynice

शपथविधीनंतर "मावळते मुख्यमंत्री ह्यांनी उगवत्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करायचे असते",
असे सभ्य राजनैतिक जीवनाचे, मॅनर्स व एटिकेट्स असतात. परंतु राजनीतीत अपयश आले, तरी एक व्यक्ती म्हणून खुजेपणा दाखवायला नको होता. अश्याने त्यांच्या मुळ स्वभावातील कद्रुपणा, वरवरील सोज्वलतेचा बुरख्याआडून दर्शन देऊन गेला.

बाकी कालच्या शापाथविधीमध्ये, कोल्हापुरातील पुरातुन पुण्यात वाहून आलेल्या गाबाळातील, चंपा बाईचा चेहेरा पहाण्यालायक होता.

मी गेल्या गुरुवारी मातोश्रीवर होतो .. तासदीड तास तिथे मी काढला .. जब्बरदस्त जागा .. माझे सध्या ठाम मत बनले आहे कि या जागेतच काहीतरी अद्भुत असावे .. एक गूढ आणि प्रभावी वास्तू असे मी म्हणेन .. तिथला हरेक पहारा त्या जागेत येणाऱ्या प्रत्येकाला डोळ्यात तेल घालून पाहत असतो .. ती जागा म्हणजे मुंबईचा किल्ले राजगड वाटते .. अद्भुत अक्षरशः अद्भुत ,,, असो .. मी इथे खालील काही निरीक्षणे नोंदवत आहे

१) महाविकास आघाडीचा शपथविधी जवळच शिवाजीपार्कात ( शिवतीर्थावर ) पार पडला ..अक्षरश गर्दी उसळली होती .. उद्धव ठाकरेंनी खरतेच कमाल केलीय .. तुफ्फाणी प्रतिसादात सर्वाना अचंबित करून सोडले आहे ..
२) मा अहमद पटेलांची उपस्थिती म्हणजेच सोनिया गांधींची उपस्थिती असे मी म्हणेन
३) एक आश्चर्यकारक घटना बघितली .. दादर टीटीपासून ते शिवतीर्थ पर्यंत सर्वत्र फक्त भगवे आणि युवकाँग्रेसचे झेंडे होते .. कुठेही राष्ट्रवादीचा झेंडा दिसला नाही .. जर चुकल्यासारखे वाटले आणि पुढे काहीतरी विपरीत घडू शकते असे वाटतेय .. अजूनही खेळ संपलेला नाही असे दिसतेय ..
४) कसेही असले तरी मुख्यमंत्र्यांनी पहिलाच हातोडा मारून सर्वावर कडी केलीय
एक म्हणजे : बळीराजाला येत्या दोन दिवसात चौकशी करून न्याय मिळवून देण्याचा निर्णय आणि कारशेड स्थगिती .. ( अर्थात त्यांनी जो शब्द दिला , तो पाळण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे हे दाखवून दिलेय असे दिसते .. आता पुढे बघू काय होते आहे ते ..)
५) अजितदादांच्या बातम्या ( उपमुख्यमंत्री होणार ) अजूनही कानावर येत आहेत .. आणि अजूनही उपमुख्यमंत्री ठरलेला नाही त्यामुळे सावट अधिकच गडद झालेले आहे ..
६) मा शरद पवार , सध्या मीडियापासून लांब आहेत , त्यामुळे काहीच कळत नाही आहे..
७) उद्धव ठाकरे याना पाहिल्यान्दाच मीडियासमोर बोलताना बघितले .. आत्मविश्वास ठासून भरलेला दिसला .. ती एक सकारत्मक बाब वाटली ..
८) स्वतः हाडाचे दुर्गप्रेमी आणि त्यात छायाचित्रकार , त्यामुळे गडकोटांना चांगले दिवस येतील असे अपेक्षित आहे ..
९) काही गोष्टी खटकल्या .. गरीब आणि गरजू लोकांना , विनामूल्य कर्ज देऊन उच्चशिक्षण देणार .. पुन्हा शिक्षण आले ते हि असे म्हणजे परत शिक्षण संस्था उभ्या राहणार नव्याने .. मग आहे पुन्हा तेच .. हे कुठेतरी थांबले पाहिजे .. शिक्षणाचा बाजार मांडण्यापेक्षा , शिक्षण मोफत आणि दर्जेदार कसे दिले जाईल यावर भर दिला तर हे सर्व थांबेल अन्यथा नाही .. हा बाजार पुन्हा वाढतच जाईल .. आधीच्या सरकारांनी हेच तर केले .. शिक्षणाच्या नावावर संस्थानचे बुरुज उभे केले आणि अजूनही त्यातील रसद घरापर्यंत साभार पोच होतेय .

काही गोष्टी आवडल्या तर काही गोष्टींची भीती वाटतेय .. पुढील भावी घोटाळ्याची .. बघू आता काळच ठरवेल पुढे काय होतंय ते .. बाकी या नव्या मुख्यमंत्र्यांनी सध्यातरी बाजी मारलीय असे दिसतेय ..

काकासाहेबांचा सगळ्यातच हात असल्याने त्यांच्याबद्दल चांगले अथवा वाईट असे एकच मत बनवून त्याला चिकटून राहणे मला पटत नाही, उठा मात्र मला दरवेळी त्यांच्या हातात असलेल्या मर्यादीत चालीमधून कायम वर वर मृदू आणी आतून कमालीचे कणखर भासतात. त्यामुळे आता उघड सत्ता हाती असताना ते काय करतात याबद्दल अत्यन्त औत्सुक्य आहे.

उठा सेना ही सेटलमेंट सेना आहे. जनतेला भडकावयचे, गूंडगिरी करून प्रोजेक्ट बंद पाडायचे, त्यात आपण पैसे गुंतवायचे आणि त्याच भावना पायदळी तुडवून नंतर प्रकल्प आणायचे ही सेनेची राजनीती. यासाठीच precisely मला सेना नको वाटते. साधारण डाव्यांसारखी नीती, फक्त राजकारण उजव्या बाजूचे.
एनरॉन, नाणारला हेच केले. आता हे सरकार आल्यावर बघा नाणार परत येतो की नाही. आतल्या गोटातील माहितीनुसार उठा साहेबांचा बराच पैसा नाणार वरती लागलेला आहे. यामध्ये विकासकामांचे अभूतपूर्व नुक्सान होते. शिवसेना नसती तर एव्हाना हा प्रकल्प मोठ्या क्षमतेने सुरू होण्याच्या मार्गावर असता. मेट्रो चे पण तेच होणारे.

राष्ट्रवादी ची पद्धत वेगळी आहे. आमच्या भागात नवीन MIDC येणार होती. तिची अधिसूचना यायच्या अगोदर १ वर्ष भुजबळांची माणसे तिथे जमीन खरेदी करत होती. तो प्रकल्प पण आता शिवसेनेने बंद पाडला अशी बातमी आहे. या सर्व गोष्टींंमुळे मला शिवसेना आणि काँग्रेस एकाच माळेचे मणी वाटतात.

त्यामानाने भाजपा आणि राष्ट्रवादी बरे. पैसे खातात, पण कामांचा धडाका असतो. राष्ट्रवादी - ५ लाखाचे काम २५ लाखाचे दाखवून २० लाख खातात. पण कामाचा दर्जा चांगला असतो. आणि तेच माणूस शिवसेनेमध्ये गेल्यावर पुन्हा निकृष्ट प्रतीची कामे करायला लागतो. रस्त्याचे खड्डे बुजवून नवीन डांबरीकरणाचे पैसे खाणे, गरिबांचा कळवळा दाखवून विकासाचे प्रोजे़क्ट बंद पाडून पुन्हा लोकांना गरीबच ठेवून त्यांच्या भावनांचे राजकारण करणे या गोष्टींध्ये शिवस्सेना आणि काँग्रेसचा हात कोणी धरू शकत नाही.

अजित पवर आणि फडणवीस यांनी एकत्र सरकार केले तेव्हा मला प्रचंड आनंद झाला होता. पण दुर्दैवाने तो अल्पायुषी ठरला. ते पुन्हा एकत्र येतील अशी अपेक्शा थेवतो.

जॉनविक्क's picture

1 Dec 2019 - 1:38 pm | जॉनविक्क

गामा पैलवान's picture

1 Dec 2019 - 3:43 pm | गामा पैलवान

आनन्दा,

त्यामानाने भाजपा आणि राष्ट्रवादी बरे. पैसे खातात, पण कामांचा धडाका असतो. राष्ट्रवादी - ५ लाखाचे काम २५ लाखाचे दाखवून २० लाख खातात. पण कामाचा दर्जा चांगला असतो. आणि तेच माणूस शिवसेनेमध्ये गेल्यावर पुन्हा निकृष्ट प्रतीची कामे करायला लागतो.

अगदी नेमकं बोललात. नेमका हाच आरोप १९९९ साली युती सरकारवर झाला होता. लोकांच्या मते काँगेस व राष्ट्रवादी पैसे खाऊन कामं तरी करायचे. युतीवाले फक्त पैसेच खायचे. प्रशासनावर पकड नसल्याने कामं सरकवायची अक्कल नव्हती. परिणामी युतीस पाच वर्षं पैसे खाऊनही १९९९ च्या निवडणुकांत आघाडीपेक्षा ८ जागा कमी मिळाल्या.

आज उद्धव यांच्यासमोर कामं मार्गी लावायचंच आव्हान आहे. प्रशासनावर पकड पाहिजे.

आ.न.,
-गा.पै.

साहेब पुढील पर्याय समाप्त कधीच करत नाहीत

ते सत्ता राबवत असल्याचे उघड दिसले व उद्या काही कमीजास्त झाले तर जनमत पूर्णपणे भाजपाकडे झुकायला वेळ लागणार नाही त्यामुळे तसाही त्यांना लगेच फोकस नको आहे...

सगळे जण ठाकरे सरकार चा उर बडवत आहेत त्यामुळे इतरांची पापे माहीत असूनही उठसुठ डोळ्यासमोर येत नाहीत.

गणेशा's picture

2 Dec 2019 - 12:50 am | गणेशा

भारी लिहिले आहे.

पिंपरी चिंचवड चे पण बोलायचे झाल्यास राष्ट्रवादी महानगर पालिकेवर होती तेंव्हा कामे कडक होते होती आणि दिसत होती, येथील बऱ्याच जणांचे म्हणणे होते, खा बाबा पण आमची कामे चांगली करतोय ना बस.

आता मात्र भयाण दिसते आमचे पिंपरी चिंचवड, बघू...

बाकी भाजप आणि अजित पवार यांची युती मला मुळीच आवडली नव्हती. बोलेन यावर पुन्हा नंतर