या जन्मावर या जगण्यावर..

शुभांगी दिक्षीत's picture
शुभांगी दिक्षीत in जनातलं, मनातलं
7 Nov 2019 - 6:05 am

बाळकृष्ण वारजे आणि सुमती वारजे हे दांपत्य आज जीवन हॉस्पिटलमध्ये आले होते. आज सुमती वारजे यांच्या चेकअपचा रिपोर्ट येणार होता. नर्सने बोलावलं तेव्हा ते दोघं डॉक्टरांच्या केबीनमध्ये गेले.
"नमस्कार. बसा." डॉक्टरांनी त्यांना बसावयास सांगितले.
"डॉक्टर रिपोर्टस् चं काय झालं??" बाळकृष्ण यांनी विचारलं
"थोडं मन घट्ट करा सर." डॉक्टर म्हणाले.
"काही प्रॉब्लेम आहे का??" सुमती वारजे म्हणाल्या.
"तुम्हाला ब्रेन ट्युमर आहे. त्यामुळेच तुम्हाला सारखी चक्कर येते. हे बघा एक्सरेमध्ये पण गाठ दाखवत आहे." डॉक्टरांनी एक्सरे दाखवला. त्यात एक गाठ दिसत होती. "टेन्शन नका घेऊ आपण ऑपरेशन करून ती काढून टाकू. फक्त ऑपरेशन केल्यावर काय होईल ते सांगता येत नाही."

डॉक्टरांनी त्यांना सारे समजावून सांगितले. दोघंही बाहेर पडले तेव्हा सुमती काकू रडवेल्या झाल्या होत्या. बाळकृष्ण काका त्याही स्थितीत खंबीर होते. त्यांनी सुमती काकुंना एका हॉटेलमध्ये नेले आणि तिथे दोन मसाला डोश्यांची ऑर्डर दिलीसमती काकूंना म्हणाले, "सुमे, टेन्शन नको घेऊ. काही झालं तरी मी आहे तुझ्यासोबत. अजिबात काळजी करायची नाहीस. मी आहे."
"अहो सुमेधला सांगूया का?? तो करेल काही तरी.."
"करेल ना. एक फोन करेल. परदेशात शिकायला म्हणून गेला तो तिकडचाच झाला. तु कसलीही काळजी करू नकोस. मी आहे. अगदी पैशांचीही काळजी करू नकोस तू."

काही दिवसानी डॉक्टरांचा कॉल आला. त्यांनी ऑपरेशन आधी एक दिवस ॲडमिट होण्यास सांगितले. ॲडमिट झाल्यानंतर बाळकृष्ण काकांनी काकूंना समजावले. तुला काहीही होणार नाही. अगदी व्यवस्थित होईल ऑपरेशन आणि दोन दिवसात उड्या मारायला लागशील बघ. आपल्याला फिरायला जायचं आहे एकत्र तुझ्या आवडत्या जागेवर. मरीन ड्राईव्ह. आहे ना लक्षात पहिल्यांदा फिरायला गेलो होतो तेव्हाचं??" काकू हसल्या.

ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन सुरू झाले तेव्हा काका हॉस्पिटलच्या मध्यभागी असलेल्या गणेशाच्या मूर्तीसमोर उभे राहिले. 'देवा, खुप सहन केलंय आजपर्यंत. सगळं काही शांत राहून सहन केलं आतापर्यंत. तुला कधी बोललो नाही. माझ्या सुमीला काही होऊ देऊ नकोस. इतकीच प्रार्थना. मनापासून'. ते पुन्हा ऑपरेशन थिएटरसमोर येऊन बसले. दोन तासांनंतर डॉक्टर जेव्हा बाहेर आले. तेव्हा म्हणाले, " ऑपरेशन व्यवस्थित पार पडले. जी शंका होती तसं काही झालं नाही. अशक्तपणा आहे तोपर्यंत थोडं सांभाळावं लागेल."
"थँक्यू डॉक्टर. नवीन आयुष्य दिलंत सुमतीला."
"त्याने दिलंय. आम्ही निमित्त मात्र. काळजी घ्या."

तीन चार दिवसांनी सुमती काकुंना डिस्चार्ज मिळाला. पुर्ण बरं वाटल्यावर सुमती काकू आणि बाळकृष्ण काका दोघंही मरीन ड्राईव्हला आले तेव्हा सुमती काकू म्हणाल्या, " ऑपरेशनच्या वेळी डॉक्टरांनी भूल देण्याआधी तुमचे शब्द सारखे आठवत होते. तु ठणठणीत बरी होशील. आपल्याला मरीन ड्राईव्हला जायचंय. भिती कमी झाली माझी आणि मनाला समजावलं काही होणार नाही तुला. प्रेम करायचं आयुष्यावर तुला. पुन्हा जगायचंय."
"अगदी बरोबर बोललीस सुमे तू. आयुष्यावर प्रेम करायचं. आपले मंगेश पाडगावकर यांनी लिहलंय,

या ओठांनी चुंबून घेईन हजारदा इथली माती
अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे."
❤❤

कथाजीवनमानलेख

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

7 Nov 2019 - 10:03 am | जॉनविक्क

"त्याने दिलंय. आम्ही निमित्त मात्र. काळजी घ्या."

त्याने दुखणेही दिले!

शुभांगी दिक्षीत's picture

7 Nov 2019 - 2:03 pm | शुभांगी दिक्षीत

पण त्यातूनच नवी उमेद मिळाली जगण्याची.. :)

पद्मावति's picture

7 Nov 2019 - 12:38 pm | पद्मावति

छान लिहिलेय. आवडले.

शुभांगी दिक्षीत's picture

7 Nov 2019 - 2:04 pm | शुभांगी दिक्षीत

:)

जेम्स वांड's picture

9 Nov 2019 - 5:04 pm | जेम्स वांड

माणसे अवघड वेळी देवाला मी अमुक इतकं सहन केलं आहे अन तमुक तितकं बघितलं आहे वगैरे हवाले का देतात? ही काय रीत झाली देवाशी बर्गेन करायची?

शुभांगी दिक्षीत's picture

9 Nov 2019 - 6:19 pm | शुभांगी दिक्षीत

:)

महामाया's picture

9 Nov 2019 - 6:36 pm | महामाया

भावस्पर्शी कथा...

दुर्गविहारी's picture

11 Nov 2019 - 7:04 pm | दुर्गविहारी

छान ! मस्त कथा.