महाग्रु म्हणतात चला हवा येऊ द्या... --------------

झपाटलेला फिलॉसॉफर's picture
झपाटलेला फिलॉसॉफर in काथ्याकूट
5 Nov 2019 - 6:04 pm
गाभा: 

#साबळे: महाग्रू तुमच्या गाण्याबद्दल थोडं सांगा
#महागृ: काय ए ना निलेश, मी जेव्हा जन्माला आलो आणि जे पाहिले ट्याह्या केले ते राग यमन मध्ये केले असं सगळ्या नर्सेस म्हणाल्या. मी जेव्हा रडायचो तेव्हा एखादी ठुमरी किंवा गझल गात आहे असे सर्वांना वाटायचे, एवढा मी गाण्याशी तादात्म्य पावलेलो आहे.
------------------------
#साबळे: सर तुमच्या आणि पंचम दां च्या नात्याबद्दल काय सांगाल ?
#महागृ: त्यांचं आणि माझं नातं म्हणशील तर पंचम दा हा असा एकमेव माणूस आहे ज्याने मला स्पष्ट आणि तोंडावर सांगितलेले की तू कधी प्लेबॅक सिंगर होऊ नकोस, (नाहीतर लोकांचा पार्श्वगायकांवराचा विश्वास उडेल.) जर पंचम दांनी मला सांगितले नसते आणि मी पार्श्व गायन केले असते तर तमाम जनतेचा गाण्यावरचा विश्वास उडाला असता, किती हाल हाल झाले असते लोकांचे. आणि म्हणूनच लोकं पंचम दांना व्हिजनरी म्हणून ओळखतात
------------------
#साबळे: सर तुमच्या पार्श्व गायनाची स्पेशालिटी काय आहे
#महाग्रू: प्रत्येक गायकाचे एक बलस्थान असते, माझे बलस्थान माझा पार्श्व भाग आहे, आणि तीच माझ्या पार्श्व गायनाची स्पेशालिटी आहे निलेश.
------------------------
#साबळे: सर तुमचा रोल मॉडेल कोण आहे ? तुम्ही रोल मॉडेल म्हणून कोणाकडे पाहता.
#महागृ: वेल निलेश मनापासून सांगायचं तर मला जेव्हा रोल मॉडेल म्हणून कोणाला पाहायचे असते तेव्हा मी आरश्यात पाहतो. आरसा कधीही खोटे बोलत नाही निलेश त्या मुळे माझा रोल मॉडेल मी आरश्यात शोधतो.
---------------------------

#साबळे: आज मॅडम पण इथे आल्या आहेत, आपण त्यांना विचारू यात की त्यांचे सरांच्या गाण्याबद्दल काय मत आहे. तर मॅडम तुम्ही काय सांगाल सरांच्या गाण्याबद्दल
#मॅडम: मी ह्यांचे गाणे ऐकूनच ह्यांच्या प्रेमात पडले.
-------------------
#साबळे: मॅडम, सर दूनियभर गाणे म्हणत असतात, पण ते घरात तुमच्यासाठी गातात का ?
#मॅडम: हो तर, ते घरात तिरुमला शेंगदाणा तेलात तळलेले वडे खाऊन गातात. आणि (जमेल तेवढं लाजून) खरं सांगु का श्रिप्रीया लहान असताना हे तिच्यासाठी रोज एक छान अंगाई गीत म्हणायचे. ते एवढे छान गायचे की श्रिप्रीया बरोबर मी सुद्धा झोपून जायचे. म्हणूनच श्रिप्रीया ला भावंड झालं नाही !!!

--------------------
असो. तर मंडळी चर्चा तर होणारच, पण तुम्ही जाऊ नका पहात रहा चला हवा येऊ द्या, महागृंच्या सोबत

संपादित *

प्रतिक्रिया

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

5 Nov 2019 - 6:07 pm | झपाटलेला फिलॉसॉफर

स्रोत : मयुर कुळकर्णी

अर्धवटराव's picture

6 Nov 2019 - 8:47 am | अर्धवटराव

=)) =))

गड्डा झब्बू's picture

6 Nov 2019 - 11:14 am | गड्डा झब्बू

भारी लिहलंय :-)

कंजूस's picture

6 Nov 2019 - 12:50 pm | कंजूस

निलेश : तुमचं आवडतं वाहन कोणतं?
महाग्रु : मुंबईतील लाल डबलडेकर बस. वरची पुढची सीट.

पाषाणभेद's picture

7 Nov 2019 - 2:47 pm | पाषाणभेद

निलेशः तुम्ही केस कसे धुतात?
म्हागॄ: दररोज केस पाण्याने धुतो. म्हणून माझे केस अजून काळेभोर आहेत.

दुर्गविहारी's picture

8 Nov 2019 - 11:43 pm | दुर्गविहारी

मस्त ! भारी लिवलंय. म्हागृना वाचायला दिलं पाहिजे. अर्थात त्यांच्यावर काही परिणाम होणे शक्य नाही, याची कल्पना आहेच.

दुर्गविहारी's picture

8 Nov 2019 - 11:43 pm | दुर्गविहारी

मस्त ! भारी लिवलंय. म्हागृना वाचायला दिलं पाहिजे. अर्थात त्यांच्यावर काही परिणाम होणे शक्य नाही, याची कल्पना आहेच.

गामा पैलवान's picture

10 Nov 2019 - 10:40 pm | गामा पैलवान

इथे म्हाग्ररूंची एक दुर्मिळ रत्नवत कामगिरी आहे : https://www.misalpav.com/comment/957276#comment-957276

-गा.पै.