शेअर मार्केट क्लासेस

dadabhau's picture
dadabhau in जनातलं, मनातलं
21 Sep 2019 - 12:38 pm

आजकाल शेअर मार्केट क्लासेस चा खूपच सुकाळ झालाय. मी ही गेले वर्षभर कमीत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये... जवळजवळ फुकटात खूप लवकर अतिश्रीमंत होण्यासाठी अश्या क्लासेस चे बरेच सेमिनार ( eye opener वगैरे ...) अटेण्ड केलेत...
so called अध्यात्मिक बाबा,बुवा ,देव्या.. आणि हे मार्केटगुरु ह्यांच्या मोडस ऑपरेंडी मध्ये बरेच साम्य आढळले ( जसे टार्गेटेड market - मंदी च्या भीतीने आणि असे ही सदैव नोकरी गमावण्याची भीती वाटत असलेले IT वाले गिर्हाईकं ... सुरुवात ५-१० हजाराच्या module पासून करून हळूहळू लाखोंचे कोर्स गळ्यात मारणे .... - मला माहित असलेला एक कोर्स १६ लाखाचा आहे !!!)
ह्या गुरूंना whatsapp ग्रुप्स , telegram channels , zoom सारखे ब्रॉडकास्टींग apps मुळे आपला धंदा आणि संप्रदाय वाढवणे खूप सोपे झालेय.. तर प्रश्न असा आहे की मिपाकरांच्या पाहण्यात असे इंट्रा-डे ट्रेडिंग करून करोडपती ( ३-४ सेमिनार अटेंड केल्यामुळे आपण लाखोपती तर एकदम छाटछूट समजतो !!!) झालेले मराठी माणसे माहित आहेत का? एक गुरु तर कमीत कमी १०० कि १००० मराठी माणसांना करोडपती बनवायला निघालाय ( नाव लिहीत नाही काहींना समजले असेलच...). दुसरे म्हणजे ट्रेडिंग मध्ये गमावलेला पैसे हे लोक क्लास मध्ये कमावतात असांज अंदाज आहे.. खरे असावे का?
मिपाकरांना अश्या क्लासेस चे...गुरूंचे..त्यांच्या शिष्यांचे ( हा MLM सारखा च प्रकार आहे.. किती ही उल्लू बनले तरी शिष्य गुरुची प्रशंसा च करतात !!!) काही अनुभव असतील ( positive आणि negative ) तर share (!!!) करावेत ही विनंती ...knowledge मध्ये भर पडून हा मार्ग सोडावा कि धरून चालावा हे ठरवता येईल...

जीवनमानचौकशी

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

21 Sep 2019 - 12:47 pm | सुबोध खरे

१६ लाख फी !!!!!
हा क्लास कसा चालवावा यायचे प्रशिक्षण कुणी देतं का ?

मला ही ६ महिने आधी हे खोटे वाटले असते.. पण हा नाद लागला ( classes च्या सेमिनार अटेंड करायचा . मार्केट चा नाही...) म्हणून कळाले कि इतकी ही फी असू शकते !!! आणि इतकी फी देणारे लोक ही पाहिलेत... CA Rudramani etc सारख्या अश्या classes ला लोक गर्दी करतात ....खरं च प्रॉफिट मिळवतात market म्हणून कि त्यांच्या स्ट्रॅटेजि वापरून नुकसान करवून घेऊन गप्प बसतात ते नीट कळत नाही.. कारण आजकाल लोक social media वर फक्त positive ....चांगलचुंगलच share करतात... नुकसान झाल्याचे share करणारे विरळाच .....

सतिश गावडे's picture

21 Sep 2019 - 2:43 pm | सतिश गावडे

खरंच अशा लोकांना ट्रेडींगमध्ये पैसा कमवता आला असता तर ते आपलं ज्ञान पैशाच्या मोबदल्यात इतरांना वाटत न बसता स्वतः ट्रेडींग करत बसले नसते का?

पत्रकार अभ्यासक्रम अगदी स्वस्तातला, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा, इंदिला गांधी ओपन युनिवरसटीचा, कालिना मुंबई युनी चा आहेत. तसेच इंडिअन एक्स्प्रेस ग्रुपचा चैन्नईला पाच लाखांचाही आहे.

आता फिक्स्ट डिपॉझिटचे इंटरेस्ट कमी झाले अम्रेकीसारखे (0.5%) की हा एकच गुंतवणूक उपाय राहील. एवढा महत्त्वाचा विषय होणार तर त्यासंबंधी तांत्रीक माहिती कार्यानुभव शालेय अभ्यासक्रमात का नको? कमीतकमी जुजबी माहिती नियम हे हवेच. जुगार /ट्रेडिंग या पुढच्या गोष्टी आपापल्या हिकमतीवर प्रत्येकाने करायच्या आहेत.

राजेंद्र मेहेंदळे's picture

21 Sep 2019 - 4:19 pm | राजेंद्र मेहेंदळे

एक दोन शेअर्समध्ये आपटी खाल्ल्याने असा एखादा क्लास करावा का हा विचार करत होतोच. पी. ई. रेशो, फ्युचर ऑप्शन्स वगैरेही फारसे कळत नाही.
पण प्रतिक्रिया वाचायला आवडतील.

अश्या कोणत्याही सेमिनार ला गेल्यावर खालील तीन चार प्रश्न विचारा, बघा नाही ते तुम्हाला बाहेर काढतील किंवा "हे तुम्चायसाठी नाही" असले काही तरी थातुर मातुर उत्तर देतील
१) ठीक आहे गुरु तुम्ही हि स्ट्रॅटेजि शिकवता पण हे सांगा कि हीच स्टॅटेजि वापरून तुम्ही स्वतः मार्केट मध्ये धोका घेता का? नसेल तर का नाही? असाल तर ऑडिट केलेलं तुमचा आत्तापर्यंत चा परतवा किती आला ? ते दाखवा
२) जर तुम्ही एवढे भारी तर मग तुम्ही एखादा सेबी रजिस्टर असलेले managed फंड का नाही चालवत?
३) जर कोण्ही या दरम्यान "gurantee " हा शब्द वापरला तर ती चालूगिरी आहे असे नक्की समजावे
४) सेमिनार सेलर जर गुंतवणुकीच्या पद्धतीतील हू शकणाऱ्या फायद्या बरोबर होऊ शकणार तोटा / तोट्याची शक्यता दाखवत नसेल तर नक्की समजावे कि काही तरी गडबड आहे
५) ते सेबी रजिस्टरेड इन्व्हेस्टमेंट adviser आहेत का?
हे सर्व नकारात्मक वाटत असेल पण साधा विचार करा मोठाल्या आर्थिक संस्था ज्यांचं कडे उच्चह शिक्षित tannya असतात, उत्तम दर्जाचे ट्रेडिंग चे सॉफ्टवेअर असते त्या संस्था असले सेमिनार घेत फिरत नाहीत ,,, ते व्यासायिक रित्या इतर जनतेचा पैसा गुंतवणूक करतात
हा अर्थात हे सुद्धा खरे आहे कि काही क्लिष्ट ट्रदेईंग स्ट्रॅटेजि साठी कोणी वर्ग घेत असेल तर तो फ्रॉड असलेच असे नाही
उदाहरणार्थ, fundmental अनालयसिस किंवा ऑप्शन ट्रेडिंग च्या पद्धती इत्यादी...

( मी हे अश्या अनेक सेमिनार ला जाऊन अनुभवून मग लिहितोय"

जेम्स वांड's picture

21 Sep 2019 - 11:33 pm | जेम्स वांड

पण एकंदरीत ट्रेडिंग शिकायला, त्यातली सर्टिफिकेशन करायला, किंवा सम्यक ज्ञान घ्यायला काही क्लास उपलब्ध आहेत का नाही?

हरवलेला's picture

22 Sep 2019 - 5:25 am | हरवलेला

बऱ्याच वर्षांपूर्वीचा हा क्लास बघा. आजही तंतोतंत लागू आहे.
https://www.youtube.com/watch?v=0Q7DPIGgiHs

स्थितप्रज्ञ's picture

23 Sep 2019 - 9:03 am | स्थितप्रज्ञ

या फील्ड मध्ये जेव्हा तुम्ही रिंगणात उतरता तेव्हा तुमची कुवत, अनुभव, ताकद, इ. न बघता मार्केट तुम्हाला दिग्गजांसमोर उभे करते आणि त्यांच्या विरुद्ध जिंकून दाखवण्याचे आव्हान समोर ठेवते. याची तुलना WWF च्या आखाड्यात पहिल्याच मॅच मध्ये समोर योकोझुना उभा ठाकण्याशी करता येईल. आपण कितीही प्रयत्न केला तरी तो (मार्केट) आपल्याला उचलून अपटणार आणि आपल्या छाताडावर बसणारच. पण हळू हळू त्याच्या गेम ची कल्पना येऊन जेव्हा त्याचे वार चुकवून तुम्ही त्याला थोडे थोडे ठोस देऊन लगेच बाजूला व्हायला शिकाल तेव्हा कुठे टिकाव लागेल. तोपर्यंत थोड्याशाच मुद्दलीवर मार्केटचा अंदाज घेत राहावा.

जिथे "पैका" येतो तिथे प्रामाणिकपणा अभावानेच आढळतो. तो नाही असं मुळीच नाही पण या क्षेत्रात प्रामाणिकपणे अपल्याजवळचं ज्ञान वाटणारे फारच थोडे लोक असतात. कारण ज्याला यातलं कळतं तो पैसे कमवून आनंदी राहतो आणि ज्याला ते कळत नाही तोच अक्कल पाझळून लोकांना गंडा घालून पैसे उकळतो. पण मार्केटमधलं कळूनही अत्यल्प दरात त्याची शिकवणी घेणारेही लोक आहेत हे अनुभव घेतल्याशिवाय समजणार नाही.
फेक लोक्स त्यांच्या कोर्सच्या जाहिराती प्रखरपणे तुम्ही वरील केलेल्या माध्यमांकरवी करताना दिसतात. ज्याने लाखोंचा लॉस केलेला असतो त्याला ३०-४० हजार ओतून तो रिकव्हर करायचा रस्ता (मृगजळ) दिसत असेल तर तो आपसूक त्याला बळी पडतो. कारण अशांना हे लोक्स मार्केटमध्ये काहीतरी "होली ग्रेल" शिकवणार आहेत अशी आशा असते जी लौकरच संपते.

या होली ग्रेल च्या हव्यासापायी कुठलाही कोर्स केला तर साक्षात ब्रह्मदेव जरी शिकवायला आला तरी भ्रमनिरासच होणार.

या उलट स्टॅटिस्टिकस, प्रोबॅबिलिटी आणि मनी मॅनेजमेंट यांचा वापर करून आणि मार्केटचा ट्रेंड ओळखून हळू हळू पण कंसिस्टंटली श्रीमंत होण्याचा मार्ग कोणी रिझनेबल दरात दाखवत असेल तर असा क्लास जरूर करावा.

आज कोर्स करा आणि उद्या खोऱ्याने ओढा अशी स्वप्न कोणी दाखवत असेल तर अशा कोर्स आणि तो चालवणाऱ्या व्यक्ती पासून खोरं भर मैल लांबच रहा.

सुबोध खरे's picture

23 Sep 2019 - 10:21 am | सुबोध खरे

सगळेच क्लास वाले झोला छापच असतात असे नाही किंवा सर्वच लोक सिद्धांत किंवा तत्व( theory) शिकवणारे भंपक असतात असे नाही.

उदा. शल्यक्रियेच्या वैद्यकीय शिक्षणात ज्यांची (सैद्धांतिक बैठक) थिअरी पक्की असते ते प्रत्यक्ष शल्यक्रियेत यशस्वी होतातच असे नाही.

परंतु काहीच्या काही दावे करणारे असतात त्यांच्यापासून लांब राहावे हेच खरे.

उष्मा गतिकीचा पहिला सिध्दान्त( first law of thermodynamics) सारखा

अर्थशास्त्राचा पहिला नियम (first law of economics) -- पैसा निर्माण करता येत नाही, पैसा नष्ट होत नाही, पैसा फक्त खिसे बदलतो.

(Money cant be generated nor it can be destroyed it just changes pockets)

पैसा निर्माण करता येत नाही, पैसा नष्ट होत नाही, पैसा फक्त खिसे बदलतो.
हा हा हा :)

स्टॉक मार्केट हे अथांग सागर आहे ....आणि याबाबत बोलणे म्हणजे चक्रधर स्वामींच्या हत्ती आणि सात आंधळ्यांच्या गोष्टीसारखे आहे...
100% यशाचा आणि झटपट श्रीमंतीचा मार्ग कुणीच सांगू शकत नाही.....तो स्वतः लाच प्रयत्न आणि अभ्यास करून शोधावे लागतो.. पुस्तके वाचून किंवा वर्गात शिकवणी लावून कुणी पोहणे किंवा सायकल चालवणे शिकू शकत नाही ....

आणि मराठी माणूस तर शेयर बाजाराकडे व्यवसाय म्हणून न बघता सत्ता बाजार या नजरेने जोवर पाहिलं तोवर अश्या मार्केट गुरूंचा चेला बनत राहील आणि गंडत राहील !!

प्रकाश घाटपांडे's picture

23 Sep 2019 - 11:51 am | प्रकाश घाटपांडे

पैसे जास्त झाले की त्याला आपोआप वाटा फुटतात. फुटू द्याव्यात. जास्त साचले पण देखील चांगले नाही. प्रवाही अर्थव्यवस्था हवी ना!

अरिंजय's picture

23 Sep 2019 - 12:10 pm | अरिंजय

लोकं मार्केट काय आहे, हे समजून न घेता मार्केटकडून काहीच्या काही अपेक्षा ठेवतात. त्या (खोट्या) अपेक्षा पूर्ण करायला कोणी शिकवतंय का, ते शोधतात. आणि गंडे घालणाऱ्यांना आयते गावतात. माझा एक बाबागिरी करणारा मित्र स्पष्टपणे म्हणतो, जगात लै बकरे आहेत, तुम्ही फक्त कापायचं काम शिकून घ्या. तर मार्केट कडून अशा अवास्तव अपेक्षा ठेवणारे हे असेच कापले जातात अन् हे जगाला नावं ठेवतात. पण स्वतःचं काहीतरी चुकतंय हे बघत नाहीत.

शेअर ट्रेडिंग हा व्यवसायच आहे आणि इतर व्यवसायांप्रमाणे इथे पण या क्षेत्राचे ज्ञान, अनुभव असावा लागतो आणि धक्के खाल्ल्याशिवाय कुठलाही व्यवसाय जमत नाही. संयम ठेवून, नुकसान पचवून टिकून राहिल्यास कुठलाही व्यवसाय, शेअर ट्रेडिंग सुद्धा फायदाच देऊन जातो. बाकी कोणीतरी काहीतरी जाहिरात करतो म्हणून व्यवसायाला नावं ठेवणं हा शुद्ध वेडेपणा आहे.

चौकस२१२'s picture

25 Sep 2019 - 6:52 pm | चौकस२१२

१) गुंतवणूक ( इन्व्हेस्टमेंट ) आणि २) धंदा ( ट्रेडिंग) हे करिताना न्यान हे पाहिजे हे खरे आणि ट्रेडिंग हा व्यवसाय आहे हे खरेच... त्याला मी तरी नाव ठेवत नाही...माझी टीका फक्त अश्या लोकांवर आहे कि जे का लोकांनां गंडवून असले क्लास वैगरे चालवतात किंवा ऑटोमॅटिक ट्रेडिंग सॊफ्टवर वैगरे विकतात इंग्रजीत असाहन्न स्नेक ऑइल सेल्सपर्सन म्हणतात.... अशी लोक सापडणं अवघडच कि जे कोणतेही "पटकन झटपट श्रीमंत व्हा" वायदे ना करीत ट्रेडिंग मधील खरे न्यान शिकवतात !

सुबोध खरे's picture

23 Sep 2019 - 12:42 pm | सुबोध खरे

मुळात बाजारात नफा कसा होतो?
१) एका कंपनीने ने धंदा सुरु केला कि त्यात होणाऱ्या नफ्यात( आणि तोट्यात सुद्धा) तुम्ही ( घेतलेल्या समभागांच्या प्रमाणात) आंशिक स्वरूपात सामील होता
यात कंपनीचा नफा तुम्हाला डिव्हीडंड किंवा बोनस समभाग द्वारा मिळतो. कंपनी दिवाळ्यात निघाली तर आपले पैसे साफ बुडतात.

२) समभाग कमी किमतीला घेतला आणि जास्त किमतीला विकला कि त्यातील फरक (दलालाची दलाली आणि कर वजा जाऊन) हा तुमचा नफा असतो.
समभाग तुम्ही जास्त किमतीला केंव्हा विकू शकता? जेंव्हा कोणी विकत घेणारा असतो तेंव्हाच ( म्हणजेच हा समभाग तुम्ही कोणातरी खड्ड्यात पडू शकेल अशा माणसाला विकता)
हा समभाग वर जाईल असा कोणाचा तरी आडाखा असतो म्हणून तो विकत घेतो आणि तो समभाग आता "पिकला" आहे तेंव्हा तो विकणे आवश्यक आहे हा तुमचा आडाखा आहे.
तुम्ही वेळेत समभाग विकला तर नफा होतो आणि वेळे अगोदर किंवा वेळे नंतर विकला तर नुकसान होते. असे बरेच आडाखे यात बांधायला लागतात.

एक उदाहरण टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टी सी एस) चा समभाग १ रुपयाचा आहे आणि त्याची आज बाजारात किंमत २००० रुपये आहे.
त्यांनी १५०० टक्के वर्षाला डिव्हीडंड दिले तरी आपल्याला फक्त १५ रुपये मिळतात. याचा अर्थ आज आपण हा समभाग डिव्हीडंड साठी घेतला तर त्यात आपले नुकसानच आहे.कारण हा परतावा फक्त ०.७५ % आहे. त्यांनी २००९ नंतर २०१८ मध्ये बोनस दिला. म्हणजेच २०१० मध्ये हा समभाग विकत घेतला असता तर आजमितीस त्याचा डिव्हीडंड आणि बोनस मिळूनही एकंदर नफा झाला नसता
लोक हा समभाग घेतात तो "खाली" विकत घेऊन "वर" विकायला. म्हणून हा एका अर्थाने सट्टा आहे.
तुम्ही कोणता समभाग केंव्हा विकला पाहिजे हा अभ्यास करणे आवश्यक आहे. चार बुकं वाचून आणि दोन क्लास लावून आपण कोट्याधीश होऊ अशी अपेक्षा असलेले लोकी नागवले जाऊन बाहेर पडतात

राहुल मराठे's picture

23 Sep 2019 - 1:51 pm | राहुल मराठे

"म्हणजेच २०१० मध्ये हा समभाग विकत घेतला असता तर आजमितीस त्याचा डिव्हीडंड आणि बोनस मिळूनही एकंदर नफा झाला नसता" कसा काय बुवा ?

राहुल मराठे's picture

23 Sep 2019 - 2:18 pm | राहुल मराठे

समजा मी एक गहु तांदुळाचा घाऊक व्यापारी आहे, मे महिन्या मध्ये हवामान खात्याने कमी पावसाचा इशारा दिला असल्याने मी तेव्हाच तांदूळ आणि गव्हाचा साठा करून ठेवला या अपेक्षेने की उत्पादन कमी होऊन पुढे त्याचा भाव वाढेल. हा पण एक प्रकारचा सट्टा आहे का.

चौकस२१२'s picture

25 Sep 2019 - 7:08 pm | चौकस२१२

म्हणाल तर सगळं आयुष्य सट्टा आहे , त्यामुळे असा धंदा करणे ( शेअर ) याला सट्टा ( गॅम्बलिंग) का म्हणू नये या प्रश्नाला उत्तर नाही

एकतर लोक २ गोष्टीत गोंधळ घालतात गुंतवणूक ( इन्व्हेस्टमेंट साधारण लांब पल्ल्याची) आणि दुसरे म्हणजे धंदा/ उलाढाल ( ट्रेडिंग, साधारण छोट्या कालावधीत ) यांच्यात.
अभ्यास करून, हे दोन्ही केला तर तो व्यवसायाचं आहे असे म्हणले पाहिजे .
एक उदाहरण देतो.. बरेच वर्ष जगभर जिथे घोडे रेस वर पैसे लावल्यास कायद्याने मुभा होती तिथे फक्त सट्टा ( गॅम्बलिंग) किंवा फार तर व्यासायिक सट्टा शक्य होते, तुम्ही फक्त घोडा जिंकेल यावर एकतर बुकमेकर च्या विरुद्ध पैसे लावू शकत होता किंवा टोट वर ( म्हणजे सर्वांनी मिळून पैसे एकत्र करायचे जो जिकेलं त्याने ८०% आणि टोट कंपनी २०% ) पैसे लावणे शक्य होते
तेव्हा यांच्यात उलाढाल ( ट्रेडिंग ) करणारे अशक्य होते
बेटफैर यांनी बेटिंग चे एक्शचेन्ज सुरु केले त्यामुळं घोडा जिंकेल किंवा हरेल असे दोन्ही बाजूने एका मेकाविरुद्ध जनता "खेळू" शकली आणि त्यातून ट्रेडिंग ची शक्यता निर्माण झाली याचा अर्थ असा कि जेव्हा माणूस बेटफैर वर ट्रेडिंग करतो तेव्हा तो घोड आहे कि हत्ती आहे याचाच संबंध नसतो तर त्याचं किमतीत कसा चढ / उत्तर होईल हे ठरवणे यात कला असते ....अर्थात हे भारतात अविवध आहे अजूनतरी फक्त रेसकोर्स वरील टोट आहे असो..

भंकस बाबा's picture

23 Sep 2019 - 4:46 pm | भंकस बाबा

तुमचे टीसीएस बद्दलचे विधान कुठेतरी चुकते आहे!
मला खात्री होती , तरी तुमच्यासारख्या दिग्गज माणसाने हे विधान केले म्हणून टीसीएसचा आयुष्यभराचा प्रवास बघितला. तर असे आढळून आले की कोणत्याही बाजारात , म्हणजे तेजीत वा मंदित हा शेयर ज्याने घेतला आहे तो आज नफ्यामधेच आहे. माझा एक शेयरबाजारातील गुरु होता.त्याने 2008 साली सांगितले होते की इंफोसिस, टीसीएस, ब्रिटानिया हे शेयर कधीही घ्यावेत. ह्या माणसाकडून जर क्लास लावला असता तर कदाचित आज आमच्या गल्लीतला झुनझुनवाला अशी प्रसिद्धि नक्कीच मिळाली असती. पण 2008 सालीच गेला बिचारा! जाताना आपल्या घरवाल्यासाठी 10000 एसीसीचे शेयर ठेवून गेला , बाकीचे सटरफटर देखील भरपूर होते. मला केशर घातलेली बिर्यानी मिळाली होती त्यावर्षी पतेतीला

शाम भागवत's picture

23 Sep 2019 - 5:23 pm | शाम भागवत

माझी पुतणी इन्फोसीसमधे होती. असंच कुणाचे तरी ऐकून, तिने २००१ च्या सुरवातीला ₹१५००० ला एक शेअर असे तीन शेअर्स घेतले होते. हा सर्वोच्च भावाच्या आसपासचा भाव आहे. नंतर तो शेअर ₹२२५० पर्यंत गडगडला होता.

“नशीब आपले”, असं समजून ती गप्प बसली होती. पुन्हा शेअर्सच्या भानगडीत पडायचे नाही हेही ठरवून टाकले होते. पण त्याच बरोबर शेअर विकायचे नाहीत हेही ठरवले होते.

त्यावेळेस तिला लाखभर पगार असल्याने तिचे फारसे काही बिघडलेही नाही.
पण त्या ३ शेअर्सवर मिळालेले बोनस शेअर्स लक्षात घेता ती आज नफ्यात आहे.
आज भाव ७६४ आहे. बोनस शेअर्स मिळाल्याने तिच्याकडे आज १९२ शेअर्स आहेत.

आजची किंमत ७६४*१९२= १४६६८८
खरेदी किंमत १५०००*३=४५०००

तारीख : बोनसचे प्रमाण : हातातले शेअर्स
13-07-2018 1:1 १९२
24-04-2015 1:1 ९६
10-10-2014 1:1 ४८
14-04-2006 1:1 २४
13-04-2004 3:1 १२
२००१ ला विकत घेतले ३

चांगली माणसे ओळखायला शिकायला लागते. ती पारखता यायला हवीत. अशी माणसे मिळाली की त्या माणसांची संगत कधी सोडायची नसते. त्यांच्याबरोबर राहून आपण कधी चांगले बनलो ते कळत देखील नाही.

तसेच चांगल्या कंपन्या ओळखता यायला हव्यात. त्यातील गुंतवणूक वर्षानुवर्षे ठेवायची असते. एखादा निर्णय चुकू शकतो. पण एकूणात आपण नफ्यात असण्याची शक्यता जास्त असते. या कंपन्यांबरोबर राहून आपण कधी मोठे झालो ते कळतच नाही.

१८ वर्षे त्या ३ शेअर्सची संगत सोडली नाही. बस्स. फक्त इतकेच तिने केले.
असो.
_/\_

सुबोध खरे's picture

23 Sep 2019 - 6:15 pm | सुबोध खरे

२००१ ला ३ समभागाची किंमत ६३ हजार स भ नि नि (PPF) मध्ये टाकले असताना त्यात वाचलेला कर १९ हजार रुपये कमी करून खिशातून ४४ हजारच रुपये गेले असते.

हे पैसे १७ वर्षांनी २०१८ मध्ये २ लाख ४२ हजार होतात.वर यावर मिळणार परतावा पूर्णपणे करमुक्त आहे. आणि हि गुंतवणूक संपूर्णपणे सुरक्षित आहे.

https://www.paisabazaar.com/compound-interest-calculator/

पहा हिशेब करून

म्हणून म्हणतोय कि समभाग कितीही चांगला असला तरी केंव्हा घ्यायचा आणि केंव्हा विकायचा याचे काही गणित आहे.

सुबोध खरे's picture

23 Sep 2019 - 6:29 pm | सुबोध खरे

हाच हिशेब टी सी एस मध्ये केला तर आपल्याला लक्षात येईल कि २००६ मध्ये ज्यांनी टी सी एस चा समभाग घेतला त्यांना १:१ बोनस असे २००६ आणि २००९ आणि नंतर २०१८ मध्ये मिळाले. म्हणूनच २०१० मध्ये घतेयस तेवढा नफा होणार नाही.
आपण आपली गुंतवणूक इतर उपलब्ध गुंतवणुकीच्या तुलनेत आणि महागाईच्या निर्देशांकाशी करून पाहिली पाहिजे.
शब्दशः अर्थ काढला तर नुकसान झाले असे म्हणणे चूक ठरेल परंतु जर हि गुंतवणूक उपलब्ध असणाऱ्या तुलनेत सुरक्षित गुंतवणुकीपेक्षा जास्त नसेल तर त्याचा धोका पाहता त्यात गुंतवणूक करावी कि नाही याचा लोकांनी विचार करावा.
वरच्या उदाहरणात अगदी ४५००० रुपये ( कोणती ही कर वजावट न मिळता) २०१८ मध्ये १ लाख ६९ हजार होते
टी सी एस चा समभाग कधीही बुडणार नाही आणि हा माझा सर्वात पहिला समभाग होता आणि याचे समभाग २००९ मध्ये विकूनच मी माझ्या व्यवसायाला सुरुवात केली. परंतु कोणताही समभाग सदा सर्वकाळ नफा देईलच याची खात्री नाही.

शाम भागवत's picture

23 Sep 2019 - 6:36 pm | शाम भागवत

महिना १ लाख पगारवाल्याची वजावटीच्या सगळ्या गुंतवणूका करून झालेल्या असतात हो.
तेव्हा ४५००० चा हिशोब केलाय तोच बरोबर वाटतोय.

तसेच पूर्णपणे अयोग्य वेळी गुंतवणूक करूनही काय होऊ शकते हे लिहिलंय.

तसेच ३ शेअर्स १८ वर्षे पकडून ठेवण्याबरोबरच, दरवर्षी फक्त ३ शेअर्स घेत राहून त्या चांगल्या कंपनीबरोबर सहभाग नोंदवत राहणे किती भाग्याचे झाले असते याची कल्पनाच करता येत नाही.

असो.

भंकस बाबा's picture

23 Sep 2019 - 8:17 pm | भंकस बाबा

शेयर विकुन पैसा उभा करणे हे अगदी अंतिम सत्य!
आज मार्केट ऑल टाइम हाईकडे असताना इंफोसिस पडलेला होता , आता करेक्शन आल्यावर इंफोसिस कडे पहा

भंकस बाबा's picture

23 Sep 2019 - 8:17 pm | भंकस बाबा

शेयर विकुन पैसा उभा करणे हे अगदी अंतिम सत्य!
आज मार्केट ऑल टाइम हाईकडे असताना इंफोसिस पडलेला होता , आता करेक्शन आल्यावर इंफोसिस कडे पहा

अनुभव छान आहेत . घरी बसून कमवण्यासाठी उत्तम काम म्हणून बऱ्याच जणांनी शिफारस केली . त्यामुळे उत्सुकता आहे .

१. नुकतेच यू ट्यूबवर कुबेर यांचे एक व्याख्यान ऐकले: अाज देशात मंदी अाहे का? दुवा: https://www.youtube.com/watch?v=Xx0ngPXpQ5A त्यात त्यांनी एक विधान केले अाहे: देशाच्या अर्थव्यवस्थेशी शेअर बाजाराचा सुतराम संबंध नसतो. पण लोकसत्ता मात्र शेअर मार्केट गडगडलं किंवा उसळलं तरी पहिल्या पानावर बातमी छापते. शेअर मार्केटमध्ये पूर्ण वहावलेले, अाणि नंतर अाजिबात कानाला खडा लावलेले अनेक मित्र माहित अाहेत. अशाच अाशयाचे अाणखी काही वाचनात अाले होते. अर्थमंत्री वगैरे एकदम कोसळणारा सेन्सेक्स सावरायला का धावतात, हे कधीच समजलेले नाही.
२. शेअर मार्केटमध्ये पैसे नुसते याच्याकडून त्याच्याकडे फिरतात. प्रत्यक्षात देशाची संपत्ती ही कष्टाने किंवा कल्पक उद्योग सुरू होण्यानेच वाढते. गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले, किंवा ते मालामाल झाले, ही काय भानगड अाहे? हे सगळे निव्वळ अाभासी मूल्य नव्हे का?
३. शेअरचा भाव कमी किंवा जास्त झाल्यामुळे, शेअर मार्केट मध्ये जे लोक ‘खेळतात’ त्यांचा फायदा किंवा तोटा होतो. असे लोक केवळ १०-२० लाख असतील, म्हणजे एकूण लोकसंख्येच्या मानाने नगण्य.
४. शिवाय अायपीओ सोडून शेअर ज्या कंपनीचा अाहे, तिला त्याचा भाव वाढल्याने काहीही फायदा होत नाही. एकदा शेअर बाजारात काढताना झाला तेवढाच. जे किरकोळ गुंतवणूकदार फायद्याच्या अाशेने यात पैसे गुंतवतात, त्यांचे या भावांच्या वाढीत वा कमी करण्यात कसलेही नियंत्रण नसते. फक्त अापण गळ टाकून बसायचे.
५. ज्या संपत्तीच्या वाढीत/ घटीत माझा काहीच वाटा नाही, त्याचा फायदा/ नुकसान मी का सोसायचे? पैसे ही कष्ट करूनच मिळवायची गोष्ट नाही का?
६. शेअरमध्ये अापले पैसे अापोअाप वाढतात असा एक समज अाहे. पण खरे तर जे गुंतवतात, ते सतत गुंतलेलेच रहातात. फायदा काढायचा, तर सतत लक्ष ठेवणे, अत्यंत जागरूकपणे भावांकडे लक्ष ठेवणे, योग्य वेळी विकणे, घेणे, हे करायला इतर कामांइतकाच वेऴ लागतो. ‘अारामात पैसे’ असं काही नसतं.
७. अाफ्रिकेत जेव्हा सगळे हिरे खणायला गोल्डरशसमध्ये गेले, तेंव्हा काही अत्यंत थोड्या लोकांना हिरे मिळाले अन ते मालामाल झाले. पण खरा गडगंज पैसा म्हणे कुदळ फावडी विकणारांनीच मिळवला. तसे हे ब्रोकर, म्युचअल फंडवाले, अॉनलाइन ट्रेडिंग वाले खरे मालामाल होतायत का?

…तर शेअर मार्केट सगळं खरंच इतकं महत्वाचं अाहे का? यासाठी क्लास वगैरे निव्वळ बुवाबाजी वाटते.

जी काय बचत अाहे, ती जर बॅंकेतच ठेवली तर महागाईच्या दराहून कमी दराने वाढते, हे माहित अाहे, तरी पण शेअरमध्ये पैसे गुंतवले नाहीत, तर फार काही अापण गमावतो का?
टीप: माझा यात अभ्यास नाही, पण हे प्रश्न नेहमी मनात येतात.

ज्ञानव's picture

23 Sep 2019 - 8:20 pm | ज्ञानव

प्रश्न आहेत. ज्याने त्याने स्वधर्मच पाळावा. शेअर मार्केट अजिबातच महत्त्वाचे नाही. इतर अनेक मार्ग आहेत ज्या द्वारे पैसे मिळवता येऊ शकतात.

फक्त शेअर मार्केट आणि इतर व्यवसायात समान धागे भरपूर आहेत. पेशन्स , मेहनत, सावधपणा, सजगता, कल्पकता वगैरे जे इतर सगळ्या व्यवसायात लागते तेच इथेही लागते. निर्णय स्वातंत्र्य हा एकमेव घातक घटक इथे आहे जो अत्यंत दुर्लक्षिला गेलेला आहे. पण हे माझे वैयक्तिक मत आहे.

जॉनविक्क's picture

24 Sep 2019 - 2:30 pm | जॉनविक्क

जुगार = नफ्याचा अथवा तोट्याचा कोणताही ठोकताळा नसता केलेली अंध गुंतवणूक.

ट्रेडिंग = अपेक्षित नफा व होऊ शकणारा तोटा याचे गणित मांडून जोखमीची योग्य ती जाणीव ठेवून केलेली कौशल्याधरीत गुंतवणूक.

शेअर्सचे व्यवहार दोन्ही प्रकारात मोडतात पण शेअर्समधे कौशल्याधरीत गुंतवणूकिसाठी सक्षम होण्यास बराच काळ तिथे घालवावा लागतो आणि hands on experience च matter करतो हे ऐकतो कोण ?

ज्ञानव's picture

23 Sep 2019 - 8:10 pm | ज्ञानव

अ ) मी ही गेले वर्षभर कमीत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये... जवळजवळ फुकटात खूप लवकर अतिश्रीमंत होण्यासाठी अश्या क्लासेस चे बरेच सेमिनार ( eye opener वगैरे ...) अटेण्ड केलेत... ९९% लोक ह्याच उद्देशाने क्लास करतात. गुरुजी एक जादूची काडी देतील आणि घबाड हाती लागेल ह्या उद्देशाने येणारेच अधिक असतात. हा दोष कुणाचा?

ब)मिपाकरांच्या पाहण्यात असे इंट्रा-डे ट्रेडिंग करून करोडपती ( ३-४ सेमिनार अटेंड केल्यामुळे आपण लाखोपती तर एकदम छाटछूट समजतो !!!) झालेले मराठी माणसे माहित आहेत का? ह्या प्रश्नातून दिसणारी मानसिकता प्रचंड घातक आहे. पण क्लासवाले तीच एन्कॅश करतात. दोष कुणाचा?

आपली रोजची नोकरी करण्यात मग्न असणाऱ्या कित्त्येक जणांना फावल्या वेळात लोणची,पापड, साड्या, शर्ट पीस, फटाके, उटणी विकताना आणि आपल्याच कार्यालयातील लोकांच्या गळ्यात मारताना पाहिले आहे पण हल्ली तीच माणसे फावल्या वेळात शेअर मार्केटमध्ये काही करता येईल का हे चाचपताना दिसतात. शेअर मार्केट हे फावल्या वेळात करण्याचा व्यवसाय नाही. त्यासाठी क्लास हा अपरिहार्य आहे. पण वर दिलेल्या अ आणि ब ह्या प्रश्नांची उत्तरे ज्याने त्याने शोधणे महत्त्वाचे आहे. कुठलाही व्यवसाय हलक्यात घेणारी जमतच मार खाते आणि मग आपल्या अपयशाचे खापर फोडण्यासाठी त्याच धंद्यातल्या अडचणींचा बाऊ करताना दिसते. तुम्ही क्लास का करू इच्छिता? ह्या प्रश्नाचे तुमच्या लेखातले उत्तर भरपूर पैसे कमावण्यासाठी असे दिसून येते. पण पैसे कमावण्यासाठी कुठले शिक्षण घ्यायला हवे हा रिसर्च आधी करावा लागतो म्हणजे कुठल्या शिक्षणाला भविष्यात डिमांड आहे ते शोधून मगच पुढे जावे लागते. एकदा तो रिसर्च केला कि आपली औकात चेक करून त्याला पर्याय शोधावे लागतात, उत्तम कॉलेजसाठी उत्तम मार्क असावे लागतात तरच पुढे मार्ग सापडत जातात. तद्वतच, जर तुम्हाला क्लास करायचा असेल तर एन एस ई किंवा बीएसइ चे अधिकृत क्लासेस चालतात ते करावे लागतात. पण त्या आधी आपण कुठे आहोत म्हणजे

(अ) आपल्याला शेअर मार्केटबद्दल अजिबात काहीच माहिती नाही.
(ब)थोडीफार ओळख आहे.
(क)बरीच वर्षे मार्केटशी कनेक्टेड आहे.
ह्या अ,ब,क पैकी आपण कुठे फिट होतो? हे पाहून क्लासची निवड करावी. म्हणजे तुम्ही जर मार्केटची अजिबातच माहिती नाही ह्या (अ) कॅटेगरीतले असाल आणि ग्यान थिअरीच्या क्लासला जाऊन बसाल तर सगळे डोक्यावरूनच जाणार. क्लासची निवड हि स्वतःबद्दलची पूर्ण माहिती करून घेतल्यानंतरच करायची आहे. सर्वच क्लासेस हे एनएसईची मॉडेल्स शिकवतात त्यामुळे ते योग्यच शिकवतात.

तसेच, इंट्रा डे करून कुणी करोडपती झाला काय आणि नाही झाला काय? त्याने आपल्याला वैयक्तिक काय फायदा ? जर एखादा करोडपती झाला नसेल म्हणून त्याचा दोष क्लासेसला असेल तर ते कितपत संयुक्तिक आहे? आणि अगदी करोडपती झाला असेल म्हणून त्याचे श्रेय क्लासेस असेल तर तद्दन मूर्खपणा आहे.

दहावीला पहिला आलेला मुलगा ज्या क्लासचा आहे त्या क्लासला सगळे धावतात त्यामुळे क्लासवाल्यांची धन होते पण मग त्यात दोष कुणाचा ?

क्लासेस मुळे पैसा नाही मिळत (आणि शाळेत मार्कही नाही मिळत.) पण (एखाद्यालाच ) अभ्यासाची दिशा मिळतेच मिळते. ती एखाद्यालाच का मिळते कारण इतर विद्यार्थी प्रश्न विचारायला बुजतात किंवा आळस करतात. म्हणूनच आमचा क्लास एकमेव क्लास आहे ज्यात आजीवन सभासदत्व आहे. दोन दिवस कार्यशाळा आणि आयुष्यभर तुमच्या शंकाचे निरसन, तसेच तुमच्या मार्केटमधील ट्रेडिंग संदर्भात तुम्ही केलेल्या किंवा इतरांनी सुचवलेल्या प्रयोगांवर चर्चा करण्यासाठी इक्विटी रिसर्च लॅब इतका ऐवज आम्ही उपलब्ध करून देतो. आता इथे विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून भंडावून सोडणे अपेक्षित असते पण काही निवडक विद्यार्थीच नेटाने पाठपुरावा करतात. इतरांना वेळ नाही, प्रश्न विचारण्याचा संकोच किंवा वाचनमात्र राहून स्वतःला घडवून नंतर मैदानात उतरण्यास पसंती किंवा अगदी गुरुजींचीच परीक्षा घेणे अशी विविध कारणे असतात. पण आमची फी किंवा आजीवन सभासदत्व प्रचंड महाग आहे.

सुबोध खरे's picture

23 Sep 2019 - 8:41 pm | सुबोध खरे

@ज्ञानव
आपल्या उत्तम टिप्पणीला एक पुरवणी जोडू इच्छितो.

चैनीची वस्तू गरजेची केंव्हा होते? आपल्या शेजाऱ्याने विकत घेतली कि

तद्वत

आपला शेजारी/ मित्र/परिचयाची व्यक्ती जेंव्हा शेअर मार्केटात मी "चार दिवसात अमुक तमुक पैसे कमावले" म्हणून शेखी मिरवायला लागला कि त्याच्या भोवती जमा झालेले चार मित्र मैत्रिणी याना वाटायला लागते कि हा "साधारण" माणूस जर इतके पैसे कमावतो तर मी "एवढा हुशार" आहे मला तर याच्यापेक्षा किती तरी जास्त कमावता यायला पाहिजेत.

किंवा गृहिणीला वाटायला लागते कि मी आता चार पैसे कमावत नाही तर नवऱ्याचे चार पैसे घेऊन मी तिप्पट कमविणे आणि नवऱ्याचे पैसे परत करून स्वावलंबी होईन.

मग हेच सगळे बकरे स्वतःहुन हलाल होण्यासाठी खाटकाकडे चालू लागतात

ज्ञानव's picture

23 Sep 2019 - 8:54 pm | ज्ञानव

डॉक्टरसाहेब, हे हि एक मोट्ठे कारण नक्कीच आहे.

ढब्ब्या's picture

23 Sep 2019 - 10:31 pm | ढब्ब्या

४ वर्षापुर्वी पुण्यात श्री किरण जाधव यांचा टेक्निकल अनालिसिस चा कोर्स केला होता. माझा अनुभव अतिशय चांगला होता.
कोर्स ची सुरूवातच शेयर बाजारकडून तुमच्या अपेक्षा आणी वास्तवात किती मिळू शकतात अशी केली होती.

आजही मि त्यातल्या काही पद्धती वापरतो आणि मला त्या फायदेशीर वाटतात.

टीपः हि कोणतीही जाहीरात नाही ... मि ईतर पद्धती देखील वापरतो, जो पर्यन्त माझ्या स्वतःच्या रुल बुक मधे राहून ट्रेडींग करतो, तो पर्यन्त सगळे छान चालते, साहस मात्र बर्याचदा अंगाशी येते :)

सुबोध खरे's picture

24 Sep 2019 - 9:53 am | सुबोध खरे

शेयर बाजारकडून तुमच्या अपेक्षा आणी वास्तवात किती मिळू शकतात
हि फार महत्त्वाची गोष्ट आहे.

परंतु जर लोकांना सांगितलं कि तुम्हाला वास्तवात साधारण वार्षिक १५ % परतावा मिळू शकेल( हा बहुसंख्य तज्ज्ञांनी दिलेला सरासरी आकडा आहे) तर अशा क्लासला भरमसाठ फी भरून कुणीही येणार नाही हि वस्तुस्थिती.

तुमच्या मुलाला आज मिळत आहेत त्यापेक्षा ५ % गुण जास्त मिळवून देऊ असे म्हटल्यास कोण पालक आपल्या मुलाला क्लास मध्ये प्रवेश घेईल.

जगात चमत्कारालाच नमस्कार केला जातो.

आणि हाव, मत्सर, आणि कमी श्रमात भरपूर मोबदला हे घटक अशा अवास्तव दावे करणाऱ्या लोकांच्या मागे हुरळून लागण्यास कारणीभूत असतात

कंजूस's picture

24 Sep 2019 - 7:30 am | कंजूस

चांगली चर्चा.

सध्या धुमाकूल उडवणारा शेअर ट्रेडींग गुरु बाबा सुनिल मिंगलानी हा आहे.
यांचे अनेक व्हीडियो यु ट्युब वर उपलब्ध आहे. यांचा क्लास झाल्यावर हे स्वत: विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया घेतात त्याचे ही व्हिडियो आहेत. यातील विध्यार्थी ज्या भावात्मकतेने प्रतिसाद देतात , रडतात, चेकाळतात, आजपर्यंत मिंगलानी भेटले नसल्याने मार्केट मधले सर्व वर्षे काही १० काही २० वर्षे जुने असलेले ही म्हणतात की हमने तो आज तक कुछ सीखा ही नही था आज चाबी मिल गयी. कोर्स मध्ये गोल्डन गेट स्ट्रॅटेजी शिकवीली जाते. कोर्स होली ग्रेल हंड्रेड पर्सेंट चा वादा करतो. मिंगलानी म्हणतात मी करोडो गमवले अनेक वर्षे घालवली असंख्य धक्के पचवले प्रयोग केले व अखेर
मला बाई स्ट्रॅटेजी सापडली हो
मित्रांनो तुफान मनोरंजनासाठी तरी यु ट्युब वर सुनील मिंगलानी यांच्या कोर्सेस चे प्रतिक्रियांचे व्हिडीयो बघाच
मात्र यात मोठा धोका असा आहे की तुम्हाला कोर्स करण्याची तीव्रतम इच्छा मनात निर्माण होइल व मोठा चुना लागु शकेल
बाकी मिंगलानी जिनीयस माणुस आहे मानवी सायकॉलॉजी मार्केंटींग कम्युनिकेशन स्कील मध्ये अत्यंत निष्णात आहे
या व्यतिरीक्त सीरीयस क्लास करायचा असेल तर मी खालील क्लास मी सुचवेल अर्थातच निर्णय आपापल्या परीस्थीती मतीनुसारच घ्या हे वेगळे सांगणे न लगे
Ashish H. Kyal चा करावा वेव्हस्ट्रेटेजी साइट एकदा बघुन घ्यावी.
दुसरा एक पर्याय व्हॉल्युम स्प्रेड अ‍ॅनालिसीस चा कोर्स हा फार व्यापक विषय आहे पण कॉइनेज अ‍ॅकेडमी वाले ही एक याच्याच व्हॉल्युम आधारीत स्ट्रॅटेजी शिकवतात पण ते सर्व साइड बिझनेस सारखे नसुन डेडीकेटेड गेम आहे. हे सर्व पुन्हा एकदा आपापल्या परीस्थीती मती नुसार

सुबोध खरे's picture

25 Sep 2019 - 11:17 am | सुबोध खरे

बाजारात एवढा मोठा नफा मिळवणारे किती असतील हजारात एक.
जसे इतके क्लासेस चालतात आय आय टी साठी ज्यात १० लाख पैकी फक्त ५ हजार विद्यार्थ्यांना चांगला अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश मिळतो बाकीचे काही खड्ड्यात जातात का? नाही तर ते इतर अभ्यासक्रम करून आयुष्यात यश मिळवतातच.
तसंच आहे इथे.

ज्ञानव's picture

25 Sep 2019 - 3:25 pm | ज्ञानव

...knowledge मध्ये भर पडून हा मार्ग सोडावा कि धरून चालावा हे ठरवता येईल...

काय ठरलं? काही मदत लागली तर हाळी द्या.

तुर्रमखान's picture

26 Sep 2019 - 12:30 am | तुर्रमखान

शेअर्समध्ये गुंतवणुकीला भावनांना महत्व नसते. तिथं आपला-तुपला कुणी नसतं. फायदा किंवा तोट्याचा अगदी सरळ साधा हिशेब असतो. त्यामुळे कुणी केवळ भाषा, जात, प्रांत, धर्म यावरून 'आपल्या' लोकांना श्रीमंत करण्यासाठी ट्रेनींग देतं असं भासवत असेल तर विश्वास ठेवणं अवघड आहे.

सुबोध खरे's picture

26 Sep 2019 - 10:22 am | सुबोध खरे

आजतागायत आपला चांगला चाललेला व्यवसाय किंवा नोकरी सोडून पूर्ण वेळ शेअर मार्केट मधील स्वतःच्या गुंतवणुकीवर वर्षानुवर्षे आपले पोट भरेल एवढा पैसा मिळवणारा माणूस मी तरी पाहिलेला नाही.
(यात लोकांना गुंतवणूक सल्ले देणे/ ब्रोकर हा व्यवसाय किंवा त्यांचा गुंतवणूक सल्लागार होणे हे गृहीत नाही)

तेंव्हा रॉबर्ट कीऑसकी (रिच डॅड पुअर डॅड चा प्रसिद्ध लेखक) म्हणतो तसे शेअर बाजारात गुंतवणूक करून संपूर्ण निवृत्त होणे हे कदाचित फार तुरळक लोकांना शक्य होईल.

उदा. आपली गुंतवणूक एक कोटी असेल त्याच्या साधारण १२-१५ लाख व्याजा/ परताव्यावर( महिना एक ते सव्वा लाख) मी "घरी बसून आराम करीन" असे म्हणणे मला तरी कठीण वाटते.

यामुळेच शेअर बाजारात नुसते पैसे कसे गुंतवावेत (समभाग कसे विकत घ्यावेत) हा भाग महत्त्वाचा नसून ते कसे किंवा केंव्हा विकावेत या फार महत्त्वाचा विषय फारच कमी क्लासवाले/ पुस्तक लिहिणारे शिकवतात.

जोवर हि क्लूप्ती मिळत नाही तोवर बाजारावर आपला उदरनिर्वाह करणे फार कठीण आहे.

मला तरी असे कोणतेही पुस्तक किंवा लेख आजमितीस सापडलेला नाही.

चौकस२१२'s picture

28 Sep 2019 - 6:57 pm | चौकस२१२

रॉबर्ट कीऑसकी
या महाशयांचा नाव असल्या सेमिनार मध्ये नेहमी ऐकलं जात.. यांनी खरंच बाजारात उलाढाल ( ट्रेडिंग) करून पैसे कमावले कि नुसते पुस्तक आणि सेमिनार विकून! हा एक साधा प्रश्न समोर येतो.. पण याचे उत्तर यांचे "भक्त " देत नाहीत.. कारण पितळ उघड पडेल

सुबोध खरे's picture

28 Sep 2019 - 7:58 pm | सुबोध खरे

पण याचे उत्तर यांचे "भक्त " देत नाहीत.. कारण पितळ उघड पडेल

आय आय एम चे सर्व प्राध्यापक उद्योगात यशस्वी व्यवस्थापक असतातच का?

किंवा सर्जरी शिकवणारे सर्व प्राध्यापक उत्तम शल्यक्रिया करू शकतातच का?

एखाद्याने चांगली तत्वे सांगितली आणि दुसर्याने त्याबद्दल चांगले लिहिले तर तो लगेच भक्त होतो का?

तुम्हाला रॉबर्ट कियोस्कीचे पुस्तक आवडले नसेल म्हणून त्याची तत्वे सांगणारे लगेच भक्त होतात का?

इतका पूर्वग्रह असू नये.

सर्वप्रथम म्हणजे मी आधी लिहिले कि माझा अश्या शिकवणी घेणाऱ्यांना सरसकट विरोध नाहीये.. जर कोणी प्रामाणिक पणे उंटांऊनिकीतील ( उलाढालीतील) अवघड गोष्ट शिकवण्यासाठी असे पैसे घेऊन शिकवत असेल तर ठीक आहे ,, मी विरोध करतोय ( किंवा त्यातील फोल पण दाखवतोय) ते या शिकवण्याची जाहिरात ज्या प्रकारे केली जाते त्याला आहे, या दोन्ही मध्ये फरक नाही का?
लोकांची दिशाभूल करून , उगाच दिवास्वप्न दाखवून जे केले जाते त्याला आहे.
आणि मी हे अनुभवूतून बोलतोय.. इतर देशात जिथे भारतापेक्षा जास्त पद्धतीचे आणि गुंतागुंतीचे फिनान्शिअल प्रॉडक्ट आहेत आणि जिथे अश्या शिकवणी उद्योगांवर थेतील सरकार ची बऱ्यापैकी कडवी नजर असते आशय ठिकाणी गेली बरेच वर्षे हा उद्योग कसा सिक्सहॅलतॉ / ब्रोकरेज धंदा कसा चालतो याचा अभयास करून बोलतोय.
सिंगापोर चे MAS किंवा ऑस्ट्रेलिया चे ASIC
आता तुम्ही जी उदाहरण दिलीत त्याबद्दल
१) आय आय एम चे प्राध्यापक यासास्वी उद्योजक असतात का? नसतात बहुतेक हे खरे पण हे लक्षात साध्य कि - आय आय एम हे काही या ४ खोल्यातल्या शिकवण्यांसारखे टिनपाट नसते, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आय आय एम किंवा तेथील प्रोफेसर काही अशी "आज शिका आणि उद्या भरपूर कमवा "जाहिरात करीत नाहीत . परत मोठा फरक आहे
२) शल्यक्रिया.. माहिती नाही पण बहुतेक त्यांना शल्यक्रियेचा अनुभव असावा लागत असेल!

आता गुंतवणूक पुस्तक विकणारे सेमिनार विकणारे.. प्रश्न साधं आहे कि जर तुम्ही एवढे भारी असाल तर दाखवा ना तुम्ही खरंच याचा स्ट्रॅटेजि वापरून रग्गड कमावलं आहेत का ते? का तुम्ह इ जे यशस्वी झालो म्हणताय ते पुस्तक लिहून आणि सेमिनार विकून
जे खरे गुंतवणूक तद्न्य आहेत ते व्यासायिक रित्या मानजेड फंड चालवतात कि जिथे फुशारक्या मारून उपयोग नसतो तुम्ही लाखो लोकांचा पैसा व्यायसायिक रित्या उपयोगात अनंत असता .
समजा एखादा सर्व धोके नीट समजावून सांगत असेल उगाच फुशारक्या मारत नसेल आणि उदाहररथ डेरीवेटीव्हस मधील विविध ट्रेडिंग च्या कल्पना कि ज्या सर्वसाधारण शेअर ट्रदेईंग पेक्सह थोड्या क्लिष्ट असतात किंवा स्प्रेड ट्रेडिंग तर ठीक ना, पण बहुतेक बसलाय लोकांचाच मार्केटिंग बघा ...
राहता राहिला प्रश्न सेबी किंवा त्या त्या देशातील सरकारी देखरेखीची.. खरा तर कोणताही टीप वैगरे देताना तुम्ही एका प्रकारचा आर्थिक सल्ला देत असता.. भारतात यापैकी किती जाहिरातदार सेबी रजिस्टर्ड "आर्थिक सल्लागार" असतात?
अजून एक म्हणजे भारतात या क्षेत्रात गॅरंटी किंवा आर्बिट्राज हा शब्द किती ढोबळ प्रमाणे वापरला जातो
इतर काही देशात जर एखाद्या आर्थिक सल्लागाराने किंवा असल्या शिकवणी घेणाऱ्याने जर हा शब्द वापरला तर जिथे सरकारी रेग्युलेटर जागरूक आहे तिथे त्याला धारेवर धरले जाईल
एकूणच ग्राहक म्हणून यातील काही बारकावे लोक बघत नाहीत
-धोका आणि संधी
- ब्रोकर बुडणे, त्याच्याकडील आपले पैसे सुरक्षित आहेत कि नाही?
असो हा वेगळाच विषय आहे
असो माझी प्रतिक्रिया तिखट वाटत असेल कदाचित पण हा आंधळा विरोध नाहीये

सुबोध खरे's picture

30 Sep 2019 - 10:07 am | सुबोध खरे

हायला

तुम्ही मला काय वित्तीय सल्लागार समजून झोडपताय का?

मी एक व्यवसाय करणारा डॉक्टर आहे आणि मी कुणालाही कसलाही वित्तीय सल्ला देत नाही.

तसेच मी कोणत्याही मलम (MLM -एम वे, टप्पर वेअर ओरिफ्लेम) कंपनी( ज्यांचे सदस्य कियोस्कीचे दाखले देत असतात) चा विक्रेताही नाही

रॉबर्ट कियोस्की दिवाळखोर झाला कि नाही याच्याबद्दल पण मला काहीच म्हणायचे नाही

पण त्याने पुस्तकाद्वारे सामान्य माणसाने "पैसा नुसताच पडून राहण्यापेक्षा तो गुंतवून त्यातून आपली आर्थिक प्रगती साधली पाहिजे" हा विचार मांडला (तसा तो इतरांनी मांडला असेलच पण त्याचे पुस्तक प्रसिद्ध झाले म्हणून माझ्यासारख्या अनेक लोकांनी ते वाचले.)

म्हणून मी त्याचा "भक्त" झालो हे आपले म्हणणे मला अजिबात मान्य नाही.

शेअर बाजारात गुंतवणूक आणि ट्रेडींग हे दोन वेगवेगळे मार्ग आहेत. ट्रेडींग छोट्या कालावधीसाठी करतात. छोट्या कालावधीमध्ये शेअरची किंमत बर्‍याच वेळा सेंटीमेंटवर वर-खाली होते. छोट्या कालावधीतल्या (एक दिवस, आठवडा, महिना) शेअरच्या किमतीचा अंदाज बांधणे कठीण असते. पण ट्रेड इन्फॉर्मेशन ड्रिव्हन (लिगली आणि एथिकली) वा क्वांट ड्रिव्हन (फंडामेंटल + कोरिलेशन रिग्रेशन स्टॅट्स) असेल अंदाज/गणित बरोबर आलं तर लिव्हरेज ट्रेड्स (वा ऑप्शन मार्केट) मध्ये खूपच अधिक परतावा मिळू शकतो. पण अंदाज चुकले तर पैसे जाण्याची शक्यताही अधिक असते. केवळ टेक्निकल अ‍ॅनालिसिसवर फंड मॅनेज करायला दिला तर त्याचे वर्षभराचे परतावे किती असतील? अशा ट्रेडींग करणार्‍यांचे लाँग टर्म रिटर्न्स (१ वर्षाचे) इंडेक्स पेक्षा अधिक असतील (आफ्टर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स, ब्रोकरेज आणि फंड मॅनेजमेंट खर्च) तर ती ट्रेडींग स्ट्रॅटेजी आउटपफॉर्मींग आहे असे म्हणता येईल. पण तसे आकडे कुठलेच टेक्निकल अ‍ॅनालिसीसवाले देत नाहीत. नवख्या लोकांचे कॅपिटल लॉस होण्याची शक्यताच अधिक. ते ब्रोकर-सबब्रोकरला श्रीमंत करायचे धंदे आहेत.

गुंतवणूक ही त्यामानाने मोठ्या कालावधिसाठी केली जाते. मोठ्या कालावधीत (१ वर्ष वा अधिक) शेअरची किंमत कंपनीचे व्हॅल्यूएशनचे पॅरामिटर्स (ग्रोथ रेट, रिटर्न्स ऑन कॅपिटल एम्प्लॉएड, कॉस्ट ऑफ कॅपिटल ई.) उत्तरोत्तर चांगले होत जात आहेत की, घसरत जात आहेत यावर वर खाली होते. एखाद दुसर्‍या स्टॉक मध्ये गुंतवणूक शक्यतो स्वतःच्याच अभ्यासानंतरच करावी. आणि केलेल्या गुंतवणूकीचे क्वार्टर रिझल्ट, फंडामेंटल्स नियमाने पहावेत. अपेक्षेप्रमाणे कंपनी शेअर होल्डर्स साठी व्हॅल्यू क्रिएट करत आहे, व्हॅल्यूएशन पॅरामिटर्स इंप्रूव्ह होत आहेत की ढासळत आहेत हे महत्त्वाचे. एखाद दुसर्‍या कंपनी मधली गुंतवणूक ही अन-डायव्हसिफाईड असल्याने त्यात कंपनी स्पेसिफिक रिस्क असते. त्यामुळे भले ओव्हरऑल मार्केट वर जातय पण तुमचा स्टॉक गटांगळ्या खातोय असे चित्र असू शकते. किंवा उलटही होऊ शकते ओव्हरऑल मार्केट गटांगळ्या खातय. पण तुम्ही निवडलेले स्टॉक्स आउटपफॉर्म करतायत.  

तसा अभ्यास करणं शक्य नसेल तर, निफ्टी ईटीएफ किंवा सातत्याने बेंचमार्क आउटपफॉर्म करणारे शक्यतो लार्ज किंवा मल्टी कॅप म्युच्युअल फंड अधिका अधिक कालावधिसाठी (१० वर्ष) ठेवून द्यावेत. जितक्या अधिक कालावधीसाठी तुम्ही डायव्हर्सिफाईड इक्विटी इन्व्हेस्टमेंट (म्युच्युअल फंड किंवा निफ्टीइटीएफ) ठेवाल तशी तशी त्यातली रिस्क कमी कमी होत जाते. म्हणजे एक वर्षाच्या गुंतवणूकीतला सर्वात जास्त तोटा हा जानेवारी २००८ ते जानेवारी २००९ या कालावधीत होता. हा तोटा हा ५०% हून अधिक होता. म्हणजे गुंतवलेल्या १०० रुपयाचे ५० रुपयेच झाले. पण दहा वर्षाच्या कालावधीतला कमीत कमी परतावा हा डिसेंबर-०७ ते डिसेंबर-१७ या कालावधीत आहे. या कालावधीतली गुंतवणूक केवळ द.सा.द.शे ५% ने वाढली आहे. म्हणजे कॅपिटल लॉस नाही झालं पण परतावे एफडी पेक्षा फारच कमी आहेत. (तात्रिंक भाषेत गुंतवणूकीचा कालावधी जसजसा वाढतो तसतसा परताव्याचा स्टँडर्ड डिव्हीएशन्स म्हणजे रिस्क कमी कमी होत जाते). मे २००३ - मे २०१३ या कालावधीतले इंडेक्सचे रिटर्न्स सर्वात जास्त म्हणजे द.सा.द.शे २०% ने वाढले आहेत. फॉरवर्ड पीई रेशो (आजची किंमत/भविष्यातला नफा) हा एक निर्देशांक आहे ज्यावरून इंडेक्स/इंडिव्हिज्यूअल स्टॉक किती एक्सपेन्सीव्ह आहे वा भविष्यात काय अपेक्षा आहेत हे मोजले जाते. अधिक पीई म्हणजे अधिक अपेक्षा अधिक महाग. जर खरोखरच भविष्यातले प्रॉफीट ग्रोथ अपेक्षेप्रमाणेच असेल तर हाय पीई मोठ्या कालावधिसाठी हाय राहू शकतो. पण भविष्यातल्या अपेक्षा कमी असतील तर पीई रेशो कमीच राहील. सध्याचा निफ्टीचा ट्रेलिंग पीई रेशो (आजची किंमत/कंपन्यांचे गेल्या ४ तिमाईचा नफा)  गेल्या ३,५,१० वर्षाच्या सरासरीपेक्षा अधिक आहे. म्हणजे बाजाराच्या ग्रोथच्या अपेक्षा जास्त आहेत.  कंपन्यांचे प्रॉफीट ग्रोथ अपेक्षेप्रमाणे होणार असेल तर "चढत्या बाजाराबरोबर" पीई रेशो पण हाय राहील. जर अपेक्षित ग्रोथ झाली नाही वा होण्याची शक्यता मावळली तर मार्केट मध्ये करेक्शन होईल. इंडेक्सची ही आकडेवारी म्युच्युअल फंडातल्या लाँग टर्म गुंतवणूकी साठी उपयोगी पडेल. करेक्शन नंतर इंडेक्सचा पीई सरासरी पेक्षा कमी असेल आणि तुमची ग्रोथची अपेक्षा बाजाराच्या अपेक्षापेक्षा अधिक असेल तर ती सगळ्यात उत्तम संधी असेल, चांगले लाँग टर्म रिटर्न्स मिळविण्याची.  

अजून एक, इकॉनॉमिक्स टाईम्सच्या इटी मनी अ‍ॅपने डायरेक्ट इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून देण्याची चांगली सोय केली आहे. (असेच अजून काही अ‍ॅप्स /वेबसाईट्स आहेत म्हणा). नेट बँकींगच्या पोर्टल वरून वा इतर कुणाकडून घेतलेल्या रेग्युलर म्युच्युअल फंड पेक्षा डायरेक्ट फंडामधली गुंतवणूक जसजसा कालावधी वाढत जातो तसतशी अधिक वाढत जाते. (डिस्ट्रीब्यूशन कमिशनच्या टक्केवारी नुसार ५-७ वर्षात १०% ते २०% चा फरक पडतो) त्यामुळे शेअर बाजारातले काही कळत नसेल तर डायरेक्ट म्युच्युअल फंड/इटीफ जास्तीत जास्त कालावधीसाठी ठेवून दिलेत तर एफडी पेक्षा जास्त परतावा मिळण्याच्या शक्यता वाढतील. बाकी ते किती घ्यायला हवेत इ. व्यक्तीच्या गरजेनुसार बदलत जाईल.

शाम भागवत's picture

28 Sep 2019 - 7:23 am | शाम भागवत

एखाद्या विशीष्ट्य समभागांत दीर्घमुदतीची गुंतवणूक करायची असेल तर त्या गुंतवणूकीच्या १०% समभाग ट्रेडिंगसाठी वापरून, त्यातून होणाऱ्या नफ्यातून आपली गुंतवणूक मोकळी करून घेणे हे धेय्य असले पाहिजे. त्यासाठी १ले वर्ष सरावासाठी कागदावर ट्रेडिंग केले तरी चालेल.

ज्ञानव's picture

28 Sep 2019 - 9:51 am | ज्ञानव

पण ही स्ट्रॅटेजी कुठल्याही क्लासवाले शिकवत नाहीत. ते स्ट्रॅटेजीच्या नावावर ट्रेडिंग सेट अप्स शिकवतात आणि सेट अप्सचा वापर कसा करायचा हे विद्यार्थी गुरूजींना विचारतच नाहीत. विद्यार्थी संवाद साधण्याऐवजी शेअर्स जमले नाहीत तर डेरीव्हेटीव्हज आणि डेरीव्हेटीव्हज जमलं नाहीतर कमोडीटी....करन्सी असे दाही दिशा फिरून निराश होतात. मग दोष क्लासेसना जातो.

शाम भागवत's picture

28 Sep 2019 - 7:24 am | शाम भागवत

एखाद्या विशीष्ट्य समभागांत दीर्घमुदतीची गुंतवणूक करायची असेल तर त्या गुंतवणूकीच्या १०% समभाग ट्रेडिंगसाठी वापरून, त्यातून होणाऱ्या नफ्यातून आपली गुंतवणूक मोकळी करून घेणे हे धेय्य असले पाहिजे. त्यासाठी १ले वर्ष सरावासाठी कागदावर ट्रेडिंग केले तरी चालेल.

तुर्रमखान's picture

28 Sep 2019 - 7:59 pm | तुर्रमखान

उत्तम विवेचन.

१. शेअर ट्रेडींग करायचे असतील तरच क्लासेस करावेत. गुंतवणुक म्हणून घेणार असाल तर असंख्य फुकट पुस्तकं आणि महाजालावर रिसोअर्स उपलब्ध आहेत. ते शोधून, वाचून आणि समजावून घेणं शक्य नसेल तर क्लास करून देखील फायदा होणार नाही. क्लास वाल्याचा होईल. गुंतवणुकीसाठी घेण्यासाठी शेअर्स निवडणं अवघड नाहिये. ट्रेडींगसाठी शेअर्स निवडण्याबरोबर खरेदी विक्रीचं टायमिंग महत्वाचं असतं.

२. शेअर ट्रेडींगमध्ये उतरणार असाल तर हाताशी भरपूर वेळ आहे याची खात्री करा. स्वतः भरपूर अभ्यास करायची तयारी असू द्यावी. दोन-चार जड पूस्तके वाचायची चिकाटी असावी. पाच-पंचवीस यु-ट्यूब विडिओ बघून आरंभशूरासारखा निर्णय घेउ नका.

३. हे दोन्ही जमणार नसेल तर रेग्युलर म्युच्युअल फंडात गुंतवणुक करावी. मागच्या काही वर्षात कुत्र्यांच्या छत्र्यांसारखे म्युच्युअल फंड सल्लागार उगवले आहेत. 'वॅल्यु रिसर्च', फंड्स ईंडिया, स्क्रीपबॉक्स ई. वरून फंड निवडतात. मूळ धाग्यात म्हणल्याप्रमाणे वॉट्सअ‍ॅप-फेसबूक गृप तयार करून मासे गळाला लावायचे आणि रेग्युलर फंड घ्यायला लावायचे. एकदा सिप सुरू झाली की यांची वर्षानूवर्षे कमिशन सुरू होते. 'बाजाराच्या चढउताराला घाबरू नका, गुंतवणूक करत रहा' अशा आशयाच्या पोस्टचा मधून मधून मारा करत रहायचा. वास्तविक वर दिलेल्या साईट वरून चांगले म्युच्युअल फंड निवडणं खूप सोपं आहे. त्यातल्या त्यात लार्ज कॅप तर अजूनच सोपं. म्युअच्युअल फंडाच्या डायरेक्ट प्रकारात गुंतवणुक केली तर त्याचा दीर्घकालीन परतावा त्याच फंडाच्या रेग्युअलर प्रकारापेक्षा जास्त असतो. त्या त्या म्युच्युअल फंड हाउसेसच्या साईतवर सगळी माहिती छान असते. कार्वी वगैरे अ‍ॅप्स आहेत जिथं तुम्ही कंसोलिडेटेड स्टेटमेंट्स बघू शकता, सगळं फुकटात. त्यामुळे असल्या एजंटाच्या बेबसाईटचा फार काही उपयोग नसतो.

सुबोध खरे's picture

28 Sep 2019 - 8:37 pm | सुबोध खरे

बैलाचा डोळा
उत्तम विवेचन

एजंट मार्फत केलेले सगळे उद्योग हे एजंटच्याच फायद्याचे असतात. म्युचल फंडमध्ये उत्तम परताव्यासाठीच्या गुंतवणुकीला देखील बेसिक नियम हा शेअर मार्केटचाच असायला हवा. म्हणजे मार्केट तळाला असतानाच म्युचल फंडमध्ये गुंतवणूक व्हायला हवी. पण जेव्हा जेव्हा मार्केट अतिऊच्च पातळीला असते तेव्हाच आय पी ओ आणि म्युचल फंडच्या जाहीरातीना उत येतो. कारण, त्यावेळी सामन्यातला सामान्य माणूस पण सहज पैसे मिळवण्याची अनैसर्गिक, अतार्किक, बेधुंद हाव मनात धरून असतो. हि हाव हेरूनच नवजात कंपन्या आणि फंड हाउसेस आपले उख्खळ पांढरे करून घेतात. ह्यातून हेच सिद्ध होते कि मानसिक गुंतवणुकीतून (जी सामान्य माणसाची मानसिकता दर्शवते) नव्हे, तर बौद्धिक गुंतवणुकीतूनच (जी फंड हाउसेसची कठोर बुद्धिमत्ता दर्शवते.) पैसे मिळवता येतात.
सामान्य माणूस ज्याला शेअर्समधले काही कळत नाही त्याने म्युचल फंडमध्ये गुंतवावेत हा पण एक चुकीचा, दिशाभूल करणारा प्रचार आहे. म्युचल फंडची निवड करताना सुद्धा शेअर्सच्या निवडी इतकाच रिसर्च अपेक्षित आहे. कोणते फंड हाउस, कोणता सेक्टर, मिड कॅप की लार्ज कॅप? टॅक्स सेव्हिंग कि अन्य इत्यादी अनेक गोष्टींचा विचार करून मगच म्युचल फंड निवडावा लागतो. पण शेअर्समध्ये होत नसेल इतकी अंदाधुंद गुंतवणूक (?) म्युचल फंडात होत असते. म्युचल फंड सेफ आहे. एस आय पी सेफ आहे असे सांगून एकदा तुम्ही पैसे टाकायला सुरुवात केलीत कि एका कालावधीपर्यंत झक मारत पैसे टाकत राहता किंवा म्युचल फंड म्हणजे लॉंग टर्मच ही मनाची तयारी करूनच गुंतवणूक करत राहता. तर मग तीच तयारी करून त्याच शेअर्समध्ये म्हणजे ज्या शेअर्समध्ये म्युचल फंडवाले पैसे गुंतवतात,आपण स्वतः गुंतवणूक केली तर काय हरकत आहे. इथे प्रतिवाद असा होतो कि म्युचल फंडवाल्यांना केव्हा आत शिरायचे आणि केव्हा बाहेर पडायचे हे कळत असते पण मग ते मार्केट ४०००० असताना कंठशोष करून तुम्हाला आत का घेतात ?
शेवटी फंड व्यवस्थापक हा पण फंड हाउसचा एजंटच तो त्याच्या कंपनीच्या भल्यासाठीच काम करणार. कुठल्याही मार्केटमध्ये तुम्हा आम्हाला पैसे कमावून द्यायला कुणीही बांधील नाही. आपली गाडी आपणच चालवणे उत्तम त्यासाठी थोडावेळ क्रिकेट, राजकारण आणि इतर टाईम पास बाजूला ठेवून एक तास स्वतःला देणे कठीण आहे का ? त्याहीपुढे आपल्या मुलांना आठवी नववीत आल्यावर अर्थसाक्षर करणे हा प्रथमोपचार आहे नव्हे तोही एक संस्कारच आहे. अकौंटस आणि अर्थसाक्षरता हि प्रत्येक मुला मुलीला संस्कारातूनच दिली गेलीच पाहिजे.
मग क्लासेस काय किंवा म्युचल फंड्स काय किंवा अन्य कुणीही काय तुम्हाला सो कॉल्ड गळाला लावणार नाही.

जॉनविक्क's picture

29 Sep 2019 - 11:27 am | जॉनविक्क

सर तुम्ही परत लिहते व्हा _/\_

शाम भागवत's picture

29 Sep 2019 - 5:12 pm | शाम भागवत

ये हुई बात.
_/\_

उपेक्षित's picture

29 Sep 2019 - 6:15 pm | उपेक्षित

वा उस्ताद वाह.

चौकस२१२'s picture

30 Sep 2019 - 6:57 am | चौकस२१२

"सामान्य माणूस ज्याला शेअर्समधले काही कळत नाही त्याने म्युचल फंडमध्ये गुंतवावेत हा पण एक चुकीचा, दिशाभूल करणारा प्रचार आहे.
हे तांत्रिक दृष्ट्या खरे आहे, पण मला वाटते कि या सल्लाय मागचा कारण असे कि
- मुतुअल फंड हे व्यायसायिक पद्धतीने चालवले जातात त्यामुळे तुम्ही वयक्तिक निर्णय घेण्यापेक्षा कदाचित अशी गुंतवणूक करणे हे कमी धोक्याचे होय शकते...
"कदाचित "शेवटी आपण सर्वच मार्केट चा धोका अप्रत्यक्ष रित्या घेत असतोच

तेजस आठवले's picture

29 Sep 2019 - 5:33 pm | तेजस आठवले

म्युच्युअल फंड बाबतीत -->

काही बाबतीत सहमत आहे. मी स्वतः एक वैयक्तिक पातळीवर काम करणारा म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर आहे. (सामान्य भाषेत एजन्ट )
रेग्युलर आणि डायरेक्ट पर्यायांमधून मिळणाऱ्या परताव्यात साधारण २-३% फरक पडू शकतो. १० ते २०%नाही.
राहता राहिली गोष्ट कमिशनची. ते किती असते हे सांगायची आम्हाला परवानगी नसते. (अर्थात सेबीने घालून दिलेल्या दंडकाप्रमाणे कमिशनची मर्यादा सेट केलेली असते) आम्हाला मिळणारे कमिशन अत्यंत तुटपुंजे आहे.उदाहरणार्थ, एखाद्या संभाव्य ग्राहकाला म्युच्युअल फंड म्हणजे काय हे समजावून सांगणे, केवायसी आणि इतर फॉर्म भरून घेणे, आणि ही कागदपत्रे वैयक्तिकरित्या फंडच्या ऑफिसात जमा करणे ह्यासाठी ज्या २ खेपा होतात त्याचे बस भाडेही निघत नाही.
बऱ्याच जणांना एजन्टच्या कमिशन बाबतीत पोटशूळ असतो. (हे तुम्हाला वैयक्तिकरित्या नाही). पण संभाव्य ग्राहक मिळवण्यासाठी जी डोकेफोड करावी लागते त्याचे हे मूल्य असते. आता ह्यात तुम्ही म्हणता तसे गंडवणारे लोक असतात. नाही असे नाही. पण एलआयसी आणि म्युच्युअल फंड ह्यांच्या कमिशन पद्धतीत जमीन अस्मानाचा फरक आहे हे नम्रपणे नमूद करू इच्छितो. एलआयसी चा तुमचा हफ्ता काढताना एजन्ट चे कमिशन धरूनच काढतात. त्यामुळे तुम्ही एलआयसी एजन्ट ला परस्पर पोसता.
बरेच जण आधी मला तुमचे कमिशन किती हा प्रश्न हमखास विचारतात. मी त्यांना फक्त एवढेच सांगतो कि आपण जर एक लाख रुपये म्युच्युअल फंडात गुंतवलेत तर तेव्हडे सगळे फंडातच गुंतवले जातात. तुमच्या गुंतवणूक रक्कमेतून काढून आम्हाला कमिशन मिळत नाही. गुंतवणूक करणार आपण आणि ह्याला फुकट कमिशन मिळणार(जे फुकट नसते) ह्या गोष्टीने बरेच जण बैचैन होतात. आणि एक लाख पगार असलेल्या माणसाला जी पाच हजाराची गुंतवणूक म्युच्युअल फंडात करायची असते तीही तो करत नाही आणि ते एक लाख रुपये बरेच महिने तसेच सेविंग अकाउंटला पडून राहतात. (३.५% करपात्र व्याज)

मी माझ्या प्रत्येक ग्राहकाला हे स्पष्ट सांगतो हे तुमच्या गुंतवणुकीवर खात्रीशीर परतावा मिळणार नाही. शेअर मार्केटशी संबंधित असल्याने ह्या गुंतवणुकीत धोका आहे परंतु चांगला नफा होण्याची शक्यता पण आहे. लाखाचे बारा हजार पण होऊ शकतात किंवा दोन लाख पण होऊ शकतात. बरेच जण ह्यातला नकारात्मक भाग फक्त डोक्यात ठेवतात आणि चांगल्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे टाळतात. ह्याच लोकांना जेव्हा गोड बोलून गंडवणारा एजन्ट मिळतो तेव्हा तो खात्रीशीर १५ ते २०% अमिश दाखवतो आणि मासे गळाला लावतो आणि लोक काहीही मागचा पुढचा विचार न करता पैसे गुंतवतात.

अर्थात ह्यापुढे अशा कमिशन बेस्ड सेवा हळूहळू बंदच होत जाणार आहेत.

ज्ञानव's picture

29 Sep 2019 - 6:14 pm | ज्ञानव

म्हणून कुणावरही राग /पोटशूळ नाही. एजंटला काय मिळतं? खरोखरच काही नाही. (तुम्ही म्हंटलं तसं विमा एजंट हा अपवाद पण जाऊ देत तो एक वेगळाच विषय आहे.) पण म्युच्युअल फंड हाऊस आणि त्यांची मार्केटींग टिम ही जे काम करते ते विमा एजंटटाईपच काम झाले असं वाटतं. स्किम्स तेव्हाच गळ्यात मारल्या जातात जेव्हा मार्केट ऊच्चतम पातळीवर असतं. ग्राहकाची मेंढरांच्या मानसिकतेनं वागण्याची / निर्णय घेण्याची सवय हेरूनच काम केले जाते.
समोरून आलेल्या ग्राहकाला योग्य सल्ला किंवा गुंतवणूकीबाबत सजग करण्याऐवजी आपली तुंबडी भरण्याकडेच त्यांचा कल असतो. (त्यातली नैतिक-अनैतिकता हा वादाचा विषय होऊ शकतो.)

माझा राग / पोटतिडीक ग्राहकांच्या आधी ढिलं राहण्याबाबत, अंधविश्वासाने गुंतवणूक करण्याबाबत आणि नंतर फसवले गेले म्हणून ऊलट्या बोंबा मारून आम्ही सामान्य माणसं म्हणून गळा काढण्याबाबत आहे.

चौकस२१२'s picture

30 Sep 2019 - 7:03 am | चौकस२१२

नाण्याची दुसरी बाजू छान लिहिली आहेत
"कमिशन बेस्ड सेवा हळूहळू बंदच होत जाणार आहेत." मग त्याला पर्याय काय असणार आहे?
काही इतर देशात असे झाले आहे

तेजस आठवले's picture

29 Sep 2019 - 7:45 pm | तेजस आठवले

ग्राहकांची मानसिकता हा एक फार वेगळा विषय आहे. माझ्या अनुभवानुसार सांगतो.. बरीच जण गुंतवणुकीबाबत काहीही अभ्यास करत नाहीत. कुठून तरी म्युच्युअल फंडाबाबत ऐकीव माहिती घेतात. जेव्हा कधी फंड डिस्ट्रिब्युटर(म्हंजे मी ) ची आणि ह्यांची भेट होते, तेव्हा अगदी एक्सआयटेड असतात. त्यांना पैसे सव्वापट ते दुप्पट होतात असे कोणीतरी सांगितलेले असते.मी त्यांना म्युच्युअल फंडाची सर्व माहिती देऊन धोक्यांची आणि परताव्याच्या अनियमिततेची कोणतीही खात्री मिळत नाही हे मी स्पष्ट सांगतो. त्यानंतर लगेच त्यांच्या तलवारी म्यान होतात आणि कायमच्या म्यानच राहतात. मिळवीन तर २० ते ५०% नफा, नाहीतर ते लफ़डंच नको असा त्यांचा दृष्टिकोन असतो. माझ्या माहितीत किती तरी माझ्या वयाचे तरुण लोक बँकेत जवळजवळ ३/४ लाख रुपये महिनोन महिने ठेवून आहेत. ह्याच लोकांना अरे ३.५% व्याजावर सेविंग अकाउंट मध्ये पैसे पडून ठेवण्यापेक्षा मग कमी धोका असणारी(म्युच्युअल फंडांपेक्षा) एफडी तरी कर असे सांगितले कि त्यांना रण गाजवण्यासाठी असलेली आपली तलवार भेंडी कापायला वापरायला लावल्यासारखे नैराश्य येते. त्यामुळे घेईन तर बीएमडब्लू नाहीतर तडफडत चालत हिंडेन असा मंत्रचळेपणा करतात. मधला काही मार्गच नाही.

"माझा राग / पोटतिडीक ग्राहकांच्या आधी ढिलं राहण्याबाबत, अंधविश्वासाने गुंतवणूक करण्याबाबत आणि नंतर फसवले गेले म्हणून ऊलट्या बोंबा मारून आम्ही सामान्य माणसं म्हणून गळा काढण्याबाबत आहे."
+१. मात्र दुसरी बाजू अशी की बऱ्याच जणांना काहीच धोका पत्करायचा नसतो आणि काही जणांना तर आपण कायम बकरेच आहोत आणि आज ना उद्या कापायला जायचेच आहे अशी आत्मघातकी मानसिकता असते.

एकूणच चर्चा चांगली चालली आहे असे मत नोंदवतो.

@भागवत/ज्ञानव जी, 
९०% इन्व्हेस्टमेंट- १०% ट्रेडींग केली काय कींवा १०% इन्व्हेस्टमंट- ९०% ट्रेडींग केली काय. जी कुठली स्ट्रॅटेजी असेल ती जर इंडेक्सला वा डायरेक्ट म्युच्युअल फंडाच्या रिटर्न्सला कन्सिटंटली आउटपरफॉर्म करत असेल (आफ्टर शॉर्ट टर्म कॅप. गेन टॅक्स, ब्रोकरेजेस  अ‍ॅण्ड  अदर एक्सपेन्स) तर ठिक नाहीतर  त्या धडपडीपेक्षा  (स्ट्रॅटेजीपेक्षा) डायरेक्ट म्युच्युअल फंडातली गुंतवणूक चांगली एवढेच माझे म्हणणे आहे. 

समजा मी स्वतः क्लास लावून, अभ्यास करून ट्रेडींग करायचे ठरवले वा स्वत: स्टॉक सिलेक्ट करून इन्व्हेस्ट करायचे ठरविले (वा दोघांचे काँबीनेशन) तर मी मिळविलेले परतावे डायरेक्ट म्युच्युअल फंडच्या  परताव्यापेक्षा वा इंडेक्सच्या  परताव्यापेक्षा दर क्वार्टरला/दर वर्षाला कन्सिस्टंटली चांगले येत असतील तर मला समाधान असेल की मी माझी स्ट्रॅटेजी काम करत आहे. (जो काही १६ लाखाचा,१६ हजार रुपयाचा क्लास लावला, जी काही पुस्तकं वाचली त्यातून जे काही शिकलो ते फायदेशीर आहे).  
उदाहरणादाखल: 
डीएसपी मिड कॅप फंडाच्या रेग्युलर फंडाचे परतावे:  
२६ सप्टेंबर २०१३ चा एन.ए.व्ही. १६.११ रुपये/युनीट २७ सप्टेंबर २०१९ भाव ५४.३५ रुपये/युनीट - म्हणजे ६ वर्षात माझ्या १ लाख गुंतवणूकीचे झाले साधारण ३ लाख ३७ हजार रुपये
डीएसपी मिड कॅप फंडाच्या डायरेक्ट फंडाचे परतावे:
२६ सप्टेंबर २०१३ चा एन.ए.व्ही. १६.१८ रुपये/युनीट २७ सप्टेंबर २०१९ भाव ५७.१९ रुपये/युनीट - म्हणजे ६ वर्षात माझ्या १ लाख गुंतवणूकीचे झाले साधारण ३ लाख ५३ हजार रुपये म्हणजे साधारण मूळ १ लाखाच्या गुंतवणूकीवर ६ वर्षात १६ हजाराचा म्हणजे १६% चा फरक हा डायरेक्ट आणि रेग्युलर मध्ये आहे. मी स्वतः निवडलेल्या एक लाखाच्या मिडकॅप स्टॉक्सच्या पोर्टफोलिओचे व्हॅल्यूएशन त्याच काळात ३ लाखाहून खाली असतील तर त्याला अर्थ नाही. (समजा मिडकॅप ईटीएफचे-इंडेक्सचे ३ लाख होत असतील, तर माझी स्ट्रॅटेजी अंडरपरफॉर्म करत आहे)
याच फंडाचे १६ जानेवारी २०१८ ते १६ जानेवारी २०१९ या १ वर्षाच्या काळातले डायरेक्ट फंडाचे रिटर्न्स -११.५६% आहेत. (आणि रेग्युलर म्युच्युअल  फंडाचे -१२.२५% )
माझं म्हणणं एवढच आहे की, आपली जी काही स्ट्रॅटेजी (मिड कॅप मध्ये वा लार्ज कॅप मध्ये) असेल त्याचे रिटर्न्स त्याच्या त्याच्या बेंचमार्कपेक्षा (इंडेक्सपेक्षा) वा कंपिटीटीव्ह प्रोडक्ट्स (त्या त्या डायरेक्ट म्युच्युअल फंड) पेक्षा जास्त असायला हवेत. (किंवा एखाद्या पिरियड मध्ये तोटा झाला असेल -जसे गेल्या वर्षी मिड आणि स्मॉलकॅप पार कोसळून गेले- तर आपला तोटा त्या मानाने कमी झालेला असला पाहीजे) तरच स्वतः केलेल्या  मेहनती मध्ये  अर्थ आहे.  मग ती ट्रेडींग स्ट्रॅटेजी असो वा इन्वेस्टमेंट स्ट्रॅटेजी वा दोघांचे कॉम्बीनेशन. 

@तेजस जी, पेपर बेस्ड डिस्ट्रीब्यूशनच्या तळाशी असलेल्या डीस्ट्रीब्यूटरला कदाचीत मूळ कमिशनचा काही भाग मिळत असेल. त्यांनी केलेल्या मेहनतीचा न्याय्य मेहनताना मिळाला पाहिजे या भावनेशी सहमत. पण इथिकल प्रॉब्लेम  हा आहे की या कमिशनमुळे कॉन्फ्लीक्ट ऑफ इंटरेस्ट येतो  आणि मिससेलींगच्या मुळाशी हे येते. (डिस्ट्रीब्यूटरने नाही पण अ‍ॅड्व्हाजरने हे कॉन्फ्लीक्ट ऑफ इंटरेस्ट टाळले पाहिजेत हे माझे मत आहे). याचा योग्य तो बॅलन्स साधण्याचा प्रयत्न सेबी नेहमी करतच असते म्हणा. प्रस्तुत धागा हा स्वतः ट्रेडींग/इन्व्हेस्टमेंट करून शेअर बाजारात फायदा मिळवू इच्छिणार्‍यांसाठी असल्याने त्यांना  डायरेक्ट म्युच्युअल फंडात स्वतः  गुंतवणूक करता येईलच असे मला वाटले. (म्हणजे आर्थसाक्षर असतीलच वा निदान अर्थसाक्षर होण्याचा प्रयत्न करत असतील असे गृहीत धरले आहे). त्यामुळे अशांनी आपल्या ज्या काही स्ट्रॅटेजीज आहेत त्याची तुलना डारेक्ट फंडाशी करावी.

ज्ञानव's picture

30 Sep 2019 - 7:38 am | ज्ञानव

आपल्या विवेचनाशी अंशतः सहमत आहे. मार्केटमध्ये एम आर एफ (५००-५००००) आणि सुझलॉन (२००० -२.५) ह्या जोड्या प्रसिद्ध आहेत. एक शेचा हजार झाला एक हजारचा कवडीमोल झाला. आपण दिलेले डी एसपी चे उदाहरण एम आर एफच्या कॅटेगरीतले आहे. सहा वर्ष कुठलीही स्ट्रॅटेजी न लावता डबल होणारे शेअर्स पण असतात. (स्ट्रॅटेजीज हा हल्ली परवलीचा शव्द झाला आहे. ) पण ते ओळखता येत नाहीत. तद्वत, सामान्य माणूस किंवा अ‍ॅड्व्हायजर शेकडो फंड हाउसेसमधून हजारो स्कीम्स मधून एखादा मोती निवडून देण्याची शक्यता किती ? तसेच तुम्ही दिलेले डीएसपीचे उदाहरण मोदिपूर्व काळातले आहे. (२०१३ चे फालतूतल्या फालतू शेअर्सचे भाव पण २०१४ नंतर आसमंतात पोहचले होते. तेजीमध्ये ऑपरेटर्सनि हात धुवून घेतले नसतील तर शप्पथ! मी स्वतः ७० रुपयाने एप्रिल २०१३ला घेतलेला शेअर जुलै २०१३ ला १९५ ला विकला होता. आज १.२५ रुपया फक्त (नारळ नाहीच.) किंमत आहे.) नेमकी फंड हाउस आणि त्यातली योग्य स्कीम निवडणे हा पण अभ्यासाचा भाग आहे पण तेजसनि वर्णन केल्याप्रमाणेच ग्राहक राजा वागत असल्याने सब घोडे बारा टक्के असा कारभार चालतो.

माझा मुद्दा हा आहे कि म्य्युचल फंडाची निवड आणि शेअर्सची निवड दोन्ही जोखमिच्याच गोष्टी आहेत. २०१३ ते मागे २००८ ह्या काळात किती म्युचल फंड कंठशोष करत होते? तेव्हा म्युचल फंड भारतात बाळसे धरू लागले होते आता चांगले गुटगुटीत झाले आहेत. ४०००० मार्केट पोहोचल्यावर कितीजण हात धुवून मागे लागले होते हे निरीक्षण प्रत्येकाने करायलाच हवे. मार्केट डाऊन असतांना जास्तीत जास्त लोकांनी शेअर्स किंवा म्युचल फंडात पैसे गुंतवावेत ह्या मताचा मी आहे.

प्रस्तुत धागा हा खालील विषयावर होता.
मिपाकरांना अश्या क्लासेस चे...गुरूंचे..त्यांच्या शिष्यांचे ( हा MLM सारखा च प्रकार आहे.. किती ही उल्लू बनले तरी शिष्य गुरुची प्रशंसा च करतात !!!) काही अनुभव असतील ( positive आणि negative ) तर share (!!!) करावेत ही विनंती ...knowledge मध्ये भर पडून हा मार्ग सोडावा कि धरून चालावा हे ठरवता येईल...
पण धागाकर्तेच परागंदा झाले आहेत.

ज्ञानव's picture

30 Sep 2019 - 7:40 am | ज्ञानव

मी स्वतः ७० रुपयाने एप्रिल २०१३ला घेतलेला शेअर जुलै २०१३ ला १९५ ला विकला होता. आज १.२५ रुपया फक्त (नारळ नाहीच.) किंमत आहे.)

मी स्वतः पाटीदार हा ७० रुपयाने एप्रिल २०१३ला घेतलेला शेअर जुलै २०१३ ला १९५ ला विकला होता. आज १.२५ रुपया फक्त (नारळ नाहीच.) किंमत आहे.)

dadabhau's picture

1 Oct 2019 - 3:31 pm | dadabhau

मी वाचतोय आणि चाललेल्या चर्चेतून मला समजतील असे खूप मुद्दे लक्षात आले आहेत.. ..मिपाकर जाणकार असतात सगळ्या विषयात हे मला परत एकदा अनुभवायला मिळाले .... btw तुमच्या मार्गदर्शनाची ( class नाही म्हणत) फी किती आहे? तुमचे tradebook \ ऑर्डर book व्य. नि . करू शकाल का? मी विचार करतो मग...

ज्ञानव's picture

1 Oct 2019 - 5:39 pm | ज्ञानव

सामील व्हा. आजूबाजूच्या इतर सभासदांचा अंदाज घ्या मग मार्गदर्शनाची अशी वेगळी गरज पडणारच नाही. अट एकच तुमचा सहभाग १००% हवा. निसंकोचपणे प्रश्न विचारणे आणि कमीतकमी एक वर्ष तरी समूहाबरोबर राहणे जमले तर पेशंसची पण परीक्षा होईल. समूहात फालतू फॉरवर्डस चालत नाहीत. शेअर्स व्यतिरिक्त इतर व्यवसायाची माहिती किंवा त्याबाबत प्रश्न तुम्ही विचारू शकता पण राजकारणावर वगैरे चर्चा चालत नाहीत. भाषा नरमाईची लागते इतर सदस्यांच्या मताचा मान राखून आपले मत मांडता येईल असे पाहावे लागते. ह्या सगळ्याचा विचार करून अंदाज घेऊन मग क्लास म्हणा, मार्गदर्शन म्हणा त्याबद्दल विचार करू.

शाम भागवत's picture

1 Oct 2019 - 5:55 pm | शाम भागवत

तुमच्या समुहामधे मिपा मिपा खेळता येत नाही का?
म्हणजे
चर्चा स्क्रीनच्या उजवीकडे सरकवण्याची सोय नाहीये का?
:)

डिएसपी मिड कॅप केवळ एक उदा. आहे. कोटक मिड कॅप, एल एण्ड टी मिड कॅप, अ‍ॅक्सिस मिड कॅपचे परतावे कमी अधिक फरकाने गेल्या ६ वर्षात तेवढेच आहेत कारण मिडकॅप इंडेक्स (बेंचमार्क - ज्याच्याशी फंडाच्या परफॉर्मन्सची तुलना करतात) तेवढा वाढलाआहे आणि त्याला फॉलो करणारे फंड तेवढे वाढलेले आहेत. लार्ज कॅप फंडांचे रिटर्न्स ६ वर्षाचे थोडे कमी आहेत. पण तेही ही थोड्याफार फरकाने एकाच रेंज मध्ये आहेत. थोडक्यात गेल्या ६ वर्षात मिड कॅप इंडेक्सने लार्ज कॅप इंडेक्सला आउटपफॉर्म केलं आणि आउट परफॉर्मिंग फंडांनी त्या त्या इंडेक्सला (त्यांच्या बेंचमार्कला).

पण ह्याच मिडकॅप मध्ये गेल्या दोन वर्षात खूप करेकक्शन झालं कारण व्हॅल्यूएशन्स खूपच फुगलं होतं आणि एक्सपेक्टेड ग्रोथ झाली नाही. म्हणून मिडकॅप इंडेक्सचे आणि त्याला फॉलो करणार्‍या जवळजवळ सगळ्याच मिड्कॅप फंडांचे गेल्या २ वर्षातले रिटर्न्स लार्ज कॅपच्या मानाने खूपच कमी आहेत. (मिड कॅप शार्प निगेटीव्ह लार्ज कॅप पॉझिटिव्ह).

त्यामुळे कन्सिस्टंटली आउटपरफॉर्म करणारे फंड त्या त्या इंडेक्सला/बेंचमार्कला आउट परफॉर्म जरूर करतील (जर फंड मॅनेजरचे जजमेंट चांगले असेल तर) पण जी कॅटेगरी ते रिप्रेझेंट करतात (लार्ज/मिड्/स्मॉल) त्या अ‍ॅसेट क्लासचे व्हॅल्यूएशनचे सुजलेले असेल तर करेक्शन तर येणारच. इंडेक्सबरोबर हे फंड पण कोसळणार. त्यातल्या त्यात चांगल्या फंडाचे नुकसान फारफार तर इंडेक्सपेक्षा कमी असेल. म्हणून इंडेक्सचे व्हॅल्यूएशन महत्वाचे. त्यामुळे स्वतः इन्व्हेस्ट/ट्रेडींग करताना ही गोष्ट बॅक ऑफ द माइंड असली पाहिजे.

तुर्रमखान's picture

30 Sep 2019 - 1:25 am | तुर्रमखान

माझी वैयक्तीक निरिक्षणे आणि अनुभव.

१. एलायसीच्या आणि म्यु. फंडाच्या कमिशन मध्ये फरक असला तरी एलायसीत स्पर्धा खूप (अर्थसाक्षरही न म्हणवणारे रिटायर्ड अजोबा आणि विम्याचे प्रकारही धडपणे न सांगू शकणार्‍या गृहिणी एजंट्स आहेत) झाल्यामुळे अनेक एजंट्स म्यु. फंड एजंट्स झाले आहेत. पुर्वीपेक्षा नाही म्हणले तरी अर्थसाक्षरता वाढल्यामुळे एंडावमेंट प्लॅन्स आणि युलिपचा फोलपणा लोकांच्या लक्षात येत आहे. नवश्रीमंत आयटी गर्दीला म्यु. फंडाचं जास्त आकर्षण असल्यामूळे कमिशन कमी असलं तरी संख्या खूप असल्यामुळे रेग्युलर फंडाचे एजंट्स कमी असलेतरच नवल.

२. बहुसंख्य रेग्युलर फंडाच्या ग्राहकाना फंड मॅनेजर किंवा एक्स्पेन्स रेशो जाउद्या पण फंडाचा प्रकारदेखील माहीत नसतो. खूप जणांना फंडाचं पूर्णनावसुद्धा माहीत नसतं. नुसतं सिप करतो म्हणतात. या अज्ञानासाठी गुंतवणुकदारा बरोबरच एजंट जबाबदार नाही का? म्यु. फंड निवडणं खरं तर सोप्प आहे. बाजारामधल्या हजारो म्यु. फंडमधून आम्ही चांगले फंड निवडतो, घरबसल्या केवायसी करतो वगैरे एजंटांच्या दाव्यांना फारसा अर्थ नसतो. डायरेक्ट फंडाचं केवायसीसुद्धा ऑनलाईन पद्धतीनं होतं. फंडहाउसेअच्या साईट्स समजायला सोप्या असतात. एकदा बँक मॅडेट झालं की सगळे ट्रान्सॅक्शन एका क्लिकवर करता येतात. त्यामुळे गुंतवणूकदार गरजेपेक्षा जास्त अर्थसाक्षर झाला तर तो परस्पर डायरेक्ट फंडात गुंतवणुक करेल ही भीती कदाचीत एजंटाना असावी.

३. कमिशन आणि गुंतवणुकीचा परतावा याचा काहीही संबंध नसणं ही मोठ्ठी गोची आहे. (आता सुदैवाने किमान फंड मॅनेजरचा पगार फंडाच्या परताव्यावर अवलंबून असण्याच्या हालचाली सुरू आहेत.)

४. याउप्पर रेग्युलर म्यु. फंडात गुंतवणुक करायची झालीच तर स्मॉल किंवा मिड कॅपमध्ये घ्या. कारण ज्ञानव म्हणतात त्याप्रमाणे लार्जकॅप फंडापेक्षा डायरेक्ट ब्युचिप शेअर्स काय वाईट? पण रिस्क आणि मॉनिटरींग कमी लागत असल्यामुळे बहुतेक एजंट्स लार्ज कॅप सजेस्ट करत असतात. खरं तर स्मॉलकॅप फंड निवडण्यात जास्त कौशल्य लागतं आणि एजंटचा कस तिथच लागतो. माझ्या माहिती प्रमाणे बहुतेक रेग्युलर फंड लार्ज कॅप प्रकारातए आहेत. ही आकडेवारी कुठे उपलब्ध असली तर वाचायला आवडेल.

प्रसाद_१९८२'s picture

1 Oct 2019 - 6:36 pm | प्रसाद_१९८२