आणि मी कुडमुड्या ज्योतिषी बनलो.

राजे १०७'s picture
राजे १०७ in जनातलं, मनातलं
18 Sep 2019 - 3:09 pm

नव्वद ब्याण्णव असं काही तरी साल असेल. मला पुण्याला भेट द्यायला फार आवडायचं. लक्ष्मी रोड वर नामांकित ज्योतिषांकडे भविष्य पाहणे, तुळशीबागेत नुसतं भटकणं, सारसबाग, पर्वती, संभाजी उद्यान वेळ मिळेल तिकडे भटकणं आणि खादाडी करणं हा सोलो प्रोग्राम असायचा. पिएमटीने कमी पण पायी खूप फिरायचो.
मला नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू पहिल्या पासून खूप आवडायच्या. लहान रेडिओ, घड्याळं, विजेऱ्या अशा वस्तूंच्या शोधात मी कॅम्प मध्ये सायंकाळी भेट द्यायचो. अरोरा टॉवर परिसरात सायंकाळी रस्त्यावर असे विक्रेते स्वस्तात अशा गोष्टी विकायचे. आजकाल कुठेही चायना इलेक्ट्रॉनिक व इलक्ट्रीक वस्तू मिळतात. पण तेव्हा अशा गोष्टी लवकर मिळत नव्हत्या. कस्टमचा माल ( जप्त केलेला) असे काही लोक सांगत. तर अशाच एका सायंकाळी मला तो तिथल्या फुटपाथवर भेटला. तो म्हणजे किरो.
किरोचं वर हाताचा पंजा छापलेले ते पुस्तक होते. पामिस्ट्री व अंकशास्त्र व इतर माहिती असलेलं जाडजूड इंग्रजी मधील पुस्तक शंभर रुपयांत मिळालं.
काहीतरी घबाड सापडल्यासारखं पुस्तक घरी घेऊन आलो. मग काय अभ्यास चालू केला. हाताचे प्रकार, पर्वत, आयुष्य, हृदय, मस्तक,लग्न रेषा, धनरेषा हळूहळू समजून घेतलं. जोडीला जन्मांक, नामांक, कोणत्या महिन्यात जन्म झाला तर त्याची वैशिष्ट्ये, शुभ अंक, रंग,रत्न याची माहिती चांगलीच आत्मसात केली.
मग सहजच शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या हाताचं निरिक्षण करून त्यांना ठोकताळे सांगायला सुरुवात केली. जोडीला दाते पंचांग विकत घेऊन अवकहडा चक्र, नक्षत्र, तिथी याचीही माहिती करून घेतली होतीच.
गंमत, खेळ म्हणून उगाचच मित्रांचे हात पाहून तुझ्या आयुष्यात चांगले घडणार आहे अशा बाता मारायला चालू केले. जन्म तारीख विचारुन साधारणपणे पुस्तकात दिलेल्या आजारांना बळी पडण्याची शक्यता लक्षात घेऊन तुला असा असा त्रास होतो ना? तो हो म्हणे. मग मी हे पदार्थ खाऊ नको ते खा असा सल्ला देई. बहुतेकांना प्रेम, लग्न या गोष्टींविषयी फारच उत्सुकता असायची. मग करंगळीच्या तळाशी असलेल्या आडव्या लग्नरेषा, त्यांची लांबी, हृदयरेषा वगैरे बघून भविष्य सांगायचो. खूप भरभराट होईल, चांगला जोडीदार मिळेल असे पॉझिटिव्ह भविष्य फक्त सांगायचो. कुणाची आयुष्य रेषा तुटलेली असो किंवा धनरेषा कमकुवत असो चांगलंच होणार आहे हे ठोकून द्यायचो. फुकटात भविष्य सांगतो म्हटल्यावर बरेच गावातले लोकं याला भविष्य सांगता येतं अशी कुजबुज करायचे. काही महिला भाऊ पाह्यनारे मला मुलगाच होईल ना ? असे विचारीत.
कुणी आत्मविश्वास कमी असलेली मुले पास होईन का हे विचारायचे.
मला ज्योतिष नीट कळतही नव्हते नि एखादा गुरुही केला नव्हता. हळूहळू मी लोकांना फसवत आहे ही भावना निर्माण झाली. आतून पोकळी जाणवत होतीच. मलाही सारखं या गोष्टींचं वेड लागल्यासारखे झाले होते. सहदेव भाडळी, इंद्रजाल सारखी पुस्तकं वाचून नको तिकडे पाय पडायला लागले होते. नकळत कुणाच्याही हाताचं विश्लेषण करणं, मुहूर्त पाहून कामे करणे, ठराविक नक्षत्रावर काही तोडगे करून पाहणे याचा चाळा जडायला लागला असं वाटल्यावर एके दिवशी ती पुस्तकं आडबाजूला टाकून दिली व परत कोणाला ज्योतिष सांगितले नाही.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

18 Sep 2019 - 3:20 pm | जॉनविक्क

असा सुरुवातीलाच शेवट करायचा नसतो... मला तर अत्यन्त रोचक लेखमाला बनेल याचि खात्री आहे.

-(महा कुडमुड्या ज्योतिषी) जॉनविक्क

राजे १०७'s picture

18 Sep 2019 - 3:30 pm | राजे १०७

जवान भाऊ लेखमाला नाही वं. एकलाच लेख हाये ह्यो.
- आपला कै. तमराज किल्विष

जॉनविक्क's picture

18 Sep 2019 - 4:27 pm | जॉनविक्क

राजे १०७'s picture

18 Sep 2019 - 4:31 pm | राजे १०७

माझ्या आयडीची हत्या केली प्रशासकांनी. :-(

जॉनविक्क's picture

18 Sep 2019 - 4:48 pm | जॉनविक्क

प्रशासकांनी :-)

राजे १०७'s picture

18 Sep 2019 - 6:13 pm | राजे १०७

हा जुनाच आयडी आहे ना.

जॉनविक्क's picture

18 Sep 2019 - 7:36 pm | जॉनविक्क

मग ? चूक काय आहे त्यांनी दिलाय हे मान्य करण्यात ?
तुमचा नुकताच एक आयडी सुद्धा मान्य झालाय पण बहुतेक तुम्ही तो नंतर वापराल.

तो आयडी कोणता हे आत्ताच एक दोन दिवसातील माझ्याच एखाद्या धाग्यावरील प्रतिसादात इथेच एनक्रिप्ट करून पोस्ट करून ठेवतो.

फक्त जेंव्हा तुम्ही म्हणाल की ते तुम्हीच हो तेंव्हा त्याची लिंक देतो व तो डिक्रिप्ट कसा करावा त्याची की पण देतो, म्हणजे किती तारखेला मी तो प्रतिसाद दिला हे आपण वाचल्यावर मी खरंच बोलतोय हे तुम्हीही मान्य कराल.

अर्थात एक हिंट आत्ताच देतो माझ्या लवकरच येणाऱ्या एखाद्या प्रतिसादातील 7 व्या शब्दातील तिसरे अक्षर हे त्या प्रतिसादा दिवशी जी तारीख असेल त्याला 6 ने गुणल्यावर जी संख्या येईल तो शब्द तुमच्या आयडीचा पुढून दुसरा शब्द असेल :)

अमर सर, ह्या "तमराज किल्विष" नावाबद्दल खूप उत्सुकता आहे.
ह्या नावाचा अर्थ काय?

राजे १०७'s picture

18 Sep 2019 - 6:12 pm | राजे १०७

शक्तिमान सिरियल मधील खरनायकाचं नाव आहे तमराज किल्विष. "अंधेरा कायम रहे" हा त्याचा डायलॉग होता.

ऋतुराज चित्रे's picture

18 Sep 2019 - 5:43 pm | ऋतुराज चित्रे

नव्वद ब्यांनव मध्ये मुंबईत खूप स्वस्ताई होती. हेच किरोचे पुस्तक मला फोर्टच्या फूटपाथवर फक्त २० रू. आणि लिंडा गूडमनचे सन साईन १०० रू. मिळाले होते.

मी शंभर रुपये ठोकून दिले आहे. मलाच नक्की किंमत आठवत नव्हती. ;-)

जॉनविक्क's picture

18 Sep 2019 - 7:26 pm | जॉनविक्क

सध्याच ते रस्त्याकडेला 50 मधेच मिळतेय म्हटल्यावर 100 तर विषयच मिटला.