मनिषा

तमराज किल्विष's picture
तमराज किल्विष in जनातलं, मनातलं
31 Aug 2019 - 4:48 am

मनिषा
मनिषा म्हणजे मनी माझ्या जवळच्या नात्यातील मुलगी. गोरीपान, हसली की गालावरची खळी फार सुंदर दिसायची. त्यात तिच्या दातावर एक दात आलेला आणि वरच्या ओठावर उजव्या बाजूला मोठासा तिळासारखा ठिपका. काळेभोर डोळे नि काळेभोर लांबसडक केस. माझ्या पेक्षा वयाने सहा-सात वर्षे लहान.
असेच एकदा कोणीतरी वडीलधारे म्हणाले यांची जोडी छान दिसेल. हे ऐकून ती इतकी सुंदर लाजली की बस. मलाही ती आवडत होतीच, पण आता मनोमन मीही तिला आयुष्याचा जोडीदार मानायला लागलो.
कधी तिच्या घरी जाणं झालं तर लाजून हसायची , पण बोलायची मात्र मुळीच नाही. माझ्या वाऱ्यालाही थांबायची नाही. ती जवळ येताच माझ्या हृदयात धडधड वाढायची. आवाज एकदम निघायचाच नाही. खूप वेळानंतर एक-दोन वाक्य बोलायचो तेही अभ्यास कसा चाललाय वगैरे. आम्ही दोघे बोलत आहोत हे कुणाच्या लक्षात आले तर काय होईल अशी तिला धास्ती वाटायची. खूप भित्री भागुबाई होती. मला तिला प्रपोज करायचे होते, पण जणू तिला अंदाजच यायचा मला काय बोलायचं आहे आणि ती मला पाहताच लाजून दूर जाई व कुठेतरी लपून बसे. माणसांमध्ये मला तिच्याशी बोलता यायचे नाही कारण नातेवाईक आम्हाला नवरा बायको म्हणून टोमणे मारायचे. पण कानाला खूप गोड वाटायचे ते टोमणे.
दिवस असेच जात होते, बोलणं होतंच नव्हतं व तिच्या मनात नेमकं काय आहे हे कळत नव्हते. मी तर सारखा तिचाच विचार करायचो. तिला बोलतं कसं करावं हेच समजत नव्हते. एक दिवस धाडस करून एक पत्र लिहिलं व माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे हे लिहून ' यू नो व्हेरी वेल व्हू आय एम' असे शेवटी लिहिले व निनावी पत्र तिच्या कॉलेजच्या पत्त्यावर दिलं पाठवून. नंतर माझी धडधड खूपच वाढली. काय होईल याचा विचार स्वस्थ बसू देईना. पत्र मीच लिहिले हे तिला कळेल व रागावली, तिला आवडले नाहीतर.. घरच्यांना सांगितले तर त्यांची प्रतिक्रिया कशी असेल.. विचार करून करून फारच हवालदिल झालो होतो.
क्रमशः

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

1 Sep 2019 - 10:49 pm | ज्योति अळवणी

मग पुढे?

मराठी कथालेखक's picture

1 Sep 2019 - 10:57 pm | मराठी कथालेखक

सुरुवात चांगली केलीत.. पुढचे भाग वेगाने येवू द्या..

जॉनविक्क's picture

1 Sep 2019 - 11:05 pm | जॉनविक्क

त्यात तिच्या दातावर एक दात आलेला

वाह. याला चोर दात म्हणतात ना ? आशा मुलींचे देखणेपण माझ्या नजरेत तरी हमखास वाढते.

तमराज किल्विष's picture

2 Sep 2019 - 7:49 am | तमराज किल्विष

धन्यवाद ज्योती जी, मराठी कथालेखक जी, आणि जॉन भाऊ. पहिल्या भागाला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून बाकीचे भाग टाकले नाही.