Lyrics

मारवा's picture
मारवा in काथ्याकूट
17 Aug 2019 - 11:18 pm
गाभा: 

तेरे नूर के दस्तूर में न हो सलवटें न शिकन रहे मेरी कोशिशें तो है बस यहीं रहे खुशबूएं गुलशन रहे तेरी ज़ुल्फ़ सुलझाने चला तेरे और पास आने चला
"सत्यमेव जयते " च्या टायटल सॉंग मधील वरील ओळी ऐकतांना आपण काहितरी युनिक ऐकतो आहे हे जाणवले आणि मी शोधु लागलो हे कोणी लिहिलय ? नाव कळलं प्रसुन जोशी
मग मी त्याच्यावर लक्ष ठेऊ लागलो. सत्यमेव हे गाणं सुद्धा सुंदर अर्थपुर्ण ओळींनी भरलेलं आहे

मुझे खुद को भी है टटोलना कहीं है कमी तो है बोलना कहीं दाग हैं तो छुपायें क्यों हम सच से नज़रें हटायें क्यों
मला प्रसुन च्या इतक्या साध्या सरळ सोप्या शब्दांना इतकी तेज धार देण्याचं कसब फ़ार आवडलं. रंग दे बसंती च्या गाण्यातील या ओळी बघा साधेच शब्द आहेत (सीधी सी बात ना मिर्च मसाला सारखं)
आंधियो से झगड रही है लौ मेरी, अब मशालो सी बढ रही है लौ मेरी,
नामो निशॉ रहे ना रहे, ये कारवॉ रहे ना रहे, उजाले मै पी गया, क्यो सहते रहे
रु-ब-रु रोशनी है
धुऑ छ्टा खुला गगन मेरा नयी डगर नया सफ़र मेरा जो बन सके तु हमसफ़र मेरा
रु-ब-रु रोशनी है
मात्र या गाण्याची सुरुवात एकदम बोली भाषेत सणसणीत ऐ साला अशी अनोखी आहे.
प्रसुन चा साल्याचा साला शब्द लाडका दिसतो भाग मिल्खा भाग मध्ये साला ने तो लाइन क्लोज करतो.
कोयला काला है चट्टानो ने पाला है,
अंदर काला बाहर काला पर सच्चा है साला
काय ताकदीचे लिरीक्स आहेत मिल्खा चा सगळा संघर्ष मोजक्याच शब्दात बांधुन शेवटाला साला शब्द सणसणीत तडाखा दिल्यासारखा टाकतो. गायक ही त्याचा पुर्ण वापर करुन घेतो.
एकामागोमाग दारुगोळ्यासारखे आदळणारे शब्द

जिंद्गी का ये घडा रे एक सांस मे चढा रे हिचकियो मे क्या है मरना पुरा मर ले.
पण पुन्हा त्यात एकदम कॉन्ट्रास्ट म्हणजे अवघड कसरत साधत या हळुवार ओळी येतात
उलझे क्यूँ पैरों में ये ख़्वाब क़दमों से रेशम खींच दे, पीछे कुछ ना आगे का हिसाब इस पल की क्यारी सींच दे
गझनीतल्या गाण्यातल्या या ओळी बघा त्याच्या
बहेका मै बहेका वो बहेकी हवा सी आयी
एक ही नजर मे सब मंजिल वंजिल पायी
हटके अलग सी थी बिलकुल जुदा सी
ना ही अदाए ना कोई अंगडाई
एरवी या गाण्यात मला त्याच्यातल्या खट्याळपणाचा भास होतो. म्हणजे बघा मंजिल अदा आणि अंगडाई हे बॉलिवुड चे गाण्यातले स्टीरीओटाइप्स हजारो गाणी एकेकावर
त्याला एका मिश्कील शैलीत मंजिल वंजिल पायी मस्तच ( तुम्ही जे अदा अंगडाई म्हणताना बाबा त्यातल काही नाही तिच्यात पण तुम्ही जी मंजिल वंजिल म्हणता ती भेटली बर्का असे जणु म्हणत असावा असे वाटते )
गुजरे जहॉ से वो रौनक उडाए, चलके नदीसी वो मुझको भिगोती जाए
किती सुंदर क्या बात है हाए !!! पुढे तो म्हणतो
राह मे उसकी हाथ बांधे हुए , पलके बिछाए हुए, सर को झुकाए हुए, खुश्बुओसे छाए हुए,
टकटकी बांधे हुए, साथ साध जाने कितने सारे मौसम खडे हुए.

तसाच अमिताभ भट्टाचार्य हा सुद्धा एक प्रतिभाशाली गीतकार आहे त्याचं सर्वाधिक आवडणारं गाणं म्हणजे " रे कबीरा मान जा ". खर म्हणजे कविताच लिरीकल पोएट्री जणु !
गाण्यातली गुढता भुरळ पाडणारी
कैसी तेरी खुदगर्जी ना धुप चुने ना छांव, कैसी तेरी खुदगर्जी किसी ठोर टिके ना पॉव
बन लिया तु अपना पैगम्बर, तर लिया तु सात समंदर फ़िर भी सुखा मन के अंदर
क्यु रह गयॉ
किंवा तु हवा का एक बवंडर बुझ के यु अन्दर ही अन्दर
क्यु रह गयॉ
या ओळींमधील रिक्तता व्यर्थता आर्तता मनाला भिडते हे एकीकडे आणि दुसरीकडे " लब नमक रमे ना मिसरी " यातील शब्दाची कुशल किमयागारी भुरळ पाडते आणि तिसरीकडे
टुटी चारपाई वोही ठंडी पुरवाई रस्ता देखे, दुध की मलाई वो ही मिट्टी की सुराही रस्ता देखे
या ओळींमधील गुढता हे काय आहे ? हा काय म्हणु पाहतोय ? अतीव सुंदर अस गाणं आहे हे जितक्या वेळा ऐकतो तितक्या वेळा ताजं च वाटतं.
अमिताभ च हे एक गाणं ऐ दिल है मुश्कील चित्रपटातील बघा, यात त्याने बॉलिवुडच्या गाण्यात क्वचितच बहुधा पहिल्यांदाच वापरले गेलेले असे काही शब्द वापरले आहेत.
मेरी रुह का परींदा फ़डफ़डाए, लेकीन सुकुन का जजीरा मिल ना पाए
वे की करां वे की करां ( जजीरा - द्विप टापु बेट )
एक बार तजल्ली तो दिखा दे, झुठी सही मगर तसल्ली तो दिला दे
रांझन दे यार बुलेया , सुनले पुकार बुलेया, तु ही तो यार बुल्लेया , मुर्शीद मेरा मुर्शीद मेरा
तजल्ली व तसल्ली चा एकत्र उपयोग निव्वळ अप्रतिम आहे. तजल्ली चा अर्थ ईश्वरीय प्रकाश वा दर्शन म्हणु या. मुर्शीद म्हणजे मार्गदर्शक
मै ता-गुल से लिपटी हुइ तितली की तरह मुहाजिर हु, एक पल को ठहरु एक पल मे उड
वे मै ता हु पगडंडी लबदी ऐ जो राह जन्नत की , तु मुडे जहॉ मै साथ मुड जाऊ
(मुहाजिर- इथे रेफ़्युजी, तात्पुरता निवासी या अर्थाने ) पुढे एका ओळीत तर
जिस दिन से आश्ना से दो अजनबी हुए है, तनहाईयो के लम्हे सब मुलतवी हुए है. क्यु आज मै मुहब्बत फ़िर एक बार करना चाहु.
ये दिल तो ढुंढता है इन्कार के बहाने , लेकिन ये जिस्म कोई पाबंदीया ना माने.
मागे एक स्वानंद आणि अमिताभ इ. लिरीसीस्ट च्या चर्चेचा एक कार्यक्रम होता त्यात त्यांनी मार्केट च्या गाण्याकडुन असलेल्या सर्व डिमांड पुर्ण केल्यावर एकुण गाण्यात आमचा "से" हा फ़ार तर १० ते २० टक्के इतकाच शिल्लक राहतो पण ही अशी वरील गाणी बघितल्यावर यावर विश्वास बसत नाही. यात म्हणजे इतकी स्वतंत्र रचना करुन पुन्हा त्याचा फ़्लो स्मुथ ठेवणे फ़ार अवघड आहे याचे श्रेय संगीतकाराचे ही तितकेच आहे.
अमिताभ चे अजुन एक लुटेरा या चित्रपटातील ( हा सुंदर चित्रपट ओ हेन्री च्या द लास्ट लीफ़ या कथेवरुन प्रेरीत आहे ) च्या गाण्यातील लिरीक्स सुंदर आहे.

हवॉ के झोके आज मौसमो से रुठ गए, गुलो की शोखीयॉ जो भवरे आके लुट गए, बदल रही है जिन्दगी की चाल जरा, इसी बहाने क्यु ना मै भी दिल का हाल जरा
सवार लुं. सवार लुं हाय सवार लुं
ये सारी कोयले बनी है आज डाकिया , कुहुं कुहुं मे चिठ्ठीयॉ पढे मजाकिया , इन्हे कहो की ना छुपाए, किसने है लिखा बताए, उसकी आज मै नजर उतार लुं
सवार लुं सवार लुं हाय सवार लु

या सिनेमाची बंगाली पार्श्वभुमी असल्याने अमिताभ ने याच गाण्याचं एक ओरीजीनल बंगाली व्हर्जन ही बनवलं होतं असं तो एका मुलाखतीत म्हणतो त्यात त्याने ते गाऊनही दाखवलय.
या वरील सर्वांहुन अतिशय वेगळ्या धाटणीची गाणी ही त्याने लिहिलीय जसे ज्याने तो प्रसिद्ध झाला ते इमोशनल अत्याचार तसच देहली बेली तील भाग डी के बोस, भाग डी के बोस हे एक नंबर मवाली टुक्कार द्विअर्थी गाणं असो (इथे गुलजार साहेबांच्या याच कौशल्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही म्हणजे एकीकडे साथिया साथिया मद्धम मद्धम तेरी ये गीली हसी, वा ताजा गिरे पत्ती की तरह सब्ज लॉन पर लेटे हुए सारख्या कोवळ्या ओळी आणि दुसरीकदे गोली मार भेजे मे भेजा शोर करता है ) वा ओल्ड वर्ल्ड चार्म जपत रचलेलं बलम पिचकारी जो तुने मुझे मारी तो सीधी साधी छोरी .... असो . या गाण्याच ही एक ओरीजनल व्हर्जन होत ज्यात तो म्हणतो की त्याला ओरीजनली खालील ओळी ठेवण्याची इच्छा होती मात्र तो म्हणतो मला ते ज्या यंग क्राउड साठी होतं त्यांच्या साठी त्यात बदल करावा लागला.

बलम पिचकारी जो तुने मुझे मारी तो बोले रे जमाना खराबी हो गई, मेरे अंग राजा जो तेरा रंग लागा तो ब्रिज की ये कन्या नवाबी हो गई.

खर म्हणजे अमिताभला गायक बनण्याची इच्छा होती त्याने काही गाणी गायलेली सुद्धा आहे त्यामुळे तो म्हणतो की मला धुन डोक्यात असल्याशिवाय गाणं लिहिणं जमतच नाही.
इतक्या सुंदर रचना करुनही हा फ़ारच नम्र माणुस आहे इतकी इमोशनली इन्टेन्स रचना करणारा माणुस प्रांजळपणे म्हणतो की मी एक प्रॉडक्ट देतो एक डिमांड पुर्ण करण्याचा प्रयत्न असतो तसेच एंड युजर महत्वाचा आहे व माझं एक कमर्शियल प्रॉडक्ट आहे त्यात मला अनेकदा मॉडिफ़ाय कराव लागतं. तर इतक्या कमर्शियल चौकटीच्या बंधनात राहुन त्या सर्वांची मागणी पुर्ण करुन सुद्धा शेवटी त्यात एक स्वत: च्या रचनात्मक सौंदर्याचा समावेष करणं खरं म्हणजे करता येणं जमणं हीच मोठी गोष्ट आहे.

कौसर मुनीर च्या ही काही रचना त्यातील अत्यंत हळुवार भावना मनाला भिडुन जातात जस की हे एक गाणं बघा स्टीरीओटाइप बॉलिवुड मध्ये ही वेगळी शैली वाटते मला तरी
नए नए नैना रे ढूंढे है दरबदर क्यों तुझे ,नए नए मंज़र ये तकते है इस कदर क्यूँ मुझे
जरा जरा फूलो पे झड़ने लगा दिल मेरा ,जरा जरा कांटो से लगने लगा दिल मेरा
मैं परेशान परेशान परेशान परेशान आतिशे वो कहाँ , मैं परेशान परेशान परेशान परेशान रंजिशे है धुँआ हाँ

प्रेमात पडलेल्या मुलीत बदल होतोय तो ही कसा अगदी हळुवार बदल धीरे धीरे से तो ज्या सुंदर शैलीत मांडलाय तो खुप भावतो. यातले नए नए नैना हे स्वत;ला उद्देशुन युनिक आहे. तसेच आतिशे वो कहॉ रंजिशे है धुऑ हा मला वाटतं माझ्यात पुर्वीची गर्मी राग भरलेला आता कुठाय ? म्हणजे ती तक्रार संपलीये आणि निराशा उडुन जातेय असा अर्थ म्हणजे असा हळु हळु स्व मध्ये बदल होतोय...
चाहत के छीटे है खारे भी मीठे है मैं क्या से क्या हो गई
जरा जरा फितरत बदलने लगा दिल मेरा
जरा जरा किस्मत से लड़ने लगा दिल मेरा

अफ़लातुन लिरीक्स की बात हो और पियुष मिश्रा का जिक्र ना हो ?
पियुष मिश्रा हा बोलुन चालुन एक दमदार कवी आता हा जेव्हा बॉलिवुडसाठी गाणी लिहितो तेव्हा तो बॉलिवुडच्या टीपीकल साचांची अक्षरश: पार वाट लावुन देतो. इतकी भन्नाट लिरीक्स याने दिलेली आहेत एकीकडे अगदी परीपुर्ण आरम्भ सारखी कविता म्हणा वा गाणं म्हणा तर दुसरीकडे त्याच्या राणाजी म्हारे या गाण्याची लिरीक्स बघा या गमतीदार गाण्यात तो ज्या हसत खेळत पॉलिटीकल / सोशल कमेंटस करतो ते पुर्ण गाणं मुळातुन ऐकण्यासारखे आहे बॉलिवुड मध्ये असे काही अभावाने आढळते

राणाजी म्हारे गुस्से मे आए ऐसो बलखाए अगिया बरसाए घबराए म्हारो चैन , जैसे दुर देस के जैसे दुर देस के टावर मे घुस जाए रे एरोप्लेन
राणाजी म्हारे ऐसो गुर्राए ऐसो थर्राए भर आए म्हारे नैन जैसे सरे आम भई, इराक मे जाके जम गए अंकल सैम
म्हारी तो बीच बजरिया हाय बदनामी हो गई , म्हारी तो लाल चुनरीया शर्म से घानी हो गई, म्हारो तो धक धक होवे जो जो बीते रे
जैसे हर एक बात पे जैसे हर एक बात पे डेमॉक्रसी मे लगने लग गई बेन्ड
बर हे सर्व राणाजी म्हारे चा पारंपारीक ओल्ड वर्ल्ड चार्म सांभाळुन सिनेमातलं त्यावरील नृत्य ही त्याच पारंपारीक शैलीतील पण त्याच्यातच टाकलेला समकालीन आशय एकदम विरुद्ध
हा कॉन्ट्रास्ट फ़ार लोभस आहे पुन्हा त्यात गांभीर्याला फ़ाट्यावर मारुन सगळं गंमत जंमत शैलीत त्यामुळे गाणं अधिकच बोचतं.

पियुष मिश्राचं अजुन एक उल्लेखनीय काव्यात्म गाणं म्हणजे गॅग्ज ऑफ़ वास्सेपुर मधील,

इक बगल में चाँद होगा, इक बगल में रोटियाँ , इक बगल में नींद होगी, इक बगल में लोरियाँ हम चाँद पे, हम चाँद पे,
रोटी की चादर डाल कर सो जाएँगे और नींद से, और नींद से कह देंगे लोरी कल सुनाने आएँगे
एक बगल में खनखनाती, सीपियाँ हो जाएँगी , एक बगल में कुछ रुलाती सिसकियाँ हो जाएँगी
हम सीपियो में, हम सीपियो में भर के सारे तारे छू के आएँगे ,और सिसकियो को, और सिसकियो को
गुदगुदी कर कर के यूँ बहलाएँगे . और सिसकियों को, गुदगुदी कर कर के यूँ बहलाएँगे

मित्रांनो तुमची आवडती लिरीक्स शेअर करा लिरीक्स वर चर्चा करायला खुप आवडेल. चर्चेच्या ओघात अजुन अजुन सुंदर गाणी आठवत जातील मजा येइल

प्रतिक्रिया

फारएन्ड's picture

18 Aug 2019 - 5:05 am | फारएन्ड

मारवा - अनेक आभार हा धागा काढल्याबद्दल. गेल्या अनेक वर्षांत अनेक सुंदर गाणी लिहीली गेली आहेत. अमिताभ भट्टाचार्य तर आता प्रचंड आवडता आहे.

वरती बलम पिचकारीचा उल्लेख आहे त्यातले "बोली भजन तेरी, नीयत कव्वाली है" ही एक धमाल उपमा आहे. बदतमीज दिल सुद्धा त्यातील रणबीर ची एण्ट्री, ठेका, डान्स वगैरे मुळे जास्त फेमस असले तरी त्यातील वाक्यरचनाही मस्त आणि चपखल आहेत.

त्याचे माझे सर्वात आवडत्या गाण्यांपैकी एक म्हणजे 'दंगल' चे टायटल वाले. जबरी मोटिवेशनल गाणे आहे. हरयाणवी भाषेतील सगळे ठोक शब्द आणून चपखल बसवले आहेत.
धडकने छातीमे, जब दुबक जाती है, पीठ थपथपा, उनको फिर जगा, बात बन जाती है
बावले हाथी सी, हर चुनौती है रे, सामने खडी घूरके बडी, आँख दिखलाती है,
तो आँख से उसकी आँख मिलाके भिड जाने का नाम है प्यारे दंगल दंगल

यातल्या त्या पिसाळलेल्या हत्तीची उपमा जबरी आहे.

चन्ना मेरेया मधली 'मेरे जिक्र का जुबाँ पे सुवाद रखना' ही लाइनही जबरी फेवरिट. या गाण्यातील शब्द व संगीताचे मॅजिक काही वेगळेच आहे. किलर सनई आहे (स्वदेस मधल्या रेहमान च्या 'ये जो देस है तेरा' मधल्या सनईच्या वापरानंतर पहिल्यांदाच अशी ऐकली). मारवा - असाच एक धागा या वाद्यांबद्दल काढा तुमची आवड असेल तर. काय पो छे मधल्या 'मांजा' गाण्यातील एका इण्टरल्यूड मधे असेच काहीतरी एका वाद्याची ट्यून आहे. अतिशय सुंदर.

चन्ना मेरेया हे गाणं ही फारंच गोड आहे आणि बॉलिवुड मध्ये या थीम ची एक लाँग ट्रॅडिशन आहे पटकन आठवणारे उदाहरण म्हणजे " मुबारक हो सबको समा ये सुहाना
मै खुश हो मेरे आसुओ पे ना जाना मै तो दिवाना दिवाना दिवाना "
ऐ दिल है मुश्कील चे डायलॉग ही रोचक आहेत.
" एक तरफा प्यार की ताकत हि कुछ और होती है, औरो के रीश्तो की तरह ये दो लोगो मे नही बटती " हा किंवार्र
" कम्ब्ख्त खयालो ने ही तो जिंदा रखा है वरना सवालो ने कबका मार दिया होता "
दंगल च गाणं माहीत नव्हतं आता ऐकल मस्तच आहे या गाण्यातील " रे जाडा पाड दु" म्हणजे काय ? ते काय कळलं नाही पण बाकी गाणं दमदार आहे खरचं.
मांजा चे लिरीक्स स्वानंद किरकिरे चे आहेत एक्स्ट्रा ऑर्डीनरी
बर्फिली आखो मे पिघला सा देखेंगे हम कल का चेहरा,
पथरीले सीने मे उबला सा देखेंगे हम लावा गहरा
रुठे ख्वाबो को मना लेंगे कटी पतंगो को थामेंगे
सुलझा लेंगे उलझे रिश्तो का मांझा
पतंग मांजा या प्रतिमांचा असा वापर क्वचितच पाहण्यात येतो "उलझलेला रीश्ता " तशी रीकरींग थीम आहे पण त्याला मांजा ची उपमा बेहतरीन आहे.
गुलजार च्या कविता संग्रह " पुखराज" मध्ये एक मैने तो एक ही रीश्ता बुना था उसकी सारी गिरहे नजर आती है मेरे यार जुलाहे ( कबीराला उद्देशुन आहे ) त्याची आठवण येते पण मांजा ला जोडणं म्हणजे युनिकच
ते वाद्य सारंगी आहे बहुधा मी मागे असा वाद्यांवर धागा काढला होता तो इथे आहे
http://www.misalpav.com/node/33909

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Aug 2019 - 9:57 am | ज्ञानोबाचे पैजार

दंगल मधली सगळीच गाणी मस्त आहेत...

त्यातले अजून एक आवडलेले गाणे म्हणजे "नैना" "झूठा जग रैन बसेरा, सांचा दर्द मेरा, मृग-तृष्णा सा मोह पिया, नाता मेरा तेरा" अशी सुरुवात करत अख्खे गाणे अंगावर येते.

तलाश मधले "रात मे जागते है" सुध्दा असेच आवडते गाणे, जावेद अख्तर ने लिहिलेल्या चपखल शब्दांमुळे लक्षात रहाते

रात में जागते हैं ये गुनाहों के घर,
इनकी राहें खोले बाहें जो भी आये इधर
ये है गुमराहों का रास्ता मुस्कानें झूठी है पहचानें झूठी है
रंगीनी है छाई फिर भी है तन्हाई
कल इन्ही गलियों में इन मसली कलियों में तो ये धूम थी
जो रूह प्यासी है जिसमें उदासी है वो है घुमती
सबको तलाश वोही समझे ये काश कोई
ये है गुमराहों का रास्ता
मुस्कानें झूठी है पहचानें झूठी है रंगीनी है छाई फिर भी है तन्हाई

कट्यार काळजात घूसली मधे सगळीच गाणी सुरेख आहेत पण विषेश आवडले ते "यार इलाही"

दिल ही जब इलज़ाम लगाये, देवे कौन सफाई, तुझसे नज़र मिलाउन क्या, जब खुद से नज़र चुराई
ओ यारा, ओ यारा, में सब हारा था, तुझ को लाख पता है,
तुझे पता क्या मेरी खता है, तू ही बता दे लाही
में झूठा, ये वजूद भी झूठा, में झूठा, ये वजूद भी झूठा,
सच्ची तेरी खुदाई, यार इलाही मेरे, यार इलाही, यार इलाही मेरे, यार इलाही

पैजारबुवा,

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 Aug 2019 - 11:04 am | ज्ञानोबाचे पैजार

बदलापुर मधले आतिफ अस्लम ने गायलेले जीना जीना पण असेच एक आवडते गाणे

सच्ची सी हैं ये तारीफे , दिल से जो मैंने करी है,
जो तू मिला तो सजी हैं, दुनिया मेरी हमदम
ओ आसमां मिला जमीन को मेरी, आधे आधे पूरे हैं हम,
तेरे नाम पे मेरी ज़िन्दगी, लिख दी मेरी हमदम
हाँ, सीखा मैंने जीना जीना कैसे जीना, हाँ, सीखा जीना मेरे हमदम
ना सीखा कभी जीना जीना कैसे जीना, ना सीखा जीना तेरे बिना हमदम

फटा पोस्टर निकला हिरो मधले "मैं रंग शर्बतों का" पण मस्त गाणे आहे..
मैं रंग शर्बतों का तू मीठे घाट का पानी
मुझे खुद में घोल दे तू मेरे यार बात बन जानी

सिक्रेट सुपरस्टार मधली सगळी गाणी मस्त आहेत

कहती है दुनिया मैं हूँ बावरिया
सुध से गयी मैं खुद से गयी मैं तेरी हो गयी मैं..
पर जग क्या जाने मन के फ़साने
खो कर खुद को पा कर तुझ को मेरी हो गयी मैं..
तेरी नगरिया जाउंगी मैं तेरी नजरिया वारूँगी मैं
तेरे इश्क़ दा चोला पहन के, मैं तुझमें ही रंग जाउंगी
तेरे इश्क़ दा चूड़ा पहन के मैं तुझे ही सज जाउंगी
मैं नचदी फिरां.. बन ठन बल्लिये हो..
मैं नचदी फिरां.. ओ छम छम छलिए हो..

भाई जोगिंदर सिंग लुधियानावाले यांचे "ऐसी मरनी जो मरे" सुध्दा अतिशय श्रवणीय आणि अर्थपूर्ण भक्तीगीत आहे

ऐसी मरनी जो मरे, बहुर न मरना होवे,
कबीरा, मरता मरता जग मुवा, मरती न जाने कोई
ऐसी मरनी जो मरे, बहुर न मरना होवे,
क्या जाना केव मरयेंगे , कैसे मरना होवे
जे कर साहीब मनहू ना बिसरे, तैसा मरना होवे,

कैलाश खेर ने गायलेले "मन मे जोत जगा दे साहीब" हे गाणे सुध्दा अत्यंत सुरेख आहे

साहीब मेरी नजमे तेरी नजर का नूर दे
दे साहीब दे दे मुझे तू भक्ती का कोई नूर दे
जैसे चमके चांदनी, गगन बीच लहेराये,
वैसेही सदगुरु नजर, मेरे मन मे समाये,
मे रे मन मे जोत जगा दे, हो... सत की राह दिखा दे
मेरे मन मे जोत जगा दे साहिब जोत जगा दे

नक्की ऐका.. आवडतिल

पैजारबुवा,

यशोधरा's picture

18 Aug 2019 - 8:40 am | यशोधरा

आवडला धागा. वाचत राहीन.

जव्हेरगंज's picture

18 Aug 2019 - 10:36 am | जव्हेरगंज
लई भारी's picture

18 Aug 2019 - 1:02 pm | लई भारी

_/\_ भारी लिवलंय! बरीचशी आवडती गाणी आहेत.
पियुष मिश्रा/राणाजी आणि लुटेरा चा उल्लेख आल्यामुळे छान वाटले.
दंगल सगळंच अनोखं मिश्रण आहे; 'नैना' तर लाजवाब.
तलाश ची गाणी विशेषतः 'जी ले जरा' आवडत.
गुलजारसाब म्हटलं कि मला 'इजाजत' च आठवतो. डेडली कॉम्बिनेशन आहे त्यातली सगळी गाणी.

महासंग्राम's picture

20 Aug 2019 - 1:15 pm | महासंग्राम

एखादा माणूस किती सुंदर आणि सहज लिहू शकतो याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे बंटी और बबली मधलं कजरारे

हो तेरी बातों में किमाम की खुशबू हैं
हो तेरा आना भी गर्मियों की लू है

आँखे भी कमाल करती है
पर्सनल से सवाल कृती है

शब्दांचा विषय निघालाय तर नुसरत ने गायलेल्या सासो कि माला मधल्या काही ओळी लाजबाब आहेत.

पद्मावति's picture

20 Aug 2019 - 2:38 pm | पद्मावति

सुंदर धागा. वाचतेय.

नि३सोलपुरकर's picture

20 Aug 2019 - 4:34 pm | नि३सोलपुरकर

पियुष मिश्रा _/\_
अप्रतिम कलाकार आहे .. लिहतो ,गातो आणि अभिनय ही करतो ,त्यानेच लिहिलेल एक बगल मे चांद होगा .. गाण्याचे बोल लाजवाब आहेत .

होनी और अनहोनी की परवाह किसे है मेरी जान,
हद से ज्यादा ये ही होगा कि यहीं मर जायेंगे,
हम मौत को सपना बता कर उठ खड़े होंगे यहीं,
और होनी को ठेंगा दिखाकर खिलखिलाते जायेंगे .

इथे मिपावरच पियुष मिश्रा वर एक उत्तम लेख वाचलेल आठवतय .

चिगो's picture

21 Aug 2019 - 3:09 pm | चिगो

आणखी एक तरुण लेखक/ कवी / गीतकार आहे, वरुण ग्रोवर.. त्याची 'मसान' चित्रपटातली गाणी ऐका, वाचा.. जबरदस्त.
इर्शाद कामिलने लिहीलेली गाणीपण अत्यंत सुंदर आहेत.
अमिताभ भट्टाचार्य / प्रसून जोशी/ पियुष मिश्रा हे तर अत्यंत सरस आहेत..
पियुष मिश्रांचं 'हुस्ना' हे माझ्या ऑल टाईम फेवरेट्स पैकी एक आहे.

पियुष मिश्रा चं हुस्ना सुंदर आहे याच्याशी काहीसं साम्य असणारं गुलजार ची एक कविता आठवते.

हुस्ना = पियुष मिश्रा

लाहौर के उस
पहले जिले के
दो परगना में पहुँचे
रेशम गली के
दूजे कूचे के
चौथे मकां में पहुँचे
और कहते हैं जिसको
दूजा मुल्क उस
पाकिस्तां में पहुँचे
लिखता हूँ ख़त में
हिन्दोस्तां से
पहलू-ए हुसना पहुँचे
ओ हुसना

मैं तो हूँ बैठा
ओ हुसना मेरी
यादों पुरानी में खोया
पल-पल को गिनता
पल-पल को चुनता
बीती कहानी में खोया
पत्ते जब झड़ते
हिन्दोस्तां में
यादें तुम्हारी ये बोलें
होता उजाला हिन्दोस्तां में
बातें तुम्हारी ये बोलें
ओ हुसना मेरी
ये तो बता दो
होता है, ऐसा क्या
उस गुलिस्तां में
रहती हो नन्हीं कबूतर सी
गुमसुम जहाँ
ओ हुसना

पत्ते क्या झड़ते हैं
पाकिस्तां में वैसे ही
जैसे झड़ते यहाँ
ओ हुसना
होता उजाला क्या
वैसा ही है
जैसा होता हिन्दोस्तां यहाँ
ओ हुसना

वो हीरों के रांझे के नगमें
मुझको अब तक, आ आके सताएं
वो बुल्ले शाह की तकरीरों के
झीने झीने साये
वो ईद की ईदी
लम्बी नमाजें
सेंवैय्यों की झालर
वो दिवाली के दीये संग में
बैसाखी के बादल
होली की वो लकड़ी जिनमें
संग-संग आंच लगाई
लोहड़ी का वो धुआं जिसमें
धड़कन है सुलगाई
ओ हुसना मेरी
ये तो बता दो
लोहड़ी का धुंआ क्या
अब भी निकलता है
जैसा निकलता था
उस दौर में हाँ वहाँ
ओ हुसना

क्यों एक गुलसितां ये
बर्बाद हो रहा है
एक रंग स्याह काला
इजाद हो रहा है

ये हीरों के, रांझों के नगमे
क्या अब भी, सुने जाते है हाँ वहाँ
ओ हुसना
और
रोता है रातों में
पाकिस्तां क्या वैसे ही
जैसे हिन्दोस्तां
ओ हुसना

ख्वाब= गुलजार

सुबह सुबह इक ख्वाब की दस्तक पर दरवाज़ा खोला देखा
सरहद के उस पार से कुछ मेहमान आये हैं
आँखों से मानुस थे सारे

चेहरे सारे सुने सुनाए
पाँव धोए हाथ धुलाए
आँगन में आसन लगवाए
और तंदूर पे मक्की के कुछ मोटे मोटे रोट पकाए
पोटली में मेहमान मेरे
पिछले सालों की फसलों का गुड़ लाए थे

आँख खुली तो देखा घर में कोई नहीं था
हाथ लगाकर देखा तो तंदूर अभी तक बुझा नहीं था
और होठों पे मीठे गुड़ का जायका अब तक चिपक रहा था
ख्वाब था शायद
ख्वाब ही होगा
सरहद पर कल रात सुना है चली थी गोली
सरहद पर कल रात सुना है
कुछ ख्वाबों का खून हुआ है

यातील होठों पे गुड का जायका अब तक चिपक रहा था हे सुंदर आहे यावरुन अमिताभ भट्टाचार्याच्या गाण्यातील ओळ हमखास आठवते
अच्छा चलता हु दुवाओ मे याद रखना
मेरे जिक्र का जुबा पे सुवाद रखना

वरुण च
ये मोह मोह के धागे तेरी उंगलियो से जा उलझे
कोई टोह टोह ना लागे किस तरह गिरह ये उलझे
है रोम रोम एक तारा जो बादलो मे से गुजरे

यातील एकेका शब्दाची द्विरुक्ती करुन साधलेला परीणाम मोहक आहे. गाणं ही अतिशय शवणीय आहे हा एक बोनस.

दुमैं जिसे ओढ़ता-बिछाता हूँ,
वो ग़ज़ल आपको सुनाता हूँ..!

तसेच मसान चित्रपटात आलेलं गाणं दुष्यंत कुमार च्या कवितेच्या ओळी

तू किसी रेल-सी गुज़रती है,
मैं किसी पुल-सा थरथराता हूँ..!

सुरुवातीला वापरुन मग बहुधा स्वानंद किरकीरे की वरुण कोणी लिहील्या माहीत नाही मात्र

काठ के ताले हैं आँख पे डाले हैं उनमें इशारों की चाबियां लगा रात जो बाक़ी है शाम से ताकि है नीयत में थोड़ी..
नीयत में थोड़ी खराबियां लगा खराबियां लगा मैं हूँ पानी के बुलबुले जैसा तुझे सोचूं तो.. फूट जाता हूँ

पानी के बुलबुले जैसा ही प्रतिमा आणि मग त्याचे फुटणे ही अफलातुन कवि कल्पना आहे. असाच प्रयोग अगोदर गालिब च्या शेर चा फक्त मुखडा वापरुन " दिल ढुंढता है फिर वही फुर्सत के रात दिन" बाकी ओळी स्वतःच्या वापरुन गुलजार यांनी हे सुंदर गाण लिहेलेलं आहे.

वर दुष्यंत कुमारांची मुळ कविता जिच्या दोन ओळी वापरलेल्या आहेत ती अशी

एक जंगल है तेरी आँखों में,
मैं जहाँ राह भूल जाता हूँ..!

हर तरफ़ ऐतराज़ होता है,
मैं अगर रौशनी में आता हूँ..!

मैं तुझे भूलने की कोशिश में,
आज कितने क़रीब पाता हूँ..!

कौन ये फ़ासला निभाएगा,
मैं फ़रिश्ता हूँ सच बताता हूँ..!

चिगो's picture

22 Aug 2019 - 3:20 pm | चिगो

तुमच्या ह्या प्रतिसादासाठी धन्यवाद, मारवा.. तुम्ही किती रसिक आणि 'दर्दी' आहात, हे जाणवलं..

पानी के बुलबुले जैसा ही प्रतिमा आणि मग त्याचे फुटणे ही अफलातुन कवि कल्पना आहे.

एक्झॅक्टली.. वरुणने दुष्यंत कुमारांच्या त्या दोन ओळींना इतक्या सुंदररित्या फुलवलं आहे की बस्स.. ह्याच गाण्यात 'किसी लंबे सफर की रातों में, तुझे अलाव-सा जलाता हुं, हेदेखील केवळ अप्रतिम.. हे गाणं ऐकल्यावर स्वानंद करकरेंना एकच तक्रार कराविशी वाटते कि ते आणखी गाणी का गात नाहीत?

गुलजार - हा माणूस तर कमाल आहे..

महासंग्राम's picture

22 Aug 2019 - 3:28 pm | महासंग्राम

करकरे नाही हो किरकिरे

राजेंद्र मेहेंदळे's picture

21 Aug 2019 - 8:14 pm | राजेंद्र मेहेंदळे

बर्‍याच दिवसानी असे काहीतरी वाचायला मिळाले. कामाच्या गडबडीत हिंदी गाणी पाहिजे तशी लक्षात राहत नाहित, किंबहुना गाडीत जाता येता एफेम वर ऐकतो तितकेच. मग रसग्रहण वगैरे तर गोष्ट फारच दुरची. तरीही काही जुने नवे गीतकार आणि त्यांची गाणी जरुर आठवतात.

माझ्या आवडत्या गीतकारांपैकी एक जावेद अख्तर.
फुलोंपर शबनमकी नमी है, रंगो की मेहफील सी जमी है, मौसम भी मंजर भी मै भी कहते है बस तेरी कमी है -- ऐश्वर्या रायचा डेब्यु सिनेमा और प्यार हो गया
एक लडकी को देखा तो ऐसा लगा- १९४२ ए लव्ह स्टोरि
केह्ने को जश्न बहारा है- जोधा अकबर
केहनेको साथ अपने एक दुनिया चलती है पर चुपके ईस दिलमे तनहाई रहती है-नमस्ते लंदन
ऐसा लगता है जो ना हुआ होनेको है/ पंच्छी नदिया पवन के झोके-रिफ्युजी
दो पल रुका ख्वाबो का कारवा- वीर जारा
कैसी है ये रुत के जिसमे- दिल चाहता है

मराठीत सांगायचे तर ग्रेस बेस्टच पण मंगेश पाडगावकर,आरती प्रभु, आणि नव्यामध्ये गुरु ठाकुर संदीप खरे वगैरे अनेक नावे सांगता येतील. खाली एक मस्त लिंक देतोय. खुप माहिती मिळते ईथे

https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika

जॉनविक्क's picture

21 Aug 2019 - 8:29 pm | जॉनविक्क

समीर ची एक उत्कृष्ट रचना. अत्यन्त साधं सोपं काव्य, काळजासोबत अजून बरेच ठिकाणी भिडणारं. विशेषतः या ओळी वाचल्या की कवींच्या लेखणीमधे काय ताकत असते याची कल्पना सर्वसमन्यालाही यावीच...

पड़ने लगी है कड़ाके की सर्दी
कितना सताए है मौसम बेदर्दी
ऐसे में कैसे सहें हम जुदाई

अत्यन्त मोजक्या आणि संयत शब्दात नेमकपणाचे प्रकटीकरण देणारं असं दुसरं उदाहरण विरळाच. कवीने फार महत्वाचा प्रश्न फक्त उपस्थितच केलेला नाही तर पुढील वाक्यात लगेच त्याने उपायही दिला आहे तो म्हणजे

ऐसे में कैसे सहें हम जुदाई
बाहों में लेके ओढ़ा दो रजाई
तरसाए बैठी रतिया जाड़ा लगे
सरकाए लियो तकिया ...

हे गाणं मनात ज्या गुदगुल्या निर्माण करायचं त्याला तोड नाही

मंदार कात्रे's picture

21 Aug 2019 - 9:07 pm | मंदार कात्रे

मैं बलवान लगे चट्टान
रहे मैदान में आगे
हुड हुड दबंग्ग दबंग्ग दबंग्ग दबंग्ग

जो झुंजार हो तयार वही सरदार सा लगे

दार को काट रे
जब वीर भरे खुंखारे

अरे मैं बलवान लगे चट्टान
रहे मैदान में आगे

जब गगन ागन बरसावे रे
वह ठंडी पवन बन जावे रे
जो सब का बार उठावे रे है वही दबंग्ग
हो जब घडी कठिन सी ावी रे
वह जेठ से सबल बन जावे रे
जो सब को पार लगावे रे है वही दबंग्ग
दार को काट रे
जब वीर भरे खुंखारे

जब बात ाँ पे आवे रे
वह बाण कारज पे खावे रे
वह सब के प्राण बचाए रे है वही दबंग्ग
वह शूरवीर कहलावे रे
सरकाल बाणे मँडरावे रे
दुश्मन को मार गिराए रे है वही दबंग्ग
दार को काट रे चीर धरे सनाटे रे
जब वीर भरे खुंखारे
अरे मैं बलवान लगे चट्टान
रहे मैदान में आगे

जो झुंजार हो तयार वही सरदार सा लगे
हुड हुड दबंग्ग दबंग्ग दबंग्ग दबंग्ग
हुड हुड दबंग्ग दबंग्ग दबंग्ग दबंग्ग

Song - Hudd Hudd Dabangg
Film - Dabangg
Singer - Sukhwinder Singh, Wajid
Lyricist - Jalees Sherwani
Music Director - Sajid, Wajid
Artist - Salman Khan, Arbaaz Khan, Sonakshi Sinha, Vinod Khanna, Others
Music On - T-Series

What about sunrise
What about rain
What about all the things that you said
We were to gain
What about killing fields
Is there a time
What about all the things
That you said were yours and mine
Did you ever stop to notice
All the blood we've shed before
Did you ever stop to notice
This crying Earth, these weeping shores....

कहर आहे ही प्रतिभा

Looking out
Across the nighttime
The city winks a sleepless eye
Hear her voice
Shake my window
Sweet seducing sighs
Get me out
Into the nighttime
Four walls won't hold me tonight
If this town
Is just an apple
Then let me take a bite
If they say
Why, why, tell 'em that it's human nature
Why, why, does he do it that way
If they say
Why, why, tell 'em that it's human nature
Why, why does he do me that way

या गाण्याची चाल सुरेख आहे मायकल चा आवाज गाण्यात "जान" आणतो. वर बोल्ड केलेल्या ओळी फार आवडतात. त्याच्या पॉप्युलर आक्रस्ताळी इमेज ला छेद देणारं गाणं. या गाण्याची जन्मकथा ही रोचक आहे Porcaro ने हे गाणं मुळात त्याच्या मुलीसाठी लिहीलेलं होतं
https://en.wikipedia.org/wiki/Human_Nature_(Michael_Jackson_song)
ऐकायला ही अतिशय मधुर सॉफ्ट गाणं आहे.
https://www.youtube.com/watch?v=SvtvI6UxkvY

ओ ईको फ्रेंडली, नेचर के रक्षक
मैं भी हूँ नेचर
रिवाजों से, समाजों से
क्यूँ, तू काटे मुझे, क्यूँ बांटे मुझसे इस तरह
क्यों सच का सबक सिखाए, जब सच सुन भी ना पाए
सच कोई बोले तो तू, नियम कानून बताये
तेरा डर, तेरा प्यार, तेरी वाह
तू ही रख (रख साले)
साड्डा हक, एत्थे रख...

If they say
Why, why, tell 'em that it's human nature
या ओळीला मैं भी हूँ नेचर फार जवळ जातो
पण tell 'em that it's human nature हे मायकलं फार सॉफ्टली सुनावतो त्या उलट रणबीर च्या गाण्यात भिडणारा बर्स्ट झाल्यासारखा आक्रोश जाणवतो.
कारण गाण्याच्या मुळात असावे कारण मायकल चे मुळ गाणे लिहीणारा आपल्या लहान मुलीसाठी हे म्हणत होता इर्शाद च्या डोक्यात दुसराच लाव्हा उकळतोय....

जॉनविक्क's picture

22 Aug 2019 - 11:36 pm | जॉनविक्क

Simply Amazing.

मायकेल जॅक्सन या दोन शब्दानंतर माझं अवघ मनोरंजन स्तब्ध होतं.

महासंग्राम's picture

22 Aug 2019 - 3:30 pm | महासंग्राम

बावरा मन देखने चला एक सपना
बावरे से मन की देखो बावरी है बातें
बावरी सी धड़कनें हैं, बावरी है साँसे
बावरी सी करवटों से निंदिया तू भागे
बावरे से नैन चाहे, बावरे झरोखों से
बावरे नजारों को ताकना

बावरे से इस जहां में बावरा एक साथ हो
इस सयानी भीड़ में बस हाथों में तेरा हाथ हो
बावरी सी धुन हो कोई, बावरा एक राग हो
बावरे से पैर चाहे, बावरे तरानों के
बावरे से बोल पे थिरकना

बावरा सा हो अँधेरा, बावरी खामोशियाँ
थरथराती लौ मद्धम, बावरी मदहोशियाँ
बावरा एक घुंघटा चाहे हौले हौले बिन बताये
बावरे से मुखड़े से सरकना

ते गाणं आहे

गेली कुठं गावना
बोल्या बिगर रहावना
बुजलिया कांनाची भोकं

अन खाजवकी
जर्र खाजवाकी
बुगडी शोधायला डोक्कन खाजवाकी
तुमचं खाजवाकी
बुगडी शोधायला डोकं

महासंग्राम's picture

22 Aug 2019 - 11:53 pm | महासंग्राम

चित्रपट : आली अंगावर
गाणं : गेली कुठं
गीतकार : दादा कोंडके
संगीत : राम लक्ष्मण
गायिका : उषा मंगेशकर

जॉनविक्क's picture

23 Aug 2019 - 12:52 am | जॉनविक्क

मंदार कात्रे's picture

22 Aug 2019 - 5:15 pm | मंदार कात्रे

Great

मंदार कात्रे's picture

22 Aug 2019 - 5:16 pm | मंदार कात्रे

Great reaction for the earth song !

There's a place in your heart
And I know that it is love
And this place could be much
Brighter than tomorrow
And if you really try
You'll find there's no need to cry
In this place you'll feel
There's no hurt or sorrow
There are ways to get there
If you care enough for the living
Make a little space
Make a better place
Heal the world
Make it a better place
For you and for me
And the entire human race
There are people dying
If you care enough for the living
Make it a better place
For you and for me

हिल द वर्ल्ड, मेक इट बेटर प्लेस

प्रमोद देर्देकर's picture

23 Aug 2019 - 8:00 am | प्रमोद देर्देकर

हिल द वर्ल्ड माझंही आवडतं गाणं. त्यातला वाढत जाणारा रिदम अप्रतिम त्यातही तो जेव्हा कडव्यात ओह करून हळुवार ओरडतो खरं तर गुंजन करतो ते अफलातून आहे.
दुसरे इथीयोपीया देशातील दुष्काळग्रस्त लोकांना मदतीसाठी सत्तर लोकांनी मिळून गायलेलं गाणं त्यात त्याची बहिण जेनेट जेकसन पण आहे.

We Are T he World We are The nation
या गाण्यानं माझ्या अंगावर राष्ट्रगीत म्हणताना जसा येतो तसा काटा येतो.
आपण देशाचे नाही तर जगाचे नागरिक आहोत ही उच्च कोटीची भावना.
यातून जो मील्यन डॉलर निधी उभा राहिला तो तसाच्या तसा त्या देशात गेला.

महासंग्राम's picture

23 Aug 2019 - 9:19 am | महासंग्राम

बॉब डिलनचं हे गाणं माझं फार फार आवडतं आहे, विशेष म्हणजे आर्टिकल १५ चित्रपटात आयुष्यमान खुराणा च्या एंट्रीला हे गाणं वाजतं तेव्हा जाम भारी वाटतं

How many roads must a man walk down
Before you call him a man?
How many seas must a white dove sail
Before she sleeps in the sand?
Yes, 'n' how many times must the cannon balls fly
Before they're forever banned?
The answer, my friend, is blowin' in the wind
The answer is blowin' in the wind

Yes, 'n' how many years can a mountain exist
Before it's washed to the sea?
Yes, 'n' how many years can some people exist
Before they're allowed to be free?
Yes, 'n' how many times can a man turn his head
And pretend that he just doesn't see?
The answer, my friend, is blowin' in the wind
The answer is blowin' in the wind

Yes, 'n' how many times must a man look up
Before he can see the sky?
Yes, 'n' how many ears must one man have
Before he can hear people cry?
Yes, 'n' how many deaths will it take till he knows
That too many people have died?
The answer, my friend, is blowin' in the wind
The answer is blowin' in the wind

प्राची अश्विनी's picture

23 Aug 2019 - 12:08 pm | प्राची अश्विनी

वाह! लेख अन् प्रतिसाद दोन्ही छान.

रविकिरण फडके's picture

23 Aug 2019 - 12:13 pm | रविकिरण फडके

माझी आजी एक गाणं म्हणायची. एकोणीसशे साठच्या दशकातील गोष्ट आहे ही. त्यातल्या २-३ ओळीच मला आठवतात, त्या अशा आहेत:

गळ्यात घाटा न मिळे पोटा
हिंडे बारा वाटा,
जन हे करतील चेष्टा
ऐके साजणी ।

हे गाणं ती शिवरात्रीला हमखास म्हणायची. पण म्हणून शंकर पार्वतीचा काही संबंध आहे का, मला माहीत नाही.
शक्यता कमी आहे, पण जर कुणाला माहीत असेल, किंवा माहीत करून घेण्याचा मार्ग माहीत असेल, तर कृपया अवश्य सांगा.

मायमराठी's picture

23 Aug 2019 - 12:49 pm | मायमराठी

हा धागा वाचताना कितीतरी जुने धागे उसवून समोर येऊन नाचू लागले. सगळ्यांना बांधून घेणं शक्य नाही. एक मनांत बांधला गेलेला इथे उलगडतो.

"देखो इन्हें ये हैं ओस की बूँदें
पत्तों की गोद में आसमां से कूदें
अंगड़ाई लें फिर करवट बदल कर
नाज़ुक से मोती हंस दें
फिसल कर खो ना जाएँ ये
तारे ज़मीं पर ...।
ये तो है सर्दी में धूप की किरणें
उतरें जो आँगन को सुनहरा सा करने
मन के अंधेरों को रोशन सा कर दें
ठिठुरती हथेली की रंगत बदल दें
खो ना जाएँ ये.. तारे ज़मीं पर ये...।"
शब्द इतके परिणामकारक आहेत की अर्थासकट काळजात रुतून बसतात. चारचौघांपेक्षा वेगळी असणारी, दिसणारी मुलं मंचावर नाचत असतात. स्लो मोशन त्यांच्या चेहऱ्यांची रेष न् रेष टिपते. त्यांचे पालक, त्यांच्या मनातले कौतुक लपवता येत नाही, ते डोळ्यांतून बागडत राहते. त्यांच्या मुलांचं अस्तित्वाचे महत्व, त्या पालकांच्या वतीने प्रसून जोशी लिहितात. ह्या अश्या शब्दांना शं ए लॉ यांनी कुठे कुठे फिरायला नाही नेलं. हे गाणं बघताना शब्द ,नाजूक पंखांच्या पक्ष्यांसारखे हातावर येऊन बसतात. आपल्या डोळ्यांत बघत आपण त्यांची दखल घेतोय ना? हे पाहूनच उडतात. संगीत व शब्द ह्यांची दुहेरी मैफिल एकाचवेळी सजते आणि खूप सारा आनंद देत देत अंतर्मुख करूनच संपते.

सुंदर प्रतिसाद !

मायमराठी's picture

23 Aug 2019 - 11:47 pm | मायमराठी

:)

सालदार's picture

23 Aug 2019 - 5:21 pm | सालदार

Westlife - Flying Without Wings
निव्वळ अप्रतिम...

Everybody's looking for that something
One thing that makes it all complete
You find it in the strangest places
Places you never knew it could be

Some find it in the face of their children
Some find it in their lover's eyes
Who can deny the joy it brings
When you found that special thing
You're flying without wings

Some find it sharing every morning
Some in their solitary lives
You find it in the words of others
A simple line can make you laugh or cry

You find it in the deepest friendship
The kind you cherish all your life
And when you know how much that means
You've found that special thing
You're flying without wings

So impossible as they may seem
You've got to fight for every dream
'Cause who's to know
Which one you let go
Would have made you complete
Well,…

सालदार's picture

23 Aug 2019 - 5:26 pm | सालदार

संपुर्ण---

Everybody's looking for that something
One thing that makes it all complete
You find it in the strangest places
Places you never knew it could be

Some find it in the face of their children
Some find it in their lover's eyes
Who can deny the joy it brings
When you found that special thing
You're flying without wings

Some find it sharing every morning
Some in their solitary lives
You find it in the words of others
A simple line can make you laugh or cry

You find it in the deepest friendship
The kind you cherish all your life
And when you know how much that means
You've found that special thing
You're flying without wings

So impossible as they may seem
You've got to fight for every dream
'Cause who's to know
Which one you let go
Would have made you complete

Well, for me it's waking up beside you
To watch the sunrise on your face
To know that I can say I love you
In any given time or place
It's little things that only I know
Those are the things that make you mine

And it's like flying without wings
'Cause you're my special thing
I'm flying without wings

And you're the place my life begins
And you'll be where it ends
I'm flying without wings
And that's the joy you bring
I'm flying without wings

एका हिंदी चित्रपटात हे इंग्रजी गाणे गुंफायची शक्कल लड़वल्याबद्दल अनुराग कश्यप ला एक कडक सल्यूट. त्याचे बोल पुढील प्रमाणे आहेत.

I Am A Hunter And She Want To See My Gun
When I Pull It Out Boy The Woman Start To Run

She Beg Me To See It, She Beg Me To Show It
But When I Reveal It, She Want To Run And Hide

_/\_

मारवा's picture

25 Aug 2019 - 4:15 am | मारवा

एक जेव्हा इंडीयन पॉप ला बहार आली होती तेव्हा शान च्या या लिरीक्स फार भावले होते. या गाण्यातला नॉस्टॅल्जीया....त्यातला लाइट्स चा वापर....शान चा आवाज आणी या ओळींनी जिवाला घोर लावला होता.

आँखों में सपने लिए घर से हम चल तो दिए जाने ये राहें अब ले जाएँगी कहाँ
आँखों में सपने लिए घर से हम चल तो दिए जाने ये राहें अब ले जाएँगी कहाँ
मिट्टी की खुशबू आए पलकों पे आंसू लाए पलकों पे रह जायेगा यादों का जहाँ
मंज़िल नयी है अंजना है कारवां चलना अकेले है यहाँ तन्हां दिल..तन्हां सफ़र ढूंढे तुझे फिर क्यूँ नज़र तन्हां दिल..
दिलकश नज़ारे देखे झिलमिल सितारे देखे आँखों में फिर भी तेरा चेहरा है जवां
कितनी बरसातें आई कितनी सौगातें लाई कानों में फिर भी गूंजे तेरी ही सदा..
वादे किये थे अपना होगा आशियाँ वादों का जाने होगा क्या
तन्हां दिल..तन्हां सफ़र ढूंढे तुझे फिर क्यूँ नज़र तन्हां दिल..

तसेच रजनीगंधा या चित्रपटातील नायिकेचं ( जे आपल्या सर्वांना कधी ना कधी लागु होत ) हे longing हे बंधन तोडु पाहणारं मन ज्याला हे ही धड कळत नाही की आपण नेमकं कशाच्या मागे धावतोय. ही सर्वांच्या कधी ना कधी हमखास अनुभवाला येणारी व्याकुळता सर्व बंधने तोडण्याची उर्मी ... फार नेमक्या शब्दात मांडलीये

कई बार यूं भी देखा है
ये जो मन की सीमा रेखा है
मन तोड़ने लगता है
अन्जानी प्यास के पीछे
अन्जानी आस के पीछे
मन दौड़ने लगता ह

पण ते या कडव्या पर्यंतच पुढच्या ओळी कश्मकश dilemma दाखवणार्‍या

राहों में, राहों में, जीवन की राहों में
जो खिले हैं फूल फूल मुस्कुराके
कौन सा फूल चुराके, रख लूं मन में सजाके
कई बार यूं भी देखा है ...

जानूँ ना, जानूँ ना, उलझन ये जानूँ ना
सुलझाऊं कैसे कुछ समझ न पाऊँ
किसको मीत बनाऊँ, किसकी प्रीत भुलाऊँ
कई बार यूं भी देखा है ...

रजनीगंधा चित्रपट मन्नु भंडारी यांच्या कथेवर आधारीत होता.