टारंटिनो

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in मिपा कलादालन
19 Aug 2019 - 8:26 am

वर्षातून एकदा येणाऱ्या एखाद्या उत्सवाची किंवा घटनेची आपण जशी आतुरतेने वाट बघतो तसा वार्षिक ऑस्कर सोहळा म्हणजे माझा एक राखून ठेवलेला दिवस, मग ते बघणे, त्यात कोणते चित्रपट आपले राहून गेले वैगरे आढावा घेणे असा वर्षानुवर्षे चालेल प्रघात, हे नमूद करण्याचे कारण असे कि उत्तम चित्रपट ( कोणत्याही भाषेतील) हा एक छंद आणि आवड असणाऱ्यामाझयासारख्याची जेव्हा घनघोर निराशा होते एखाद्या चित्रपटाकडून तेव्हा किती लागेल हे कळावे म्हणून...
असो

चित्रपटाचाच नाव आहे "वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड "
क्विंटन टारंटिनो सारखा दिग्दर्शक ( किलबिल १,२, जंगो unachenged ) आलं पचिनो , ब्रॅड पिट , लिओनार्दो डिकॅप्रिओ सारखे भक्कम नट त्यामुळे फार अपेक्षा ठेवून गेलो ( त्यात भर म्हणजे पैसे वसूल ३ तास लांबी) पण काहीच पदरात पडलं नाही.
कथा एका तरुण पण स्वतःच्या सध्याचं कामगिरी बद्दल शंका येत असलेलया कलाकाराची ( लिओ) आणि त्याचा ड्राइवर आणि स्टंट डबल काम करणाऱ्याची आणि त्यांचं अवती भवती असेललाय काही प्रसिद्ध हॉलिवूड मधील व्यक्तींची ?( दिग्दर्शक रोमन पोलान्स्की, ब्रूस ली! वगैरे)
अर्थातच लिओ आणि ब्रॅड यांनी व्यक्तिरेखा उत्तम उभ्या केल्यात , लिओ स्टार म्हणून आणि जरा विचित्र म्हणून ब्रॅड ( त्याचे सेवन मधील काम आठवा) , कॅलिफोर्निआयटील उन्हाळ्यातील जुंना काळ इत्यादी छान दाखवलाय ( रेट्रो इमारती जुने चित्रपट संददर्भ इत्यादी )
टारंटिनो च्या चित्रपटात अनवट भाग असतात, ते हि फारसे नाहीत, जरा कुठे अनवट भाग येतोय असे वाटते, गूढता वाटयेत ड्राइवर च्या जीवनात तर तो हि बार फुसका निघतो .
टारंटिनो म्हणाला कि जीवघेणी मारामारी आणि ती हि इतकी खरी वाटावी कि अंगावर शहरे यावेत .. हे आहे पण फारशी नाही
या दोघांची मैत्री टिकते कि जाते , लिओ चा "स्टार काळ" राहतो कि जातो यावर खूप काही घडेल असे वाटते ,, तीन तास वाटत राहते पण फार काही घडत नाही
शेवट पण "वास्तवात घडू शकत असला" तरी थोडासा हास्यास्पद वाटतो
तेव्हा अपेक्षा भंग टाळा आणि स्टार पावर असली तरी निराशा व्हायची शक्यता जास्त हे लक्षात घ्या

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

19 Aug 2019 - 12:38 pm | जॉनविक्क

तेव्हा अपेक्षा भंग टाळा आणि स्टार पावर असली तरी निराशा व्हायची शक्यता जास्त हे लक्षात घ्या

धन्यवाद.