पुराणातील वांगी ?

Jack_Bauer's picture
Jack_Bauer in काथ्याकूट
13 Jul 2015 - 12:55 am
गाभा: 

आपल्याकडील काही लोक हे आपल्या पूर्वजांनी काय केले याचेच कौतुक करण्यात मग्न असतात . आपल्या पूर्वजांनी केले असेल भले, पण त्याचा आपण काहीही उपयोग करून न घेता किंवा त्यात काही भर न टाकता नुसतेच बडबड करत बसण्यात काय अर्थ आहे ? मला अशा लोकांचं खरच आश्चर्य वाटत. दुसर्यांनी केलेली प्रगती किंवा शोध याचे कौतुक करून आपल्या भारतात हे का नाही करू शकलो ह्याचा विचार करण्याऐवजी "काय त्यात एवढं , हे तर भारतात १००० वर्षांपूर्वीच होत" अस म्हणण्यात कसला अभिमान ?
आपण काही उदाहरणे बघू ज्यात अ म्हणजे एखादा शोध किंवा तंत्रज्ञान आणि ब म्हणजे वरील प्रकारच्या लोकांकडून आलेल्या प्रतिक्रिया व माझी प्रतिक्रिया :

अ : अणूबॉम्बचा शोध
ब : हें , आपल्याकडे आग्नेयास्त्र होत पूर्वी. महाभारतात वापर केला होता. कुरुक्षेत्रावर अजून काहीही उगवत नाही !!!
मी : असू शकेल , पण आपण त्या तंत्रज्ञानाचा आजच्या वापरासाठी काय उपयोग केला ? आजही आपण अनेक शस्त्रास्त्रे रशियासारख्या देशाकडून आयात करतो आणि करोडो रुपये यावर दर वर्षी खर्च होतात . भारताच्या अणूविषयक कार्यक्रमासाठी युरेनियम बाहेरून आयात करतो , reactors आयात करतो. मग आपल्याकडील ह्या पूर्वजांकडील ज्ञानाचा नुसताच बढाई मारून काय फायदा ?

अ : विमान
ब: आपल्याकडे विमानाचा शोध प्रथम लागला , अमेरिकेत नाही . रामायणापासून उल्लेख आहे विमान वापरल्याचा . vimanas नावाची एक documentary पण आहे त्यावर.
मी : ठीक आहे , पण आज आपल्या भारताची काय स्थिती आहे ? करोडो रुपये खर्चून आपण आज फ्रांसकडून विमाने विकत घेत आहोत. विमानाची technology जर आपल्याकडे आधीपासून होती तर पण आपण आज त्याचा आपल्या देशासाठी काय उपयोग करून घेतला ?

अ : प्रोग्रामिंग
ब : आपली संस्कृत प्रोग्रामिंगसाठी बेस्ट आहे असे नवीन संशोधन झाले आहे. आपल्याकडे हे आधीपासूनच आहे, हे C /C ++ वगैरे आत्ताच आहे.
मी : आपण जे बोललात त्यातच सगळ आलं. संस्कृत हि आपली भाषा , ती प्रोग्रामिंगसाठी चांगली हे आपल्याला पाश्च्यात्त देशातील लोकांनी सांगितल्यावर आपल्याला कळते ? संस्कृत प्रोग्रामिंगसाठी वापरता येईल कि नाही तो भाग वेगळा , पण तिकडचे लोक आपल्या संस्कृतवर संशोधन करून जगाला सांगतात आणि आपण फ़क़्त हो हो बघा आम्ही किती भारी , आमची संस्कृत किती भारी असे म्हणत बसण्यातच धन्यता मानतो. मग तिकडचाच कोणीतरी त्यावर अधिक संशोधन करतो आणि patent मिळवून ते तंत्रज्ञान आम्हालाच विकतो.

अ: शस्त्रक्रिया / एखादं नवीन मशीन किंवा तंत्र
ब : आपल्या भारतात सुश्रुताने हजारो वर्षांपूर्वी अमुक तमुक इतकी अवघड शस्त्रक्रिया केली होती. आपल्या भारतात हि गोष्ट तेव्हापासूनच माहीत होती . हे इतक्या वर्षांनी शोधून काढलं या पाश्च्यात्त लोकांनी .
मी : आपल्याला माहित होतं ना आधीपासून पण सध्या आपण त्याचा काय फायदा करून घेतोय ? आज भारत अनेक औषधे , मशिन्स , medical parts परदेशातून आयात करतो . operation करण्यासाठी डॉक्टरनी भारतीय part X रुपयांना आणी परदेशी पार्ट ८X रुपयांना असे सांगितल्यावर कितीतरी जण महाग असूनही परदेशी पार्ट वापरा असं सांगतात. कदाचित भारतीय पार्ट चांगला असेलही , पण quality बाबतीत तो विश्वास वाटत नाही. याची कारणे अनेक असू शकतील जसे कि परदेशी कंपन्यांचे aggressive मार्केटिंग वेगैरे पण शेवटी भारतातील पैसा बाहेर जातो आहे हे सत्य राहतेच. मग सुश्रुताने हजारो वर्षांपूर्वी अमुक तमुक इतकी अवघड शस्त्रक्रिया केली होती याचा आपल्याला सध्या काय उपयोग झाला ?

मला भारताला किंवा आपल्याकडील प्रत्येक गोष्टींना नावं ठेवायची नाहीत. परवाची इस्रोची कामगिरी बघून खूप अभिमान वाटला. किती तरी अमेरिकन मित्रांना हे माझ्या भारतातील संशोधकांनी करून दाखवलं अस मी अभिमानाने सांगितलं. मोदींचा "स्वच्छ गंगा " प्रोजेक्ट , पूर्वीपासून आपण नद्यांना पूजनीय मानत आलो आहोत आणी आता तिच्या सफाईसाठी प्रयत्न करतो आहोत ही खूप चांगली गोष्ट आहे. आपल्याकडे अगदी सम्राट अशोकाच्या काळापासून चर खणणे, बांध घालून पाणी जिरवणे ह्या गोष्टी केल्या जायच्या, सध्या महाराष्ट्रात राबवली गेलेली "जलयुक्त शिवार योजना " आणी त्यामुळे वर्धा आणी नागपूर येथे मुबलक उपलब्ध झालेले पाणी हे चर खणणे, बांध घालून पाणी जिरवणे ह्यामुळेच शक्य झाले.

आपल्याकडे असलेले पुराणातील ज्ञान आपण वापरून आज आपला उत्कर्ष कसा होईल हे पाहीले तर त्या ज्ञानाचा सदुपयोग झाला असे म्हणता येईल . दुसर्यांनी केलेल्या कष्टांमूळे लागलेले शोधांच क्रेडीट ज्याचं त्याला देऊन आपल्याला काय करता येईल ह्याचा विचार न करता नुसतेच आमचे पूर्वज असे होते आणी आपल्याकडे अमुक तमुक आधी पासूनच होते असं म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात काय अर्थ आहे ?

प्रतिक्रिया

अस्वस्थामा's picture

17 Jul 2015 - 9:44 pm | अस्वस्थामा

अर्रे .. कय चल्लय कय ?

बादवे, नामबदलानंतर "आगोबा दुदुदुदु इ. इ." असे शब्द असलेले प्रतिसाद येत नाहियेत आजकाल असे निरिक्षण नोंदवतो. :)

नाखु's picture

18 Jul 2015 - 4:24 pm | नाखु

नक्की काय ?

पुरावा का
गाडावा ??????

नस्तेतस..

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jul 2015 - 1:31 am | अत्रुप्त आत्मा

@चालू दया तुमचं निरर्थक अत्मरंजन.>> आंsssss! दू दू दू हत्ती ब्रम्हराक्षस आग्यावेताळ! :-\

अग्निबंदुकात्रुप्त-प्र चेतसागोबा
http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-001.gif http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-005.gif

आनंदी गोपाळ's picture

22 Jul 2015 - 9:18 pm | आनंदी गोपाळ

विमान शब्दाचा एक अर्थ (उंचावरील) खिडकी असाही होतो ना?

काळा पहाड's picture

17 Jul 2015 - 6:12 pm | काळा पहाड

+ ज्यांना विज्ञानातलं फारसं कळत नाही ते लोक वाद घालत बसत नाहीत.
+ ज्यांना विज्ञानातलं "सगळं" कळतं (किंवा विज्ञानातलं सगळं कळतं असं वाटतं) असे विज्ञान न शिकलेले लोक विरोधी मताची टिंगल टवाळी करणे यात धन्यता मानतात.
+ ज्यांना विज्ञानाला सगळं कधीच कळू शकत नाही हे कळतं, असे विज्ञान शिकलेले लोक कुठलिही मतं (उदा: महाभारतकाळी क्षेपणास्त्रे होती हा दावा) तो वैज्ञानिक दृष्ट्या वा गणितीय दृष्ट्या फेटाळला गेल्या शिवाय कधीच फेटाळत नाहीत.

संदीप डांगे's picture

17 Jul 2015 - 6:20 pm | संदीप डांगे

१ नंबर. सौ सुनार की, एक लुहार की.

पुण्याचे वटवाघूळ's picture

18 Jul 2015 - 4:51 pm | पुण्याचे वटवाघूळ

मला वाटते की ब्रम्हास्त्र हे सगळ्यात भारी अस्त्र होते आणि ते सगळ्यात मोठे अस्त्र होते. अनेक लोक ब्रम्हास्त्राला अ‍ॅटम बॉमबही म्हणतात.

रामायणात उल्लेख आहे की हनुमान लंकेत गेला तेव्हा (ज्या व्हिजीटमध्ये त्याने लंका जाळली तीच व्हिजीट) तो पहिल्यांदा रावणाच्या सैनिकांना जुमानत नव्हता. पण नंतर रावणपुत्र इंद्रजीत तिथे गेला आणि त्याने हनुमाअनाला पकडले.त्यावेळी इंद्रजीताने ब्रम्हास्त्राचा प्रयोग केला आणि हनुमानाला पकडले. एकट्या हनुमानाला पकडायला अ‍ॅटम बॉम्ह जरा अतीच झाला नाही का? आणि दुसरे म्हणजे हनुमानाला इतर सैनिक दोराने बांधायला लागले तेव्हा ब्रम्हास्त्राचा इफेक्ट गेला. अ‍ॅटम बॉम्ब इतका पुचाट असतो का?

याविषयी जरा गुगळींग कल्यावर हिस्टरी चेनेलवरील खालील व्हिडिओ मिळाला. व्हिडिओ बघितलेला नाही अजून पण तो हिस्टरी चेनेलवरचा असेल तर नक्कीच बघायला हवा. हा व्हिडिओ एन्शेंट एलियन्सचा आहे पण कमेन्टमध्ये रामायण-महाबारताचा उल्लेख आहे. बघयाला हवा

ह्या व्हिडिओमध्ये महाभारतातील राम आणी सीता असे म्हटले आहे .... हिस्टरी चेनेल कडून ही अपेक्षा नाही

अस्वस्थामा's picture

22 Jul 2015 - 7:23 pm | अस्वस्थामा

हिस्टरी चॅनल आम्रिकेचा संध्यानंद हय भावा.. :)
धा मधला एक प्रोग्रॅम बघण्यालायक असतोय कवा कवा.. बाकी हा आस्लाच माल बगा..

तुडतुडी's picture

22 Jul 2015 - 4:39 pm | तुडतुडी

@बॅटमॅन
वैमानिक शास्त्र हा ग्रंथ फ्रॉड असल्याचे अगोदरच सिद्ध झालेले आहे.>>>
आधार ?? कधी कुणी आणि कशाच्या आधारावर हा ग्रंथ फ्रॉड असल्याचे सिद्ध झालेले आहे?फारच अगाध ज्ञान आहे ब्वा तुमचं

बाकी ॠग्वेदात कुठल्या यानाची माहिती आहे जरा सांगा बघू.>>>
प्रत्येक विमानाचे डिटेल सांगा बघू . एखाद्या गोष्टीतले डिटेल आपल्याला माहित नसतील तर त्याला चूक म्हणण्याचा काय अधिकार ?

बाकी कणादांनी एक फक्त एकोळी सिद्धांत मांडला म्हणून >>>
बास एवढंच माहित आहे का ? पुन्हा एकदा तुमचं अगाध ज्ञान दाखवून दिलंत

आपल्या इतिहासाबद्दल तुम्हांला खूप माहिती आहे असे दिसते, तरी तुम्ही हे ज्ञान वाटावे अशी विनंती आहे>>>
शोधा म्हणजे सापडेल . आणि आधुनिक शास्त्राचं फारच ज्ञान दिसतंय तुम्हाला. अगदी जगातली प्रत्येक गोष्ट माहित असल्यासारखी .
तुमच्या प्रतिसादांवरून तुम्हाला जाणून घ्यायची ,समजून घ्यायची किवा चर्चा नसून केवळ वादासाठी वाद घालायची इच्छा आहे असं दिसतंय . तेव्हा तुमच्या हास्यास्पद प्रतिसादांवर कॉमेंट करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवण उचित वाटत नाही .तेव्हा मी माझे प्रतिसाद थांबवत आहे . सत्य काही तुमच्या मानण्या न मानण्यावर अवलंबून नाहीये .
शेवटचा प्रतिसाद तुमचा आहे म्हणजे तुम्ही ह्या वादात जिंकलात असा गैरसमज करून घेवू नये कारण
एखाद्याने 'पांढरा रंग पांढरा नाही . काळाच आहे' असं म्हणायचं ठरवलं असेल आणि तो त्यातच आत्मरंजन करून घेत असेल तर त्याला इतर काय करणार

तुडतुडी: हा शोधनिबंध बघा, आणि तो का चूक आहे त्यामागची कारणे बघा. उचलला हात आणि बडवला कळफलक हे करणे लै सोपे आहे. तेव्हा तुमच्या मेंदूवर ताण येईल हे कबूल असले तरी हा रिसर्च पेपर बघाच. मग पाहू अगाध ज्ञान कुणाचे आहे ते.

http://cgpl.iisc.ernet.in/site/Portals/0/Publications/ReferedJournal/ACr...

प्रत्येक विमानाचे डिटेल सांगा बघू . एखाद्या गोष्टीतले डिटेल आपल्याला माहित नसतील तर त्याला चूक म्हणण्याचा काय अधिकार ?

बास एवढंच माहित आहे का ? पुन्हा एकदा तुमचं अगाध ज्ञान दाखवून दिलंत

छे छे, तुमचा गैरसमज होतोय. मी केवळ अज्ञानी बालक असून तुमच्या चरणांपाशी आलोय, तरी मार्गदशन करा. याचकाला विन्मुख पाठवणे आपल्या थोर संस्कृतीत बसतं का?

माझ्या अल्पमतीला माहिती असलेले दोनचार ज्ञानकण मी उधळले. तुम्हांला इतके ज्ञान असूनही नेमके काहीच माहिती असू नये हे रोचक वाटते.

तुडतुडी's picture

22 Jul 2015 - 4:43 pm | तुडतुडी

काळा पहाड >>>+1111111111
एकदम बरोबर . कधी काय होतं , कधी काय नाही , काय बरोबर , काय चूक, काय frod काय genuine सगळं काही आपल्यालाच कळतंय असा काही लोकांचा इथे गोड (गैर)समज झालेला दिसतोय

बाकी या ठिकाणी एक कयास जाहीर करावासे वाटते आहे:

तुडतुडी हीच पूर्वाश्रमीची म्हैस की क्कॉय?

अस्वस्थामा's picture

22 Jul 2015 - 7:20 pm | अस्वस्थामा

+१!!
बादवे, रेड्याची कविता वर येणे आणि हा कयास याचा काही अर्थाअर्थी संबंध असेल काय असा विचार करतोय.. ;)

बॅटमॅन's picture

22 Jul 2015 - 8:37 pm | बॅटमॅन

अग्गा बाब्बौ =)) =)) =))

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jul 2015 - 12:04 am | अत्रुप्त आत्मा

अस्वस्थामा>> =)) अंदाजि अनुबंधाने निर्वाणल्या गेलो आहे! =))

अस्वस्थामा's picture

23 Jul 2015 - 7:35 pm | अस्वस्थामा

:)))

गुर्जी तेवड्या स्मायल्या आणा पाहू परत आपल्या.. (तुमचा वशीला हय म्हणे)

(स्मायलीसम्राट गुर्जींच्या स्मायल्यांचा पंखा ! )

प्रकाश घाटपांडे's picture

13 Aug 2019 - 11:47 am | प्रकाश घाटपांडे

ही बातमी वाचलीत का? https://marathi.thewire.in/sanskrut-nasel-tar-sanganak-crash-pokhriyal

प्रकाश घाटपांडे's picture

13 Aug 2019 - 11:55 am | प्रकाश घाटपांडे

आमचे पूर्वज ग्रेट होते. त्या काळात आमाच्या ऋषी मुनींनी अनेक प्रगत शोध लावले होते. अनेक वेद उपनिषदात त्याचा उल्लेख आहेत.फक्त कालौघात ते ज्ञान नष्ट झाले. मुघलांनी आपली अनेक प्राचीन ग्रंध जाळले त्यामुळे त्याचे पुरावे नष्ट झाले. अशा प्रकारचे युक्तिवाद आपण अनेक वर्षे ऐकत असतो. काही लोकांना ते खरेही वाटतात. मला वाटते त्यातील सत्यतेपेक्षा पुर्वजांविषयीची कृतज्ञतेचा भाग त्यात अधिक आहे.

जॉनविक्क's picture

13 Aug 2019 - 11:59 am | जॉनविक्क

पण ही कृतज्ञता नेमकी कोणत्या गोष्टीसाठी आहे ?

प्रकाश घाटपांडे's picture

13 Aug 2019 - 12:05 pm | प्रकाश घाटपांडे

आपले पूर्वज ग्रेट होते ही भावना सुखावून नेणारी असते. त्यामुळे त्यांच्याविषयी कृतज्ञता करावीशी वाटते त्यांना!