काश्मीरमध्ये नक्की काय चाललेय?

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in काथ्याकूट
5 Aug 2019 - 10:35 am
गाभा: 

नमस्कार मंडळी
काश्मीर हे १९८७- ८८ पासुन नेहमीच धुमसत राहिले आहे. खरेतर १९४७ पासुन म्हणायला हवे. कारण राजा हरिसिंग यानी भारत स्वतंत्र झाला तेव्हा प्रथम स्वतंत्र राहायचा निर्णय घेतला पण नंतर पाकिस्तानने हल्ला केला तेव्हा शेवटी काश्मीर भारतात विलिन केले आणि भारतीय लष्कराची मदत घेतली.

पाकिस्तानचा काश्मीर् वर नेहमीच डोळा राहिला आणि त्यातुन पुढे २ युद्धे झाली. पुढे थेट युद्धात जिंकणे अशक्य आहे हे कळल्याने अनेक छुपे हल्ले, अतिरेकी कारवाया, घुसखोरी वगैरे सुद्धा आजमावुन बघितली गेली आणि त्यातुन हळुहळु पाक व्याप्त काश्मीरचा प्रश्न उभा ठाकला. याशिवाय स्थानिक मुस्लिम जनतेची सहानुभुती मिळवणे , काश्मीरी पंडीतांना धमकावणे, पळवुन लावणे वगैरे सुद्धा झाले.

मी मोदीभक्त नाहि, पण मोदी सरकार आल्यापासुन चित्र थोडे बदलले आहे. काश्मीर प्रश्नावर धडक आणि आक्रमक पावले टाकली जात आहेत. किवा त्याचे नीट मार्केटींग केले जात आहे म्हणा. मग तो सर्जिकल स्ट्राईक असो किवा कटराचा रेल्वेपुल असो.

पण परवा शुक्रवारपासुन काश्मीरात जे चालु आहे त्याची नीट संगती लागत नाहिये. लष्कराला काहितरी खबर मिळालेय आणि शस्त्रसाठा सापडला अशी बातमी आहे. ईतक्या वर्षात प्रथमच सरकारने अमरनाथ यात्रा स्थगित केली. त्या नंतर खोर्‍यातील सर्व पर्यटकांना बाहेर पडायच्या सुचना दिल्या आणि ठिकठिकाणी पर्यायी आणि अतिरिक्त वाहतुकिच्या सोयी उपलब्ध केल्या. पहलगाम मधे पहाडात गेलेले गिर्यारोहक सोडुन बाकी सर्वांना खाली आणले. जम्मु स्थानक आणि श्रीनगर विमानतळ गर्दीने फूलुन गेलाय.

शाळा कॉलेज बंद आहेत आणि नागरीकांना ८-१० दिवस पुरेल ईतका अन्न व ईतर जीवनावश्यक वस्तुंचा साठा करायची सुचना आहे. पेट्रोल पंपावर २ कि.मी. पर्यंत रांगा आहेत. लष्कराच्या तुकड्या उतरवल्या जात आहेत. थोडक्यात चिन्हे काहीशी ठीक नाहित.

१२ ऑगस्टला ईद आहे. १५ ऑगस्टला स्वतः मोदी काश्मीरात झेंडा वंदन करणार अशीही एक हूल आहे.

तर काय अंदाज आहे तुमचा? तज्ञ मिपाकरांचे यावर मत जाणुन घ्यायला आवडेल.

प्रतिक्रिया

Yogesh Sawant's picture

5 Aug 2019 - 11:08 am | Yogesh Sawant

सर, थांबा कि जरा. सगळ्यांना सगळं सगळ्या वेळी कळलंच पाहिजे का हो.

महासंग्राम's picture

5 Aug 2019 - 11:26 am | महासंग्राम

काश्मीर प्रकरण : घटनेतून कलम ३७० हटवण्याची शिफारस

माकडतोंड्या's picture

6 Aug 2019 - 12:40 pm | माकडतोंड्या

काश्मिर सोडा आता पाकिस्तानाची काळजी करा.

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 Aug 2019 - 9:21 pm | राजेंद्र मेहेंदळे

पाकिस्तान आपल्या मरणाने मरेल. मी कशाला काळजी करु त्याची?
आत्ताच तिथे टोमॅटो १७० रुपये किलो आहेत. डॉलर चा भाव १६० झालाय. चायना आणि अमेरिकेच्या कुबड्यावर देश उभा आहे. होउदे काय व्हायचे ते पाकचे.

रच्याकने ३७० लोकसभेतही रद्द झाले, म्हणजे लोकसभेची मोहोर उमटली आज.

सुबोध खरे's picture

7 Aug 2019 - 6:33 pm | सुबोध खरे

सहज पाहिले पाकिस्तानची सद्य स्थिती
https://www.numbeo.com/cost-of-living/country_result.jsp?country=Pakistan

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Aug 2019 - 7:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

३७० कलम हटले आता पुढे काश्मिर खो-यात काय परिस्थिती होईल त्यावर जरा चर्चा करू या.

लोकसभा आणि राज्यसभेतील अनेकांची भाषणे मी ऐकली. मा.गृहमंत्र्याचा प्रस्ताव आणि एकूण उत्तरेही ऐकलीत.

प्रश्न आहे की काश्मिरीही त्यांची ओळख हा बदल स्वीकारतील काय ? किती स्वीकारतील ? आणि भविष्यात काय काय मांडून ठेवले असेल ?

मी नेटवरील जम्मू काश्मिर टीव्ही आणि त्यावरील काही लोकांची मतं पाहात होतो, भारताचा प्रचंड द्वेष दिसतो, अनेकांना हे कलम आवडलेले नाही. अशावेळी त्यांना कोणीही मदत करीत नाही असे दिसते. आम्हाला कोंडून हे सर्व केलं. वगैरे. हे सर्व पाहता काय काय होऊ शकेल, सरकार तिथे काय पावले उचलेल ?

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

7 Aug 2019 - 8:23 pm | सुबोध खरे

जम्मू आणि काश्मीर यापैकी जम्मू आणि लडाख येथील लोकांनी याचे स्वागतच केलेले आहे पण सध्याच्या पत्रकारांकडून ते बाहेर येणे शक्य नाही.
बाकी कश्मीर खोऱ्यातील सुन्नी मुसलमान लोक जे एकंदर १६ टक्के आहेत. त्यांचे ब्रेन वॊशिंग झालेले आहे पर्यटन सोडून कोणताही रोजगार नाही मदरशात शिक्षण झालेल्या गरीब मुलांना भडकावून देणे हे काही दशकांपासून चालू होते. त्यांना दगडफेकीसाठी पैसा पुरवला जात होता.

एकदा सरकारची सर्व यंत्रणा ताब्यात घेतल्यावर तेथील गुप्तचर यंत्रणा कामाला लावून यांची पाळेमुळे शोधून काढली. दहशतवादी लोकांना सज्जड शिक्षा केली आणि पाकिस्तान ला एकटं पाडलेलं आहे. शिवाय या लोकांना पलीकडून मिळणारी मदत बंद झाली आहे त्यामुळे दगडफेकी बंद झाल्या आहेत.

आता काही कराल तर संपवून टाकू अशी धमकी दहशतवाद्यांना दिल्यामुळे त्यांचे लागेबांधे असलेले लोक सध्या थन्ड आहेत.

काश्मीर मधील पर्यटनाचा काळ संपत आल्यामुळे सामान्य माणसाला फार त्रास होणार नाही म्हणून आता हे ३७० कलम रद्द करण्याला हात घातला आहे.

पाकिस्तान आणि त्यांचे चेले अतिरेकी हे काही काळ काड्या घालायचा हे प्रयत्न करणारच.परंतु गुप्तचर यंत्रणा हातात ठेवल्यामुळे माहिती उत्तम तर्हेने उपलब्ध होते त्यामुळे १०० पैकी ९९ हल्ले तुम्हा आम्हाला न समजताच फोल केले जातात.

बाकी अरुंधती रॉय,रामचंद्र गुहा, सागरिका घोष, मेधा पाटकर सारखे घरभेदी आहेतच कंठ शोष करायला.

थोडा काळ तणाव राहील अन सगळं थंड होईल

श्री खरे साहेबांशी एकदम सहमत. काश्मीरी लोक देखील या रोजच्या दंग्याला कंटाळले आहेत. येणारी नवीन पिढी रोजगारासाठी बाहेर जात आहे. पाकिस्तान भिकारी झाल्यामुळे त्यांचा पाकिस्ताना बद्दल असणारा इंटरेस्ट कमी झाला आहे. बद्रवा, सोपुर मधील डोगरी भाषिक काश्मीरी मुले फौजे मध्ये भरती होत आहेत. काश्मीर लोकांच्यात अनेक गट तट जाती जमाती असल्या मुळे ती पूर्ण पणे विखुरलेली आहेत. याचा फायदा घेऊन मोदी निश्चितच त्यांना कामाला लावतील यात शंका नाही, जसे त्यांनी आपले साद्य लधाक मध्ये केले.या साठी त्यांना स्थानिक काश्मीरी नेत्यांना हाताशी धरून हे करावे लागेल.या बाबतीत पाकिस्तान खूपच आक्रमक होईल पण त्या साठी फौज तयार आहे.या साठी निदान ३ ते ४ वर्षाचा कालावधी लागेल. गंमत म्हणून एक किस्सा सांगतो . आमच्या इंजी. कॉलेजच्या मागे होरी म्हणून एक छोटे गाव आहे मागील एका इलेवशन चे वेळी त्यांनी चक्क बीजेपी चा हातात झेंडा घेऊन अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने ते घोषणा देत होते .यात वृध्द महिला देखील सामील होत्या . हे सर्व काश्मीरी शिया पंथीय आहेत व मतदान करायला जावू नये म्हणून आमच्या मेस मधील अनेक बेहरे दगडांनी त्यांची डोकी फोडत होते. हे सर्व दृष्य अाम्ही खिडकीतून पहात होतो.

माहितगार's picture

9 Aug 2019 - 1:16 pm | माहितगार

प्रश्न आहे की काश्मिरीही त्यांची ओळख हा बदल स्वीकारतील काय ? किती स्वीकारतील ? आणि भविष्यात काय काय मांडून ठेवले असेल ?
मी नेटवरील जम्मू काश्मिर टीव्ही आणि त्यावरील काही लोकांची मतं पाहात होतो, भारताचा प्रचंड द्वेष दिसतो, अनेकांना हे कलम आवडलेले नाही. अशावेळी त्यांना कोणीही मदत करीत नाही असे दिसते. आम्हाला कोंडून हे सर्व केलं. वगैरे. हे सर्व पाहता काय काय होऊ शकेल, सरकार तिथे काय पावले उचलेल ?
-दिलीप बिरुटे

सर कानपटीवर आतंकी बंदूक असतानाची आणि कानपटीवर आतंकी बंदूक नसतानाच्या भाषेत फरक असतो. पंजाब आणि आसाम मधील आंतंक कालीन भाषा आणि आताची भाषा यातील फरक आपल्याला सहज दिसेल आणि हा फरक विशेष काही न करता अगदी अवघड स्थितितही लोकशाही प्रक्रीया चालू राहील याची काळजी घेतल्याने झाला. तेलंगणाला विभक्त झाल्या नंतरही काही काळ आंध्र भावनिक झाला पण नंतर सरळ आले.

जेव्हा अस्मान कोसळते तेव्हा सुरवातीस कुरबुर करुन पर्याय नाही म्हणून जनता नवा नॅरेटीव्ह स्विकारण्यास तयार होते. खरेतर पाकीस्तानी पंजाबातील मुस्लिम रणजीत सिंगाच्या काश्मिरातील मुस्लीम डोग्रांच्या गैरमुस्लीम राजवटीला सराव्लेले होते. दुषित हितसंबंधाच्य अनुषंगाने मुस्लिम लीगने हिंदू बहुमताखाली रहाणे शक्य नसल्याचा बागुलबुवा उभा केला त्यातील फारच थोडे भारत सोडून पाकिस्तानात गेले, जे भारतात राहिले त्यांनी बदललेला नॅरेटीव्ह स्विकारला सततच्या हिंदुत्वी टिकेने आम्ही पाकीस्तान समर्थक नाही भारतीयच आहोत हा नॅरेतीव्ह ते स्विकारते झाले . असेच बदल काश्मिरातही होतील ३७०मुळे राष्ट्र्वादी मुस्लीम राजकारण्यांचे काश्मीरींना आकर्षण वाटत नसे आता आता तसेही ३७० नाही म्हटल्यावर काश्मिरी स्थानिक पक्षांना राष्ट्रीय धारेत येण्या शिवाय पर्याय नाही. अब्दुल्ला आणि मुफ्तिंना अटक केल्याबद्दल टिका होते पण त्यांना अटक झाल्यामुळे फुटीरांच्या तुलनेत स्थानिक पब्लिकचा सपोर्ट वाढण्यात मदत होईल दुसरीकडे विधानसभा पुर्नरचनेमुळे नेहमी पेक्षा नव्या राष्ट्र्वादी नेतृत्वाकडे सत्ता गेल्यामुळे त्यांना त्यांच्याशी जमवून घ्यावे लागेल.

स्थानिक शिक्षणात जे काही भारत विरोधी नॅरेटीव्ह असतील ते पुसावे लागतील आणि तसे करणे जम्मुतील राष्त्रवादी नेतृत्व उदयास येऊन शक्य होईल. सामान्य जनते सोबत आतंकवादाच्या विरोधात सैनिकी पेक्षा पोलीसी कार्यवाही अधिक प्रभावी असू शकते. केंद्रसरकारला पोलीस दलांना सरळ नियंत्रीत करता येत नव्हते तसे नियंत्रीत करता आले की सैन्यदलावरची टिका पण कमी होते.

रहाता प्रश्न पाक प्रणित हातात स्वतः शस्त्र न घेणे पण फुटीरता आणि पाकची तळी उचलणार्‍यांचा प्रश्न रहातो. माझ्या व्यक्तिगत मते या मंडळींना ब्रिटीश डोईजड भारतीय राजांना तनखे देऊन दुसर्‍या प्रदेशात नेऊन ठेवत तसे या फुतीरांना तनखे देऊन गप्प बसण्याच्या अटीवर दुसर्‍या प्रदेशात हाऊस अरेस्ट्मध्ये ठेवावे आणि जसा त्यांचा स्थानिक जनतेशी संपर्क सुटेल तसे हे फुटीर जनतेच्या विस्मरणात जातील.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Aug 2019 - 9:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काश्मिरी जनता सध्या विचित्र कोंडीत सापडली आहे. आपलं आयडेंटेटी जपण्यासाठी त्यांना कलम हटवायला नको असं वाटत होतं. फुटीरवाद्यांना आता आजाद काश्मिरची हाक देण्यावाचून पर्याय नाही असे दिसते. काश्मिर मधे बाहेरचे उद्योग येऊन आपल्याला आपलं काय राहील ही त्यांना भिती वाटते. आम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं ही काश्मिरीची मागणी म्हणजे कायची काय मागणी आहे. गेली काही दशके तेथील वातावरण सतत हिंसाचारांनी वेढलेले असतांना त्यांच्याकडून काही अपेक्शा करणे मुर्खपणाचे होते.

जम्मू काश्मिर या नेटवरील या भडकावू चॅनल आणि बीबीसी या वातावरण खराब करणार्‍या वृत्त वाहिन्या फूलटू वातावरण खराब करीत आहेत. मला वाटतं सरकारने आणि भारतीय जनतेने काश्मिरी जनतेमधे एक विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. वातावरण कुलुषित करणार्‍यांना थेट देशविघातक कृत्य केले म्हणुन चार सहा महिने जेलात पाठवावे असे वाटते.

ता.क. : भारतीयांनी भडकावू फेसबूकपानावर योग्य काय हे समजून सांगण्यासाठी लॉगीन न करता आपापल्या जवाबदारीवर प्रयत्न करावेत असे वाटते.

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

12 Aug 2019 - 12:16 pm | माहितगार

काश्मिरी मुळ ओळख पंडिती आणि फारतर सुफी म्हणता येईल. धर्मांतरे झाल्यानम्तरही तेथिल काश्मिरी सुफी संप्रदायाने भक्ती हा मुख्य ढाचा कायम ठेवला असण्यात नवल नव्हते. ३७०चा उपयोगकरून त्यांची नसलेली उर्दुभाषा लिपी लादणे, तसेच मुलतत्ववादी आणि दहशतवादीच गैरकाश्मिरी वहाबी ओळख काश्मिरवर लादण्याचा प्रयत्न करत आहेत.

मोदी भाजपाच्या इतर ज्या चुका असतील त्या असतील पण मोदी ०.१ सरकारने भारतात वैश्विक सुफी आधीवेशन भरवले जाण्यात पुढाकार घेतला याचा सोईस्कर विसर पाडला जातो. अगदी शहांच्या भाषणात काश्मिरची सुफी ओळख फुटीरतावाद्यांकडून का पुसली जात आहे हा प्रश्न विचारला गेला .

तसेही ३७० अप्रत्यक्षपणे धार्मिक ओळखीसाठी वापरले जात असेल तर सत्ता आणि धर्म यांची सांगड घालणारी व्यवस्था काश्मिरात असो पाकीस्तानात असो वा व्हॅटीकन मध्ये असो ती जावयास हवी अशी स्पष्ट भूमिका प्रत्येक भारतीयाने आंतरराष्ट्रीय मंचावर तसेच सोशल मिडिया वर आवर्जुन मांडावयास हवी.

सत्ता आणि धर्म यांचे दुषित हितसंबंध जपणारे हितसंबंध देशी आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी का जपावेत ? हा प्रश्न एकतर्फी केवळ भाजपाला विचारता येत नाही तो दुषित हितसंबंधातून वातावरण बिघडवणार्‍या काश्मिरी फुतीरता वाद्यांना ते पाकीस्तानी ते आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वच माध्यमांना विचारावयास हवा.

भारतात सत्तेत असलेल्या सरकारला अगदी धर्म आणि सत्तेची सांगड घालणार्‍या सरकाराम्शी नाईलाजाने संबंध चालू ठेवावे लागतात पण भारतीय सर्वसामान्य नागरीकांना आणि विरोधीपक्ष नेत्यांना हा मार्ग उपलब्ध असतो तो आंतरराष्ट्रीय जनमत पाकीस्तानचे धर्माधारीत राष्ट्र असण्या विरुद्ध बनवणे गरजेचे आहे तसे न केल्यामुळेच पाकीस्तान तालिबान ला हवा देऊन पश्चिमेचे आमेरीकेचेही नुकसान करून देतोय हे पश्चिमी माध्यामांपुढे अधोरेखीत करण्यात भारतीय दुर्दैवाने कमी पडतात असे वाटते.

दुसरे केंद्रशासीत प्रदेश करून भारत सरकार सैन्यदल कमी वापरून पोलीस दलांकडून सुरक्षा व्यवस्था अधिक नियंत्रीत करेल आणि पोलीसदलांच्या कार्यपद्धती सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेत अधिक सहजतेने येतात आणि वस्तुतः मानवाधिकारांची जपणूक होण्याच्या संधी तसेच समान संधी वाढतात हे ऊपयुक्त ठरेल हे ही अधोरेखीत केलेजाणे गरजेचे असावे असे वाटते.

यशोधरा's picture

9 Aug 2019 - 9:00 pm | यशोधरा

श्रीनगर मध्ये पिढीजात घर असलेल्या काश्मिरी व्यक्तीकडून कालचा वृत्तांत -

Just got back from Srinagar and I had gone there yesterday.

First thing i would like to mention that Tata Sky is working there so people are watching the News and getting Newspapers as well. So they know whats going on.

My flight was full as it flew into Srinagar. Tickets are dirt cheap. Got out of the Airport fully prepared to walk some of the kms to get Home. And surprisingly the Pre Paid Taxis were working. usually I pay 600 Rs for an Innova to take me home. yesterday I paid Rs.700 only. Wasnt stopped anywhere on the way though we passed through Hyderpora where you know who stays.And no issues going at the way to TRC via Jawahar Nagar and Raj Bagh.

Reached home and surprised my Parents and some relatives and friends. Sat in the Garden sipping Coffee and enjoying the Weather. They were not too happy to see me as they really love their Home and life in Kashmir. We have our own Eco-System in place in Srinagar which would be hard for outsiders to understand. Contrary to the popular belief we live in "Zero" fear in Kashmir. This time is no different.

Anyways we managed to even buy some Chicken from the neighborhood and we had a good Birthday Dinner and I woke up today for my first Birthday in my Hometown after many years. And yesterday some of us even tried to go to the Dal Lake but were turned back by the Security Forces.

I roamed around a bit in the morning in my Mohalla getting people's opinion and then we left around 2 for the Airport and we were dropped back by Ikki and we were stopped only at one place and they let us go once we showed them our Tickets.

Got to the Airport without any issues and I also witnessed Ghulam Nabi Azad landing and not allowed into the city.And now I am back in Gurugram.

So all in all I wish the Restrictions go soon and some kind of Peace returns to the Valley.

PS : Please feel free to share.

- Kiki Mathwan

नाखु's picture

9 Aug 2019 - 10:54 pm | नाखु

तरीही आम्ही उघडा डोळे आणि झिंगा नीट हेच बघणार

धर्मराजमुटके's picture

12 Aug 2019 - 11:49 am | धर्मराजमुटके

लोकसत्ता, इंडीयन एक्सप्रेस आणि जनसत्ता ही एकाच समुहाची वृत्तपत्रे आहेत. गेले काही दिवस बघतोय की जनसत्ता मधे काश्मीर मधे अशांतता आहे अशा बातम्या सतत येत आहेत. इतर सगळ्या पत्रांत चांगल्या बातम्या देत असताना नेमके हेच का अशा बातम्या देतात समजत नाहीये.

धर्मराजमुटके's picture

13 Aug 2019 - 12:04 am | धर्मराजमुटके
Sanjay Uwach's picture

12 Aug 2019 - 12:17 pm | Sanjay Uwach
योगेश कोकरे's picture

12 Aug 2019 - 7:26 pm | योगेश कोकरे
याना काश्मिर हवाय्,काश्मिरि नकोयत....३७० रद्द करायचि पद्धत चुकिचि वाटली.तिथल्या लोकाना विश्वासात न घेता तिथलि विधानसभा अस्तित्वत नसताना त्यान्च्या राज्याबद्दल घेतलेला निर्णय म्हनजे फक्त बहुमत आहे म्हनुन केलेला रडीचा डाव आहे.
डँबिस००७'s picture

12 Aug 2019 - 9:17 pm | डँबिस००७

याना काश्मिर हवाय्,काश्मिरि नकोयत

यांना काश्मिर हवाय मग गेले ७० वर्षे काँग्रेसवाले काय करत होते ?
काही माहिती आहे का उगाच उचलली जीभ लावली ..............

का श्मिरची जन संख्या आहे भारताच्या जन संख्येच्या १%, आणी ह्यांना भारताच्या बजेट मधुन जातात तब्बल १०%. उत्तर प्रदेशची जन संख्या आहे भारता च्या १०% आणी त्या राज्याला बजेट मधुन मिळतात फक्त ८.५%
ईतके वर्षे खाउन माजलेले त्यावेळेला नै आठवल ?
तिथल्या लोकाना विश्वासात न घेता म्हणजे कोणाला विश्बासात घ्यायच म्हणे ? तिथल्या नेत्यांना ? ज्यानी म्हंटल होत की ३७० ला हात लावुन दाखवा रक्ताचे पाट वहातील, भारताच्या तिरंग्याला खांदा द्यायला कोणी नसेल काश्मिर मध्ये !! हे तेच नेते ज्यांची पाकिस्तानच्या अति रेक्या बरोबर उठबैस होत असते.

अब्यासा वाढवा,

याना काश्मिर हवाय्...

'भारत एकसंघ हवाय कोणत्याही तडजोडीं शिवाय'

('कोणत्याही तडजोडीं शिवाय' हे महत्वचे)

धर्मराजमुटके's picture

12 Aug 2019 - 10:48 pm | धर्मराजमुटके
Rajesh188's picture

13 Aug 2019 - 11:42 am | Rajesh188

गेली 70 वर्ष काश्मीर च वेगळे पण जपण्यासाठी कायदेशीर संरक्षण काश्मीर ल दिले होते .
बाकी राज्यांपेक्षा जास्त पैसे सुद्धा केंद्र सरकार काश्मीर वर खर्च करत होते .
तरी सुद्धा तिथे रोज हिंसाचाराच्या घटना घडत होत्या .
त्या पाठीमागे देशद्रोही विचार हेच कारण असलं पाहिजे .
370 रद्द केल्यामुळे काश्मिरी धोक्यात येईल हे कारण तितकसं पटत नाही .
रोजगारी साठी लोक देशभर स्थलांतर करत आहेत .
मुंबई मध्ये मराठी संस्कृती धोक्यात आली आहे .
बंगलोर मध्ये कानडी संस्कृती धोक्यात आली आहे देशातील सर्व महानगरात स्थानिक संस्कृती धोक्यात आली आहे म्हणून काय ह्या सर्व स्थानिक लोकांनी देशा विरूद्ध युद्ध पुकारले नाही किंवा शस्त्र हाती घेवून हिंसाचार घडवला नाही .
किरकोळ हाणामारीच्या गोष्टी घडल्या असतील .
आणि परकीय शक्तीची मदत सुद्धा घेतली नाही .
मग काश्मिरी लोकांनी हिंसाचाराचा मार्ग का स्वीकारला