मनोरुग्नाचा विषय

शिवाजी पाटील's picture
शिवाजी पाटील in जनातलं, मनातलं
8 Aug 2019 - 8:00 pm

मनोरुग्न होतांनां येणारी शारीरीक व मानसीक दुर्बलता नमस्कार,
मी, शिवाजी पाटील सद्या मनोविकार/डिप्रेशन/मानसीक पिडा या विषयावर माझे स्वत:हाचेच अनुभव व्यक्त करीत आहे कारण हे मला अतिआवश्यक वाटतात माझे वय27 आहे मी जिल्हा जळगाव,महाराष्ट्र येथील रहीवासी गेल्या 1 वर्षा पासुन मी मनोरुग्नच होतो.मी पदविचे शिक्षण घेत स्पर्धापरिक्षा देत होतो पदवीनंतरही अभ्यास चालु होता वारंवार होणार्या परिक्षा खर्च,अपयश खंबीर मनाने सामना करीत होतो.4ते5 वर्ष त्याच परिरीस्थीतीत कारण मी शेती ही करतो आर्थीक अडचन नेेहमीच भासत होती,मुंबईत रु12,000महीन्याची एक कंत्रीटी नौकरी भेटली 1वर्ष काम केले दुसर्या वर्षी सेवा समाप्त केली गेली पुन्हा घरी परतलो खेड्याचा असल्यामुळे मित्र,सभोवतालीन लोक नेहमीच माझ्या संदर्भात विचारत प्रत्येकास नेहमीच त्याच विषयावर उत्तर देणे कठीण स्वभाव शांत असतल्याने कुणाशी जास्त न बोलणे आपल्याच कामात व्यस्त राहने टिका,टिंगलटवाळी तर होतच होती तेही कारण नसतांना मनात खुप वाईट वाटे कारण या अगोदर ईतक्या मोठ्या प्रमाणात वाटेल तसे वागणारे टोचुन बोलणारे माझ्या आयुष्यात तरी नव्हते कारण मी लहानपणापासुन प्रेमाणेच वागत कुणाचे भांडण,टिंगल,फसवणुक जमत नसे परंतु माझ्या सोबत असे घडायला लागले मग मी एकांतात राहनेच पसंत केले न बोलता माझ्याच कामात अभ्यासात व्यस्त 4ते 6तास अभ्यास रात्री12पर्यंत मोबाईल वर अभ्यास मात्र काही 2त4महीने खुप डिप्रेशन मध्ये आलो सकाळपासुनच कमी पाणी पिने जेवन करुनही अल्प प्रमाणात पाणी पिणे जेवण तर वेळेवर होत याचाच डिप्रेशन सोबत कमी पाणी पिने मग भुक मंद झाली ,विसरभोळा होण्यास सुरवात झाली ती तर खुप मोठ्या प्रमाणावर उद्याचे,आजचे नाही तर चालु सांगीतलेली गोष्ट ही लक्षात राहत नसे मग मी हळुहळु पुर्णतहा गोंधळायला लागलो,समोरचा व्यक्ती आपल्याशी काय बोलत आहे हे सुद्धा कळायला उशीर होत किंवा समज नसे,मग लोकांचे बोलणे व स्वत:हाची होत असलेल्या शारीरीक परिस्थीती बिघडत गेली योग्य पचन न होणे,रात्री झोपच उडायला लागली,मग डोके दुखायला सुरुवात झाली,कधी कुठे तर कधी कुठे डोके खुपच मोठ्या प्रमाणात दुखायला लागले व विस्मरण ही खुप स्वत:हाच्याच विचारात मग्न न विचार करताही मनात दिवसरात्र विचारांचे मोठे वादळ मनाचा पुस्तक वाचल्यास पुस्तकातील लिहीलेल्या ओळीही चुकीच्या तर कधी बरोबर लीहील्या वाटे वाचल्यावरही शब्दही लक्षात न राहने ,मगील माझा झालेला अभ्यासही मी पुर्ण विसरलो तो ही लक्षात येत नसे डोके दुखीच्या बाबतीत असे वाटे जणु ब्रेनट्युमर किवा गाठी वाटे काहीही विचीत्र वाटे,मनात वाईट चांगले असंख्य विचार चाले आपण नेमके काय करतो आहे हे ही कळत नव्हते मग उपाय मनोचीकस्सक कडे गेलो 1 महीना गोळ्या घेतल्यावर बुद्धी शुद्धीवर तसेच या गोळ्या बरे वाटत असल्यास माझ्या मते वारंवार घेऊ नयेत कारण या गोळ्या वर्षानुवर्षे घेतांना व्यक्ती मी पाहीले आहेत व बघतोय मि मग दुधात काजु व बदाम रात्री भिजऊन सकाळी व्यायाम केल्यावर सेवन केले,विचारांनपासुन दुरहोण्मायासाठी माझ्या आवडीच्या ठिकाणी काही दिवस स्थलांतरीत झालो,मेंदुतील काही निवडक रसायनांनवर आपल्या राहनीमानाचा,विचारांचा,खानपानाचा व अनेक चांगल्सया वाईट वयींचा खुप जवळचा संबंध असतो ते वेळेवर दुरुस्त केलेले कधीही चांगले माझ्या आयुष्यात हे क्षण मी कधीही विसरु शकत नाही आपल्याला जे सांगीतले ते तंतोतंत सत्य आहे

आरोग्यअनुभव

प्रतिक्रिया

मेंदुतील काही निवडक रसायनांनवर आपल्या राहनीमानाचा,विचारांचा,खानपानाचा व अनेक चांगल्सया वाईट वयींचा खुप जवळचा संबंध असतो ते वेळेवर दुरुस्त केलेले कधीही चांगले

तुम्ही गांजा किंवा तत्सम मादक द्रव्यांचे सेवन करत होतात का? जर पूर्वी करत असाल तर ही लक्षणे खूप कॉमन आहेत!

तमराज किल्विष's picture

8 Aug 2019 - 9:27 pm | तमराज किल्विष

अहो होतकरू माणूस गांजा कशाला ओढेल? शिवाजी भाऊ स्पर्धा परिक्षेत यश आलेच पाहिजे हे फार मोठे आव्हान तुम्ही ओझ्यासारखे मनावर ठेवले. आणि "जर एवढा अभ्यास करून सुध्दा यश मिळाले नाही तर? " या नकारात्मक विचारानेच सगळी दुर्दशा केली. एकतर तुम्ही अतिसंवेदनशील माणूस असाल त्यामुळे लोकांच्या बोलण्याला महत्त्व दिले.
तुम्हाला पुर्ण बरं आणि आनंदी व्हायचं असेल तर गोंदवलेकर महाराजांचे चरित्र, प्रवचने वाचा.

परंतु स्मृती संबंधी प्रश्न निर्माण झाले तर आत्मविश्वासावर त्याचा गंभीर परिणाम होतोच होतो. आणि हे होणे तसेही डिप्रेशनची फार पुढील स्टेज अधोरेखित करते.

विशेषतः अचानक आजूबाजूला जे काही चालू आहे त्याची संगती लागणे अवघड झाले तर परिस्थिती अतिशय बिकट होते.

आपण अशा अवस्थेतून गेलात आणि त्यातून सावरतही आहात ही कौतुकास्पद आणि प्रेरणादायीच बाब आहे. (औषधे सोडून) विसरभोळेपणा कमी व्हावा/नाहीसा व्हावा म्हणून आपण काही विशेष मेहनत घेतली आहे का? असल्यास जरूर शेअर करा.

मिसळपाववर विविध परिस्थितीतील विविध लोकं अतिशय मोकळेपणाने व्यक्त होताना बघुन चांगलेही वाटते.

माझ्या आयुष्यात हे क्षण मी कधीही विसरु शकत नाही आपल्याला जे सांगीतले ते तंतोतंत सत्य आहे

खरं तर नेमकं हेच विसरता आले तर जास्त बरे होईल नाही का ? :)

असो, आपली पोस्ट वाचून आंनद वाटला.

तमराज किल्विष's picture

9 Aug 2019 - 5:45 am | तमराज किल्विष

माझ्या आयुष्यात हे क्षण मी कधीही विसरु शकत नाही आपल्याला जे सांगीतले ते तंतोतंत सत्य आहे
> > जॉन भाऊ ते लक्षात राहिले म्हणजे परत त्याची पुनरावृत्ती होणार नाही. लेखकाने या सगळ्यातून मार्ग काढला असल्याने चुका टाळून योग्य मार्ग कोणता हे त्याला लक्षात आले आहे.

प्रमोद देर्देकर's picture

9 Aug 2019 - 10:21 am | प्रमोद देर्देकर

खूप छान मोकळं लिहलंत बरं केलंत.
तुमचे मिपावर स्वागत .
आता आणखी वेगवेगळ्या विषयावर लेख येवू द्या . कविता येवु द्या.
गणपती लेखन स्पर्धेत भाग घ्या.

पुढील वाटचालीस शुभेच्छा .

लोकेश तमगीरे's picture

9 Aug 2019 - 10:41 am | लोकेश तमगीरे

खरे पाहता मानसिक त्रास यावर मोकळेपणाने आपण बोलणे ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल तुमचे खूप अभिनंदन.
जवळच्या व्यक्तीशी मोकळेपणाने बोलत रहा. अव्यक्त भावना व्यक्त केल्या की तुम्हाला निश्चितच बरं वाटत राहील.
आवडीच्या गोष्टी करत रहा. सायकॅट्रिस्ट आणि सायकॉलॉजिस्ट यांची मदत घेत रहा.
मिपा वर लिहत रहा.
पुलेशु !

राजाभाउ's picture

9 Aug 2019 - 5:07 pm | राजाभाउ

+१ असेच म्हणतो

धर्मराजमुटके's picture

9 Aug 2019 - 6:36 pm | धर्मराजमुटके

तुम्ही फार तळमळीने लिहिले आहे आणि हा थट्टा करायचा विषय नाहीये पण तुम्ही मनोरुग्ण होता म्हणजे नक्की काय होते हे लेख वाचून कळाले नाही. तुम्ही डिप्रेशनचे परिणाम सांगीतले. मुळात नक्की काय झाले होते ते लिहाल काय प्लीज ?

क्ती वर खुप जास्त परिणाम होतो,सारखे वारंवार डोके खुपच दुखत राहते,सारखे कुणी आपल्याशी संवाद साधत आहे बोलत आहे असा वाटते,व एकण्यासही येते परंतु समजत नाही,वारंवार थुंकने,कुणीतरी आपल्याशी भांडण करत आहे असे वाटणे,कधी कधी मनुष्य पुर्ण चीडतो,वेडया सारखाही वागु लागतो व परंतु त्याचे कधी कधी स्वत:हाच्या विचारांवर,क्रुत्यावर स्वत:हाचेच नियंत्रण नसते,भान नसतो,व अशी क्रुत्ये घडतात मी तर शुध्दीवर येताच कुण्या जादुटोणा केला कि काय असे वाटुन मी ही टोणे टोटके करायला लागायचो फार विचीत्र परिस्थीती घडली होती. धन्यवाद!