चालू घडामोडी : जूलै २०१९

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in काथ्याकूट
3 Jul 2019 - 9:35 pm
गाभा: 

१. भारतात शाकाहारी भोजनालये आपल्या नावामागे / पुढे वेगवेगळ्या पदव्या लावतात.
उदा. प्युअर व्हेज / शुद्ध शाकाहारी / वैष्णव रसोई इ. इ. जसजसे दक्षिणेकडे जावे तसतसे ही पदवी हाय क्लास / हाय क्वालिटी व्हेज अशी बदलत जाते. एका ठिकाणी तर चक्क प्युअर व्हेज आणि नॉनव्हेज अशीही पाटी बघीतल्याचे आढळते.
अशाच एका हाय क्वालिटी भोजनालयाची अखेर होणार काय ?

बातमी : अर्श से फर्श तक: भारत के 'डोसा किंग' के पतन की कहानी

२. अमेरीकेतील संभाव्य मंदीच्या बात म्यांनंतर सोने हा परत गुंतवणू कीचा फायदेशीर पर्याय बनणार का ?

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jul 2019 - 10:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही दिलेल्या बातमीतील डोसा किंगवर झालेल्या कायदेशीर कारवाईचा त्याच्या रेस्तराँमधील अन्नाशी (अन्नाची प्रत, स्वच्छता, इ) काहीच संबंध नाही... तो त्याच्या इतर बेकायदेशीर कारवायांमुळे कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे.

धर्मराजमुटके's picture

3 Jul 2019 - 10:15 pm | धर्मराजमुटके

पण आपल्याकडे बरेचसे उद्योगधंदे एकखांबी तंबू असतात. संस्थापक / मालक नसल्यामुळे पुढील भविष्य कसे असेल असे मला म्हणायचे आहे. अर्थात मुले धंदा पुढे नेतीलच पण तरी पण एक उत्सुकता आहे. किंवा या नकारात्मक प्रसिद्धीचा काही तोटा होईल किंवा कसे ??

चौथा कोनाडा's picture

3 Jul 2019 - 10:29 pm | चौथा कोनाडा

मी आता काँग्रेसचा अध्यक्ष नाही, आधीच राजीनामा दिला आहे – राहुल गांधी

मी आता काँग्रेस अध्यक्षपदावर नसून पक्षाच्या कार्यकारी समितीने तातडीने बैठक बोलवून नव्या अध्यक्षाची निवड करावी असे राहुल गांधी यांनी बुधवारी स्पष्ट केले. मी आधीच राजीनामा दिला असून कार्यकारी समितीने नव्या अध्यक्षाची निवड करावी असे राहुल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आता काय होइल पुढे ?

अर्धवटराव's picture

4 Jul 2019 - 12:27 am | अर्धवटराव

(कदाचीत) काँग्रेसचं भलं होईल.

NiluMP's picture

4 Jul 2019 - 2:52 am | NiluMP

:-)

कंजूस's picture

4 Jul 2019 - 3:32 am | कंजूस

आर्थिक युद्ध.
कोणत्या देशाने कोणत्या देशाकडून काय विकत घ्यायचं किंवा नाही. १)दमबाजी, २)लादणे, ३)अडवणे, ४)मनाई.

शून्यातून जे विश्व निर्माण करतात ते सर्व परिस्थिती मधून आलेले असतात .
परिस्थिती प्रतिकूल असली तरी त्यांचं मनोधैर्य बिलकुल खचत नाही .
पण त्यांच्या मुलांना सर्व आयते मिळालेलं असतं त्यामुळे त्यांनी संघर्ष केलेला नसतो .
समोर थोडे जरी संकट आले तरी ते सैरभैर होतात .
बऱ्याच उद्योग समूहाच्या वारसा न ची हीच अवस्था .
कोटुंबिक भांडणात नेस्तनाबूत होतात किंवा संकटात

रमेश आठवले's picture

4 Jul 2019 - 11:07 am | रमेश आठवले

राजस्तानात जवळ जवळ सर्व शाकाहारी हॉटेलांवर अमुक पवित्र भोजनालय अशी पाटी असते.

३० जुनला दिल्लीतील चांदनी चौकमधल्या दुर्गा मंदिराच्या परिसरात स्कूटी पार्किंग , दारु पिणे व तिथला घरांच्या जवळ
लघुशंका करण्यार्याला हटकले म्हणुन त्या परिसरात रहाणार्या हिंदु माणसाची ह्या दोन मुस्लिम मुलांशी बाचाबाची झाली. हे झाल संध्याकाळी ते दोघे ३०० - ३५० मुस्लिम लोकांचा जमाव घेऊन " नारा ए तदबीर" , "अल्ला हु अकबर" अश्या घोषणा देत त्या परिसरात रात्री १२ च्या सुमारास दाखल झाले. ह्या वेळेचा फायदा घेत ह्या जमावाने १०० वेर्षापेक्षा जुन्या दुर्गा मंदिरावर हल्ला चढवला व सर्व
मुर्तींची तोडफोड केली. पोलिसांनी मग येउन शांतता प्रस्थापित केली.

३ जुलैला एनडी टीव्हीच्या रविश कुमारला अचानक जाग आली आणि प्राईम टाईम मध्ये त्याने ही बातमी सांगीतली. म्हणे काही
अराजक तत्वांनी मंदिराची मामुली तोडफोड केली. कटाक्षाने मुसलमान हा शब्द टाळला ! १०० वेर्षापेक्षा जुन्या दुर्गा मंदिरावर हल्ला चढवला व त्याची अपरिमीत हानी केली वैगेरे महत्वाची माहिती दिलीच नाही.

नरेंद्र मोदीनी महात्मा न बनता मोदीच राहावे. काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादात मुसलमानांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करू नये. ठोस निर्णय हेरून लवकरात लवकर राम मंदिर आणि काश्मीरचा प्रश्न निकालात काढावा

अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारमन पहिल्या महिला अर्थमंत्री.

देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री होण्याचा मान १९७०-७१ मध्ये इंदिरा गांधी यांच्याकडे गेला असला, तरी अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरणार आहेत. कारण इंदिरा गांधी पूर्णवेळ अर्थमंत्री नव्हत्या. १९७०-७१मध्ये इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना अर्थ खातं त्यांच्याकडे ठेवलं होतं. मात्र सीतारामन या खऱ्या अर्थाने पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत.

न्यू स्पेस इंडिया लिमिटेड नावाच्या शासकीय आस्थापनेची स्थापना.

अमोल निकस's picture

6 Jul 2019 - 9:55 pm | अमोल निकस

न्यू स्पेस इंडिया लिमिटेड नावाच्या शासकीय आस्थापनेचा फायदा काय ? ?

पृथ्वी व्यतिरिक्त दुसऱ्या ग्रहावर जाणे हे तंत्र सर्व देशांना माहीत आहे.
खूप वर्षा पूर्वी माणूस चंद्रा वर जावून आलंय .
इस्रो ला ह्याच्या पुढचे तंत्र शिक्षण ghave लागेल .
आपण विकसित देशांच्या १०० वर्ष पाठी आहे हे सत्य कधीच नाकारू नये..
ती आत्मप्रौढी आहे फक्त मनाला समाधान देईल

गामा पैलवान's picture

7 Jul 2019 - 12:31 am | गामा पैलवान

Rajesh188,

माझ्या मते आपण १०० वर्षं वगैरे पाठीबिठी आजिबात नाही. इस्रोच्या वयाच्या मानाने यशदर बराच जास्त आहे.

आ.न.,
-गा.पै.

वामन देशमुख's picture

7 Jul 2019 - 11:45 am | वामन देशमुख

.>>> पृथ्वी व्यतिरिक्त दुसऱ्या ग्रहावर जाणे हे तंत्र सर्व देशांना माहीत आहे.

- सुदान आणि येमेनला सुद्धा माहित आहे का?

>>> आपण विकसित देशांच्या १०० वर्ष पाठी आहे हे सत्य कधीच नाकारू नये...

- इथे "आपण" म्हणजे भारतीय / इस्रो असं तुम्हाला म्हणायचंय असं मी समजतो. तसा असेल तर तुमच्या मते जे कोणते विकसित देश आहेत त्या देशांनी १९१८ साली, (इस्रोपेक्षा १०० शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१८ साली, नाही का?) एकाच वेळी १०० उपग्रह आकाशात पदार्पित केले होते का?

>>> ती आत्मप्रौढी आहे फक्त मनाला समाधान देईल.

कमालीच्या घातक न्यूनगंडापेक्षा आत्मप्रौढी कितीतरी चांगली, नाही का?

मतमतांतरांचा आदर आहेच, पण म्हणून आपण तथ्यांपासून ढळू नये, नाही का?

Vovager सूर्य माला सोडून पुढच्या प्रवासाला गेले सुद्धा .
आणि त्यांनी जी माहिती पाठवली आहे ती एडिट करून जगाला दिली जाते आहे आणि आपण अजुन चंद्र आणि मंगला भोवतीच अडकलो आहे

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jul 2019 - 12:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

अवकाश संशोधनामागचा खरा उद्येश काय आहे, हे तुम्हाला खरेच माहीत आहे का ???!!! :)

Rajesh188's picture

7 Jul 2019 - 11:46 pm | Rajesh188

अवकाश संशोधन जे आता पर्यंत झाले आहे त्याची काही percent ch माहिती सामान्य लोकांशी शेअर केली जाते .
पृथ्वी वरील लोकांचे आयुष्य सुखी होण्यासाठी अवकाश संशोधनाचा काडीचा उपयोग नाही .
पृथ्वी च्या कक्षेत फिरून पृथ्वी वर लक्ष ठेवणारे उपग्रह फक्त radio tv,mobile aani lashkari halchali var लक्ष ठेवणे ह्यातच सफल आहे (ते पण जमत नाही .म्हणून world trade center var halla होवू शकला ,,)
पृथ्वी वर होणारी एक सुधा नैसर्गिक आपत्तीचा
पूर्व सूचना ह्या आधुनिक यंत्रणेला देता आली नाही .
विश्वाची उत्पत्ती शोधणे असे काही तरी मोठ्या गोष्टी केल्या जातात .
पण रिअल मध्ये पृथ्वी वर घडणाऱ्या किती गोष्टी का घडतात ह्या प्रश्नाचे उत्तर अजुन तरी अनुत्तरीत आहे

प्रसाद_१९८२'s picture

8 Jul 2019 - 10:27 am | प्रसाद_१९८२

पृथ्वी वर होणारी एक सुधा नैसर्गिक आपत्तीचा
पूर्व सूचना ह्या आधुनिक यंत्रणेला देता आली नाही .

--

तुम्हाला या विषयावर भरपूर अभ्यास करण्याची खूप गरज आहे.

जगाचे सोडा, दोन एक महिन्यापूर्वी भारतातील पूर्व किनार्‍याला धडक देणार्‍या (नाव आठवत नाही) वादळाची पूर्व सूचना मिळाल्यानेच अनेक लोकांचे वेळीच स्थलांतरण करुन त्यांचे प्राण वाचवण्यात यश आले होते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Jul 2019 - 2:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमचे बहुतेक प्रतिसाद, त्या विषयाचा अभ्यास न करता लिहिलेले व "मला असे वाटते म्हणून तेच्च वैश्विक सत्य आहे" अश्या प्रकारचे असतात. सद्याचे, अवकाश संशोधन आणि अवकाशप्रवास यासंबंधीचे, प्रतिसादही त्याला अपवाद नाहीत. अभ्यास वाढवायची गरज आहे, यात वाद नाही.

आता तुमच्या माहीतीकरिता, चंद्रावर माणूस पाठवल्यामुळे, तुमच्या कल्पनेपेक्षा खूप जास्त फायदे मानवजातीला झालेले आहेत. त्यापैकी, काही मोठे महत्वाचे फायदे असे आहेत...

1. CAT scanner: this cancer-detecting technology was first used to find imperfections in space components. याचा वैद्यकशास्त्रातला उपयोग सर्वसामान्य माणसांनाही माहीत आहेच.

2. Computer microchip: modern microchips descend from integrated circuits used in the Apollo Guidance Computer. उत्तमोत्तम संगणक बनविण्यास याचा किती उपयोग आहे, हे सांगायलाच हवे काय?

3. Cordless tools: power drills and vacuum cleaners use technology designed to drill for moon samples. तुमचा मोबाईल आणि टीव्ही/एसीचा रिमोट हे यापैकी एक फारच खालच्या स्तरावरचे साधन आहे.

4. Ear thermometer: a camera-like lens that detects infrared energy we feel as heat was originally used to monitor the birth of stars. याचा वैद्यकशास्त्रात उपयोग होतो, हेवेसांन.

5. Freeze-dried food: this reduces food weight and increases shelf life without sacrificing nutritional value. याची अनेक उदाहरणे तुमच्या जवळच्या सुपरमार्केटमध्येच नव्हे तर कोपर्‍यावरच्या दुकानातही दिसतील.

6. Insulation: home insulation uses reflective material that protects spacecraft from radiation. हे वरून दिसत असले नसले तरी त्याचा अनेक घरांच्या बांधणीत उपयोग होतो.

7. Invisible braces: teeth-straightening is less embarrassing thanks to transparent ceramic brace brackets made from spacecraft materials. याचा वैद्यकशास्त्रात उपयोग होतो, हेवेसांन.

8. Joystick: this computer gaming device was first used on the Apollo Lunar Rover. याचा केवळ खेळण्यांतच नाही तर लढाऊ विमानांतही उपयोग केला जातो.

9. Memory foam: created for aircraft seats to soften landing, this foam, which returns to its original shape, is found in mattresses and shock absorbing helmets. हे विमान-चारचाकीच्या बैठका, दिवाणखान्यातल्या बैठकांपासून ते अगदी झोपायच्या खोलीतल्या गाद्यांपर्यंत वापर होणारे तंत्रज्ञान आहे.

10. Satellite television: technology used to fix errors in spacecraft signals helps reduce scrambled pictures and sound in satellite television signals. गावागावात पोचणारा टीव्ही याचमुळे, हेवेसांन.

11. Scratch resistant lenses: astronaut helmet visor coating makes our spectacles ten times more scratch resistant. अत्यंत उच्च तंत्राच्या उपकरणांपासून ते नेहमीच्या वापराच्या चष्म्यांपर्यंत हे तंत्रज्ञान वापरले जाते.

12. Shoe insoles: athletic shoe companies adapted space boot designs to lessen impact by adding spring and ventilation. खेळाडूंसाठी आणि विशेषतः फ्लॅटफूट नावाच्या आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी या गोष्टीचे किती मोल आहे हेवेसांन.

13. Smoke detector: Nasa invented the first adjustable smoke detector with sensitivity levels to prevent false alarms. सर्वसामान्य घरातील आणि सार्वजनिक जागांमध्ये याचा वापर केलेल्या उपकरणांनी जगभरात किती जीवहानी आणि संसाधनहानी वाचवली आहे याची मोजदाद करणे कठीण आहे.

14. Swimsuit: Nasa used the same principles that reduce drag in space to help create the world’s fastest swimsuit for Speedo, rejected by some professionals for giving an unfair advantage. स्वस्पष्टीकरणात्मक !

15. Water filter: domestic versions borrow a technique Nasa pioneered to kill bacteria in water taken into space. हे तंत्रज्ञान, ऑफिस-रेस्तराँ-घर यांच्यामध्ये आजकाल जवळजवळ अनिवार्य झाले आहे आणि आरोग्याची २४ X ७ काळजी घेत आहे, हेवेसांन.

खास भारताबद्दल बोलायचे झाले तर, वरच्यांमध्ये खालील फायदे मिळवा...

१. गावागावात पोचलेली मोबाईल क्रांती आणि तिचे फायदे

२. गावागावात पोचलेला टीव्ही आणि त्याचे फायदे

३. देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी मिळणारी उपग्रहांची मदत : यात संरक्षक (शत्रूवर नजर ठेवणे) आणि आक्रमक (हल्ला करण्यासाठी मदत) अश्या दोन्ही प्रणाली येतात. उदा: बालाकोटवर केलेल्या हल्ल्याच्या पूर्वतयारीत आणि हल्ल्यात भारतिय उपग्रहांची मदत अमुल्य होती... त्यामुळेच सर्व कारवाई भारतिय सैन्याला शून्य धोक्यासह यशस्वीपणे करता आली.

५. भारताच्या संरक्षण व्यवस्थेत दाखल झालेल्या आणि दिवसेदिवस क्षमता वाढत असलेल्या क्षेपणास्त्रांसंबंधीचे मूलभूत ज्ञान अवकाशतंत्रज्ञानातून विकसित होते, हे वेगळे सांगायला नकोच.

५. उपग्रह वापरून केलेले हवामान अंदाज किती उपयोगी असतात हे सांगायला नकोच... भारताच्या पूर्व व पश्चिम किनार्‍यावर आलेल्या वादळांमध्ये किती जीवहानी व इतर नुकसान टळले, हे माध्यमांत वाचले असेलच.

६. इस्रोने, अवकाशयानांसाठी, लहान आकाराच्या व वजनाच्या पण भरपूर वीज साठविणार्‍या बॅटर्‍यांचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. ते व्यापारी संस्थांना इलेक्ट्रिक कार आणि इतर उपयोगांसाठी लागणार्‍या बॅटर्‍या बनविण्यासाठी देण्याचे नुकतेच जाहीर झाले आहे. कदाचित तुमच्या पुढच्या वीजचारचाकीसाठी किंवा तुमच्या शहरात चालणार्‍या वीजबसमध्ये हे तंत्रज्ञान वापरले जाईल. :)

असो ही यादी मारूतीच्या शेपटीसारखी वाढत जाणारी आहे.

विस्तारभयास्तव इतकेच मोजके फायदे लिहिले आहेत. सर्व फायदे लिहू गेल्यास पुस्तक लिहावे लागेत. पण, वरील फायदे, माझा मुद्दा पूर्णपणे समजावून द्यायला पुरेसे आहेत.

सबळ माहिती अथवा अभ्यासाशिवाय बेधडक विधाने करण्याने, तुम्ही कळत-नकळत स्वतःची विश्वासार्हता गमावत आहात, हे तुमच्या नजरेस आणून द्यावेसे वाटले म्हणूनच हा प्रतिसाद दिला आहे. बाकी सगळे तुमच्यावर अवलंबून आहे.

Rajesh188's picture

8 Jul 2019 - 3:08 pm | Rajesh188

माझी पोस्ट बिलकुल योग्य नव्हती तर त्या मध्ये बऱ्याच ठिकाणी घोड चुका होत्या .
पण एकदा पोस्ट प्रदर्शित झाल्या नंतर एडिट करायची सोय नाही .
तुमचं म्हणणे योग्य आहे .
पुढे काळजी घेईन
रोखठोक पने चूक दाखवल्या बद्दल धन्यवाद

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Jul 2019 - 3:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

मनाचा मोठेपणा दाखवून चूक कबूल केल्याबद्दल आभार.

मनमोकळेपणे चूक मानणे, ही सुधारणेची आणि विकासाची पहिली पायरी असते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Jul 2019 - 3:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

मनाचा मोठेपणा दाखवून चूक कबूल केल्याबद्दल आभार.

मनमोकळेपणे चूक मानणे, ही सुधारणेची आणि विकासाची पहिली पायरी असते.

चंद्रावर सोळा सोमवार करायचे आहेत . संकष्टी होणार नाही.

तिवरे धरण फुटल्या पासून मराठी वृत वाहिन्या चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत .
रोजच कोणत्या ना कोणत्या धरणातील भिंती मधून होणारी पाण्याची गळती दाखवत नाहीत .
पण ते दाखवताना त्यांच्या कडून मोठी चूक होत आहे असं वाटत .
कारण जी गळती ते दाखवत आहेत त्याचे प्रमाण आपल्या घरात जेवढे नळाला पाणी येते तेवढच असते .
खूप मोठा पाणीसाठा धरणात असताना छोट्या प्रमाणात पाण्याची गळती होणारच पण त्या मुळे धरणाला धोका आहे असा निष्कर्ष जे टीव्ही anchor काढत आहे .
तो शास्त्रीय दृष्टी ने बघितलं तर योग्य नाही .
तर ह्यातील जाणकारांनी
धरणामधून किती प्रमाण पेक्षा जास्त पाणी गळती झाली तर तिला धोकादायक आहे हे समजल जाते ह्या विषयी मत व्यक्त करावे .

हा धागा खासकरून धाग्याचे राजकीय स्वरूप मी लक्ष्यवेध करत असलेल्या विषयाच्या दृष्टीने आजिबातच पोषक नाही. खरे म्हणजे लक्षवेधत असलेल्या विषयास वेगळ्या धागा लेख चर्चेची क्षमता आहे.

'इंग्रजी चित्रप्टातील हिंदूत्व'

मी खाली केलेल्या विवरणापेक्षा लक्ष वेधू इच्छित असलेला गार्डीयनचा लेख स्वतःच अधिक बोलका -सहज समजणारा आहे त्यामुळे सरळ त्या लेख वाचनाकडे गेल्यास अधिक उत्तम

How movies embraced Hinduism (without you even noticing)

१) इथे इंग्रजी चित्रपटातील हिंदू तत्वज्ञान, लोक यांची प्रत्यक्षता नव्हे तर इंग्रजी/पाश्चात्य चित्रपटातील त्यांनी दाखवलेल्या कल्पनात कुठे कुठे हिंदू तत्वज्ञान, संस्कृतीशी अथवा हिंदूपणाशी समकक्षता आढळते ?

२) या शीर्षकातील हिंदूत्व हा शब्द राजकीय अर्थाने नव्हे तर तत्वज्ञान आणि संस्कृती या अर्थाने हिंदूपणा आहे.

३) गार्डियनमधील लेखात म्हटल्याप्रमाणे इंग्रजी/ पाश्चात्य चित्रपट किंवा साहित्यात तुम्हाला हिंदूपणा सादृश्य समकक्षता कधी कुठेआढळल्या का ?

प्रश्न ३ वेगळा धागा लेख काढण्या योग्य आहे इच्छूकांनी अवश्य काढावा.

डँबिस००७'s picture

11 Jul 2019 - 9:10 pm | डँबिस००७

ईंदिरा जयसिंग व ग्रोव्हर यांच्या तर्फे गेले २० 'वर्षे चालवली जाणारी लॉयर्स कलेक्टिव्ह नावाची NGO ला गेल्या वर्षी सरकारने टाळं लावलेल होत . आता ह्या NGO च्या प्रमोटर विरुद्ध CBI ने तपास सुरु केलेला आहे !! ह्या NGO ने आता पर्यंत ८००० कोटी रु परदेशातुन फंड स्वरुपात आणले ! त्या रक्कमेच नक्की काय केल हे ईंदिरा जयसिंग व ग्रोव्हर ह्यांना सांगता आलेल नाही !
ईंदिरा जयसिंग व ग्रोव्हर ह्यांच्या
दिल्ली मुंबई तील सर्व ठिकाणावर एकाच वेळा धाडी टाकण्यात आलेल्या आहेत !
ईंदिरा जयसिंग सुप्रिम कोर्टात वकिल आहेत ! समलैंगिक लोकांच्या हक्काबद्दल लढा देउन सुप्रिम कोर्टातुन आपल्या बाजुने निर्णय करुन घेतला!!
ह्या गोष्टीला समजवुन घेण्यासाठी
ईंदिरा जयसिंग व ग्रोव्हर ह्यांची
पार्श्वभुमि बघावी लागेल !

ईंदिरा जयसिंग व ग्रोव्हर ह्यांच्या
लॉयर्स कलेक्टिव्ह NGO ला AIDS विरुद्ध लढण्यासाठी हजारो कोटी मिळत होते !! पण हाय भारताची AIDS मधली प्रगती फारच स्लो !! हि प्रगती वाढवण्यासाठी खास प्रयत्न करणे
लॉयर्स कलेक्टिव्ह NGO ला गरजेचे ठरले म्हणुन समलैंगिक लोकांच्या हक्का बद्दल ईतका कळवळा !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jul 2019 - 8:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

कुलभूषण जाधव यांच्यासंबंधातील खटल्यात, हेग येथिल आंतरराष्ट्रिय कोर्टाने (International Court of Justice), भारताचे सर्व दावे मानले आणि पाकिस्तानचे सर्व दावे अमान्य केले आहेत. हा आंतरराष्ट्रिय स्तरावर भारताने पाकिस्तानचा केलेला अजून एक मोठा पराभव ठरला आहे.

यामुळे आता,
(अ) पाकिस्तानच्या कांगारू लष्करी कोर्टाने दिलेल्या फाशीच्या निर्णयाला खीळ (स्टे) बसली आहे आणि
(आ) (पाकिस्तान सतत नाकारत आलेली) कुलभूषणशी संवाद साधण्याची (काऊंसलर अ‍ॅक्सेस) परवानगी भारताला मिळेल... अर्थातच, बंद खोलीत लुटुपुटीची केस चालविण्याचा पाकिस्तानचा मार्ग बंद झाला आहे.

यानंतरही, पाकिस्तानसारखे बनेल राष्ट्र सरळ सुतासारखे वागेल याची खात्री नाहीच. पण, आता त्याच्या सर्व बदमाष कारवाया जगासमोर आणून त्याच्यावर सतत दबाव राखणे भारताला सोपे होईल.

अजून लढाई संपलेली नाही पण, या केसमधली ही एक महत्वाची पायरी भारताने जिंकली आहे.

https://timesofindia.indiatimes.com/india/icj-rules-pakistan-must-review...

https://timesofindia.indiatimes.com/india/kulbhushan-jadhav-case-eight-k...

अर्थात हे एक मत पाकिस्तानी juryचे होते.

सुबोध खरे's picture

18 Jul 2019 - 12:47 pm | सुबोध खरे

पाकिस्तान आंतरराष्ट्रीय समुदायाचा कितीह दबाव आला तरीही कमांडर कुलभूषण जाधव याना कधीही सोडणार नाही हि वस्तुस्थिती आहे.

कारण हा त्या राष्ट्राच्या "प्रतिष्ठेचा" प्रश्न बनला आहे. स्वतःच्या जनतेच्या नजरेत आपली स्थिती वाईट होणे हे कोणत्याही राज्यकर्त्याला/ लष्करशहाला परवडणारे नसते.

त्यातून कुभूषण जाधव हे गुप्तहेर होते आणि ते पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाची हेरगिरी करायला आले होते आणि आपण कसे त्यांना शौर्याने आणि शिताफीने पकडले याचा डांगोरा पिटल्यावर त्यांना सोडून देणे हि राजकीय आत्महत्याच ठरेल. त्यामुळे त्यांच्यावर परत खटला चालवून त्यांना परत फाशी किंवा मरेपर्यंत जन्मठेपच दिली जाईल यात कुणालाही शंका नाही.

परंतु पाकिस्तानचा खोटेपणा जितका उघड पडेल तितके कमांडर जाधव याना फाशी देणे हे कठीण जाईल आणि तुरुंगात का होईना पण ठेवणे भाग पडेल.

कोणताही गंभीर गुन्हा न केलेले ५०० च्या वर भारतीय नागरिक पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. त्यांना ते सहज सोडत नाहीत तर अशा मोठ्या खटल्यातील आरोपीला सोडणे कसे शक्य आहे( दुर्दैवाने).

आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय पाकिस्तान ला बंधनकारक नाही असे वाचनात आले . आता पर्यन्त दोन वेळा अमेरिका ने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय खूंटीला टांगुन आरोपी नां फाशी दिली आहे व न्यायालय अमेरिका चे काहीही बिघडवू शकली नाही .
एकच आशा आहे की पाकिस्तान भिखारी देश असल्या मुळे आंतरराष्ट्रीय भिक मिळविणय साठी जाधव यांना मरेपर्यन्त जन्मठेप शिक्षा देण्याची शक्यता वाटते .
बीबीसी न्यूज़ - जाधव जैसे मामलों में ICJ के फ़ैसलों की अनदेखी होती रही है
http://www.bbc.co.uk/hindi/international-39962152

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2019 - 12:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

Cops bust Rs 5,000 crore heroin racket with links to Taliban

तालिबान आणि पाकिस्तानी लोकांनी चालवलेल्या एका मोठ्या टोळीला दिल्ली पोलिसांनी पकडले आहे. ही टोळीची, अंमली पदार्थांच्या तस्करीची उलाढाल तब्बल रु५००० कोटी (रु पाच हजार कोटी) ची होती !

प्रियंका गांधी यांनी ज्या
सभ्यतेने
संयमाने
सुजाणपणाने
संवेदनशीलतेने

सोनभद्र प्रकरणात योगी सरकारच्या विरोधात जी भुमिका घेतली ती अत्यंत

स्तुत्य्
अनुकरणीय
अशी आहे

याच रीतीने जर प्रियंका गांधी काम करत राहील्या तर त्यांच्यात भारतीय राजकारणाला एक नविन दिशा देण्याची क्षमता आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jul 2019 - 11:21 am | डॉ सुहास म्हात्रे

सोनभद्र येथिल दुर्दैवी व निषेधार्ह हत्याकांड

या दुर्दैवी आणि निषेधार्ह हत्याकांडातील पिडित लोकांना मदत व्हावी असे काही करण्याऐवजी या प्रसंगाचे राजकारण करण्याचाच जास्त प्रयत्न केला जात आहे... त्यात, उत्तर प्रदेशच्या कॉन्ग्रेस प्रभारी असलेल्या प्रियंका गांधी सर्वात पुढे आहेत, आणि इतर पक्ष व स्वतःच्या राज्यातल्या अराजकाकडे सतत दुर्लक्ष करणार्‍या ममता बॅनर्जीही फार मागे नाहीत. :(

१. Explained: What happened in Sonbhadra, what's happening now | All you need to know

२. गुगल विचारणा करून मिळू शकणारे अजून काही दुवे

या प्रकरणाची त्रोटक पार्श्वभूमी :

(अ) सन १९५५ साली, तत्कालीन कॉन्ग्रेसच्या राजवटीत, जमिन हडप करण्यासाठी, अवैधरित्या एक सोसायटी स्थापन करण्यात आली व तिच्याकडे जमिनीची मालकी देण्यात आली.
(आ) नंतर, सन १९८९ मध्ये तत्कालीन कॉन्ग्रेसच्या राजवटीत, ती जमीन सोसायटीकडून एका व्यक्तीकडे अवैधरित्या हस्तांतरीत करण्यात आली.
(आ) त्यासंबंधीचा खटला कोर्टात दीर्घकाळ आजपर्यंत प्रलंबित आहे आणि म्हणून सद्य सरकार या बाबतीत कारवाई करू शकत नाही.
(इ) त्यामधील दोन बाजूत असलेले दीर्घकालचे वैर अचानक चिघळून हिंसा केली गेली.

अश्या पार्श्वभूमीवर, योगी सरकारच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेऊन आणि १४४ कलमाचा भंग करत गुन्ह्याच्या जागेवर जाण्याचा आग्रह धरून, प्रियंका गांधींनी टेलिव्हिजनच्या झगमगाटात राजकिय भाकरी भाजून घेण्यापलिकडे काय साध्य केले आहे? लोक हुशार झाले आहेत आणि आता अश्या नौटंकी त्यांना मोहवत नाहीत, हे समजून घेण्यात कॉन्ग्रेस अजूनही कमी पडत आहे.

किंबहुना, "राजकारण्यांनी यामध्ये पडून या गुन्ह्याला राजकिय रंग देवू नये" असे स्थानिक लोकांनी म्हटल्याचे माध्यमात पाहिले असेलच. यावरून तरी राजकारण्यांनी बोध घ्यायला हवा.

सततची नकारात्मकता टाळून, काहीतरी सकारात्मक कार्य आणि योजना राबविल्याशिवाय, लोकांना कॉन्ग्रेसबद्दल ममत्व वाटणार नाही, ही बाळबोध जाण हुशार, मातब्बर आणि जुन्या-जाणत्या कॉन्ग्रेसी नेत्यांना अजूनही येत नाही, हे अनाकलनिय आहे. सरकार पक्षाला ओढूनताणून विरोध करणे आणि आंतरराष्ट्रिय मुद्द्यांवर पाकिस्तानची तळी उचलणे (पक्षी : आपलेच नाक कापून सरकारला अपशकून होईल अश्या समजात राहणे) यापुढे त्यांची बुद्धी जात नाही असेच दिसत आहे.

एक वेळ प्रियंका राजकारणात नवीन असल्यान त्यांना हे समजत नसेल. पण, दुर्दैवाने, "कौन बनेगा पक्षाध्यक्ष?" या वैयक्तिक राजकिय चढाओढीच्या नाटकाचे अनेक उलटसुलट प्रयोग करण्यात गुंतलेल्या कॉन्ग्रेसच्या नेत्यांनाही, प्रियंका गांधींना यावेळीही योग्य सल्ला देण्यासाठी वेळ मिळालेला दिसत नाही.

असेच होत राहिले तर, दुर्दैवाने, भारतात सबळ विरोधी पक्ष असण्याचे मनोरथ, केवळ दिवास्वप्नच राहतील. :(

ही बातमी फॉक्स "न्यूज"वर आहे बरं. (ट्रम्पभक्तांनी नेमेप्रमाणे 'फेक न्यूज, फेक न्यूज' असा पढवलेला आरडाओरडा करण्यापूर्वी सांगितलेलं बरं! :)) तसा बाकीचा ट्विटरतमाशा चालू आहेच तात्यांचा, पण ही बातमी अगदी नेहमीच्या गोंधळापेक्षाही चित्तचक्षुचमत्कारिक वाटली!

ओबामामामांनी व्हाईट हाऊस ट्रम्पतात्यांच्या हवाली करून अडीच वर्षं झाली तरी त्यांचे बिनडोक कांगावे काही संपत नाहीत* (आता बघा, व्हॉटअबाऊटरी करून ओबामा कसा बुशने इकॉनॉमी खड्ड्यात घातली म्हणून कांगावा करत होता, असं म्हणत ट्रम्पभक्त धावत येतील!! :)). काल तर चक्क व्हाईट हाऊसमधलं एअर कंडिशनिंग नीट चालत नाही, हा ओबामा प्रशासनाचाच दोष आहे असं तात्यांनी आपल्या (टॅक्सपेयर-फंडेड) सुट्टीवर जायच्या आधी जाहीर केलं! (चार प्रमुख वाहनकंपन्यांनी ट्रम्पतात्यांना फाट्यावर मारून थेट कॅलिफोर्निया राज्याशी गाड्यांचे मायलेज पर गॅलन लक्ष्य निर्धारित केल्यामुळे आणि गेल्या तिमाहीत चार टक्के सोडाच, पण तीन टक्के जीडीपी वाढीचं लक्ष्य गाठता न आल्याचं उघड झाल्यामुळे तात्या (नेहमीपेक्षा जास्तच) भंजाळले असावेत!!!)

बाकी तथाकथित बिल्डरला साधं एसी दुरुस्त करवून घेता येऊ नये आणि तथाकथित 'डीलमेकर'ला वाहनकंपन्यांशी साधं डील करता येऊ नये? गंमतच आहे!

“For instance, the Obama administration worked out a brand new air conditioning system for the West Wing and it was so good before they did the system,” he said.

“Now that they did this system it's freezing or hot in here,” he complained.

It’s common for presidents to blame their predecessors for problems plaguing the country, but this might be the first time the climate in the White House has been brought up by a presidential successor.

दुवा: https://www.foxnews.com/politics/trump-blames-obama-administration-white...

"तुम्ही पक्ष सोडून का जात आहात?"
- "जनतेची तशी मागणी आहे. प्रवाहाविरुद्ध जायचं का विकासाबरोबर हा प्रश्न निर्माण झाला. आम्ही विकासाबरोबर जायचं ठरवलं. आघाडीला सत्ता मिळेल असं जनतेला वाटत नाही. सत्तेशिवाय विकास होणार नाही."
"साहेबांना सोडणार?"
"साहेबांना कायम ह्रुदयात स्थान आहेच."
(" पण सत्ता डोक्यात आहे.")

प्रसाद_१९८२'s picture

29 Jul 2019 - 4:29 pm | प्रसाद_१९८२
जॉनविक्क's picture

29 Jul 2019 - 4:44 pm | जॉनविक्क

आता मोदी भाई सुद्धा यात आले होय ?

भंकस बाबा's picture

29 Jul 2019 - 7:12 pm | भंकस बाबा

राफेल नोटंकीपेक्षा बरी आहे.
पंतप्रधान झाले म्हणून क़ाय झाले?
काही हौसमौज करू नए क़ाय माणसाने?
चरसगांजा घेण्यापेक्षा, गुमनाम सहलीवर जाण्यापेक्षा, असहिष्णुताच्या नावाने बोंबा मारण्यापेक्षा हे बर्र!

प्रसाद_१९८२'s picture

29 Jul 2019 - 7:20 pm | प्रसाद_१९८२

पुलवामा इथे सिआरपिएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी,
जिम कार्बेट पार्कमधे याच कार्यक्रमाचे शुटिंग करण्यात व्यस्त होते प्रधानसेवक असे वाटते.

डोले मिटून राऊलबाबाच्या मांगे मांगे धावनार्‍यांना राऊलबाबाची डोले मिटून खोटी बोंब मार्न्याची आदत लाग्ली आसल्यास आच्चर्य न्हाय. ढवल्या शेजारी पवल्या बांदला आसं कायकी म्हत्यांत नाय्का? =))

https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/pm-modi-ca...

नगरीनिरंजन's picture

30 Jul 2019 - 11:31 am | नगरीनिरंजन

पुलवामात सुरक्षाव्यवस्थेत ढिसाळपणा झाल्याबद्दल व नंतरही मोदींना उशीरा सांगितल्याबद्दल सखोल चौकशी आणि बर्‍याच अधिकार्‍यांवर कारवाई झाली असेल नाही?
नक्की कोणी हयगय केली काही कळलं का पुढे?
मला वाटतं मोदीजी खूपच प्रेमळ आहेत. अधिकार्‍यांवर रागावतात; पण लगेच माफ करून टाकतात. साध्वीजींना कधीही माफ करणार नाही म्हणतात; पण तरी काही म्हणत नाहीत. अगदी माऊलीसारखे प्रेमळ आहेत आपले प्रिय मोदीजी. चो च्वीट!

गब्रिएल's picture

30 Jul 2019 - 11:47 am | गब्रिएल

मियाँ गिरा लेकीन तंगडी उप्परीच है । =)) =)) =))

नगरीनिरंजन's picture

30 Jul 2019 - 11:50 am | नगरीनिरंजन

करेक्ट!! =)) =))

ट्रम्प's picture

29 Jul 2019 - 10:21 pm | ट्रम्प

अचानक गुपचुप 20 / 25 दिवस थाईलैंड ला सुट्टीवर जाणाऱ्यापेक्षा हे उत्तम :)

नगरीनिरंजन's picture

30 Jul 2019 - 11:07 am | नगरीनिरंजन

=))

अगदी बरोबर बोल्लात! कोणता पंतप्रधान गेला होता?

गब्रिएल's picture

30 Jul 2019 - 11:48 am | गब्रिएल

आपलं ठ्येवावं झाकून आनि दुसर्याच पाहावं (तोल जाईल इक्तं) वाकून =)) =)) =))

भंकस बाबा's picture

31 Jul 2019 - 8:02 pm | भंकस बाबा

आठवडाबाजारला गेला तरी गांवभर होतं, इथे या कानाचा त्या कानाला पत्त्या लागत न्हाइ! वर ईचारल तर साळसुदावाणी आव आणतात. अरे बोला ना गुलाबी गल्लीत, पारिजात चाळीत, चौथ्या माळ्याच्या मैनेबरोबर गप्पा हाणायला गेलो होतो. हाय हिम्मत?

नगरीनिरंजन's picture

2 Aug 2019 - 6:06 am | नगरीनिरंजन

तो कुठं का जाईना, तो पंतप्रधान थोडीच आहे?
आपले प्रिय मोदीजीसुद्धा पंतप्रधान नसताना कुठं गेले/जातील त्याच्याशी देणंघेणं नाही.
आपला पंतप्रधान काय करतो ते महत्त्वाचं.
असो. भारतीय अर्थव्यवस्था पाचव्या नंबरवरून सातव्या नंबरवर आलीय. कोणाकोणाचा विकास होतोय इथे पाहू आता.

भंकस बाबा's picture

3 Aug 2019 - 10:25 pm | भंकस बाबा

कितव्या नंबरवरुन कितीवर आली होती ते सांगितले असते तर बरे झाले असते.
रच्याकने केदारनाथला , जंगलात फिरायला जाण्याला पाप म्हणतात काय तुमच्याकडे?

नगरीनिरंजन's picture

4 Aug 2019 - 1:12 am | नगरीनिरंजन

१९९० मध्ये पहिल्या दहातही नसणारी अर्थव्यवस्था २०१५ पर्यंत सातव्या नंबरवर आली. इतका मोमेन्टम होता आणि तो नुसता राखला असता तरी वाढत राहिली असती. मुळात नुसता अर्थव्यवस्थेचा आकार पाहून काही उपयोग नाही हेच भक्तांच्या डोक्यात शिरत नाही. आता तर आकारही कमी करून दाखवला प्रिय मोदीजींनी. =))
तिकडे चीनवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी अमेरिकन उद्योग इतर देशांतल्या संधी शोधत आहेत आणि त्याचा फायदा व्हिएतनाम, तैवान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया उचलत आहेत. आपल्याकडे मात्र प्रत्येक सेक्टरमध्ये नोकर्‍या जायची वेळ आलीय.

आणि हो,खांद्यावर संपूर्ण देशाची जबाबदारी असताना डोंगरात व जंगलात फिरून पब्लिसिटी स्टंट करण्याला आमच्याकडे पापच म्हणतात.
कदाचित आपल्या कार्यसंस्कृतीत नसतील म्हणत.

भंकस बाबा's picture

4 Aug 2019 - 8:15 am | भंकस बाबा

दोन पावले मागे आली तर टिका, पुढे आली तर आळीमिळी गुपचिळी!
अमेरिकन कंपन्या इतर देशात संधी शोधत असल्या तरी त्या काही जाचक अटीदेखिल टाकतात.
गेल्या पाच वर्षात नमोनी कोणतीही सुट्टी न घेता काम केलेले आहे. शिवाय त्यांनी आता केलेले पर्यटन( तुमच्या मते पब्लिसिटी स्टंट) देशाला फायदा मिळवून देत आहेत. राजमाता अमेरिकेला जाऊन उपचार करून घेतात तेव्हा ते मेडिकल टूरिजम असेल नाही?

सुनील's picture

4 Aug 2019 - 9:13 am | सुनील

गेल्या पाच वर्षात नमोनी कोणतीही सुट्टी न घेता काम केलेले आहे

भारतीय पंतप्रधानाला अधिकृतपणे सुटी घेता येत नाही. सबब, आजवरचा प्रत्येक पंतप्रधान हा सुटी न घेताच काम करीत आलेला आहे!

(खात्री नसल्यास गुगलून पहावे. भरपूर माहिती उपलब्ध आहे).

भंकस बाबा's picture

4 Aug 2019 - 9:35 am | भंकस बाबा

जेव्हा हार्ट सर्जरीसाठी इस्पितळात भरती होते तेव्हा बेडवरुन सरकार चालवत होते नाही?
अरे चुकले तेव्हा तर मैडम आणि रागाच सरकार चालवायचे! मनमोहन तर फक्त सहीसाठी होते. अगदी राफेल प्रकरणात ओलांदशी चर्चा रागाने केली होती. संसदेत बोलला हो तो! नंतर फ्रांसने खंडन केले या बातमीचे! पण जाउदे, आता आपले ठरलयं ना कि फक्त आणि फक्त मोदींची बदनामी करायची?
मग बाकी पंतप्रधानाचा उल्लेख फाउल मानण्यात यावा.

सुनील's picture

4 Aug 2019 - 9:44 am | सुनील

भारतीय पंतप्रधानाला अधिकृतपणे सुटी घेता येत नाही

जमल्यास माझ्या या विधानाचा प्रतिवाद करा. आणि मी मोदींची बदनामी कुठल्या विधानाने केली आहे, ते दाखवून द्या.

नगरीनिरंजन's picture

4 Aug 2019 - 9:43 am | नगरीनिरंजन

पहिली गोष्ट म्हणजे मी काही कोणाचा व्यक्तिगत विरोधी नाही; त्यामुळे त्यांच्या फेल्युअरमुळे मला आनंद होतो असे काही नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे सरकारवर टीका करणे प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे म्हणून मी करतो त्यात इतर काही हितसंबंध नाही किंवा तुमच्यासारखं भविष्यात काही मिळेल अशी आशा नाही.
मुळात अर्थव्यवस्थेच्या आकारावरून केलेल्या रँकिंगला फारसा अर्थ नाही; पण इथे काही विद्वान सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उड्या मारत होते म्हणून हे लिहीणे भाग होते.
मनमोहन सिंगांच्या काळातही अर्थव्यवस्था वाढत असतनाही त्यावर जॉबलेस ग्रोथ असल्याची टीका झालीच होती. इथे तर असलेल्या नोकर्‍या व उद्योग धोक्यात आहेत, सरकारला पैसा मिळवणे अवघड झाले आहे तरी टीका करायची नाही म्हणजे काय?

सुबोध खरे's picture

5 Aug 2019 - 10:10 am | सुबोध खरे

सरकारवर टीका करणे प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे
फक्त ती पूर्वग्रहदूषित नसावी एवढीच अपेक्षा
बाकी चालू द्या

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Aug 2019 - 10:14 am | डॉ सुहास म्हात्रे

फक्त ती पूर्वग्रहदूषित नसावी एवढीच अपेक्षा

असं कसं, असं कसं. पूर्वग्रहदूषित टीका करणे हा जन्मसिद्ध हक्क आहे असे काहीजण समजतात (फक्त, उघडपणे, ते त्याला विचारस्वातंत्र्य म्हणतात, इतकेच) !
...आणि स्वतःच्या सद्सदविवेकबुद्धीला वेसण घालून आणि मानभावीपणे जे असे करू शकतात त्यांना विचारवंत, मानवी अधिकारांचे रखवाले, बुद्धीवादी, इत्यादी अनेक नावांनी ओळखले जाते. ;) =))

नगरीनिरंजन's picture

7 Aug 2019 - 8:16 am | नगरीनिरंजन

असा त्रास होणारच. =))
मग दुसर्‍याची नजर पूर्वग्रहदूषित आहे असं जोरजोरात म्हणायचं ही सोपी परंपरागत युक्ती.
चालू द्या. कोंबडं झाकून ठेवलं म्हणून तांबडं फुटायचं राहात नाही.
आणि हो, “सदसद्विवेकबुद्धी” असं लिहितात.

नगरीनिरंजन's picture

7 Aug 2019 - 8:05 am | नगरीनिरंजन

=))
कंपन्यांच्या विक्रीचे आकडे जाहीर करताहेत तरी पूर्वग्रहदूषित म्हणायचे.
सरकारतर आहेच डिनायलमध्ये पण आपल्यासारखे विद्वान नागरिकही?

सुबोध खरे's picture

7 Aug 2019 - 9:18 am | सुबोध खरे

ब्वॉर्र

उपेक्षित's picture

7 Aug 2019 - 7:41 pm | उपेक्षित

@ नगरीरंजन साहेब, लक्ष्य नका देऊ कारण हि डॉक्टर ची जोडगोळी जरा कोणी काही सरकार विरोधात लिहिलेलं बघितलं कि वसकन अंगावर येती.
त्यांच्या अजूनही डोक्यात येत नाही कि मोदीला विरोध म्हणजे कोन्ग्रेस समर्थन नसते.

त्यांचे चालुदे.

सुबोध खरे's picture

7 Aug 2019 - 8:10 pm | सुबोध खरे

खांद्यावर संपूर्ण देशाची जबाबदारी असताना डोंगरात व जंगलात फिरून पब्लिसिटी स्टंट करण्याला आमच्याकडे पापच म्हणतात.

पब्लिसिटी स्टंट ?

यालाच माझ्या मर्यादित आकलनामध्ये पूर्वग्रह म्हणतात.

बाकी वसकन अंगावर येती हे वाचून करमणूक झाली.

अजून येऊ द्या

नगरीनिरंजन's picture

8 Aug 2019 - 5:14 am | नगरीनिरंजन

आपले आकलन खरंच मर्यादित आहे; कारण गुहेत जाऊन बसल्याने (कॅमेरामन घेऊन) किंवा जंगलात गेल्याने देशाचा नक्की काय फायदा झाला ह्याची कोणतीही माहिती सरकारने प्रसिद्ध केलेली नाही.
किंबहुना आजवर पब्लिसिटीवर हजारो कोटी खर्च केलेत ह्याची माहिती मात्र उपलब्ध आहे. अशी माहिती पाहून मत बनवावे इतपत आकलन नसल्यास त्याला मर्यादित म्हणणे हेसुद्धा औदार्य म्हणावे लागेल.
इत्यलम्.

सुबोध खरे's picture

8 Aug 2019 - 10:13 am | सुबोध खरे

गुहेत जाऊन बसल्याने

https://www.india.com/news/india/after-pms-visit-to-kedarnath-over-7-lakh-people-visited-the-shine-within-45-days-report-3697895/

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Aug 2019 - 10:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

कोणी एक किंवा तुमची जोडी किंवा इतर कोणती जोडी, कोणते काम, करते आहे, हे स्वतःहून जाणण्याइतपत मिपाकर हुशार आहेत.

मुद्दा सोडून (किंवा मुद्दा नसल्याने), असे बेजार झाल्यागत, बिनबुडाचे सरसकट दावे करण्याने, स्वतःचेच पितळ उघडे पडते ! तेव्हा, इतरांच्या डोक्यावर टीप्पणी करण्यापेक्षा स्वतःच्या डोक्याकडे, विचारांकडे आणि लिखाणाकडे लक्ष देणे, (कठीण आहे पण) जास्त चांगले होईल.

तेव्हा, त्रस्त समंधा शांत हो... वगैरे, वगैरे ! =))

अरे वाह जोडगोळी ला बाण वर्मी बसला बहुतेक :)
असो एकच सांगणे आहे (मनापासून) वैचारिक वाद आहेत सो त्या मर्यादे पर्यंत ताणू माझ्याकडून अथवा तुमच्या (जोडगोळीकडून) कडून भान ठेवू.
असो बाकी तुम्ही (जोडगोळी) चांगले सुज्ञ आहात सो तुमचे (जोडगोळीचे) चालू द्या.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Aug 2019 - 6:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

वैचारिक वाद-प्रतिवाद करायला मुद्दे मांडायचे असतात आणि त्यांना सबळ पुरावे व तर्काचा पाया द्यायचा असतो.

उगाच उद्धट आणि भडकाऊ विधाने करण्याला वाद-विवाद म्हणत नाहीत, तर मुद्दे संपल्यामुळे किंवा बाजू उलटल्यामुळे निर्माण झालेली चिडचिड आहे, हे मिपाकर जाणतात, हे विसरू नये.
=)) =)) =))

अन्यथा, चालू द्या करमणूक !

उपेक्षित's picture

9 Aug 2019 - 7:50 pm | उपेक्षित

हायला आम्ही करू ती वैचारिक चर्चा आणि बाकीचे करणार तो उद्धटपणा?, चांगलय कि राव आणि माझी चीड चीड ? :) :)
किती ते गैरसमज करून घेता म्हात्रे सर ? बाकी ते उद्धटपणाविषय तुमच्या जोडीदाराला ४ उपदेशाचे डोस पाजले तर बरे. कसे ? ;)

असो चालू दे तुमची (जोडगोळीची) वैचारिक चर्चा आंम्ही काय करमणूक करणारे हाय काय आय काय ;) ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Aug 2019 - 10:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमचे वरचे प्रतिसाद, विशेषतः डोक्याचा उल्लेख असल्यापासूनच्या पुढचे प्रतिसाद, परत वाचा आणि त्यांच्यामध्ये कोणत मुद्दे आहेत हे शोधून पहा. मग, हे विनोद तसेच पुढे चालू ठेवण्याने, तुमच्याच विश्वासार्हतेला तुम्हीच धोका निर्माण करत आहात, हे ध्यानात येईल (कदाचित्).

असो. यापुढे मी प्रतिसाद दिला नाही तर तुमचे मुद्दे सिद्ध झाले असा समज करून घेउ नये. केवळ, झोपलेल्याला जागे करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची इच्छा नाही म्हणून तसे केले असे खात्रीने समजावे. राम राम.

हल्ली हल्ली तुमच्या जोडगोळीचे अहंकारयुक्त प्रतिसाद पाहून आश्चर्य नाही वाटले.
असो तुमच्या वयाचा आणि ज्ञानाचा आदर आहे आणि राहिलबाकी इत्यलम.

प्रसाद_१९८२'s picture

30 Jul 2019 - 1:19 pm | प्रसाद_१९८२

बाकी,
प्रधानसेवकांनी त्या बेअर ग्रील्स बरोबर संभाषण हिंदीत केले की इंग्रजीत ! :))
--
निवडणुका जवळ आल्यावर, अश्या तर्‍हेची नौटंकी करायची जुनीच सवय प्रधान सेवकांना आहे.
तेंव्हा उद्या ते सलमान खानच्या बिग बॉसमधे दिसले तरी आश्चर्य वाटणार नाही.

बाप्पू's picture

30 Jul 2019 - 2:18 pm | बाप्पू

आत्ता कोणती निवडणूक आहे??
बहुतेक तुमच्या गावाची ग्रामपंचायत निवडणूक असेल आणि त्यावर प्रभाव पाडण्यासाठी मोदींनी या शो मध्ये भाग घेतला असेल.. हो ना??

तेजस आठवले's picture

30 Jul 2019 - 4:41 pm | तेजस आठवले

पब्लिसिटी स्टंट, माझ्या मते. बाकी चालू द्या.

आम्ही पण आमच्या वेळी जंगलात दौरे आणि शिकार कित्येक वेळा केली पण ते जाहीर केले नाही
अरे सिंह बघायला जंगलात कशाला जाता, आमच्याकडे तर नाक्यानाक्यावर आमचे ढाणे वाघ असतात
आरेसेसने आता डिस्कव्हरी नेटवर्कपण ताब्यात घेतले आहे. सिंहाने गोमांस खायचे का नाही हे आता मोदी/संघ ठरवणार का
ममा, मलापण शिंव्ह बगायला जायाचंय...त्याच्या पोटातल्या पिशवीत सिम्बा असतो ना...

अखेर तीन तलाक गुन्हा ठरविण्याचा कायदा पास झाला. वेगवेगळ्या चॅनेल्सवरील चर्चेत एकंदरीतच मुस्लीम स्कॉलर्स ला जबरदस्त मिरची लागलेली दिसत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jul 2019 - 10:34 am | डॉ सुहास म्हात्रे

वंशपरंपरागत चाललेली दुकाने बंद व्हायची भिती माणसाला विचित्र आणि आक्रमक बनवते... मग ती दुकाने धर्माची असो की राजकारणाची.

गोवा रोड बांधकाम ठेकेदारांची वंशपरंपरागत तिसरी पिढीही बांधत राहील.
--

रविकिरण फडके's picture

31 Jul 2019 - 10:08 pm | रविकिरण फडके

@कंजूस

"गोवा रोड बांधकाम ठेकेदारांची वंशपरंपरागत तिसरी पिढीही बांधत राहील"

नितीन गडकरी झिंदाबाद! केव्हढं मोठं काम करून राहिले ना!

शिवाय नंतर टोल नाके बसवून त्यांचीही पिढीजात कमाईची सोय करून ठेवली जाईल!

खटपट्या's picture

10 Aug 2019 - 1:28 pm | खटपट्या

असुदे की, कितीही झाले तरी पुर्वीचा गोवा रोड हा म्रुत्युचा सापळा होता. गडकरी आल्यानंतर युध्दपातळीवर काम चालू आहे. हा रस्ता म्हणजे काही मुंबै पुणे रोड नव्हे. दर्‍याखोर्‍यातुन जाणारा रस्ता आहे. आवाकाही मोठा आहे. खांग्रेस सरकारच्या वेळी काहीच झाले नाही. पण गडकरी हा रस्ता करतीलच असा विश्वास आहे. चांगली सुविधा हवी असेल तर टोल द्यावा लागेलच आणि कोकणवासीय तो आनंदाने देतील...

हा नाही होत आणि कोस्टल रोडचं भूत मानगुटीवर. कोकण रेल्वेने गोवा प्रवासी केव्हाच पळवलेत.
कारवार, त्रिवेंद्रमला जाणारे वरच्या एनएचफोरनेच जातात.

भंकस बाबा's picture

4 Aug 2019 - 8:19 am | भंकस बाबा

लष्कर वाढवल्यावर फुटिरतावादी व कोंग्रेसच्या पोटात दुखू लागले आहे. गमतीची गोष्ट ही आहे की जेव्हा 370 वा काश्मीरबद्दल सरकार शांत होते तेव्हा हेच निर्लज्जपणे विचारत होते की क्या हुवा तेरा वादा!
वर्षानुवर्ष चाललेले दुकान बंद होण्याची वेळ आली बहुतेक?

भंकस बाबा's picture

4 Aug 2019 - 8:20 am | भंकस बाबा

लष्कर वाढवल्यावर फुटिरतावादी व कोंग्रेसच्या पोटात दुखू लागले आहे. गमतीची गोष्ट ही आहे की जेव्हा 370 वा काश्मीरबद्दल सरकार शांत होते तेव्हा हेच निर्लज्जपणे विचारत होते की क्या हुवा तेरा वादा!
वर्षानुवर्ष चाललेले दुकान बंद होण्याची वेळ आली बहुतेक?

धागा ज्या विषयाने चालू केला आहे त्याबद्दल थोडेसे. "शाकाहारी" या शब्दाच्या बर्‍याच आव्रुत्या आल्या असल्या तरी सर्वांचे अर्थ खालीलप्रमाणेच.

प्युअर व्हेज = शकाहारी
शुद्ध शाकाहारी = शाकाहारी
वैष्णव रसोई इ. इ. = शाकाहारी
हाय क्लास = शाकाहारी
हाय क्वालिटी व्हेज = शाकाहारी
प्युअर नॉनव्हेज = असं काही नसतं