आकाशदर्शन (२) - संदर्भ पद्धती

कंजूस's picture
कंजूस in तंत्रजगत
16 Mar 2019 - 10:20 pm

इतर लेख
आकाशदर्शन (१) - सुरुवात आणि ओळख

आकाशदर्शन (३) - कार्यक्रम करणाऱ्या संस्था

आकाशदर्शन - संदर्भ पद्धती

'आकाशदर्शन - सुरुवात आणि ओळख' या मागच्या भागात आपण सूर्याची रास आणि वर्षाचा महिना - तारीख याचा संबंध पाहिला. तसेच सूर्य मावळल्यावर साधारणपणे कोणती रास डोक्यावर, कोणती रास पूर्वेला उगवत असणार हे कळले. १ जानेवारीस धनु(९) राशितला सूर्य मावळेल तेव्हा थोडे वर मकर(१०), अजून वर कुंभ(११), डोक्यावर मीन(१२) थोडे खाली पुर्वेकडे खाली मेष(१), त्याखाली वृषभ(२), आणि अगदी पुर्वेला उगवणारी मिथुन(३) असा क्रम असतो. दोन तासांनी हे आकाश पश्चिमेकडे एक रास सरकून कर्क(४) रास उगवेल आणि मकर(१०) पश्चिम क्षितिजावर जाईल. असे एकेक पट्टे रात्रभर हलणार. संध्याकाळनंतर काळोख पुरेसा झाला की सर्वात प्रथम पश्चिमेकडचे ग्रह,तारे, तारकापुंज पाहून टाकायचे कारण ते लवकरच मावळणार आहेत. इतर डोक्यावरचे मावळायला बराच वेळ असतो, ते नंतर पाहता येतील.

कुठे आकाशदर्शन कार्यक्रमाला गेल्यास तिथले मार्गदर्शक दुर्बिणी एखाद्या ताऱ्याकडे रोखतात ( फोकस) आणि तारा दाखवून माहिती सांगतात. एका पाठोपाठ एक असे रात्रभर तारे दाखवण्यात येतात. पण जर का आपण कुठे पर्यटनास गेलो तर कुठे काय पाहता येईल यासाठी पुस्तके, मॅप्स ,टिप्स यांचाच आधार घ्यावा लागेल. रात्री कुणाला फोनही करू शकत नाही. ( करू शकतो पण करू नये म्हणतात.) आपल्या हौसेचा लोकांना त्रास कशाला?

मित्राला फोन -
"हॅलो, बंब्या काय झालं रे? एवढ्या रात्री फोन केलास?"
"काही नाही, इकडे राजस्थानात आहे."
"मग?"
"आकाशदर्शन करायला बाहेर पडलो आहे. मृग नक्षत्र कुठे दिसेल?"
"वरती. गुड नाइट."
असे संवाद होऊ शकतात.
---------
हॅाटेल मध्ये असाल तर -
"जेवून जरा उशिरा येतो."
"साडे बाराला खालचे गेट बंद करतो, लवकर या."
------
जरा अंधारी जागा पाहून रस्त्याकडे उभे राहून आकाशाकडे पहावे तर खाली पायाला डास लक्ष्य वेधतात, गार वारा सुटतो. एखादी मोटरकार मोठ्ठे हेडलॅम्पस लावून जाते आणि डोळे दिपतात. एकूण स्वत: xxxशिवाय आकाशदर्शन होत नाही.
---------
तारे शोधण्याच्या पद्धतीकडे वळूया.
Right Ascenion (RA), Declination (dec. किंवा Dec.)
ताऱ्यांची यादी असते त्यात प्रत्येक ताऱ्यापुढे एका रकान्यात RA : Hour minute seconds अशी तासा मिनिटांत वळ दिलेली असते.
आणि dec : + /- शून्य ते नव्वद अंक degrees arc minutes arc seconds असा कोन दिलेला असतो.

आपण जे सूर्याची रास हे ढोबळ रूप पाहिले त्याचे सूक्ष्म अचूक रूप म्हणजेच RA एवढी माहिती आतापुरती लक्षात ठेवून पुढे जाऊया. कसं ते पाहा -
एकूण आकाशाचा गोल २४ RA मध्ये विभागला आहे

0 hour 0 minute पासून 02 hours 0 minutes पर्यंत मेष रास

02 hour 0 minute पासून 04 hours 0 minutes पर्यंत वृषभ रास

04 hour 0 minute पासून 06 hours 0 minutes पर्यंत मिथुन रास
-- याप्रमाणे
.. .... ...
एकेका राशिचे दोनदोन RA आहेत.

.. .... ...

22 hour 0 minute पासून 24 hours 0 minutes पर्यंत मीन रास
24 hours 0 minutes म्हणजेच 0 hour 0 minute
------------
या प्रमाणे 10 hour 0 minute पासून 12 hours 0 minutes पर्यंत सिंह रास येईल.
कोणत्या ताऱ्याचा RA 10-12 दरम्यान आल्यास तो सिंह राशीच्या पट्ट्यात आहे हे निश्चित झाले.

----------------
----------------
Dec आणि Latitude याचा संबंध समजून घेऊ.
एखाद्या ताऱ्याचा dec = 19.1° degree आहे आणि आपली Latitude सुद्धा 19.1° degree North ( मुंबई जवळ) आहे आणि इतर कोणत्याही ठिकाणाची Latitude ( जिपीएस डेटा / लोकेशन डेटा मोबाइलमध्ये दिसतो त्यात असते) हीच असेल तर तो तारा 'डोक्यावरून' जाईल. 18.5 किंवा 19.5 असेल तर फार काळजी करू नये. नुसत्या डोळ्यांनी बघण्यासाठी हा तारा डोक्यावरूनच जातोय असं म्हणता येईल. खूपच फरक असेल तर पाहू. एखाद्या ताऱ्याचा dec 49.1 आहे तर तो तारा
49.1 वजा 19.1 = 30° उत्तरेला दिसेल. आपल्या डोक्यावरच्या बिंदूपासून उत्तरेला 30° तीस अंश. आता प्रश्न पडेल की तीस अंश कसे मोजायचे? कोनमापक घेऊन मोजायचे का? - नाही. अगदी डोक्यावरच्या बिंदूपासून उत्तर क्षितिज हे ९० अंश धरले तर निम्मे अंतरावर ४५ अंश येईल. किंवा तीन समान भाग अंदाजे केले तर तीस, साठ अंश येतील.

काही ताऱ्यांचे dec -39° ( वजा ३९ अंश) तर तो कुठे दिसेल? पुन्हा आपली Latitude 19.1° degree North आहे हे लक्षात घ्या. आपण उत्तर गोलार्धात आहोत. तो तारा 39 + 19.1= 58.1 म्हणजे अंदाजे 60° दक्षिणेला दिसेल. डोक्यावरच्या बिंदूपासून दक्षिणेकडे साठ अंशावर शोधायचा तो तारा. वृश्चिक समुहातील तारे मुंबई /पुण्यापासून असे दक्षिणेला दिसतील. आता समजा तुम्ही ओस्ट्रेलियातून 39° South Latitude असलेल्या ठिकाणाहून हाच तारा ( dec. -39°) पाहायचा असेल तर तो डोक्यावरून जाईल. Dec 19° चा तारा तिकडून उत्तरेस दिसेल.
-------------------
ही वेबसाइट पाहा -
The brightest star

http://www.atlasoftheuniverse.com/stars.html

Equatorial coordinates : रकाने RA= 4, DEC = 5
Spectral type =रकाना 8 - ताऱ्याचा रंग त्याच रंगाच्या फॅान्टमध्ये दिला आहे.
Visible mag.= 9
( जेवढा अंक लहान व वजा तेवढा तारा तेजस्वी असतो, चार पुढचे तारे अंधुक असतात)

----------------
या संदर्भ पद्धतीतून तारे कुठे आहेत हे शोधणे सुरुवातीस थोडे अवघड वाटले तरी युनिवर्सल स्टँडर्ड पद्धत असल्याने पुढे मॅपवरून तारे पटकन शोधता येतील कोणाच्या मदतीशिवाय.
कोणी टेलिस्कोप लावून काही शोधत असेल तर तुम्हाला अंदाज येईल की तो कोणत्या राशिच्या पट्ट्यात उत्तरेला पाहतोय का दक्षिणेला. मग त्यावरून योग्य प्रश्न विचारला की त्याचा इंटरेस्ट वाढेल.
--------
हा भाग समजला की आकाशातले तारे खिशात.

ताऱ्यांची इंग्रजी - मराठी नावे
Excel sheet मध्ये

Google doc link
Star names

https://drive.google.com/file/d/1vw5611KuJxjQp2YuerXeqvTc-yNfxOyI/view?u...

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

16 Mar 2019 - 10:48 pm | यशोधरा

वाचतेय..

ज्ञानव's picture

16 Mar 2019 - 11:10 pm | ज्ञानव

प्रयत्न करतो आहे.

तुषार काळभोर's picture

16 Mar 2019 - 11:14 pm | तुषार काळभोर

दक्षिण गोलार्धात नि उत्तर गोलार्धात दिसणारे तारे वेगळे असतात असं ऐकलंय. खरंय का ते?

>>दक्षिण गोलार्धात नि उत्तर गोलार्धात दिसणारे तारे वेगळे असतात>>??

हो नक्कीच वेगळे. दक्षिण गोलार्धात असलेले देश /खंड साउथ अमेरिक, ओस्ट्रेलिया वगैरे विचार केल्यास तिथून सप्तर्षी, शर्मिष्ठा ( बिग डिपर, कॅसिओपिआ) हे ध्रुव ताऱ्याभोवतीचे तारकासमुह दिसणार नाहीत. उत्तर गोलार्धातले देश थोडे सुदैवी आहेत कारण बरेच उत्तम तारकासमुह तिकडेच आहेत. द ध्रुवाकडे रोखणारा कोणताही ठळक तारा नाही. द गोलार्धासाठी वृश्चिक आणि धनु रास हे खास आकर्षण. आकाशगंगेचं केंद्र त्या दिशेकडेच आहे.

प्रमोद देर्देकर's picture

17 Mar 2019 - 12:55 pm | प्रमोद देर्देकर

वाचतोय

पाषाणभेद's picture

22 Mar 2019 - 10:38 am | पाषाणभेद

छान लेखमाला आहे मराठीत. लिहीत रहा. पुस्तक करा.

जो जो मराठीत लिहणार त्याला पाठींबा.

यशोधरा's picture

22 Mar 2019 - 10:40 am | यशोधरा

पुढील भाग कधी?

कंजूस's picture

22 Mar 2019 - 11:07 am | कंजूस

आकाशात काय काय गमतीदार पाहण्यासारखं आहे ते कुठे आणि कधी पाहायचे याची माहिती नकाशे, साइट्सवर असते ते RA - DEC मध्ये असते. ती पद्धत समजून घ्या .
लेखात मराठी इंग्लिश नावं Excel मध्ये दिली आहोत.
थोडी प्रॅक्टिस केली केली की जमेल.
पुढचा भाग दुर्बिण / टेलिस्कोपवर लिहिण्याचा विचार आहे.

अजय देशपांडे's picture

2 May 2019 - 9:19 am | अजय देशपांडे

वाचण्यासाठी आतुर झालो आहे

@ अजय देशपांडे, आणि सर्वच उत्सुक हौशी आकाशनिरिक्षकांनो -
कोणतीही दुर्बिण( बाइनो), किंवा टेलिस्कोप घेण्या अगोदर जास्तीत जास्त वस्तू पाहा. जिथे कार्यक्रम होतात तिथे अशी साधने घेऊन आलेले लोक असतात. त्यातून बघून काय दिसले, कसं दिसले, ट्राइपॅाड लावला होता का, एका ताऱ्याकडून दुसऱ्या ताऱ्याकडे जाण्यासाठी काय करावे लागले, वस्तू किती मोठी, नेता येते का, त्याचा मेक, नंबर आणि साइज ( आरसा/भिंगाचे माप) ,आणि हो अंदाजे किंमत जाणून घ्या. या माहितीमुळे शॅार्टिस्ट करता येते.
आपल्याा या वस्तूचा उपयोग कशासाठी करता येईल किंवा नाही हेसुद्धा अती महत्त्वाचे असते.

कॅम्रा जोडून फोटोग्राफी करता येते का, अक्सेसरीज वेगळ्या कितीला मिळतात हे सर्व आलं. शेवटी हौस आहे त्याला मोल नसते तरीही माफक रिटन आनंद घेता आला पाहिजे.

थोड्याफार वस्तू पाहिल्यावर काय असायला पाहिजे याची बरीचशी कल्पना येते.

चौकटराजा's picture

30 Mar 2019 - 8:05 pm | चौकटराजा

मृग , श्रवण,, व्याध , चित्रा स्वाती., कृतिका ,रोहिणी,,सप्तर्शी , ध्रुव, ज्येष्ठा .

अजय देशपांडे's picture

15 Jul 2019 - 12:43 pm | अजय देशपांडे

ही दुर्बिण माझ्याकडे असून त्या मध्ये आय पीस ऐवजी मी compund मायक्रोस्कोप बसवला आहे ,त्यामुळे मला शनीची कडी छान दिसली त्याच बरोबर गुरु त्याच्या चंद्रा सोबत दिसतो व त्यावरील पत्ते पण दिसतं आहेत

अजय देशपांडे's picture

15 Jul 2019 - 12:53 pm | अजय देशपांडे

100mm_Newtonian_Telescope

कंजूस's picture

15 Jul 2019 - 5:44 pm | कंजूस

वा!

जालिम लोशन's picture

16 Jul 2019 - 5:44 pm | जालिम लोशन

निरीक्षणासाठी?

जालिम लोशन's picture

16 Jul 2019 - 5:44 pm | जालिम लोशन

निरीक्षणासाठी?

जालिम लोशन's picture

16 Jul 2019 - 5:44 pm | जालिम लोशन

निरीक्षणासाठी?

जालिम लोशन's picture

16 Jul 2019 - 5:44 pm | जालिम लोशन

निरीक्षणासाठी?

जालिम लोशन's picture

16 Jul 2019 - 5:44 pm | जालिम लोशन

निरीक्षणासाठी?

जालिम लोशन's picture

16 Jul 2019 - 5:44 pm | जालिम लोशन

निरीक्षणासाठी?

जालिम लोशन's picture

16 Jul 2019 - 5:44 pm | जालिम लोशन

निरीक्षणासाठी?

जालिम लोशन's picture

16 Jul 2019 - 5:44 pm | जालिम लोशन

निरीक्षणासाठी?

कंजूस's picture

16 Jul 2019 - 6:36 pm | कंजूस

पावसाळा संपल्यावर
पावसाळा संपल्यावर
पावसाळा संपल्यावर
पावसाळा संपल्यावर
पावसाळा संपल्यावर
पावसाळा संपल्यावर
पावसाळा संपल्यावर
पावसाळा संपल्यावर