माफ करा राजे आम्ही पितो , होय आम्ही पितो

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
15 Jul 2019 - 7:09 pm

माफ करा राजे

आम्ही पितो , होय आम्ही पितो

पिता असलो जरी कुणाचे तरी आम्ही पितो

होय राजे , हे राज्य जरी तुम्हामुळे लाभले

आमची मुलेबाळे सुखशांतीने नांदत असली

तरी आम्ही पितो , आम्ही धुंदित मस्तीत बेफाम पितो

पिताना बरेच फोन वाजतात , घरच्यांचे

आम्ही दुर्लक्ष करतो , आणि बिनधास्त पितो

मग आम्ही धडपडत सावरत कसेबसे उठतो

तुम्हीच राखून दिलेल्या घराकडे वळतो

तिथे आमची माँसाहेब , असलीच तर पत्नी

डोळ्यात प्राण आणून वाट बघत असते

आम्ही गडाच्या मुख्य दरवाजाशी पोचतोच तोपर्यंत

दार उघडलेले असते

स्वागतासाठी माँसाहेब , आमच्या सौ आणि मुलेबाळे

सर्वजण अगदी शेलके चेहरे घेऊन उभे असतात

आम्ही जग जिंकून आल्याच्या अविर्भावात

रंगमहालाकडे प्रस्थान करतो आणि थोडावेळ असेच पहुडतो

झोप येत नसते , इकडेतिकडे कूस बदलून झाली

कि यांचा प्रश्न येतो

ताट मांडले आहे , दोन घास खाऊन घ्या

आम्ही आपले आमच्या जिवलग सरदार मंडळींच्या आठवणीत रममाण

आज आम्ही कायकाय वदले , कोण त्यावर उत्तरले? कसे उत्तरले ?

याचा लेखाजोखा मांडतो , तोपर्यंत उजाडले असते

पुन्हा गड उतार होतो , मित्रांचा नवा गड पादाक्रांत करण्यासाठी

माफ करा राजे , हे मित्रांचे गड पादाक्रांत करावे

नवीन झेंडे लवकरात लवकर रोवावे , मैत्रीत सर्व काही जिंकावे

म्हणूनच आम्ही पितो

मुलाबाळांचे , घरच्यांचे काय

ते तर आपलेच आहेत आणि पुढेही असतील

इस्पितळातसुद्धा आणि घरीही

पण आम्ही जर नाही प्यायलो तर मित्र नसतील आणि दारुही नसेल

आणि कदाचित पुढे मीही ...

=======================================================================================================
मिपाकरांनो , मी असे नाही म्हणत कि कुठलेही व्यसन वाईट आहे .. मीपण करतो .. पण माझ्या खांद्यावर माझ्या करडी नजर असलेल्या बायकोचे जोखड आहे ..आणि मला वाटत ते आहे म्हणूनच मीपण आहे नाहीतर मला पण तुम्ही कधीच श्रद्धांजली अर्पण केली असती .. वरुणचे वाचून तीव्र दुःख झाले , एव्हढे कि मी व्यक्त करू शकत नाही आहे .. जे कुणी कुठलेही व्यसन करत असतील मग ते खादाडीचे असो वा अजून कुठलेही त्यावर नियंत्रण ठेवता आले पाहिजे अन्यथा घरच्यांना त्रास अटळ आहे .. आणि जर तुम्ही तुमच्या घरच्यांनाच सुखी पाहू शकत नसाल तर हे जीवनच व्यर्थ आहे..हे माझे ठाम मत आहे .. तेव्हा स्वतःला जपणे आणि जपून व्यसन करणे हे प्रत्येक मिपाकरांचे आद्यकर्तव्य आहे .. मी हळूहळू या मिपाशी जोडत चाललो आहे .. का कुणास ठाऊक , तुम्ही सर्वजण मला आपले वाटू लागला आहात , एक काळजी उगाच घर करून बसलेली असते .. तुम्हाआम्हा सर्वाना सुखशांतिसौख्य उदंड लाभो आणि निरोगी आयुष्य लाभो .. हीच त्या महादेवाकडे प्रार्थना .. वरुण मित्रा तुला श्रद्धांजली आणि हे दुःख, हा अनपेक्षित धक्का पचवण्यासाठी तुझ्या घरच्यांना बळ मिळो ...

धोरण

प्रतिक्रिया

जालिम लोशन's picture

16 Jul 2019 - 12:00 am | जालिम लोशन

good

गड्डा झब्बू's picture

16 Jul 2019 - 12:06 am | गड्डा झब्बू

अब रुलायेगा क्या पगले?
कवितेतला दर्द जाणवला...

जॉनविक्क's picture

16 Jul 2019 - 1:32 pm | जॉनविक्क

अत्यन्त चांगला संदेश दिला आहे.

फुटूवाला's picture

16 Jul 2019 - 1:51 pm | फुटूवाला

आवडली

खिलजि's picture

16 Jul 2019 - 2:43 pm | खिलजि

:(