स्पिती घाटी - भाग 2 (सोलन - शिमला -कुफ्रि)

व्लॉगर पाटील's picture
व्लॉगर पाटील in भटकंती
5 Jul 2019 - 7:42 am

स्पिती घाटी - भाग 2 (सोलन - शिमला -कुफ्रि)

आम्ही आमच्या roadtrip ला दिल्ली तुन सुरुवात केली, selfdrives.in ने पंन्नू कार कडून eco sport कार 9 दिवसासाठी भाड्याने घेतली. आणि आमच्या प्रवासाला सुरुवात झाली.

पहिल्या दिवशी कसोली घाटात रस्त्याचे काम सुरू असल्या कारणाने खूप ट्रॅफिक लागलं आणि त्यात आमचा पहिला दिवस संपला , अनपेक्षितपणे प्लॅन नसताना सोलन या गावात आम्हाला राहावं लागलं. Oyo वरून रात्री 10 च्या दरम्यान राहायची सोय केली.
दुसऱ्या दिवशी सकाळी सोलन या गावाचा फेरफटका मारला हे गाव मशरूम चे शहर म्हणून फेमस आहे तसेच red city म्हणून पण ओळखलं जातं कारण इथे टोमॅटो भरपूर पिकतात .
त्यानंतर आम्ही शिमला ला पोहचलो. Weekend असल्याने भरपूर गर्दी होती त्यामुळे शिमला शहरात न फिरता आम्ही गेलो जाखू मंदिर ला . हनुमान जेव्हा लक्ष्मण साठी संजविनी च्या शोधात होते तेव्हा त्यांनी ते तिथे विश्रांती साठी राहिले होते असे म्हणतात म्हणूनच तिथे त्यांचे मंदिर आणि जवळपास 108 फूट उंचीची सुंदर मूर्ती आह. तुम्ही कधी जाल तर नक्की भेट द्या .

संध्याकाळच्या वेळी आम्ही पोहोचलो कुफ्रि या गावात . कुफ्रि हे गाव बटाट्या साठी प्रसिद्ध आहे . गावाला भेट देण्यासाठी तुम्हाला घोडा घ्यावा लागतो, 500rs एकाला घेतात, वरती गेल्यानंतर तिथे बाजार आहे , telescope point आहे जिथून वैष्णोदेवी मंदीर , इंडिया चायना बॉर्डर वगैरे असे पॉईंट दिसतात म्हणे त्यासाठी पुन्हा तुम्हाला 200 ते 500 रुपये द्यावे लागतात. Apple garden फिरवण्यासाठी 500rs .

जे bachelor लोक आहेत त्यांनी शक्यतो या पॉईंट न गेललेच बरं कारण इतके पैसे मोजून तिथे पाहण्यासारखा काहीच नाही पण जर फॅमिली सोबत असाल आणि फक्त शिमला फिरणार असणार तर तुम्ही भेट द्या फॅमिली time spend करण्यासाठी जागा चांगली आहे . तिथले सफरचंद नक्कीच खा .

बाकी ट्रिप चे भाग लवकरच येतील, या भाग पाहण्यासाठी विडिओ लिंक खाली आहे न स्पिती घाटी चे येणारे भाग पाहण्यासाठी नक्की subscribe करा .....स्पॉटवर

प्रतिक्रिया

इतक्या नीरसपणे हिमालयात फिरता तुम्ही?

टवाळ कार्टा's picture

7 Jul 2019 - 5:50 pm | टवाळ कार्टा

या हिशोबाने मी जितका फिरलोय त्याबद्दल काहिही लिहिलेले नाहिये....म्हणजे मी बहुतेक शिक्षा म्हणून फिरतो असे समजून चालतो
=))

यशोधरा's picture

7 Jul 2019 - 6:00 pm | यशोधरा

लिहा की मग. लिहिल्यावर ठरवूयात. =))

विडिओ पाहिले. रस्ते भयानक आहेत. तुमचे ड्राइविंग साहसी आहे.
कॉमेंटरी हवी ,म्युझिक हळू करून दोनचार वाक्ये सांगता येतील.