पावसाळ्यात प्रवास आणि तुमची कार

मिलिंद दि.भिड़े भिलाई's picture
मिलिंद दि.भिड़े भिलाई in तंत्रजगत
18 Jun 2019 - 5:11 pm

मिलिंद भिड़े, भिलाई नगर, छत्तीसगढ़

फक्त कार ओनर्स ने वाचावे आणि व्यवहारात गरजे प्रमाणे आणावे:

पुष्कळ दा असे होते कि आपण कुठे तरी महत्वाच्या कामाने जात असतो, पाऊस येईल असे वाटत असते आणि आपण कार घेऊन बाहेर निघतो ।

आपल्या अपेक्षे प्रमाणे आपल्याला रस्त्यात पाऊस लागतो आणि आपण सहज पणे कार वाईपर चालू करतो, आणि अचानक तो वाईपर चालण बन्द होत । आता वाढत्या पावसात आपल्याला ड्राइव करायला त्रास होत असतो कारण समोर चा रस्ता स्पष्ट दिसत नाही आणि आपण गांगरतो ।

काय करावे हे माहित नसते, आणि जवळपास गैरेज ही नसते । अश्या वेळेस काय करावे हे माहित असले तर आपण हळूहळू पण सुखरूप आपल्या गंतव्या वर किंवा गैरेज पर्यन्त पोहोचु शकतो ।

कार वाईपर बन्द व्हायला सामान्यतया 2 कारण असतात ।
1. वाईपर फ्यूज उडलेला असतो ।
2. वाईपर आर्म, वाईपर मोटर च्या शाफ़्ट वर लागलेल्या ड्राइव पासून वेगळे झालेले असतात.

पहिल्या प्रॉब्लम चा उपाय सोपा आहे । कार मेन रोड पासून साइड लेन ला घ्यायची, फ्यूज बॉक्स शोधायचा, फ्यूज चेक करायचे आणि गेलेला फ्यूज रिप्लेस करायचा । फ्यूज बॉक्स च्या झाकणा च्या #आतल्या बाजूला स्पेयर #फ्यूज, फ्यूज #पुलर, आणि सर्किट #डायग्राम असते । सर्किट डायग्राम वर फ्यूज कशा साठी, कोणता, त्याची रेटिंग लिहिलेली आणि ग्राफिकली प्रिंटेड असते । फ्यूज रेटिंग फ्यूज वर अंकात: 7.5,10,15 20 अशी लिहिलेली असते ।

#टीप: नॉर्मली फ्यूज बॉक्स, कार बोनेट खाली, कार बैटरी जवळ असतो । त्याचा बॉक्स मोठा, किंवा लाम्बुळका आणि काळा असतो ।फ्यूज कवर उघडायला साइड लॉक दाबून उचलायचे असते ।

प्रॉब्लम नम्बर 2 असल्यास

कार चे वाईपर स्विच बन्द करायचे. कार च्या काचेवर मळलेला तम्बाखू वर्तमान पत्रा ने चांगला घासून लावायचा, आणि दुसऱ्या पेपर ने पुसून, #वाईपर #न #चालवता, पुढे मदत मिळेल तेथ पर्यन्त बिनधास्त पोहोचयचे. तम्बाखू घासल्या नंतर पुन्हा वाईपर चालू करायचा #नाही. घासलेल्या तम्बाखू मुळे अगदी धो धो पाऊस पड़त असला तरी काचे वर पाणी थांबत नाही आणि आपली ड्राइविंग सुखरूप होते ।

सुज्ञास हे साँगायची गरज़ नाही कि #पावसाळ्यात आपल्या कार मध्ये तम्बाखू आणि जुनि वर्तमान पत्रे ठेवावित ।

मी एकदा अश्याच परिस्थितीत सहकुटुम्ब असताना महाड़ ते भुसावळ तम्बाखू घासून पोहोचलो आणि भुसावल ला येऊन वाईपर आर्म नवे टाकले आणि पुढे छत्तीसगढ़ ला वन पीस पोहोचलो ।

पुष्कळ दा असे होते कि पावसाळ्यात कार च्या विंडस्क्रीन वर #आतून वाफ जमते । एका हाताने आतून विंडस्क्रीन सतत पुसत, सिंगल हैंड ड्राइविंग जमत नाही । अश्या परिस्थितीत कार मध्ये असलेला ए सी हीटर मोड़ वर चालू करायचा आणि "सगळे ए सी वेंट" वरती विंड स्क्रीन च्या दिशे ला वाकवायाचे आणि मस्त क्लियर विंड स्क्रीन मध्ये कार चालवून घरी किंवा गंतव्या वर शांत पणे पोहोचयचे ।

आपण वेळ देऊन पोस्ट वाचली त्या करिता धन्यवाद आणि आभार ।

आपले अनुभव ज़रूर लिहा, म्हणजे इतर लोकांना मदत होईल ।

पुनश्च आभार ।

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

18 Jun 2019 - 5:49 pm | पाषाणभेद

छान अनुभव आणि तात्पुरता उपाय सुचवलात.

पाषाणभेद's picture

18 Jun 2019 - 5:50 pm | पाषाणभेद

मिपावर स्वागत.

उपयोजकांचे आभार.

अभ्या..'s picture

18 Jun 2019 - 5:54 pm | अभ्या..

तरी म्हणले एसटीचे सगळे ड्रायव्हर दामोदर जगन्नाथ मालपाण्याचे इतके फ्यान का असतेत.
आयड्या चांगलीय. मल्टीपर्पज आहे.

सुबोध खरे's picture

18 Jun 2019 - 6:01 pm | सुबोध खरे

एक साधी पण महत्त्वाची गोष्ट.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच म्हणजे १ जूनला ( भारतात या पूर्वी साधारण पाऊस सुरु होत नाही) आपल्या मोटारीचे वायपरचे रबर तपासून घ्यावेत आणि वायपरची मोटर तपासून घ्यावी. काही वेळेस कडक उन्हाळ्यामुळे रबर खराब आणि घट्ट झालेले असते. त्यामुळे त्याने पाण्याचा निचरा नीट होत नाही. अशा स्थितीत सरळपणे ते बदलून घ्यावेत. कारण ज्याला स्वतःची कार परवडते त्याला ३०० रुपये नक्कीच परवडतात.

आपण भारतीय लोक नको तेथे चिकूपणा करण्यात पटाईत आहोत.

हीच स्थिती टायरची आणि ब्रेकची आहे. (मोटारसायकल आणि स्कुटरच्या बाबतीत तर हे फार महत्त्वाचे आहे.)

टायर जर जास्त झिजले असतील तर पावसाळ्याचे अगोदरच बदलून घ्यावेत. कारण १०० पैकी एकदा जरी अपघात झाला आणि कार ठोकली गेली तरी फटका रुपये ५००० पेक्षा जास्त पडतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jun 2019 - 10:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर माहितीपूर्ण लेखमालिका चालू आहे. अजून लिहा.

Yogesh Sawant's picture

22 Jun 2019 - 7:46 pm | Yogesh Sawant

पुष्कळ दा असे होते कि पावसाळ्यात कार च्या विंडस्क्रीन वर #आतून वाफ जमते । एका हाताने आतून विंडस्क्रीन सतत पुसत, सिंगल हैंड ड्राइविंग जमत नाही । अश्या परिस्थितीत कार मध्ये असलेला ए सी हीटर मोड़ वर चालू करायचा आणि "सगळे ए सी वेंट" वरती विंड स्क्रीन च्या दिशे ला वाकवायाचे आणि मस्त क्लियर विंड स्क्रीन मध्ये कार चालवून घरी किंवा गंतव्या वर शांत पणे पोहोचयचे ।

हि युक्ती छोट्या (हॅचबॅक) गाड्यात उपयुक्त आहे. मोठ्या (SUV) गाड्यात उपयोग होत नाही. मोठ्या (SUV) गाड्यात AC लावायचा. आमचा मारुती एस्टिलो (हॅचबॅक) आणि निसान टेरॅनो (SUV) मधला अनुभव.

चौथा कोनाडा's picture

24 Jun 2019 - 10:43 pm | चौथा कोनाडा

मोठ्या (SUV) गाड्यात उपयोग होत नाही.

म्हणजे काय ?

एसी/ब्लोअर मधला हीटर तर काचेवर आटल्याचे बाजून गरम हवा फवारतो आणि आतून वाफ जमायची थांबते. हे तुमच्या (SUV) गाड्यात होऊ शकत नाही ?

गवि's picture

24 Jun 2019 - 11:11 pm | गवि

पुष्कळ दा असे होते कि पावसाळ्यात कार च्या विंडस्क्रीन वर #आतून वाफ जमते । एका हाताने आतून विंडस्क्रीन सतत पुसत, सिंगल हैंड ड्राइविंग जमत नाही । अश्या परिस्थितीत कार मध्ये असलेला ए सी हीटर मोड़ वर चालू करायचा आणि "सगळे ए सी वेंट" वरती विंड स्क्रीन च्या दिशे ला वाकवायाचे आणि मस्त क्लियर विंड स्क्रीन मध्ये कार चालवून घरी किंवा गंतव्या वर शांत पणे पोहोचयचे ।

अगदी उलट.

पावसात जर आतला एसी (थंडावा) बंद केला तर बाहेर जास्त गार असतं. त्याने काच बाहेरून गार होऊन आतल्या बाष्पाचं (आपले उच्छवास साठून) आतून काचेवर condensation होतं आणि ते पुसत रहावं लागतं. आत हीटर लावला तर हा तापमान फरक (आत vs बाहेर) आणखीनच वाढतो. आणि काच बाहेरुन तुलनेत अधिकच थंड पडल्याने काचेवर आतल्या ह्युमीडिटीचा आणखीनच दाट जलकण थर बनतो. (आपण वाफ धरणे म्हणतो)

यावर उपाय नेमका उलट आहे. आत अत्यंत गार हवा करणे (एसी अधिक गार करुन). त्यामुळे आतली हवा बाहेरच्यापेक्षा गार होते आणि आता condensation बाहेरच्या बाजूला होतं. ते वायपरने सहज पुसलं जातं आणि पाऊस पडतच असल्यास वाहूनही जात राहतं.

मला हेच सांगायचं होतं. तुम्ही योग्य शब्दात मांडलत. धन्यवाद.

लई भारी's picture

15 Jul 2019 - 10:08 am | लई भारी

बऱ्याच कार मध्ये हे बघितले आहे आणि मी तर हा मोड नेहमी वापरतो
माझ्या माहितीप्रमाणे ते गरम हवाच फेकते आणि फुल्ल स्पीडने असेल तर लगेच काच स्वच्छ होते. मागच्या काचेला देखील असते, ज्यामध्ये काचेच्या मधून बहुधा ते सर्किट(?) फिरवलेले असते ज्यामुळे काच गरम होत असावी.
बहुधा हे बर्फ पडत असणाऱ्या ठिकाणी जास्त उपयुक्त असेल पण पावसात मला निश्चित उपयोग झाला आहे.

मला जास्त थंड सहन होत नाही त्यामुळे कधी पूर्ण गार करून बघितले नाही.

https://en.wikipedia.org/wiki/Defogger
https://www.wisegeek.com/how-can-i-keep-my-car-windows-from-fogging-up.htm

Rajesh188's picture

1 Jul 2019 - 12:25 pm | Rajesh188

जास्त पावूस झाला आणि तुम्ही आणि तुमची गाडी रस्त्या वरल्या प्रचंड पाण्यात सापडला गाडीचा जास्त हिस्सा पाण्याखाली गेला की गाडीचे दरवाजे उघडता येत नाहीत .
तेव्हा गाडी मध्ये एक हातोडा असावा जेणे करून तुम्ही हतोड्या नी काच तोडून बाहेर याल .
२६ तारखेच्या मुंबई chya प्रचंड पावसात दरवाजे न उघडल्या मुळे खूप लोकांचा जीव गेला होता

मुंबईत पावसात कारने प्रवास करताना थोडे टिकाऊ खाद्य पदार्थ आणि पेय जल कारमध्ये स्टोअर करून ठेवावे.

माझ्या पुणे सातारा प्रवासात असा प्रसंग आला होता .
रात्रीची वेळ होती मध्यम स्वरूपाचा पावूस चालू होता .
वायपर व्यवस्थित काम करत नव्हता .
अंधारात आणि vaypar ठीक नसल्या मूळ एकाठीकानी रस्त्यावर पाणी जमा होत ते दिसले नाही .
गाडी त्या पाण्यात जाताच पाण्याचा प्रचंड फवारा समोरच्या काचेवर
उडाला आणि काही वेळ रस्ता दिसणे बंद झाले.
त्या मुळे माझा गाडीवर चा ताबा सुटला पण नशीब पुढे,पाठी,बाजूला kontach वाहन नव्हतं

लई भारी's picture

15 Jul 2019 - 10:04 am | लई भारी

तंबाखूचा उपयोग भारी आहे राव! माहित नव्हतं हे!

बाकी, खरे सरांनी सांगितल्याप्रमाणे पावसाळ्याच्या सुरुवातीला सर्व गोष्टी तपासणे हाच उत्तम उपाय आहे.

बोलघेवडा's picture

15 Jul 2019 - 10:22 am | बोलघेवडा

वर राजेश यांनी म्हणल्याप्रमाणे जर तुम्ही कार मध्ये अडकलात आणि आणि दरवाजे पाण्याचे प्रेशरमुळे उघडले नाहीत तर काचा फोडाऊन बाहेर येणे हा एकाच मार्ग शिल्लक राहतो. त्यासाठी हेड रेस्ट उचकटून बाहेर काढण्याची सोय बऱ्याच कार्स मध्ये असते. त्या हेड रेस्ट ला खाली लोखंडी रॉड असतो व पुढे टोक असते जेणे करून काचा फोडणे सोपे जावे. गरज पडल्यास हा उपाय करता यावा म्हणून ही माहिती देत आहे.

https://images.app.goo.gl/d8UVxnFCqby9YUEj9

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jul 2019 - 11:27 am | डॉ सुहास म्हात्रे

चारचाकीच्या काचा, सुरक्षित आणि क्रॅश रेझिस्टंट असाव्यात यासाठी लॅमिनेटेड किंवा टेंपर्ड काचेने बनवलेल्या असतात. त्यांच्या मध्यभागावर जड वस्तूने (उदा : सर्वसाधारण हातोड्याने) आघात करून त्यांना फोडणे सहज शक्य नसते.

त्याऐवजी, एखाद्या टोकदार वस्तूने, विशेषतः खिडकीच्या कोपर्‍यातील (मध्यभागी नव्हे) काचेवर आघात करून अथवा जोर देऊन काच सहज फोडता येते.

१. कारमध्ये अडकलेल्या माणसाला, हेड रेस्ट सीटमधून बाहेर काढून तिचा खालचा टोकदार भाग, काच आणि दरवाजामध्ये खोचून काच सहज फोडता येते.

२. बाहेर काढू शकणारी हेड रेस्ट नसल्यास, गाडीची काच फोडण्यासाठी खास टोकदार स्टील हतोडा मिळतो, तो सुरक्षाव्यवस्था म्हणून गाडीत (ट्रंकमध्ये नाही) सहज हाती येईल असा ठेवावा.

३. हेच तंत्र कारच्या बाहेर असलेल्या माणसाला वापरून आतमध्ये अडकलेल्या माणसांना बाहेर काढण्यास वापरता येते. त्यासाठी, जवळपास उपलब्ध असलेला टोकदार दगड, लोखंडी कांब, सिरॅमिकचा टोकदार तुकडा, इत्यादी टोकदार वस्तू वापरून काम साधता येते.

पाण्यात अडकलेल्या चारचाकीतून सुटका करण्यासाठी खास बनवलेली खालील चित्रफीत यासंबंधी माहिती मिळविण्यास फार उपयोगी आहे...

(युटुबवरून साभार)

रेमिंग्टन's picture

25 Jul 2019 - 2:07 am | रेमिंग्टन

मला नुकताच आलेला एक अनुभव -
आम्ही सकाळीच परगावी जाण्यासाठी पार्किंगमध्ये आलो. आमचा गाडी साफ करणारा माणूस म्हणाला,"साहेब, थांबा 2 मिनिटं"
पटकन त्याने क्लिनिक प्लस शाम्पूचं सॅशे आणलं आणि माझ्या गाडीचं बॉनेट उघडून जिथून आपण पाणी भरतो त्यात रिकामं केलं.
मला म्हणाला,"आता बघा साहेब, समोरची काच एकदम स्वच्छ होईल"
मला भारी वाटलं. थोडं पुढे गेल्यावर मी स्टीयरिंगपासला काचेवर पाणी मारणारा दांडा ओढला. शाम्पूयुक्त पाणी काचेवर पसरलं. आधी तर काच एकदम स्वच्छ झाली पण नंतर जेव्हा जेव्हा पाणी मारायचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा फेसाळ पाणी काचेवर येऊन काच धुरकट दिसायला लागली. काच काही नेहमीसारखी स्वच्छ होईना. मला काय समजेना. कदाचित वायपरचे रबर्स खराब झाले असतील का?
जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावं :-)