मिपावर मुक्त लेखन विभाग सुरु करण्या विषयी.

गड्डा झब्बू's picture
गड्डा झब्बू in काथ्याकूट
6 Jun 2019 - 11:38 am
गाभा: 

मिपावर मुक्त लेखन विभाग सुरु करण्या विषयी.
सदस्य म्हणून मी इथे नवीन असलो तरी गेल्या कित्येक वर्षांपासून मिपाचा नियमित वाचक आहे. खूप चांगले लेख, कथा, कविता, चर्चा इथे वाचायला मिळाल्या आहेत. मिसळपाव, मनोगत, मायबोली, ऐसी अशा कित्येक मराठी संस्थळांवर वावर असला तरी बहुरंगी-बहुढंगी व दर्जेदार लेखनाचे प्रमाण आणि सातत्य मिपावर जास्त असल्याचे माझे निरीक्षण आहे.
सध्या काही नवोदित लेखकांच्या धाग्यांवरील प्रतिसादांमधे शुद्धलेखन, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कंपूबाजी, टिंगल टवाळी अशा विषयांवर साधक बाधक चर्चा वाचनात आली. आज माहितगार साहेब आणि आनन्दा साहेबांचे दोन प्रतिसाद वाचले आणि काही बाबी नव्याने लक्षात आल्या.
आपले विचार लेखनातून,प्रतिसादातून व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला नक्कीच आहे मग तो प्रस्थापित लेखक,वाचक असो कि नवोदित. प्रतिसादात किंगल टवाळी, हिणकस शेरेबाजी, व्यक्तिगत टीका झाली तर उदयोन्मुख लेखक,लेखिकांच्या मनोधैर्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. काही प्रसंगी हा अपराध माझ्याकडूनही घडला आहे. अशा प्रकारांमुळे लेखनातला आशय आणि विषय बाजूला पडून सदर लेखक,लेखिका संस्थळापासून किंवा लेखनापासून कायमचा दुरावण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या बाजूला पुरेशा गांभीर्याने न केलेले लेखन, प्रमाणाबाहेर असलेल्या शुद्धलेखनातील चुका, चुकीच्या शब्दयोजना आणी फेसबुक whatsapp वरील मजकुर कॉपी पेस्ट करून काढलेले धागे वाचकांचा रसभंग करताना मिपाच्या दर्जालाही घातक ठरतात.
या गोष्टी टाळण्यासाठी मिपा प्रशासनास विनंती करू इच्छितो कि इथे लेख, कविता, तंत्रजगत, कलादालन प्रमाणे मुक्त लेखन असा विभाग सुरु करावा. त्याचा आराखडा असा असावा.
मुक्त लेखन

  1. नवोदितांनी आपले लेखन थेट साहित्य प्रकारात प्रकाशित न करता आधी या विभागात करावे.
  2. हा विभाग वाचनमात्र असावा
  3. शक्य असल्यास प्रतिसाद द्या ऐवजी व्यक्तिगत संदेश पाठवा असा पर्याय उपलब्ध असावा.
  4. वाचकांनी आपल्याला अपेक्षित सुधारणा, दुरुस्त्या लेखकाला व्यक्तिगत संदेशाच्या माध्यमातून कळवाव्या.
  5. लेखकाने सुचवण्यात आलेल्या सुधारणांचा विचार करून आवश्यक असल्यास योग्य ते बदल करून मग लेखन उचित साहित्य प्रकारात प्रकाशित करावे.
  6. सुधारित लेखन प्रकाशित केल्यावर संपादक मंडळास विनंती करून मुक्त लेखन विभागातून आधीचे लेखन काढून टाकण्यास कळवावे.

असा विभाग सुरु करणे शक्य नसल्यास आपले लेखन प्रकाशित करताना त्यात "सदर लेखक नवोदित असून आपल्या सूचनांचे स्वागत आहे.वाचकांनी टीका टिप्पणी प्रतिसादात न करता व्यक्तिगत संदेशातून कळवाव्यात." असा डिस्क्लेमर असावा. धाग्यावरील धुळवड थांबण्यास याचा नक्की उपयोग होईल.
वाचकांचा व्याकरण, शुद्धलेखनाचा फाजील आग्रह नसला तरी लेखकांकडून स्वच्छलेखनाची अपेक्षा असते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी सातत्याने दर्जाहीन धागे प्रकाशित होत राहिले तर त्यावर टिंगल टवाळी होणारच.यात दोष वाचक, प्रतीसादाकांचा नसून पूर्णपणे लेखकाचा आहे.
मिपाकरांच्या सूचनांच्या प्रतीक्षेत.
जाता जाता - मुक्त लेखन साठी पर्यायी शब्द सुचवावेत.

प्रतिक्रिया

जाता जाता - मुक्त लेखन साठी पर्यायी शब्द सुचवावेत.

नवलेखन

गड्डा झब्बू's picture

6 Jun 2019 - 12:06 pm | गड्डा झब्बू

नवलेखन शब्द चांगला आहे. पण मिपावर त्याच्याशी मिलता जुळता नवे लेखन असा विभाग आधीपासून आहे.

धर्मराजमुटके's picture

6 Jun 2019 - 5:06 pm | धर्मराजमुटके

म्हणजे सकाळ वर्तमानपत्रात "मुक्तपीठ" नावाचं सदर असतं तसे काय ?

हस्तर's picture

6 Jun 2019 - 5:28 pm | हस्तर

एवढा पण नको

गड्डा झब्बू's picture

6 Jun 2019 - 6:52 pm | गड्डा झब्बू

तसच काहीसं. वाचकांनी प्रुफ रीडिंग करून दिल्याने विभागवार प्रकाशित झालेले लेखन वाचकांचा रसभंग करणार नाही अशी अपेक्षा.
रच्याक- मुक्त लेखन साठी "मुक्तपीठ" हा पर्यायी शब्द चांगला आहे

सकाळ ने मुक्तपीठ सुरू करून वाचकांसोबत एक ऋणानुबंध कायम केला आहे. आणि आता मिसळपाव सुद्धा त्याच पावलावर पाऊल टाकत आहे हे बघून अतिशय छान वाटत आहे. मिसळपावला या उपक्रमाबद्द्ल मन:पूर्वक शुभेच्छा.

नव लेखकांना ही अनेक शुभेच्छा, आम्ही तुमचे लिखाण वाचायला अत्यन्त उत्सुक आहोत.

नावातकायआहे's picture

6 Jun 2019 - 9:42 pm | नावातकायआहे

लुना वाले ब्रम्हे ईथे पण?

जॉनविक्क's picture

6 Jun 2019 - 9:49 pm | जॉनविक्क

लुना वाले ब्रम्हे ईथे पण

ये क्या बवाल है रे बमाय ?

"लुना वाले ब्रम्हे" हे काय प्रकरण आहे? मिपावरचा काही खास शब्दप्रयोग असेल तर माहित करून घ्यायला आवडेल.

आनन्दा's picture

7 Jun 2019 - 9:18 am | आनन्दा

http://michkashala.blogspot.com/2013/04/blog-post.html?m=1

इसकाळ ने उडवला तो लेख वाटतं
पण

म्हणून काय झालं

कोणीतरी ठेवला आहे ना ब्लॉगवर

हे घ्या

जॉनविक्क's picture

7 Jun 2019 - 10:02 am | जॉनविक्क

=))

हा हा हा जबरी आहेत कि हे ब्रम्हे आजोबा. त्यांचे आणखी काही विनोदी लेखन वाचायला मिळते का शोध घ्यावा लागेल :-))

चौथा कोनाडा's picture

6 Jun 2019 - 9:32 pm | चौथा कोनाडा

१. नवोदितांनी आपले लेखन थेट साहित्य प्रकारात प्रकाशित न करता आधी या विभागात करावे.

उत्तम सुचवणी

२. हा विभाग वाचनमात्र असावा

ठीक आहे, टिंगल टवाळी, हिणकस शेरेबाजी, व्यक्तिगत टीका होऊ नये यासाठी अर्थातच उपयुक्त.

३. शक्य असल्यास प्रतिसाद द्या ऐवजी व्यक्तिगत संदेश पाठवा असा पर्याय उपलब्ध असावा.

मिपा संपादक मंडळाला याच्या तांत्रिक बाजू बघाव्या लागतील. ते शक्य नाही असे समजल्यास काय पर्याय आहे हे तपासावे लागेल.

४. वाचकांनी आपल्याला अपेक्षित सुधारणा, दुरुस्त्या लेखकाला व्यक्तिगत संदेशाच्या माध्यमातून कळवाव्या.

मिपाकर लगेच प्रतिसाद आणि मुक्त चर्चा करण्याला करण्याला प्राधान्य देतात, हेच आवडते असे निरीक्षण आहे
(मी स्वतः आता पर्यंत खूपच जणांना व्यनि केला आहे) त्यामुळे हा पर्याय कोण वापरणार हा प्रश्नच आहे.

५. लेखकाने सुचवण्यात आलेल्या सुधारणांचा विचार करून आवश्यक असल्यास योग्य ते बदल करून मग लेखन उचित साहित्य प्रकारात प्रकाशित करावे.

हे लेखकाने केले तर उपयोग आहे, नाही तर सुचवण्या / व्यनि करणाऱ्या मिपाकरांचे कष्ट वाया जातील.
याला जर प्रतिसादड नाही मिळाला तर हा विभाग लवकरच बंद पडेल.

६. सुधारित लेखन प्रकाशित केल्यावर संपादक मंडळास विनंती करून मुक्त लेखन विभागातून आधीचे लेखन काढून टाकण्यास कळवावे.

याने मिपा संपादक मंडळाचा कार्यभार वाढेल. त्यांची संमती असेल तरच हे शक्य होईल.

यापेक्षा लगेच लेखनाची घाई ना करता, काही काळ वाचनमात्र राहून जे लिहीन ते शुध्द, सुसंबद्ध, सखोल, तर्कशीर, दर्जेदार लिहीन हे ठरवल्यास आहे त्या सेटअप मध्ये लेखन करता येईलच की !

मी मिपावर पाच वर्षे वाचनमात्र होतो, पण नंतर जे काही मोजके लिहिले ते वरील मुद्दे डोळ्यापुढे ठेवून लिहिले. उत्त प्रतिसाद आणि कौतुक वाट्याला आले.

मिपा म्हणजे फेसबुक अथवा व्हाट्सएप्प नाही कि सभासद येतील आणि नुसते लाईक करून जातील हे ध्यानात घेणे गरजेचे आहे.

गड्डा झब्बू's picture

7 Jun 2019 - 8:56 am | गड्डा झब्बू

+101

इरामयी's picture

24 Jun 2019 - 7:28 pm | इरामयी

मला हे नाही पटत. असं करणं म्हणजे आंम्ही (उच्च दर्जाचे लेखकु) आणि इतर (तुच्छ नवोदीत!) अशी विभागणी होऊ शकेल भविष्यात अश्या नियमामुळे.

मिसळपाववरची आजवरची पद्धत -- जे लेख दर्जेदार नाहीत त्यांना प्रतिसाद मिळत नाही किंवा टिकेला सामोरं जावं लागतं -- हीच जास्त बरोबर आहे. त्यात्च जास्त मोकळेपणा आहे, नव्या लेखनाला उत्तेजन आहे. असा नवा सेक्षन काढून कंपूबाजीला चालना मिळेल.... असं मला तरी वाटतं.

(उच्च दर्जाचे लेखकु) आणि इतर (तुच्छ नवोदीत!) अशी विभागणी होऊ नये आणि जे लेख दर्जेदार नाहीत त्यांना टिकेला सामोरं जावं लागू नये हीच अपेक्षा आहे यामागे!!!

श्वेता२४'s picture

7 Jun 2019 - 12:49 am | श्वेता२४

यापेक्षा लगेच लेखनाची घाई ना करता, काही काळ वाचनमात्र राहून जे लिहीन ते शुध्द, सुसंबद्ध, सखोल, तर्कशीर, दर्जेदार लिहीन हे ठरवल्यास आहे त्या सेटअप मध्ये लेखन करता येईलच की !/code>
+१
कसं आहे की, मीही मिपावर नवीनच आहे. टंकताना माझ्याकडूनही चुका होतात. झाल्या आहेत. पण त्या नकळत घडल्या व वाचकांनाही ते कळते. त्यामुळेच कोणी त्याचा बाऊ करत नाही. पण काही जण शुद्धलेखनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, सांगूनसुद्धा अशुद्ध लिहीत आहेत याला कोडगेपणा म्हणतात. आपल्या अशुद्ध लिहीण्याचा दुसर्याला होणारा त्रास पाहून या लोकांना विकृत आनंद होत असावा. अशा विकृत प्रवृत्तीचे समर्थन कसे केले जाऊ शकते? कारण शुद्ध लिहीले नाही तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. मी इथे मुद्दाम अशुद्ध लिहून प्रतिसाद दिला आहे. आणि शेवटी असे धागे यापुढे न वाचण्याचा पर्याय वाचकांसमोर आहेच. त्यापेक्षा सं.मं.ने जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या उद्देशाने काढलेले धागे ओळखून वेळीच उडवून टाकावेत किंवा वाचनमात्र करावेत

टवाळ कार्टा's picture

7 Jun 2019 - 12:54 am | टवाळ कार्टा

त्यापेक्षा सं.मं.ने जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या उद्देशाने काढलेले धागे ओळखून वेळीच उडवून टाकावेत किंवा वाचनमात्र करावेत

लैच अपेक्षा ;)

श्वेता२४'s picture

7 Jun 2019 - 10:22 am | श्वेता२४

अशा आयडींना धागा काढण्याची किंवा प्रतिसाद देण्याची सोय काही काळ बंद ठेवावी.

>>> पण काही जण शुद्धलेखनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, सांगूनसुद्धा अशुद्ध लिहीत आहेत याला कोडगेपणा म्हणतात. आपल्या अशुद्ध लिहीण्याचा दुसर्याला होणारा त्रास पाहून या लोकांना विकृत आनंद होत असावा. अशा विकृत प्रवृत्तीचे समर्थन कसे केले जाऊ शकते? कारण शुद्ध लिहीले नाही तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो.>>>
सहमत. चांगल्या सूचनांना प्रतिवाद करत हट्टाने अशुद्ध लिहून वर मी असेच लिहिणार तुम्हाला वाचायच तर वाचा असा पवित्रा घेऊन लिहित राहणे हि अभिव्यक्ती नाही तर दुराग्रह आहे. अशा विकृत प्रवृत्तीचे समर्थन केले जाऊ शकत नाही. अशा धाग्यांवर टिंगलटवाळी झाल्यास त्याचा निषेध करण्याचा नैतिक अधिकार लेखक आणि त्याचे समर्थक दोघांनाही नाही.

कुमार१'s picture

7 Jun 2019 - 11:12 am | कुमार१

+ ११

चौकटराजा's picture

7 Jun 2019 - 11:43 am | चौकटराजा

मी लेखन केल्यावर ते काळजीपूर्वक तपासून न घेता पोस्ट करतो . देवनागरी टंकताना श्री लिपी हे निर्दोष आहे पण ते येथे उपलब्ध नाही . सूचित शब्दात काही शब्द इतके वेगळे भलते येतात की असा शब्द चुकून दुरूस्त करायचा राहिला तर आपले हसेच व्हावे .परंतु अर्थ बदलत नसेल किंवा व्हिजुअली शब्द खटकत नसेल तर शुद्ध लेखनाचा दुराग्रह कोणी करू नये . उदा पाणी हा शब्द चुकून पानी असा झाला तर लगेच बोंबाबोंब नको मात्र तो पानि असा झाला तर मात्र युक्त नाही . गुगल मधून टंकताना तर हा शब्द कितीतरी वेळा तारा असा टंकला जातो असा शब्द आळसाने दुरुस्त करावयाचा राहिल्यास काही खरे नाही. सूचित शब्द ही सोय असली तरी ती तशी धोकादायक आहे याचा प्रत्यय व्हॉटस आप वर फार वेळा येतो. आता हेच पहा ना मला आप असंच टाईप करता आले . त्याचा खरा शब्द सूचित शब्दात एखादे वेळी सापडेल तर दुसऱ्या वेळी नाही .

काही गोष्टी समजुन घ्यायला फार कठीण असतात

आता मागच्या वाक्यात जू च जु झालाय
तिथपर्यन्त ठीक आहे
चु झाला तर

तसेच लेखनात वाक्यामध्ये योग्य विरामचिह्न वापरणे
किती महत्वाचे आहे याचा मी आता इथे जे लिहितोय
त्यावरून अन्दाज यावा

मला शुद्ध लेखनाबद्दल फारसा आक्शेप नाही
तंकताना काही चुका होतातच
प्रूफ रीडिन्ङ करायाल प्रत्येकाला वेल असेलच असे नाहे

पण म्हणून डायरेक्ट बेसिक सुवाच्य लेखनाचा आग्रह धरणार्याना
प्रतिगामी म्हणून संबोधने जर अति होते असे नाही का वातत

टीप - ही सत्याग्रहाची नवीन पद्धत आहे. नाइलाज आहे.

सहमत . बाकी मी कुणाला प्रतिगामी वगैरे म्हटले नाही माझया वाक्यात दुराग्रह याचा अर्थ चिकित्सक पणा असा आहे ! आता यातलाच माझ्या हा शब्द घ्या तो सॉफ्टवेअर ने ,माझया असा आला आहे . अर्थात मी तो माझ्या येईपर्यंत लढले पाहिजे हे खरेच !

चौकटराजा's picture

7 Jun 2019 - 3:54 pm | चौकटराजा

वरील माझया ,माझ्या वगैरे बोल्ड किंवा अवतरणा मध्ये हवेत .. हीच वाईट मला लागली आहे ,यावर काम केले पाहिजे !

गड्डा झब्बू's picture

7 Jun 2019 - 5:13 pm | गड्डा झब्बू

>>>मी लेखन केल्यावर ते काळजीपूर्वक तपासून न घेता पोस्ट करतो .>>> अवघड आहे मग :-))
>>>उदा पाणी हा शब्द चुकून पानी असा झाला तर लगेच बोंबाबोंब नको मात्र तो पानि असा झाला तर मात्र युक्त नाही .>>>
तेच म्हणतोय शुद्धलेखनाचा अवाजवी आग्रह नाही पण स्वछ्लेखन अपेक्षित असते वाचकाला.

प्रतिसाद बदलण्यासाठी अगदी अजिबात नाही किंवा कायम संपादन देण्यापेक्षा ४८ तास दिले पाहिजे.

या विभागातले धागे वाचनमात्र असावेत अशी अपेक्षा आहे. वाचकांनी सुधारणा व्यक्तिगत संदेशातून द्याव्या.

चौकटराजा's picture

7 Jun 2019 - 5:44 pm | चौकटराजा

मूळ लेखन बदलण्यासाठी काही तासाची मुभा असावी .

गड्डा झब्बू's picture

7 Jun 2019 - 5:53 pm | गड्डा झब्बू

काही तास कमी पडतील काही दिवसांची मुभा असावी.

ते मोकलाया चे क्रांतिकारक कवी कुठे आहेत, पैला मान त्यांना.

प्रकाश घाटपांडे's picture

9 Jun 2019 - 2:30 pm | प्रकाश घाटपांडे

मिपाच्या इतिहासातील सोनेरी पान आहे ते