काहि समजुति................ .........................

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
4 Jun 2019 - 3:00 pm
गाभा: 

काहि समजुति................
.........................
शनिवारी चणे-फुटाणे खाउ नये, नाहीतर गरिबी येते...... याला आधार कृष्ण-सुदाम्याच्या गोष्टीचा दिला आहे. कृष्ण-सुदामा गुरुगृही एकदा जंगलात गेले असतांना वादळी पावसात अडकले होते. त्यांनी एका झाडाचा आश्रय घेतला. सुदाम्याला गुरुपत्नीने दिलेले ओले चणे/ हरबरे त्याने एकट्याने खाउन टाकले, श्रीकृष्णाला दिले नाही. म्हणुन त्याला गरिबी आली
१)फळं झेलु नये, नाहीतर महाग होतात.
२)जेवायला वाढतांना पोळी बोटांमधे कात्रीसारखी पकडु नये.
३)अन्नाचा घास खातांना एक बोट(तर्जनी) उंचावत मुखात घालु नये.
४)जेवतांना डावा हात जमिनीवर ठेउन जेउ नये.
४) टीफीन देतांना त्यात ३ चपात्या देउ नये. २ किंवा ४ द्याव्या. तीनच चपात्या खाणारा असला तर एका चपातीचं तुकडा मोडुन ठेवावा. याचं कारण म्हणे कुणी 'गेल्यावर' ३ र्या दिवशी 'सावडायला' जातांना स्मशानात नैवेद्य ठेवावा लागतो, त्यात ३ पोळ्या देतात म्हणुन.
५)खुर्चीवर बसुन पाय हलवु नये
६)डाव्या हाताने कुठलिही वस्तू ठेवू नये. ती हरवते वा नंतर लवकर सापडत नाही
७)अंघोळ झाल्यावर बादली पूर्ण रिकामी करु नये,.थोडं तरी पाणी ठेवावं..
..एका दिवसात २ अंघोळी करु नये..
८)शनिवारी मीठ व तेल आणू नये. हातावर मीठ देवू नये. मीठ उसने मागू नये. संध्याकाळी दूध विरजण्यास लावू नये. रविवारी दही घूसळू नये. तेल तूप एकत्र विकत आणू नये. निरसं दूध तसेच तापविण्यास ठेवू नये. आधी पातेल्यात चमचाभर तरी पाणी टाकावे व मग दूध पातेल्यात तापविण्यास टाकावे. त्यामुळे दूभत्या गायीची वा म्हशीची कास जळत नाही. संध्याकाळी लाल मिरची कूटू नये. अशा अजूनही जुन्या समजूती आहेत.
९)पैसे देण्याघेण्याचा व्यवहार उजव्या हातानेच करावा.
बोटाच्या कात्रीत पैसे पकडु नयेत
आपण पण धागा पुढे न्यावा आपले अनुभव लिहित जावेत

22नंदू शिंदे, अभिजीत परांजपे and 20 others
12 comments
1 share
Like

प्रतिक्रिया

दारू पिण्याअगोदर दोन थेबं शिंपडन्याचे कारण काय असावे ?

सुबोध खरे's picture

4 Jun 2019 - 7:46 pm | सुबोध खरे

मिपा वर जिलब्या टाकू नये

22नंदू शिंदे, अभिजीत परांजपे and 20 others
12 comments
1 share
Like

?????????????

हस्तर's picture

4 Jun 2019 - 7:50 pm | हस्तर

https://www.maayboli.com/node/44800?page=1

झक्की, आणि कात्रीत (दोन बोटात ओढताना पकडतो तशी पकडलेली) सिगरेट द्यायची नाही दुसर्‍याला हे नव्हते का तुमच्या काळी? त्याने म्हणे भांडणे होतात.

Submitted by टवणे सर on 23 August, 2013 - 11:55
टिटवीचं ओरडणं, पालीचा चुकचुकाट अशुभ
भारद्वाज पक्षी दिसणं, सापसुरळीच्या शेपटीला हात लावणं अतिशय लाभदायक
पोपट, ससे, माकड पाळणं अशुभ
चिचुंद्री घरात असणं शुभ
शनिवारी चणे-फुटाणे खाउ नये, नाहीतर गरिबी येते. (हे माझी आई अजुनही पाळते). याला आधार कृष्ण-सुदाम्याच्या गोष्टीचा दिला आहे. कृष्ण-सुदामा गुरुगृही एकदा जंगलात गेले असतांना वादळी पावसात अडकले होते. त्यांनी एका झाडाचा आश्रय घेतला. सुदाम्याला गुरुपत्नीने दिलेले ओले चणे/ हरबरे त्याने एकट्याने खाउन टाकले, श्रीकृष्णाला दिले नाही. म्हणुन त्याला गरिबी आली वै.वै. आणि तेव्हा शनिवार होता!
बाप्रे काय काय आणि कुठे संदर्भ लावतात हे जुने लोक!!

१)फळं झेलु नये, नाहीतर महाग होतात.
२)जेवायला वाढतांना पोळी बोटांमधे कात्रीसारखी पकडु नये.
३)अन्नाचा घास खातांना एक बोट(तर्जनी) उंचावत मुखात घालु नये.(आमची आज्जी खाटकन लाटणं/ उलथनं फेकुन मारायची असं केलं तर. Sad )
४)जेवतांना डावा हात जमिनीवर ठेउन जेउ नये.
४) टीफीन देतांना त्यात ३ चपात्या देउ नये. २ किंवा ४ द्याव्या. तीनच चपात्या खाणारा असला तर एका चपातीचं तुकडा मोडुन ठेवावा. याचं कारण म्हणे कुणी 'गेल्यावर' ३ र्या दिवशी 'सावडायला' जातांना स्मशानात नैवेद्य ठेवावा लागतो, त्यात ३ पोळ्या देतात म्हणुन. Uhoh
५)खुर्चीवर बसुन पाय हलवु नये (मुलींनी तरी)

अशी अनेक बंधनं होती आम्हाला लहानपणी.

Submitted by मी_आर्या on 24 August, 2013 - 01:03
ग्रहण चालू असताना सर्व खाद्य पदार्थ, पाण्याची भां

जालिम लोशन's picture

4 Jun 2019 - 11:10 pm | जालिम लोशन

शेवटी काय कुतुहल जागे झाले म्हणजे झाले. कुठे copy right आणी plagarism check करायचे आहे?

वामन देशमुख's picture

4 Jun 2019 - 11:24 pm | वामन देशमुख

नाव व आडनाव जोडून लिहू नये. दोन्हीत किमान एक अंडरस्कोअर तरी द्यावा.
नाहीतर अश्या व्यक्तीने पाडलेल्या जिलेबीची लिहिलेल्या लेखाची इतर मिपाकर टर उडवतात.

वामन देशमुख's picture

4 Jun 2019 - 11:28 pm | वामन देशमुख

बीअर थेट बाटलीने पिऊ नये.
तसेच ती (बीअर) ग्लासात ओतताना (त्या ग्लासाच्या) भिंतीलगत ओघळेल अशी ओतावी, फेस होऊ देऊ नये.

प्रलयनाथ गेंडास्वामीं's picture

5 Jun 2019 - 12:30 pm | प्रलयनाथ गेंडास...

तंदूरी अथवा फ्राईड चिकन , हे त्याच्या स्किन सकट खाल्ले पाहिजे ...
(स्किन बाजूला काढून, कबाब खाण्याचा आगचोरपणा करू नये )

वामन देशमुख's picture

4 Jun 2019 - 11:31 pm | वामन देशमुख

संध्याकाळी शुभंकरोती म्हणावी, आणि आपल्या घरात लहान मुले (मुलगे आणि मुली) असतील तर त्यांच्याकडून परवचा म्हणवून घ्यावा.

वामन देशमुख's picture

4 Jun 2019 - 11:34 pm | वामन देशमुख

चांगल्या लोकांनी इतरांशी नेहमी खरे बोलावे, शक्यतो खोटे बोलू नये.
© वामन देशमुख

वामन देशमुख's picture

4 Jun 2019 - 11:40 pm | वामन देशमुख

शय्येवर* झोपताना शक्यतो दक्षिणेकडे* मस्तक करून झोपावे.

शय्येवर* म्हणजे अंथरुणावर किंवा इतर कुठेही.
*दक्षिणेकडे म्हणजे, दक्षिण या दिशेकडे, दक्षिणा या द्रव्याकडे नव्हे.

टवाळ कार्टा's picture

5 Jun 2019 - 4:14 am | टवाळ कार्टा

मिपा संपादकांना श्या देउ नये....जसा सचिन ज्या चेंडूला आउट व्हायचा तो नेहमी अप्रतिम"च" असतो त्याप्रमाणेच मिपासंपादक पदावरची व्यक्ती "गंभीर, साक्षेपी, विचारवंत, निरपेक्ष, धीरोदात्त, धडाडीचा, कुशाग्र बुध्दीमत्तेचा, डायनामिक, भरपूर वेळ असणारा आणि पुण्यामुंबईतला" अशी सर्वगुणसंपन्न असते =))

हे आमचे (म्हणजे माझे) नाही मच्याच एका मिपाकर मित्राचे मत आहे ;)

ट्रम्प's picture

5 Jun 2019 - 11:35 am | ट्रम्प

डायरेक्ट सम्पादकांच्या धोतराला हात ?
/\ /\

आनन्दा's picture

5 Jun 2019 - 11:48 am | आनन्दा

ही पण एक जुनी समजूत ---

शिळ्या कढीला ऊत आणून त्यात जिलबी सोडल्यास बुडाला आग लागते

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Jun 2019 - 4:11 pm | ज्ञानोबाचे पैजार

- आपल्या ग्लासातली दारु झाडाच्या कुंड्या मधे गुपचूप ओतू नये, त्यामूळे पुढचा जन्म गांडूळाचा मिळतो

- चखणा फुकट असला तरी जेवणा ऐवजी खाउ नये, असे केल्याने पुढच्या वेळी वेटर चखणा देत नाही किंवा नुसता मक्याचा चिवडा देतो

- बियर मधे रम किंवा व्हिस्कीत वाईन मिसळून पिउ नये, असे लोक पुढच्या जन्मी गाढव बनतात.

-आपल्या ग्लासातली दारु हळूच मित्रांच्या ग्लासात ओतू नये, पुढच्या जन्मी पीएमपीएमलच्या लेडीज स्पेशल बस मधे कंडक्टर ची ड्युटी मिळते.

-डोलकर मित्रांना चुकिच्या पत्यावर सोडू नये, याच जन्मी बायको आणि गर्लफ्रेंड घट्ट मैत्रीणी होतात

-चार पाच पतियाळा पेग पोटात गेल्यावर गच्चीचे कठडे, बसचा दरवाजा किंवा स्टेजच्या कडेला उभे राहू नका खाली पडाल.

-मद्यपान केल्यावर मैत्रीणीच्या अंगलट करु नये, ती जोरात थप्पड ठेउन देण्याची शक्यता आहे. (तिने सुध्दा दोन पेग घेतले असले तरी)

-दारु ही दारुसारखीच प्यावी, त्यात उगाच मिरचिचा ठेचा, सिगरेटची राख असले काही घालून आपण कसले अट्टल बेवडे आहोत असे दाखवायचा प्रयत्न करु नका अंगाशी येईल, असे केल्यास पुढच्या वेळी तुम्हाला डूप्लिकेट माल मिळेल.

- दारु न पिणार्‍यांची दारु पिताना टवाळी करु नये, एक तर तेच शेवटी तुमच्या उपयोगाला येणार असतात, आणि असे केल्यास राहु वक्री होउन घरी जाताना बॉस भेटण्याची शक्यता वाढते.

पैजारबुवा,

उशिरा सुचलेले शहाणपण वाटसपवर टाकून इतरांना सावध करू नये. त्यांचं त्यांना लवकर/उशिरा सुचू द्यावे.

पिकनिकमध्ये अर्धवटपणा करत राहिल्याने लोकप्रियता वाढते.