हे मला माहित नव्हते!! आपणास??

फुटूवाला's picture
फुटूवाला in काथ्याकूट
29 May 2019 - 10:22 am
गाभा: 

गेल्या आठवड्यात माझं बँक ऑफ बडोदाचे एटीएम कार्ड हरवले. माझ्या लक्षात येताक्षणी मी ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून तात्काळ ब्लॉक केलं आणि नवीन एटीएम कार्डसाठी साठी नोंदणीसुद्धा केली.
छोटासा व्यवसाय असूनही माझे सगळे कलाईन्ट कॅशलेस व्यवहार करतात. मलाही सोपं वाटत ते. पण स्वॅप मारायला कार्डच नसेल तर लोचा झाला. नवीन कार्ड यायला पंधरा दिवस लागणार हे माहीतच होतं.
तर माझी पंधरा दिवसांसाठीची फरफट सुरु झाली. महिनाअखेर असल्याने येणारे पैसे मागत सुटलो. ते बँकेत जमाही होत गेले. पण काढणार कसे? एक युक्ती सुचली कि मित्राच्या अकॉउंटला टाकून त्याच्याकडून घ्यावे. एकदा केलंही. पण प्रत्येक वेळी कोणता मित्र आपल्यासाठी रिकामा असणार.
काल बँकेत गेलो आणि कार्ड डिलिव्हरीचं स्टेटस विचारलं तर ते म्हणाले पुढील पंधरा दिवसांत पत्त्यावर येऊन जाईल. थंडगार एसी मध्ये बसून पंधरा दिवस बोलताना त्यांना काहीच वाटत नाही. वाटणार तर कशाला? वेळ माझी गंडलीय. मग मी त्यांना पासबुक साठी नोंदणी केली तर किती दिवसात येईल विचारले. उत्तर आलं तात्काळ मिळेल. अरे वाह!!! करा नोंदणी अन द्या पासबुक म्हणालो. ते म्हणाले पासबुक पाहिजे कशाला? मी-पैसे काढायला! ते- त्याची गरज नाही.
माझ्यासाठी नवीन माहिती पुढीलप्रमाणे.... जर कार्ड नसेल आणि पासबुकही नसेल तर तुमच्या बँकेच्या कोणत्याही ब्रॅन्चमध्ये कसलीही स्लिप ना भरता फक्त आधार किंवा पॅन दाखवून बायोमेट्रिक पद्धतीने पैसे काढता येतात.

प्रतिक्रिया

गवि's picture

29 May 2019 - 11:43 am | गवि

अनेक बँकांत इंटरनेट बँकिंगद्वारे कोणत्याही मोबाईलफोनवर पैसे ट्रान्सफर करून आलेल्या कोड्सचा वापर करून एटीएममधून कार्ड (किंवा खातेही) नसताना थेट विथड्रावल करता येतं. बँक ऑफ बरोडामध्येही ही सोय आहे असं आंजावर दिसतंय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 May 2019 - 3:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

अरे वाहमहमहिति,माहि,

गेला बाजार तुम्ही चेक बुक नाही वापरत का मालक? सेल्फ ने लगी निघतात.

एकुलता एक डॉन's picture

30 May 2019 - 11:00 am | एकुलता एक डॉन

लगेच दुस्र्य बन्केत नविन खाते खोला व पाइसे त्रन्स्फेर करा

चाणक्य's picture

30 May 2019 - 11:30 am | चाणक्य

तुम्हाला चेकबुक म्हणायचय का ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 May 2019 - 12:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

१. जर कार्ड नसेल आणि पासबुकही नसेल तर तुमच्या बँकेच्या कोणत्याही ब्रॅन्चमध्ये कसलीही स्लिप ना भरता फक्त आधार किंवा पॅन दाखवून बायोमेट्रिक पद्धतीने पैसे काढता येतात.

तुमच्या नेहमीच्या बँकेतील मॅनेजर तुम्हाला कोणतीही फोटो आयडी (उदा : ड्रायव्हिंग लायसेन्स) स्वीकारून एक "लूज चेक (एक चेक)" देऊ शकतो. तो बेअरर चेकच्या स्वरूपात वापरून खात्यातून नकद काढता येते.

२. सावधगिरी म्हणून दोन बँकांत खाते ठेवावे, म्हणजे ऐनवेळेस अडचण होणार नाही.

फुटूवाला's picture

30 May 2019 - 5:13 pm | फुटूवाला

माहितीबद्दल धन्यवाद..!

हस्तर's picture

31 May 2019 - 1:52 pm | हस्तर

withdrawal slip ??

भीमराव's picture

1 Jun 2019 - 6:54 pm | भीमराव

आमच्या गावात महाराष्ट्र ब्यांकेने दोन कार्यकर्ते नेमले आहेत. जे बायोमेट्रीक मशीन घेऊन घरोघरी जाऊन पैसे देने घेणे व्यवहार करतात. त्यात त्यांना टक्के वारी मधे लाभ भेटतो. एक प्रकारचा फिरता एटीएम प्रकार

चौथा कोनाडा's picture

3 Jun 2019 - 1:22 pm | चौथा कोनाडा

ही टक्केवारी त्यांना बँकेकडून मिळत असेल ना ? की खातेदाराकडून घेतात ?

ते तपासून पहायला हवे, नाही तर आमच्या पैशातूनच आमाला मुंबई दाखवत असले म्हणजे झालं.

लई भारी's picture

3 Jun 2019 - 1:14 pm | लई भारी

परवाच कुठेतरी वाचलं की YONO अँप वरून काहीतरी code generate करून जवळच्या एटीएम मधून विना कार्ड पैसे काढता येतात.
प्रत्येक बँकेची अशी काही सुविधा आहे का बघायला हवी. म्हणजे शाखेत न जाता पैसे मिळवण्यासाठी.

चौथा कोनाडा's picture

3 Jun 2019 - 1:21 pm | चौथा कोनाडा

माहितीपुर्ण धागा !

अशी वेळ आली कधी तर याचा उपयोग नक्कीच होईल.