लोकसभा निवडणूक निकाल २०१९

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in काथ्याकूट
23 May 2019 - 6:09 am
गाभा: 

नमस्कार मिपाकरहो!

यावर्षीची लोकसभा सार्वत्रिक निवडणूक खूपच चुरशीची झाली आहे आणि आज या निवडणुकीचा निकाल घोषित होणार आहे. वेगवेगळ्या संस्थांनी एग्झिट पोलच्या माध्यमातून आपापले अंदाज वर्तवले आहेत. ते कितपत खरे ठरतात याची उत्सुकता आहे. संदर्भासाठी ते अंदाज इथे देत आहे.

Poll_of_Polls
https://images.indianexpress.com/2019/05/national.jpg

सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि हळूहळू चित्र स्पष्ट होत जाईल. या निकालासंबंधीची चर्चा, अपडेट्स, बातम्या यांसाठी हा धागा सुरु करत आहे.

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

23 May 2019 - 8:08 am | उगा काहितरीच

निकाला कोणत्या साइटवर व्यवस्थित पहायला मिळेल ? गूगल च्या होमपेजवर (election live update) असं टाकल्यावर जे दिसतंय त्यात सगळे पक्ष आहेत , मोबाईल वरून पहायला थोडं अवघड आहे. त्यापेक्षा NDA , UPA ,Other असं पाहिजे सरळसरळ.

वामन देशमुख's picture

23 May 2019 - 8:32 am | वामन देशमुख

लोकसत्ता, टाइम्स ऑफ इंडिया, झी न्यूज इ. साइटवर बऱ्यापैकी माहिती आहे.

प्रसाद_१९८२'s picture

23 May 2019 - 8:37 am | प्रसाद_१९८२

Nivadnuk Ayogachi Website paha.

वामन देशमुख's picture

23 May 2019 - 8:42 am | वामन देशमुख

बरोबर आहे, निवडणूक आयोगाच्या साइटवर अधिकृत माहिती मिळेलच, तिथे घोषित निकाल दिसतील पण कदाचित निकालपूर्व कल दिसणार नाहीत.
https://results.eci.gov.in

क्षमा करा, निवडणूक आयोगाच्या या साइटवर निकालांचा कलदेखील उपलब्ध आहे.
https://results.eci.gov.in/pc/en/partywise/index.htm

गड्डा झब्बू's picture

23 May 2019 - 8:58 am | गड्डा झब्बू
प्रसाद_१९८२'s picture

23 May 2019 - 8:19 am | प्रसाद_१९८२

BJP+ ----- 42
Congress + 8
Others ------- 12
SP+BSP---------4

वामन देशमुख's picture

23 May 2019 - 8:37 am | वामन देशमुख

सद्यस्थिती - ८:३५
लोकसभा - २१४/५४२
रालोआ - १३०
संपुआ - ५७
इतर - २७

वामन देशमुख's picture

23 May 2019 - 9:18 am | वामन देशमुख

BTW,
लोकसभेच्या ५४३ पैकी ५४२ जागांवर निवडणूक होत आहे.
तामिळनाडूतल्या वेल्लोर या मतदारसंघात प्रचंड प्रमाणात रोख रक्कम सापडल्यामुळे एप्रिल महिन्यातच तेथील निवडणूक रद्द करण्यात आली होती.

BTW,
लोकसभा निवडणूकांसोबतच आंध्रप्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांच्या विधानसभा निवडणूकादेखील होत आहेत. तेथील स्थिती याप्रमाणे -

आंध्रप्रदेश - १०१/१७५
(सत्ताधारी) तेलुगु देशम - १२
वाइएसाआर काँग्रेस - ८८
इतर - १

ओडिशा ४३/१४६ -
(सत्ताधारी) बिजद - ३०
भाजप - १०

अरुणाचल प्रदेश ११/६० -
(सत्ताधारी) भाजप - ९
इतर - २

सिक्कीम ६/३२ -
(सत्ताधारी) सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट - २
सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा - ४

महाराष्ट्रातील हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत पाटील काँग्रेसच्या सुभाष वानखेडेपेक्षा आघाडीवर आहेत.
शिवसेना सोडल्यापासून सुभाष वानखेडे यांचं नशीब काही ठीक दिसत नाही. २०१४ साली भाजपात असताना ते कॉंग्रेसकडून हरले आणि आता काँग्रेस मध्ये राहून बहुदा शिवसेनेकडून हरतील.

विजुभाऊ's picture

23 May 2019 - 10:39 am | विजुभाऊ

बारामती , मावळ , शिरुर , सातारा येथे धक्कादायक निकाल लागती असे ऐकतो आहे.
काय अवस्था आहे तेथे

वामन देशमुख's picture

23 May 2019 - 10:54 am | वामन देशमुख

बारामतीत सुप्रिया सुळे यांची २५ हजाराहून अधिक मतांची आघाडी
मावळात शिवसेनेचे यांची 80000 मतांची आघाडी
साताऱ्यात उदयनराजे भोसले ८००० आणि शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे रामसिंग कोल्हे हे १३००० ने आघाडीवर.

तथापि, यात मला व्यक्तिशः धक्कादायक काही दिसत नाहीय, काही चुकतंय का?

महासंग्राम's picture

23 May 2019 - 10:59 am | महासंग्राम

रामसिंग कोल्हे हे अमोल कोल्हेंच्या वडिलांचं नाव आहे

वामन देशमुख's picture

23 May 2019 - 11:09 am | वामन देशमुख

व्हय व्हय, चुकून मिष्टेक झाली!
उमेदवारांचे पुर्ण नाव अमोल रामसिंग कोल्हे असे आहे.

वामन देशमुख's picture

23 May 2019 - 10:41 am | वामन देशमुख

महाराष्ट्रात २०१४ साली काँग्रेसची लाज राखणारे दोन लोकसभा मतदारसंघ म्हणजे नांदेड आणि हिंगोली. यापैकी हिंगोलीत शिवसेना आणि नांदेडात भाजप थोडीशी आघाडीवर अशी सद्यस्थिती आहे. नांदेडात अशोक चव्हाणांना भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर हे टफ फाईट देत आहेत.

महासंग्राम's picture

23 May 2019 - 10:57 am | महासंग्राम

सोलापुरात तिरंगी लढत, जय सिध्देश्वर महास्वामी आघाडीवर; सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर पिछाडीवर

वामन देशमुख's picture

23 May 2019 - 11:05 am | वामन देशमुख

सध्यातरी तीन आकडी संख्या गाठणारा एकमेव पक्ष भाजप आहे.
दोन आकडी संख्या गाठणारे पक्ष - शिवसेना, काँग्रेस, बसपा, बिजू जनता दल, जदयु, तृणमूल काँग्रेस, डीएमके, आणि वाइएसआर काँग्रेस पक्ष.

वामन देशमुख's picture

23 May 2019 - 11:34 am | वामन देशमुख

५४२/५४२
रालोआ - ३३१ (भाजप - २९, शिवसेना - २०)
संपुआ - १०१ (काँग्रेस - ५०)
इतर - ११०

वामन देशमुख's picture

23 May 2019 - 11:35 am | वामन देशमुख

५४२/५४२
रालोआ - ३३१ (भाजप - २९१, शिवसेना - २०)
संपुआ - १०१ (काँग्रेस - ५०)
इतर - ११०

चौकटराजा's picture

23 May 2019 - 12:02 pm | चौकटराजा

योगेंद्र यादव याचे भविषय - मोदी लाट असेल
प्रकाश आंबेडकर यांची भीती - काँग्रेस दुभंगेल .. ( गांधी घराण्याची हाकालपट्टी होईल ?)

महाराष्ट्र कॉंग्रेसमुक्त होण्याच्या मार्गावर.
भाजप २४
शिवसेना १९
कॉंग्रेस ०
राष्ट्रवादी ४
इतर १
चित्र आशादायक आहे.

सतिश म्हेत्रे's picture

23 May 2019 - 12:29 pm | सतिश म्हेत्रे

एनडीए - 343
यूपीए - 78

प्रसाद_१९८२'s picture

23 May 2019 - 1:01 pm | प्रसाद_१९८२

सोलापुरातील स्थिती कोणी सांगू शकेल का?

भाजपचे जयसिध्देश्वर महास्वामी ४८ हजार मतांनी आघाडीवर

प्रसाद_१९८२'s picture

23 May 2019 - 1:48 pm | प्रसाद_१९८२

जबरी,
अर्बन नक्षलवादी व कथित हिंदू दहशतवाद निर्मात्याला सोलापूरकारांनी घरचा रस्ता दाखवला हे एक बरे झाले.

जय सिध्देश्वर महास्वामी ७७ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

पुण्यात काय झाले? मध्यंतरी मतमोजणी थांबवली होती ना?

महासंग्राम's picture

23 May 2019 - 2:37 pm | महासंग्राम

पुन्हा सुरु झालीये मोजणी. गिबा ९५,००० मतांनी आघाडीवर आहेत सध्या
मावळात श्रीरंग बारणे विजयी, पवार घराण्यात पार्थ पवारांच्या रूपाने पहिला पराभव

भारतात मोदी सलग दुसऱ्यांदा जिंकल्याप्रमाणे , तिकडे
डॉनल्ड ट्रम्प देखील दुसरी टर्म जिंकू शकतात, असे भाकीत करायला हरकत नाही.

सतिश म्हेत्रे's picture

23 May 2019 - 2:33 pm | सतिश म्हेत्रे

...

सद्ध्या भाजप जिंकल्याचा आनंद साजरा करा हो.
डो ट्र चं नंतर बघू.

महाराष्ट्रात बवंआ ने कांग्रेस ची मते मिळवून निकालात फरक पाडला
मतांची बेरीज करतांना कांग्रेस ने ही मत मोजलीच नाहीत
अन्यथा महाराष्ट्रात थोडा निकाल वेगळा असता

शाम भागवत's picture

23 May 2019 - 3:47 pm | शाम भागवत

असं आत्ता तरी निश्चितपणे सांगणे अवघड वाटते.

शरद पवारांचे पत्रकार परिषद

इव्हेएम वरतून घुमजाव!!

महासंग्राम's picture

23 May 2019 - 2:59 pm | महासंग्राम

राजू पेंटरचे पण कान उपटले

सोन्या बागलाणकर's picture

23 May 2019 - 3:11 pm | सोन्या बागलाणकर

तथाकथिक मराठी लोकांच्या कैवाऱ्यांचा "लाव रे तो विडिओ" काही कामास आला नाही. आता त्यांना स्वतःच ते विडिओ बघून टाइमपास करायची वेळ आली.

आनन्दा's picture

23 May 2019 - 3:28 pm | आनन्दा

रावीश कुमार ला बघायला NDTV लावून बसलोय, पण तो दिसतच नाहीये..

गड्डा झब्बू's picture

23 May 2019 - 5:05 pm | गड्डा झब्बू

तमाम फुरोगामी आणि सिक्युलर लोकांनी ज्याला पाडण्यासाठी आकाशपाताळ एक केले त्याला जनतेने भक्कम पाठबळ देऊन पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून दिले.
श्री नरेंद्र मोदींना पंतप्रधानकीच्या दुसऱ्या टर्मसाठी भरघोस शुभेच्छा!!!
हर हर मोदी! घर घर मोदी!!

भंकस बाबा's picture

23 May 2019 - 5:19 pm | भंकस बाबा

आली आहे म्हणतात! कुठची?

उगा काहितरीच's picture

23 May 2019 - 5:28 pm | उगा काहितरीच

औ'बाद ! बिरुटे सरांची सिट.

ट्रम्प's picture

23 May 2019 - 7:31 pm | ट्रम्प
ट्रम्प's picture

23 May 2019 - 7:32 pm | ट्रम्प
ट्रम्प's picture

23 May 2019 - 7:33 pm | ट्रम्प

1 ) राज ठाकरे यांच्या प्रयत्नांना यश !!!!!

मनसे सारखीच केली काँग्रेस व राष्ट्रवादी ची अवस्था !!!!

2 ) नागरिक शास्त्रात हे शिकलो होतो की सगळे खासदार मिळून पंतप्रधान बनवतात.

पण 2019 मध्ये एका पंतप्रधानाने सगळे खासदार बनवलेत.

3 )रुझानों के अनुसार इस समय
राहुल गांधी सबसे आगे चल रहे हैं...

और कांग्रेसी लठ लेकर उसके पीछे !!!!!

तुला नाही मला नाही, घाल MIM ला. खैरे ठासुन आले असते, पण हिंदू मत जाती मधे अडकलं आणि जे झालं ते असं झालं.

धर्मराजमुटके's picture

23 May 2019 - 8:53 pm | धर्मराजमुटके

चाणक्य प्रशांत किशोर कहा है ?

गड्डा झब्बू's picture

23 May 2019 - 9:19 pm | गड्डा झब्बू

BP कि गोली खाके सो रहे है.

शब्दानुज's picture

23 May 2019 - 9:47 pm | शब्दानुज

धागा एवढा थंड !

च्छ्या..पुर्विच मिपा राहिलं नाही.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

23 May 2019 - 10:05 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

ते माजी संपादक व खासदार कुमार केतकरही आज दिसत नाहीत चानेल्सवर . कदाचित त्याना उद्या "व्यापक कटा'चा वास येईल. असो. निखिल वागळे, मोदी परत निवडून आल्याने 'मला एक वेगळीच अनामिक भिती वाटू लागली आहे" असे मुलाखतीत म्हणाले.

प्रसाद_१९८२'s picture

23 May 2019 - 11:13 pm | प्रसाद_१९८२

आज 11:30 वाजलेतरी मतदान मोजणी का सुरू आहे ?

एकच पक्ष सर्व जागा जिकल्या तर काय होते/होईल.

सोन्या बागलाणकर's picture

24 May 2019 - 4:03 am | सोन्या बागलाणकर

सु श्री मायावती ताईनी evm रडगाणं आळवायला सुरुवात केली आहे. त्यांच्या दाव्याप्रमाणे मुद्दाम evm काही ठिकाणी छेडछाड न करता ठेवण्यात आली ज्यामुळे असे वाटावे कि evm मध्ये घोटाळा नाहीये. *टाळ्या*

सोन्या बागलाणकर's picture

24 May 2019 - 4:04 am | सोन्या बागलाणकर

काँग्रेसचा १७ राज्यांमध्ये धुव्वा!
आता तरी काँग्रेस नेत्यांना अक्कल येईल हि अपेक्षा करतो.

कॉन्ग्रेसला लोकांनी का डावलले - तुमचे मत
धागा निघावा.

त्यापेक्षा मोदींच्या विजयाची मीमांसा करणारा धागा निघावा.
ते जास्त आवश्यक आहे, त्यातून शिकण्यासारखे देखील बरेच असेल.

रणजित चितळे's picture

24 May 2019 - 9:23 am | रणजित चितळे

मग आपणच काढा की धागा

सध्या वेळ नाही, हंगाम चालू आहे.. मग लिहायचा विचार आहे.

चौकटराजा's picture

24 May 2019 - 9:47 am | चौकटराजा

एम आय एम नावाचा मुसलीमांचा पक्ष व दलितामधील एक गट प्रकाश आंबेडकर गट यांना १२ जागा हव्या होत्या त्या बदल्यात ते आपल्या पूर्ण पाठिंबा आघाडीला देणार होते. आघाडीने त्यांना धुडकावून लावल्यावर त्यांनी विधान सभेची पूर्व तयारी म्हणून सर्व ४८ जागा लढवल्या . पैकी ३० ठिकाणी त्यांना काहीही महत्व नाही असेच दिसत आहे. ९ ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केल्याने निकालात फरक आलेला आहे. ७ ठिकाणी ते तिसर्या नंबरला देखील नव्हते. १२ जागी दलित व मुसलमान मिळून ५५ टक्के मतदार आहेत असा आंबेडकर यांचा दावा होता . त्यामुळे तेथे आम्हाला महत्व आहे असे त्यांचे म्हणणे . अर्थात ते निवडून न आल्याने उघड आहे ममुसलीम व दलित मते आघाड़ीला पडली. प्रकाश आंबेडकरांनी अकोल्याची जागा मुसलीम माणसाला आघाडीसाठी सोडली असती व त्या बदल्यात शिंदेंचा सोलापुरातील पत्ता काटून ती जागा स्वतः: साठी मिळविली असती आता एका जागेचा जरी समझोता केला असता तर या दोन्ही जागा भाजपा ला मिळाल्या नसत्या . पण.......

mrcoolguynice's picture

24 May 2019 - 11:33 am | mrcoolguynice

माझ्या वैयक्तिक मते...

अंबेडकराना (राज ठाकरे यांचा प्रमाणे) लोकसभा ही प्रीलीम परिक्षे सारखी द्यायची होती.
त्या दोघाँची नज़र येनरया बोर्डाच्या ( विधानसभे) कड़े आहेत.
आता ज़ेव्हा हाँ लोकसभेचा धुरला ख़ाली बसेल, आणि यूनिट बाय युनिट , मत डिस्ट्रीब्यूशब समजेल, तेव्हा ते व हे आपपले पत्ते खोलतिल.