कोलकता किंवा हलदिया इथे कुणी मिपाकर आहेत का?

Primary tabs

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in भटकंती
25 Feb 2019 - 9:19 pm

नमस्कार

सध्या माझा मोठा मुलगा, कामानिमित्ताने हलदियाला आहे.

त्याला कोलकाता शहर बघायची इच्छा आहे.

अशा कठीण समयी मिपाकरांशिवाय कोण मदतीला येणार?

कोलकाता येथे कुणी मिपाकर असतील तर फारच उत्तम.

आपलाच,
मुवि

ता.क. ===) खरे तर हा प्रश्न, प्रश्नोत्तरे ह्या सदरात टाकायचा होता....पण आम्ही त्या साठी अपात्र ठरलो.

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

4 Mar 2019 - 5:53 pm | चौथा कोनाडा

कुणीच मिपाकर दिसत नाहीय, कोलकाता किंवा हलदियाला.
मिपाकरांनी त्यांच्या ओळखीतलं असेल त्याचाही संदर्भ उपयोगी पडू शकतो.

खंडेराव's picture

5 Mar 2019 - 8:18 pm | खंडेराव

कोणी मिपाकर नसतील तर खाली दुवा देतोय त्यावरून तिथल्या प्रमुख स्थळांची माहिती मिळेल, त्यात जे आवडतील ते प्लॅन करू शकता.

https://www.tripadvisor.in/Attractions-g304558-Activities-Kolkata_Calcut...

काही वेळा कोलकाता वेगवेगळ्या काळात पाहिले असल्यामुळे "आपली आवड" काय असेल तसेच हातात फिरण्याकरता किती दिवस आहेत त्यावर बरेच अवलम्बून असेल असे मलाही वाटते. हल्दियालाच राहून रोज कुठेतरी जाऊन काही पहाण्याचा बेत असेल तर (१) व्हिक्टोरिया मेमोरियल (२) बेलुर मठ/दक्षिणेश्वर (३) जमेल तेव्हढ्या बन्गाली क्षुधाशन्तिगृहाना भेट (सामिष व निरामिष दोन्ही जमवता येत असेल तर आणखीनच छान) असा ऐसपैस (जमेल तेव्हढा करावा, बाकी सोडावा असा) बेत आखता यावा.

कोलकत्यात "टेकायला" महाराष्ट्र निवास" आहे (१५, हझरा रोड +९१ ३३ २४७४०७३७/२४०७०७३५/२४७४००७३५).

कोलकात्याचे माहितीपत्रक पाहिले. काही विशेष नाही हावडा पुलाशिवाय.
एकाने सांगितले - मुंबई आणि कोलकाता ब्रिटिशांनीच वसवल्याने भारी दगडी इमारती मिळाल्या. त्यात म्युझिअम वगैरे इतर सरकारी कार्यालये थाटली गेली. कटिंग चा टपरीवर घेत गप्पा झोडत पिवळ्याकाळ्या अम्बेसेडर टाक्स्या पाहायच्या. बाकी काही नाही. दार्जिलिंग किंवा भुबनेशर_पुरी करण्यासाठी मध्यवर्ती ठिकाण.

चौथा कोनाडा's picture

28 Apr 2019 - 1:21 pm | चौथा कोनाडा

झाली कि नाही शेवटी कोलकाता महानगर भटकंती ?

मुक्त विहारि's picture

2 May 2019 - 7:33 am | मुक्त विहारि

आता तो, त्याला योग्य वाटेल, तो निर्णय घेईल.

उपेक्षित's picture

2 May 2019 - 12:50 pm | उपेक्षित

बाकी स्थलदर्शन करो/ न करो पण कोलकत्याला खादाडी मात्र करायला सांगा अवश्य.

वामन देशमुख's picture

4 May 2019 - 8:48 am | वामन देशमुख

कोलकातामध्ये खादाडी करायला कोणकोणती ठिकाणे आहेत?

मुलाला कलेची आवड असेल तर (खरेतर नसली तरिही) बघायला पाहिजेच अशी जागा म्हणजे 'मलिक बाडी' ऊर्फ 'मार्बल पॅलेस.'
मी फार वर्षांपूर्वी गेलो होतो तेंव्हा बाहेर बसलेल्या तिथल्या एका नोकराने ही खाजगी जागा आहे, इथे जाणे 'अलाऊड' नाही वगैरे सांगितले पण मला बंगाली परिचिताने सांगितल्या प्रमाणे त्याच्या हातावर पाच दहा रुपये ठेवल्यावर 'अलाऊड' झाले. अर्थात आता कदाचित व्यवस्थित तिकीट वगैरेची सोय झालेली असेल. मी तर फारच भारून गेलो होतो ही जागा बघून आणि तिथेच मला एका कादंबरीची कल्पना सुचली, बाडीच्याच परिसरात बसून मी लगेच लिहायला सुरुवातही केली, पण अजून ते अपूर्ण आहे.
१८३५ मधे फ्रेंच वास्तुविदाने बनवलेली ही वास्तु आहे, आणि संगमरवरी पुतळे, चित्रे, आणि अन्य कलावस्तुंनी भरलेली आहे. इथे फिरताना आपण रोम वा फ्लॉरेन्स मधे आलेलो आहोत, असेच वाटत रहाते.
मुलगा जर युरोपात फिरून आलेला असेल तर त्याला फारसे नाविन्य वाटणार नाही, पण नसेल तर भारतात 'यासम हीच' अशी ही जागा आहे.
याविषयी माहिती:
https://en.wikipedia.org/wiki/Marble_Palace_(Kolkata)

http://www.pothik.co.in/marble-palace-the-forgotten-treasure-house-of-ko...

माझे पुन्हा कधी कलकत्त्याला जाणे झाले तर मला फक्त मलिक बाडीच परत बघायची इच्छा आहे.
धाग्याचे नाव 'कोलकत्यात काय बघावे' असे असते तर मी लगेचच प्रतिसाद दिला असता. मिपाकरांविषयी विचारणा असल्याने धागा उघडून बघितला नव्हता.
.
.
.
.

मुक्त विहारि's picture

4 May 2019 - 9:59 am | मुक्त विहारि

मुलाला लिंक पाठवली आहे.