महाराष्ट्रातील चालू घडामोडी

स्वामि १'s picture
स्वामि १ in काथ्याकूट
21 Apr 2019 - 9:15 am
गाभा: 

आज निवडणुकीचे वातावरण सर्वत्र असताना निवडणूकीच्या निकालानंतर महाराष्ट्राला व मराठी समाजाला काय मिळेल हा महत्त्वाचा विषय आहे. ह्या आधी लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला काय मिळाले होते? आपल्या महाराष्ट्रातून चार पाच खासदार मंत्री झाले म्हणून महाराष्ट्र व मराठी माणसाची प्रगती झाली असा काही ईतीहास आहे का? महाराष्ट्रातून तीनचार मंत्री मध्ये दोन ते तीन हमखास अमराठी असल्याने त्यांना महाराष्ट्र व मराठी बद्दल किती आपुलकी असेल हे शंकास्पद आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून उभ्या असलेल्या उमेदवाराला आपण महाराष्ट्रासाठी व मराठी समाजाला काय मिळवून देणार हे विचारले पाहिजे किंबहुना महाराष्ट्र व मराठी साठीच काम करेल अशा उमेदवाराला निवडून देउ असे खडसावले पाहिजे

प्रतिक्रिया

उपयोजक's picture

21 Apr 2019 - 9:22 am | उपयोजक

Arshad

स्वामि १'s picture

21 Apr 2019 - 10:34 am | स्वामि १

प्रचंड वाढती लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात आपला जिव गुदमरला जातो. फक्त सुशिक्षित समाज कुटुंब नियोजन करतो. त्यामुळे अशिक्षित जनता वाढत आहे. तर एक विशिष्ट समाज भारतावर वर्चस्व मिळण्यासाठी आपली लोकसंख्या मुद्दामून वाढवत आहे व दुर्दैवाने आपल्या देशात लोकसंख्या चा विषय कोणीच गांभीर्याने घेत नाही

सर्तक रहा!! आपल्या महाराष्ट्रातील विविध शहरात प्रचंड गर्दी असते. निवडणूक दरम्यान आपल्या कडे ही घातपात होउ शकतो.

सुबोध खरे's picture

22 Apr 2019 - 11:36 am | सुबोध खरे

सर्तक रहा

सरतक रहा कि सरकत रहा

मुळात "सतर्क" हा मराठी शब्द आहे का?

आणि त्याचा मूळ अर्थ तर्कासहित असा होईल असे वाटते.

सावधान किंवा दक्ष हे शब्द मराठी आहेत.

स्वामि १'s picture

22 Apr 2019 - 12:05 pm | स्वामि १

धन्यवाद खरे साहेब, पुढील वेळेस योग्य शब्दात लिहेन.

ईथे edit करता येते का माहित नाही, असल्यास कसे करावे.

भंकस बाबा's picture

22 Apr 2019 - 12:30 pm | भंकस बाबा

तुम्ही एक काम करा, संपादक मंडळात सामिल व्हा.
तुमचा वर दिलेला बॉब पाहुन मी फुटलो हो!

विजुभाऊ's picture

22 Apr 2019 - 12:46 pm | विजुभाऊ

कृपाशंकर सिंह सारखा जौनपूर हून आलेला माणुस महाराष्ट्राचा गृहहराज्य मंत्री बनू शकतो,
सम्जय निरुपम सारखा माणुस ( या माणसाला राजकारणात शिवसेनेने पुढे आणले)
या लोकांना लोकप्रतिनीधी म्हणून आपल्यावर लादणार्‍या पक्षांना धडा शिकवला पाहिजे
त्याहूनही महत्वाचे म्हणजे शिवछत्रपतींचा वारसा सांगत निवळ्ळ गुम्डगिरी करणार्‍यानाही त्यांची जाग अदाखवून दिली पाहिजे

विजूभाउ बरोबर बोललात, परप्रातीयांचे मतदार वाढल्यास परप्रातीय ही मंत्री होतात
आपण गाफील राहुन चालणार नाही. परप्रातीयांच्या गुप्त कारस्थान ओळखा. मराठी माणसांना मुंबईत हेतुपूर्वक नोकरी धद्यामधे टाळले जात आहे

प्रसाद_१९८२'s picture

22 Apr 2019 - 4:11 pm | प्रसाद_१९८२

साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना भाजपाने लोकसभेची उमेदवारी देऊन योग्य केले का ? कोर्टाने जामीन दिला असला तरी दहशतवादाच्या आरोपातून मुक्त केले नाही तरिही भाजपाने तीला तिकिट देऊन चूकीचा पायंडा पाडला आहे का ?

राजकारणात हे चालतच म्हणून त्याला पाठिंबा मुळीच नाही, भारतीय राजकारण असेच आहे. महाराष्ट्राने भारतीय लोकशाहीतुन बाहेर पडावे व शिवाजी महाराजा प्रमाणे स्वराज्य स्थापन करावे. काही वर्षापुर्वी मॅचफिंकलिग करणाऱ्या अजरउद्दिला ही टिकिट दिलेच होते

भंकस बाबा's picture

22 Apr 2019 - 10:12 pm | भंकस बाबा

तुम्ही ठीक आहात ना?
नाही आजकाल उन्हाचा ताप वाढलाय, म्हणून विचारले.
काहीतरी थंड घेत जा , बर असतं शरीराला

धन्यवाद, भंकस बाबा आपण डोक थंड ठेवण्यास सांगितले. आपण मराठी व महाराष्ट्रा च्या प्रगती साठी उपाय सुचवावेत

भंकस बाबा's picture

23 Apr 2019 - 8:11 am | भंकस बाबा

आपण टाकलेले प्रतिसाद क़ाय सूचवत आहेत?
घरात ढेकुन झाले म्हणून क़ाय कोणी घराला आग लावतात?
भारतीय लोकशाहितून बाहेर पडायच्या गोष्टी करता आपण, ज्या महाराष्ट्र राज्याने मुंबई आपल्याबाहेर पडू नये म्हणून 105 हुतात्मा दिले त्या राज्याला तुम्ही स्वतंत्र होऊ सांगता?

१०५ हुतात्मा झाले मुंबई महाराष्ट्राला मिळाली आज ही मुंबई महाराष्ट्रात आहे पण अर्थसत्ता परप्रातीयांच्या हातात आहे. व रोज शेकडो संख्येने परप्रातीय मुंबई व महाराष्ट्रात येतात. ह्या वर आपण उपाय सुचवावेत

भंकस बाबा's picture

23 Apr 2019 - 6:41 pm | भंकस बाबा

उपाय हाच आहे की, मराठी माणसाला उत्तम स्ट्रीट फूड बनवायला शिकवा. भेलपुरी खायला आपण भैयाकड़े जातो.मसाला डोसा खायला अन्नाकड़े. रस्त्यावर कितिजणाना तुम्ही विचारता की बाबा तुम्ही मराठी आहात क़ाय? जर नसेल तर तुम्ही पुढच्या गाडिवर जाता क़ाय? रस्त्यावर चाललेल्या बांधकामाला दक्षिणी मजूरच का असतात. त्या कामात मराठी मजूर का दिसत नाहीत? फार वर्षापूर्वी मराठी लोकांना रोजगार मिळावा म्हणून झुणकाभाकर केंद्र सुरु झाली होती. मी जेव्हा मुंबईत ह्या केंद्रावर जातो तेव्हा झुणकाभाकर सोडून तिथे सर्व मिळते. आणि देणारा हमखास दक्षिणी असतो. तुम्ही स्वतालाच विचारा तुम्ही बाहेर खायला जाता तेव्हा कधी पोहे, शिरा, थालीपीठ हे पदार्थ मागितले आहेत क़ाय? मुंबईत मिळणारी मिसळ देखिल वाटान्याची मिळते. तुम्ही अशी मिसळ खाऊन कधी तक्रार केली आहे का?
तुम्ही बदला , जग बदलेल

१०५ हुतात्मा झाले मुंबई महाराष्ट्राला मिळाली आज ही मुंबई महाराष्ट्रात आहे पण अर्थसत्ता परप्रातीयांच्या हातात आहे. व रोज शेकडो संख्येने परप्रातीय मुंबई व महाराष्ट्रात येतात. ह्या वर आपण उपाय सुचवावेत

आजानुकर्ण's picture

24 Apr 2019 - 12:10 am | आजानुकर्ण

तुम्ही हिंदी बोलायला सुरुवात करा. आपोआप तुम्ही 'इतर भाषक' व्हाल व अर्थसत्ता तुमच्या ताब्यात येईल.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

23 Apr 2019 - 7:04 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

" रोज शेकडो संख्येने परप्रातीय मुंबई व महाराष्ट्रात येतात. ह्या वर आपण उपाय सुचवावेत"
जालिम उपाय म्हणजे अमराठी उद्योगपतीना उद्योग उभे करण्यास मज्जाव करणे. म्हणजे नविन उद्योगधंदे येणारच नाहीत, पर्यायाने परप्राण्तिय पण येणार नाहीत.
"आम्हाला परप्रांतिय उद्योगपती(रांका,रहेजा,बजाज्,गोयल,मेहता) पाहिजेत पण त्यांच्या राज्यातले चाकरमानी मात्र नकोत.. परप्रांतिय व्यावसायिकाकडे फक्त आम्हीच ९ ते ६ पाट्या टाकणार" असे कसे चालेल?

परप्रातीय उद्योजक आपल्याच राज्यात उद्योग चालू करावेत व तेथील कामगारांना तेथेच काम मिळेल.
बोलायला सोप्पे आहे पण महाराष्ट्र सारखे पोषक वातावरण व मराठी माणसासारखी सहिष्णुता इतर राज्यात नाही आहे.
पण ह्या मराठी माणसाच्या सहिष्णुता चा फायदा परप्रातीयानी घेतला. व दुर्दैवाने मराठी माणूस महाराष्ट्रात पोरका झाला

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

24 Apr 2019 - 1:00 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

महाराष्ट्र सारखे पोषक वातावरण व मराठी माणसासारखी सहिष्णुता इतर राज्यात नाही आहे.

ह्यासाठी काही विदा? भोपाळ,इण्दौर, वडोदरा, दिल्ली, बेंगळुरु,उज्जैन,बेळगाव येथे लाखावर मराठी आहेत. अगदी ५० हून अधिक वर्शे वास्तव्य आहे.

परप्रातीय उद्योजक आपल्याच राज्यात उद्योग चालू करावेत व तेथील कामगारांना तेथेच काम मिळेल.

मग ईतर ठिकाणी उद्योग आहेतच. अनेक मराठी लोकाना महाराष्ट्राबाहेर काहीच नसते असा एक गोड गैरसमज असतो. पुर्वी पु.ल. म्हणायचे तसे खरेदीसाठी मुंबईकराला "रानडे रोड" पलिकडे काही मिळू शकते ह्यावर विश्वास बसत नाही.. वा पुणेकरास 'लक्ष्मी रोड"..
https://en.wikipedia.org/wiki/Category:Companies_based_in_Chennai
https://en.wikipedia.org/wiki/List_of_companies_based_in_Gurgaon
https://en.wikipedia.org/wiki/Category:Companies_based_in_Ahmedabad

पूर्ण देशाचा कोण्ही द्वेष करत नाही फक्त युपी, बिहार, बंगाल ह्या तीनचार राज्यातील लोकांना महाराष्ट्र वैतागला आहे .
त्या राज्यातून अजून वीज , नळाचे पाणी सुधा नाही सर्वांना .
सामाजिक अवस्था तर भीषण नच आहे
अजुन 100 वर्ष तरी ते सुधारतील ह्याची खात्री नही

सोन्या बागलाणकर's picture

24 Apr 2019 - 1:27 pm | सोन्या बागलाणकर

काय उचलली जीभ लावली टाळ्याला?

ग्वालेर, इंदूर, बडोदा येथील तर संस्थानिकच मराठी होते मग काय तिथल्या स्थानिक लोकांनी काय बंड केलं का?
झालंच तर आपला रजनीकांत गायकवाडसारखा मराठी माणूस साऊथ मध्ये सुपरस्टार झाला. तिथल्या लोकांनी असं म्हटलं का की तो मूळचा मराठी आहे इथून त्याला बाहेर हाकला?

महाराष्ट्रात पोषक वातावरणापेक्षा मुंबई उत्तम सारखे बंदर आहे आणि ब्रिटिश काळापासून बनलेलं उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आहे ज्यामुळे इथे उद्योजक आकर्षित होतात. आता हे यूपी किंवा बिहारमध्ये अपेक्षा करणं चुकीचं आहे कारण त्याची भौगोलिक रचनाच त्यासाठी पूरक नाहीये.

आपला मुद्दा रेटण्यासाठी काय वाट्टेल ते लिहाल काय?

गुजरात आणि राजस्थान मधील काही जतीचेच लोक उद्योग व्यवसायात अग्रेसर आहेत .
ह्यांच्यात एक खास गुण आहे ज्या राज्यात जातील तिथल्या जनतेत हा समाज मिसळतो .
स्थानिक भाषा शिकण्याचा प्रयत्न करतो आणि स्थानिक राजकारणात लुडबुड करत नाही .
दुसरे आपले दक्षिण भारतीय बांधव हे सुधा स्थानिक भाषा शिकण्याचा प्रयत्न
करतात आपले काम आणि आपण असेच ह्याचे वागणे असते स्थानिक राजकारण काय चालय ह्याचे त्यांना काही देणेघणे नसते .
त्या मुळे हे तिन्ही समाज परके वाटतं नाहीत .आणि ते स्थानिक रीतिरिवाज सुधा शिकतात.

पण ह्याच्या उलट हिंदी भाषक लोकांचे वागणे असते .
एक गैरशिस्त रक्तात bhinleli असते .
कायदे न पाळणे हा ह्यांचं आवडता छंद असतो .
स्थानिक राजकारणात खूप हस्तक्षेप करतात वर त्यांचे नेते इथे येवून स्थानिक लोकांनाच शाहणपण शिकवतात
स्थानिक भाषा शिकत नाहीत उलट स्थानिक भाषा आणि संस्कृती चा अनादर करतात .
त्यामुळे महाराष्ट्र च नाहीतर देशातील सर्वच राज्य ह्या लोकांचा द्वेष करतात

स्थलांतरित येणाऱ्या वर कुठलेच बंधन नसल्याने कोण गुन्हेगार व कबाड जनता येत आहेत त्याची कल्पना स्थानिकाना नसते. राज्यकर्ते सर्वाना भारतीय म्हणून बघतात किंभवना ते हेतुपूर्वक दुर्लक्ष करतात. हे मराठी माणसाचे दुदैवं आहे

नमकिन's picture

29 Apr 2019 - 4:37 pm | नमकिन

गरीबांना शिक्षण, संस्कार, जुनाट अंधश्रद्धा रीतिरिवाज, अनारोग्य, कुपोषण, भविष्य निर्वाह बेफिकीर वृत्ती, जातिव्यवस्था चातुर्वर्ण्य फूकाचा अभिमान यात गुरफटून गेले असते.
यातूनच पुढे लोकसंख्या वाढली की अजून दारिद्र्य रेषेखाली जीवन.
मग शहरात सर्व सोयी उपलब्ध (झोपडपट्टी) नळाला पाणी, २४तास वीज, पालिकेच्या मोफत शिक्षण, आरोग्य योजनेची अंमलबजावणी मग लोंढे येणारच, बरं रोखण्यासाठी काही निकष लावू म्हटलं की डोळ्यासमोर राज'कीय विरोध.
ही सर्व प्रगत राज्य सरकार तसेच जनतेचा अनुभव आहे मागील २५-३०वर्षातला.
दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र..... सर्वत्र चित्र सारखेच आहे. यावर उपाय एकच भूमिहीन/भूमिपुत्र नौकरी धंदा यात ८०% प्राधान्य दिले तर सुटकेचा मार्ग सापडेल नक्कीच. कधीतरी कुठेतरी कुणीतरी सुरूवात करायला हवी. कायदेशीर अंमलबजावणी केली तरच फरक दिसेल.

आता पर्यंत फक्त maharshtra झळ सोसत होता पण आता सर्वच प्रगत राज्यांना उत्तरेच्या
बेशिस्त लोकांची झळ पोचू लागली आहे .
आणि काही राज्यात विरोध पण झाला
उदा .पंजाब,कर्नाटका, गुजरात, आसाम,महाराष्ट्र.
तामिळनाडू.
त्यामुळे एक दिवस सर्व प्रगत राज्य मिळून ह्या समस्येचा विरोध नक्की करतील
आणि तो दिवस जवळ आला आहे

आपली संस्कृती नष्ट होण्याच्या आधीच आपण आपली भांडणे दुर ठेऊन ह्या विषयावर चर्चा झाली पाहिजे. आपण एकत्र आल्याशिवाय राज्यकर्ते ह्यात लक्ष घालणार नाहीत.

स्वामि १'s picture

30 Apr 2019 - 8:03 pm | स्वामि १

महाराष्ट्रातील जिल्हातील व आजुबाजुच्या शहरात नवनवीन इमारती होत आहेत व त्यासोबत रस्ते दुकाने व इतर अनेक नवनवीन इमारती वाढत आहेत व सिमेंट ची जंगले वाढत आहेत. ह्या वाढत्या इमारती ना सुधारणा म्हणता येईल का? सुधारणा म्हणजे नक्की काय? सायंस व टेकनाॅलाॅजी झपाट्याने मानवी जीवन बदलत आहेत. ह्यालाच सुधारणा म्हणता येईल का?

देश प्रेम किती असावे लांगोट काढून नागडे होण्या एवढे नक्कीच नसावे .
मूर्ख मराठी आपलेच बांधव देश देश करतात
पण up Bihari Marathi Lok कमजोर होण्याची वाट बघत आहेत.
एकदा ताकत कमी झाली की मराठी लोकांचं भारतीयत्व पण नाकारलं जाईल

अनन्त अवधुत's picture

1 May 2019 - 3:12 am | अनन्त अवधुत

स्वतःला जप.
हे पाच शब्द बोलून मी खाली बसतो.
आणि खाली बसून प्रश्न विचारतो : देशप्रेमाचे परिमाण काय आहे हो?

राजेश 118 बोलतात ते बरोबर आहे. मराठी माणसाने देश प्रेम करायचे म्हणजे आपली भाषा व संस्कृती नष्ट करायची व परप्रातीयांना आपल्या घरात प्रवेश द्यायचा. असले देश प्रेम मराठी नष्ट करेल

भंकस बाबा's picture

1 May 2019 - 7:53 am | भंकस बाबा

भारतीयत्व नाकारले जाईल. अहो पण हेच तर तुम्हाला पाहिजे आहे ना? म्हणजे बघा, तुम्ही कामानिमित्त दिल्लीला चालले आहात. रेल्वे स्टेशनवर तुम्ही जाऊन पहिल्यांदा सिक्युरिटी चेकच्या रांगेत उभे राहणार, मग तुमचा पासपोर्ट तपासला जाईल . आता यात तर वेळ जाइलच, कारण तपासणी अधिकारी मराठी असेल ना? याचा अनुभव घ्यायचा असेल तर कुठल्याही पोस्टऑफिसमध्ये जाऊन पाच रूपयाचे स्टैम्प घेऊन बघा. मग दिल्लीमधे परत सिक्युरिटी चेक! तुमची तर कसुन चौकशी होणार, कारण तुम्हीच मराठी कारण आहात ना?
म्हणजे चार ते पाच तास तुम्ही या कार्रवाईसाठी घालवणार.
पण या सगळ्यानंतर तुमच्या तोंडावर ब्रम्हानंद झळकत असणार, कारण याचसाठी तर तुम्ही अट्टाहास केला होता.

आपापसात वाद करण्यापेक्क्षा मराठी व महाराष्ट्रा ची प्रगती कशी होईल ह्या वर लिहा ही विनंती

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 May 2019 - 11:40 am | डॉ सुहास म्हात्रे

लांगोट काढून नागडे होण्या एवढे नक्कीच नसावे .

हेच तत्व, इतर कोणताही मुद्दा (उदा : तुम्ही मांडत असलेला) मांडताना, लक्षात ठेवण्याजोगे आहे, नाही का?! :) ;)

अनन्त अवधुत's picture

1 May 2019 - 11:44 am | अनन्त अवधुत

:)

पहिली संख्या कामी होती तेव्हा घटनेचा हवाला दिला जायचा .
आता संख्या वाढली आहे तर आमचा Maharashtra chya साधन संपत्तीत हिस्सा आहे अशी भाषा बदलली आहे .
मध्ये गुजरात मध्ये जे काय घडलं तेव्हा सुधा आमचा गुजरात मध्ये हिस्सा आहे आणि तो मिळवायला आम्ही तिथे जातो अशा प्रतिक्रिया होत्या .
डोळे ,कान उघडे ठेवले तर हे स्थितंतर लक्षात येईल .
मग धोका किती मोठा आहे ह्याची जाणीव होईल .
आपण देशप्रेमाची कोषातून बाहेरच येत नाही .

प्रसाद_१९८२'s picture

3 May 2019 - 4:11 pm | प्रसाद_१९८२

तशी ही मुंबईत मराठी माणसाची अवस्था "मुंबई तुमची, भांडी घासा आमची" अशीच आहे.

Rajesh188's picture

3 May 2019 - 4:56 pm | Rajesh188

तुम्ही म्हणता तशी अवस्था नाही .
पण मुंबई चे उदाहरण समोर घेवून पुढची धोरण ठरवली पाहिजेत.
पाणी मुंबई ल पाणी पुरवण्यासाठी नवीन धरण बांधली जावू नयेत .
मुंबई वर सरकारनी जास्त पैसा खर्च करू नयेत .
नवीन शहर जेव्हा उभे राहते तेव्हा परप्रांतीय लोकांशी फटकून राहवे .
अशी काळजी पुढे घेतलीच पाहिजे

Rajesh188's picture

3 May 2019 - 5:24 pm | Rajesh188

कोणत्या हि शहराची प्रगती होण्यासाठी तीन
महत्वाच्या गोष्टी लागतात
1) पाणी
२) वीज आणि रस्ते
३) कायदा सुव्यवस्था आणि शांतता.
आणि ह्या तिन्ही बाबतीत मुंबई देशात १
नंबर ल आहे .
महाराष्ट्र आणि मुंबई व्यतिरिक्त देशातील कोणतंच राज्य मुंबई सारखे उत्तम infrastructure पुरवू शकत नाही
त्याचाच फायदा घेवून इथे येवून लोक करोडपती झाले .
मुंबई मध्ये आले नसते तर कधीच करोडपती झाले नसते
आणि ह्याचे सर्व श्रेय महाराष्ट्र चे उत्तम प्रशासन आणि उत्तम राजकीय नेतृत्व आणि संयमी मराठी जनता ह्यांचं च आहे.
त्यामुळे व्यापार तुमच्या ताब्यात नाही असे कोण्ही हिनवू नये .
तेच जर पाणी ८ दिवसातून एकदाच आले
वीज दिवसातून ८ tasach आली .
कायदा suvyavshe चा बोरा उडाला.
मुंबई चे वातावरण अशांत झाले तर आज करोडो ची वार्ता करणारे हजारात सुधा कमवू
शकणार नाहीत हे सुधा सत्य आहे .
आणि देशातील कोणतंच राज्य अशी सुविधा देण्यासाठी capable नाही.
आज करोड रुपयाचा फ्लॅट फुकट सुधा कोण्ही घेणार नाही .
त्या मुळे हिनवू नका तुमच्या मुळे आम्ही नाही आमच्या मुळे तुम्ही सुखात आहात ह्याची जाणीव असावी

स्वामि १'s picture

3 May 2019 - 11:18 pm | स्वामि १

महाराष्ट्रात व मुंबईत जे पोषक वातावरण मराठी माणसाने निर्माण केले तसे उर्वरित भारतात कोठेच नाही आहे.
ह्याच मराठी माणसाला आज मुंबईतून बाहेर काढले जात आहे. वेळीच आपण जागे नाही तर महाराष्ट्रत ही मुंबई सारखी दशा होईल

प्रसाद_१९८२'s picture

4 May 2019 - 8:16 pm | प्रसाद_१९८२

महाराष्ट्रात व मुंबईत जे पोषक वातावरण मराठी माणसाने निर्माण केले तसे उर्वरित भारतात कोठेच नाही आहे.
--
तुम्हाला असे वाटत असेल तर तुम्ही भारत फिरलाच नाहीत, असे खेदाने म्हणावे लागेल.

Rajesh188's picture

4 May 2019 - 9:29 pm | Rajesh188

मुंबई ची जी लोकसंख्येची
घनता आहे अशी कोणतीही जागा पूर्ण भारता मधील
जिथे
वीज 24 तास आहे
पाणी सर्व घरात नळाने येते
लोकल ट्रेन ची सुविधा
स्थानिक लोकांचा हिंसक विरोधाची तीव्रता
कमी आहे
अत्यंत सुरक्षित वातावरण जिथे रात्री ,2 ला सुधा स्त्रिया रस्त्यावर दिसतात
अशी एकच जगा सांगा तिथे जावून मी 10 दिवस राहीन किंवा google search Karin
फक्त एकच जागा सांगा माझे तुम्हाला आव्हान आहे समजा

महाराष्ट्र chya जीवावर भारतीय लष्कर पोसले जाते .
महाराष्ट्र वजा केला तर बंदुकीच्या गोळ्या सुधा
देश खरेदी करू शकणार नाही.
डॉक्टर,engenner,aani shikshit
लोकांना १०० रुपये रोजवर काम करायला लागेल
उद्योगपती लोक दुकान चालवताना दिसतील
गल्ली बोळात

अनन्त अवधुत's picture

4 May 2019 - 12:59 am | अनन्त अवधुत

तुम्ही जे लिहिलंय ते एखाद्या सभेत जोशात बोलले तर टाळ्या खेचेल, कारण ती गर्दी आहे.
पण इथे लिहिताना, संबंधित आणि योग्य विदा द्यावा हि विनंती.

Rajesh188's picture

4 May 2019 - 10:02 pm | Rajesh188

गुजरात ची राजधानी गांधी नगर आणि राजस्थान ची जयपूर ह्यांची तुलना मुंबई ,पुणे सोडा नाशिक शी सुधा होणार नाही .
आणि उर्वरित देश तर हिधोबतच नाही

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 May 2019 - 10:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा धागा आता वास्तवतेची मर्यादा ओलांडून बेजबाबदार दाव्यांकडे पोचला आहे. अतिशयोक्ती अनेकदा विनोदाचा पाया असते असे म्हणतात... त्या तत्वावर हा धागा आणि अनेक प्रतिसाद (अतिशयोक्तीचा अतिरक असलेले आणि म्हणून विचित्र विनोदी असलेले, पक्षी : लेखकांचे हसे करणारे) विनोद म्हणता येतील. :)

अश्या धाग्याची आणि प्रतिसादांची खिल्ली उडवली गेली तर मग त्यांच्या लेखकांना, "टिंगल-टवाळी का होते आहे?" असा प्रश्न विचारायचा हक्क राहत नाही, हे सांगायलाच हवे काय ?!

एक प्रकारे हा धागा त्या प्रश्नाचे चपखल उत्तरच आहे.

Rajesh188's picture

4 May 2019 - 10:23 pm | Rajesh188

लोकसंख्येची घनता
आर्थिक व्यवहार
24, तास वीज
घरोघरी नळाचे पाणी
भाषा फ्रेंडली इथे unconfirt नसतो
सर्व प्रकारचे जेवण हॉटेल मध्ये उपलब्ध
लोकल रेल
स्त्रिया रात्री 2, पण रस्त्यावर असतात

असे एकच शहर भारता मधील सांगा आणि नंतर बिनबुडाचे कमेंट ध्या

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 May 2019 - 10:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारतात दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळूरू, इत्यादी अनेक ए-ग्रेड शहरे आहेत त्यांचा जरासा अभ्यास करा. जालावर सगळे सहज सापडेल... आणि मग मत परत एकदा सांगा. कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय, केवळ 'मला वाटते म्हणून तसे असेल' या समजूतीने केलेल्या विधानांना बेजबाबदार (किंवा तुमच्या भाषेत बिनबुडाची) विधाने म्हणतात.

बाकी यानंतर मी प्रतिसाद दिला नाही तर, ते करण्यात "फायदा/श्रम गुणोत्तर" फार तोट्याचे असल्याने केला नाही असे समजा. मी काय म्हणतो आहे ते तुमच्या ध्यानात यावे अशी आशा आहे.

Rajesh188's picture

4 May 2019 - 10:51 pm | Rajesh188

Mi तुम्ही suchvleli
देल्ही
बंगलोर
कलकत्ता
मद्रास
ह्या शहरांची आणि मुंबई ची तुलना खालील पॉइंट वर गूगल वर शोधतो आणि रिझल्ट copy pest Karun इथे कमेंट देतो

1) लोकसंख्येची घनता
२) २४ तास वीज
३)नळाने पाणीपुरवठा
४) सर्व भाषिक लोकांना comfort वाटणारी जगा
५)हॉटेल मध्ये देश विदेशात जेवण उपलब्ध
६), कायदा आणि सुव्यवस्था
७) swachta
८) लोकल रेल्वे
९) आर्थिक व्यवहार
१०) शांतता
११)स्थानिक लोकांची गुंडगिरी

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 May 2019 - 12:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

उत्तम !

या प्रतिसादाने तुम्ही कोणताही अभ्यास न करता भडक विधाने केली आहेत, हे मानले आहे. ही सुधारणा आहे. यासाठी तुमचे अभिनंदन ! कारण, कोणत्याही सुधारणेसाठी, प्रथम काहीतरी समस्या आहे हे कबूल करणे अत्यंत आवश्यक असते.

यापुढे, "तथ्ये माहीत करून घेणारा बेसिक स्तराचा तरी अभ्यास करून मगच विधान करावे", हे मूलभूत तत्व लक्षात ठेवले तर तुमच्या लेख/प्रतिसादांना इतर लोक योग्य ते महत्व देतील. अन्यथा काय होईल ते दिसत आहेच.

योग्य मुद्द्यांचाही पाठींबा चूक, असत्य किंवा अतिशयोक्त विधानांनी करणारे लोक, स्वतःच्याच मुद्यांचा पराभव करत असतात.

मुंबई व आसपासच्या शहरात शेकडो संख्येने परप्रातीय आले, येत आहेत व आपण विरोध न केल्यास येतच राहतील.
आता विरोध का करायचा?
इथे मराठी भाषा नष्ट होत चालली आहे
जे काही मराठी बोलतात त्यात हिंदी शब्दाचा उपयोग जास्त असतो
मराठी संस्कृती व संस्कार संपूर्ण नष्ट होत आहेत
पायाभूत सुविधा पुरविण्यात बाधा येते
किती लोकसंख्या वाढणार आहे? ह्याची काहीच कल्पना नसल्याने ठरवलेल्या योजना मोडीत निघतात. हे सर्व डोळ्यांनी दिसतअसताना अजून कुठले पुरावे पाहीजेत
इतक्या मोठय़ा प्रमाणात स्थलांतर भारतात कुठलाच राज्यात झाले नाही मग महाराष्ट्रात का सहन करावे. उर्वरित महाराष्ट्रात ही परप्रातीयाचे स्थलांतर होत आहे ते वेळीच थांबवले पाहिजेच

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 May 2019 - 1:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

याबाबतीत तुम्हाला थोडीशी मदत...

भारतभर इतर अनेक अमराठी भूभागांवर लहान-मोठ्या संख्यांनी मराठी माणसे राहत आहेत. उदा : तमीळनाडूमधील तंजावूर येथे सुमारे ७०,००० मराठी माणसे राहत आहेत.

तुमच्या योजनांप्रमाणे, त्यांच्यावर स्थानीक अमराठी लोकांनी काय कारवाई करावी, हे सुद्धा लिहा... म्हणजे सगळीकडे समसमान नियम राबवायला सोपे जाईल व तेच न्याय्य होईल, नाही का?

महाराष्ट्रातील मराठी माणसांनी महाराष्ट्राची व मराठी माणसाची काळजी ध्यावी. परप्रातीयांचा स्थलांतराचा प्रश्न महाराष्ट्र निर्माण झाला आहे इतर राज्यात नाही. बडोदा,इंदोर, तांजवार किंवा इतर ठिकाणी मराठ्याचा काळापासून म्हणजे २०० ते ३०० वर्षा पुर्वी पासून मराठी राहतात तेथे मराठ्याचे राज्य होते. व तिथून मराठी जनतेने बाहेर निघयला सांगितले नाही आहे
संकट महाराष्ट्रवर आले आहे केवळ त्याचाच विचार करावा

महाराष्ट्रातील मराठी माणसांनी महाराष्ट्राची व मराठी माणसाची काळजी ध्यावी. परप्रातीयांचा स्थलांतराचा प्रश्न महाराष्ट्र निर्माण झाला आहे इतर राज्यात नाही. बडोदा,इंदोर, तांजवार किंवा इतर ठिकाणी मराठ्याचा काळापासून म्हणजे २०० ते ३०० वर्षा पुर्वी पासून मराठी राहतात तेथे मराठ्याचे राज्य होते. व तिथून मराठी जनतेने बाहेर निघयला सांगितले नाही आहे
संकट महाराष्ट्रवर आले आहे केवळ त्याचाच विचार करावा

Rajesh188's picture

5 May 2019 - 8:48 pm | Rajesh188

कामगार आयुक्त
आंतरराज्य स्थलांतरीत कामगार (रोजगाराचे नियमन आणि सेवाशर्ती) अधिनियम, १९७९
प्रमुख नियोक्त्याची नोंदणी
परवाना - आंतरराज्य स्थलांतरित कामगार
परवाना नुतनीकरण - आंतरराज्य स्थलांतरित कामगार

परवाना - आंतरराज्य स्थलांतरित कामगार
-अटी
प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.
1
आवश्यक तो फॉर्म
PDF(25 KB)
आवश्यक बाबी
अर्जासाठी विहित नमुन्यातील फॉर्म भरावा कृपया अर्ज संपूर्णपणे आणि अचूकपणे भरावा. कंत्राटदाराचे ओळखपत्र सोबत जोडलेले आहे काय? कंत्राटदाराच्या वयाचा दाखला सोबत जोडलेला आहे काय? (व्यक्तींच्या बाबतीत) अर्जात नमूद केलेले कामगार जेथे कामास आहेत, त्या आस्थापनेचे नाव व पत्ता आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्र प्रमुख नियोक्त्याचा तपशील नमूद केलेला आहे काय? साईटवरील कंत्राटदाराच्या व्यवस्थापकाचा तपशील सोबत जोडलेला आहे काय? कंपन्यांच्या बाबतीत, संचालकांचा / भागीदारांचा तपशील सोबत जोडलेला आहे काय? आस्थापनेच्या नियंत्रणासाठी व पर्यवेक्षणासाठी जबाबदार असलेल्या अन्य व्यक्तींचा तपशील सोबत जोडलेला आहे काय?रु. १००/- च्या मुद्रांकावरील घोषणापत्र सोबत जोडलेले आहे काय? लागू असलेले शुल्क अदा केलेले आहे काय? चलन / शुल्काची पावती सोबत जोडलेली आहे काय? कामगारांचा तपशील सोबत जोडलेला आहे काय? प्रमुख नियोक्त्याची स्वाक्षरी असलेला मूळ फॉर्म क्रमांक ६ (प्रमुख नियोक्त्याचे प्रमाणपत्र) सोबत जोडलेले आहे काय?

The Interstate Migrant Workers (Regulation of Employment and Conditions of Service) Amendment Bill, 2011 is proposed to make this Act gender neutral by amending its title and replacing the word ‘workman and workmen’ by the words ‘worker and workers’ respectively.[6] However, the lawmakers have not thought of bringing additional provisions to implement this Act strictly with more accountability and punishments for violations.

Possible improvements
Edit
All interstate workers should be registered in gram panchayat or municipality or corporation compulsory.
All interstate workers shall be provided with the benefits of Public Distribution System (PDS) Cards to avoid buying food grains and kerosene at higher prices. Adhar identity card shall be made compulsory for the interstate workers.
The remuneration to interstate workers shall be deposited in their bank accounts and not by cash by the contractors
Every state government shall mandatorily operate an internet portal indicating the registered principal employers, contractors, establishments and interstate workmen details including Adhar card data for general public information and verification. The details of interstate workmen shall be uploaded by the principal employers and contractors promptly. Non compliance by the principal employers or contractors is treated as violation of the Act and liable for punishment.
No contractor shall deploy the workers outside the state without getting registered in that state. All the details of the interstate workers deployment outside the state shall be made available to the state authorities promptly.
The state government authorities shall conduct mandatory yearly audit of all employers / contractors in a state regarding deployment of interstate workers and submit yearly compliance status or implementation report to the state assembly for their scrutiny.
The ongoing finance commission shall give weight age in devolution of central government funds to the states which are giving more employment to interstate workers as they are ahead in demographic transition. Demographic transition of a state is a real index & status of all round human and economical development

Rajesh188's picture

5 May 2019 - 9:54 pm | Rajesh188

मी वर पोस्ट केलेला कायदा अस्तित्वात आहे ना .
मग हा कायदा कोण्ही ही कुठेही कोणतेही नियम
न पाळता रहा हे सांगत नाही
तुमचे मत विषयाला धरून ध्या
विषयांतर नको

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 May 2019 - 11:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

असे एकच शहर भारता मधील सांगा आणि नंतर बिनबुडाचे कमेंट ध्या संदर्भ : https://www.misalpav.com/user/32316

हे तुम्ही लिहिले होते ना ?

त्यानंतर मी काही शहरांची नावे सुचविली तेव्हा तुम्हीच...

ह्या शहरांची आणि मुंबई ची तुलना खालील पॉइंट वर गूगल वर शोधतो आणि रिझल्ट copy pest Karun इथे कमेंट देतो संदर्भ : https://www.misalpav.com/comment/1032220#comment-1032220

असे लिहिले होते ना ? म्हणजे आतापर्यंत सगळे मुद्द्याला धरूनच चालले होते. मग आता घुमजाव कशाला ? गुगलवरची माहिती तुमच्या सोईची नाही हे अगोदरच माहीत होते. :)

ते काहीही असो. तुमच्याशी चर्चा करण्यात "फायदा/वेळेचा व्यय" यांचे प्रमाण अत्यंत व्यस्त होत आहे. तेव्हा, तुम्ही तुमचे चालू द्या.

यापुढे मी प्रतिसाद दिला नाही तर, मला या चर्चेत अजिबात रस नाही, असेच समजा. शुभेच्छा !

ट्रम्प's picture

8 May 2019 - 6:01 pm | ट्रम्प

काय साहेब एवढ्या लवकर दमले ? मस्त कर्मनुक चाल्ली होती !!!!

नवीन होणारे सभासद माझ्या तर्कहीन प्रतिक्रिया वाचून पुन्हा मिपावर फिरकणार नाहीत अस वाटतंय !!!
संपादकानू काळजी घ्या हो !!!
मिपा गेल्या दोन महिन्यात खुपच बालिश व्हायला लागला आहे .
विनाअनुदानित शाळेत च फिल येत आहे :)

फुटूवाला's picture

8 May 2019 - 6:56 pm | फुटूवाला

+१
:))