परप्रातीयांच्या आक्रमणा पासुन मराठी माणसाला कोण वाचवेल .

स्वामि १'s picture
स्वामि १ in काथ्याकूट
20 Apr 2019 - 4:32 pm
गाभा: 

आज महाराष्ट्रात प्रचंड संख्येने परप्रातीय येत आहेत व ह्या वाढत्या लोकसंख्येमुळे मराठी माणसाचे जनजिवन विस्कळीत झाले आहे.
मुंबई च्या आसपास च्या शहरात व गावात प्रचंड गर्दी वाढली असून मोकळा श्वास घेणे अशक्य झाले आहे व हे चित्र उर्वरित महाराष्ट्रात ही पसरू लागले आहे. मराठी संस्कृती व संस्कार नष्ट होत चालली आहे. दोन मराठी माणसे ही आपापसात हिंदी बोलताना दिसतात. हे असेच चालू राहीले तर मराठी माणूस महाराष्ट्रात अल्पसंख्यक होतील. ह्या मध्ये मराठी ला कायदा व घटणे त कुठलिच तरतूद नाही आहे. अशा वेळी मराठी माणसाने काय करावे?

प्रतिक्रिया

हा प्रश्न मुघलांच्या किंवा हबश्यांच्या किंवा इंग्रजांच्या राजवटीपासून कायम चालत आला आहे .. आणि पुढेही तो तसाच राहील .. " ळ " अक्षर आणि त्याचा वापर असलेले शब्द फक्त आपल्या मराठीत आहेत समजलं,,, स्वामी बाळा ...

नको काळजी करू .. तो काळ यायचाय अजून

जेव्हा " ळ " संपेल तेव्हाच

बळ संपेल मराठीचे

नाहीतर तिची घोडदौड

सातासमुद्रापार चालत राहील ,

वाजवुनी संबळ

मी गातो गाऱ्हाणे

द्यावे थोडे बळ

ऐसे विचार थोपवण्या

उपयोजक's picture

20 Apr 2019 - 6:21 pm | उपयोजक

ळ हा उच्चार दक्षिणेतल्या चारही भाषांमधे आहे.

बोलघेवडा's picture

20 Apr 2019 - 5:33 pm | बोलघेवडा

चावून चोथा झालेला विषय. नवीन काहीतरी काढा राव.

असेच आपण उदासिन राहतो म्हणून आपल्या वर परप्रातीयांचे आक्रमक होते. घराबाहेर निघण्याची ही इच्छा होत नाही कारण सर्वत्र गर्दी असते. तेव्हाच त्याचे गांभीर्य वाढते

आपण मिपावर एक जिलबी टाकायची.

सोन्या बागलाणकर's picture

21 Apr 2019 - 4:12 am | सोन्या बागलाणकर

तुकोबांच्या सल्ल्याप्रमाणे वागावं -

जे जे होईल ते ते पाहावे
चित्ती असू द्यावे समाधान

तुमचं चित्त थाऱ्यावर नाही म्हणून असे विषय तुमच्या डोक्यातून निघतात. सुट्टी घ्या आणि थोडं कुलू मनाली वगैरे करून या, डोकं थंड होईल.

नाखु's picture

21 Apr 2019 - 7:06 am | नाखु

मिपाकरांचेही.

सहजशक्य आहे तिथे आवर्जून मराठीतून संवाद साधणारा वाचकांची पत्रेवाला नाखु

मराठी व महाराष्ट्रा ला ह्या संतांची थोर परंपरा असल्याने च मराठी टिकुन आहे पण आपण बरोबर बोललात चितं ठिकाणावर नही, जिकडेतिकडे प्रचंड गर्दी आवाज प्रदुषण असलेल्या ठिकाणी चिंत ठिकाणावर राहत नाही म्हणून हा राग आहे

वकील साहेब's picture

22 Apr 2019 - 11:46 am | वकील साहेब

चिंत नाही हो चित्त लिहा चित्त

कस होणार रे बाबा या मराठीच ?

स्वामि १'s picture

22 Apr 2019 - 12:11 pm | स्वामि १

धन्यवाद, आपले मराठी वरील प्रेम व तळमळ बघुन बरे वाटले,
आपण चुकांची नेहमीच सुधारणा करत रहा

उपयोजक's picture

21 Apr 2019 - 9:20 am | उपयोजक

Arshad

कंजूस's picture

21 Apr 2019 - 9:38 am | कंजूस

पळाले की वाचतो.

विवेकपटाईत's picture

21 Apr 2019 - 10:06 am | विवेकपटाईत

दिल्ली नोयेडा गुरुग्राम येथे किमान ५ लाख परप्रांतीय मराठी भाषिक ही राहतात. दिल्लीच्या हिंदीत बरीच भेसळ झाली आहे. . मूळ दिल्लीकर बैचेन झाले आहेत. आजकाल पोरे एका दुसऱ्याची वाट लावतात. भाषा भ्रष्ट झाली. पर प्रांतीय लोकांमुळे. काही उपाय सुचवा.

महाराष्ट्रात आलेल्या परप्रातीयाची संख्या पेक्षा महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्याची संख्या ही निच्छित कमी आहे किंवा महाराष्ट्रात आलेले परप्रातीय व इतर राज्यात आलेले परप्रातीय किती आहेत हे ही मोजून पाहा, नक्कीच इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रात नक्कीच परप्रातीय जास्त आले आहेत. महाराष्ट्रात मराठी माणसाने मराठी वर प्रेम करावे हिच अपेक्षा. मराठी प्रगती साठी नकारात्मक लिखाण टाळावे.

विवेकपटाईत's picture

21 Apr 2019 - 7:45 pm | विवेकपटाईत

आम्ही मराठी भाषेवर प्रेम करतो हे वेगळे अनेक तथाकथित मराठी प्रेमी नेहमीच आमच्या लेखन चुका काढण्यात रस दाखवितात व हतोत्सहित करतात. बाकी पर प्रांतीय का येतात .कारण स्थानीय ते काम करायला तैयार नसतात. हे सर्वत्र आहे. आपण आपल्याच लोकांना काम देऊ तर बाहेरून लोक येणार नाही. द्वेषाची राजनीती करण्यात अर्थ नाही.

टाइप करताना अनेकांच्या चुका होतात. त्याला अनेक कारणे आहेत
सवय नसणे, app चांगला नसणे, मोबाईल चांगला नसणे म्हणून शुद्ध लेखनावरून कोणाला कमी समजु नये.
त्यामुळे मुळ विषय बाजुला राहतो

सुबोध खरे's picture

22 Apr 2019 - 11:38 am | सुबोध खरे

निच्छित

हे मूर्च्छित सारखा वाटतंय.

अर्थात मूर्च्छित मराठी भाषा आहे कि भाषिक हा वादाचा मुद्दा आहे.

मराठीवर प्रेम करा हो पण प्रथम शुद्ध अर्थ असलेले शब्द तरी लिहा.

महाराष्ट्रात आलेल्या परप्रातीयाची संख्या पेक्षा महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्याची संख्या ही निच्छित कमी आहे किंवा महाराष्ट्रात आलेले परप्रातीय व इतर राज्यात आलेले परप्रातीय किती आहेत हे ही मोजून पाहा, नक्कीच इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रात नक्कीच परप्रातीय जास्त आले आहेत. महाराष्ट्रात मराठी माणसाने मराठी वर प्रेम करावे हिच अपेक्षा. मराठी प्रगती साठी नकारात्मक लिखाण टाळावे.

चौथा कोनाडा's picture

21 Apr 2019 - 10:02 pm | चौथा कोनाडा

परप्रांतीयांचे आक्रमण ही खरंच फार मोठी समस्या आहे.
यावर कडक उपाय म्हणून:
वाडीतून खेड्यात,
खेडयातून तालुक्यात,
तालुक्यातून जिल्ह्यात,
जिल्ह्यातून राजधानीत,
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात
स्थलांतर करण्यास कायद्याने बंदी घातली पाहिजे.
मोक्का, अस्पा, कलम ३७० सारखे कडक कायदा केले पाहिजेत.
वेळे प्रसंगी फाशीसारखी निर्णायक कृतीही केली पाहिजे !

धन्यवाद, आपल्या सारखे मराठी वर प्रेम करणारे व परप्रातीयांच्या मराठी वरील आक्रमकमणावर विरोध करणारे एकत्र आल्यास आपण सहज यशस्वी होऊ

विजुभाऊ's picture

22 Apr 2019 - 12:03 am | विजुभाऊ

हिंदी बोलणे थांबवा/ आपसूक बरेच प्रॉब्लेम्स कमी होतील. हिंदी ऐवजी मराठी किंवा इंग्रजी चा वापर करा.
बाकी एका मुद्द्यावर सहमत.
स्थानीक लोक फार माजुरडेपणे वागतात.सुतार गवंडी कामासाठी वगैरे तर स्थानीक माणुस उपलब्ध नसतोच.
महाराष्त्रात येण्यासाठी इतराना विशेषतः उत्तरभारतीयाना मनाई / पासपोर्ट ठेवल्यास हे प्रमाण कमी होईल

स्वामि १'s picture

22 Apr 2019 - 10:44 am | स्वामि १

धन्यवाद, आपण अगदी बरोबर बोललात. हिंदी एवजी इंग्रजीचा वापर करा इग्रजी अंतरराष्टीय भाषा आहे व ती शिकलीच पाहिजे. हे परप्रातीय आपल्या कडे न आल्यास आपल्या ला मराठी कारागीर उपलब्ध होतीलच. रोजगार मराठी माणसाला मिळाला पाहिजे परप्रातीयाला नव्हे.

सुबोध खरे's picture

22 Apr 2019 - 11:46 am | सुबोध खरे

हे परप्रातीय आपल्या कडे न आल्यास आपल्या ला मराठी कारागीर उपलब्ध होतीलच.

काय सांगताय?

कोकणात जाऊन पहा.

कामाला खात्रीचा माणूस मिळत नाही हि स्थिती आहे.

मनरेगा मध्ये वर्षात १०० दिवसाचा रोजगार खात्रीचा आहे तेंव्हा ३५० रुपये रोजाने ३ दिवस काम कार्याचे वाटत हजार रुपये खिशात पडले कि पुढचे तीन दिवस दारू पिऊन पडून राहायचे. गेलं तर गेलं कामावर, नाही तर सरकार आपलं आहेच महिन्यात १० दिवसाचा रोजगार हमीचा आहे.

त्यातून प्रत्यक्ष काम न करता २० दिवस हजेरी लावायची. १० दिवसाचा पगार घ्यायचा १० दिवसाचा "त्यांना" द्यायचा. काम झालं तर झालं नाही तर नाही.
हा का ना का

यामुळे कोकणात आंब्याच्या बागांवर देखरेख करायला आंबे पाडायला सर्रास नेपाळी माणसे आहेत. नेपाळी लोकी सोडून गेले तर आंब्याच्या बागांची वाताहत होईल इतकी वाईट स्थिती आहे.

आणि आपण मराठी माणसाबद्दल इथे बसून गहिवर काढतोय

विजुभाऊ's picture

22 Apr 2019 - 12:38 pm | विजुभाऊ

हे खरे आहे डॉक्टर साहेब.
कोकणातच कशाला, आजकाल पश्चीम महाराष्त्रात दुधाच्या धारा काढणारेही भैय्ये आहेत. मराठी लोक मिळतच नाहीत.
एम आय डीसी तले कॅज्यूअल लेबर ही अमराठी आहेत,
मराठी मुले कशात दिसतात तर कोणत्यातरी गडावरून ज्योत आणणे , पालख्या काढणे , दहीहंडीचे थर लावणे , कोणत्यातरी दादा बापू च्या वाढदिवसाचे फलक लावणॅ , बंद पुकारणे , खळ्ळ खटॅक मरणे , राजे , पहाराज , " बगतोस काय रागाने..... " इत्यादी स्टीकर्स दुचाकीवर लावून फिरणे . अंगभर दागीने घालून कुठल्यातरी मिरवणूकीत मिरवणे, शिवजयंतीला कपाळावर नाम ओढून फेटा घालून फिरणे , गल्लीतील गणपतीची वर्गणी मागणे. इत्यादी करत फिरतात.

जेव्हा आपण महाराष्ट्रात व मराठी च्या प्रगती चा विचार करतो तेव्हा मराठी तरुणांना ही योग्य दिशा मिळेल असे अपेक्षित आहे. आपल्यातील चुकलेल्याना योग्य शिक्षण देऊन चांगली मराठी संस्कृती निर्माण करूया. आपल्यातला आळस दुर केल्यास आपण इस्रायल प्रमाणे प्रगती करू शकतो. सकारात्मक विचार व प्रतिसाद मिळाला तर आपली प्रगती अशक्य नाही. व हे मराठीच्या रक्तात आहेच व तो आपला ४०० वर्षाचा इतिहास आहे

चौथा कोनाडा's picture

24 Apr 2019 - 4:18 pm | चौथा कोनाडा

बाबासाहेब, साहेबांचे साहेब ......

Rajesh188's picture

25 Apr 2019 - 7:08 am | Rajesh188

सर्व मराठी समाज तुम्ही वर्णन केल्याससरखा आहे बिलकुल ग्राह्य नाही
सर्वच समाजात काही तरुण तुम्ही म्हणता त्या प्रमाणे असतात सर्रास सर्व मराठी तरुण तसे आहेत ह्या मधून तुमचा मराठी द्वेष स्पष्ट दिसत आहे ।
आणि प्रामाणिक ,कष्टाळू मराठी तरुणांचा तुमच्या पोस्ट नि उपमर्द होत आहे

स्वामि १'s picture

25 Apr 2019 - 5:33 pm | स्वामि १

महाराष्ट्रात उद्योगधंदे वाढले कारण मराठी माणसे कतृवात व हुशार कष्टकरी होते. नंतर भरभराट झाल्यावर कमी पगारात उत्तर प्रांतातील माणसे काम करू लागली व मराठी समाजाला आळशी संबोधले गेले.

Rajesh188's picture

25 Apr 2019 - 7:14 am | Rajesh188

सर्व मराठी समाज तुम्ही वर्णन केल्याससरखा आहे बिलकुल ग्राह्य नाही
सर्वच समाजात काही तरुण तुम्ही म्हणता त्या प्रमाणे असतात सर्रास सर्व मराठी तरुण तसे आहेत ह्या मधून तुमचा मराठी द्वेष स्पष्ट दिसत आहे ।
आणि प्रामाणिक ,कष्टाळू मराठी तरुणांचा तुमच्या पोस्ट नि उपमर्द होत आहे

सुबोध खरे's picture

22 Apr 2019 - 12:58 pm | सुबोध खरे

हे राव साहेब कोण आहेत म्हणायचं?

सुबोध खरे's picture

22 Apr 2019 - 1:02 pm | सुबोध खरे

हे राव साहेब कोण आहेत म्हणायचं?

सुबोध खरे's picture

22 Apr 2019 - 1:02 pm | सुबोध खरे

http://www.myfatpocket.com/fashion-news/gold-obsessed-man-shows-off-soli...
हे पहा
साडे आठ किलोचा सोन्याचा शर्ट घालून फिरणारे दत्ता साहेब फुगे.

महासंग्राम's picture

22 Apr 2019 - 1:09 pm | महासंग्राम

डॉक, सध्या परलोकवासी झालेत ते. चिटफंड च्या वादातून दगड घालून खून करण्यात आला होता त्यांचा.

हो म्हणजे मी ऐकलं त्यानुसार ढापलेल्या पैशांच्या वाटणीवरून त्यांचा जीव गेला उगीच.

असते तर आत्ता सगळं अंग सोन्याचं झालं असतं त्यांचं

Rajesh188's picture

22 Apr 2019 - 11:08 pm | Rajesh188

महाराष्ट्र च नाही तर सर्व प्रगत राज्यांना परप्रांतीय लोकांचे ग्रहण लागले आहे .
यूपी , बिहार, बंगाल, झारखंड ही राज्य देशात गंभीर समस्या निर्माण करत आहेत .
मध्ये दक्षिणेत आशि पण चर्चा चालू होती की साऊथ chya सर्व राज्यांनी मिळून वेगळा देशाची मागणी करावी .
इथपर्यंत हा विषय गंभीर आहे

भारत हा देश खुप मोठा व लोकसंख्या हा भयंकर वाढलेली आहे व देशात संस्कृती व संस्कार मघे खूप फरक आहे. आजच्या घडीला सर्व राज्ये वेगळी व्हावीत असे वाटते. संरक्षण व परराष्ट्र संबंध हा विभाग सयुक्तिक ठेउन स्वतंत्र देश झाल्यास महाराष्ट्राची सर्वाधिक प्रगती होइल.

विजुभाऊ's picture

23 Apr 2019 - 10:30 am | विजुभाऊ

सहमत

ज्ञानव's picture

23 Apr 2019 - 11:39 am | ज्ञानव

हा शब्दच शिवीसारखा वापरला जातो का ? मराठी माणूस आणि त्याचे दुर्गुणविशेष आपण आवडीने चघळतोच त्याहीपेक्षा आपण ते अलिप्तपणे, जणू मी मराठी नाहीच ह्या दृष्टीकोनातूनच आणि शिव्या शाप दिल्यासारखे चर्चा करत असतो. ह्यात बदल नको का करायला? निळू फुलेंपासून ते शरद पवारांपर्यंत आपणच आपल्या माणसांना नावे ठेवत असतो. सिनेमातल्या भुमिके मुळे निळू फुलेंसारखा माणूस आपण गमतीजमतीत बदनाम करून टाकला तेच शरद पवार म्हणजे भ्रष्टाचारच (अगदी असेलही खरे)पण इतर अमराठी नेते अजिबात भ्रष्टाचारी नाहीत का? त्यांच्या बद्दल कुणी काही बोलताना दिसत नाहीत. युपीचा एक आमदार मुंबईतल्या एका भय्यासाठी शस्त्रास्त्र घेऊन आला होता. आमच्या पाठीशी नगरसेवकसुद्धा राहत नाही. त्यात ब्राम्हण मराठा वाद आहेच. ज्या विभागात लहानाचा मोठा झालो त्याच विभागात मी आणि माझे मित्र एक हॉटेल टाकू शकलो नाही. म्युनिसिपाल्टीतले, पोलीसातले, स्थानिक गुंड सगळे मराठी असून माझ्याविरुद्ध होते.

ईथे मुंबईत भय्ये (आणि मोदी आल्यापसून) गुजराथी आक्रमक व्हायला लागलेत त्याच्या मागे त्यांच्या हातात असलेली अर्थसत्ता हे महत्वाचे कारण आहे. साउथ इंडियन हॉटेलवाल्यांनी मराठी बरोबर गुजराथी पाट्या लावल्या आणि त्याच्या कैक वर्षे आधी जैन डिशेस मेनू कार्डावर घेतल्या ह्याला कारण हॉटेलमध्ये येणारे बहुसंख्य गिर्हाईक जैन आहे आणि वाटेल तेव्हढे पैसे देऊन ते आपल्याला हवी तशी डिश बनवून घेण्याची आर्थिक कुवत ठेवून आहेत. त्याच प्रमाणे भैय्ये स्वस्तात कारागिरी करतात म्हणून सगळ्यांनी त्यांना जवळ केले तरी मराठी माणूस जी गोष्ट १० रुपयात त्यांच्याकडून बनवून घेतो वर फुकटचे चार खिळे मारून दे सांगतो तेव्हा तीच वस्तू गुजराथी २५ रुपयात बनवून घ्यायला तयार होऊन वर चार खिळे, प्रत्येक खोलीत जुन्या फर्निचर वर छोटे मोठे काम करून घेतो. भय्ये आनंदाने त्यांची कामे करतात कारण २५ रुपये म्हणजे थोडे जास्तच मिळतात म्हणून.

अर्थसत्ता आणि सामाजिक ऐक्य जोपर्यंत आपल्या हाती येत नाही तोपर्यंत आपण कुणावरही कुरघोडी करण्याची स्वप्ने बघूच शकत नाही.

कोकणातली परिस्थिती लवकरच मुळशी पॅॅटर्नच्या वळणाने जायला लागली आहे. सोन्याची खाण असलेले कोकण आम्ही किंवा आमचे राजकीय पुढारी महाराष्ट्रेतर लोकांच्या समोर हीन दीन लीन होऊन विकतायत. तरीही आम्ही कुंभकर्ण (तो सहा महिन्याने तरी जागा होत होता आपण त्यापेक्षाही गये गुजरे आहोत.) जागे व्हायला तयार नाही.

धन्यवाद ज्ञानव, आपण समस्येवर योग्य बोट दाखवले,

"अर्थसत्ता आणि सामाजिक ऐक्य जोपर्यंत आपल्या हाती येत नाही तोपर्यंत आपण कुणावरही कुरघोडी करण्याची स्वप्ने बघूच शकत नाही. "

अर्थसत्ता चा विचार आज पर्यंत मराठी माणसांनी कधीच केला नाही. ह्या विषयावर आपण ज्ञानव, अजुन सर्विस्तर लिहावे.
पैसा व संपत्ती व पोषक वातावरण आपल्या महाराष्ट्रात आहे. पण मराठी माणूस त्याचा फायदा उचलू शकला नाही किंवा ह्या पोषक वातावरणात पैसा व संपत्ती कशी वाढवावी हे मराठी माणसाला कोणी च शिकवले नाही. किंबहुना घटणेत कायदा व शिक्षणात विषय नाही.

धन्यवाद ज्ञानव, आपण समस्येवर योग्य बोट दाखवले,

"अर्थसत्ता आणि सामाजिक ऐक्य जोपर्यंत आपल्या हाती येत नाही तोपर्यंत आपण कुणावरही कुरघोडी करण्याची स्वप्ने बघूच शकत नाही. "

अर्थसत्ता चा विचार आज पर्यंत मराठी माणसांनी कधीच केला नाही. ह्या विषयावर आपण ज्ञानव, अजुन सर्विस्तर लिहावे.
पैसा व संपत्ती व पोषक वातावरण आपल्या महाराष्ट्रात आहे. पण मराठी माणूस त्याचा फायदा उचलू शकला नाही किंवा ह्या पोषक वातावरणात पैसा व संपत्ती कशी वाढवावी हे मराठी माणसाला कोणी च शिकवले नाही. किंबहुना घटणेत कायदा व शिक्षणात विषय नाही. ज्ञानव आपण ह्या विषयावर लिहीतच राहा

मराठी कथालेखक's picture

25 Apr 2019 - 3:33 pm | मराठी कथालेखक

आधी ही बातमी वाचा.. तुमच्या चित्तवृत्ती (मूड) बदलतील !!
पुण्याच्या योगेंद्र पुराणिकांनी जपानमध्ये महापालिकेची निवडणूक जिंकली
फार मुद्देसूद लिहायला आता वेळ नाही.. पण थोडक्यात आठवतायत /सुचतायत त्या गोष्टी लिहितो.
आता मूळ प्रश्नाबद्दल
कोणत्याही प्रगत प्रदेशाकडे अप्रगत प्रदेशातील लोकांचा ओढा असतोच.. म्हणूनच ट्रम्पसाहेबांना मेक्सिकोसीमेवर भिंत बांधायची आहे. असो.
बाकी मराठी माणूस कुठे नाही ? मराठी माणसाचे आकर्षण सगळ्या देशाला आहे.. आंबेडकर , टिळक , सावरकर ई..
सांस्कृतिक क्षेत्रात बघा - गुलजार , कैफी आजमी सारख्या कवी/लेखकांना मराठी भाषेशी जवळीक करावीशी वाटली.
प्रा. स्टॅनले वोल्पर्ट या इतिहासकाराला भारतीय इतिहासचे कुतुहल वाटले.. तो दोनच भारतीय भाषा शिकला एक मराठी , दुसरी संस्कृत. (संदर्भ)
आता काही रिक्षा/टॅक्सीचालक मराठी शिकत नसतील आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्याशी हिंदीत बोलावं लागत असेल तर त्याबद्दल खंत करत बसण्याची गरज नाही..

स्वामि १'s picture

25 Apr 2019 - 6:04 pm | स्वामि १

धन्यवाद मराठी कथालेखक, आपण चांगली माहिती पुरवली, मराठी माणसाला योग्य संधी मिळाल्यास तो व महाराष्ट भरपूर पुठे जाइल व तो हे वेळोवेळी दाखवतच आहे.