यांना कसे आवरायचे?- मार्गदर्शन हवे आहे

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
19 Apr 2019 - 12:13 pm
गाभा: 

गेल्या तीन दिवसात एका फायनान्स कम्पनीच्या लोकांनी " काही कर्ज हवे आहे का " अशी विचारणा करण्यासाठी फोन केले आहेत.
या एकाच कम्पनीचे मला जवळजवळ २४ वेळा फोन आले आहेत.
प्रत्येक वेळेस नव्या व्यक्तीने , वेगळ्या क्रमांकावरून हे फोन येतात.
सहसा आपण वैयक्तीक मोबाईल क्रमांक कोणाला देत नाही.माझा क्रमांक " डू नॉट डिस्टर्ब" साठी नोंदणी केलेला आहे.
तरीही हे फोन येतच रहातात. फोन केलेल्या इसमास विचारले की मला तुमच्या मॅनेजरशी बोलायचे आहे. तर उत्तर मिळते की " माझे मॅनेजर इथे नाहीत"
माझा नंबर कुठून मिळाला असे विचारले तर उत्तर दिले जाते की कंपनीच्या डेटाबेस मधून मिळाला.
हा डेटाबेस कोण देते विचारचे तर तो प्रश्न टाळला जातो.
मी वैतागलोय. हैराण झालोय. झक मारली आणि मोबाइल घेतला असे झालेय. समोर माणूस दिसला असता तर त्याचे थोबाड फोडले असते इतका राग आलाय.
या फायनास कंपनीवर कोर्टात फिर्याद / पोलीसात तक्रार देता येईल का?
एकसारखे फोन करून मानसीक त्रास देणार्‍या त्या फायनास कंपनीला धडा शिकवायचाय.
तुम्हाला कोणाला अस अनुभव येतोय का?
तुम्ही यावर काय उपाय केलात?
मार्गदर्शन हवे आहे.

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

19 Apr 2019 - 12:31 pm | मराठी_माणूस

हो. असे फोन बर्‍याचदा येतात. वेगवेगळ्या नं. वरुन येतात. चिडुन काही फायदा नाही हे लक्षात आले आहे.
थंड पणे त्यांना एव्हढेच सांगतो की सध्या लोन ची काही आवश्यकता नाहीय्ये .

गणामास्तर's picture

19 Apr 2019 - 12:32 pm | गणामास्तर

" डू नॉट डिस्टर्ब" साठी क्रमांक नोंदणी करून काहीही उपयोग होत नाही.
तुम्ही तुमचा क्रमांक बँक अकाउंटला जोडला असेल तर बँक तुमचा डेटा विकते हे जगजाहीर आहे त्यामुळे असे कॉल येतात.
जर का तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर त्याची नोंदणी करताना तुम्ही जिथे जिथे म्हणून तुमचा नंबर, आधार, पॅन नंबर वगैरे जी काही माहिती दिली असेल ती सगळी सरकारने ऑलरेडी विकलीय. त्यामुळे सिट बॅक अँड रिलॅक्स. आपण हे थांबवू शकत नाही.

चौथा कोनाडा's picture

19 Apr 2019 - 12:35 pm | चौथा कोनाडा

असा फोन आला तर चिडायचं नाही. आधीच कुल व्हायचे.
फोन घेताच मग शांतपणे गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग वै बोलायला सुरुवात करायची.
ते घाईत असतात, सुसाट माहिती सांगायाला सुरुवात करतात. आपण "गुड ....." असे अभिवादन करायचे.
कुठला सण असेल त्यानुसार "हॅप्पी दिवाळी, ख्रिसमस, पोंगल, रामनवमी, बैसाखी, गुढी पाडवा, दसरा इ इ " असल्या शुभेच्छा द्यायच्या. त्यांचा टेम्पो स्लो होऊन जातो. त्यांची प्रेमाने चौकशी करायची, चहा पाणी / जेवण झाले का वै.
मग त्यांना ओळखू येतं कि हे बेणं वेगळच आहे, सोडून देतात नाद.

असले शेकडो प्रयोग करू शकतो, यात आपली अध्यात्मिक प्रगती सुद्धा साधली जाते.

धडाबिडा शिकवायला जाऊन फार काही साध्य होणार नाही असे वाटते.
ती एक यंत्रणा असते, आपल्या कडे तशी तुल्यबळ यंत्रणा, वेळ आणि आर्थिक ताकद असेल तर भांडून धडा शिकवणात अर्थ आहे

खिलजि's picture

19 Apr 2019 - 12:43 pm | खिलजि

मिचक्यांचे आवाज काढणे .. वेगवेगळ्या भाषांत बोलणे .. मध्येच ढेकर देणे किंवा थंड हवेचे आवाज ऐकवणे .. कधीकधी संध्याकाळी फोन करा मला तुमचे उत्पादन घ्यायचे आहे असे सांगणे .. जर कुना शहाणी किंवा शहाण्याने स्वतःच्या पर्सनल नंबरवरून फोन केलाच तर रात्री जेव्हापण लघुशंकेस किंवा इतर कामास उठला तेव्हा तो फोन फिरवणे आणि उत्पादनाबद्दल विचारणे .. या काही गोष्टी कटाक्षाने केल्यात तर तुम्हाला कधीच फोन येणार नाहीत .. मी हा शेवटचा उपाय अघोरी पद्धतीने वापरला आहे .. तुम्ही विश्वास नाही ठेवणार पण मी कधीही डी एन डी केला नाही किंवा तसे करा म्हणूनही सांगितले नाही ..

हे साले एका कळपातच वावरतात .. तुम्ही दोघातिघांना सडकून त्रास दिलात ना तर तुम्ही आपोआप प्रसिद्धी पावतात आणि मग हे लोक्स तुमच्या वाट्यालाही जात नाहीत .. कंपन्यांची नावे भलेही वेगळी असतील पण हे सर्व जिथून आपला देता उचलत असतील तिथे आपण ज्याला त्रास दिला असेल तो नक्कीच नोंद ठेवत असणार आपली " एका विक्षिप्त गिर्हाईक " म्हणून .. करून बघा .. पुढील चालीसाठी शुभेच्छा

अभ्या..'s picture

19 Apr 2019 - 12:52 pm | अभ्या..

त्यांनाच कामाला लावायचे. मनात येईल तो पॅन नंबर सांगायचा. सिबिल स्कोर तुम्हीच हुडका म्हणुन सांगायचे. आधार कार्डचा नंबर पण मनाला येईल तो सांगायचा. चुकीचाय म्हणले की त्यांच्यावर डाफरायचे, सरकारवर डाफरायचे, नंदन निलेकेणीवर डाफरायचे. अगदीच मज्जा करायची असली तर १५०-२०० असा सिबिल सांगायचा. तरीही मला कर्ज पाह्यजे हे टुमणे सोडायचे नाही. दोन वाक्ये झाली की "कधी होणार डिस्बर्समेंट?" असे विचारायचे. लै नड आहे हो सध्या असे सांगत बसायचे. लै लोन झाल्याने, क्रेडीट कार्डे ब्लॉक झालीत, कुणी कर्ज देत नाही तुम्ही देवासारखे धावून आलात असे सांगायचे, अगदी सेल्स पर्सन प्रत्यक्ष भेटतो म्हणला तरी कुठे तरी आडबाजूला भेटायला बोलावायचे. आपण जायचेच नाही. फोनवरुन मनाला येईल तसे नॅव्हीगेट करत राहायचे. मनाला वाटले तर नीट बोलायचे अन्यथा काहीही सांगत बसायचे. अगदी इथे मिपावर धाग्याला प्रतिसाद मिळत नाहीत हे पण गार्‍हाणे गायचे. चौकीदार अ‍ॅक्चुअली कोण आहे त्याची चर्चा करायची, आगामी लोकसभेत कुठली सीट बसेल हे त्यालाच विचारायचे. त्याच्या नसलेल्या चुका हुडकु हुडकू त्याला ग्यान शिकवायचे. शेवटी ते कंटाळतात. जमल्यास आपल्याला ब्लॅक लिस्टीत टाकतात. किस्सा खतम. मग मज्जानु लाईफ.

चौथा कोनाडा's picture

19 Apr 2019 - 1:02 pm | चौथा कोनाडा

हा .... हा ..... हा ... !

नंदन निलेकेणीवर डाफरायचे.

अगदी इथे मिपावर धाग्याला प्रतिसाद मिळत नाहीत हे पण गार्‍हाणे गायचे.

हा .... हा ..... हा ... !

धागा शतकी होणार यात शंका नाही !

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Apr 2019 - 2:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

सद्या अभ्या..च्या प्रतिभेला सणसणीत धुमारे फुटत आहेत... हा वसंत ऋतूचा परिणाम म्हणावा की इतर काही ? =)) =)) =))

सुबोध खरे's picture

19 Apr 2019 - 12:56 pm | सुबोध खरे

TRAI चा DND अँप्लिकेशन गुगल स्टोअर वर उपलब्ध आहे. तो डाऊन लोड करा आणि येणाऱ्या प्रत्येक फोन बद्दल तक्रार करा. काही दिवसांनी यांचे हे नंबर ब्लॉक होतात आणि तुमचा त्रास थांबतो हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.
तोवर आलेल्या प्रत्येकाला माझे वय ७५ आहे सांगा. कर्ज हवंच आहे पण परत केंव्हा मिळेल याची शाश्वती नाही. मुलाने पैसे पाठवले कि परत करेन सांगा. त्यांच्या यादीतूनही आपले नाव कट होईल.

भंकस बाबा's picture

19 Apr 2019 - 1:17 pm | भंकस बाबा

माझ्या एका टवाळ मित्राने केलेला संवाद सांगतो.
कॉलर : सर लोन घ्या ना.
मित्र : नाही मला गरज नाही.
कॉलर : सर बघा सर अगदी छोटा ईएमआई भरावा लागेल. ईजी इंस्टालमेंट, तात्काळ कर्ज , अगदी थोड़े डॉक्युमेंट
मित्र : मैडम , माझ्याकडे एक जाफराबादी म्हैस आहे , दिवसाला वीस लीटर दूध देते, अगदी आखुड़शिंगी, कमी चारा खाते. स्वस्तात काढायची आहे. तुम्ही फ़ोनवर कोणालातरी पटवा ना , तुम्हालापण कमीशन देऊ.
कॉलर : अहो अशी कामे आम्ही करत नाही.
मित्र : मग तुम्हीच घ्या.
कॉलर : अहो मला गरज नाही.
मित्र : एक्सटली, मला पण तुमच्या लोंनची गरज नाही.
बघा हे करून , सगळा स्ट्रेस दूर होतो. हापिसातला, बायकोवरचा, शेजार्याचा असा सगळ्याचा वचपा काढल्याचा आनंद अनुभवता येतो

भंकस बाबा's picture

19 Apr 2019 - 1:17 pm | भंकस बाबा

माझ्या एका टवाळ मित्राने केलेला संवाद सांगतो.
कॉलर : सर लोन घ्या ना.
मित्र : नाही मला गरज नाही.
कॉलर : सर बघा सर अगदी छोटा ईएमआई भरावा लागेल. ईजी इंस्टालमेंट, तात्काळ कर्ज , अगदी थोड़े डॉक्युमेंट
मित्र : मैडम , माझ्याकडे एक जाफराबादी म्हैस आहे , दिवसाला वीस लीटर दूध देते, अगदी आखुड़शिंगी, कमी चारा खाते. स्वस्तात काढायची आहे. तुम्ही फ़ोनवर कोणालातरी पटवा ना , तुम्हालापण कमीशन देऊ.
कॉलर : अहो अशी कामे आम्ही करत नाही.
मित्र : मग तुम्हीच घ्या.
कॉलर : अहो मला गरज नाही.
मित्र : एक्सटली, मला पण तुमच्या लोंनची गरज नाही.
बघा हे करून , सगळा स्ट्रेस दूर होतो. हापिसातला, बायकोवरचा, शेजार्याचा असा सगळ्याचा वचपा काढल्याचा आनंद अनुभवता येतो

विजुभाऊ's picture

19 Apr 2019 - 1:43 pm | विजुभाऊ

पण या कंपन्याना धडा कसा शिकवायचा?
आपण त्यांचे ग्राहक झालेलो नसतो त्यामुळे ग्राहक न्यायालयाचा पर्याय देखील बाद ठरतो.
दुर्लक्ष्य करायचे हे ठीक आहे. पण काम चालू असताना , कशात तरी व्यग्र असताना , मिटींग मधे असताना , डिस्कशन चालु असताना, नाटक , सिनेमा पहात असताना , दुपारी झोपलेले असताना , हे असले बीन कामाचे फोन येणे हा किती मनस्ताप च नाही तर छळवाद आहे
फोन प्रत्येक वेळेस नवीन नंबरवरून येतात त्यामुले ब्लोक करणे ही शक्य नाही. शिवाय अननोन नंबर एखाद्या सहकार्‍याचा , नातेवाईकाचा , व किंवा काही व्यावसायीक कामाचा ही असू शकतो.
असले फोन घेवून त्यावर तिरकस बोलणे हे लॉजीकल आहे पण त्यासाठी तुम्हाला तुमचे चालु असलेले काम सोडून तो फालतू कॉल अटेंड करावा लागतो
या फायनान्स कम्पन्याना आणि त्याना डेटा देणाराना धडा कसा शिकवायचा हाच प्रश्न आहे.

महासंग्राम's picture

19 Apr 2019 - 2:26 pm | महासंग्राम

विजुभाऊ तुम्ही त्यांना फायनान्स कंपनी धडा शिकवू शकता पोलीस तक्रार करून फक्त न्यायालयीन प्रक्रियेत गुंतण्याची तेवढा वेळ आणि पैसे खर्च करण्याची तयारी हवी. त्यांच्यावर केस करू शकता पण हि प्रोसिजर खूप लांब चालते.
यात पण तुम्ही कोणत्या बेसिसवर त्यांच्यावर खटला दाखल करणार महत्वाचे आहे.
तुमचा नंबर त्यांच्याकडे कसा आला यावरीन तुम्ही काहीच करू शकत नाही.

सुबोध खरे's picture

19 Apr 2019 - 6:57 pm | सुबोध खरे

विजूभाऊ

दुपारी झोपलेले असताना मी शांतपणे फोन सायलेंट मोड वर ठेवतो.

जेंव्हा आपल्याकडे मोबाईल फोन नव्हते तेंव्हा काय होत होते? काहीही नाही.

मग आता काय होईल? काहीही नाही.

माझ्या जवळच्या नातेवाईकांना( आईवडील भाऊ इ) याना माझ्या घरचा लँडलाईन नंबर माहिती आहे तेवढीच तातडीची गरज पडली तर (हे आम्ही डॉक्टर आहोत म्हणून) ते येथे फोन करू शकतात.

बाकी दुनियेला मी फाट्यावर मारलेले आहे.

२४ तास उपलब्ध असायला आपण हमरस्त्यावरील "वेश्या" नाही (त्या पण "२४ तास" उपलब्ध नसतात)

मी रुग्ण पाहत असताना फोन आला आणि पलीकडून असे कर्ज पाहिजे का विचारणा झाली तर मी फोन बंद न करता बाजूला ठेवतो आणि नंतर डी एन डी च्या ऍप वर तक्रार करतो.

रिकामा असलो आणि तिकडच्याच आवाज दीड शहाणपणाचा वाटला तर वय ७५ आहे पासून माझं घर विकायचं आहे पर्यंत जे काही मनाला येईल ते बोलतो आणि आपलाच तणाव कमी करतो.

जर स्वर नम्रपणाचा असेल तर नम्रपणे उत्तर देतो आणि डी एन डी च्या ऍप वर तक्रार करतो.

इरामयी's picture

1 May 2019 - 11:19 am | इरामयी

यावर एक सोपा उपाय आहे.

फोन घ्यायचा आणि बाजूला ठेवून द्यायचा. ती फोनवरची मुलगी "हॅलो मॅडम, हॅलो हॅलो" करत शेवटी फोन ठेवून देते. असं दोन तीन वेळा करावं लागेल. नंतर काही दिवस फोन येणार नाहीत.

चांदणे संदीप's picture

19 Apr 2019 - 2:23 pm | चांदणे संदीप

माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की, असे कॉल्स आपल्याला पुढील घटनानंतर येतात.

१) कोणत्याही कर्जासाठी ॲप्लाय करून झाल्यानंतर
२) ते "डिस्बर्स" झाल्यानंतर काही दिवसांनी
३) क्रेडिट कार्डला ॲप्लाय केल्यानंतर
४) क्रेडिट कार्डावर भरगच्च खरेदी केल्यानंतर
५) एखादी मोठी खरेदी ईएमआयवर झाल्यानंतर
६) बॅंक किंवा इतर गुंतवणूक करून घेणाऱ्या संस्थेकडे नवीन काहीतरी सुरू केल्यानंतर
७) लोनवाले तुमच्या सिबील स्कोअरवर लक्ष ठेऊन असतात. तो उत्तम असल्यास व नवीन काही लोन बऱ्याच काळात घेतले नसल्यास
८) बॅंकबाझार किंवा तत्सम साईट्सवर कुठे टिचक्या दिल्यास
९) तुमच्या दुर्दैवाने बॅंकीगमध्ये तुमचे मित्र/ओळखीचे/नातेवाईक असल्यास
१०) जुन्या लोन मिळवून देणाऱ्यांपैकी कुणाशी सलगी केल्यास

थोडक्यात, अशा कॉल्सपासून सुटका इल्लै.
मग मी असे करतो. समोरून कुणी मराठीतून बोललं की आपण इंग्रजी झाडायची आणि हिंदी किंवा इंग्रजीतून बोलल्यास आपल्याला त्यावेळी सुचेल त्या मराठीतून बोलायचं. वैतागून आपली दोन मिनिटे वाया घालवायची नाहीत.

Sandy

महासंग्राम's picture

19 Apr 2019 - 3:24 pm | महासंग्राम

मला फोन आला कि मीच त्यांना ऑफर देतो आधी आमच्या कंपनीचं प्रॉडक्ट खरेदी करा मग लोन च पाहू, एका मिनिटाच्या आत फोन ठेवतात.

पुणेरी राघूमैना's picture

22 Apr 2019 - 9:08 pm | पुणेरी राघूमैना

ते निष्पाप आहेत. फक्त नको असे सांगा काम होऊन जाईल

उगा काहितरीच's picture

19 Apr 2019 - 4:27 pm | उगा काहितरीच

अगोदर मी पण खूप वैतागलो होतो अशा फोनला. तुम्हाला नंबर कुठून मिळाला ? वगैरे लै वेळा भांडुन झाले. पण उपयोग नाही. एकदा कॉल वर मस्त दोन्हीबाजुंनी शिव्यांचे आदानप्रदान पण झाले . (याचा मनस्ताप स्वतः लाच जास्त होतो.) पोलिसांची धमकी देऊन झाली , काही उपयोग नाही . ते म्हणतात सर आम्ही कुठलाही गुन्हा केलेला नाही. आणि नुसत्या नंबरवरून त्यांना गाठणे हे ही पोलिसांसाठी वेळखाऊ/ किचकट काम आहे. (टेक्निकली बरोबर वाटते ,अबक व्यक्तीने तुम्हाला फोन केला व शांतपणे लोन हवंय का असं विचारलं तर त्यावर कोणत्या गुन्ह्याखाली अटक होणार ? ) वर सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे छळुनही झालंय जसेकी , हो हवंय लोन . दोन कोटी पस्तीस लाख अठरा हजार तिशने बावन्न रुपये. तुमचं उत्पन्न किती ? दोन हजार .
पण हळूहळू तेही बोर होत गेलं. एकदा एका महिलेने ऐकवलं , सर मी इथे व्यवस्थितपणे बोलतेय आणि तुम्ही असं बोलताय ! पैशाची गरज नसली असती तर आम्ही पण इथे जॉब केला नसता वगैरे.
तेव्हापासून असे कॉल आले की एकच गोष्ट करतो. सर , लोन हवंय का ? नको थँक्यू . पुढचं काहीही न ऐकता फोन ठेवून द्यायचा . मानसिक शांती मिळते.
बघा मला तरी हा एकच उपाय लागू पडला आहे.

आनन्दा's picture

19 Apr 2019 - 4:48 pm | आनन्दा

मी पण तेच करतो ..
पण एखादा परत परत फोन करायला लागला तर मात्र मग झाडून काढतो.

पुणेरी राघूमैना's picture

22 Apr 2019 - 9:07 pm | पुणेरी राघूमैना

परत करायला सांगू नका. ते आठवणीने करतील. पण घाईनं नको मानले तर चालेल

खरंय. मी पण असंच करतो. नो थँक्स म्हणून सरळ फोन बंद करतो.
सोबत ट्रू कॉलर वर असे नंबर ब्लॉक करत जातो.
अजूनही मधूनच एखादवेळी असे फोन येतातच. पण प्रमाण आता जवळपास नगण्य झालंय.

बाकी ते धडा शिकवणे वगैरे सगळे ठीके, पण आपण मनस्ताप किती करून घ्यायचा याचा विचार करणे त्याहून जास्त ठीके.

अवांतरः
- रस्त्यावर लिफ्ट मागितली तर शक्यतो मी कुणाला मदत करत नाही. कारण स्वतःच्या सुरक्षेची काळजी. मला काय माहित कोण व्यक्ती कशी आहे ते. ओळखीच्या व्यक्तींसोबत झालेल्या घटना माझ्यासाठी पुरेशा आहेत. आणि आपण लोकांना मदत केली पाहिजे वगैरे ठीके, पण माझ्या आणि माझ्या परिवाराची काळजी घेणे हे जास्त ठीके.
- भिकार्‍यांनाही मी शक्यतो भीक घालत नाही. कारण भीकेतून मिळणारे पैसे बघूनच अनेक टोळ्या यात उतरल्यात. लहान मुले पळवून त्यांना भीकेला लावणारे प्रकार आपण वाचत असतोच. माझ्यासाठी ते पुरेसं नाह, नाही म्हणायला.

शेखर's picture

19 Apr 2019 - 4:28 pm | शेखर

विजुभाऊ,

तुम्ही त्यांना बासरी शिकवण्याची काऊंटर ऑफर द्या...बघा लगेच फोन बंद करतील...

प्रमोद देर्देकर's picture

19 Apr 2019 - 4:59 pm | प्रमोद देर्देकर

उ.गा. जे काही म्हणत आहेत ते जरा समजून घ्या विजुभौ.
मोठ्या नाईलाजाने शिक्षण कमी असून सुध्दा घराला हातभार लागावा म्हणून ह्या कंपनीत ते लोक काम करतात. तुम्ही फक्त एक दोन फोनला उत्तरं देता पण त्यांना टार्गेट पुरण करण्यासाठी किती लोकांकडून शिव्या शाप ऐकावं लागतं असेल .
तेव्हा " नाही नकोय " असं म्हणून फोन लगेच बंद करा किंवा अनोळखी क्रमांक म्हणून उचलू नका.
हा सोप्पा उपाय करा .

मराठी कथालेखक's picture

19 Apr 2019 - 6:12 pm | मराठी कथालेखक

समोरची व्यक्ती बँक किंवा तत्सम ठिकाणाहून बोलतेय हे कळाल्यावर मी "बरं बोला" म्हणतो आणि फोन डिसकनेक्ट न करता तसाच बाजूला ठेवतो. ती व्यक्ती बोलत राहून काही सेकंदांनी फोन बंद करते.. अशा वेळी अशा व्यक्तीची किती चिडचिड होत असेल याची कल्पना करुन मला छान वाटतं. मी फोन स्पीकरवरही टाकलेला नसतो तरी काही वेळा त्य व्यक्तीचं मोठ्याने "हॅलो. हॅलो सर" हे ऐकायला येतं...
वर काही लोकांनी म्हंटलं तसं वेडीवाकडी उत्तरं द्यायला मला आवडेल पण ऑफिसमध्ये आजूबाजूला सहकारी बसलेले असताना मला असं करायला विचित्र वाटेल म्हणून मी तो मोह टाळतो.

फुटूवाला's picture

19 Apr 2019 - 7:17 pm | फुटूवाला

एक पर्याय मी वापरतो. तुम्हीपण विचार करू शकता. ट्रूकॉलर हे ऍप प्रत्येक नवीन(अनोळखी) नंबरची माहिती फोन रिंग चालू असतानाच २-५ सेकंदात दाखवतं.(अर्थात तुमच्या मोबाईलच इंटरनेट चालू असेल तरच) नाव कळालं किंवा नाही कळालं तरी ते त्या नंबरला किती जणांनी ब्लॉक, स्पॅम केलंय ते लाल अक्षरात दाखवतं. जर १० पेक्षा जास्त जणांनी ब्लॉक केलेलं असेल तर तो फोन नक्कीच लोन, जाहिरातीसाठी असतो हे गृहीत धरून उत्तर द्यायचे की नाही ठरवता येते..

ज्ञानव's picture

20 Apr 2019 - 8:50 am | ज्ञानव

वर नंबर दिसला कि मी फोन स्पीकर फोनवर टाकतो आणि शांतपणे आपले काम करत राहतो.
तिथून हेलो हेलो आपको मेरी आवाज आ रही है वगैरे त्यांचे त्यांच्या पगाराला अनुसरून काम चालू असते.
त्या व्यक्तीचा काही दोष नसतोच तो /ती पोटासाठी काम करत असते. फोन उचलल्याने त्या व्यक्तीचा फोन कदाचित कौंट होऊन तिचे भले होईल.
मी थोडे एन्जोय करतो. समोरून call बंद झाला कि true caller वर तो नंबर ब्लॉक करतो "Fraud" ह्या नावाखाली.
पूर्वी मला २५ - २५ फोन येत असत आता एखादाच येतो. ह्या आधी सगळे रक्त आटवणारे उपाय करून झाले होते.
फारच आनंदात असलो तर एखादे गाणे लावून ठेवतो जे त्याला ऐकू जात असते आपण उत्तरच देत नसल्याने ते फोन कटच करतात.
बरे त्यांचा फोन रेकॉर्ड होत असल्याने ते तुम्हाला शिव्या घालू शकत नाहीत कि तुम्हाला बोलते करण्यासाठी युक्त्या करू शकत नाहीत.
बाकी मज्जा नि लाईफ हो !

पिंट्याराव's picture

20 Apr 2019 - 12:33 am | पिंट्याराव

मलाही मध्यंतरी असे फोन कॉल्स यायचे, बहुतेक करून शेअर मार्केट्सच्या टिप्स सांगतो,आमच्या अमूक तमूक सर्विससाठी सबस्क्राईब करा, अश्या आणि इतर अनेक गोष्टींसाठी. मी प्रत्येक नंबर ब्लॉक करायला सुरूवात केली, spam call म्हणून फोनबूकमध्ये त्यांचे नाव लिहून ठेवणे, अन दुसऱ्यांदा त्यांचा फोन रिसीव्ह न करणे, पोलिसांत तक्रार करेल असा दम देऊन झाला, तसं बरंच काही करून पाहिलं... मग काही काळाने लक्षात आलं की कशाचाच काहीही उपयोग होत नाहीय. आणि अजून एक गोष्ट, हे सगळे फोन कॉल्स परराज्यातून येत होते... मग मी केवळ एककलमी अजेंडा राबवला, समोरच्याला मी सांगायचो की, मला फक्त मराठी बोलता येते, अन हिंदी समजते पण बोलता येत नाही... त्याने काहीही सांगितलं की मी, काय? मला समजलं नाही , अजून एकदा समजावून सांगा... कृपया मराठीत सांगा म्हणून विनंती करायचो... मग तो म्हणायचा हिंदीत बोला सर, इंग्रजीत बोला. पण मी अडून राहायचो... अन मला मराठीशिवाय अन्य कुठलीही भाषा येत नाही म्हणून संवाद संपवायचो... त्यानंतर आता वर्षभर तरी झालं असेल, असे सगळे कॉल्स बंदच झालेत.

भंकस बाबा's picture

20 Apr 2019 - 8:29 am | भंकस बाबा

हे मराठीत बोलण्याचा उपाय मी करून बघितला आहे, पुढच्या वेळी कॉल मराठी बोलणारा करतो. समोरचा जेव्हा आपली मराठी फाडायला लागला तेव्हा आमची गाड़ी मालवणीवर घसरली, चांगला पंधरा मिनिटे त्याला फ़ोनवर तंगवला व मालवणी बोलायचा कंड शमवून घेतला. अगदी त्याला गाईला दूध वाढण्यासाठी कोणता चारा वापरावा हे विचारुन झाले.
मनाला फार शांति मिळते हो!

नमकिन's picture

29 Apr 2019 - 4:56 pm | नमकिन

सध्या थेट मराठीत संवाद साधला जातो.
आमचा साधा फोन आहे तेव्हा नुसत्या नको म्हणून कट करणेच हातात. कामाची एकाग्रता भंगते तर चूका होण्याची शक्यता/भिती वाटते.
सध्या बिल्डर सेल्सवाले भर पडली आहे.

पिंट्याराव's picture

20 Apr 2019 - 12:33 am | पिंट्याराव

मलाही मध्यंतरी असे फोन कॉल्स यायचे, बहुतेक करून शेअर मार्केट्सच्या टिप्स सांगतो,आमच्या अमूक तमूक सर्विससाठी सबस्क्राईब करा, अश्या आणि इतर अनेक गोष्टींसाठी. मी प्रत्येक नंबर ब्लॉक करायला सुरूवात केली, spam call म्हणून फोनबूकमध्ये त्यांचे नाव लिहून ठेवणे, अन दुसऱ्यांदा त्यांचा फोन रिसीव्ह न करणे, पोलिसांत तक्रार करेल असा दम देऊन झाला, तसं बरंच काही करून पाहिलं... मग काही काळाने लक्षात आलं की कशाचाच काहीही उपयोग होत नाहीय. आणि अजून एक गोष्ट, हे सगळे फोन कॉल्स परराज्यातून येत होते... मग मी केवळ एककलमी अजेंडा राबवला, समोरच्याला मी सांगायचो की, मला फक्त मराठी बोलता येते, अन हिंदी समजते पण बोलता येत नाही... त्याने काहीही सांगितलं की मी, काय? मला समजलं नाही , अजून एकदा समजावून सांगा... कृपया मराठीत सांगा म्हणून विनंती करायचो... मग तो म्हणायचा हिंदीत बोला सर, इंग्रजीत बोला. पण मी अडून राहायचो... अन मला मराठीशिवाय अन्य कुठलीही भाषा येत नाही म्हणून संवाद संपवायचो... त्यानंतर आता वर्षभर तरी झालं असेल, असे सगळे कॉल्स बंदच झालेत.

१) असे कॅाल्स त्या कंपनीतून येत नसतात. कॅाल_सेंटर्समधून येतात. त्या कर्मचाऱ्यांना असे कॅाल्स करण्यासाठी पगार मिळतो त्यामुळे ते करतच राहतात.
२) नाही /नको सांगून फोन बंद करणे हा एक उपाय.
३)सिम कार्ड स्टॅाक अन्ड्राइडवाल्या मोटो फोनमध्ये टाकून पाहणे. हा उपाय नक्की करून पाहा. सॅमसंग, किंवा इतर चाइनिज फोन टाळणे.

नितिन थत्ते's picture

20 Apr 2019 - 8:07 am | नितिन थत्ते

हे लोक रॅण्डमली कोणालाही फोन करतात. त्यांच्याकडे कुठलाही डेटा नसतो. मी माझ्याच बँकेकडून कारसाठी लोन घेतले होते. ते लोन चालू असताना एक वर्ष ही झाले नसताना त्याच बँकेतर्फे कार लोन पाहिजे का म्हणून मला फोन येत होते. हे जर का आउटसोर्स केलेले लोक असतील तर बँकेने स्वतःकडे काहीही चाळणी न लावता सर्व ग्राहकांचे फोन नं त्यांना दिले असतील.

तुमच्या केसमध्ये कदाचित त्या आउटसोर्सिंग कंपनीत दहा लोक असतील तर ती यादी दहा जणात वाटून देण्याचेही कष्ट घेतले गेले नसतील. दहाही जण सर्व क्रमांकांना फोन करत असतील.

मराठी कथालेखक's picture

20 Apr 2019 - 2:48 pm | मराठी कथालेखक

ट्रुकॉलरमुळे माझा फोन संथ होतो /अडकतो/म्हणून मी ट्रुकॉलरला 'फोर्स स्टॉप' केले आहे. जेव्हा गरज असेल तेव्हा वापरायचे म्हणून काढून टाकले नाही.

शब्दानुज's picture

20 Apr 2019 - 6:22 pm | शब्दानुज

रच्याकाने

असे बरेच प्रणाली (अॅप!) आहेत ज्यांना संदेश प्रणालीमद्दे (मेसेज अॅप) प्रवेशयोग्यता( अॅक्सेस) दिली जाते. म्हणजेच तुम्हाला आलेले सर्व संदेश अशा प्रणाल्या वाचू शकतात. बॅंक (मराठी शब्द ? पेढी ?) आपणासा जो ए. वा.सा. सं (एक वापर सांकेतिक संदेश) पाठवला जातो (अो. टी. पी ) तो वाचून काही अपहार झाल्याचे कोणास माहिती आहे का ?

उगा काहितरीच's picture

20 Apr 2019 - 6:36 pm | उगा काहितरीच

बँकेला मराठी शब्द अधिकोष !
कधिकाळी अबक खाते नावे अधिकोष खाते जमा केलंय म्हणून माहीत आहे.

OTP वरून परस्पर पैसे काढता येतील असं वाटत नाही . कारण , बाकी Credientials शिवाय ॲप मधे लॉगीन नाही करता येणार. पण तरीही असे प्रकार करून पैशाचे अपहार करताच येणार नाहीत असे छातीठोकपणे कुणीच सांगू शकणार नाही.

पुणेकर भामटा's picture

22 Apr 2019 - 2:13 am | पुणेकर भामटा

आमच्या कडे गावाला पुर्वी बँकेला संचयनी म्हणायचे, अधिकृत शब्द नक्की माहिती नाही.

विजुभाऊ's picture

22 Apr 2019 - 10:26 am | विजुभाऊ

वरचे सर्व प्रतिसाद वाचले तर असे दिसते की ते जे कॉल करणारे असतात त्यांच्या पोटाचा प्रश्न असतो म्हणून ते कॉल करतात. त्यात त्यांचा काहीच दोष नसतो
त्यांच्या पोटावर पाय येवू नये या साठी आपण छळवाद सहन करायला शिअक्ले पाहिजे.
चार दिवसात एकाच बँकेकडून वारंवार फोन येवून आपला छळ झाला तरी चालेल.
पण आपण त्याना जे डेटा देतात त्यांच्या विरुद्ध तक्रार करायची नाही कारण ते माणूसकी विरुद्ध आहे.
( यु पी बीहार मधील लोकांनी मुंबईत येवून काही केले तरी तक्रार करायची नाही. त्यांना देशोधडीला लावणार्‍या नेत्यांनाही काहीच बोलायचे नाही.... हे का आठवले कोणास टाऊक)

कानडाऊ योगेशु's picture

22 Apr 2019 - 9:22 pm | कानडाऊ योगेशु

तुम्ही काहीही केले तरी हे कॉल्स येतच राहणार. आपण आपल्यापुरते उत्तर पाहाय्चे. नो थँक्स म्हणुन फोन कट करणे फायद्याचे पडते. जर वेळ असेल तरच इतर गोष्टी स्वतःच्या करमणुकीसाठी ट्राय करावेत. मधंतरी मी ह्या कॉल्सचा उपयोग उगाच इंग्लिशचा कंड शमविण्यसाठी करायचो. तसे टेक्निकल इंग्लिश व्यवस्थित बोलता येते पण सोशल इंग्लिश बोलताना चार पाच वाक्यांनंतर अडखळायला व्हायचे. ह्या कॉल्सचा थोडाफार फायदा झाला. संभाषणातले साधारण पॅटर्न्स दिसुन येतात.

उगा काहितरीच's picture

22 Apr 2019 - 9:42 pm | उगा काहितरीच

तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी १००% लोक १००% वेळेस वाहतूकीचे नियम पाळून वाहने चालवणार नाहीत. तसा प्रयत्न करायला गेल्यास प्रचंड पैसा , वेळ व मेहनत लागेल . त्यापेक्षा सोपा उपाय म्हणून स्वतः गाडी व्यवस्थितपणे चालवून आपल्यापुरती अपघात होण्याची संभाव्यता कमी करणे आपल्या हातात आहे. तसेच , असे कॉल १००% बंद करणे खूप वेळखाऊ , किचकट काम आहे . बरं खूप प्रयत्न करूनही असे कॉल १००% बंद होतील अशी ग्यारंटी नाही देता येणार.
माझ्यापुरता मी कमी मनस्ताप होईल असा मार्ग निवडलाय.

(रच्याकने आपला मोबाईल नंबर दर २ महिन्यांनी बदलला तर असे कॉल येणे बंद होईल का ? )

दादा कोंडके's picture

22 Apr 2019 - 5:31 pm | दादा कोंडके

माझ्याकडे असलेल्या क्रेडीट कार्ड कंपनीकडूनच मला सतरांदा फोन येतो. तुमच्या डेटबेसमधला नंबर डिलीट करून टाका' या विनंतीला केराची टोपली दाखवली जाते. ट्रायच्या अ‍ॅप वर तक्रार करून काहिही होत नाही. रोज किमान बारा मेसेजसुद्धा येतात. ते बघायला पाच सेकंदच लागतात पण त्यावेळी आपण दुसरं महत्वाचं काम करत असतो आणि डिस्टर्ब होतं. बरं दुर्लक्ष करावं तर एखादा मेसेज खूप महत्वाचा असतो.
वरती अनेक प्रतिसादांमध्ये म्हणल्याप्रमाणे त्यांच्याशी संदर्भहीन बोलून मनःशांती करता येते, पण हे रिकामटेकडे उद्योग बहुतांशी वेळेला करता येत नाहीत. वर कुणीतरी सांगितलंकी बहुसंख्य कोल्डकॉल्स 'दॄष्टी' या अंधासाठी (साइट चॅलेंज्ड किंवा विजुअली इंपेअर्ड म्हणावं लागतं हल्ली) चालवल्याजाणार्या संस्थेतून येतात त्यामुळे त्यांना हिडीस फिडीस करता येत नाही.
यामुळे, 'सवासो करोड' लोकसंख्येचे असंख्य प्रॉडक्टीव अवर्स वाया जातात कारण यातली बहुतांश लोकं एकतर रिकामटेकडी असतात. बकीच्या लोकंना कोल्ड कॉल्स/मेसेज मूळे थोडा वेळ वाया गेला किंवा मध्येच डिस्टर्ब झालेलं चालतं असं दिसतं.
ट्रुकॉलर किंवा ट्रायसाठी त्यासाठी आपणच अजून एक अ‍ॅप इस्टॉल करणं हा त्यामगचा उपाय असू शकत नाही.

पुणेरी राघूमैना's picture

22 Apr 2019 - 8:50 pm | पुणेरी राघूमैना

चिडू नका. ते लोकांचा काही दोष नाही. तेही काही मजबूर लोक आहेत आपल्या सारखे.फक्त नकोय असे सांगा आणि फोन कट करा. आणि जमल्यास फक्त सांगा माझा नावासमोर DND लिहा

पुणेरी राघूमैना's picture

22 Apr 2019 - 8:54 pm | पुणेरी राघूमैना

तसेच TRUECALLER इन्स्टॉल करून तावर चाल्लादही येते कधी कधी कॉलरचे नाव. लाल कलर मध्ये नाव असलास तो स्पॅम आहे. तो कट करा डायरेक्ट. आणि नंतर कॉल नंबर ब्लॉक करा truecaller मधून

तेजस आठवले's picture

22 Apr 2019 - 9:40 pm | तेजस आठवले

मला तर कधी कधी असे वाटते की ती लोक त्यांचाच संभाषणकंड शमवण्यासाठी आपल्याला कॉल करतात. चिडून जाण्यापेक्षा आपण शांतपणे नाही सांगावे आणि फोन केल्याची तसदी घेतल्याबद्दल त्यांचे आभारही मानावेत.परत तीच व्यक्ती तुम्हाला फोन करण्याची शक्यता कमी होऊ शकते.स्वानुभव.

मास्टरमाईन्ड's picture

23 Apr 2019 - 3:11 pm | मास्टरमाईन्ड

मी स्वतः हा उपाय वापरलाय
कारण त्यापूर्वी वरती लोकानी सान्गितलेले सगळे उपाय वापरून झाले
शेवटी विचार केला की "चिडुन आपण आपलंच रक्त जाळतोय." त्यापेक्शा

चिडून जाण्यापेक्षा आपण शांतपणे नाही सांगावे आणि फोन केल्याची तसदी घेतल्याबद्दल त्यांचे आभारही मानावेत.परत तीच व्यक्ती तुम्हाला फोन करण्याची शक्यता कमी होऊ शकते.

असा माझाही अनुभव आहे.

नमकिन's picture

29 Apr 2019 - 5:06 pm | नमकिन

Truecaller ची भलामण करून आपल्या सर्वत्र:चर्या फोनमधील संपर्क सूची, चित्र व इतर वैयक्तिक माहिती ऊघड व वाटतोय याकडे दुर्लक्ष होत आहे भाऊ इतकं कळलं नाही तर मग असे होणार आहे.