ग्रंथपेटी

अनुप देशमुख's picture
अनुप देशमुख in काथ्याकूट
5 Apr 2019 - 2:09 pm
गाभा: 

मित्रहो,

पुस्तक प्रेमातून एक कीडा डोक्यात वळवळत आहे, म्हटलं आपल्या माणसात पहिल्यांदा सांगावा न जाणो ही कल्पना कुठपर्यंत जाईल.

सध्या सर्वजण (लहान, थोर, मध्यमवयीन) कुठल्या ना कुठल्या कारणाने हरतऱ्हेच्या स्क्रिन समोर आपला दिवस घालवतात आणि बघत/वाचत रहातात. यामुळे स्क्रिन पलीकडच्या साहित्याला (कंटेंट)अनन्यसाधारण महत्व आलेलं आहे. साहित्य मालक आपल्याला पाहिजे ते आपल्या नजरेस आणून डोक्यात भरत रहातो. कधी कधी आपण आपल्या आवडत्या कधी काळी वाचायचं ठरवलेल्या गोष्टी / पुस्तकं सुद्धा वाचत नाही. डोळ्यांचे दुष्परिणाम आहेत ते वेगळेच.

या सगळ्या धबडग्यात खूप मोठा वारसा हरवत चाललेला आहे तो म्हणजे वाचनसंस्कृती. आपल्या पूर्वजांपासून ते अगदी नवलेखकापर्यंत अत्यंत सकस लिखाण पुस्तकरूपात अगदी प्रत्येक घरात पडून आहे. चला त्यावरची धूळ झटकून एक सामाजिक कार्य करूया. ते पण अगदी आवाक्यातल.

अगदी साधी गोष्ट आहे आपण आपल्या घरातली वाचून झालेली पुस्तक एका ब्यागेत/पिशवीत जमा करायची. समजा माझ्या सोसायटीत 20 फ्लॅट आहेत. प्रत्येकी एक पुस्तक जरी जमा झालं तरी 20 पुस्तकांची छोटेखानी लायब्ररी तयार होईल. आता आपण हिला ग्रंथपेटी म्हणू. तुमच्या इतर सोसायटीमधल्या मित्रांना ही कल्पना सांगून आपण अशीच ग्रंथपेटी तयार करायला सांगायची.

समजा आपल्या ग्रंथपेटीतील सगळी पुस्तकं वाचून झाली की ती पेटी मित्राच्या सोसायटीच्या ग्रंथपेटी बरोबर अदलाबदल करायची.

वाचणारी माणसं आणि त्यांचा वाचनवेग यावर बरीच पुस्तकं फुकट वाचून होऊ शकतात.

काही ठळक फायदे समोर आलेत

1) फुकट नवनवीन पुस्तक वाचायला मिळतील
2) स्क्रिन समोरचा वेळ कमी होईल
3) नवीन पिढीला वाचनसंस्कृती ची ओळख होईल
4) जाणकार पिढीचे जुने छंद जोपासले जातील
5) सकस साहित्य वाचल्याने आपोआप व्यक्तिमत्व विकास होईल

ही यादी वाढत राहील यात शंका नाहीच. चला तर मग आपल्याच खेळाचे आपण नियम बनवून सुरू करूया ग्रंथदिंडीचा प्रवास!

टीप : सूचना आणि सल्ल्यांचे स्वागत

प्रतिक्रिया

Nitin Palkar's picture

8 Apr 2019 - 8:24 pm | Nitin Palkar

कल्पना चांगली आहे पण एकंदरीतच 'मोबइल' लांब ठेवणे हेच लोकांना जमेल का ... मोबाईलचे व्यसन कमी करणे हे कशा रीतीने शक्य होऊ शकेल?

अनुप देशमुख's picture

9 Apr 2019 - 6:28 pm | अनुप देशमुख

मोबाईल पासून दुर जाण तितकंसं अवघड नाहीये, त्या निमित्ताने मोठे आणि लहान हे दोघेही कल्पकता वापरून वेळेचा मस्त उपयोग करू शकतात. जस की मुलांना पुस्तकं गोष्टी रूपात वाचून दाखवायची. मजा येईल

कंजूस's picture

9 Apr 2019 - 8:57 pm | कंजूस

सध्या हेच चालू आहे -

पाषाणभेद's picture

10 Apr 2019 - 12:12 am | पाषाणभेद

यांची आर्थीक मॉडेल काय असावे?

कंजूस's picture

10 Apr 2019 - 7:15 am | कंजूस

प्रायोजक आहेत. या वाचनालयाच्या दहा शाखा काढल्या आहेत पै यांनी.
मी बरीच पुस्तकं बदलली.

एक जुने पुस्तक आणि दहा रुपये बदल्यात एक पुस्तक तिकडचे घ्यायचे. सर्व नोंदी संगणकीय केली आहेत. दहावी बारावीची मुले स्वयंसेवक.

कुमार१'s picture

10 Apr 2019 - 9:07 am | कुमार१

आवडली.

शेखरमोघे's picture

10 Apr 2019 - 8:40 pm | शेखरमोघे

पुण्यातल्या बर्‍याच ठिकाणी अशी "पेटी" चालू आहे. मी वापरत असलेल्या पेटीचा "उगम" नाशिकमधला आहे आणि त्या उपक्रमाला सुरवात करणार्‍याने कुसुमाग्रजान्चे नाव दिलेले आहे.

चौथा कोनाडा's picture

13 Apr 2019 - 5:13 pm | चौथा कोनाडा

मोबाईल पासून दुर रहन्यासाथी उत्तम कल्पना आहे.
कंजूस साहेबांच्या "पै'ज फ्रेन्ड्स लायब्ररी" च्या मॉडेलचे अनुकरण उत्तम राहिल !