चालू घडामोडी - एप्रिल २०१९

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in काथ्याकूट
3 Apr 2019 - 11:24 am
गाभा: 

India gets custody of 2017 CRPF camp attack plotter from UAE

परदेशातून, विशेषतः युएईमधून, अतिरेकी व आर्थिक गुन्हेगारांना परत आणण्याची प्रक्रिया जोरात चालू आहे. जेश ए मोहम्मद ता अतिरेकी संघटनेतील, निसार तांत्रे या एका महत्वाच्या अतिरेक्याला भारतात परत आणले गेले आहे. डिसेंबर २०१७ मध्ये जम्मूकाश्मीरमधील लेथपोरा येथील CRPF कँपवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा हा मुख्य सूत्रधार होता. त्या हल्ल्यात पाच जवानांना वीरमरण आले होते आणि तीन अतिरेक्यांचा खातमा झाला होता.

प्रतिक्रिया

निवडणूक प्रचारात कोणीच मुख्य मुद्दे मांडत नाहिय्ये. मोदी नी लावलेल्या ट्रॅप मधवोविरोध स्वतःच सापडत आहेत.
निवडणूकीत मोदीना जर कोणी परभुत करू शकेल तर ते त्यांचे स्वपक्षीयच. ( उ प्र च्यामुख्यमंत्र्यांनी सेनादलाचा उल्लेख मोदीसेना असा केला)
शिवसेना नक्की मुक्ताफळे उधळते त्यांचे त्यानाच समजत नाही. किरीट सोमय्या ना विरोध कशा साठी आहे तेच सेनेला माहित नाहिय्ये.
लालु यादवंच्या ओसाड वाडीत बंड झालंय. ( त्याने किती फरक पडेल असे वाटतय)
मायवती नी उधळलेली मुक्ताफळे पाहिली तर त्याना त्यांच्याच पुतळ्याच्या मांडीत बसवून कुठेतरी दूर जंगलात सोडून यावे / गंगा नदीत विसर्जन करावे.
राहूल गांधीचे २जी स्पेक्ट्र घोटाळ्यात थेट सम्बंध असल्याचे पुरावे दिले जात आहेत.

श्री. किरीट सोमय्यांच्या जागी श्री मनोज कोटक याना उमेदवारी दिली आहे.

भाऊ तोरसेकर यांचा राहुल आणि मोदी यांनी आपसी खेळातून इतर पक्षांना नामोहरम करण्याबद्दल लेख वाचला. (एक ओळी धागा नको, वेगळा धागा म्हणून काढणे आणि त्यावर त्या लेखापेक्षा वेगळे जोडणे आवश्यक नाही, असे वाटल्याने येथे लिहले आहे.) यावर मते वाचायला आवडेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2019 - 9:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भाऊ तोरसकर एककल्ली आणि विद्यमान सरकारचे प्रचारक असल्यासारखे लिहित असतात, त्यांचं लेखन गंभीरपणे घ्यायचे कारण नाही.
मी त्यांच्या फेबू भिंतीवर आपलं लेखन पाहता आपणास नवीन सरकारात किमान एखादे महामंडळ वगैरे मिळेल असे लिहून आलो होतो. :)

-दिलीप बिरुटे

सध्याच्या सरकार चे समर्थन करणे किंवा टीका करणे याचे काही परिमाण असेल ......... तर त्याच न्यायाने "समतोल,निष्पक्ष,सामान्य जनतेचा कळवळा" वगैरे वगैरे असणारे काही बुद्धीमंत लोक हे गठबंधन किंवा काँग्रेस च्या होऊ शकणाऱ्या सरकारात मंत्रिपदाचे दावेदार तर नक्की ठरतात !

भंकस बाबा's picture

4 Apr 2019 - 12:43 pm | भंकस बाबा

उद्या जर मायवती संरक्षणमंत्री व तेजस्वी यादव शिक्षणमंत्री झाले तर आश्चर्य वाटायला नको!

उद्या जर मायवती संरक्षणमंत्री व तेजस्वी यादव शिक्षणमंत्री झाले तर

तर बहुधा भारत पाक सीमेवर त्यांचे उभे केलेले पुतळे पाहून पाक सैन्य माघारी फिरेल , पुतळ्याना अडकून रणगाडे मोडून पडतील.

बिहारचे १२वी टॉपर हे एक उदाहरण पुरे ठरेल तळा आणि गाळातील शिक्षण कसे होईल या बाबत सांगायला

डँबिस००७'s picture

4 Apr 2019 - 5:07 pm | डँबिस००७

काँग्रेसच्या सरकारात पद्म पुरस्कार कसे दिले जातात त्याच बरोबर महामंडळातल महत्वाच्या जागा कश्या वाटल्या जातात हे ह्यां ना चांगलेच माहीती आहे असे दिसते. कदाचीत त्यावेळेला संधी हुकली आणी आता अशी संधी मिळणे नाही हे पाहुन ईव्हळणे चालु आहे.

ट्रम्प's picture

4 Apr 2019 - 6:02 pm | ट्रम्प

बरखा , राजदीप यांचे ग्यान ओसांडून वाहत होते म्हणून त्यांना पद्म डिलेत का ?

रोख तुमच्या वर नाही , पण हा प्रश्न मला खूप दिवस त्रास देताय :)

प्रगतिशील शेतकरी चावरे कुत्रे आपल्या बाहेच्या अंगणात पाळून ठेवत असतात म्हणजे मग बाहेरून कोणी त्रास देऊ लागला कि आपण काहीही न करताहि तेच भुंकून आपले काम करत असतात.

ता क :- याचा वरील कोणत्याही प्रतिसादाशी संबंध नाही

चानेलवरच्या मुलाखतीत सामान्य लोक " अम्हाला कुठलाही लाभ नाही झाला" सांगत आहेत.

बाप्पू's picture

3 Apr 2019 - 4:03 pm | बाप्पू

सामान्य लोक कधीच म्हणणार नाहीत कि आम्ही समाधानी आहोत.
ते 25 वर्ष्यापुर्वी देखील समाधानी नव्हते आणि इथून पुढच्या 25 वर्ष्यानंतर देखील समाधानी नसणार आहेत.
कारण त्यांची बुद्धीच सामान्य आहे.

खरं म्हणजे राजने निवडणूकीत उतरायला पाहिजे.
संसदेत बोलायला मिळणाऱ्या माइक्रोफोनची वट वेगळीच आणि चौकातल्या माइकची वेगळी.
उर्मिला मातोंडकर काय जोरदार बोलतेय.

सोन्या बागलाणकर's picture

4 Apr 2019 - 4:38 am | सोन्या बागलाणकर

माईकची वट दाखवण्यासाठी संसदेत जातात?
हे मला माहीतच नव्हतं. मी आपला उगाच समजत होतो की लोकांची कामं करायला त्यांना लोक निवडून देतात.

आनन्दा's picture

4 Apr 2019 - 7:24 am | आनन्दा

कशाला कीस पाडताय?
भावार्थ समजून घ्या ना वं

तेजस आठवले's picture

3 Apr 2019 - 9:16 pm | तेजस आठवले

उर्मिलाबानो भाजपात आहेत का काँग्रेस मध्ये?

उर्मिलाबानो भाजपात आहेत का काँग्रेस मध्ये?

दोन गोष्टी ..
1) उर्मिला मातोंडकर यांनी मोहसीन मिर यांच्याशी काही वर्षांपूर्वी निकाह केला.
आणि
2) उर्मिला जी यांनी एका मध्ये प्रवेश केला.. आणि आता निवडणूक लढवत आहेत

आता बातमी क्रमांक 1 आणि 2 यांच्यावर विचार केला तर समजेल कि उर्मिला बानो कोणत्या पक्षात जाणार..
उत्तर सोपे आहे.. - आपली तीच.. सेकुलर वादी आणि शांतता धर्मप्रिय खांग्रेस..

लाल दिव्याच्या अम्बेसेडर गाडीची गम्मत वेगळीच असते असं म्हणाले होते पंत.

भंकस बाबा's picture

4 Apr 2019 - 8:43 am | भंकस बाबा

धर्मान्तर केल्यावर साक्षात्कार होतो की आपण इथे एकटे पडतोय, कारण घरात मुक्त वातावरणाला बंदी! मग बोलायचे कशावर घरातील इतराशी? कारण चर्चा करायला गेले तर पवित्र पुस्तकातील दोन तीन श्लोक कानावर पडतील, आणि आपल्या रंगील्या बानो इथे कमी पडतात ना! मग चला बाहेर, आपण या घरात किती सुखी आहोत ते दाखवू, (पक्षी आपला निर्णय चुकला नाही हे पटवून देउ)
बाकी कोंग्रेसने जाहिरनामा अगदी थाटात परोसला. काश्मीरला भारतापासुन तोडायची धोरणे आखताना काश्मीरी पण्डिताविषयी चकार शब्द या जाहिरनाम्यात नाही, म्हणजे देशभर तुम्ही टिळा लावून व रुद्राक्षाच्या माळा घालून फिरणार पण जिथे हिंदू धर्माविषयी प्रश्न उभा राहिला की घुमजाव करणार! वाह रे खान्ग्रेसी
एक प्रश्न , उर्मिलाबाई आपल्या जुन्या नावाने निवडणूक लढवत आहे, निवडणूक आयोगाकडे तक्रार करून तिला असली नाव प्रचारात वापरायला भाग पाडू शकतो का?

कंजूस's picture

4 Apr 2019 - 9:27 am | कंजूस

मोठा गहन प्रश्नच आहे.

किरीट सोमय्याना सेनेचा इतका कडाडून विरोध कशासाठी होता? कोणी सांगेल का
ज्या पद्धतीने प्रचार चाललेला आहे त्यावरून असे दिसतेय की भारतापुढे आरोग्य सेवा,पाणी , शिक्षण ,रोजगार औद्योगीक प्रगती वगैरे प्रश्नच शिल्लक नाहिय्येत.
हिंदी भाषीक पट्ट्यात तर विकास होऊन गेलेला आहे. लालू , तेजस्वी, मुलायम बुवा बबुवा यांचाच काय तो प्रश्न आहे असे वाटतेय.
नदीजोड प्रकल्प हा पुर्ण विस्मरणात गेलाय.

निवडणुकांचा प्रचार ही फार मौजेची गोष्ट आहे. कोणताही पक्ष प्रचारात देशाचा विकास याबाबत बोलत नाहीये. तरीही दोन्ही प्रमुख पक्षांच्या शासनाने आपापल्या कार्यकाळात केलेली कामं बघून जनता मत देईल अशी आशा करूया.

गोंधळी's picture

4 Apr 2019 - 4:50 pm | गोंधळी

कोणताही पक्ष प्रचारात देशाचा विकास याबाबत बोलत नाहीये.

हा विकास कोण आहे? २०१४ ला त्याचा खुपच बोलबाला होता. गुजरात मधिल निवडणुकांच्या वेळी तो वेडा झाला व तो हरवला आहे अस ऐकले होत.

नवीन नोकऱ्या देणे दूर राहिलं, नवीन सरकारला प्रथम BSNL चे पावणे दोन लाख आणि MTNLचे पन्नासेक हजार कर्मचाऱ्यांचं करायचं काय हे सोडवावं लागेल.
Bsnl/ mtnl कडे 4G चे वांधे आणि युएस/साउथ कोरिआत 5G सुरु झाले काल. डिसेंबरपर्यंत पन्नासेक शहरांत येणार. ३०० Mbps+ speed.

दुश्यन्त's picture

4 Apr 2019 - 4:29 pm | दुश्यन्त

उर्मिला मातोंडकर हेच तिचे असली नाव आहे आणि ती आपल्या असली नावानेच निवडणूक लढत आहे. आपले नाव काय असावे हा प्रत्येकाचा स्वतंत्र अधिकार आहे.नियमानुसार त्यासाठी जे काही कागदपत्रे (ओळखपत्र , ऍफिडेव्हिट वगैरे) तिला आयोगाकडे द्यावेच लागते.
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, प्रिया दत्त, पूनम महाजन, पंकजा मुंडे हि राजकीय क्षेत्रातली काही नावे. राजकीय, फिल्म आणि एकूण सर्वच क्षेत्रात स्त्रिया आपले माहरेचे नाव वापरतात हे काही नवीन नाही . बाकी दोन भिन्न धर्मीय व्यक्तींनी लग्न केले म्हणजे धर्मांतर केलेच पाहिजे असे काही नाही.

वायनाड मध्ये भारी झेंडे फडकत आहेत म्हणे

बाप्पू's picture

4 Apr 2019 - 7:13 pm | बाप्पू

वायनाड मध्ये रोड शो मध्येशांततावादी लोक हिरवे झेंडे घेऊन नाचत होते..
यावरून समजून घ्या कि राहुल यांनी हीच सीट बॅक अप म्हणून का निवडली असेल..

तेजस आठवले's picture

4 Apr 2019 - 5:28 pm | तेजस आठवले

माझा नावावर काही आक्षेप नाही पण लोकसत्तेमध्ये ती भाजपात गेल्याची बातमी आली होती म्हणून म्हटले.

ती बातमी त्यांनी एप्रील फूल म्हनून छापली होती.
बातमी खाली तसा उल्लेख केलेला आहे.

तेजस आठवले's picture

4 Apr 2019 - 6:18 pm | तेजस आठवले

कुबेरांनी त्यांची नेहमीची फालतुगिरी चालू ठेवतानाच ही नवी फालतूगिरीपण चालू केली का... चान चान

मोदी म्हणतात "दाराआडचा मुलगा कधीही बोलेल."

या निवडणुकीत भाजप ची कसोटी आहे हे मात्र निश्चित !!

तसेच या निवडणुकीत बऱ्याच प्रमाणात मध्यमवर्गीय ( टैक्स बेनिफिट ,देश प्रेम मुळे ) भाजप च्या बाजूने तर गरीब व शेतकरी वर्ग ( ज्यांच्या अपेक्षा कधीच पूर्ण होत नाही ) काँग्रेस व इतर च्या बाजूने होण्याची शक्यता वाटते .
मोदी सरकार ने बदल घडवीण्यास ( इंफ्रास्ट्रक्चर ) सुरवात केली पण गरीबांना अपेक्षित आर्थिक ( भरपूर योजना सुरु करून देखील ) बदल झालेला वाटत नाही .
अल्पसंख्यक आणि दलित समाज या वेळी रागा च्या एड्याचाळ्यानां पाठीम्बा देण्याची शक्यता वाटते .
बाहेर फिरताना बरेच जण मोदींच्या विरोधात बोलताना आढळतात .

मला असे वाटतेय कि निरीक्षण चुकतेय आपले.
जितक्या लोकांना मी भेटलो त्यांच्यापैकी आर्थिक दृष्ट्या मध्यमवर्ग, आणि उच्च वर्ग हे दोन्ही मोदींच्या बाजूने दिसले. यामध्ये बरेचसे लोक हे नोटबंदी ला फासलेला निर्णय मानत असले तरी त्यामध्ये मोदींच्या हेतूबद्दल शंका उपस्थित करत नाहीत. इतर इन्फ्रा स्ट्रक्चर च्या कामामबत, सरंक्षण, कायदा सुव्यवस्था, आरोग्य आणि स्वछता याबद्दल मोदींची स्तुती आणि पाठराखण करतात.

बाकी शेतकर्याबद्दल बोलायचे झाले तर 50-50 आहे. बरेचसे शेतकरी हे मोदींच्या बाजूने दिसतात. याला कारण म्हणजे पाणी आणि वीज याचा वाढलेला आवाका.
मला अजूनही आठवतेय कि पुण्यापासून फक्त 20 काम च्या अंतरावर असलेल्या गावी 5 वर्ष्यापुर्वी 18-18 तस लोड शेडींग असायचे. पण आता अगदीच नगण्य प्रमाणात लोड शेडींग आहे. हा आणि असे इतर बरेचसे बदल ज्यांना समजले ते मोदींच्या बाजूने बोलताना दिसतात.
जे शेतकरी एका दिवसात कर्जमाफी आणि एका दिवसात जादू होऊन शेतमालाला दुप्पट तिप्पट भाव मिळेल या आशेवर असतात ते मोदींना शिव्या घालतात.

आर्थिक दृष्ट्या गरीब, सतत सरकारने काहीतरी फुकट द्यावे अशी अपेक्षा करणारे खूप लोक भारतात आहेत. आणि बरेचसे दलित लोक ज्यांना कितीही केले आणि काहीही झाले तरी आपल्यावर नेहमीच अन्याय होतो असे वाटत राहते. असे लोक यावेळी मोदींच्या विरोधात आहेत. पण ते त्या पक्षाला मतदान करतील जे त्यांच्या ह्या समस्या 65 वर्ष्यात सोडवू शकले नाहीत. या सर्वांना टार्गेट करण्यासाठी तर राहुल गांधी उर्फ खान यांनी महिना 12000 रुपये खैरात देण्याची घोषणा केली आहे.

भाजपा च्या थोड्याफार जागा कमी होतील पण पुन्हा एकदा मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतील असे वाटते.

ढब्ब्या's picture

4 Apr 2019 - 8:20 pm | ढब्ब्या

नंबर चा विचार केल्यास, ऊप मध्ये भाजपा २५ एक सीट गमवेल पण बंगाल आणि तामिळ्नाडू सारख्या ठिकाणी ह्या भरुन निघतील वाट्टय.
गुजरात, महा, राजस्थाह, मप्र ह्या बेल्ट मध्ये भाजपा ला थोडा फटका बसेल पण फार काही नुकसान होइल असे वाटत नाही.

त्यामुळे कदाचीत त्यांच्या सीट आहे तेवढ्याच रहतील आसं वाटतय.

खांग्रेस मात्र उप्र मध्ये पुर्ण झोपेल अस वाट्टय. पण केरळ आणी बाकी राज्यात स्तिथी बरी असेल. पण एकूण २०-२५ जास्ती सिट मिळ्तील कदचीत.

अर्थात हा माझा अंदाज, सद्य स्थिती बघून ...

एकूणात भाजपा परत सत्तेत येइल जर खांग्रेस आणी ईतर मध्ये मतविभागणी झाली तर.

बाकी खांग्रेस चा मॅनिफेस्टो बघुन कुंपणावरचे काही भाजपा कडे वळले तर बरय.

विशेषतः काँग्रेसच्या जाहीरनाम्यामधील मुद्दे बघता मतदारांना प्रलोभन दाखवून गळाला लावण्याचा सरळसरळ प्रयत्न दिसून येतो आहे.

महिन्याला ६ ते १२ हजार देण्याचे कबूल केलं आहे म्हणजे असे लोक ज्यांना याचा अर्थव्यवस्थेवर किती ताण येईल हे कळत नाही किंवा इतर काही ज्यांना घेणेदेणे नसते अश्या लोकांची मते खिश्यात घालण्याचा प्रयत्न आहे. या प्रकारचा प्रयोग दोन लाख कर्ज माफ करण्याचे वचन देऊन मप्र, राजस्थान मध्ये केला आहे आणि त्याला बळी पडल्यामुळे मतांची टक्केवारी कमी न होऊनसुद्धा भाजपला कमी जागा मिळाल्या.

AFSPA , १२४ अ रद्द करणे आणि ३७०, ३५ अ रद्द न करणे हे मुस्लिमांना तसेच तुकडे गॅंगला त्यांचे पुढील आयुष्य त्यांचा अजेंडा राबवत सुखाने जगता येईल याचे आश्वासन आहे. याचे परिणाम ज्यांना फारसे समजत नाहीयेत किंवा समजले तरी काही घेणंदेणं नाहीये असे लोक पण काँग्रेसला मतदान करतील.

तसेच NRC रद्द करण्याच्या आश्वासनामुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये सुद्धा चांगली मते मिळू शकतात.

त्यामुळे काँग्रेसला बऱ्यापैकी सीट्स मिळण्याची शक्यता आहे. अर्थात बहुमत मिळणे अशक्य आहे पण याचा परिणाम म्हणजे कडबोळ्याचे सरकार येणार. १९७७ आणि १९८९ चा इतिहास परत गिरवला जाणार का हे लवकरच कळेल.

मी तर म्हणतो लोकांनी भाजपाला परत २ जागांवर आणून ठेवावं. भारतीय जनतेला फक्त माझा फायदा काय हेच महत्वाचं आहे, त्यामुळे हे इतर पक्ष त्यांची ही इच्छा पूर्ण करणार आहेत. बाकी देशाचे तुकडे होउदे, दहशतवादी हल्ले होउदे नाहीतर इस्लामिक स्टेट होउदे आपल्याला कर्जमाफी मिळतेय, पेट्रोल स्वस्त मिळतंय वर १२००० रुपये पण मिळत आहेत. अजून काय पाहिजे?

ट्रम्प's picture

5 Apr 2019 - 2:38 pm | ट्रम्प

या वेळी खरच भाजप चे सरकार आलेच नाही पाहिजे !!
मस्त पैकी सीरिया / येमेन सारखी यादवी , पेट्रोल संपन्न व्हेनझुयेला सारखे खायचे वांदे , पाकिस्तान सारखे अल्पसंख्यक चे धार्मिक उछाद वाढले पाहिजेत .
त्याच प्रमाणे जंगला मध्ये हाइना हा प्राणी जसा विचित्र आवाज काढून जीवंत हरिण ला पोटा पासून खायला सुरवात करतो आणि मग थोड्या वेळाने ते हरिण हळू हळू मृत्यु अवस्थे ला पोहोचते तशी अवस्था भारतातील मतदारांची झाली पाहिजे , कारण ग्लानी अवस्थेत वेदना जाणवणार नाही व सुखद मृत्य येईल !!

पुढील निवडणुकीत भाजप चा पराभव होणार हे गृहीत धरून आदरणीय बंगाली बानो ,रागा , आदरणीय माया आणि हावेच अंदाज घेवून टोपी फिरवनारे काका यांच्यात पंतप्रधान पदावरुन सूचक इशारे सुरु झाले आहेत .

गरीब लोकांचा उद्धार फक्त हीच मंडळी करु शकतील याची गरीबानां खात्री झालेली आहे . त्यामुळे येवूदयाच सर्व पक्षीय सरकार .

ढब्ब्या's picture

5 Apr 2019 - 7:34 pm | ढब्ब्या

उपहास म्हणून तुमचे मत ठीकाय, पण भारताची लोकसंख्या आणी लोकसंखेची घनता बघता, एक काडी पण यादवी सद्रुश्य परीस्थिती आणू शकते.
कणखर आणी सक्शम नेत्रुत्वचीच (पण हुकुमशाही नाही) गरज आहे.
कुठल्याही प्रकारे देश पोखरला जाउ नये हे महत्वाचे, जे तिसरी आघाडी किंवा खांग्रेस च्या राजवटीत घडू शकते असे वाटते.

महाठगबंधनच्या नेत्यांचे आपसात अजिबात पटत नाही. त्यामुळे त्यांचे सरकार आले तरी ते दीड ते दोन वर्ष पेक्षा जास्त चालणार नाही.

मोदी साहेबानी मधल्या पातळीवर बरेच ठिकाणी प्रामाणिक अधीकारी आणून बसवलेले आहेत या लोकांना हटवून त्यांच्या जागी आपल्या मर्जीतील लोकांना आणण्यासाठी वेळ लागेल.

श्री मोदी यांनी कोणत्याही मोठ्या नेत्याला हात लावलेला नाही कारण "राजकीय सूडाचा" मोठा अपप्रचार करून सहानुभूती मिळवता येते हे श्रीमती इंदिरा गांधी आणि श्रीमती जयललिता यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

त्यामुळे श्री मोदी यांनी मोठ्या नेत्यांना हात न लावता त्यांच्या चेल्या चमच्यांचा विरुद्ध मोहीम चालवली आहे. त्या लोकांना वाचवण्यासाठी या महाठगबंधनच्या नेत्यांना कष्ट करावे लागतील. याना वाचवले नाही तर कार्यकर्ते नाराज होतात आणि वाचवायचे तर जास्त कष्ट पडतात.

आपण म्हणताय तेवढे महाठगबंधनच्या लोकांना आता पैसे खाणे सोपे जाणार नाही. एक तर सामान्य माणसांना पेड मीडिया बद्दल खात्री राहिलेली नाही. त्यामुळे त्यांनी किती गुणगान केले तरी महाठगबंधनची लायकी लोकांना माहिती आहे. शिवाय सोशियल मीडिया मुळे आजकाल खाबू माणसांना धाक बसला आहे. त्यातून श्री मोदी यांनी अनेक लष्करी कंत्राटे शेवटच्या दोन वर्षात दिलेली आहेत ती पूर्ण होईपर्यंत नवी कंत्राटे देता येणे सहज शक्य होणार नाही.

दरमहा ६ हजार रुपये हे २०% गरिबांना देणे हा अशक्य गोष्ट आहे हे सर्वच नेत्यांना माहिती आहे. त्यामुळे जसे कर्जमाफीच्या मोठ्या घोषणा देऊन मध्य प्रदेशात आणि राजस्थान मध्यें काँग्रेस निवडून आली तिथे आता कर्जमाफी प्रत्यक्षात न आल्याने भाजपला मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे तळागाळाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. हीच स्थिती दोन वर्षांनी फेर निवडणूक झाल्यास होईल.

त्यातून आता राज्यसभेत भाजपची गणसंख्य जास्त झाल्याने महाठगबंधनला कोणताही कायदा पास करून घेणे( उदा. AFPSA रद्द करणे) सहज शक्य होणारच नाही.

मी तर म्हणतो सध्या भाजप पडली आणि महाठग बंधन निवडून आले तर बरंच होईल. कारण २ वर्षात भ्रमनिरास होऊन भाजप प्रचंड बहुमताने निवडून येईल
निवडणुकीचा खर्च सामान्य माणसांच्या बोडक्यावर बसेल पण जर आपली लायकी तीच असेल तर तसेच सही.

ढब्ब्या's picture

5 Apr 2019 - 9:09 pm | ढब्ब्या

तरी पण गुजराल, देवेगौडा सरकारचा ईतिहास पाहता, महाठगबंधन नकोच.
नंतर च्या सरकार चा अर्धा वेळ घाण निस्तरण्यातच जाणार.

ट्रम्प's picture

5 Apr 2019 - 10:37 pm | ट्रम्प

पण हे शिवजयंती , अम्बेडकर जयंती , गणपती विसर्जन मिरवणूक ला क्वार्टर ढोसुन नाचणार्या वर्गाला कळत नाही .

डँबिस००७'s picture

5 Apr 2019 - 10:33 pm | डँबिस००७

अंशःत सहमत !
ज्या पद्धतशीर प्रमाणे ठरावीक मिडीया , संघटना व पक्ष, हिंदु समाजा विरुद्ध पब्लिकली गरळ ओकत आहेत त्यावरुन त्यांच्या पार्श्वभागावर चटके बसत आहेत हे स्पष्ट आहे !!

सर टोबी's picture

6 Apr 2019 - 10:53 am | सर टोबी

पक्षीय बलाबल बद्दलची माहिती: http://164.100.47.5/Newmembers/partypositionsummary.aspx. मोदींच्या विरोधाला काहीही किंमत देण्याची कुणाला गरज वाटणार नाही.

बाकी मोदी कोणत्या लोकांच्या मागे हात धुवून लागले त्याची माहिती जाणून घ्यायला आवडेल. सदा सर्वकाळ परदेश दौरे, निवडणूक प्रचार, संसदेतदेखील प्रचारकी थाटाची भाषणे या व्यतिरिक्त काही त्यांनी केले असेल तर बरेच आहे.

लष्कराच्या विशेष अधिकाराबद्दल बाधित होणाऱ्या लोकांच्याच मताचा विचार व्हावा असे मला व्यक्तिशः वाटते. अगदी पुण्यात देखील बोपखेल, घोरपडी गावच्या लोकांच्या भावना लष्कराच्या विशेष अधिकाराबद्दल इतरांच्या भावनांपेक्षा वेगळ्या असतील.

विनोद१८'s picture

10 Apr 2019 - 11:13 pm | विनोद१८

.......सदा सर्वकाळ परदेश दौरे मोदींच्या मनात आले आता बर्याच दिवसात गोट्या खेळलो नाही कि लगेच चालले अमेरिकेला ट्रुम्प बरोबर, इस्राईल मध्ये नेत्यानाहु बरोबर आणि तिकडे जापानमध्ये तो शिन्जो आबे हे सगळे निरोद्योगी लोक्स अगदी वाटच बघत असतात मोदीची, हा मोदी इकडे आमच्याकडे येतोय कधी आणि आपण त्याच्याबरोबर गोट्या खेळतोय कधी. अर्थात ही मोठी माणसे आपसातच खेळ्नार विरंगुळा म्हणुन.

माझातर्फे या गोट्यापंडीताचा णिषेद.

पयशे वाटण्याच्या योजनेत किती लागतील आणि ते कुठून आणणार हेसुद्धा सांगायला हवे.

ट्रेड मार्क's picture

5 Apr 2019 - 3:16 am | ट्रेड मार्क

काँग्रेसने दिलेली सगळी आश्वासने पूर्ण करायचं म्हणलं तर साधारणपणे २० लाख कोटी लागतील असा अंदाज आहे भारताचं टोटल बजेट २१.५ ते २२ लाख कोटी आहे. म्हणजे सगळी कर्जमाफी, ७२००० रुपये, सबसिड्या वगैरे देऊन सुद्धा जवळपास २ लाख कोटी उरतातच की, मग अजून काय पाहिजे?

होऊ द्या खर्च, भरपूर पैसा आहे आपल्याकडे. त्यातूनही वर लागलेच तर मनमोहन सिंगांसारखे जागतिक दर्जाचे अर्थशास्त्री आहेतच, ते भारी आयड्या काढून बक्कळ पैसे मिळवून देतील. तसा नाईलाजाने का होईना पण इमानेइतबारे आयकर भरणारा मध्यमवर्ग आहेच. एक १०-१५% टॅक्स सहज वाढवता येईल. गांधी घराण्याचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सॅम पित्रोदा यांनी सांगितलं आहे की मध्यमवर्गाने स्वार्थी बनू नये. मोठ्या मनाने त्यांच्या आजूबाजूला दिसणाऱ्या गरीब लोकांना वाटण्यासाठी वाढीव कर द्यायला काय हरकत आहे? संपूर्ण चर्चा इथे बघा.

जीएसटीची एकच स्लॅब करण्याचे पण रागानी आश्वासन दिले आहे. म्हणजे जर सरसकट सगळ्या वस्तू १२% नी लावल्या तर कितीतरी उत्पन्न वाढेल. आहात कुठे?

पंत प्रधान नरेंद्र मोदीजींना यु ए ई चा उच्चतम पुरस्कार झायेद मेडल गौरवण्यात आलेल आहे.

यु एन ओ, अमेरिका, युरोप मधले देश त्यानंतर मध्य पुर्वेतले देशांवर पंत प्रधान नरेंद्र मोदीजीं नी काय जादु केलेली आहे कोण जाणे की
एका पेक्षा एक वरचढ पुरस्कार हे देश मोदीजींना देत सुटलेले आहेत.

https://www.khaleejtimes.com/international/india/narendra-modi-responds-...

गामा पैलवान's picture

5 Apr 2019 - 1:42 am | गामा पैलवान

लोकहो,

नाहीतरी चौकीदार चोर आहे असं म्हणतोच ना पप्पू, मग मोदी चारसोबीस झाले ना?

म्हणजेच मोदींना येत्या निवडणुकीत ४२० जागा मिळणार हे पप्पूच सांगतोय.

आ.न.,
-गा.पै.

या कलाकरांच्या टोळक्या तील कित्तेकानां कुत्री सुद्धा ओळखत नसतील .
नासिररूद्दीन च्या नावा बद्दल अपेक्षा होती पण आश्चर्य वाटले पटवर्धन , देशपांडे , आणि पालेकर चे . सामान्य लोकांना लोकशाहीवरचा धोका आज पर्यन्त दिसला नाही मग यांना कसा क़ाय दिसतो ?

vote against bjp: भाजपला मतदान करू नका, ६०० कलाकारांचं आवाहन
http://mtonline.in/HmsTyZ?

गामा पैलवान's picture

6 Apr 2019 - 2:53 pm | गामा पैलवान

ट्रम्प,

बातमीबद्दल धन्यवाद! बातमीत म्हटलंय की कलाकारांच्या मते भाजपमुळे भारतीय संविधान धोक्यात आलंय. पण मग हेच कलाकार नक्षलवाद्यांचा निषेध का करंत नाहीत?

जो पक्ष ( म्हणजे मोदी) घटनादत्त मार्गाने राजकारण करतोय त्याच्या विरुद्ध विनाकारण बोंबा ठोकायच्या. आणि त्याच वेळी जे नक्षलवादी भारतीय घटना उघडपणे नाकारून हिंसक मार्ग चोखाळतात त्यांना मात्र पाठींबा द्यायचा. याचा अर्थ असा की उपरोक्त कलाकारांना भारतीय संविधान कोलमडायला पाहिजे. कोण घटनाद्रोही आहे ते कळलं ना?

आ.न.,
-गा.पै.

विनोद१८'s picture

10 Apr 2019 - 11:35 pm | विनोद१८

......या फुकट्यांचे विविध पदावर वर्णी लागणे, फुकटचे मिरवणे, दिल्ली दरबारी चापलुसी करुन आपले उखळ पांढरे करुन घेणे फुक्कट सरकारी खर्चाने फुक्कट चरणे, झालेच तर सरकारी महामंडळातर्फे परदेशी प्रवास वगैरे चंगळ आता २०१४ नंतर बंद झाली आहे, तेव्हा ते मोदीसरकारला शिव्याशापच देणार, या सर्व फुकट्खाऊंची खरी पोट्दुखी हीच आहे की मोदी यांच्यासमोर चार उष्टेखरकटे दाणेसुद्धा टाकत नाही.

दुर्लक्ष करा, यांचे सिनेमे पाहणे बंद करा. असे वाळीत टाकले तरच सरळ होतील.

चामुंडराय's picture

12 Apr 2019 - 4:29 am | चामुंडराय

.

सिनेमाचे ( विशेषत: हिन्दी) अर्थकारण पाहिल्यास या प्रचाराची सत्यता पटेलच.

प्रसाद_१९८२'s picture

6 Apr 2019 - 11:51 am | प्रसाद_१९८२

पाकिस्तानचं F-16 विमान पाडल्याचा भारताचा दावा खोटा - अमेरिकन नियतकालिक
https://www.bbc.com/marathi/international-47829521
--

ही बातमी एक अफवा असल्याचे भारतीय वायुसेनेचे म्हणणे आहे. जर का वरिल बातमी अफवा असेल तर
भारतीय वायुसेना पाकिस्तानी एफ १६ पाडल्याचे पुरावे जाहिर करुन, या अफवांना पुर्णविराम का देत नाही हा एक प्रश्नच आहे.

भारतीय वायुसेना पाकिस्तानी एफ १६ पाडल्याचे पुरावे जाहिर करुन, या अफवांना पुर्णविराम का देत नाही

अस करता येणार नाही कारण भारतीय वायुसेनेने पाकिस्तानी एफ १६ पाडल पण ते पाकिस्तानच्याच भुमीत जाऊन पडल . ज्यावेळेला अभिनंदनच्या मिग २१ बायसन ह्या विमानाचा पाठलाग करत होते तेंव्हा पाकिस्तानी एफ १६ च्या मागोमाग मिग २१ बायसन सुद्धा पाकिस्तानी हद्दीत घुसल, ते मिग २१ बायसन विमानाच्या जुन्या तंत्रा मुळे वैमानिकाला समजु शकले नाही. अभिनंदन असेच समजत राहीला की तो भारताच्या हद्दीतच आहे.

आता जर पाकिस्तानच्या विमानांचा पा ठलाग करावा लागला तर फारुख अब्दुल्ला सारख्या हलकट नेत्यांना मिग २१ बायसन विमाना च्या टपावर बांधुन घेऊन जावे लागेल. मग भारतीय वायुसेनेने शत्रुचे विमान पाडले की नाही ह्याचा आंखो देखा हाल त्या नेत्यांना उपलब्ध होईल

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Apr 2019 - 4:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

Not aware’: Pentagon on Pak F-16 count after Feb aerial dogfight with IAF

एफ-१६ पाडले नाही असे प्रसिद्ध करणारे नियतकालीक अमेरिकन सरकार किंवा पेंटॅगॉनचे अधिकृत मुखपत्र नाही. आपल्याकडे जश्या सोईस्कर बातम्या "छापून आणल्या जातात" त्यातलाच हा अमेरिकन प्रकार आहे.

भारतिय वायूसेनेने पेंटॅगॉनकडे, (अ) एफ-१६ची रडारवरची इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर आणि (आ) पाकिस्तानी विमानाने सोडलेल्या AIM-120 AMRAAM मिसाईलचे भारतात पडलेले व क्रमांकासह असलेले अवशेष, असे दोन सज्जड पुरावे दिले आहेत आणि ते निर्विवाद आहेत.

पेंटॅगॉनने पाकिस्तानला दिलेल्या एफ-१६ची मोजणी केली असली तरी त्यासंबंधी माहिती उघडपणे देणे त्यांना फार गैरसोईचे आहे. कारण, आजतागायत जगभरातून अनेक देशांकडून मागणी असूनही, अमेरिका हे विमान फार थोड्या देशांना आणी तेही वापरण्यासाठीच्या अनेक अटींवर देते. असे आधुनिक विमान ६०-६५ वर्षे जुन्या (आणि तेही रशियन) विमानाने पाडणे हे...
(अ) अत्यंत मानहानीचे आहे व
(आ) भविष्यातल्या एफ-१६च्या विक्रिच्या दृष्टीने मारक आहे.

त्यामुळे, एखादे विकाऊ नियतकालीक पकडून अमेरिका दिशाभूल करू शकते. किंवा त्यापेक्षा जास्त शक्यता अशी आहे की, आपले नाक वाचविण्यासाठी पाकिस्तानने ही बातमी छापून आणली असावी. (बालाकोट हल्ल्यामध्ये काहीच नुकसान झाले नाही, अशी बातमीही छापून आणली होती हे आठवत असेलच. नंतर परदेशी वार्ताहरांना प्रत्यक्ष जागेवर नेऊन दाखवू असे सांगून, भेट तीनदा पुढे ढकलून, शेवटी ती भेट बारगळली; आणि सत्य जगासमोर आलेच.)

आता, पेंटॅगॉनने (मोजणी केली असली नसली तरी) अशी काही मोजणी केली नाही असे सांगून, त्या नियतकालिकातील बातमी फेक असल्याचे दुरान्वयाने सांगितले आहे. पण, एफ-१६ पडले की नाही याबद्दल मौन पाळले आहे. विमान पाडले असे कबूल केल्यास, ते प्रकरण अमेरिकन काँग्रेससमोर जाऊन अमेरिकेला पाकिस्तानवर बंधने (सँक्शन्स) घालावी लागली असती व ते करणे सद्यस्थितीत अमेरिकेला परवडणारे नाही. कारण, अफगाणिस्तानमधून पाय काढून घेण्यासाठी तालिबानशी चाललेल्या वाटाघाटींसाठी अमेरिकेला अजूनही पाकीस्तानच्या मदतीची गरज आहे... त्यातले महत्वाचे तालिबानी गट पाकिस्तानची अपत्ये आहेत.

महेश हतोळकर's picture

9 Apr 2019 - 11:06 am | महेश हतोळकर

भारतीय एअर व्हाइस मार्शल RGK KAPOOR यांनी पत्रकार परिषदेत पुरावा दिला आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Apr 2019 - 11:26 am | डॉ सुहास म्हात्रे

त्यांनी मी वरच्या प्रतिसादाच्या तिसर्‍या परिच्छेदात लिहिलेले पुरावे दिले आहेत. हे पुरावे पेंटॅगॉनला, पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी, गोपनियरित्या अगोदरच दिले होते.

मात्र,
(अ) अमेरिकन नियतकालिकात, "पाकिस्तानमध्ये केलेल्या मोजणीत सर्व एफ१६ विमाने सुरक्षित आहेत असे दिसले", अशी दिशाभूल करणारी फेक न्युज पाकिस्तान (आणि ?पेंटॅगॉनने) छापून आणल्यामुळे आणि
(आ) तिचे भारतिय राजकारणी आणि तथाकथित विचारवंत यांनी भांडवल करणे सुरू केल्यामुळे
भारताला, अमेरिकेचा रोष झाला तरी त्याला झुगारून, पाकिस्तानला (आणि ?अमेरिकेला) उघडे पाडणे भाग पडले आहे.

अमेरिकेला असे उघडे पाडण्यासाठी आणि तसे करताना एफ्१६ची बाजारातली किंमत करण्याचा निर्णय घेण्यासाठी, प्रचंड राजकिय इच्छाशक्ती व धाडस यांची गरज असते... ते सद्य सरकारने दाखवले, याचा सर्व भारतियांना सार्थ अभिमान वाटायला हवा.

महेश हतोळकर's picture

9 Apr 2019 - 11:36 am | महेश हतोळकर

विद्यमान शासनाचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे हाच खरा मुद्दा आहे.
विमान पाडलं, कारवाई केली, पुरावे दिले यापेक्षा शासनाचा जनतेला अभिमान वाटतो याचाच अनेकांना मस्तकशूळ आहे.
तो वाटू नये यासाठीच हा सगळा गदारोळ सुरू आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Apr 2019 - 11:53 am | डॉ सुहास म्हात्रे

आंतरराष्ट्रिय राजकारणात, "तडक हल्ला करून सामर्थ्यवान राष्ट्राला न दुखावता आपले ध्येय साध्य करता येणे", हा सर्वात योग्य आणि जागतिक मान्यतावर्धक मार्ग समजला जातो... कारण, त्यामुळे जिथे जे संदेश पोचायला हवे असतात, ते तिथे पोचतात. :)

सद्या भारताने स्विकारलेला मार्ग, शेवटचे सामंजस्यपुर्ण हत्त्यार असते.

जेव्हा भारताने बालाकोटवर (पक्षी : पिओकेमध्ये नाही तर पाकिस्तानच्या सार्वभौम भूभागात ८० किलोमीटर आत जाऊन) हल्ला केला, पण तरीही, चीन व मुस्लिम राष्ट्रांसह एकाही देशाने भारताला दोष दिला नाही... तेव्हाच भारताने जागरिक स्तरावर पाकिस्तानवर मुत्सद्दी विजय मिळवला होता.

आपले डावपेच उघड करण्याने (आंतरराष्ट्रिय स्तरावर) अधिक काहीच साध्य होणार नव्हते. पण, पाकिस्तानच्या आणि चुकार भारतियांच्या नाठाळपणाला उपाय म्हणून तसे करावे लागले. किंबहुना, ते डावपेच जाणण्याची सर्वात जास्त जिज्ञासा व गरज पाकिस्तानला आहे... व काही मूर्ख भारतीय, स्वार्थी हितसंबंधांसाठी, (व ते पाकिस्तानला कळले तरी बेहत्तर पण) ते उघड व्हावेत यासाठी गदारोळ करत आहेत.

युद्धशास्त्रातला एक महत्वाचा नियम असा आहे : "आपल्या 'न केलेल्या' आणि 'यशस्वीरित्या केलेल्याही' कारवायांच्या डावपेचांचा सुगावा शत्रूला न लागू देता, त्याला सतत गोंधळात ठेवणे, म्हणजे अर्धे युद्ध जिंकण्यासारखे आहे."

विनोद१८'s picture

10 Apr 2019 - 11:59 pm | विनोद१८

....दुर्दैवाने एवढी सुबुद्धी अजुन काही लोकांना नाहीये.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Apr 2019 - 10:22 am | डॉ सुहास म्हात्रे

हे त्यांना चांगले माहीत असते, पण स्वार्थापुढे देश आणि स्वत सोडून इतर सर्व खड्ड्यात गेले तरी त्यांना त्याचे सोयरसुतक नसते.

इतके निर्लज व निर्ढावलेले मन असल्याशिवाय, गरिबांच्या आणि इतर नागरिकांच्या विकासासाठी, इतकेच काय तर गरोदर स्त्रियांसाठी आणि कुपोषित बालकांच्या पोषणासाठी असलेला कराचा, पैसा सहजपणे खाणे कसे शक्य होईल ???!!!

भंकस बाबा's picture

6 Apr 2019 - 11:54 am | भंकस बाबा

पुण्यात एका युवा मेळाव्यात एका प्रश्नाला उत्तर देताना पप्पू साहेब बरळले की न्याय योजनेला पैसा परदेशी पळालेल्या भगोडयाकडून आणून गरीबाना वाटला जाईल, धन्य त्या कोंग्रेस पक्षाची आणि रागा तर धन्य आहेच. पण कमाल एका गोष्टीची वाटली की पुण्यात तरुण वर्गाने असे भतुले ऐकून घेतले, एकाही श्रोत्याने यावर आक्षेप नोंदवला नाही? कारण नीरव मोदी, माल्या , चोक्षी असे किती पैसे घेऊन पळाले आहेत की या न्याय योजनेच्या अजगराला पूरे पडतील?

मराठी_माणूस's picture

6 Apr 2019 - 12:28 pm | मराठी_माणूस

https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/cover-story/chai-pe-charcha-v...

कोणीही आले तरी ह्या लोकांच्या आयुष्यात काही फरक पडेल का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Apr 2019 - 3:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चालू ठेवा. नेहमीचेच छान प्रतिसाद उत्तम करमणूक.

-दिलीप बिरुटे

हि निवडणूक लोकसभेची आहे, मराठी व महाराष्ट्रा साठी जो जास्तीत जास्त काम व सुधारणा ची मागणी करेल त्याच उमेदवार ला मते द्या

प्रसाद_१९८२'s picture

6 Apr 2019 - 5:53 pm | प्रसाद_१९८२

हि निवडणूक लोकसभेची आहे, मराठी व महाराष्ट्रा साठी जो जास्तीत जास्त काम व सुधारणा ची मागणी करेल त्याच उमेदवार ला मते द्या
--
हा तर खूप जुना फंडा झाला.
आता ज्या-ज्या पक्षाचा उमेदवार, मतदाराला दाबून पैसे देईल त्या सर्वांकडून पैसे घेऊन शेवटी मतदान ' नोटा' ला करायचे. :))

ट्रेड मार्क's picture

7 Apr 2019 - 5:57 am | ट्रेड मार्क

शाळेत नागरिकशास्त्र हा विषय ऑप्शन ला टाकला होता काय? लोकसभेची निवडणूक देशाचं नेतृत्व कोण करणार हे ठरवते. प्रादेशिक भाषा आणि राज्यासाठी प्रत्येक राज्य विचार करत बसलं तर कसं सरकार येईल याचा काही विचार केला आहे का?

प्रादेशिक अस्मिता जपण्यासाठी विधानसभेच्या निवडणूक आहेत.

मराठी व महाराष्ट्रा वर परप्रातीयांचे आक्रमक झाले असून मराठी भाषा व संस्कृती संपण्याच्या मार्गावर आहे म्हणून जो मराठी भाषा व संस्कृती जपण्यासाठी कार्य करणाऱ्या उमेदवाराला मतदान करा

प्रसाद_१९८२'s picture

6 Apr 2019 - 5:56 pm | प्रसाद_१९८२

मराठी भाषा व महाराष्ट्राचे 'नवनिर्माण' करायची प्रतिज्ञा घेतलेला पक्ष यंदा निवडणुकच लढवत नाही आहे ना. नाहितर केले असते त्याला मतदान.

बाप्पू's picture

6 Apr 2019 - 8:57 pm | बाप्पू

हो ना.. मराठी चा ठेका घेतलेले आदरणीय ठाकरे साहेब हे यंदा बारामतीच्या काकांचा प्रचार करणार आहेत. तसें कॉन्ट्रॅक्ट साइन झालेय.. त्याबदल्यात आगामी विधानसभा निवडणुकीत काहीतरी सेटलमेंट करायची असेल..
असो.
हेच राज ठाकरे छगन भुजबळ, अजित पवार, तटकरे इ विरुद्ध अगदी बेंबी च्या देठापासून बोंबलत होते.. आता त्याच लोकांना निवडून आणण्यासाठी सभा घेणार आहेत म्हणे.

मनसे सैनिकांचा ( राज ठाकरे गुंड सेना ) मेंदू तपासून घेतला पाहिजे.. कारण ते अजूनही राज ठाकरे यांच्या माकड उड्यांवर टाळ्या वाजवतायत...

अहो त्यांच्या सभेला होणारी गर्दी मनसे ला मतदान करत नव्हती तर काँग्रेस आणि चलाख काका ला मतदान करील याची काही शाश्वती नाही.
एका परिने राज जितके मोदींच्या नावाने बोम्बलतिल तितके भाजप सेने चे मतदारा वाढतील . कारण राज ठाकरे ला माणनारा वर्ग हा उजव्या विचारांचा , देश व धर्म यांना प्राधान्य देणारा , सुशिक्षित आणि आर्थिक दुष्टचक्रातून बाहर असलेला आहे , त्यामुळे राज नी जरी टोपी फिरवली तर राज ला फिरवायला या वर्गाला वेळ लागणार नाही .
राजकारणात वाटचाल करताना जरी त्यांची व्यूवरचना चुकली असली तरी प्रतिमा खराब न होवू देता त्यांनी पुन्हा भरारी घेणे अपेक्षित होते , पण तसे न करता एखाद्या पाळीव प्राण्या सारखे काकांच्या ईशाऱ्या वर मोदिवर ओरडत सुटले आहेत . बर मोदींच्या विरोधात साथ कोणाची देत आहेत तर कुप्रसिद्ध काँग्रेस आणि रा कॉ ची ? या दोन पक्षा बद्दल राग असणारे राज च्या आवाहनावरुन कशा वरुन त्या दोन बदनाम पक्षाला मतदान करतील ? त्यांच्या या दुहेरी व्यक्तिमत्वचा धिक्कार करणारे मनसे चे कार्यकर्ते मनसे सोडून केव्हाच गेले आहेत .

गोंधळी's picture

6 Apr 2019 - 6:50 pm | गोंधळी

सध्या भरतीय जनतेला २०१४ च्या मानाने कठीण परिस्थिती आहे.
कमकुवत व स्क्शम नस्लेला (पुर्विचा भ्रष्टाचारी) विरोधी पक्ष तर दुसरीकडे बहुमत मिळुनही फारस काही करु न शकलेला (जुमलेबाज व फेक)सत्ताधारी पक्ष.

भंकस बाबा's picture

6 Apr 2019 - 7:32 pm | भंकस बाबा

पप्पूच्या जाहिरनाम्याने पुष्कळ सोपी करून दिली आहे. जुमले परवडले पण हिरवळ नको.

गोंधळी's picture

6 Apr 2019 - 10:22 pm | गोंधळी

जुमले परवडले?????
सामान्य भारतीय जनतेला नाही परवडनार. तुम्ही असाल हो असामान्य.
हिरवळ नको असेल तर त्यांना ग्रुहमंत्री करा पण पंतप्रधान नकोच.

भंकस बाबा's picture

7 Apr 2019 - 7:35 am | भंकस बाबा

15 लाख न मिळाल्याचे दुःख तुमच्या प्रतिसादातून ओसंडून वहात आहे.
हिरवळ फोफावण्याचे कारण आपल्या पप्पूच्या पार्टिची धोरण आहे हे तरी मान्य आहे तुम्हाला हे ही नसे थोडके!
आता जरा रागाच्या जाहिरनामा तपासू.
हे जे फुकटचे खैरात वाटायचे चालले आहे ते फार वर्षापूर्वी ग्रीस या देशाने करून बघितलेले आहे. परिणाम आज त्यांची अर्थव्यवस्था गंटागळ्या खात आहे. गोंधळी साहेब तुम्ही आयकर भरत असाल अशी अपेक्षा करून हे बोलन्याची हिम्मत करतो की तुम्हालाच पिळून हे खैरात वाटणार आहेत. राहिली गोष्ट तुम्हाला न मिळालेल्या 15 लाखानी तुमचे माझे काही नुकसान झालेले नाही. ( 15 लाख देणार हे मोदिनी कुठेही म्हटलेले नाही)

गोंधळी's picture

7 Apr 2019 - 11:40 am | गोंधळी

बहुधा तुमचा अभ्यास कमी दिसतो आहे़.
जुमले - नोकरर्या देणे,उज्वला योजना,विमुद्रीकरण्,स्वच्छ भारत्,मुद्रा लोन्,मेक इन इंडिया,..........

अर्थव्यवस्थे बद्दल बोलता मग प्र.मं.आ.यो. अंतर्गत २लाख वाटले जातायत त्याचे काय? शेतकर्यांना ६ हजार वाटले त्याच काय? हे तुम्हाला पटते काय?
RBI वर पैसे देन्यासठी दबाव का आणावा लागला?

खर बोलणार्याला देशद्रोहि ठरवण्यात येत आहे. सरकारच चुका व अपयश दाखवणारर्या माध्यमांवर दबाव आणला जात आहे.
सरकारच्या विरुद्ध जाणारी महिती बाहेर येउ दिली जात नाही आहे.खोटी महिती दिली जात आहे.

आता ही विकास करनण्याबद्द्ल,.बेरोजगारि बद्द्ल काहीच बोलत नाहि आहेत.

मी मान्य करतो की भारतीय जनता जास्त भावनाशील आहे.त्यामुळे आपल जास्त नुकसान झालेल आहे.
पण आता फक्त मनाने विचार न करता बुद्धीला पटेल ते केल पाहिजे.

ट्रेड मार्क's picture

8 Apr 2019 - 7:21 am | ट्रेड मार्क

किती गोंधळ घालताय.

नोकऱ्या देणे: एकच उदाहरण देतो, तुमच्या लाडक्या राफेल प्रकरणात रिलायन्सला एवढं मोठ्ठ कॉन्ट्रॅक्ट मिळालं. त्यांनी कंपनी स्थापन सुद्धा करून फाल्कन विमानाचे सुटे भाग तयार सुद्धा करायला सुरुवात केली. मग तिथे काय अनिल अंबानी आणि त्याचे कुटुंब स्वतः सगळी कामं करतेय का? नोकऱ्या तयार झाल्या नाहीत? बरं जिथे फॅक्टरी आहे तिथे वाहतूक करणारे, भजी तळून आणि चहा बनवून लोकांच्या खाण्याची व्यवस्था करणारे वगैरेंना रोजगार मिळाला नाही? अशी कितीतरी उदाहरणे देता येतील... अगदी गंगेतून होणाऱ्या जलवाहतुकीपासून सरदार पटेलांच्या पुतळ्यापर्यंत.

दुसरी महत्वाची गोष्ट रोजगार देण्याचे आश्वासन देता येऊ शकते पण नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन कोणी कसे देऊ शकेल? मोदींनी २ कोटी "नोकऱ्या" देण्याचे आश्वासन दिले होते याचा काही पुरावा द्याल का?

प्रधान मंत्री आवास योजना: २ लाख काय खैरातीसारखे वाटले जात नाहीयेत. जर निम्न उत्पन्न गटातील लोकांना जर स्वतःचे घर घ्यायला मदत मिळत असेल तर तुम्हाला काय वाईट वाटतंय? संपूर्ण घर फुकट देत नाहीयेत तर थोडी मदत करत आहेत. यात मोदी किंवा त्यांच्या मंत्र्यांपैकी कोणी घोटाळा केला असेल तर ते सांगा. बादवे प्रगत देशांमध्ये सुद्धा पहिले घर घेणाऱ्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे सरकारी मदत मिळते.

शेतकऱ्यांना ६ हजार: वर्षाला ६ हजार रुपये बीबियाणे आणि इतर खर्चासाठी मिळणार आहेत. हे सुद्धा सरसकट वाटले जात नाहीयेत. यात घोटाळा झाला असेल तर त्याचे पुरावे द्या.

कोण कोणाला देशद्रोही ठरवत आहे? खरं बोलणाऱ्याला म्हणजे कोणाला? जे तुम्हाला खरं वाटतंय ते मला नसेल वाटत तर? पण तरीही भाजप किंवा सरकारने असे "खरं" बोलणाऱ्यांवर काही कारवाई केली आहे का? का नुसते सोशल मीडिया वर कोणी तुम्हाला विरोध केला म्हणून तुम्ही ओरडताय?

कुठल्या माध्यमांवर कोणी दबाव आणलाय याचे पुरावे तर द्या. उगाच काहीपण टायपायचे.

बेरोजगारी वर बोलत नाही म्हणजे काय? विकास होत नसेल तर नोकऱ्या निर्माण होत नाहीत. कुठल्या पार्टीचे सरकार आहे ते बाजूला ठेवा, सरकारचे काम संधी तयार करायचे आहे. ते काही तुम्हाला बोटाला धरून नोकरी मिळवून देणार नाहीत. भांडवलाअभावी जे लोक छोटामोठा व्यवसाय करू शकत नाहीत त्यांच्यासाठी मुद्रा योजना आहे, तर तुम्हाला त्यावरही आक्षेप असेल. नवीन व्यावसायिकांना कुठलीही ब्यांक दारातही उभं करत नाही हे स्वतः एकदा अनुभव घेऊन बघा. मग अश्या लोकांना सरकार मदत करत असेल तर ते पण रोजगार निर्माण करणेच नाही का? फुकट दरमहा ६-१२ हजार देण्यापेक्षा हे नक्कीच चांगले आहे.

ज्या नोकऱ्या उपलब्ध आहेत त्या मिळवण्यासाठी जे स्किल लागते ते मिळवणे, इंटरव्यू पास करणे हे प्रत्येकाला आपलेआपलेच मिळवावे लागणार आहे. त्यात सरकार काय करणार?

भंकस बाबा's picture

8 Apr 2019 - 8:56 am | भंकस बाबा

अहो नीट अभ्यास केला असता ना मी(10वीच्या बोर्डाचा)जाउदे!
मुद्द्यावर येउया.
स्वच्छ भारत - जरा मुंबईत येऊन फिरा, जागोजागी स्वच्छतागृह उभी राहिली आहेत. पुष्कळ स्वछतागृह ही कोंग्रेसच्या नगरसेवकानी वा आमदारानी उभारली आहेत. ही त्यानी समाजसेवा म्हणून नाही तर मोदींच्या भीतिने उभारली आहेत. ज्या भागात पाच वर्षापूर्वी स्वछतागृहाची निकड नव्हती तिथे अचानक स्वछतेचा का पूळका यावा? तर आपण नाही केले तर मोदी करतील या भीतिने! मग मारे त्यासाठी केंद्राकडून अनुदान घेतले असेल पण नाव मात्र या टिकोजीरावांचे, कोंग्रेसचे आमदार अस्लम शेख हे या बाबतीत आघाडिवर आहेत. नाहीतर या माणसाला फक्त अनधिकृत मशिदि बांधण्यासाठी निवडून दिले आहे असा संशय येतो, बाकी मतदारसंघात काही उल्लेखनीय कामगिरी नाही.
गंगा स्वछता अभियान- फार वर्षापूर्वी गंगेचे फोटो यायचे वर्तमानपत्रात छापुन , तटावर जाळले गेलेले मृतदेहाचे अर्धवट जळलेले अवशेष गंगेत वाहत असलेले! अगदी गंगेचे घाट वेगेरे पार्श्वभूमीवर दाखवून. आता असे फोटो का नाही येत? मिशन फेल गेले आहे हे दाखवायला विरोधी पक्षाना बरे नाही का पडणार? बर जलवाहतुक, त्यासाठी इंफ्रास्ट्रक्चर वेगेरे गोष्टी चर्चेला घेतल्याच नाहीत.
मी ज्या कंपनित काम करतो त्या फ़र्मला मेडिकल ट्रांसक्रिप्टर या पदासाठी उमेदवार पाहिजे आहे, मिळतच नाही आहे. जे येतात ते असा पगार मागतात की आमचा मैनेजर खजिल होतो. कारण त्यांना बहुराष्ट्रीय कंपन्या तेवढा पगार देतात. ही परिस्थिति सगळीकड़े आहे. कामे आहेत पण योग्य उमेदवार नाही, योग्य उमेदवाराला घेण्यासाठी कंपन्या टपलेल्या आहेतच.
तर गोंधळी साहेब डोळे उघडा आणि आजुबाजुला बघा,

गोंधळी's picture

8 Apr 2019 - 11:11 am | गोंधळी

भंकसजी व ट्रेड मार्कजी जरा ही लिंक पहा -
https://www.youtube.com/watch?v=wfF5Q17lYy4

मला फक्त एवठेच म्हणायच आहे की जे बरोबर आहे ते आहे पण जे चुक आहे किंवा खोट आहे त्याला चुकिचेच म्हटले पाहिजे.

व्यक्ति पुजा न करता तटस्थ राहुन बघायला हवे. तरच दिखावा व सत्य काय आहे ते समजुन येइल.

डँबिस००७'s picture

8 Apr 2019 - 12:26 pm | डँबिस००७

व्यक्ति पुजा न करता तटस्थ राहुन बघायला हवे. तरच दिखावा व सत्य काय आहे ते समजुन येइल.

जरा कळ काढा येत्या मे मध्ये कळेलच काय दिखावा आहे आणी व सत्य काय आहे ते समजुन येइलच !!

मला सुद्धा भाजप चे सरकार आणि मोदी जुमलेबाज वाटतात !!!!
अस वाटतं फेकून देवू भाजप ला अडगळीत!!!
पण भाजप ला पर्यायी पक्ष लवकर आठवत नाही हो !!
बर गठबंधन ला निवडून द्यावे तर किमान 2004 व 2009 सारखी परिस्थिति आता हवी होती , म्हणजे पंतप्रधान पद काँग्रेस ला भेटणार का ? भेटले तर काँग्रेसमध्ये 130 करोड़ लोकांचे नेतृत्व खंबीर / गंभीरपणे करणारा कोणी आहे का ? काँग्रेस ला पंतप्रधान पद देणे इतर पक्षानां मान्य असेल का ? आत्ताच पंतप्रधान पदावरुन त्यांच्यात एकमत नाही तर सुशिक्षित असलेल्या भाजपा विरोधकांनीं सत्तेची चावी कोणाला सोपवावी ?
पंतप्रधान पदी भाजप व्यतिरिक्त कोणत्या पक्षाचा कोणता नेता योग्य वाटतो ? या विषयावर मला आपले विचार वाचायला आवडतील .
2009/ 2014 ला निष्कलंक ममो होते म्हणून ठीक , पण आता कोणत्या पक्षाचा कोणता नेता पंतप्रधान पदी योग्य वाटतो ? कोणते नेते सक्षम / योग्य वाटतात ?

गोंधळे साहेबांसाठी प्रतिसाद होता बरका !!!

ट्रेड मार्क's picture

9 Apr 2019 - 6:22 am | ट्रेड मार्क

म्हणजे मोदींचे नाव घेतात म्हणून एबीपी सारख्या मोठ्या न्यूज चॅनेलच्या प्रक्षेपणात अडथळे आणू शकतात पण नंतर पु. प्र. वाजपेयींनी जे ब्लॉग लिहिले किंवा मुलाखती दिल्या व्हिडीओ पब्लिश केले त्यावर मात्र सरकारने काहीच केले नाही? एवढंच नव्हे तर ज्या ध्रुव राठीच्या तूनळी च्यानेलची लिंक तुम्ही दिली आहे त्याच च्यानेलवरून ध्रुव कितीतरी मोदीविरोधी गरळ ओकत असतो. त्यावर किंवा वायर वगैरे च्यानेल्स वर काहीच कारवाई होत नाही? असं कसं होत असेल बरं?

अगदी एनडीटीव्ही वरून तसेच राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, सागरिका घोष वगैरे सगळे हाय प्रोफाईल पत्रकार तर अगदी २००२ पासून मोदींविरुद्ध बोलत आहेत, नाहीनाही ते आरोप करत आहेत त्यांचे च्यानेल नाही ब्लॉक झाले? मध्यंतरी रवीश कुमारने पण ब्लॅकआउट स्क्रीनचं नाटक केलं होतं हे आठवत असेल. मोदींनी किंवा सरकारने त्यांचे प्रोग्रॅम ब्लॅकआउट केले हे कशावरून? ध्रुव राठी सांगतो म्हणून? काय पुरावा आहे?

गोंधळी's picture

9 Apr 2019 - 11:11 am | गोंधळी

अगदी अपेक्षित प्रतिसाद दिलात.
मुळ मुद्दा असा आहे कि त्या जाहिरातील मधिल लोक जे सांगत आहेत ते खोट कि खर आहे.ते सांगा.
त्यांना पैसे देउन अस बोलायल लावले आहे का?

ट्रेड मार्क's picture

10 Apr 2019 - 3:25 am | ट्रेड मार्क

कोणाचे काय काय लागेबांधे आहेत, कोणाची कुठे कुठे बोटं किंवा गळे अडकलेत, कोणाचे कसले साटेलोटे आहेत हे माझ्यासारख्या छोट्या माणसाला कुठून कळणार?

पण मी सगळ्या बाजूची मतं वाचतो/ ऐकतो. उदा. राफेलचा मुद्दा - मोदी, सीतारामन, जेटली यापासून ते रागा, पायलट, सिंदिया, पवन खेडा सगळ्यांची मतं ऐकली. फ्रांस सरकारने दिलेलं प्रेस रिलीझ वाचलं. त्यानंतर कॅग आणि कोर्टाच्या निर्णयानंतर माझं तरी मत असं बनलं आहे की या प्रकरणात घोटाळा झाला नसावा. या विषयावर समस्त पत्रकारांमध्ये फूट पडली आहे. अर्णब आणि काही प्रमाणात टाइम्स नाऊचे पत्रकार घोटाळा नाही म्हणतात तर राजदीप, बरखा ईई घोटाळा आहे हे ठासून सांगतात. त्यात तुम्ही ध्रुव राठीचे व्हिडीओ बघितलेत तर त्याने मांडलेल्या मुद्द्यनमध्ये फारसा दम वाटत नाही. ओढून ताणून संबंध लावणे अर्थाचा अनर्थ करणे हे बऱ्याच प्रमाणात दिसते. तुम्ही वर टाकलेल्या व्हिडीओ मध्ये जे प्रकरण आहे ते राफेलच्या मानाने छोटं आहे. पण राफेलच्या प्रकरणात सरकारविरुद्ध किंवा मोदींविरुद्ध जाहीरपणे बोलणाऱ्या कोणाला कुठल्या कारवाईला तोंड द्यायला लागलं आहे का? किंवा कुठल्या च्यानेलवर काही आडमार्गाने सुद्धा काही कारवाई झाली आहे का?

त्या जाहिरातील मधिल लोक जे सांगत आहेत ते खोट कि खर आहे.ते सांगा

ही जाहिरात आहे हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद. एक तर ध्रुव राठी राहतो जर्मनी मध्ये, तिथून फावल्या वेळात हे व्हिडीओ तयार करतो. त्याचे बरेच सबस्क्रायबर्स आहेत आणि हिट्स पण बऱ्यापैकी मिळतात. तूनळीवर जितके हिट्स त्याप्रमाणात पैसे पण मिळतात. जर हे लोक आम्ही तटस्थ आहोत असे म्हणतात तर एकतर्फी व्हिडीओ का शेअर करतात? यापैकी कोणीही सलग कुठले व्हिडीओ दाखवत नाहीत तर त्यांना सोयीस्कर असेल असे भाग कापून दाखवतात. मध्ये त्यांची मते सांगतात आधीचे आणि नंतरचे प्रसंग सरमिसळ करून त्यांना पाहिजे तसे नॅरेटिव्ह तयार करतात.

हा ध्रुव राठी हे काँग्रेस च्या इको सिस्टिम ने मोठे केलेले प्रकरण आहे.
ऑर्डर मिळाल्यासारखे याच्या ट्विट ला सागरिका घोष आणि तत्सम पत्रकार रिट्विट करायला लागतात. त्यानंतर लगोलग याला NDTV वर चर्चे बोलावणे येते. मग प्रिंट,वायर सारख्या वेबसाइट्स... ज्यातील बहुतांशी २०१४ नंतर जन्माला आल्यात त्या या ध्रुव राठी ला उचलून धरतात. एका ठराविक काळात त्याचे ट्विटर चे फॉलोवर्स लाखो ने वाढवले जातात.
हे घडण्या पेक्षा घडवून आणले जात असते.

https://www.youtube.com/watch?v=iMFCes4QDao

गोंधळी's picture

10 Apr 2019 - 2:12 pm | गोंधळी

माफ करा ती जाहिरात नाही आहे. पं.प्र प्रत्यक्ष त्या लोकांशी संवाद करत आहेत. अस दाखवण्याचा प्रयत्न आहे कि शेतकर्यांच उत्पन्न वाढल आहे. पण त्याच लोकांना
याबद्द्ल विचारल्यास ते तस नसल्याच सांगत आहेत.

हे माझ्यासारख्या छोट्या माणसाला कुठून कळणार?
तुम्हालाही या संबंधी ठोस माहिती नाहि. त्यामुळे माझ त्या व्हिडीओ बद्दलच मत बदलेल नाही. तुम्ही जर त्या व्हिडीओ मधल्या लोकांच खरच उत्पन्न वाढल आहे ह्या संबंधी
माहिती दिलीत तर माझ मत बदलेल.

मुळ मुद्दा महत्वाचा आहे बाकी हा असाच आहे तो तसाच आहे ह्या वादात मला पडायच नाही आहे.

मुद्दा- उज्ज्वला योजनेनुसार गरीबी रेषाखालील जनतेला गॅस कनेक्शन व १६०० रु. ३वर्षांकरता देण्यात आले.
जर का गॅस रिफीलींगचे दर बघतले तर गरीबी रेषाखालील जनतेला ते कस परवडु शकत हा खुप मोठा प्रश्नच आहे.

सुबोध खरे's picture

10 Apr 2019 - 6:22 pm | सुबोध खरे

जर का गॅस रिफीलींगचे दर बघतले तर गरीबी रेषाखालील जनतेला ते कस परवडु शकत?

हीच स्थिती मोबाईल बद्दल १० वर्षांपूर्वी होती याची आठवण झाली.

सध्या भारतात ७३ कोटी लोक भ्रमणध्वनी वापरतात.
For 2017 the number of mobile phone users in India is expected to rise to 730.7 million.
https://www.google.com/search?q=no+of+mobile+users+in+india&rlz=1C1CHNY_...

The World Health Organization (WHO) had said that IAP was claiming 500,000 lives in India every year, most of whom were women and children

Read more at:
http://timesofindia.indiatimes.com/articleshow/17605667.cms?utm_source=c... ..
हा आकडा २०१२ चा आहे.

या पाच लाख स्त्रियांच्या आणि बालकांच्या आयुष्याची किंमत काय?

दारू पिण्यासाठी पुरुषांच्या खिशात पैसे असतात पण गॅसचा सिलिंडर आणण्यासाठी पैसे नसतात हि भीषण वस्तुस्थिती आहे.

आणि जर राहुल गांधी सत्तेत आले तर ६ हजार रुपये दर महिना असेच खात्यात येणार आहेत मग काय चांदीच आहे.

गोंधळी's picture

10 Apr 2019 - 9:10 pm | गोंधळी

मी योजनेच्या विरुद्ध नाही आहे. तर साध्यते विषयी शंका आहे.

https://www.livemint.com/Politics/oqLQDFKNuMdbmLEVL88krN/Indias-poor-are...

https://www.thehindu.com/news/national/about-85-of-ujjwala-beneficiaries...

विनोद१८'s picture

11 Apr 2019 - 12:13 am | विनोद१८

मुद्दा- उज्ज्वला योजनेनुसार गरीबी रेषाखालील जनतेला गॅस कनेक्शन व १६०० रु. ३वर्षांकरता देण्यात आले.
जर का गॅस रिफीलींगचे दर बघतले तर गरीबी रेषाखालील जनतेला ते कस परवडु शकत हा खुप मोठा प्रश्नच आहे.

याचे उत्तर अगदी सोप्पे आहे, ते फुकट द्यायला सांगू.

ट्रेड मार्क's picture

11 Apr 2019 - 6:51 am | ट्रेड मार्क

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या OSD आणि इतर जवळच्यांकडे २८१ कोटी रुपये सापडले आहेत अशी बातमी आहे. पण जरा गुगलून बघा किती मुख्य वर्तमानपत्रांमध्ये हेडलाईन म्हणून आहे. तसेच किती न्यूज चॅनेल्स वर यावर ब्रेकिंग न्यूज म्हणून चर्चासत्र झडत आहेत.

राफेल प्रकरणात सगळे मोदींना फक्त प्रश्न विचारात आहेत. पण ६०,००० कोटींच्या व्यवहारात ३०,००० कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिश्यात कसे टाकता येतील याचे स्पष्टीकरण राहुल गांधीला कोणीच विचारत नाही.

राफेल वरचीच एक याचिका न्यायालयाने दाखल करून घ्यायला संमती दिली म्हणून सगळे लगेच त्यावर मोदींना मोठा झटका म्हणून ओरडायला लागले. पण राहुल आणि सोनिया ५००० कोटींच्या हेराल्ड प्रकरणात बेलवर बाहेर आहेत पण एकसुद्धा प्रश्न नाही?

ध्रुव राठी, विनोद दुआ वगैरे स्वतःला तटस्थ समजणाऱ्यांनी या कुठल्या विषयावर राहुल/ सोनिया/ काँग्रेस/ प्रियंकाला गेलाबाजार काँग्रेसच्या एखाद्या मंत्र्याला व प्रवक्त्याला प्रश्न विचारणारे व्हिडीओ प्रदर्शित केलेत का?

त्या व्हिडीओ संबंधी -

त्या महिलेचं पाहिलं व्यक्तव्य होतं - माझं उत्पन्न दुप्पट झालं. मग त्यावर खोदून खोदून परत विचारण्यात आलं - आधी कुठली शेती करत होतात त्यातूनच झालं का? तर तिने नाही सांगितलं. तिथे क्लिप संपली. फक्त शेतीचं उत्पन्नच दुप्पट व्हायला पाहिजे असा आग्रह का? जर शेतीच्या जोडीने, सरकारच्या कुठल्या तरी योजनेमुळे/ साहाय्यामुळे, ती दुसरे व्यवसाय करून उत्पन्न वाढवत असेल तर चालणार नाही?

गॅस रिफीलींगचे दर बघतले तर गरीबी रेषाखालील जनतेला ते कस परवडु शकत हा खुप मोठा प्रश्नच आहे.

मग या लोकांना आहे त्याच परिस्थितीत ठेवायचं, म्हणजे ते केरोसीन व लाकूड वापरत असतील तेच वापरू द्यायचं? म्हणजे केरोसीनचा काळाबाजार चालू रहाणार. माझा प्रश्न तर हा आहे की प्रत्येक योजना अशी सेपरेट का बघितली जातेय? सरकारच्या DBT, मनरेगा, प्रधानमंत्री ग्रामसडक वगैरे योजना आहेत ज्यामुळे बरेच लोक गरिबीरेषेच्या वर आले आहेत, येत आहेत.

गोंधळी's picture

11 Apr 2019 - 3:21 pm | गोंधळी

माझा मुद्दा हा आहे की ही योजनेचे जे लक्श होत ते साध्य झालेल नाही आहे.१ ला सिलेंडर वापरल्यानंतर तो परत रिफील करणार्यांच प्रमाण कमी आहे.
ही सद्याची वस्तुस्थिती आहे.

मग या लोकांना आहे त्याच परिस्थितीत ठेवायचं, म्हणजे ते केरोसीन व लाकूड वापरत असतील तेच वापरू द्यायचं?

म्हणजे तुम्हाला निदान सिलेंडर रिफीलींगचा मुद्दा मान्य आहे असे दिसते.

तर या योजनेतील त्रुटी दुर केल्या पाहिजेत. तो पर्यंत जाहिरात बाजी न केल्यास ते योग्य राहील.

मुद्दा :- डिमोचा मुळ उद्देश सफल झाला आहे असे दिसुन येत नाही आहे. किती ब्लॅक मनी पकडला त्याची आकडेवारी कोण देईल का?
फेक नोटा सापड्ल्या पण आता ही २००० च्या फेक नोटा सापडत आहेत.

https://www.businesstoday.in/current/economy-politics/demonetisation-rbi...

डिमॉनेटायझेशन मूळ उद्देश किती सफल झाला आहे हे राजकीय पक्षांची वक्तव्ये वाचलीत तर ०% पासून १००% पर्यंत एकदा येईल.

परंतु लष्कर आणि निमलष्करी दले आणि गुप्तचर खाते याना विचारले तर त्या बऱ्याच गोष्टी ज्या बाहेर आल्या नाहीत त्या समजून येतील. माझ्या लषकरी गुप्तहेरखात्यातील मित्राशी सध्याच बोलणे झाले तेंव्हा त्याने सांगितलेली गोष्ट अशी आहे.

१) महाराष्ट्र छत्तीसगड आणि तेलंगण या लागून असलेल्या नक्षलवादी भागात जे उद्योगधंदे आहेत त्यांच्याकडून नक्षलवादी खंडणी गोळा करतात हे उघड गुपित आहे. शिवाय शहरी नक्षलवादी सुद्धा त्यांना असेच पैसे पुरवत असतात.

अधिकारीक तत्वावर कुणीच मान्य करणार नाही परंतु सर्वाना "माहित आहे."

हा पैसा संपूर्ण रोख रकमेच्या स्वरूपात (५०० आणि १००० च्या नोटा) होता आणि या लोकांनी हा सर्वत्र जमिनीत पुरून ठेवलेला होता. यातून या लोकांच्या संघटनांचा खर्च चालत असे. एका फटक्यात हा पैसा निरुपयोगी झाला
या लोकांनी उद्योगांना परत वेठीस धरण्याचा प्रयत्न केला परंतु उद्योगांकडे पण पैसे नव्हतेच त्यामुळे नक्षलवादी संघटनांची फार कुचंबणा झाली.

शहरी नक्षलवादी एकदम आरडा ओरडा कोल्हेकुई करू लागले याचे हे कारण आहे.

२) विविध जिल्हा बँकांना अन सहकारी पतपेढ्याना पैसे बदलून देण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिला होता परंतु त्यांनि आपल्या संचालक मंडळाचे कोट्यवधी रुपये बदलून दिले आणि हे पैसे त्यांच्या तिजोरीत पडलेले आहेत. रिझर्व्ह बँकेकडे वारंवार खेटे घालूनही बँकेने हे पैसे बदलून देण्यास नकार दिला आहे त्यामुळे एका बँकेत हे पैसे सडू लागल्याची बातमी आली आणि दुसऱ्या बँकेत उंदरांनी पैसे कुरतडल्याची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेचा हिशेब साधा सरळ आहे. हे पैसे घेऊन त्याची विल्हेवाटच लावायची आहे. मग आपण बदलून का द्या?

या स्थिती मुळे या जिल्हा सहकारी बँका आणि पतपेढ्या डबघाईला आल्या आहेत. कागदोपत्री पैसे आहेत पण ते संचालकांना देऊन बसल्यामुळे प्रत्यक्षात पैसे नाहीत अशी स्थिती आहे. आता भागधारकांना पैसे/ कर्ज द्यायचे तर पैसे आणायचे कुठून? यामुळे सामान्य नागरिकांमध्ये याबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे.

यात एका राजकीय पक्षाचे फार मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे त्यांच्या लोकांची निवडणुकीला उभे राहायची तयारी नाही.

दुसऱ्या एका राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याने आपले काही पैसे (बाकी बरेच पैसे फार मोठी किंमत देऊन बदलून घ्यायला लागले) आपल्याच जातीच्या बँकेतुन बदलून घेतल्याची अफवा आहे. या बँकेची स्थिती यामुळे अजूनच वाईट झालेली आहे. आणि त्यांच्या वर रिझर्व्ह बँकेचे अजूनच निर्बंध आले आहेत.

https://economictimes.indiatimes.com/industry/banking/finance/banking/rb...

http://www.uniindia.com/ckp-bank-depositors-forum-urge-buying-of-unaucti...

काका मला वाचवा असा टाहो ऐकू आल्याचे काही लोक बोलताना ऐकू आलंय.

दुवे काळजीपूर्वकी वाचा

सर टोबी's picture

12 Apr 2019 - 4:34 pm | सर टोबी

नोटबंदीमुळे नक्षलवाद्यांचे कंबरडे चांगलेच मोडले होते. आता निवडणुकीदरम्यान त्यांचे हल्ले परत वाढलेत परंतु त्याची कारणे वेगळी आहेत. मधल्या काळात मोदींच्या आर्थिक धोरणांचा परिणाम म्हणून देशाची अर्थव्यवस्था चांगलीच वेगात धावायला लागली आहे. त्यामुळे लघु उद्योजक आणि शेतकरी यांच्याकडे चांगलाच पैसा खेळायला लागला आणि नक्षलवाद्यांना जीवदान मिळाले. त्यात अमोल पालेकर वगैरेंनी सत्तरच्या दशकात जो दाबून पैसा मिळवला तो आता त्यांनी शहरी नक्षलवादी म्हणून द्यायला सुरुवात केली आहे. पण काळजी नको. नवीन सरकार आल्यावर एक अंतर्गत सर्जिकल स्ट्राईक तर होणारच.

स्थलसेना प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार वगैरेंच्या संपर्कात नसलेला
~ सर टोबी

सुबोध खरे's picture

12 Apr 2019 - 8:30 pm | सुबोध खरे

एक गोष्ट लक्षात घ्या
नक्षलवादी काही मूर्ख नाहीत. त्यांनी पण सामान्य जनतेला वेठीस धरून त्यांच्या खात्यात पैसे जमा केलेच शिवाय लोकल कंत्राटदाराना सुद्धा दहमकावून आपली कामे केलीच तेंव्हा त्यांचा काही सगळाच्या सगळा पैसे वाया गेला असे नाही.
शिवाय काही गोष्टी कुठेच आणि कधीच प्रसार माध्यमात येणार नाहीत.
त्या म्हणजे एकाच नंबरच्या दोन नोटा छापल्या गेल्या होत्या आणि हे सर्व सरकार आणि टांकसाळीत तज्ञ लोक यांचे साटेलोटे होते. त्यामुळे रिझर्व्ह बँक आणि टाकसाळ यांच्या हिशेबात जरी १४ -१५ लाख रुपयांच्या नोटा होत्या तरी वेगवेगळ्या अंदाजा प्रमाणे प्रत्यक्षात अशा दुहेरी क्रमांकाच्या अतिरिक्त अशा एक लाख ते ४ लाख कोटी रुपयांच्या दुहेरी क्रमांकाच्या नोटा निर्माण केल्या गेल्या असाव्यात. म्हणजेच १५. ४ लाख कोटी अधिकारीक नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या होत्या त्यापैकी १५.३ लाख कोटी परत आल्या. पण यात या दुहेरी क्रमांकाच्या नोटा पण परत आल्या. आणि ज्या आल्या नाहीत त्यात दुहेरी आणि मूळ अशा १ ते पाच लाख कोटी रुपयांच्या नोटा वाया गेल्या आहेत.
अर्थात यावर ज्यांनी या दुहेरी क्रमांकाच्या नोटा जारी केल्या ते हा गोष्ट कदापि मान्य करणार नाहीतच पण उच्च रवाने आरडा ओरडा पण करीत आहेत.
निश्चलनीकरण आणि त्यानंतर नोटांचा छापच बदलल्यामुळे जुन्या नोटा छापण्याचे साचे आणि यंत्रे पण निकामी झाली आहेत.
अर्थात अशीच स्थिती पाकिस्तानच्या आय एस आय ची पण आहे. त्यांचे पण जुन्या नोटा छापण्याचे साचे आणि यंत्रे पण निकामी झाली आहेत

तेलगी यांचा असाच बनावट मुद्रांकाचा घोटाळा ३० हजार कोटींचा होता आणि हा घोटाळा ८ वर्षे चालू होता. घोटाळ्यात अनेक पोलीस आणि सरकारी अधिकारी यांचं हात होता आणि तेलगी यांची नार्को टेस्ट झाली त्यात त्यांनी श्री शरद पवार आणि श्री छगन भुजबळ यांचे नावही घेतले होते. पण पुढे एकही आरोपीला शिक्षा झाली नाही. हा इतिहास आहेच.
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/telgi-tatt...

अभ्या..'s picture

16 Apr 2019 - 3:21 pm | अभ्या..

निश्चलनीकरण आणि त्यानंतर नोटांचा छापच बदलल्यामुळे जुन्या नोटा छापण्याचे साचे आणि यंत्रे पण निकामी झाली आहेत.
अर्थात अशीच स्थिती पाकिस्तानच्या आय एस आय ची पण आहे. त्यांचे पण जुन्या नोटा छापण्याचे साचे आणि यंत्रे पण निकामी झाली आहेत

काहीही. चक्क काहीही लिहायचे?
साचे म्हनजेच आर्टवर्क सिलिंडर फक्त चेंज झाले. फार कष्ट अन खर्च नसतात हो त्यासाठी. असे ना तसे होशंगाबादहुन लागतातच सिलिंडर रेग्युलरली. ते फक्त डिझाइन चेंज झाले. बाकी नोटा चौकोनच आकारातील असल्याने सरळ रेषेतले कटिंग शिवाय दुसरे काही नसते. त्यासाठी कटिंग लेआउट चेंज होतो फक्त. ग्रेव्हीयरचे साचे चेंज करायचा खर्च सरकार रेग्युलरली करते. त्यात काही नवीन नाही. जास्त फरक पडला तो एटीएम मशीन्सना. इव्हन हा नव्या साच्याचा खर्च भारतातले सारे एटीएम मशीन्स कॅलिब्रेट करण्याच्या खर्चासमोर न के बराबर आहे. सो साचे निकामी झाले म्हणण्याला काही अर्थच नाही.
यंत्रे निकामी झाली हे तर मोट्ठा विनोद आहे. अशी कोणती प्रोसेस आहे की ज्यामुळे जुनी यंत्रे आणि ती प्रोसेस निकामी झाली. ग्रेव्हियर, ईंटिग्लो आणि लिथो ह्या तीन तंत्रानीच नोटा प्रिंट केल्या जात होत्या आणि नव्या नोटाही ह्याच तंत्राने प्रिंट केल्या जातात. लहानसाहान अ‍ॅडऑन्स असतात पण ते रिसर्च आणि डिझाईन करतानाच केलेले असतात. मशीन्समध्ये अन प्रिंटिंगमध्ये मायन्त्युट चेंज करुन होतात ते. त्याने प्रोसेस अन मशीन बदलत नसते. बदल थोडासा कागदात झाला पण तो विषय वेगळा आहे. मशीन त्याच असतात. नोटाबंदीने नवीन मशीन आणल्या हा जोक आहे. नोटाबंदीनंतर फक्त डिमांड्मुळे मशीन लाइन्स वाढवल्या मिंटने. प्रोसेस तीच आहे.
सेम असेच आयएसाअयने बसवलेल्या मशीनबाबत आहे. भारताच्या मशीन्स निकामी झाल्या त्यामुळे त्यांच्या मशीन्स निकामी झाल्या असले खोटे दावे करुच कसे वाटतात?

सुबोध खरे's picture

16 Apr 2019 - 6:49 pm | सुबोध खरे

माझा शब्द प्रयोग चुकला असेल पण तांत्रिक मुद्द्यावर वाद घालण्यापेक्षा मूळ मुद्दा लक्षात घ्या

खालचा दुवा पूर्णपणे वाचून घ्या.

The parliamentary panel was informed that the volume of FICN smuggled into India in 2010 was between Rs 1,500 and Rs 1,700 crore, which went up to Rs 2,500 crore in 2012 - a rise of 55 per cent. This year, fake currency worth Rs 1,200 crore has already infected the Indian economy till July.
https://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-2488000/Pakistan...

हे आकडे २०१३ चे काँग्रेसचे सरकार असतानाचे आहेत आणि अर्थात हे हिमनगाचे टोक आहे. हे आकडे निश्चलनीकरणाच्या समर्थनार्थ २०१७ नंतरचे किंवा मोदी सरकार आल्यानंतरचे नाहीत

अडीच हजार कोटी रुपयात किती मोठ्या प्रमाणावर दंगे आणि अशांतता भडकवता येईल याचा विचार करा.

गामा पैलवान's picture

15 Apr 2019 - 1:15 pm | गामा पैलवान

खरे डॉक्टर,

तुमचं म्हणणं खरं दिसतंय. कालंच पुण्यातली बातमी वाचली की निवडणुका असल्या तरी दारू नेहमीसारखी वाहत नाहीये :

https://www.loksatta.com/pune-news/alcohol-in-pune-1875688/

हे नोटाबंदीमुळेच झालंय. म्हणून कुणाकुणाच्या पोटात दुखतंय. हा एकमेव फायदा सुद्धा इतर साऱ्या तोट्यांना पुरून उरेल.

आ.न.,
-गा.पै.

ट्रेड मार्क's picture

12 Apr 2019 - 6:07 am | ट्रेड मार्क

माझा मुद्दा हा आहे की ही योजनेचे जे लक्श होत ते साध्य झालेल नाही आहे

हे फारच लवकर निष्कर्ष काढणे नाही का? मुळात योजना चांगली आहे का हे सांगा. योजना नुसती जाहीर करून फायदा किंवा पैसे मात्र दुसऱ्याच जागी असं झालंय का?

जर योजना चांगली आहे आणि त्यात भ्रष्टाचार सुद्धा झालेला दिसत नाहीये तर मग ती सगळ्यांना सांगायला काय हरकत आहे? त्याचं एवढं पोस्टमॉर्टेम करायची काय गरज आहे? तुम्ही आधी जी शेती करत होतात त्याचंच उत्पन्न दुप्पट झालंय का हा प्रश्न कितीसा योग्य आहे? शेती तेवढीच, पीक थोडं दरवर्षी कमीजास्त येणार मग उत्पन्न फक्त दुप्पट त्याच शेतीतून व्हावं अशी अपेक्षा का? म्हणजे जर त्या उत्पादनाचा शेतकऱ्याला मिळणार भाव दुप्पट झाला तर आपल्याला चालेल का?

म्हणजे तुम्हाला निदान सिलेंडर रिफीलींगचा मुद्दा मान्य आहे असे दिसते. तर या योजनेतील त्रुटी दुर केल्या पाहिजेत. तो पर्यंत जाहिरात बाजी न केल्यास ते योग्य राहील.

मुद्दा मला फारसा मान्य नाहीये. माझं म्हणणं आहे की अजूनही हे लोक पारंपरिक इंधन वापरत होते ही गोष्ट चांगली होती का? ते बदलण्याचा तर प्रयत्न होतोय. काही लोक थोडे मागे पडत असतील पण म्हणून सगळ्यांनाच वंचित ठेवायचे हे योग्य आहे का?

डिमोचा मुळ उद्देश सफल झाला आहे असे दिसुन येत नाही आहे.

खरेसाहेबांनी सांगितलंच आहे. मीही एक मुद्दा जोडतो. बेफामपणे कर्ज दिल्याने आणि माफ केल्याने बँकांमध्ये सुद्धा रोखीचा तुटवडा निर्माण झाला होता. युपीए सरकारने २००४ ते २०१३ या काळात ३६ लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटले त्यातले बरेच कर्ज माफ केले किंवा रिशेड्युल केले. मोदी आले तेव्हा कदाचित बँकांची स्थिती एवढे वाईट होती की प्रायव्हेटच नव्हे तर सरकारी ब्यांक सुद्धा कधीही बंद पडल्या असत्या. या ब्यांकांत कुठून पैसे ओतायचे? उद्या तुम्ही ब्यांकेत १ लाख रुपये रोख काढायला गेलात आणि ब्यांकेने रोख पैसे नाहीत म्हणून सांगितलं तर? आधी दिलेली बातमी बायस वाटत असेल तर काँग्रेसच्या लाडक्या रघुराम राजन यांनी सांगितलेलं बघा.

मी आधी म्हणलंय तसं एक एक कृती व योजना न बघता संपूर्ण चित्र बघायला पाहिजे. अगदी सफल नाही झाली असं म्हणलं तर मग अजून काही ठराविक लोकच का ओरडत आहेत? ज्या गरीब लोकांना त्रास झाला असं म्हणलं जातंय ते लोक तर काहीच ओरडत नाहीयेत. तसेच ३ एक लाख शेल कंपन्यांना बंद केलं, त्याचे डायरेक्टर्स रडारखाली आले. त्याद्वारे चालणारा हवाला बंद झाला. अर्थात याचा अर्थ परत होणारच नाही असं कोणीच छातीठोक पणे सांगू शकत नाही. पण निदान रोखलं तर गेलं, आता असे परत होऊ नये म्हणून बरेच कायदे बदलले गेले, नवीन केले गेले.

तसेच फक्त लोकांचे गळे दाबलेत असं नाहीये. तर एनपीए झालेली कर्ज वसूल करण्यासाठी Insolvency and Bankruptcy Code सारखा कायदा लागू केला. यात हजारो कोटी रुपयांची वसुली झाली आहे.

पण जर भिंगच घेऊन त्रुटी काढायच्या म्हणाल्या तर काढता येतीलच. या कारवायांमुळे दुखावलेले, अडचणीत आलेले लोक असतीलच. पण आपण चोरांनी ठोकलेल्या बोंबा ऐकायच्या का नाही हे प्रत्येकाने आपलं आपलं ठरवावं.

गोंधळी's picture

15 Apr 2019 - 2:07 pm | गोंधळी

अ हो सुबोध सर डिमो. हा मुद्दा ईमोशनली खुप भारी वाटतो. पण तो व्यवहार्य आहे की नाहि हे ही बघितले पाहिजे.

हा पैसा संपूर्ण रोख रकमेच्या स्वरूपात (५०० आणि १००० च्या नोटा) होता आणि या लोकांनी हा सर्वत्र जमिनीत पुरून ठेवलेला होता. यातून या लोकांच्या संघटनांचा खर्च चालत असे. एका फटक्यात हा पैसा निरुपयोगी झाला
या लोकांनी उद्योगांना परत वेठीस धरण्याचा प्रयत्न केला परंतु उद्योगांकडे पण पैसे नव्हतेच त्यामुळे नक्षलवादी संघटनांची फार कुचंबणा झाली.

विरोधाभासि प्रतिसाद -एक गोष्ट लक्षात घ्या
नक्षलवादी काही मूर्ख नाहीत. त्यांनी पण सामान्य जनतेला वेठीस धरून त्यांच्या खात्यात पैसे जमा केलेच शिवाय लोकल कंत्राटदाराना सुद्धा दहमकावून आपली कामे केलीच तेंव्हा त्यांचा काही सगळाच्या सगळा पैसे वाया गेला असे नाही.

हा काही कायमचा उपाय नाही आहे नक्षलवादावरचा. त्याचा परिणाम कही कालावधीसाठी च राहणार आहे.

या स्थिती मुळे या जिल्हा सहकारी बँका आणि पतपेढ्या डबघाईला आल्या आहेत. कागदोपत्री पैसे आहेत पण ते संचालकांना देऊन बसल्यामुळे प्रत्यक्षात पैसे नाहीत अशी स्थिती आहे. आता भागधारकांना पैसे/ कर्ज द्यायचे तर पैसे आणायचे कुठून? यामुळे सामान्य नागरिकांमध्ये याबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे.

तेच ह्यात सर्वात जास्त नुकसान सामालेला आहे. तुम्हि हा मुद्द का विसरता कीन्य नागरिक्, लघु उद्योजक व कामगार ह्यांना झा बँका आणि पतपेढ्या ह्यात सामान्य नागरिकांचे पैसे असतात व त्या डुबल्या तर त्यात बाकि को नाहीपेक्षा सामान्यांचेच जास्त नुकसान होणार आहे.

ह्यात फक्त ब्लॅक मनी वाल्यांची कशी वाट लागली आहे ह्याच मानसिक समाधान मात्र खुप मिळाले पण व्यवहारीक फायदा काय हे ही तपासायला पाहिजे.

आकडेवारी बघितली तर सध्यातरी तो नाही झाला आहे असे दिसते.

सरकाच्या म्हण्ण्यानुसार ३लाख करोड्च्या नोटा परत येणार नाहीत असा अंदाज होता पण ०.७ म्हणजे जवळ्पास १० हजार करोड्च्या नोटा फक्त परत आल्या नाहीत.

परत नव्या नोटांसाठी ७९६५ करोड खर्च आला.

GDP जेव्हा १ टक्का वाढतो तेव्हा सधारण अर्थव्यवस्था १लाख करोड ने वाढलेली असते. त्यामुळे डिमो. च्या कळात GDP ची आकडेवारी बघितली तर किती नुकसान झाल आहे हे समजुन येईल.

त्यामुळे खुप मानसिक समाधान देणारा परंतु व्यवहारिक नसणारा निर्णय म्हणजे डिमो. असे म्हणता येईल.

सुबोध खरे's picture

15 Apr 2019 - 8:01 pm | सुबोध खरे

वेगवेगळ्या अंदाजा प्रमाणे प्रत्यक्षात अशा दुहेरी क्रमांकाच्या अतिरिक्त अशा एक लाख ते ४ लाख कोटी रुपयांच्या दुहेरी क्रमांकाच्या नोटा निर्माण केल्या गेल्या असाव्यात.

आणि ज्या आल्या नाहीत त्यात दुहेरी आणि मूळ अशा १ ते पाच लाख कोटी रुपयांच्या नोटा वाया गेल्या आहेत.

या बद्दल आपण लिहिण्याचे चातुर्याने टाळले आहे असे दिसते आहे.

या अतिरिक्त चलन फुगवट्यामुळे महागाई किती भडकली असती हे एखाद्या अर्थ तज्ज्ञाला विचारून घ्या.

(२०१४ साली ९ % असलेला महागाईचा दर २०१९ पर्यंत २. ५ % पर्यटन खाली आलेला आहे.)

गोंधळी's picture

16 Apr 2019 - 2:51 pm | गोंधळी

वेगवेगळ्या अंदाजा प्रमाणे प्रत्यक्षात अशा दुहेरी क्रमांकाच्या अतिरिक्त अशा एक लाख ते ४ लाख कोटी रुपयांच्या दुहेरी क्रमांकाच्या नोटा निर्माण केल्या गेल्या असाव्यात.

दुहेरी क्रमांकाच्या नोटांबद्दलचा रिझर्व्ह बँकेचा कूठला रिपोर्ट आहे का?

एक लाख ते ४ लाख कोटी रुपयांच्या दुहेरी क्रमांकाच्या नोटा चलनात येतात आणि रिझर्व्ह बँकेला ते कळुन येत नाही हे कस होऊ शकेल.

या दुहेरी क्रमांकाच्या नोटाच बरोबर परत आल्या नाहीत असे जर तुम्ही म्हणता याचा अर्थ ज्याने नोटा निर्माण केल्या त्या त्याच्या जवळच होत्या. त्या चलनात न्हवत्याच.

असे कोण का करेल जर त्या नोटांचा फायदा करुन घ्याय्चा असेल तर तो प्रत्यक्ष चलनात आल्यानंतरच होउ शकतो.

त्यामुळे ह्या मुद्द्यासंबंधी थोडा संभ्रम आहे.

सुबोध खरे's picture

16 Apr 2019 - 6:52 pm | सुबोध खरे

"अब्दुल करीम लाट साहेब तेलगी" या व्यक्तीने २० हजार कोटी रुपयांचे बनावट मुद्रांक कसे आणि कुणाच्या सहयोगाने तयार केले आणि ते किती वर्षे चलनात होते ते त्यांच्या नार्को टेस्ट मध्ये कुणाचे नाव आले होते, एकदा व्यवस्थित वाचून घ्या.
मग चर्चा करू.

गोंधळी's picture

17 Apr 2019 - 3:22 pm | गोंधळी

आता ह्या फेक नोटां मागचे तेलगी जो पर्यंत पकडला जात नाही तो पर्यंत निश्चित आकडेवारी क्ळुन येणार नाही.
आताही २००० च्या बनावट नोटा बर्र्यापैकी सापडत आहेत.

मला ही डिमो. चा निर्णय चांगला आहे असे वाटत होते. पण तो खरच चांगला होता का? हे कळण्यासाठी व्यवहारीक(आकडेवारीतुन- नफा/तोटा) द्य्रुष्ट्याच बघाव लागेल.

ट्रेड मार्क's picture

18 Apr 2019 - 7:41 am | ट्रेड मार्क

आम्ही एवढे कष्ट घेऊन प्रतिसाद लिहिला आणि तुम्ही चक्क दुर्लक्षच केलंत!

त्यात बँकांच्या रोख तरलतेचा एक मुद्दा मी मांडला आहे, त्यावर आपले काही विचार?

गोंधळी's picture

18 Apr 2019 - 10:39 pm | गोंधळी

डिमो. व रोख तरलतेचा किंवा एनपीए हे दोन वेगळे मुद्दे आहेत.

डिमो. मुळे डिपोजिट वाढले त्यामुळे बँकाना फायदा झाला असे जर तुमचे म्हणने असेल तर माझ्या मते ते तसे नाही आहे.
कारण बँकासाठी ते देणे(liability) असते.जर लोन ग्रोथ चांगली असेल तर त्याचा फायदा झाला असे म्हणु शकतो. पण डिमो. च्या नंतची आपल्या अर्थ व्यवस्थेची परिस्थिती पाहिली तर त्याचा फार उपयोग झाल्याचे दिसणार नाही.

लेसकॅशचा मुद्दा ही नंतर घुसवण्यात आला.

आता काय होतय कि तुम्ही सगळे आधिच्या सरकारशी तुलना करत आहात. भ्रष्टाचार नाही होत आहेना,योजना चांगली आहेना बस म्हण्जे सरकार चांगल करत आहे.
आपल्या देशात लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे योजना राबवन ही खुप मोठी अड्चण असते.

सध्याची जमीन वास्तविकता(ground reality) पाहीली तर याकडे प्रकर्षाने लक्ष पुर्वले आहे असे दिसत नाही.
त्याबद्दल्च्या सरकारच्या जाहिराती म्हणजे window dressing आहेत.

ट्रेड मार्क's picture

19 Apr 2019 - 3:14 am | ट्रेड मार्क

डिमो. मुळे डिपोजिट वाढले त्यामुळे बँकाना फायदा झाला असे जर तुमचे म्हणने असेल तर माझ्या मते ते तसे नाही आहे.

नोटा बँकेत परत आल्याने डिपॉझिट वाढले नाही पण रोख तरलता वाढली. तुमचा जरा गोंधळ झालेला दिसतोय, तुम्हाला बँकेतल्या अंतर्गत गोष्टी माहित नाही असे गृहीत धरून स्पष्ट करून सांगायचं प्रयत्न करतो.

"डिपॉझिट म्हणजे बँकासाठी ते देणे(liability) असते" हे तुम्हाला माहित आहे. बँक कशी चालते? ठेवी घेणं आणि कर्ज देणे हा बँकेचा मुख्य व्यवसाय असतो. उदा. म्हणून समजा तुम्ही बँकेत १००० रुपये ठेव ठेवली आहे, ज्यावर बँकेने ८% व्याज देणे कबूल केले आहे. मी बँकेकडे कर्ज मागितले आणि बँकेने मला ७५० रुपये कर्ज १२% व्याजाने दिले. तर हे ७०० रुपये कुठून आले? तर तुम्हीच ठेवलेल्या ठेवीतून. असे लाखो लोक ठेवी ठेवतात आणि साधारण तेवढेच कर्जही घेतात. साधारण २५-२८% तरलता ठेवली जाते जी ठेवी परत करायला आणि क्लीअरिंग वगैरे इतर व्यवहार करायला वापरली जाते.

आता तुमची ठेव ३ वर्षांची आहे आणि माझे कर्ज पण मी ३ वर्षात फेडायचे ठरले आहे. पण तुम्हाला ३ वर्षे झाल्यावर एकदम व्याजासहित पैसे मिळणार आहेत आणि मला मात्र दर महिन्याला ठराविक हप्ता भरायचा आहे. मी १ वर्ष हप्ता भरला पण नंतर मात्र गडबड केली. ३ महिन्यांच्यावर हप्ते थकल्याने बँकेने मला एनपीएमध्ये टाकले, ज्यामुळे मला २-३% अधिक व्याज लागू लागले. आता आधीच मी भरू शकत नव्हतो (किंवा भरायची इच्छा नव्हती) तेव्हा आता तर मला कारणच मिळालं. ७५० चं कर्ज आता ९०० रुपयांवर गेलं. मग एक नवीन म्यानेजर आला आणि त्याने मला एक आयडिया सांगितली. म्हणाला १००० रुपयांचं नवीन कर्ज देतो त्यातून आधीचे ९०० भरून टाका आणि १०० मधले.... मधल्या काळात रिझर्व्ह ब्यांक आणि सरकार तरलता राखण्यासाठी मदत करत राहिले.

मी आधीच ७५० चा हप्ता भरत नव्हतो तर १००० चा कुठून भरणार? होताहोता ३ वर्ष झाली माझं कर्ज १२०० च्या वर गेलं आणि एक दिवस तुम्ही ब्यांकेच्या दारात ~ १२६० (१००० + व्याज) घ्यायला उभे राहिलात. आता ब्यांकेने तुम्हाला पैसे कुठून द्यावेत? २-३ मार्ग आहेत, जसे दुसऱ्याकोणीतरी ठेवलेल्या ठेवीतून किंवा रिझर्व्ह ब्यांकेकडून परत कर्ज घेऊन अथवा दुसऱ्या ब्यांकेकडून कर्ज घेऊन. पण हे किती दिवस चालणार?

माझ्याकडे पैसे होते पण कर्ज भरायची दानत नव्हती. आणि भारतात असे लोक कल्पनेपेक्षाही जास्त आहेत. मग जर या परिस्थितीत नोटबंदी झाली असती तर मी माझ्याकडचे पैसे बाद होण्यापेक्षा बँकेत भरणे श्रेयस्कर मानले असते का नाही? भले मी माझं कर्ज नाही फेडलं असं समजा. पण कुठल्यातरी मार्गाने ते बँकेकडे द्यायलाच लागले असते ना? आता हीच रक्कम १ लाख करा बघू आणि आता सांगा पैसे काढायला आणि बदलून घ्यायला मर्यादा का ठेवली होती. तेच पैसे खात्यात भरायला मात्र नव्हती.

एक केस मी स्वतः बघितलेली आहे. २०००/१ सालातली गोष्ट असेल आमचा एक थकबाकीदार होता, चांगलं ४-५ कोटींचं कर्ज एनपीएमध्ये होतं. राजकीय वर्तुळात उठबस असलेला चांगला गब्बर माणूस होता पण काही केल्या पैसे भरत नव्हता. आम्ही आपले दर महिन्याला वसुलीसाठी भेट देऊन यायचो. एकदा वैतागून आम्हाला घरात एका खोलीकडे घेऊन गेला. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण दार उघडलं तर चक्क खोलीभरून नोटा होत्या. म्हणाला एकरकमी भरू शकतो पण भरणार नाही. का तर पहिली गोष्ट म्हणजे भरायची गरज नाही आणि दुसरं म्हणजे समजा ऑडिटमध्ये निघालं तर आयकर विभाग मागे लागू शकेल. म्हणजे थोडक्यात काय तर कोट्यवधी रुपयांच्या नोटा बाळगून होता, बँकेकडून कर्जही घेतलं होतं. पण कर्जफेड करणार नाही कारण कोणी काही वाकडं करू शकत नाही. आणि खरंच ब्यांक काहीच करू शकली नाही. पुढे बँक अडचणीत येऊन बंद पडली. आता नोटबंदी झाली असती तर याच माणसाने काय केलं असतं, तुम्हीच सांगा. अश्याच अजून लोक बँकांना कसे लुबाडतात याच्या बऱ्याच केसेस मी तुम्हाला सांगू शकतो.

गोंधळी's picture

19 Apr 2019 - 11:40 am | गोंधळी

रोख तरलता वाढली हा मुद्दा मान्य आहे.

हे तुम्हाला माहित आहे. बँक कशी चालते? ठेवी घेणं आणि कर्ज देणे हा बँकेचा मुख्य व्यवसाय असतो

मला म्हणायच आहे कि नुसती रोख बँकेकडे येउन बँक फायद्यात येणार नाही तर त्या रोख्तेचा उप्योग कर्ज वितरणासाठी केल्यास त्यातुन फायदा होतो.

डिमो नंतर कर्ज वितरणा चा वेग मंदावल्याचे कळुन येते.

https://www.bloombergquint.com/business/loan-growth-slows-to-a-crawl-in-...

https://www.livemint.com/Opinion/j6FWY6uYX5sGxcqW4WR1dN/How-demonetisati...

ट्रेड मार्क's picture

19 Apr 2019 - 9:04 pm | ट्रेड मार्क

इथे वाटल्या गेलेल्या कर्जाच्या वसुलीचे वांधे होते, तिथे अजून कर्ज वाटत का फिरावं? ब्यांकेत ठेवलेल्या स्वतःच्याच ठेवी परत घ्यायला आलेल्या लोकांना द्यायला पैसे नव्हते हा मुद्दा आहे. त्याची सोय कुठून करायची? नुसत्या नोटा छापून?

जुन्या नोटा वापरून कर्जफेड करण्यासाठी सरकारने पण मुदत दिली आणि लोकांनी सुद्धा त्याला प्रतिसाद दिला. तसेच छोट्या व्यावसायिकांना मुद्रा योजनेद्वारे बरीच कर्जे वाटली गेली.

तुम्ही कधी अनुभव घेतला असेल तर छोट्या स्टार्टअप किंवा उद्योगांसाठी कर्ज द्यायला बँका दारातही उभं करायच्या नाहीत. अगदी आपलं लाडकं उदा. घेतलं ते म्हणजे भज्यांची गाडी लावायची असेल तर ब्यांक कर्ज द्यायची का? ३ वर्षांचे टॅक्स रिटर्न आणा, गॅरेंटर आणा, कोलॅटरल आणा आणि तरी वर अव्वाच्यासव्वा व्याज भरा अशी परिस्थिती होती. त्याउलट मोठे व्यावसायिक मात्र त्यांच्या कॉन्टॅक्टस आणि वजनाच्या जोरावर पाहिजे तितके कर्ज मिळवून जायचे. तुम्ही जर कोणा बँकेतल्या अनुभवी व्यक्तीला विचारलेत तर छोटे कर्ज घेणारे अगदी नेमाने हप्ते भरतात आणि त्या उलट बहुतेक "मोठे" व्यावसायिक टाळाटाळ करतात. दुसरं म्हणजे एकाच माणसाला १ कोटी कर्ज देण्यापेक्षा १०० लोकांना प्रत्येकी १ लाख कर्ज देणे सोयीस्कर असते. कारण एक कोटीवाला डिफॉल्टर झाला तर सगळे पैसे बुडतील. पण १०० पैकी अगदी ५० लोक डिफॉल्टर झाले तरी ५० लाख तर परत येतील.

गोंधळी's picture

20 Apr 2019 - 8:25 pm | गोंधळी

आता याबाबत जगभरातील तज्ज्ञांमध्ये एकमत आहे की या घोडचुकीचा नकारात्मक परिणाम छोटे व्यावसायिक, कामगार आणि शेतकरी यांच्यावर मोठ्या प्रमाणात झाला आणि श्रीमंतांना मात्र त्याची अजिबात झळ लागली नाही.

असे हे अर्थतज्ज्ञ सांगत आहेत.

https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/conflict-of-ec...

तुम्ही कधी अनुभव घेतला असेल तर छोट्या स्टार्टअप किंवा उद्योगांसाठी कर्ज द्यायला बँका दारातही उभं करायच्या नाहीत. अगदी आपलं लाडकं उदा. घेतलं ते म्हणजे भज्यांची गाडी लावायची असेल तर ब्यांक कर्ज द्यायची का?
हा मुद्दाबरोबर आहे.

पण बरीच कर्ज वाटली म्हणजे योजना यशस्वी झाली का?
तर जेव्हा मुद्रा योजने अंतर्गत जी कर्ज वाटली आहेत. त्याची जास्तीत जास्त परत्फेड होईल तेव्हा यशस्वी झाली अस म्हणता येईल.
सध्या बँकर्सचा या बाबत च मत निगेटीव्ह आहे.

ट्रेड मार्क's picture

21 Apr 2019 - 5:37 am | ट्रेड मार्क

तुम्ही दिलेल्या लेखातील पहिलाच परिच्छेद म्हणतोय, "आर्थिक धोरणांतील चुका बहुधा अल्प अथवा मध्यम कालावधीसाठी अडचणी निर्माण करतात. त्याहून मोठी, दीर्घकालीन चिंतेची बाब म्हणजे, काही गट देशात दुही निर्माण करण्यासाठी करत असलेला प्रचार ही आहे..."

टीका करणारे हेच अर्थतज्ज्ञ उपाय काय करायला पाहिजे होता हे मात्र सांगत नाहीत. बाहेरचे तर जाऊच दे, पण मिपावरचे सुद्धा कितीतरी अर्थतज्ज्ञ एक मस्त प्लॅन द्या म्हणल्यावर गायब झालेले आहेत. तुम्ही देताय?

अनियमित आणि अनियंत्रित उद्योग तसेच अवैध धंदे करणाऱ्यांना त्रास तर होणारच होता. बाकी छोटे व्यावसायिक कसे अडचणीत आले? उदा. बहुतेक भाजीवाल्यांनी सुद्धा ऑनलाईन पेमेंट स्वीकारायला सुरुवात तेव्हाच केली होती. सामान्य नागरिकांनी आणि छोट्या व्यावसायिकांनी ३ महिने त्रास सहन केला त्याला कोणीच नाही म्हणत नाहीये. पण अजून त्रास आहे का हा मुद्दा आहे. तुम्हीही बडे उद्योगपती नसावेत अशी आशा करतो. तुम्हाला वैयक्तिकरित्या तेव्हा काय त्रास झाला आणि अजून काय त्रास होतोय हे सांगा बघू.

तुम्हाला पुण्याची माहिती असेल तर गार्डन वडापाव माहित असेल. तो एवढा प्रसिद्ध आहे की दर दिवशी निदान २००० लोक तरी वडापाव खातात. म्हणजे दिवसाचे उत्पन्न तीसेक हजार रुपये असेल. हे त्याच्या एका गाडीवरचा कलेक्शन आहे. हा कुठले कुठले कर भरत असेल? बऱ्याचदा त्याच्यावर आयकरविभागाने धाड टाकली आहे. नोटबंदीच्या आधी मोदींचे गोडवे गाणारे इंजिनवाले नेते अचानक नंतर कट्टर विरोधी कसे झाले? बारामतीकरच काय पण झाडून सगळे नेते कसे टोकाचा विरोध करू लागले? मुलायम आणि मायावती मधून विस्तव जात नव्हता ते आता एका स्टेजवर आले.

मुद्रा योजनेचं पुढे काय होतंय ते कळेलच. पण जर लोकांची घेतलेलं कर्ज फेडण्याची दानत नसेल तर अवघड आहे. लोकांना ७२००० रुपये दरवर्षी फुकट वाटणेच बरे असं म्हणायला लागेल.

गोंधळी's picture

22 Apr 2019 - 11:55 am | गोंधळी

टीका करणारे हेच अर्थतज्ज्ञ उपाय काय करायला पाहिजे होता हे मात्र सांगत नाहीत. बाहेरचे तर जाऊच दे, पण मिपावरचे सुद्धा कितीतरी अर्थतज्ज्ञ एक मस्त प्लॅन द्या म्हणल्यावर गायब झालेले आहेत. तुम्ही देताय?

हा तुमचा प्रतिसाद बरोबर वाटत नाही. क्रुपया चुकिचे मुद्दे उपस्थित करु नका. असे निर्णय सरकार घेत अस्ते. त्यात काय चुक असेल तर ती दाखवुन देणे, त्याचे योग्य विश्लेषन होणे गरजेचे अस्ते.

बहुतेक भाजीवाल्यांनी सुद्धा ऑनलाईन पेमेंट स्वीकारायला सुरुवात तेव्हाच केली होती
????????

तुम्हाला पुण्याची माहिती असेल तर गार्डन वडापाव माहित असेल. तो एवढा प्रसिद्ध आहे की दर दिवशी निदान २००० लोक तरी वडापाव खातात. म्हणजे दिवसाचे उत्पन्न तीसेक हजार रुपये असेल. हे त्याच्या एका गाडीवरचा कलेक्शन आहे. हा कुठले कुठले कर भरत असेल? बऱ्याचदा त्याच्यावर आयकरविभागाने धाड टाकली आहे

हे बघा डिमो. नंतर आयकरविभागाने धाडी टाकल्या त्यात किती काळा पैसा जप्त केला त्याची आकडेवारी जर कळाली तर बर होईल.
म्हणजे जमा/खर्च किती झाला हे बघता येईल.

मुद्रा योजनेचं पुढे काय होतंय ते कळेलच. पण जर लोकांची घेतलेलं कर्ज फेडण्याची दानत नसेल तर अवघड आहे

हाच मुद्दा आहे.

हे बघा सध्याची परिस्थीती बघता पाकिस्तान व आतंकवाद हे सर्वात मोठे प्रश्न आहेत. त्यामुळे बाकिच्या छोट्या मुद्द्यांना महत्त्व देण्याची गरज आहे असे मला वाटत नाही.

ट्रेड मार्क's picture

27 Apr 2019 - 5:16 am | ट्रेड मार्क

हा तुमचा प्रतिसाद बरोबर वाटत नाही. क्रुपया चुकिचे मुद्दे उपस्थित करु नका. असे निर्णय सरकार घेत अस्ते. त्यात काय चुक असेल तर ती दाखवुन देणे, त्याचे योग्य विश्लेषन होणे गरजेचे अस्ते.

अपेक्षितच होतं! प्लॅन द्या म्हणल्यावर... असो. अंमलबजावणीत गडबड झाली ती मान्य केली आहेच. विश्लेषण आणि त्यामागची कारणे इथेच वर आणि नोटबंदीच्या इतर धाग्यांवर सविस्तरपणे मांडलेली आहेत. पण जर बँकांकडे किती नोटा परत आल्या हाच यशस्वितेचा एकमेव निकष असेल तर मग नोटबंदी फेल झाली असं म्हणावं लागेल.

????????

???????? तुमच्या भाजीवाल्यानी नव्हती केली का????????

हे बघा सध्याची परिस्थीती बघता पाकिस्तान व आतंकवाद हे सर्वात मोठे प्रश्न आहेत. त्यामुळे बाकिच्या छोट्या मुद्द्यांना महत्त्व देण्याची गरज आहे असे मला वाटत नाही.

बरं राहिलं मग. मुद्दा तुम्हीच काढलात म्हणून पुढे प्रतिसाद आले. तसं फुकटचे मिळणारे ७२००० पण कित्येक लोकांसमोरचा महत्वाचा प्रश्न आहे हे विसरून चालणार नाही. जे यासाठी पात्र आहेत अश्या गरिबांपेक्षा मधल्यामध्ये पैसे उडवण्याच्या कलेत वाकबगार असणाऱ्यांना (आणि गेल्या ४-५ वर्षात ज्यांना अश्या संधी मिळाल्या नाहीत अश्यांना) कोण निवडून येणार हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे. कदाचित आत्तापर्यंत विभाग पाडून त्याचा लिलाव सुद्धा झाला असेल.

अडीच वर्ष होत आली नोटबंदीला, जे काही परिणाम व्हायचे होते ते बहुतेक होऊन गेले. परत मोदी पंप्र होतील का नाही ते माहित नाही. मला तर वाटायला लागलंय की मोदी नकोच, पण चुकूनमाकून झाले तरी परत नोटबंदी करायची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे उगी राहावे.

गोंधळी's picture

27 Apr 2019 - 4:44 pm | गोंधळी

अपेक्षितच होतं! प्लॅन द्या म्हणल्यावर...

ओ तुमचे मोदी दुसर्या कुणाच ऐकताततरी का?

???????? तुमच्या भाजीवाल्यानी नव्हती केली का????????

तुमच्या भाजीवाल्याचा reality check व्हायला हवा.

सध्या पं. प्र. त्यांनी ज्या काहि योजना सुरु केल्या होत्या त्याबद्दल काहिच का बोलत नाहित. फक्त पुलावामा हा एकच मुद्दा असतो त्यांचा.

असो तर मला प्रामाणिकपणे असे वाटते की कोणीही सत्तेवर आले तरी आपल्या देशाच्या परिस्थितीत खुप मोठा बदल होईल असे वाट्त नाही.
लोकशाही अंतर्गतच दुसर्या मॉडेलचा विचार व्हायला हवा जिथे फक्त समाजकारणाला महत्व् असावे व राजकारणाला वाव नसावा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Apr 2019 - 4:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

लोकशाही अंतर्गतच दुसर्या मॉडेलचा विचार व्हायला हवा जिथे फक्त समाजकारणाला महत्व् असावे व राजकारणाला वाव नसावा.

लोकशाही हीच मुळात राजकारणाची एक पद्धत आहे... तर मग तिच्यासाठी राजकारणविरहित मॉडेल कसे बनवणार ?!

ट्रेड मार्क's picture

29 Apr 2019 - 2:26 am | ट्रेड मार्क

ओ तुमचे मोदी दुसर्या कुणाच ऐकताततरी का?

दुसऱ्या कोणाचं म्हणजे कोणाचं? आणि कशाला ऐकावं? त्यांना पाहिजे असेल त्यांचं ते ऐकतील.

सध्या पं. प्र. त्यांनी ज्या काहि योजना सुरु केल्या होत्या त्याबद्दल काहिच का बोलत नाहित. फक्त पुलावामा हा एकच मुद्दा असतो त्यांचा.

किती भाषणं ऐकलीत? मी जी ऐकली त्यात तरी किती विद्युतीकरण झालं, किती घरात स्वयंपाकाचा गॅस पोचवला, जनधन, मुद्रा योजना, जलमार्ग वाहतूक, रस्ते बांधणी, रेल्वेतल्या सुधारणा, स्वच्छ भारत, आयुष्मान भारत, गरीब शेतकऱ्यांना ६००० रुपये या सगळ्यांबद्दल बोलले होते.

बादवे मोदी बालाकोट बद्दल बोलतात पुलवामाबद्दल काँग्रेसी बोलतात. तर मोदी बालाकोटवर पण बोललेच आणि का बोलू नये? गेली काही दशके दहशतवादी कारवाया नुसत्या सीमेवरच नाही तर अगदी राजधानीतसुद्धा झाल्या. कोणी अशी हिम्मत केली होती का? पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन इतकी मोठी कारवाई केली आणि त्यातून जगातील दुसरा कुठलाही देश भारताच्या विरुद्ध बोलला नाही. हे राजनीती आणि कूटनीतीचे यश आहेच.

असो तर मला प्रामाणिकपणे असे वाटते की कोणीही सत्तेवर आले तरी आपल्या देशाच्या परिस्थितीत खुप मोठा बदल होईल असे वाट्त नाही.

असे बदल घडायला जनतेचा पण तेवढाच सहभाग लागतो. आता स्वच्छ भारत योजना घ्या, १३० कोटी लोक जर कचरा रस्त्यांवर टाकत राहिले तर सफाई करणारे किती पुरे पडणार? सरकारने शौचालयं बांधून काय होणार? आम्हाला रेल्वे रुळावर बसल्याशिवाय होतंच नाही असे लोक म्हणत राहिले तर कशी स्वच्छता राहणार?

असो. आमचे मोदी म्हणून तुम्ही गट बनवलेच आहेत. त्यामुळे मी कितीही सांगितलं तरी तुम्हाला पटणार नाही.

गोंधळी's picture

29 Apr 2019 - 7:01 pm | गोंधळी

किती भाषणं ऐकलीत? मी जी ऐकली त्यात तरी किती विद्युतीकरण झालं, किती घरात स्वयंपाकाचा गॅस पोचवला, जनधन, मुद्रा योजना, जलमार्ग वाहतूक, रस्ते बांधणी, रेल्वेतल्या सुधारणा, स्वच्छ भारत, आयुष्मान भारत, गरीब शेतकऱ्यांना ६००० रुपये या सगळ्यांबद्दल बोलले होते.

या सगळ्या योजनांचा reality check बघा जरा. तुम्ही फक्त घोषणांवर समधानी आहात.

टीका करणारे हेच अर्थतज्ज्ञ उपाय काय करायला पाहिजे होता हे मात्र सांगत नाहीत. बाहेरचे तर जाऊच दे, पण मिपावरचे सुद्धा कितीतरी अर्थतज्ज्ञ एक मस्त प्लॅन द्या म्हणल्यावर गायब झालेले आहेत. तुम्ही देताय?
आणि
दुसऱ्या कोणाचं म्हणजे कोणाचं? आणि कशाला ऐकावं? त्यांना पाहिजे असेल त्यांचं ते ऐकतील

ओ कशाला पलटी मारताय.

असे बदल घडायला जनतेचा पण तेवढाच सहभाग लागतो. आता स्वच्छ भारत योजना घ्या, १३० कोटी लोक जर कचरा रस्त्यांवर टाकत राहिले तर सफाई करणारे किती पुरे पडणार? सरकारने शौचालयं बांधून काय होणार? आम्हाला रेल्वे रुळावर बसल्याशिवाय होतंच नाही असे लोक म्हणत राहिले तर कशी स्वच्छता राहणार?

क्रुपया चुकीचे मुद्दे आणू नका ओ. कुठली १३० कोटी लोक कचरा रस्त्यांवर टाकतात आणि कोनाला रेल्वे रुळावर बसल्याशिवाय होतंच नाही.

बालाकोटच्या कारवाईत नक्की किती दहशतवादी ठार झाले ???

मुद्दा हा आहे की आधीच जे सरकार होत त्यांच्या करभाराला जनता कंटाळली होती. आताच्या सरकारने त्यावेळी मोठी आश्वासन देत जे कॅम्पेन केल होत त्यावरुन जनतेने त्यांना बहुमत दिल. पण ती आश्वासन पुर्ण झालेली दिसत नाहीत. त्याऐवजी जाहीरती करण्यात समाधान मानल.

आपल्या देशातील जनता भावनोद्दीपक आहे. त्यामुळे महत्वाचे मुद्दे सोडुन दिले जातात. फक्त भावनीक मुद्द्यांभोवती राजकारण फिरवल जात. म्हणुन लोकशाही अंतर्गतच दुसर्या मॉडेलचा विचार व्हायला हवा जिथे फक्त समाजकारणाला महत्व् असावे व राजकारणाला वाव नसावा असे म्हटले होते.

लोकशाही व्यवस्थेत समाजकारणाचे मुद्दे अग्रगण्य असावे अशीच अपेक्षा आहे. पण त्याकरता कायदा/घटनादुरुस्ती वगैरे करुन दुसरं एखादं मॉडेल जोडण्याची गरज नाहि, आणि त्याचा काहि उपयोग देखील नाहि. सचेतन समाज हाच त्यावर उपाय आहे.

डँबिस००७'s picture

16 Apr 2019 - 11:58 pm | डँबिस००७

डि मो च्या निर्णया विरुद्द बोलणारे एक्सपर्ट्स डि मो शिवाय सरकार कडे दुसरा काय पर्याय होता ह्याची चर्चा करताना कधीही दिसत नाहीत ! डि मो ची परिस्थीती का आली ह्याची सुद्धा चर्चा होत नाही. चर्चा फक्त सरकारला घेरण्यासाठी डि मो च्या अंमलबजावणीत झालेल्या चुकी बद्दल जास्तच बोलले जाते. त्यातही कसे चांगले योजन करता आले असते ह्याची चर्चा नाहीच !!

दुसर्याच्या चुकीवर बोट दाखवणे सोप्पे असते. जर सरकारला काहीच कळत नाही मग समाजाच्या सर्व स्तरांना स्पर्श करणार्या योजना आखल्या व यशस्वी अंमलबजावणी कशी केली ?

विनोद१८'s picture

11 Apr 2019 - 12:04 am | विनोद१८

सुदैवाने भारतिय मतदार सुज्ञ आहे तो योग्य तोच निर्णय घेइल.

ममता नावाला शिल्लक नसलेली ही बाई आता चुनाव आयोग बरोबर वाद घलायला तयार झाली आहे , कस क़ाय ते बंगाली लोक असल्या काजग , भांडखोर बैला डोक्यावर घेतात तेच कळत नाही .
चुनाव आयोगा ने चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करायला सांगितले म्हणून चुनाव आयोगालाच जाब विचारत आहे .
रागा , ममता आणि तोंडातल्या तोंडात गुडरअळकपळक अस न समजणाऱ शब्द बोलणारे काका या पैकी कोणीतरी पंतप्रधान झाले तर हा देश मी सोडून जाईन .

ता . बा - टी एम सी देशाचे नेतृत्व करायला तैयार आहे - इति ममता ,
भाजप ला हरवीणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे - इति काका :)

ममता नावाला शिल्लक नसलेली ही बाई आता चुनाव आयोग बरोबर वाद घलायला तयार झाली आहे , कस क़ाय ते बंगाली लोक असल्या काजग , भांडखोर बैला डोक्यावर घेतात तेच कळत नाही .
चुनाव आयोगा ने चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करायला सांगितले म्हणून चुनाव आयोगालाच जाब विचारत आहे .
रागा , ममता आणि तोंडातल्या तोंडात गुडरअळकपळक अस न समजणाऱ शब्द बोलणारे काका या पैकी कोणीतरी पंतप्रधान झाले तर हा देश मी सोडून जाईन .

ता . बा - टी एम सी देशाचे नेतृत्व करायला तैयार आहे - इति ममता ,
भाजप ला हरवीणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे - इति काका :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Apr 2019 - 11:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राज ठाकरे साहेबांचं कालचं भाषण एकदम जबरा. त्यांची व्यंगचित्रे आणि भाषण नंबर एक असतं.

बाकी चालू द्या.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Apr 2019 - 11:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

https://www.youtube.com/watch?v=VuUZHP4iskk

-दिलीप बिरुटे

डँबिस००७'s picture

8 Apr 2019 - 3:04 am | डँबिस००७

"जाकीटा"मागील जळजळ

मोदींनी देशाला उद्देशून परवा जी घोषणा केली त्यानंतर नेहरूंच्या किळसवाण्या आरत्या सुरू झाल्या. त्यामुळे नेहरू ह्या नावाची प्रचंड खिल्ली उडवण्यात आली. अजूनही सुरूच आहे.

मोदींनी दाखवलेल्या इच्छाशक्तीला श्रेय नाकारून ते नेहरूंना देण्यात अनेक नमोरुग्णांमध्ये स्पर्धा सुरू झाली.सोशल मीडियावर सुद्धा नेहरूनर्तक कथ्थक करू लागले.

त्याच दिवशी रात्री मला एक जुनी गोष्ट समजली जी मी पहिल्यांदा ऐकली होती. आपल्यापैकीही अनेकांना ती बहुधा माहिती नसेल. नव्या पिढीला तर माहीत असणे अशक्य आहे.

नेहरू हा माणूस लोकशाहीप्रेमी, पुरोगामी, उदारमतवादी,अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खंदा पुरस्कर्ता म्हणून प्रसिद्ध आहे. किंबहुना त्यांची तशी प्रतिमा काळजीपूर्वक बनवली गेली. त्यावेळच्या सगळ्या पेंटरबाबूंनी छान काम केले आहे. त्यांच्या आयुष्यातील काही घटना त्या प्रतिमेला छेद देऊन जातात. अतिशय अहंकारी,असहिष्णू आणि क्षुद्र मनाचा माणूस अशीही त्यांची एक ओळख आहे.

खाली मी एक शेर उद्धृत करतो,

मन में जहर डॉलर के बसा के
फिरती है भारत की अहिंसा
खादी के केंचुल को पहनकर
ये केंचुल लहराने न पाए
अमन का झंडा इस धरती पर
किसने कहा लहराने न पाए
ये भी कोई हिटलर का है चेला
मार लो साथ जाने न पाए
कॉमनवेल्थ का दास है नेहरू
मार ले साथी जाने न पाए

ही कविता केली आहे विख्यात शायर मजरूह सुलतानपुरी यांनी. त्यांच्या मनात नेहरूंबद्दल किती राग आहे ते वेगळे सांगत नाही. त्या कवितेतील शब्दच पुरेसे आहेत.

भारताच्या पंतप्रधानांना हिटलर म्हणून जरा याआधी कुणी संबोधले असेल तर ते मजरुह यांनी.

या कवितेबद्दल त्यांना मोरारजी देसाई यांनी अटक करून तुरुंगात टाकले होते.एक वर्ष मशहुर मजरुह गजाआड होते.

नेहरूनर्तकांच्या जीव की प्राण असलेल्या, कबुतरे उडवणाऱ्या या नेत्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कशी गळचेपी केली होती यांचे हे धडधडीत उदाहरण आहे. त्या माणसाला टीका अजिबात सहन होत नसे.ज्यांनी ज्यांनी त्यांच्यावर टीका केली त्यांच्याशी ते अतिशय वाईट वागले असे तटस्थ इतिहासतज्ञ सांगतात.

त्यांच्या तुलनेत मोदी हे खूपच सहिष्णू आहेत.अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन केलेली टीका त्यांनी दुर्लक्षित केली असून स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रीत केले आहे. जर नेहरूंइतकी असहिष्णुता मोदींच्या अंगी असती तर तिहार जेल अशा अनेक मजरूहांनी भरून गेले असते.

फसलेली आर्थिक नीती, पराभूत परदेश नीती आणि कायमचा चिघळलेला काश्मीर प्रश्न यांची जबाबदारी नेहरूंवर जाते. त्यांचे प्रमाणाबाहेर आणि वाजवीपेक्षा जास्त कौतुक करण्याचे निलाजरे प्रयत्न सुरू आहेत.

त्या पार्श्वभूमीवर ही बातमी मला पहिल्यांदाच कळली ती लगेच शेअर करावीशी वाटली. अनेकांना ही गोष्ट माहीतही नसेल.विशेषतः तरुण पिढीला नेहरूंची ही काळी बाजू कळावी म्हणून अकाली सुरू झालेल्या पंडितोत्सवात मुद्दामहून विरजण टाकत आहे.

मजरुहला नेहरूंनी तुरुंगात टाकले तर किशोरवर इंदिरा गांधी यांनी बॅन घातला. आरडी वाचला...

असली ही दळभद्री हुकूमशाही वृत्तीची फॅमिली. ही फॅमिली परत कधीही सत्तेवर येणार नाही असे आत्मविश्वासपूर्ण विधान आज नरेंद्र मोदी यांनी रिपब्लिकला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. ते तुमच्या आमच्या भरवशावर केले आहे.

उतरवणार ना त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात ?

#फिरएकबारमोदीसरकार..

आनंद देवधर
२९/०३/२०१९

जगप्रसिद्ध नेहरू जाकीटाआड दडलेली जळजळ जर तुम्हाला लोकांपर्यंत पोचवायची असेल तर ही पोस्ट तुम्ही भरपूर शेअर करा.

स्वामि १'s picture

8 Apr 2019 - 4:04 pm | स्वामि १

भारतीय जनता सकक्षम नसल्याने देश हळूहळू हुकुमशाही कडे जात आहे असे वाटते

भंकस बाबा's picture

8 Apr 2019 - 4:39 pm | भंकस बाबा

सोइस्कर अर्थ तुम्ही शांतिप्रिय धर्माचे लांगुलचालन, अब्जोचे आर्थिक घोटाळे, तुकडे गैंगला समर्थन, काश्मीरला पाकिस्तानधार्जिनी स्वायतत्ता असा घेतला असे वाटते.

डँबिस००७'s picture

8 Apr 2019 - 10:28 am | डँबिस००७

अमर्त्यसेन हा मोदी सरकार विरुद्ध उघड बोलणार्या माणसाच खर बॅकग्राउंड !

Strange saga of Amartya Sen and the Rothschilds
_Arvind Kumar_
*The Sunday Guardian*
April 6, 2019, 9:05 PM

_'Rothschilds & Co funds units of ‘civil society’ in India that control narrative on ‘human rights violations’._

Amartya Sen has become hyperactive in attacking policies that benefit the people of India, but one fact he has been shy of disclosing during his attacks is his apparent conflict of interest by virtue of marrying Emma Rothschild, one of the heiresses of the world’s wealthiest family. The family have made money off India and the Indian government. The assets of the Rothschilds are estimated to be worth at least US$400 billion and the family has a reputation of enriching itself by finding opportunity even on growing misery around the world. The Rothschild family has a history of manipulating stock markets, funding world wars, engineering large scale decisions in their favour, exercising significant control over the banking system, and owning large media outlets to influence public opinion in their favour. Amartya Sen, of course, is the apostle of poverty.

The family business of Amartya Sen’s family on wife’s side, NM Rothschild & Sons, is seen as having made tremendous amounts of money during the United Progressive Alliance regime between 2004 and 2014, even as Sen’s blue-eyed-boy, Jean Dreze was a key member of Sonia Gandhi’s National Advisory Council. The connection between Amartya Sen and his family’s business is not merely a tenuous one. On the contrary, Sen’s father-in-law himself, Nathaniel Mayer Victor Rothschild, 3rd Baron Rothschild, was part of the management of NM Rothschild & Sons. Victor’s cousin, Lynn Forester de Rothschild, owns a significant stake in the Economist magazine, which explains the magazine’s constant barbs against the Hindu community even as they support Sonia Gandhi and prop up Amartya Sen’s economic ideas.

One deal that is regarded as benefiting NM Rothschild & Sons during the UPA rule involves the e-auction of 3G spectrum. The firm had been chosen to conduct the e-auction even though they had never been known as a computer software firm. The firm pocketed Rs 30.5 crore for conducting the auction and this must be considered as a gift by the UPA government. It is not clear why there was a need for an e-auction when there were only a handful of participants in the bidding process. The most questionable aspect of this whole episode was that the Rothschilds were not a neutral third party, but had been retained by Aircel, which was looking for a buyer for their towers that were eventually sold for $1.8 billion. Of course, none of this has been probed even after 2014.

Today, several firms that involved NM Rothschild & Sons to swing deals during the UPA era are embroiled in financial scams. Apart from Aircel, which is caught up in the Aircel-Maxis scam, NM Rothschild was also involved in Vedanta’s purchase of Cairn India, Kingfisher Airlines taking over Air Deccan, and the promoters of Venkateswara Hatcheries acquiring the English Premier League football club, Blackburn Rovers. Each of these firms has come under the scanner of the authorities. Venkateswara Hatcheries was raided by the income tax sleuths after suspicions about transactions related to movements of huge amounts of cash in the wake of demonetisation. For this reason, Amartya Sen’s criticism of demonetisation may contain more than meets the eye.

A few months ago, it was determined that Rothschild Bank AG and one of its subsidiaries may have violated money laundering rules in the multi-billion-dollar 1MDB corruption case in Malaysia. This background of Rothschild Bank is combined with the fact that mergers and acquisitions, especially those spanning multiple international jurisdictions, readily lend themselves to allegations of being vehicles for money laundering through arbitrary valuation of the firm being acquired. As a definitive conclusion cannot be reached without a comprehensive inquiry, there is a need to investigate NM Rothschild activities in India and determine whether the unusually high rate of scams among their clientele is a coincidence.

The Rothschilds have been active in a number of sectors in India including infrastructure, financial advisory, healthcare, and food processing, and when one Rothschild firm sold its share in a joint venture to Del Monte Pacific, Lynn Forester de Rothschild, CEO of EL Rothschild said, “We are delighted to have brought this company to a point where it has attracted large international players like Del Monte Pacific. This is a positive way for us to participate in the explosive economic growth of India.” Amartya Sen has not extended the same consideration towards the poorer people of India who would also want to participate in the “explosive economic growth of India”. Instead, he has ranted and raved against policies that would allow Indians to participate in their own economy, and along with his protégés in the National Advisory Council of the UPA government, he has ensured that Indians would only qualify as recipients of small amounts of money thrown at them as part of welfare schemes wrapped in the name of “Mahatma Gandhi”, while being prevented from actively participating as productive members of the economy and competing against his family on wife’s side, the Rothschilds.

Amartya Sen’s recent salvos on India include demands of non-interference in what he calls the “civil society”, which really translates to foreign and foreign-funded non-governmental organisations that actively interfere in Indian politics. He asks for complete freedom for the Reserve Bank of India with no oversight by the Indian people or their democratically elected representatives even as those who control the RBI take instructions from the International Monetary Fund and the World Bank. These demands may reflect his family’s priorities, as the proposal for setting up the RBI first arose during the hearings before the Indian Currency Committee in 1898 and 1899 from two members of the Rothschild clan—Alfred de Rothschild and his brother Nathan Mayer Rothschild, 1st Baron Rothschild. Both Rothschilds wanted RBI to be controlled from the West, with no oversight from the Delhi government, exactly as Amartya Sen now demands. Indian freedom fighters saw through this game of the British and defeated their efforts to create the Reserve Bank in the 1920s. The Rothschilds’ business in India goes back to a much earlier period. As far back as 1814, Nathan Mayer Rothschild, the grandfather of the two Rothschilds who provided inputs to the Currency Committee, was not only a voting member of the United Company of Merchants of England, Trading to the East Indies (also known as the East India Company), but was also among the few people eligible to be chosen as its director.

Today, Rothschild & Co funds units of the so-called “civil society” in India that control the narrative on what constitutes “human rights violations”. (Hint: Anything Hindus do is a violation of human rights unless it benefits those who wield power in America and Europe.) One organisation it funds is Prerana, which lists Asha for Education as a partner on its website. In 2002, the founder of Asha for Education, Sandeep Pandey, attended the party congress of the Naxalite group Communist Party of India (Marxist-Leninist)-Liberation and called for the unity of “revolutionary” organisations. CPI(ML)-L openly advocates an “armed revolution” and its stated objectives include the use of “illegal” methods and raising an army to wage a war against India. At their 2002 meeting, the party also honoured “comrade martyrs” or terrorists killed in action.

Like Amartya Sen, some in the UPA were aligned with the group friendly to the Naxalites and had Naxalite supporters on Sonia Gandhi’s National Advisory Council. It is fitting that the government which was based on Amartya Sen’s economic policies ended up with the same track record as his family business—a trail of deals that enriched the wealthiest people in the world at the cost of the poorer people in the country.

गामा पैलवान's picture

8 Apr 2019 - 3:38 pm | गामा पैलवान

डँबिस००७,

अगदी मर्मवेधी लेख! त्याबद्दल धन्यवाद. रॉथशील्ड्सने चेन्नईत एक अनाथालय उघडलं होतं. त्याची शुल्कबद्ध ( behind a paywall )बातमी इथे आहे. मात्र चित्रं सापडलं :

https://si.wsj.net/public/resources/images/WO-AL482_ORPHAN_P_20121019174437.jpg

म्हणे भारत स्वतंत्र झालाय! जय हो!!

आ.न.,
-गा.पै.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Apr 2019 - 11:32 am | डॉ सुहास म्हात्रे

With $79b in 2018, India tops global remittances list: World Bank

सन २०१८ मध्ये अनिवासी भारतियांनी तब्बल $७९ बिलियन (रू ५ लाख ५३ हजार कोटी) इतके परकिय चलन भारतात आणले आहे.

चर्चा करताना, अनिवासी भारतियांना, अविचारीपणे, देश सोडल्याबद्दल दोष देणार्‍यांनी ही संपूर्ण बातमी मुळातून शांतपणे जरूर वाचावी.

अभ्या..'s picture

9 Apr 2019 - 11:53 am | अभ्या..

सन २०१८ मध्ये अनिवासी भारतियांनी तब्बल $७९ बिलियन (रू ५ लाख ५३ हजार) इतके परकिय चलन भारतात आणले आहे.

करोड लिहायचे राहिले ५ लाख ५३ हजार च्या पुढे.
नुसते ५ लाख ५३ हजार एखादा वर पोचलेला एक्झिक्युटिव्ह पण आणत असेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Apr 2019 - 12:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

मुद्राराक्षसाची चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद !

बदल करवून घेतला आहे.

शाम भागवत's picture

9 Apr 2019 - 4:54 pm | शाम भागवत

हा एक शिस्तबद्ध गुन्हा आहे.

ठिकाण केरळ. कोणत्याही घरातील एखादा मुस्लीम अथवा ख्रिश्चन तरुण मजूर पासून कुक पर्यंत किंवा इंजिनियर म्हणून सुद्धा आखाती देशात नोकरी मिळवतो. आत्ता आखाती देशातील नियम बदलले आहेत. अन्यथा पूर्वी फक्त ख्रिश्चन आणि मुस्लीम लोकांनाच तिथे नोकरी करता येत असे. तर या तरुणाला नोकरी लागली कि त्याच्याकडे काही एजन्सी संपर्क साधत. त्या मुलाचा जो धर्म असेल त्याच धर्माची एजन्सी असणार.

ते त्या मुलाला आणि त्याच्या कुटुंबियांना सांगत. तुला गल्फ ला नोकरी मिळाली आहे. तिथे तुला जो पगार मिळेल तो आमच्या एजन्सीचे तिथे ऑफिस आहे तिथे जमा कर. तू जर पोस्टात किंवा बँकेत पैसे भरले तर मिळायला दोन दिवस लागतात. बँक किंवा पोस्ट दिनार ते रुपये चलन बदलण्याचे ३ ते ५ % कमिशन कापून घेते. आम्ही एक रुपया कापणार नाही. ज्या दिवशी तू पैसे भरशील त्या दिवशी जो दिनार चा रेट असेल त्याच दराने संपूर्ण पैसे तुझ्या घरी दोन तासात पोचतील. ( कल्पना करा हा तो कालखंड होता ज्यावेळी ट्रंक call बुक करून फोन लागायची दिवस दिवस वाट पहावी लागायची.) हि एजन्सी दोन तासात पैसे देण्याची हमी देत होती.

ही मुख्य सुविधा. जोडीला समजा कधी पगार उशिरा झाला तरी महिन्याला जितके पैसे येत असत तितके पैसे त्याच दिवशी दिले जात. घरातील कोणी आजारी पडले तर दवाखान्यात नेणे, कुटुंबियांच्या कडे पैसे नसतील तर पैसे खर्च करणे. ग्यास संपला असेल तर स्वतःची ओळख वापरून लगेच आणून देणे. मुलांच्या शाळेत अडमिशन साठी मदत करणे. या सगळ्या सेवा कोणतीही अपेक्षा न करता फुकट प्रदान करणे.

आता हे सगळे करणारी संतस्वरूप एजन्सीच्या या कामाचा दुसरा भाग सांगतो.

हे लोक राजकीय पक्षांच्या कडून आणि नेत्यांचा कडून काळा पैसा रोख स्वरूपात घेत. हा पैसा ते इथे त्या कामगाराच्या कुटुंबियांना देण्याच्या साठी वापरत असत. त्यातील १० % कापून घेत. बाकीची ९० % रक्कम ते लोक या कामगारांच्या कडून आखाती देशात जे पैसे परकीय चलनात वसूल करत असत. ते पैसे राजकीय पक्ष किंवा नेते अन्य देशातील ज्या खात्यात सांगतील त्या खात्यात हस्तांतरित करायचे काम करत असत. थोडक्यात भारतातील काळा पैसा हा फिजिकली भारतातच राहणार. परदेशात त्या कामगारांनी कमावलेला पैसा परकीय चलनात आपल्या देशात येणार नाही. हा परकीय चलनातील पैसा ते थेट बाहेर फिरवणार. हिंदी चित्रपटात दाखवतात तसे कोणीही पैशाने भरलेली bag घेऊन काळा पैसा घेऊन जात नसत.

*©सुजीत भोगले*

मी फक्त महत्वाचा वाटलेला मुद्दा फक्त इथे चिकटवलाय. ज्यांत कोणत्याच पक्षाची बाजू घेतलेली नाही. बाकी सर्व गाळलंय.
हे मला आलेले फॉर्वर्ड आहे व कोणतीच शहानिशा केलेली नाही. डॉ. म्हात्रेंनी दिलेल्या आकडेवारीशी संबंधीत असल्याने हा उद्योग केलाय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Apr 2019 - 5:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही लिहिलेल्या प्रकाराला "हवाला" असे म्हणतात आणि तो बेकायदेशीर/गुन्हा असतो. त्याद्वारे भारतात येणारी रक्कम अधिकृत बँकिंग प्रणालीतून येत नाही. अर्थातच, तो व्यवहार गुप्त (अळीमिळी गुपचिळी) असल्याने त्याचा नक्की आकडा मिळणे कठीण असते... केवळ अंदाज व्यक्त केला जाऊ शकतो. मात्र, तसे व्यवहार होतात यात संशय नाही. अश्या व्यवहारामुळे देशाला फायदा होत नाही, किंबहुना त्याने निर्माण होणार्‍या काळ्या पैशामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसानच होते.

खाडी देशातून भारतात येणार्‍या पैशांच्या हवाला व्यवहारात पैसे कापून घेतात हे नवीन वाचले आहे ?! हवाला हा प्रकार बेकायदेशीर असल्याने लोकांना आकर्षित करण्यासाठी त्याचा चलनबदलाचा दर (एक्सचेंज रेट) नेहमीच अधिकृत दराच्यापेक्षा जास्त ठेवला जातो. ज्यांना एनआरई अकाऊंट काढण्यात रस नसतो किंवा ज्यांच्याकडे त्यासाठी फार मोठी शिल्लक उरणारी रक्कम नसते, अश्या लोकांमध्ये हवाला जास्त लोकप्रिय आहे. त्यामुळे तो कमी पगाराची नोकरी असणार्‍या लोकांना जास्त आकर्षित करतो. ज्यांचे उत्पन्न/पगार चांगला असतो, त्यांना अधिकृत बँकिंग प्रणालीतून पैसे भारतात पाठवून, एनआरई एसबी/फिक्स्ड डिपॉझिट अकाऊंटची सोय वापरणे जास्त फायद्याचे असते. कारण, त्या अकाऊंटमधील मुद्दल व व्याज पूर्णपणे आयकरमुक्त असते व त्यांचे व्याजदर आंतरराष्ट्रिय व्याजदरांच्या तुलनेने जास्त असतात.

मी दिलेल्या बातमीतला आकडा, अधिकृत बँकिंग प्रणालीतून जाणार्‍या व अर्थातच वैध चलनव्यवहारात झालेल्या उलाढालीचा आहे. हे अधिकृत परकिय चलन देशाला आयातीची किंमत चुकविण्यास उपयोगी पडते. ते देणे चुकवून उरलेले चलन देशाची परकीय चलनाची गंगाजळी (Foreign currency reserve) म्हणून ओळखली जाते... जी, 'देशाची जागतिक अर्थव्यवस्थेतील पत' आणि 'स्थानिक चलनाची ताकद' वाढविण्यास कारणीभूत होते.

या दोन (अवैध आणि वैध) व्यवहारांत गल्लत नको.

शाम भागवत's picture

9 Apr 2019 - 7:20 pm | शाम भागवत

_/\_

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Apr 2019 - 12:53 am | डॉ सुहास म्हात्रे

हवाला हा प्रकार बेकायदेशीर असल्याने लोकांना आकर्षित करण्यासाठी त्याचा चलनबदलाचा दर (एक्सचेंज रेट) नेहमीच अधिकृत दराच्यापेक्षा जास्त ठेवला जातो. म्हणजेच, हवाला व्यवहारात अधिकृत बँकेच्या किंवा मनी चेंजरच्या दराने मिळणार्‍या रुपयांपेक्षा जास्त रुपये मिळतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Apr 2019 - 5:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

अजून थोडे...

हाच हवाला विरुद्ध दिशेने होतो तेव्हा त्याचे नियम उलटे होतात : भारतात भारतिय रुपये देऊन परदेशात परकिय चलन, स्वतः किंवा अवैध बँक खात्यात (उदा: स्विस बँकेतले "अवैध खात्यात") स्विकारले गेले तर मात्र विनिमयाचा दर अधिकृत दरापेक्षा जास्त असतो. म्हणजेच, दर डॉलरमागे अधिकृत दरापेक्षा जास्त रुपये मोजावे लागतात.

डँबिस००७'s picture

9 Apr 2019 - 11:04 pm | डँबिस००७

काल परवा दोन दिवस रेव्हेन्यु खात्याने मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ , काँग्रेसचे कर्नाटकातील व गोव्यातील आमदारांच्या सहाय्यक, जवळच्या मित्र परिवारातील लो कांच्या घरावर २३ वेगवेगळ्या जागी धाडी घालुन जवळ जवळ ९ कोटी नकद रक्कम जप्त केलेली आहे.

ही धाड खुप खोल वर विचार करुन प्लॅन केलेली होती. धाडीच्या अगोदर केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर सी आर पी एफ च्या सैनीकांच्या कंपनींना मध्य प्रदेश व ईतर ठीकाणी पाठवल होत. त्यावेळेला ह्या सैनिकांच्या प्रवासा बद्दल कमालीची गुप्तता बाळगण्यात आलेली तसेच ह्या प्रवासा बद्दल दुसरेच कारण दाखवले होते. लोकल पोलिसावर लोकल सरकारचे वर्चस्व असते व त्याचा सहभाग, मदत अश्या धाडीत मिळणार नाही झाला तर त्रासच होईल ह्याची खात्री असल्याने केंद्र सरकारच्या हाता खाली असलेल्या सी आर पी एफ सैनिकांना पाठवले होते. ह्या धाडीसाठी कोणत्याही सरकारी वहानांचा वापर करण्यात आलेला नव्हता, डोळ्यात न येता काळजी पुर्वक खासगी रेंटल गाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली होती.

नेहेमी प्रमाणॅच काँग्रेसने व्हिक्टीम कार्ड खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण खुप मोठ्या प्रमाणावर कॅश सापडल्याने त्यांची बोलती बंद झालेली होती. मोदी विरुद्द मिडीयाने ह्या सर्व बातमीला पाठ दाखवलेली होती. काही मिडीया हाऊसनेच ह्या बातमीला कव्हर केले.

आता निवडणुक आयोगाने ह्या धाडीची गंभीर दखल घेत ही रक्कम कुठुन आलेली होती त्याची चौकशी करुन अहवाल सादर करायला
केंद्र सरकारच्या खात्याला आदेश दिलेला आहे.

EC asks probe agencies to take strong action against those u ..
Read more at:
http://timesofindia.indiatimes.com/articleshow/68799484.cms?utm_source=c...

निवडणूक आयोगाने खूपच गंभीर दखल घेतली आहे .डायरेक्ट रेव्हेन्यू सेक्रेटरी ला समन्स बजावले आहे

https://www.bloombergquint.com/politics/income-tax-raids-election-commis...

डँबिस००७'s picture

10 Apr 2019 - 11:45 pm | डँबिस००७

योगेश ,
समंन्स बजावणे आणी मिटिंग साठी बोलावणे (Summon for meeting) ह्यातला फरक समजवुन घ्या !!
The Election Commission has called the revenue secretary and chairman of Central Board of Direct Taxes to discuss ongoing income tax raids.
Read more at: https://www.bloombergquint.com/politics/income-tax-raids-election-commis...
Copyright © BloombergQuint

डँबिस००७'s picture

10 Apr 2019 - 9:53 am | डँबिस००७

आता तर ही रक्कम २८१ कोटी असल्याची बातमी येत आहे !!
ह्यात घोट्याळ्यात कॉंग्रेस पुर्णपणे अडकली आहे ! पुरावे व रोख रक्कम हस्तगत झालेली आहे !!

https://youtu.be/Az4bg2ASXgU

गामा पैलवान's picture

10 Apr 2019 - 12:55 pm | गामा पैलवान

डँबिस००७,

अबब २८१ कोटींची रोकड? हे म्हणजे पूर्वी क्रांतिकारक लोकं इंग्रज सरकारचा पैसा लुटायचे तसाच दरोडा मोदी घालताहेत. त्याबद्दल मोदींचं अभिनंदन. लुटारुंवर असेच दरोडे पडावेत म्हणून शुभेच्छा.

आ.न.,
-गा.पै.

तळटीप : पप्पू म्हणे चौकीदार चारसोबीस. गामा म्हणे मोदींना ४२० पर्यंत पोचवा.

पण नक्की खिडकीची काच फुटली का?
( ब्लॅाक नंबर एफ १६)

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Apr 2019 - 8:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

Astronomers unveil first photo of a black hole

पृथ्वीपासून ५ कोटी प्रकाशवर्षे दूर असलेल्या कृष्णविवराचे (black hole) पहिलेवहिले चित्र कढण्यात संशोधकांना यश आले आहे.

तेजस आठवले's picture

11 Apr 2019 - 3:05 pm | तेजस आठवले

पृथ्वीपासून ५ प्रकाशवर्षे दूर असलेल्या कृष्णविवराचे (black hole) पहिलेवहिले चित्र आत्ताच का जाहीर केले गेले ? ५ वर्षांपूर्वी आमचे सरकार होते त्यामुळे हा फोटो आमच्या काळातला आहे.राजीव गांधी ब्लॅक होल स्कीम ही आमची स्कीम होती, ह्याने नाव बदलून फोटोपण छापून टाकला आणि श्रेय ढापतोय.,ही इज ट्राईन्ग टू इन्फ्लुएन्स द वोटर्स....
(कोटी हा आकडा मी खाल्ला आहे.)

या चित्रातला प्रकाश पाच कोटी प्रकाशवर्षापूर्वीचा आहे.

प्रदीप's picture

11 Apr 2019 - 10:44 am | प्रदीप

या चित्रातला प्रकाश पाच कोटी प्रकाशवर्षापूर्वीचा आहे.

म्हणजे पार न्हेरूंच्या काळातला !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Apr 2019 - 12:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गुड वन....! लाईक.

आम्हीच करुन दाखवलं, हमनेही कर दिखाया. अशी कुठं बातमी वाचनात आली नै.
आमचं सुदैवं दुसरं काय. ;)

-दिलीप बिरुटे