भाग 5 - शेवटचा प्रहार... तानाजींची शौर्यगाथा

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
2 Apr 2019 - 12:58 am
गाभा: 

भाग 5 - शेवटचा प्रहार... तानाजींची शौर्यगाथा

लढ्याला तोंड फुटले...

हगनदारीच्या घळीत 3 तास दुर्गधी सहन करत नाक मुठीत धरून बसलले मावळे तानाजींची आज्ञा आल्यावर....
दोरशिड्यावरून आलेल्या कंपनी 'अ' मधील तुकड्या 2 व 3 कलावंतिणीच्या बुरुजावरील पेंगणाऱ्या सैनिकांना कापून काढतात ..
तर कंपनी 'क' चे मावळे हनुमान गढीचा सफाया करायला निघाले...

1 1

साधारण सध्याच्या 180 पाऊंडी एका तंबूत 2, 3 तर कधी कधी 4 दाटीवाटीने झोपू शकतात असे मानले तर 250 ते 300 विखुरलेल्या राहुट्यात अनेक सरदारांचे सैनिक फेब्रुवारीतील थंडीच्या रात्री गुडुप्प झोपलेले असावेत.
त्यांची आपापली भोजनालये सध्याच्या भाषेत मेसेस (त्रिकोणांनी दाखवलेली) होती. उष्टे व उरलेले अन्न वरून फेकून द्यायला सोईचे तर खाली जमलेली जनावरे वेळ साधून अन्नावर तुटून पडायला सरसावत असावीत...
या नुकत्याच आलेल्या सैन्याच्या आपापल्या गस्ती तुकड्या बसल्या बसल्या पेंगत असाव्यात...

2. 2

कंपनी अ चे तुकडी 2 चे मावळे तटाच्या बाजूने पुढे सरकत सरकत जनावरांच्या पागेकडे जातात...
तुकडी 3 पुणे दरवाज्याकडील बालेकिल्ल्याच्या दरवाज्याला बाहेरून कडी लावायला सरसावले...

2अ 2अ

राहुट्यांची जागा सध्या कशी दिसते... ते वरून आणि बाजूने कसे दिसते याचे चित्र... पावसाचे पाणी दरीत खाली जाणाऱ्या घळीत लोटापरेडसाठी सोईची जागा वापरली जात होती. साहजिक ती जागा दुर्लक्षित होती. शिवाय तंबूंच्या पाठी तिकडे असल्याने ती जागा 300 शे मावळे चढून जमायला लागणाऱ्या दीर्घ वेळेला तो भाग सोईचा होता....

3 3

तुकडी 2 पागेतील आराम करत असलेल्या जनावरांच्या दावण्या तोडून त्यांच्या पुठ्ठ्यांवर सोटे मारून त्यांना राहुट्यांच्या दिशेने पळवायला लावले गेले...

3अ 3अ

त्यात भर म्हणून तुकडी 3 दरवाज्याला कडी लावून तेलात बुचकळलेले पलिते हातात घेऊन आग लावायला सुरवात केली...

4 4

अचानक दावणी तोडून सैरावैरा पळत सुटलेल्या जनावरांना तंबूत घुसण्याशिवाय पर्याय नसल्याने त्यांच्या पायदळी तुडवल्या जाण्यापासून बचावायला अंगावर जाड पांधरूणे घेऊन झोपलेल्या सैनिकांची तारांबळ उडाली.... घोडे, गाढवे, बैल, म्हशी एकदम अशी कशी सैराट आली? नक्की काय झाले याचा उलगडा न झाल्याने भांबावलेल्या सैन्याला ...
एकदम आगीचे लोळ वर जाताना पाहून तिकडे काय झाले पहायला धावले... अशा भांबावलेल्या सैन्याची मानसिकता लढायची न राहता समोरच्या गोंधळाला आवरावे कसे यावर होती...
आता हर हर महाहेव अशा रण गर्जना बालेकिल्ल्याच्या आतील सरदारांच्या कानावर येऊ लागली... अशा धुसपुशी अनेक वेगवेगळ्या तऱ्हेचे सैनिक जमले की आपापसात दंगे करतात असे वाटून सुरवातीला दुर्लक्षित केले असावेत...
...

सुमारे 200 मावळे असलेली कंपनी ड तोवर हनुमान गढीच्या बाजूने वर आली... जनावरांच्या सैराटीमधून, आगीच्या भयावह प्रकाराने दूर जायला पळत सुटलेले मुघल सैनिक एका बाजूला बालेकिल्ल्याची तटबंदी आणि दुसऱ्या बाजूला उतार असलेली घळ या सापटीत 'चिकन नेक' प्रमाणे अगदी चिंचोळ्या जागेत अडकलेल्यांना दाबून धरून....तास भर थोपवून धरून ठेवायला शक्य झाले.

...
.... तिकडे बालेकिल्ल्यातील निवासस्थानात विश्राम करणाऱ्या उदेभानाच्या नोकरांना आवाज ऐकू आले. त्यांनी उदेभानाला उठवून सांगितले तसे 'नंबर 2 कमांडर सिद्दी हलालला उठवून काय झाले आहे ते पहायला आज्ञा केली... ! त्याने कपडे सावरून, हातात शस्त्र घेऊन आपल्या शरीर रक्षकांसह तो आवाजाच्या दिशेने निघाला. पण बाहेरून दरवाजा बंद केला आहे हे त्याच्या लक्षात आले... काही तरी नक्कीच गडबड आहे हे त्याने ताडले...आपल्या सैन्याला 'आतून सगळ्यांनी लढायला सज्ज राहा' म्हणून ओरडून ओरडून आदेश द्यायला सुरवात केली...!
....
5 5

कंपनी ब आपल्या बरोबरच्या 50 जणांच्या दरवाजे फोडायचीहत्यारे घेऊन कल्याण दरवाज्याकडे निघाले. त्यांच्या कामात अडथळा आणणाऱ्यांचा खातमा करायला 100 जणांची तुकडी होती. दरवाजा खिळखिळा झाला की जोर लावून खेचून काढायसाठी ते सज्ज होेते...!
...पहिला दरवाजा अपेक्षेपेक्षा जास्त वेळ खाऊन उघडेना. कारण तिथल्या देवडीवरच्या गस्ती शिपायांनी रागरंग पाहून किल्लीचा जुडगा अंधारात किल्ल्याच्या बाहेर दूर फेकून दिला...! आता दरवाजा तोडल्याशिवाय पर्याय राहिला नाही... !
... घणावर घण पडत राहिले. पण ते अजस्त्र अवजड दरवाजे तुटता तुटेनात....!
... तानाजींना काय घडते आहे याची माहिती देणारे हलकारे आगीची बातमी देऊन बराच वेळ झाला. त्यांचे दहा अंगरक्षक, जादाची शस्रे सांभाळणारे बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडतोय का यावर अंधारात बसून लक्ष ठेवून होते... कारण उदेभानाचे आत राहणारे सरदार इकडून बाहेर पडून आपल्या सैनिकांना लढायला एकत्र करायला बाहेर येतील. तेव्हा त्यांना मारायला कंपनी ड तयार होती. मात्र सुर्याजीची 500 मावळ्याची कुमक आल्याशिवाय ही मोहिम एकतर्फी होऊन कुठल्याही क्षणी मुघलांच्या बाजूने हाता बाहेर जाण्याची शक्यता होती...!
दरवाजे किती झटपट तोडून सुर्याजीला आत यायला जमेल यावर लढाईचे सर्व भविव्य ठरणार होते...! हे तानाजी मनोमन जाणून होते...!
... सिद्दी हिलालने आपल्या सरदारांची जमवाजमव करून शस्त्रे हातात घेऊन त्यांच्या सैनिकांना 'दीन दीन' म्हणत शत्रूवर हल्ला करायला हुकूम दिले...
कोण शत्रू? आला कसा? किती सैनिक असावेत? वगैरे विचार करायला वेळ नसल्याने 'जसे जमेल तसे लढा' असा आदेश दिला गेला...!
...

. .. मुंबईतील 26 -11 च्या दिवशी... रात्री अगदी आधुनिक संचार साधने असूनही नक्की काय झाले आहे? मुंबईतील दोन टोळ्यामधील आपापसातील युद्ध नाही ... हा पाकिस्तानी आतंकवाद्यांचा हल्ला आहे, ह्याचे आकलन व्हायला जसा फार वेळ गेला तशीच गत त्यांची झाली असावी...!

6 6

...सुर्याजी आपल्या 500 मावळ्यांच्या 3 कंपन्यांसह कल्याण दरवाज्यापासून 5 मिनिटांच्या अंतरावर लपून राहिला होता. अतिशय अरूंद उताराच्या जागेतून दरवाजा उघडायची वाट पहात बसला होता. आत आपल्या सैन्याला मदतीसाठी झटपट गेल्याशिवाय 12 ते 15 शे सैनिकांसमोर तानजींच्या 5शे मावळ्यांचा टिकाव लागणार नाही हे तोही जाणून होता...!
दरवाजा अचानक उघडला तरी ताबडतोब घुसणे धोक्याचे होते. कदाचित तानाजीला मारून मुगल सैन्याने आणखी कुमक कल्याण दरवाज्याबाहेर वाट पहात असेल असे ताडून ते आपल्यावर आक्रमण करू शकतात. म्हणून तो सावध होता..!.

7 7

प्रत्यक्षात कल्याण दरवाजे असे दिसतात...

8 8

अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला. आता दरवाजा उघडला गेला नाही तर आपण जीवंत परतत नाही... या विचाराने मावळ्यांच्या मनात वेगवेगळे विचार चमकून जायला लागले. समजा पळायची वेळ आली तर लटकलेले दोर किती दूर असतील?... आता ते शाबूत असतील का? ... घरची कामं, नात्याची लोकं आठवत आठवत आता इथेच संपणार या कल्पनेने शहारे येऊ लागले...!
... वीर सेनानी शिपायांच्या मनातील ओळखतात. तानाजींनी रागरंग पाहून खणखणीत शब्दात आपल्या मन की बात सांगताना म्हटले, 'शूरांनो, आता वेळ आली आहे. वीर मरणाची. मग जिंकून का नाही मरायचे? या मुलखा बाहेरच्यांना आपण लाचारीने का मुजरे करायचे? आपल्या महाराजांना आगऱ्यात नेऊन मारायला उठलेल्यांना मारून विजय मिळवायची संधी आहे....!
मी ओळखतो त्यांना. अजिबात घाबरु नका तुम्ही... मी आहे ना तोवर कोणी तुम्हाला मरू देणार नाही... कळ काढा... आत्ता दरवाजा उघडला की सुर्या आपल्याला मिळेल'...!
.... आणि तेवढ्यात हलकाऱ्यांनी बातमी आणली की पुढचा दरवाजा नीट बंद होत नव्हता तो लगेच उघडला. आपल्या लोकांनी तुताऱ्या वाजवून, 'हर हर महादेव' गर्जनेने गडाच्या आसमंतात अनेक प्रतिध्वनी उमटत राहिले...!
... सगळ्यांना एकदम हुरुप आला...!

9 9

एका मागे एक करत 5 शे जण वर यायला तास भर लागला. आता कंपनी अ आता लढताना किती उरले किती गेले याचा अंदाज करणे अवघड होेते. चंद्र मावळला. आता पहाटेचे 4 केंव्हाच वाजून गेले. सुर्याजीचे तीनही कंपनी कमांडर बालेकिल्ल्याच्या दरवाज्याच्या तोंडाशी घात धरून सज्ज होते. पण दरवाजा आतून उघडत नव्हता...!
... उदेभानला सुचत नव्हते. शिवा इतके साहस करून रात्री कसा येऊ शकतो?... तो हा गड जिकायला कधीही येणार असे आपल्याला माहित असून आपले लोक रात्रीला आग पाहून घाबरले?... आता मला बालेकिल्ला सोडता काम नये...! कारण मी जर पकडला गेलो तर आपला पराभव झाला असे होईल....!
सिद्दी हिलालकडून कुठलीच खबर चांगली येत नाही...! जनावरांची वैरण खाक झाली. घोडे बिथरले, तंबूत ठेवलेली शस्त्रे जनावरांच्या दाटीमुळे, पायदळी तुडवल्याने हाती येईनात...! गोंधळलेल्या सैनिकांची चूक नाही....! आपल्याला आता ठपका सहन करायला लागणार...!

10 10

.... 'मी असा लपून बसू शकत नाही!', म्हणून त्याने विचारांती आपल्या दहा अंगरक्षकांना तयार राहा. म्हणून शस्त्र उचलले. दोन मशालचींना पुढे घालून त्याने बालेकिल्ल्याचे दार उघडले...1

11 11

(1) दरवाजा उघडला... मशालीच्या प्रकाशात टेकाडावरून तानाजींनी निरखले 'हाच तो उदेभान'...!
(2) आगऱ्याला महाराजांबरोबर असताना आपल्याला त्याने जयसिंहाच्या सरदारांची ओळख करुन दिली होती...!
(3) तानाजी हातात ढाल तलवार घेऊन सावकाश खाली उतरायला लागले...! तोवर उदेभानाच्या 10 अंगरक्षकांवर मागून वार करत सूर्याजींच्या शूरांनी गारद केले...! आपले रक्षक असे अचानक कोसळलेले पाहून भीषण समराची नांदी आहे म्हणत तो पुढे येत राहिला...!
मशालीच्या अंधुक प्रकाशात .... तानाजीं समोर उदेभान ठाकला...!!
(4) उदेभानाला कोण समोर आहे याची खात्री नव्हती...! बोलते करत बेसावध करायची खेळी त्याने केली... 'सिवा तो नही?'
... तो हिंदुस्तानीत काय म्हणाला याचा अंदाज घ्यायला वेळ मिळावा म्हणून तानाजींनी आपल्या अंगरक्षकांना म्हटले, 'तो काय म्हणतो रे...?'
'काय कि पण त्याला तुम्ही शिवाजी महाराज वाटताय बहुतेक... !'
'मी ताना तानाजी... मीच तुला करतो ठार...!'
... म्हणत दोघांच्या तलवारी एकमेकांशी भिडल्या. पाहता पाहता दोघांच्या शरीरावरचे कपडे रक्ताच्या रंगात माऱले. उदेभान एकटा पडला होता. तरीही तो त्वेशाने वार करत होता. त्या दोघांच्या मधे पडायची हिम्मत कोणाला होईना...!
... आता उदेभानाने पवित्रा बदलला... आपल्या हा आटपत नाही म्हटल्यावर त्याने उजव्या ऐवजी डाव्या हातात तलवार धरून ढाल डाव्या हातात घेतली. हात बदलून वार करायचा सराव आता त्याचा अशा ऐन वेळी कामाला आला...!
तानाजींनी उजव्या हाताने लढणाऱ्यांशी केलेल्या सरावामुळे आता त्यांचे आडाखे चुकायला लागले...!
उदेभानाने केलेला जोरदार घाव ढालीवर झेलताना ढालीचा बंद ढिला पडला... ती मुठीत धरूनही लडबडायला लागली...!
'अरे दुसरी ढाल आणा रे'... म्हटल्यावर नवी डाल आणे पर्यंत रंग बदलला होता...1
तलवारीचा घाव डाव्याहातावर कोसळल्याने तानाजींचा डावा हात जबर जखमी झाला. ढाल मिळूनही ती धरायचा त्राण राहिला नाही. ते तोल जाऊन बसले...!
उदेभानाने हीच संधी गाठून डोक्यावर घाव घालायला दोन्ही हातांनी तलवार उचलली... !
... मागून अंगरख्याला मानेच्या जवळ एका हाताने खेचले. तो वार हुकला...!
(6) 'तू कौन?' म्हणत उदेभानाने चमकून मागे पाहून विचारले...!
'मी सुर्या... ! त्याचे दुर्लक्ष झालेले पाहून क्षणात तानाजींनी उठून जोरदार प्रहार करत उदेभानाला पाडला...! पण पडताना त्याच्या डाव्या हातने केलेला वार छाती वरून चिरत गेला... दोघेही वीर अती श्रमाने घायाळ झाले. सुर्याजीने भावाला मदत करायला हात पुढे केला...!
तेंव्हा तानाजी म्हणाले, 'तो काय जगत नाही...!'
(7) 'तू त्यांच्या सरदाराला दाखव उदेभान मेलेला'... 'त्यांना शस्त्रे टाकून शरण या' म्हणून कबूल करून गड खाली करायला लाव... !
'मला जमेल तसे मी पहातो..!' उदेभानाचा प्राण तोवर मावळला... !
तानाजींच्या अंगरक्षकांनी अतिहळुवारपणे त्यांना सुखरूप ठिकाणी नेले. पण तोवर फार रक्त गेल्याने ग्लानी येऊन तानाजींचे प्राणोत्क्रमण झाले...!
(8) मुघल सैन्याने शरणागत होऊन जनावरे, शस्त्रे, पैसा-अडका, टाकून गड खाली केला..!

12 12

गड आला पण सिंह गेला...!

13 13

.... त्या यशवंती घोरपडी बद्दल काय? शेलारमामांचा या लढाईत कसा सहभाग होता?... पुढील भागात....

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

2 Apr 2019 - 9:28 am | प्रमोद देर्देकर

अंगावर काटा आला वाचताना .
त्रिवार मुजरा तानाजी यांना .

शशिकांत ओक's picture

2 Apr 2019 - 9:29 pm | शशिकांत ओक

आपल्या प्रतिसादाच्या भावना भावल्या!

दुर्गविहारी's picture

2 Apr 2019 - 11:21 am | दुर्गविहारी

खुपच सुंदर आणि चित्रदर्शी लिखाण.
एक शंका, कल्याण दरवाजे दोनच दिसतात, आपण उल्लेख केलाय तसा तिसर्या दरवाज्याचे अवशेषही दिसत नाहीत, तरीही तीन दरवाजे होते हा निष्कर्श कशाच्या आधारावर काढला ?
दुसरी सुधारणा म्हणजे सिंहगडावर आहे ते "तानाजी स्मारक" त्यांची समाधी त्यांच्या मुळ गावी उमरठला आहे.
बाकी यशवंती घोरपडीविषयी वाचायला उत्सुक.

शशिकांत ओक's picture

2 Apr 2019 - 9:41 pm | शशिकांत ओक

आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी ही स्मारके स्फूर्तिदायक ऐतिहासिक घटनांचे ठेवे आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Apr 2019 - 11:21 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर माहितीपूर्ण लेखमाला ! प्रत्यक्षदर्शी वर्णन.

शशिकांत ओक's picture

2 Apr 2019 - 9:48 pm | शशिकांत ओक

आपल्या प्रतिसादाबद्दल

शशिकांत ओक's picture

2 Apr 2019 - 9:48 pm | शशिकांत ओक

आपल्या प्रतिसादाबद्दल

करमरकर नंदा's picture

2 Apr 2019 - 12:25 pm | करमरकर नंदा

दाहकता, परिश्रम, मनोनिग्रह यांचे जीवंत कथन...
कल्याण दरवाजे २ का ३?

मित्रहो's picture

2 Apr 2019 - 10:31 pm | मित्रहो

हा भाग थरारक होता. चित्र डोळ्यासमोर उभे राहिले

शशिकांत ओक's picture

2 Apr 2019 - 11:06 pm | शशिकांत ओक

मित्रांनो,
खालील व्हिडिओ क्लिप पाहून आपणच ठरवावे की महाराजांच्या काळात दरवाजे 2 असावेत की 3
मला असे वाटते की महाराजांच्या आधीच्या काही शतकात ते 3 दरवाजे असावेत...

मित्रांनो,
आपल्या प्रतिसादाने उत्साहित होऊन वरील लढाईचे भाग सादर केले.
काहींनी वाचून काही शंका विचारून आपल्या दीर्घ आणि सखोल अभ्यासाची चुणुक दाखवली.
या विषयाला धरून राजगडावरून तानाजींचे मावळे सैन्य सिहगडाच्या पायथ्यापाशी कसे, कुठल्या वाटेने आणता आले असेल यावर मिल्ट्री कमांडराच्या नजरेतून विचार करून काही पर्याय सुचवता येतील का अशी विचारणा करतो....

करमरकर नंदा's picture

6 Apr 2019 - 12:21 am | करमरकर नंदा

अभ्यासूंकरिता पर्याय सुचवायची संधी आहे.

शशिकांत ओक's picture

10 Apr 2019 - 11:42 pm | शशिकांत ओक

मित्रांनो,
जनमानसात घोरपडीच्या साहाय्याने मावळे दोणागिरीचा कडा चढून वर गेले असे आत्ता पर्यत पक्के रुजले आहे...
अशा बेभरंवशाच्या मदतीने पुढील लढ्याचे नियोजन केले जाईल का? ते आपणच ठरवावे. आपल्याला वाटले की तसे करायला हरकत नाही तर तो निर्णय वाचकांच्या हाती असलेला बरा...

1 61

2 62

करमरकर नंदा's picture

12 Apr 2019 - 12:25 pm | करमरकर नंदा

ते इथे पाहून कळले.
त्यावरून कथनाची सत्यता पटते.