मोमा, वॅन गो आणि स्टारी नाईट...

अभिजीत राजवाडे's picture
अभिजीत राजवाडे in मिपा कलादालन
18 Mar 2019 - 8:47 am

न्यूयॉर्क मध्ये राहण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे न्यूयॉर्क चे भन्नाट आर्ट सर्कल. जी ए नी एकदा पुण्याबद्दल म्हटलेले हे वाक्य न्यूयॉर्क लाही लागू होते. (आता पुण्याची आणि न्यूयॉर्क तुलना करणे म्हणजे मूढपणा आहे, दिलगीरी!) मला ते पूर्ण वाक्य शब्दश: आज आठवत नाही आहे पण त्याचा मतितार्थ असा होता कि

"पुणे हे एक अजब शहर असून दिवस रात्र इथे चर्चा, भाषणे, उत्सव चालू असतात. प्रत्येक माणूस कशात तरी भाग घेत असतो जणू त्याने भाग नाही घेतला तर पोलीस तुरुंगात टाकतील."

न्यूयॉर्क मध्ये देखील करण्यासारखा खूप आहे. ह्या वीकांतात आम्ही मोमा (म्युझिअम  ऑफ मॉडर्न आर्ट) ला गेलो होतो.  मोमा एक "फाडू" जागा आहे. जर तुम्हाला "design" हा विषय आवडत असेल तर तुमच्या साठी हे कुबेराचे कोठार आहे. तिथे पोहोचल्यावर आम्हाला कळले कि सध्या "युरोपियन आर्ट" चे एक प्रदर्शन चालू आहे. माझ्या हृदयाची स्पंदने थोडी वाढली आणि आम्ही पाचव्या मजल्यावर जिथे प्रदर्शन चालू होते तिथे निघालो.

तिकिटे चेक केल्यावर वर पाहतो तर काय, एक मोठे बी-४७डी१ हेलिकॉप्टर वर टांगलेले. बाहेर लॉन मध्ये एक स्नोमॅन काचेचे दार असलेल्या फ्रीज मध्ये ठेवलेला. भारीच!

escalator वरून आम्ही पाचव्या मजल्यावर पोहोचलो, समोर पाहतो तर काय चक्क "वर्जिनल" :) वॅन गो चे "स्टारी नाईट" चित्र समोर लावलेले आणि त्यापुढे चित्रवेड्या पर्यटकांची गर्दी.

मी थक्क होऊन पाहताच राहिलो. नंतर कळले कि नुसते वन गो चे चित्र नव्हे तर मोने, पाबलो पिकासो, हेन्री मॅटीस, गॉर्की,  मार्क रॉथको या सर्वांची चित्रे देखील आहे. आपले पूज्य वासुदेव गायतोंडे यांच्या कामावर गॉर्की आणि मार्क रॉथको चा बराच प्रभाव होता. अजूनहि मी या प्रदर्शनाच्या सुखद धक्यातून बाहेर आलेलो नाही. तुम्हीं जर न्यूयॉर्क च्या आसपास असाल तर हि संधी सोडू नका.


प्रतिक्रिया

कंजूस's picture

18 Mar 2019 - 9:46 am | कंजूस

छान!

बोलघेवडा's picture

18 Mar 2019 - 12:07 pm | बोलघेवडा

वरून 6 व्या फोटोत जे चित्र आहे, ज्यात फक्त वेगवेगळ्या आकाराच्या चौकटी आहेत आणि 3, 4 च कलर आहेत त्या चित्राचा अर्थ काय आहे?

अभिजीत राजवाडे's picture

18 Mar 2019 - 8:59 pm | अभिजीत राजवाडे

ऍबस्ट्रॅक्ट आर्ट - एक मोठा विषय आहे जो अजून माझ्या बाळबुद्धीला देखील झेपला नाही पण तुम्ही हा विडिओ पाहून थोडी कल्पना करू शकता.

खंडेराव's picture

18 Mar 2019 - 2:36 pm | खंडेराव

अगदी छान, starry night बघायला मिळणे म्हणजे भाग्य!

चौथा कोनाडा's picture

21 Mar 2019 - 6:25 pm | चौथा कोनाडा

वाह, क्लासिकच !
भारी पेंटिन्गज !

झकास माहिती, अजून तपशिलवार चाललं असतं !