Women 's Day - 2019

माउ's picture
माउ in जनातलं, मनातलं
9 Mar 2019 - 3:28 am

नमस्कार मंडळीनो !
काल ' जागतिक महिला दिन' (International Women 's Day ) झाला. सगळ्या महिलांनी एकमेकीना शुभेच्छा दिल्या. ज्या working आहेत, त्यांनी छान Day Out त्यांचा enjoy केला. बऱ्याच पुरुषांनी त्यांच्या मुलीना,आई ला, बायकोला, मैत्रिणी ना, girlfriend ला वेगवेगळ्या पद्धतीने wish केले. Such a kind gesture! परत Men - Women Equality, women and their rights ह्या सगळ्या विषयांवर चर्चा झाल्या ofcourse on different platforms ..

मी स्वतः एक स्त्री आहे पण मुळात मला ह्या Women 's Day celebration वर थोडासा आक्षेप आहे. आपण सगळे जण Men - Women Equality वर तास न तास बोलत असतो आणि कसे बायकांना थोडे कमी पणे वागवले जाते ह्या वर बोलत असतो. पण आपण जसा Women 's Day celebrate करतो मग तसा men 's Day का नाही. हो, जागतिक पुरुष दिन पण असतो :) नोव्हेंबर १९ ला. किती जणांना हे माहित आहे? आणि माहित असेल,तर किती बायका हे acknowledge करतात?
खूप पूर्वी पुरुषांनी आपली शक्ती दाखवून बायका कशा त्यांच्या पेक्षा कमी level ला आहेत हे दाखवले. आणि स्त्रियानी सहन केले. मग हळूहळू काळ बदलला. मुली शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहू लागल्या पण घर आणि स्वयंपाक ची जबाबदारी अजूनही त्यांच्या वर च . आणि आता २०१९ मध्ये घर आणि स्वयपाक ची जबाबदारी outsource :) हा जो बदल झालाय तो खरंच commandable आहे. पण हे सगळे करताना बायकांनी स्वतःच्या thought process मध्ये किती बदल kelay हे, हे पण थोडे लक्षात घ्यायला पाहिजे. पुढे काही प्रश्न विचारतेय आणि जर त्याची उत्तरे positive असतील तर I really want to congratulate them and appriciate them , and get inspired from them .
जर तुम्ही working असाल, पगार कमी-जास्त कसाही असेल,
१. पण समजा तुमचा नवरा house -husband असेल तर तुम्हाला चालेल का ? तुमचा तो संसार करायची तयारी असेल का? असा एखादे 'स्थळ' आले तर त्याचा विचार कराल का?
house wife ही concept आपल्याकडे खूप रुळली आहे. त्या mentality तुन बाहेर पडायची तयारी आहे का?
आणि जर ही तयारी नसेल तर आपण पुरुषाकडे एक आर्थिक security म्हणून च बघणार का? (अर्थात च लग्न करताना प्रेम हे महत्वाचे असतेच आणि बाकी पण बऱ्याच गोष्टी, पण आत्ता तो मुद्दा नाहीए)
२. नवऱ्याला sabbatical leave चा option कधी सुचवाल का ? आणि तेंव्हा तुम्ही घराची सगळी finantial जबाबदारी घ्याल का?
३. "मी नोकरी सोडली तरी चालेल, पण माझ्या नवऱ्याने काम केले च पाहिजे after all he is the head of the family " हा विचार बरोबर वाटतो का?

समजा तुम्ही well settled आहात
१. तुमच्या मुली ला नोकरी कर, पैसे कमव, स्वतःच्या पायावर उभे राहा असा सांगणार का ? जरी ती अभ्यासात थोडी कमी असेल तरी? का असुदे, थोड्या वर्षांनी लग्न करायचे आहे, आत्ता अराम करुदे असा विचार कराल ?

मला basically हे बघायचे आहे कि, स्त्रिया स्वतःला खरंच equal मानतात का? equality फक्त हक्क दाखवताना च असते का? resposibility घेताना नाही का? आम्ही पण job करतो, पैसे कमवतो म्हणजे आपण equal झालो का? पुरुषांनी नेहमीच स्त्रियांना कमी लेखले आहे, हे मान्य पण स्त्री सुद्धा कुठेतरी अजाणते पणे हे मान्य करते का?

आपण किती बदललो आहोत हे फक्त पडताळून बघायचे आहे त्या साठी हा एक छोटासा प्रयत्न!
हा माझा पहिलाच लेख आहे. चूक भूल द्यावी घ्यावी. आणि आपले प्रामाणिक मत द्यावे.

Thank you for taking some time out for reading !

ता.क. मला house wives साठी नितांत आदर आहे. मी कुठे हि त्यांना कमी लेखत नाही. उलट ती एक अत्तिशय महत्वाची जबाबदारी आहे आणि स्त्रिया ती जबाबदारी कुठलाही training ना घेता चोख पणे पार पडतात. house wife ही सुद्धा तिच्या नवऱ्या किंवा इतर बाकी पुरुषांइतकीच समान आहे.

समाजविचारलेख

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

9 Mar 2019 - 8:54 am | प्रचेतस

तुम्ही article खूप awesome लिहिला आहे. लेख thoughtful असल्याने एकदम deep ला जाउन विचार केल्या गेला. तुम्हाला women's day च्या खूप सार्‍या wishesh.

यशोधरा's picture

9 Mar 2019 - 9:46 am | यशोधरा

Wishesh wishes म्हणायचे आहे का?

प्रचेतस's picture

9 Mar 2019 - 10:31 am | प्रचेतस

होय. autocorrect मुळे विशेसचे विशेष झाले.

असंका's picture

9 Mar 2019 - 10:12 am | असंका

+ 1
अगदी awesome!!

माउ's picture

10 Mar 2019 - 1:10 am | माउ

Thank you !

महिला दिनानिमित्त एक व्हाट्स अपीय फॉरवर्ड वाचले.

मेन डोण्ट नीड मेन्स डे
जस्ट "हॅप्पी अवर्स" इज सफिशिअंट :)

माउ's picture

10 Mar 2019 - 1:11 am | माउ

Haha! Good one :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Mar 2019 - 4:03 pm | ज्ञानोबाचे पैजार

Article अगदी from the bottom ऑफ हार्ट लिहिले आहे. रियली मला पण असेच वाटते की आजच्या women कित्ती empower झाल्या आहेत. Every फील्ड मध्ये women आहेतच. काल पुण्यात पण Corporation ने women साठी Free Transport ठेवला होता म्हणे. पुअर वूमन्स ना असे कन्सेशन मिळायला पाहिजे.

मी पण Morning ला मारुतीच्या Temple मधे women साठी prayer करून आलो.

घराच्या Woman ने मला Canteen Food खा असे सांगितले. She was Going with her Friends for Movie. काल थेटर मध्ये पण डिस्काऊंट होता वूमन साठी.

Whats App वर पण काल तोच subject होता Discussion चा किती जोक्स आले वूमन्स वर.

काल आमच्या Office मध्ये पण Women day Celebrate झाला. ऑफिस मधल्या 40 men नी दोन Women ना wish केले. मोठा Cake Cut केला, Potato Chips, Samosa आणि Tea enjoy केला मस्त ४५-५० मिनिट enjoyment झाल्यावर मग Office सुटे पर्यंत तोच subject. तसेही काल बर्‍याच मेन्स ना Tiffin मिळाले नव्हते.

किती Enjoy केला आम्ही women day...

मी तर आमच्या HR ला propose केले की आपण असा women day दर वीक ला करायला पाहिजे. मज्जानू लाईफ

पैजारबुवा

माउ's picture

10 Mar 2019 - 1:14 am | माउ

Thank you!

nanaba's picture

9 Mar 2019 - 5:50 pm | nanaba

Pahilya don prashnanche uttar ho ase hote anek varsha.
Agadi magachya varshi paryant (we are married for 15 yrs)
Kahi recent changes mule, next 5 yrs te uttar nahi zale ahe. But circumstances is d only reason.

माउ's picture

10 Mar 2019 - 1:13 am | माउ

Thank you . Yes circumstances play major role in what you do. But what I am trying to focus on is what we think as women and how do we do parenting . What are our thoughts, views etc

सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक अशा बाह्य घटकांमुळे शिक्षणात अडचण न आलेल्या प्रौढ व्यक्तीला (स्त्री असो कि पुरुष) जर आर्थिक स्वतंत्र असण्याचे आणि राहण्याचे महत्व कळत नसेल तर मला अशा व्यक्तीबद्दल काडीचाही आदर वाटत नाही.

माउ's picture

11 Mar 2019 - 7:36 am | माउ

Agreed

चौथा कोनाडा's picture

10 Mar 2019 - 8:35 pm | चौथा कोनाडा

खुप amazing lekh आहे, बरेच point's ,डिस्कस kelet, पण mala वाटतं society's he वि४ करायला अjun mature zala,लेली नाहीय.

पहिला lekh ch भारी टाकलाय. तुमचं मिपावर हार्दिक स्वागत !

पॉईंट kr 3 ani ५ बद्दल jaanakaar मिपाकरांचे vi४ ऐकायला awadatil.

पुलेशु

माउ's picture

11 Mar 2019 - 7:37 am | माउ

Khup abhari ahe.. :)

टवाळ कार्टा's picture

11 Mar 2019 - 7:22 pm | टवाळ कार्टा

लेखातल्या विचारांवर मिपावर सकारात्मक उत्तरे मिळतील याची अपेक्षा ठेऊ नका

पुमिराना - एकेकाळी या लेखावर कमीत कमी त्रिशतकी प्रतिसाद पडले असते

माउ's picture

11 Mar 2019 - 8:40 pm | माउ

Ok..

अभिदेश's picture

11 Mar 2019 - 7:28 pm | अभिदेश

he sagale sarcastic comments kalale nahit ka ?

माउ's picture

11 Mar 2019 - 8:41 pm | माउ

mala sarcastic ani genuine comment madhala farak nakki ch kalato

प्लिज अशाच रहा. सुखी रहाल. माझा नवरा असाच आहे, २ मिनिटात झोपतो पडल्या पडल्या, एकपण विचार नसतो डोक्यात. मी आपली कोण असं का बोललं विचार करत बसते.

टवाळ कार्टा's picture

12 Mar 2019 - 1:15 am | टवाळ कार्टा

तुम्ही दोघे एकमेकांचे परफेक्ट मॅच असाल =))

सुबोध खरे's picture

12 Mar 2019 - 7:19 pm | सुबोध खरे

माझा नवरा असाच आहे, २ मिनिटात झोपतो पडल्या पडल्या

अंथरुणावर पडल्या पडल्या ज्याला झोप लागते
आणि
कमोडवर बसल्यावर लगेच ज्याचे पोट साफ होते

तो सर्वात सुखी माणूस

बाकी सर्व मोहमाया आहे

जव्हेरगंज's picture

11 Mar 2019 - 10:42 pm | जव्हेरगंज

मजा आली वाचायला!!!

दुर्गविहारी's picture

12 Mar 2019 - 7:12 pm | दुर्गविहारी

विष्णुशास्त्री चिपळूणकरां नंतर ईतका शुध्द मराठी तील आज वाचायला मिळाला, त्यामुळे धन्य झालो. टोमणे नावाचा एक प्रकार मराठीत असतो, हे माउताई समजून घेतील अशी आशा.
बाकी मि.पा. हे मराठी संस्थळ आहे गैरसमज दूर केल्याबद्दल धागालेखिकेचे शतशः आभार. बाकी हाच धागा पाच-सहा वर्षापूर्वी आला असता तर काय झाले असते या विचाराने डोळे पाणावले. प्रयत्न करत रहा, मराठी लिहायला जमेल.

मराठी कथालेखक's picture

12 Mar 2019 - 7:55 pm | मराठी कथालेखक

आपले लेख आम्हाला व्यनि करावे.
आम्ही नाममात्र शुल्कात आपले लेख मराठीत रुपांतरीत करुन व्यनिने पाठवू.

इथे टोमणे मारणार्‍यांपैकी प्रत्येक जण इंग्रजी शाळेतून शिकलेल्या पाल्यांच्या मराठीची छायाचित्रे जरा प्रामाणिकतेने मिपावर टाकतील का ? किंवा गेला बाजार मराठी लेखनाचा सराव सुटलेल्या परदेशस्थ आप्त स्वकीय आणि मित्र परीवाराचे मराठी लेखनाचे नमुने मिळवून त्याची छायाचित्रे प्रसिद्ध करतील काय ?

भाषेचे शहाणपणाचा अहंकार असलेल्यां मिपाकर मित्रमंडळींना भाषा वाहती असते हा किमान नियम केवळ दुसर्‍या लेखकावर हसून घेता येते यासाठी विसर पाडून घ्यावा आणि ते ही महाराष्ट्रातील ४० टक्के मुले इंग्रजी माध्यमातून शिकत असताना तुमची मराठीभाषा तुमच्या लहानपणी होती तशीच पुढे शिल्लक राहील असे कसे गृहीत धरून चालले जाते ?

आता किती बोलीभाषा दिवस साजरे केले तरी, आमची हि भाषिक शुद्धतेचे गोमुत्र घेऊन फिरणारी अंहकारी सोवळी मंडळी अगदी मराठी भाषेची वाट लागे पर्यंत म्हणजे परवा परवा पर्यंत बोली भाषेच्या वापरास मागासले पणा समजत होती आणि त्यातील बरेच आजही पाठीमागे नाकेच मुरडतात. जर बोली भाषा चालवून घेता येतात तर मिंग्लिंशनेच काय घोडे मारले आहे ?

पोटदुखीमुळे तुम्हाला नसेल सध्याच मिंग्लिश भाषेत सहभागी व्हायचे तर नका सहभागी होऊ, आपले टिंग्लिश टोमणे मारून मिंग्लिशचा प्रवास थांबवण्याची आपल्यापैकी एकाची तरी क्षमता आहे का ? परदेशस्थ होणार्‍या भारतीयाम्च्या पुढच्या पिढ्या असेच मराठी बोलतील तीच त्यांची मातृबोली असेल हे आम्ही का नाही समजू शकत ?

तंजावरी मराठीत तामीळ शब्द आले तर आपण हसतो का ? लिहिताना माझेच विचार हरवले म्हणून असोच

टवाळ कार्टा's picture

15 Mar 2019 - 8:35 pm | टवाळ कार्टा

मिपाकरांनो, लिवा
क्याळं
:D

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Mar 2019 - 9:59 am | ज्ञानोबाचे पैजार

चूल मन चूल, नो ओने हेअर इस सेरिओउस अबोउत थे लन्गुअगे, नो ओने हस चमे विथ चोव पी तो च्लेअन थे बोअर्द. इन्फच्त एवेर्योने हस एन्जोयेद थे अर्तिच्ले. एवेर्य ओने हस गिवेन सो पोसितिवे अन्द एन्चोउरगिन्ग रेस्पोन्सेस अन्द थे समे इस अल्सो अच्क्नोव्लेद्गेद ब्य थे व्रितेर. शे हस सैद थन्क्स तो एवेर्य ओने व्हो हस रेस्पोन्देद तो थे अर्तिच्ले.

ठिस इस मिपा अन्द बेचौसे ओफ थिस मूद ओफ थे सिते वे अल्ल अरे हेअर. ओथेर्विसे थेरे अरे मन्य ओथेर सेरिओउस फोरुम्स व्हेरे औथोर्स अन्द रेअदेर्स चमे ओन थे पोर्तल विथ बोत्त्ले ओफ चस्तेर ओइल इन थे स्तोमोच एवेर्य मोर्निन्ग.

पैजारबुवा,

कोणतीही टोकाची उदाहरणे देऊन लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचे समर्थन होत नाही.

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Mar 2019 - 1:36 pm | ज्ञानोबाचे पैजार

अशा प्रकारचे प्रतिसाद देणे ही देखिल कुणाच्या तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत नाही का?

पैजारबुवा,

स्वातंत्र्याच्या गळचेपीचे स्वातंत्र्य हा एक चांगला विनोद असू शकेल पण आदर्श विधान नव्हे.

ह्याचं मराठी भाषांतर देता का बुवा?

चामुंडराय's picture

16 Mar 2019 - 9:03 pm | चामुंडराय

हे मराठी काही झेलपे नाही राव.
मूळ प्रतिसाद देवनागरीत लिहिलेला आंग्ल भाषीय असल्याने विचार केला रोमन लिपीत विंग्रजी भाषांतर करून बघू समजतंय का ते?

मग दशावतारातील सर्वज्ञानी, सर्वअंजाव्यापी साडे नववा आद्य आंग्ल यहुदी अवतार श्री. गोगलदेव यांस साकडे घातले. त्यांस नेटपॅकचा नैवेद्य दाखवल्यावर आणि त्याने माझी सगळी इत्यंभूत माहिती गोळा केल्यावर (जो ती पुढे त्याच्या फायद्यासाठी वापरणार आहेच) त्याबदल्यात माझ्या पुढे पुढील भाषांतर ओतले.
ते चावून तर अधिकच कन्फ्युज झालो.

Chool Mana Chul, No One Here These Serious Above Tha Languege, No Own Hats, with Chow Pi Chalyan Tha Baard Infact Aviorne was his enzoyed, Artechle.
This Mifa And Saga's Of These These Moods Of The Stars Are All Hey Hair Otherwisse There Hey Manya Oether Serious Forums Why Autores Aid Readser's Kiss On The Portal With Boteley Of Chaser Oil In The Stochov Everywhere Morning

हा ! हन्त ! हन्त ! गोगली मम भाषा उज्जहार ।।

सुबोध खरे's picture

16 Mar 2019 - 10:45 am | सुबोध खरे

@माहितगार
आपल्या बोलण्यात बोलताना इंग्रजी शब्द आले तर एकवेळ क्षम्य आहे पण लिहिताना आपल्याला तेच लेखन प्रकाशित करण्यापूर्वी संपादन करण्याची सुविधा उपलब्ध आहे ना? मग इतके इंग्रजी शब्द क्षम्य आहेत?
बोली भाषा आणि लेखी भाषा यात हाच फरक आहे.

....बोली भाषा आणि लेखी भाषा यात हाच फरक आहे…

हि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रगतीच्या समान संधी नाकारणारी आडमार्गाने सामाजिक उतरंड लादणारी शुद्ध लबाड पळवाट आहे. बहुतेक बोली भाषा वापरणारे कधीच तथाकथित प्रमाण भाषेवर वरचष्मा असलेल्यांशी पूर्णपणे स्पर्धा करु शकणार नाहीत, आणि कृत्रिम भाषिक न्युनत्व दाखवून त्यांच्या संधी नाकारता येतात वरून संधी देऊनही आमची बरोबरी करु शकला नाहीत हा टेंभा मिरवता येतो. प्रमाण भाषेच्या व्याख्येवरील सामाजिक उतरम्दीतील वरच्यांचे नियंत्रण हि बहुजनांना फसवणारी यंत्रणा मात्र असते.

माहितगार's picture

16 Mar 2019 - 11:58 am | माहितगार

मुख्य म्हणजे हि पळवाट उद्या मिंग्लिश बोलणार्‍या पुढच्या पिढीचा बळी देत आहे हे कळे पर्यंत पुला खालून बरेच पाणी वाहून गेलेले असेल.

सुबोध खरे's picture

16 Mar 2019 - 7:42 pm | सुबोध खरे

आपण सरकारी कर्मचारी आहात आणि आपल्याला अहिराणी किंवा तत्सम भाषेत अर्ज दिला आणि काही दिवसांनी त्यावर माहिती अधिकारात माहिती काढून कार्यवाही न केल्याचा आरोप झाला तर आपले काय म्हणणे असेल?

एखाद्या राज्यात किती बोली भाषा असतात.
दर १२ मैलावर बोली भाषा बदलते असे असताना १००० किमी लांबी रुंदी असलेल्या राज्यात किती तर्हेच्या बोली भाषा असतील. प्रत्येक गट आमचीच भाषा प्रमाण म्हणू लागले तर राज्यशकट चालवायचा कसा?
साधा DCR मराठीत भाषांतर करण्यात दोन महिने गेले त्यामुळे नवीन इमरतींचे बांधकाम रखडले. हे सर्व बोलीभाषात भाषांतर कसे करायचे?
उच्च आणि कनिष्ठ न्यायालयांचे निकाल (प्रमाण) मराठीत आणि इंग्रजीत असतात ते बोलीभाषेत भाषांतर करायचे म्हणालात तर आज खटला २० वर्षे रेंगाळतो म्हटलं तर तो उद्या ४० वर्षे रेंगाळेल.
होऊ द्या चांगभलं पण आमचीच भाषा बरोबर.

मराठी कथालेखक's picture

18 Mar 2019 - 4:01 pm | मराठी कथालेखक

इथे सामाजिक उतरंडीचा प्रश्न आला कुठे ? मराठीतील इंग्लिशच्या आचाट भेसळीला मिंग्लिश असे नाव देवून उगाच तिचे प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न मात्र खटकला. या मिंग्लिश नामक प्रकाराला बोलीभाषेच्या पंक्तीत आणून बसवणेही खटकणारे आहे. ही बोलीभाषा कधी आणि कशी झाली ? किती पिढ्यांत ही बोलली गेली ?
उद्या एखाद्या इंग्लिश भाषेतील व्यासपीठावर (अगदी देशी व्यासपीठ असेल तरी) कुणी मोठ्या प्रमाणात मराठी वा हिंदी शब्द वापरले तर चालतील का ?
आणि इथे कुणीही अतिशुद्ध , प्रमाण वा पुस्तकी भाषेचा आग्रह धरत नाहीये. पण सहज टाळता येण्याजोगे इंग्लिश शब्द तरी टाळावेत इतकीच अपेक्षा आहे. अगदी लिफ्टला उद्वाहन नाही म्हंटले तरी चालेल पण

नवऱ्याला sabbatical leave चा option कधी सुचवाल का ? आणि तेंव्हा तुम्ही घराची सगळी finantial जबाबदारी घ्याल का?

अशी वाक्ये टाळता आली असतीच ..(त्यातल्या finantial च्या चुकलेल्या spelling सह)
झालंच तर प्रस्तुत लेखिका तथाकथित सामाजिक उतरंडीतील वरच्या (मानलेल्या) स्तरातून आहे की खालच्या (मानलेल्या) स्तरातून हे कळायला मार्ग नाही.. पण या उतरंडीतील वरच्या स्तरातील लोकांची भाषा शुद्ध वा प्रमाण असते आणि खालील स्तरातील लोक अशुद्ध वा बोलीभाषा बोलत असतात हे गृहीतकही पुन्हा तपासून घ्यायला हवे.

मराठी कथालेखक's picture

18 Mar 2019 - 4:07 pm | मराठी कथालेखक

भाषा वाहती असते

खरंय..
पण फारच वहावत गेली तर आवर घालावा लागतो. नाहीतर "शब्दकोष हा शब्दच माझ्या शब्दकोषात नाही" असे म्हणत भाषेच्या प्रवाहात शब्दकोष बुडवून टाकला जाईल

माहितगार's picture

21 Mar 2019 - 9:53 pm | माहितगार

'शब्दसंग्रह वाढवणारी लवचिक भाषा तरते , आणि संकुचित भाषा खोपचात जाते' या बद्दल ही खरय लिहा आणि एक परंतु जोडा. बाकी वरच्या प्रतिसादाला इतर कुणाचे प्रतिसाद येतात का बघून उत्तर देईन मन मोकळ्या चर्चेसाठी अनेक आभार

चौथा कोनाडा's picture

19 Mar 2019 - 4:38 pm | चौथा कोनाडा

भाषा या टॉपिकवर उद्बोधक चर्चा.

अश्या चर्चांमुळे भाषेची प्रगतीच होत असते.

माहितगार's picture

21 Mar 2019 - 9:49 pm | माहितगार

भाषा टॉपीकच्या या भागा बद्दल माझ्याकडे एक मोठा लेख तयार आहे. बघू कधी टाकायचा ते.

चौथा कोनाडा's picture

23 Mar 2019 - 1:31 pm | चौथा कोनाडा

+१

प्रतिक्षेत ..... टाका लवकर !