ओढ....

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
14 Feb 2019 - 1:08 am
गाभा: 

इंजिनिअरिंगला असणारा १९ वर्षांचा सुयश इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित माहितीचा चांगला जाणकार समजला जातो.त्यातला किडाच म्हणा ना! ५ वर्षांचा असल्यापासून साध्या ड्रायसेलवर LED बल्ब लावण्यापासून सुरु झालेला प्रवास आता हाय एंड सेरीजच्या बिघडलेल्या म्युझिक सिस्टीम्स लीलया दुरुस्त करण्यापर्यंत येऊन ठेपला आहे.
इलेक्ट्रॉनिक्समधला हवा तो संदर्भ विचारा.पटकन् सांगेल,अगदीच दुर्मिळ असेल तर आंतरजालावरुन झटकन शोधून सांगेल.घरातली वीजेवर चालणारी एकही अशी वस्तू नसेल जी त्यानं खोलून बघितली नसेल.शेकडो खोलल्या,शेकडो दुरुस्त केल्या.त्याबदल्यात काही वेळा अोरडून घ्यावं लागलं,मारही खावा लागला घरच्यांचा,काहीवेळा इजाही झाली.पण पठ्ठ्याने कास सोडली नाही.झोपेचे ६ तास सोडले तर बाकीचे १८ तास हातात आणि मेंदूत फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉनिक्सच!त्याच्या खोलीत गेल्यावर तर एक छोटं वर्कशॉपचं दिसतं आपल्याला.नजर जाईल तिकडे वीजेवर चालणार्‍या वस्तू खोललेल्या!

निनाद आत्ता कुठे १० वर्षांचा आहे.पण जवळपास १७ वाद्ये कुशलतेने वाजवतो.तबला,मृदूंग,बासरी,सॅक्सोफोन असं बरंच काही.घरासमोरच एक संगीतकलेची शिकवणी होती.तिथून वेगवेगळया वाद्यांचे स्वर अगदी सहज ऐकू यायचे.या शिकवणीच्या शेजारच्या घरात एक प्रसिद्ध चित्रकार काका राहतात.ते निनादच्या बाबांचे आणि त्यामुळेच निनादच्याही अोळखीचे पण निनादला चित्रकला काही भावली नाही.भावला तो वाद्यांचा आवाज!
वय बसत नसतानाही हट्टाने शिकवणीच्या सरांच्या मदतीने निरनिराळी वाद्ये वाजवायला शिकला.एवढंच काय तर हेच नाद संगणकावर वापरुन मिक्सिंग करुन नवनवीन आवाज,ध्वनी निर्माण करायला शिकला.अगदी आई बाबांच्या स्मार्टफोनवरही त्यानं निरनिराळ्या वाद्यांच्या अॅप्स घेऊन ठेवल्या आहेत.निनादला पंडीतजींच्या कार्यक्रमासाठी त्यांच्याच आग्रहावरुन तबला वाजवायचाय पण आईबाबा 'इतक्यात नको' म्हणतात म्हणून गप्प बसलाय.पण अधूनमधून पुन्हा पुन्हा विषय काढतोच.शहरातली वाद्यांची दुकानं ही त्याची आवडती ठिकाणं.तिथले काका लोक तर नवीन वाद्य आलं की आधी निनादला कळवतात.तोही लगोलग जाऊन ते वाद्य निरखून,वाजवून येतो.काकांनाही बदल्यात या नवीन वाद्याचा 'परफॉर्मन्स' समजतो.

पहिलीत ही दोन उदाहरणे? या मुलांना केवळ जुजबी आवड नाहीये.चांगली तज्ञ वाटावीत इतपत त्यांची तयारी आहे.अशी बरीचशी उत्कट(पॅशनेट) मुलं/माणसं तुमच्याही पाहण्यात असतील.कोणत्याही उद्देशाविना कुतूहलाने भारावल्यासारखी कणाकणाने आपल्याला भावणार्‍या क्षेत्रातली माहिती गोळा करत असतात.सतत भावणार्‍या विषयाच्या संपर्कातच असतात.

हाच विषय आणि काही प्रश्न घेऊन आलो आहे.

कुठून येते ही विशिष्ट गोष्टीबद्दलची अोढ?आजुबाजूला इतक्या गोष्टी असतानाही विशिष्ट गोष्टीकडेच एखाद्याचं अवधान का जातं? निनादला चित्रकला न भावण्याची कारणं कोणती? सुयशला वाद्य वादनाची आणि निनादला इलेक्ट्रॉनिक्सची आवड का नसावी?

या अोढीमागे कोणती मानसशास्त्रीय कारणं असतात?
अनुवांशिकता हा घटक यात महत्वाची भुमिका बजावतो.पण फक्त अनुवांशिकताच महत्वाची ठरते का? परीणाम करणार्‍या अन्य गोष्टी कोणत्या? या लोकांना सतत आवडीच्या विषयाच्या संपर्कात राहण्याची स्वयंप्रेरणा मिळते तरी कुठून?

दुसरं असं की हे सगळं नैसर्गिक आहे.न मागता मिळालेलं असं आपण म्हणतो.पण हीच अोढ,आवड बाह्य साधनांद्वारा निर्माण करता येईल का?
बाह्य साधने वापरुन निनादला सुयशसारखी इलेक्ट्रॉनिक्सची आवड लावता येईल का? किंवा सुयशमधे बाह्य साधनांद्वारे निनादसारखी वाद्य वादनातली अोढ निर्माण करता येईल का?

प्रतिक्रिया

ट्रेड मार्क's picture

14 Feb 2019 - 6:37 am | ट्रेड मार्क

प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. स्वभाव, आवडनिवड, कलागुण भिन्न असणारच.

अनुवांशिकता हा घटक यात महत्वाची भुमिका बजावतो.

असं वाटत नाही कारण चांगल्या प्रथितयश कलाकारांची वा खेळाडूंची अपत्ये मात्र त्या त्या क्षेत्रात चमकताना फार कमी दिसतात. त्या मुलांना कदाचित लहानपणापासून आई किंवा वडील जी कला सादर करतात किंवा जे खेळतात ते बघून थोडीफार आवड निर्माण होणे पर्यंत ठीक आहे. पण त्याच क्षेत्रात आई किंवा वडिलांइतकी वा जास्त प्रगती फार थोडी अपत्ये करतात. एकाआड एक पिढी हुशार असते असं म्हणतात.

पण हीच अोढ,आवड बाह्य साधनांद्वारा निर्माण करता येईल का?

माझ्या मते असे करता येणार नाही. अजून तरी माणसाच्या वृत्तीमध्ये किंवा नैसर्गिक जडणघडणीमध्ये बाहेरून फेरफार करता येतील असे तंत्र नाहीये असं मला वाटतं. पुढेमागे जरी हे साध्य झालं तरी नैसर्गिकरित्या जे मिळालं आहे त्याइतकं कृत्रिमरित्या टाकलेलं करेल असं वाटत नाही.

त्या साठी Genetics बद्दल थोडी बहुत माहिती असायला हवी.
ह्यामधे जनुके software सारखे काम करतात. जरूरी नाही ते लगेच पुढच्पा पिढी मधे express होतील. काही पिढ्यांनंतर सुध्दा ती express होतात. अनेक factor त्पासाठी काम करत असतात. ति एक स्वतंत्र विज्ञानाची शाखा आहे.

उपयोजक's picture

14 Feb 2019 - 10:00 am | उपयोजक

असं वाटत नाही कारण चांगल्या प्रथितयश कलाकारांची वा खेळाडूंची अपत्ये मात्र त्या त्या क्षेत्रात चमकताना फार कमी दिसतात.

बापाइतकाच मुलगा गुणी असला पाहिजे अशी अपेक्षा असेल तर चमक फारशी दिसणार नाही.शिवाय बापाने जितक्या अोढीने,तळमळीने केलं असेल तेवढी मुलाकडे नसेल हेसुद्धा पहायला हवं.मुलगा स्वत:चेदेखील काही गुणअवगुण घेऊन येणारच ना?

१.रोहन गावस्कर सुनिल गावस्करइतका प्रतिभावान नाही.
२.याउलट आईन्सटाईन मात्र त्याच्या गणितज्ञ वडीलांच्या तुलनेत कैकपट अधिक हुशार निघाला.

रोहनची तुलना सुनिलशी झाली तर तो अपयशी ठरणारंच.पण रोहन इतका वाईट क्रिकेट खेळतो का की त्याची दखलसुद्धा घेऊ नये? तो इतका वाईट क्रिकेट खेळतो का?

ट्रेड मार्क's picture

14 Feb 2019 - 8:16 pm | ट्रेड मार्क

सुनिल गावस्कर - रोहन गावस्कर किंवा अमिताभ बच्चन - अभिषेक बच्चन

मी स्वतः रोहन ला कधीच खेळताना बघितलं नाहीये, त्यामुळे तो किती प्रतिभावान आहे हे सांगता येणार नाही. पण अमिताभ आणि अभिषेक दोघांनाही काम करताना बघितलेलं आहे. माझ्या मते तरी अभिषेक बऱ्यापैकी अभिनेता आहे पण कदाचित वडिलांबरोबरच्या तुलनेमुळे तो मागे पडला असावा असं वाटतं. पण परत प्रश्न तोच आहे ना की जर अनुवांशिकरित्या कलाकार होणं त्याच्याकडे आलं असेल तर मग त्याने स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करायला पाहिजे होतं. पण मग अभिनयातच का? हरिवंशराय बच्चन कवी होते पण अमिताभ मात्र अभिनेता आहे. कदाचित अभिषेककडे दुसरी कुठलीतरी कला असेल, जी त्याने एक्सप्लोर केलीच नाहीये!

हे गणित धंद्याच्या बाबतीत थोडं वेगळं आहे. जर तरुण मुलाने पिढीजात धंदा पुढे चालू ठेवायचे म्हणले तर त्याला आयता सेटअप मिळतो. आहे ते पुढे चालू ठेवायचे किंवा वाढवायचे ते त्या मुलाच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे. पण सर्वसाधारणपणे असं दिसून आलं आहे की फारसे कष्ट न करता मिळालेल्या गोष्टीची कदर सहसा नसते.

याउलट आईन्सटाईन मात्र त्याच्या गणितज्ञ वडीलांच्या तुलनेत कैकपट अधिक हुशार निघाला

एकाआड एक पिढीचे लॉजिक लागू झालेलं दिसतंय. पण आपल्याला आईन्स्टाईनच्या आजोबांबद्दल काहीच माहिती नाही.

मला तर त्यापेक्षाही मोठा प्रश्न पडलाय. इथे तुम्ही ज्यांना आपला कल कुठे आहे ते समजलंय अश्यांबद्दल बोलताय, पण बहुसंख्य जनता अशी आहे की त्यांना स्वतःचा कल कळतच नाही. अश्यांचं काय? कदाचित आईन्स्टाईनचे वडील आईन्स्टाईनपेक्षाही हुशार असू शकतील पण त्यांना तशी संधी मिळाली नसेल किंवा योग्य परिस्थिती मिळाली नसेल तर? कदाचित गणित त्यांना आवडतही नसेल पण वडिलांनी म्हणा किंवा इतर कोणी अर्धवट कळत्या वयात सांगितल्यामुळे त्यांनी गणित निवडला पण त्यांची आवड दुसरीच असेल तर?

कुमार१'s picture

9 Mar 2019 - 8:05 pm | कुमार१

आइन्स्टाइन यांचे एक वचन फार छान आहे.त्याचा मथितार्थ असा:

जगातील प्रत्येक जणच अलौकिक बुद्धीचा आहे.पण, होतं काय की ज्याला उत्तम झाडावर चढता येत असते, त्याला आपण फर्मावतो की चल, मला मस्त पोहून दाखव बरे !

अगदी खरे आहे.
प्रत्येकाला कुठल्या न कुठल्या विषयात गती असतेच.
फक्त ती लवकरात लवकर, शक्यतो विद्यार्थीदशेत ओळखता यायला पाहिजे.
काहींना हे कळतच नाही तर काहींना ओळखता येते परंतु संधी, अनुकूल परिस्थिती मिळत नाही.
ज्यांना संधी आणि अनुकूल परिस्थिती मिळते व त्याच बरोबर गती असलेल्या विषयात पुढे आयुष्यात काम करायला मिळते अशी मंडळी जरूर यशस्वी होतात.
अशी लोकं खरंच भाग्यवान म्हटली पाहिजेत.

आनन्दा's picture

14 Feb 2019 - 12:25 pm | आनन्दा

कॉलिंग घासुगुर्जी

उपयोजक's picture

15 Feb 2019 - 12:17 pm | उपयोजक

<<कदाचित आईन्स्टाईनचे वडील आईन्स्टाईनपेक्षाही हुशार असू शकतील पण त्यांना तशी संधी मिळाली नसेल किंवा योग्य परिस्थिती मिळाली नसेल तर? कदाचित गणित त्यांना आवडतही नसेल पण वडिलांनी म्हणा किंवा इतर कोणी अर्धवट कळत्या वयात सांगितल्यामुळे त्यांनी गणित निवडला पण त्यांची आवड दुसरीच असेल तर?>>

आईनस्टाईनच्या वडीलांचा पिढीजात व्यवसाय होता.त्यांना खरंच गणिताची आवड होती.पण व्यवसायाकडे लक्ष द्यावं लागल्याने ती अधिक विकसित करता आली नाही.
आईन्सटाईनचे वडील जर त्याच्यापेक्षाही हुशार असते तर त्यांनी गणिताचा अभ्यास करणं सोडलं नसतं.
माणूस एखाद्या विषयात किती हुशार आहे हे त्याच्या स्वत:च्या लक्षात आल्यानंतर आपली आवड किती पुढे न्यायची हे ती व्यक्तीच ठरवत नसेल का? आईन्सटाईनच्या वडीलांना कधीतरी गणिताकडे आपला कल असला तरी ५० जणांच्या उठून दिसू इतपतच ती आवड आहे असं दिसून आलं असावं त्यामुळे आपल्या मर्यादा लक्षात येऊन त्यांनी घरच्या व्यवसायाकडे लक्ष दिलं असावं.
याऊलट आईन्सटाईनबाबत घडलं असावं.त्याचं कुतूहल शमवण्याची जिद्दच इतकी मोठी असावी सोबतीला विज्ञानविषयसंबंधी आकलनशक्तीचा वेगही सामान्य माणसापेक्षा कैकपट दांडगा असावा.हे स्वत: आईन्सटाईनलाही माहित असावं.आपण वासरात लंगडी गाय शहाणी नसून चांगली धडधाकट,मजबूत,दुभती गाय आहोत हे त्याच्या लक्षात आलं असावं.
म्हणूनच हिटलरकडून होणार्‍या अत्याचारांचा त्रास होऊनही त्या त्रासामुळे वेगवेगळ्या देशात जावं लागूनही त्यानं आपलं संशोधन सोडलं नाही.यालाच मी अोढ असं म्हणतो.परिस्थिती कितीही कठीण आली तरी आपलं आवडीचं क्षेत्र न सोडणे.स्वत:च्या आवडीचा,स्वत:च्या झेपेची ऊंची नेमकी माहित असणे.

उपयोजक's picture

16 Feb 2019 - 9:51 am | उपयोजक

एकाच घराण्यात एकाआड एक असे गुणवंत निर्माण होत असतील तर यांना काय म्हणाल?

१. पृथ्वीराज कपूर ते रणबीर कपूर

२. डॉ.एम.के.सांबसिवम्
डॉ.एम.एस.स्वामीनाथन्
सौम्या स्वामिनाथन्
मधुरा स्वामिनाथन्

३. जमसेटजी टाटा ते रतन टाटा

इथे तर सलग साखळी आहे गुणवंतांची

अशी अजूनही काही कुटूंबे असतील.

एकाच घराण्यात एकाआड एक असे गुणवंत निर्माण होत असतील तर यांना काय म्हणाल )))))
अपवाद!!

बाकी धीरूभाईनंतर मुकलाभाई पण आहे आणि अनिलभै पण आहे यातच काय ते समजून जा..

विजुभाऊ's picture

1 Mar 2019 - 2:08 pm | विजुभाऊ

जमसेटजी टाटा ते रतन टाटा

इथे तर सलग साखळी आहे गुणवंतांची

अशी अजूनही काही कुटूंबे असतील.
इथे हे लोक एकमेकांचे आजोबा , मुलगा नातू नाहीत त्या अर्थाने एका घराण्यातील पण नाहीत.
राहूल देशपांडेंचे वडील फरसे परिचीत नाहीत. पणाजोबा वसंतराव देशपांडें सर्वत्र माहीत आहेत.

गणित,गायन,वादन यात अनुवंशिकता असते.
ज्योतिष शास्त्रांत निरनिराळे ग्रह विषयांची अनुकुलता/ संपर्क दाखवतात आणि ते सहसा चुकत नाही .

युयुत्सु's picture

2 Mar 2019 - 4:17 pm | युयुत्सु

मी गेले काही दिवस fbवर पाळीव प्राण्यांविषय़ीचे व्हिडीओज नियमित बघतोय. हे व्हिडीओ घरात पाळलेल्या वाघसिंहापासुन ते अजगर आणि वेगवेगळ्या पक्ष्यांपर्यंत आहेत. कुत्रा या पूर्ण रेंजचा मध्यबिंदू आहे.

हे व्हिडीओज बघताना प्राण्यांचे मानवीकरण किती वेगाने होते आहे, हे बघून मन अचंबित होते. घरातल्या लहान बाळांची काळजी घेणारी, त्यांचे पांघरूण सारखे करणारी, आजारी माणसांची काळजी घेणारी कुत्री, सोप्या बेरजा वजाबाक्या करणारी, नृत्य करणारी, इतकंच नव्हे तर गाणारी कुत्री बघून अचंबित व्हायला होते.

पाळीव प्राण्यांमध्ये वाढत असलेली ही मानव-सदृश वर्तन आणि बुद्धीमत्ता बघुन काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतात आणि पटतात

- आपली बुद्धीमत्ता जनुकांमध्ये असते. जनुकांचे व्यक्त होणे आजुबाजुच्या वातावरणावर अवलंबून असते. (नुकत्याच एका हायकोर्टाच्या निकालात या वास्तवाची दखल घेतली आहे).
- सुरक्षा, पोषण आणि चैतन्य (stimulation) ज्या वातावरणात मिळते तिथे बौद्धिक विकास झपाट्याने होतो.

वरील धाग्यात कुठेतरी वंश पुरुषाचा असतो असतो हे गृहित धरले आहे. ते मात्र चूक आहे. वंश स्त्रिचाच असतो (आज ना उद्या कायद्याला हे स्वीकारावे लागेल). तसेच आईकडुन मिळणारी जनुकीय देणगी जास्त असते. शिवाय पेशीपेटल पूर्णपणे आईकडून येत असल्याने एका अर्थाने आपले शरीर आईकडून येते पण त्याचे गुणधर्म (आई आणि वडील दोघांकडून येतात) असे म्हणणे गैर ठरणार नाही.

अभ्या..'s picture

2 Mar 2019 - 4:37 pm | अभ्या..

ओढ कशी आणि कुठून येते हे नाही सांगता येणार, अगदी माझ्या स्वतःच्या बाबतीत बोलायचे झाले तरी माझ्या घरात चार पाच पिढ्या कुणालाच चित्रकला येत नव्हती (अपवाद एक आत्या, पण तिचे लग्न माझ्या जन्माआधीच झालेले असल्याने तिची माझी भेट क्वचितच व्हायची) पण मला येतात चित्रे काढता. चित्रे काढताना पेशन्सची मात्र (सलग बारीक बारीक डेकोरेटिव्ह काम करणे) सवय लागलेली. आता घरात भावाची छोटी मुलगी आहे ती प्रचंड पेशन्सने क्राफ्ट करते. लहान लाहान मण्यांच्या माळा, ब्रेसलेटस, वगैरे पेस्टिंग, कलरिंग हे अगदि तिच्या वयाला शोभणार नाही इतक्या पेशन्सने तीन तीन तास करत बसते. पेंटिंग फारसे करत नाही पण घरातले कुठलेही बारीक बारीक काम मात्र चिकाटीने करते (उदा, मोदक, करंज्या बनवणे, सांडलेल्या बारीक वस्तू एकेक उचलणे, कागदाचे तुकडे न तुकडे गोळा करणे) चित्रे शिकवायला गेलो तर मोठे पॅच पण छोट्या ब्रशने हळूहळू आउटलाईनच्या बाहेर न येऊ देता भरत बसते. अशी चिकाटी घरात कुणाकडेच नाही. असे गुण कसे येतात ह्याचे मात्र नवलच वाटते.

उपयोजक's picture

9 Mar 2019 - 12:11 pm | उपयोजक

सेम पिंच! माझीही चित्रकला चांगली आहे.हे माझं नव्हे तर या क्षेत्रात काम करणार्‍यांचं मत आहे.पण गंमत अशी की माझ्या आई किंवा वडील किंवा त्या आधीचं कोणीही चित्रकला चांगली असलेलं माझ्या पाहण्यात नाही.