भाग 7 - हाणामारीला सुरवात

Primary tabs

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
28 Feb 2019 - 12:24 am
गाभा: 


भाग 7

-हाणामारीला सुरवात

11

1

वरील प्रातिनिधिक व्यूहरचनेतील तोफखाना इखलासखान याच्या नेतृत्वाखाली आधी पोहोचला असावा. त्याने कांचनबारीत एका उंचवट्यावरून दूरवर सिवाचे सैन्याचा पडाव पाहिला असावा.
2
मुघलसैन्याची वाट पहाणारे कांचनखिंडीच्या पायथ्यापाशी जमवाजमव करून राहिलेले महाराजांचे सैन्य.

3

तोफा डागून हलकल्लोळ माजवला तर अर्घे काम फत्ते होईल असे वाटून आपल्या तोफा खेचून आणत लावल्या असाव्यात. कमीतकमी 4 तरी असाव्यात. दारू ठासून, गोळे भरून वात बाहेर काढून गोलंदाजांची तयारी पाहून ‘फायर’ ची आज्ञा दिली असावी…
4

5

6

थांबत थांबत तोफगोळे उडत राहिले असावेत. मराठे फोजांची पांगापाग झाली. काही जखमी तर काही त्यात मारले गेले. असे तोफांचे सुरवातीचे आक्रमण सहन करावे लागेल याची जाणीव महाराजांना होती. कारण इखलासखान चांदवड बाजूने येताना त्यांच्या टेहळ्नी टिपला होता.

रसद, आणखी घोडदळ , पायदळ, शस्त्रास्त्रे यांची जमवाजमव करून दाऊदखान चांदवड किल्ल्याच्या भागातून तरातरा निघाला असावा. त्याने काही सैन्य कोलदेहेर कडील हमरस्त्यावरील खेळदरी गावापाशी नाके बंदीसाठी ठेवले असावे. इखलासखानाने (तोफखान्यावरील हा निष्णात आणि हिकमती पठानखान पुर्वी आदिलशाहीतून मुघलांच्यापदरी नोकरीला आला होता.) तोफांच्या सरबत्तीचा प्रभाव कितपत पडला असेल? त्याला काही धोका तर झाला नसेल? असा विचार करून

8

दाऊदखानाचे साधारण पाच हजाराच्या आसपास सैन्य इखलासखानाच्या मदतीला 14 किमी पार करून आले असावे. वाटेत त्याने खेळदरीत काही रसद व सैन्य मागे ठेवले असावे.

सिवा च्या सैन्याला हुसकावून लावून सुरतेच्या मालमत्तेला संपुर्ण मिळवायला आपले सध्याचे सैन्य अपुरे आहे. समजा ते तिथून सटकले तर त्यांना वणी ते दिंडोरीच्या रस्त्यावर अडवायला हवे वगैरे विचार करत तो 16 ऑक्टोबरच्या रात्री कांचनगडाच्या पायथ्याशी आला असावा.


दि 26 फेब्रुवारी 2019 ला भारताने पाकिस्तानच्या शेपटीवर पाय देऊन ठेचायची खेळी केली. 2 विमाने पाडल्याचे, 2 अधिकारी पकडल्याचे जुन्या अपघाताचे फोटो दाखवून खोटे पडल्यावर मोढ्या तोंडाने "गप गुमान, आमच्याशी बोलणी करायला या" असा वारंवार बुलावा वझीरे आझम इम्रानखान देत आहे....
त्यांचे "बोलणी करायचे निमंत्रण मान्य करा" असे म्हणणारे काही महाभाग चर्चेत भाग घेताना पाहून असेच करायचे होते तर इतका खटाटोप कशाला का केला असे वाटावे.

प्रतिक्रिया

करमरकर नंदा's picture

28 Feb 2019 - 9:06 am | करमरकर नंदा

सध्याच्या काळात सुरू असलेल्या धामधूमीच्या पार्श्वभूमीवर
हा भाग वाचताना वेगळाच अनुभव होत आहे.

शशिकांत ओक's picture

28 Feb 2019 - 6:06 pm | शशिकांत ओक

शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राचा सूक्ष्म अभ्यास केला तर साहस आणि कल्पकता यातून आणीबाणीच्या परिस्थितीत कशी मात करायची याचा वस्तुपाठ ते घालून देतात.
सध्याच्या परिस्थितीत जो पर्यंत आतंकवाद्यांचे अड्डे पाकिस्तान आपणहून नष्ट करत नाही तोपर्यंत दबाव वाढवत जायचे आहे.

जबराट चालली आहे लेखमाला.

दुर्गविहारी's picture

1 Mar 2019 - 5:00 pm | दुर्गविहारी

जबरदस्त आणि चित्रदर्शी लिखाण. पु.भा.प्र.

बबन ताम्बे's picture

1 Mar 2019 - 10:29 pm | बबन ताम्बे

शिवाजी महाराजांनी सुरत लुटली या एका वाक्यात शालेय इतिहास संपतो. पण ती मोहीम यशस्वी करायला त्यांनी केव्हढे नियोजन केले असेल, केव्हढी रिस्क घेतली असेल आणि माणसे , सेना हाताळताना नेतृत्वगुणांचा केव्हढा कस लागला असेल हे तुमची लेखमाला वाचून कल्पना येते. आपण या लेखमालेसाठी घेतलेल्या प्रचंड कष्टांना सलाम.

विजुभाऊ's picture

5 Mar 2019 - 11:34 am | विजुभाऊ

शालेय इतिहास सोडून द्या हो.
शालेय इतिहास हा सिकंदर महान होता. हे साम्गतो पण तो भारतात येवून पराभूत होऊन गेला हे साम्गत नाही.
अकबर हा महान राजा होता असे साम्गणारा इतिहास हे साम्गत नाही की त्याने चितोडवर हल्ला करून राणाप्रताप ला देशोधडीस लावले होते.
फतेपूर सिक्रीचा बुलंद दरवाजा हा चितोड वर विजय मिळवला याचे स्मारक आहे.
शालेय इतिहासात शिवाजीच्या अगोदर झालेल्या मराठी राजंची नावे कधीच साम्गत नाहीत.
संभाजीच्या बुर्हाणपूर मोहीमेबद्दल , पोर्तुगीजांवरच्या स्वारीबद्दल काहीही साम्गत नाही.
९ थोडक्यात शालेय इतिहास हा कधीच भारतीय राजे हे चंगले योद्धे होते, शूर्वीर होते, विजेते होते हे सांगत नाही. उलट परकीय आक्रमकंचे गोडवे गाण्यात धन्यता मानतो)
शालेय इतिहास हिरोजी फर्जंद हा शिवाजी महाराजांचा सावत्र भाऊ होता हे साम्गत नाही.
शालेय इतिहास शिर्क्यानी फंदफितुरीने संभाजी महाराजाना कसे अडकवले हे साम्गत नाही.
शालेय इतिहास हा जेब चार्नॉक ने इंरजांनी कलकत्त्याला राजधानी का व कशी हलवली हे संगत नाही
शालेय इतिहास हा तद्दन खोटा इतिहास आहे.

शशिकांत ओक's picture

5 Mar 2019 - 9:56 pm | शशिकांत ओक

काय घुसवायचे आणि काय लपवायचे हा खेळ शिक्षणखात्याचा नेहमीचाच पाठ्यक्रम आहे.

करमरकर नंदा's picture

1 Mar 2019 - 10:52 pm | करमरकर नंदा

कुठलीही मोहीम सुरू करताना व नंतरच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते हे मिलिटरी कमांडरच्या नजरेतून अभ्यास केल्यावर ध्यानात येते.
याचा प्रत्यक्ष अनुभव आपण सध्या घेत आहोत.
खरा प्रश्न आहे की ही हस्तगत मालमत्ता त्यांनी शेवटपर्यंत सांभाळून आणता येईल असे काय नियोजन केले असावे? यावर प्रकाश टाकायची गरज आहे.
शिवाय ह्या मालातील जडजवाहीर, सोने चांदी वापरून कसबी कारागीरांमार्फत राज्याभिषेकाच्या सोहळ्यात ३२ मणाचे सिंहासन बनवायला केला असावा असे म्हणता येईल का यावर विचार केला गेला पाहिजे.

नंदा करमरकर आणि मित्र हो,
पुण्यातील इतिहास संशोधक मंडळात

"मिलिटरी कमांडरांच्या नजरेतून - नरवीर तानाजी मालुसरे यांची यशोगाथा"

या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.
दि 17 मार्च 2019 रविवार.
सायंकाळी वाजता...

या संस्थळावर हजारांच्या संखेने सदस्यांनी विविध धाग्यातून वेगवेगळ्या लढायांविषयी लेखन वाचलेले आहे...
ज्यांना शक्य असेल त्यांना पॉवर पॉईंटवरून केलेले विचार दर्शन ऐकायला यायची सोय आहे.

करमरकर नंदा's picture

10 Mar 2019 - 11:39 pm | करमरकर नंदा

मिसळपाव सदस्यांना आपण आपल्या व्याख्यानाचे निमंत्रण मिळाले. वेळ कळवलीत तर वेळेवर पोहोचायला मदत होईल. भरत नाट्य मंदिराच्या परिसरात कार पार्किंगची व्यवस्था कुठे आहे हे समजले तर बरे होईल.
आपण सादर केलेल्या धाग्यातून नवनवीन माहिती वाचायला मिळते. म्हणून उत्सुकता ताणली गेली आहे.

शशिकांत ओक's picture

12 Mar 2019 - 11:33 am | शशिकांत ओक

सुरवात होईल.
स्थळ:- भारत इतिहास संशोधक मंडळ भरत नाट्य मंदिराच्या जवळ. पुणे.
दि 17 मार्च 2019 रविवार.