दुबई फिरण्यासाठी -- मार्च महिना

रिग पिग's picture
रिग पिग in भटकंती
18 Feb 2019 - 2:15 am

नमस्कार,
मार्चच्या 3ऱ्या आठवड्यात सहकुटुंब दुबई फिरण्याचा विचार आहे.
भेट देण्याची मुख्य स्थळे,
१. लेगो लॅण्ड (રૂपार्क / ३ दिवस)
२. डेझर्ट सफारी (१ रात्र)
३. डॉल्फिन मत्स्यालय / स्की दुबई
४. तिकडे गेल्यावर सुचतील ती स्थळे

३ मुले वयवर्षे ५, १० व १२ आणि आम्ही दोघे सोबतीला (सहल -- फक्त मुलांसाठी)
--- हि सहल झाल्यावर(च) आम्ही दोघे "एकटे" सहलीवर जाऊ शकतो अशी डिल केली आहे.---

सध्या राहण्यासाठी हॉटेलचा पर्याय जवळपास बाद केलाआहे.सर्वांसाठी १खोली मिळणेअवघड आहे.
१२ वर्ष पूर्ण म्हणजे ॲडल्टमध्ये समावेश होतोय.आणि २रूम घेतल्या तर एकात मला एकटयाला रहावे लागेल.
तिघांनाही आई त्यांच्या बरोबर पाहिजे.
एअर बि.एन.बी.चा पर्याय चांगला वाटतोय शिवाय बजेटपण सांभाळले जाईल.

६ रात्र राहण्याचा प्लॅन आहे.
कोणी जाऊन आले असल्यास आणखी काही स्थळे सुचवा.
गुगलवरील सर्चप्रमाणे मार्चमध्ये उष्णता ठिक आहे बाहेर फिरण्यासाठी.
व्हिसासंबंधी आणि राहण्यासाठी प्रत्यक्ष जाउन आलेल्यांकडुन माहिती मिळाल्यास उत्तम

धन्यवाद

प्रतिक्रिया

मंदार कात्रे's picture

18 Feb 2019 - 7:19 pm | मंदार कात्रे

गुगलवरील सर्चप्रमाणे मार्चमध्ये उष्णता ठिक आहे बाहेर फिरण्यासाठी.
साधारण १५ ते २० मार्च नन्तर तापमान वाढू लागते . खरे म्हणजे फेब्रुवारी बेस्ट!

jinendra's picture

19 Feb 2019 - 12:52 am | jinendra

मंदार,

तुम्ही दुबई मध्ये जाऊन बिग बस चे ७ days package घ्या,साधारण ११०० दिरहम (२१०००) मध्ये प्रती व्यक्ती मिळेल पण त्या मध्ये ७ दिवसाचे मोस्ट ऑफ ऑल attractions आहेत, शिवाय सगळी एन्ट्री फी असते. खूप attractions include आहेत नाहीतर खूप महाग पडते, मी नुकताच (जाने २०१९) दुबई करून आलो आहे खूप खर्च झाला कारण package घेतले नाही.

तुम्ही पॅकेज घ्या कितीही वेळ तुम्ही एकद्या पॉइंट वर थांबू शकता, बिग बस सगळीकडे १५ मिनिटाच्या अंतराने available असतात, पॉइंट झाला की बिग बस मधून दुसरीकडे जायचे. मस्त सोय आहे.

आणखी माहिती हवी असेल तर व्यनी करा.

शिवाय सगळी एन्ट्री फी package मध्ये include असते, प्रत्येक ठिकाणी वेगळी फी द्यावी लागत नाही. हॉटेल goibibo वर बुक करा स्वस्त पडेल.

संदिप एस's picture

20 Feb 2019 - 11:19 am | संदिप एस

ह्या तर हॉप ऑन हॉप ऑफ बसेस असतात ना? नवीन माणसाला तर काहीच माहीत नसतांना काही प्रॉब्लेम्स नाही होणार का?

तुमचा ईमेल ईथे किंवा विपू मधे शेअर करा- मी ईथे ३ वर्षांपासून रहातोय- की-अ‍ॅट्रॅक्शन्क्स ची फाईल आणी डिटेल प्लॅन सेंड करतो- त्याची खूप मदत होईल टूर प्लॅन करतांना- मला फोन केला तरी चालेल - ९७१-५२६७५५९४२

रिग पिग's picture

20 Feb 2019 - 4:46 am | रिग पिग

व्यनि केला आहे
धन्यवाद

वेदांत's picture

20 Feb 2019 - 10:28 am | वेदांत

व्यनी केला आहे

पाठवले आहेत सगळे डिटेल्स दोघांन्ना. आता पुढील संवाद ईमेल वरच केला तरी चालेल :-)
सॉरी मराठी टायपिंग म्धे मधे खूप चूका असतील तर-मी जास्त वाचन मात्र मोड मधेच अस्तो .