मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुलावरचा न्हावी

विसुनाना · · कलादालन
नमनाचे तेलः माझी बायको ऑईल, वॉटर आणि पोस्टरकलर अशा माध्यमात चित्रे काढत असते. तिची काही चित्रे इथे तुम्ही पाहिली होतीच. इतकी वर्षे तिची चित्रकारी पाहता-पाहता मलाही रंगांशी खेळायची हुक्की आली. आमच्या गावात एक आर्किटेक्ट/लेखक/कवि/नाट्यकर्मी कलाकार आहेत - प्रकाश धर्मा म्हणून. अत्यंत हरहुन्नरी माणूस. स्वतः उत्कृष्ट चित्रकार. त्यांनी एक प्रयोग म्हणून नवशिक्या, अर्धशिक्षित आणि अनुभवी चित्रकारांना वॉटरकलर चित्रकला शिकवायला सुरुवात केली. दर रविवारी सकाळी उस्मानिया युनिव्हर्सिटीच्या परिसरात हा प्रयोग सुरू असतो. (हे वाचून इथल्या कुणाला हुक्की आली तर तेही सामिल होऊ शकतात. प्रवेश विनामूल्य!) मीही त्या प्रयोगात नवशिक्या म्हणून सामिल झालो. चुकत माकत काही कागद आणि बरेच रंग खराब केले. अजून करतोच आहे. मी रंगवलेले एक चित्र येथे देण्याचे धाडस करतो आहे. काही चुकलंय असं वाटलं तर सांगा. काही बरं वाटलं तर श्रेय 'मास्टरजींना'. :) आता चित्र : Image removed. शीर्षक : पुलावरचा न्हावी (द बार्बर ऑन द ब्रिज) माध्यम : वॉटरकलर (जलरंग) आकार : ६ इंच * ४ इंच अंदाजे. चित्राबद्दल थोडेसे : दररोज ऑफिसला जाताना मला नल्लाकुंटा नाल्यावरील पुलाच्या फुटपाथवर हा न्हावी आपले दुकान मांडून बसलेला दिसतो. हे दृष्य मला कालौघातील दोन बिंदूंना जोडणार्‍या पुलासारखं दिसतं. म्हणून चित्राचं नाव 'न्हाव्याचा पूल' किंवा 'द ब्रिज ऑफ द बार्बर' असं द्यावं काय? असाही विचार मनात डोकावतो. (स्पष्टीकरण : जागतिक नकाशावरच्या आजच्या शहरात अजूनही साठ सत्तर वर्षांपूर्वीच्या खेड्यात पिंपळाच्या पारावर हजामतीचं दुकान मांडणारे न्हावी दिसतात. )

वाचन 8942 प्रतिक्रिया 0