कलादालन विभाग बंद करण्यात आला आहे का?

समर्पक's picture
समर्पक in मिपा कलादालन
12 Feb 2019 - 12:08 am

काही उपक्रम चालू करण्याचे मनात होते परंतु मुखपृष्ठावर तसेच वरच्या 'साहित्य प्रकार' मेनू मधून पाहिल्यावरही शेवटचा धागा २०१६ चा दिसतोय, तसेच मध्ये एक चित्रलेख प्रकाशित केलेला तो 'मिपा कलादालन' अशा टॅग खाली दिसतोय.

माझ्या मते 'कलादालन' व 'मिपा कलादालन' असे दोन भाग झाले असून 'कलादालन' मध्ये नवे लिखाण करण्याची सोय नाही आणि 'मिपा कलादालन' मधले लिखाण हे अदृश्य राहते आहे.

संपादक मंडळ, कृपया दखल घ्यावी व मार्गदर्शन करावे हि विनंती

प्रतिक्रिया

समर्पक's picture

12 Feb 2019 - 12:10 am | समर्पक

नवे लेखन पानावर सुद्धा वरच्या साहित्य प्रकारांमध्ये कलादालन दिसत नाही हे आत्ताच लक्षात आले

कंजूस's picture

12 Feb 2019 - 4:17 am | कंजूस

जुने कलादालन - http link इथे

नव्याची लिंक एचटीटीपीएस आहे, जुन्याची एचटीटीपी.

समर्पक's picture

12 Feb 2019 - 10:21 am | समर्पक

मुख्य समस्या नवीन लेखाची आहे, उदा. हा लेख प्रतिसाद येईपर्यंत केवळ ‘नवीन प्रतिसाद‘ मध्ये दिसेल. मुखपृष्ठावर व कलादालनात दिसणार नाही...

कंजूस's picture

12 Feb 2019 - 10:43 am | कंजूस

हो.

नवीन लेखन तंत्रद्न्यानात दोन ओळी लिहून तिथे लिंक द्यावी लागेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Feb 2019 - 12:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

कलादालन विभाग उत्तम रितीने चालू आहे. हल्ली तेथे फार कमी प्रमाणात लेखन/प्रदर्शन होत आहे, हे मात्र खरे आहे.

या साहित्यप्रकारातील सर्व लेख मुख्य बोर्डावरही दिसत आहेत. मात्र, तेथील लेख, प्रकाशनाची तारीख-वेळ/प्रतिसादाची तारीख-वेळ यांच्या क्रमाने दिसतात. सद्या कमी प्रमाणात लेखन/प्रदर्शन/प्रतिसाद होत असल्याने ते मागे गेलेले आहेत. या प्रकारातील नवीन लेख/प्रतिसाद आल्यास, तो लेख मुख्य बोर्डावर दिसू लागेल.

१. कलादालनात लेखन/कलाप्रकार टाकण्यासाठी खालील प्रक्रिया वापरा :

आवागमन (मुख्य पानाच्या उजवीकडील कॉलमामधील वरून तिसरा चौकोन) --> लेखन करा --> मिपा कलादालन --> प्रकाशन

२. कलादालनातील लेखन/कलाप्रकार पाहण्यासाठी खालील प्रक्रिया वापरा :

अ) साहित्य प्रकार (शीर्षकपट्टीतील पहिला पर्याय) --> मिपाकलादालन --> यादीतील तुमच्या पसंतीच्या लेखाच्या शीर्षकावर टीचकी मारा

आ) मिपा सुरू केल्यावर दिसणार्‍या पहिल्या पानावरही कलादालनातील काही लेखांची यादी दाखवणारा चौकोन दिसत आहे. त्याच्या तळामधील, "अजून पहा" हा पर्याय वापरून कलादालनातील सर्व लेखांची यादी उघडता येते.

या प्रकारातील नवीन लेख/प्रतिसाद आल्यास, तो लेख मुख्य बोर्डावर दिसू लागेल.

सदर लेख कलादालन विभागात असून मुख्यपृष्ठावर तो दिसत नाही. हाच मुद्दा मी मांडतो आहे.

अ) साहित्य प्रकार (शीर्षकपट्टीतील पहिला पर्याय) --> मिपाकलादालन --> यादीतील तुमच्या पसंतीच्या लेखाच्या शीर्षकावर टीचकी मारा

इथे कलादालन विभाग असून 'मिपाकलादालन' दिसत नाही (मला तरी) वर लेखात दिलेल्या दोन्ही लिंक पाहता हे दोन वेगळे विभाग झाले आहेत हे लक्षात येईल. त्यातील नवीन विभागात नव्या लेखनाची सोय आहे तर जुना विभागच अजूनही मुख्यपृष्ठावर दिसत राहतो. त्यामुळे कितीही नवे लेखन या विभागात झाले तरी "ठिपक्यांची मनोली"च अनंत कालपर्यंत दिसत राहील, सुधारणा न केल्यास...
'अजून पहा' मध्ये सुद्धा 'कलादालन' टॅग असलेले जुनेच लेख दिसत राहतील. 'मिपा कलादालन' टॅग असलेले नवे लेख दिसणार नाहीत.

आवागमन (मुख्य पानाच्या उजवीकडील कॉलमामधील वरून तिसरा चौकोन) --> लेखन करा --> मिपा कलादालन --> प्रकाशन

पुनश्च, नवीन लेखन हे 'मिपा कलादालन' विभागात होईल, कलादालनात नव्हे.

बघा पटतंय का...

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Feb 2019 - 10:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

मी वर जशी लिहिली आहे, तशीच प्रक्रिया वापरून, मिपा कलादालनात आताच प्रसिद्ध केलेला एक सचित्र प्रायोगिक लेख, खालील दुव्यावर पाहता येईल.

https://www.misalpav.com/node/44103

तो मुख्य पानावरच्या, "नवे लेखन" पर्यायाच्या यादीत वरच्या स्थानावर आलेला दिसत आहे.

अ) साहित्य प्रकार (शीर्षकपट्टीतील पहिला पर्याय) --> कलादालन -->
आ) मिपा सुरू केल्यावर दिसणार्‍या पहिल्या पानावरही कलादालनातील काही लेखांची यादी दाखवणारा चौकोन दिसत आहे. तेथे --->

सध्या तो मुख्य पानावरच्या, "नवे लेखन" पर्यायाच्या यादीत वरच्या स्थानावर आलेला दिसत आहे, परंतु नंतर कधीही तो त्याच्या विभागात शोधता येणार नाही...

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Feb 2019 - 8:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

सध्या तो मुख्य पानावरच्या, "नवे लेखन" पर्यायाच्या यादीत वरच्या स्थानावर आलेला दिसत आहे, परंतु नंतर कधीही तो त्याच्या विभागात शोधता येणार नाही...

वर सांगितल्याप्रमाणे जुने लेख नाहिसे होत नाही तर यादीत खालच्या स्थानांवर जातात. ते शोधण्यासाठी खालीलपैकी सोयीची असेल ती एक कृती वापरता येईल :

१. मुख्य पान व कलादालनाचे पान, या दोन्हींच्या खाली पान क्रमांक बदलायची बटणे आहेत. ते वापरून, पाने उलटून, तुम्ही जुने लेख शोधू शकता. ते बटण बहुदा तुमच्या नजरेआड झाले असे वाटते.
आतापर्यंत कलादालनात प्रसिद्ध झालेल्या लेखांच्या यादीची एकूण ६२ पाने आहेत, हे त्या बटणामध्ये दिसत आहे. पानाच्या आकारावरील सीमेमुळे, एका पानावर मोजके लेख दिसणे अपरिहार्य आहे. त्यामुळे, जुनेजुने लेख मागमागच्या पानावर जाणे सहाजिकच आहे. मात्र, जुने लेख कधीच शोधता येणार नाही, असे नाही.

२. एखादा जुना लेख पटकन शोधायचा असल्यास, एक एक पान तपासून पाहण्याऐवजी (पक्षी : वरच्यापेक्षा), दुसरी अगदी सोपी कृती अशी आहे...

गुगलमध्ये... misalpav.com + लेखाचे शीर्षक / लेखाच्या शीर्षकातील महत्वाचा शब्दसमूह... अशी विचारणा केल्यास, दिसणार्‍या दुव्यांच्या यादीत, तो लेख व त्याचा दुवा दिसेल.

उदा : misalpav.com + लॉकहार्ट व्हॅली, हा शब्दसमूह वापरून "लॉकहार्ट व्हॅली" हा समर्पक यांनी, 11 Sep 2012 रोजी 22:50 वाजता, मिपाच्या कलादालनात प्रसिद्ध केलेल्या लेखाचा दुवा गुगल समोर आणतो... त्याच्यावर क्लिक करून तो धागा मिपामध्ये उघडला जातो.

समर्पक's picture

12 Feb 2019 - 10:16 pm | समर्पक

यातील एकही लेख, बर्‍याच अलिकडल्या काळातील असूनही कलादालनात दिसत नाही...

https://www.misalpav.com/node/43726
https://www.misalpav.com/node/41526
https://www.misalpav.com/node/41236
https://www.misalpav.com/node/39922

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Feb 2019 - 8:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

वर सांगितलेल्यापैकी एक कृती (पटकन लेख शोधायचा असल्यास क्र २ ची कृती) वापरून वरच्यासकट तुम्हाला हवा असलेला लेख शोधता येईल.

कंजूस's picture

13 Feb 2019 - 6:51 am | कंजूस

@समर्पक यांच्या म्हणण्याप्रमाणे डॅाक तुमचा लेख 'नवीन लेखन'च्या यादीत आलेला दिसतो आहे परंतू जुन्या/नव्या कलादालनातील मनोल्यांना उडवून तिथे बसत नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Feb 2019 - 8:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुम्हाला काय म्हणायचे हे समजले नाही.

पण, वर सांगितलेल्यापैकी दोनपैकी एक कृती (पटकन लेख शोधायचा असल्यास क्र २ ची कृती) वापरून तुम्हाला हवा असलेला लेख शोधता येईल.

कंजूस's picture

13 Feb 2019 - 9:08 pm | कंजूस

जाऊ द्या.

समर्पक's picture

13 Feb 2019 - 11:39 pm | समर्पक

असेच म्हणतो...

समर्पक's picture

13 Feb 2019 - 11:48 pm | समर्पक

अधिक उलगडून सांगण्याच्या नादात मी वाद घालतोय असे नको व्हायला...

फार अति महत्वाचे असे काही नाही यात...

कंजूस's picture

14 Feb 2019 - 6:08 am | कंजूस

कलादालन, भटकंती आणि तंत्रद्न्यान यातील लेखांसाठी संपादन बटण ठेवले आहे ही उपयोगाची गोष्ट आहे. फोटो बदलता येतात स्वत:ला.

समर्पक's picture

14 Feb 2019 - 10:14 am | समर्पक

आभार सा.सं. ! _/\_